परवा सावंत नावाचा मित्र भेटला...
प्रोपर सावंत वाडीचा ..
गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत..
काहि फेसबुकावर पण आहेत..
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
म्ह्णजे??
ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे
त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला...
काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का?
बघतो ना....
त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो...
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली..
किति विविधता आहे..ना?
एकिकडे मालवणी मटन.वडे आंबोळी..तर इकडे पुरणपोळी..तांबडा पांढरा..झणझणीत..तर तिकडे सावजी मटण..
किति विविधता आहे महाराष्ट्रात
वाचने
8757
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर
योग्य बोललास रे अवि.
त्या विविधतेला आमचा सलाम.
आता 'कुलकर्णी' आडनावाचा उहापोह करायचा म्हण्टला तर धागा तासाभरात शतक ठोकेल. कुलकर्णी की कुळकर्णी पासूनच सुरुवात होईल.
काय स्थ
एकदा गोळवलकर गुरुजींना कोणीतरी विचारले कि तुमची जात कोणती. त्यांनी उत्तर दिले कि मी कायस्थ आहे. पृच्छकाने पुन्हा विचारले कि ते कसे. गुरुजींनी उत्तर दिले - मी या कायेत रहातो म्हणुन मी काय स्थ आहे.
अहो दोनच जाती आहेत 'स्वस्थ ,
अहो दोनच जाती आहेत 'स्वस्थ , सावकाश ' आणि दुसरी 'उरकणे'
त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/...
माझ्या सावंत आडनावाच्या अनेक मित्रांपैकी २ नवबौद्ध आहेत. किति विविधता आहे महाराष्ट्रात.
तुम्ही सन्यास घ्यावा अशी इच्छा नाही पण उगाच काहीतरी फालतू धागे काढू नका काका.
आडनावावरुन जात ओळखणे सद्या
In reply to त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/... by गड्डा झब्बू
आडनावावरुन जात ओळखणे सद्या तरी कठिण होत चालले आहे. त्यात सावंत, कदम, पाटील, मोरे ही आडनावे सर्व समावेशक आहेत यात सर्व ब्राह्मणेतर जाती येतात.
आता काही नवबौध्द जोशी आडनाव लावतात त्याला काय म्हणायचं..
असो
पाटील आडनावाचे ब्राह्मण देखील
In reply to आडनावावरुन जात ओळखणे सद्या by खटपट्या
पाटील आडनावाचे ब्राह्मण देखील पाहण्यात आले आहेत...जॉर्ज फर्नाडीस ने हरवलेले स.का.पाटील ब्राह्मण होते असे कुठेतरी वाचण्यात आले आहे.
पूर्वीच्या काळी जे वतनदार
In reply to आडनावावरुन जात ओळखणे सद्या by खटपट्या
पूर्वीच्या काळी जे वतनदार किंवा सरदार घराण्यातील लोक होते, त्यांचे एक विशिष्ट कारभारी किंव्हा खास मुख्य अधिकारी असत व लीहणे , हिशोब ठेवणे या सारखी कामे करणाऱ्या व्यक्ती ह्या बहुतेक ब्राम्हण समाजातील होत्या. त्यांना त्या सरदारांचा शिक्का उठवणे व सही करण्याचे अधिकार देखील ज्या, त्या सरदारांनी दीले असत. कालांतराने त्या मराठा सरदारांची नावे देखील त्यांना चिकटली. उदारणादाखल हेरल्याचे शिंदे, इचलकरंजीचे घोरपडे, मोरेे. ह्या जुन्या काळातल्या कारभाऱ्यांनी आपल्या धन्याच्या अनुपस्थितीत, संकटकाळात जीवाची बाजी लावून आपला इमान देखील त्यांनी जपला होता. पाटील,नाईक, देसाई मुतालिक हि आडनावे मात्र कामाच्या पदावरून पडली आहेत. हे किती जरी कांहीं असले तरी मी.पा. वरील लेखकांची नावे ही मात्र फारच मनोरंजक व निधर्मिक आहेत व ती कायमची चीकटण्याचा देखील भीती नाही.
देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार
त्यात काय मजा वाटायची ? देशावरचे ते देशस्थ आणि कोकणातले ते कोकणस्त. मग ते कोणत्याही जातीचे असोत... अगदी मुसलमानही स्वतःला कोकणस्थ आणि देशस्थ म्हणवुन घेतात.
असो.
+१ खटपट्या
In reply to देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार by खटपट्या
+१ खटपट्या
गोव्यात तर ख्रिश्चन सुद्धा
गोव्यात तर ख्रिश्चन सुद्धा RCB म्हणजे रोमन कॅथॉलिक ब्राम्हण म्हणून जात असून ह्यांच्या विवाहविषयक स्तंभात नवभारत टाइम्स या वृत्तपत्रात जाहिराती येत असत. हे म्हणजे पूर्वाश्रमीचे सारस्वत (ब्राम्हण) बाटल्यानंतर रोमन कॅथॉलिक झाले. पण त्यांनि आपली जात टिकवून ठेवली आहे आणि इतर जातींमध्ये लग्न करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही.