सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
वाचने
80680
प्रतिक्रिया
272
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन पण ....
ज्या निर्धाराने अश्विन व
In reply to अभिनंदन पण .... by गामा पैलवान
चौथी कसोटी
भालताचे प्रमुख गोलंदाज सैनी,
खरं तर ४ कसोटी सामनेच खेळलेत.
In reply to भालताचे प्रमुख गोलंदाज सैनी, by श्रीगुरुजी
चौथी कसोटी - दिवस १
रहाणेने लाबुशेनचा सोपा झेल
सावकाश अन स्थिर
४००+
In reply to सावकाश अन स्थिर by तुषार काळभोर
तसेच वाटत आहे
In reply to ४००+ by श्रीगुरुजी
३५० च्या आत
ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३६९. भारत
स्व. चुका
आपल्या चूका, आपली विकेट
In reply to स्व. चुका by गोंधळी
चौथी कसोटी दिवस दोन
चौथ्या दिवशी सोमवारी दिवसभर
In reply to चौथी कसोटी दिवस दोन by तुषार काळभोर
संघर्ष
चौथी कसोटी चौथा दिवस
१९६/५, स्मिभ ५५ वर बाद.
सुटलेले कॅचेस
ब्रिस्बेनवर ४ थ्या डावात धावा
अशा त-हेने पुन्हा एकदा....
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात
सामना ड्रॉ होइल
नेहमीच बॅकफूटला कशाला?
कसोटी सामन्यात पॉवरप्ले, ३०
In reply to नेहमीच बॅकफूटला कशाला? by मुक्त विहारि
अवघड असेल पण
In reply to कसोटी सामन्यात पॉवरप्ले, ३० by श्रीगुरुजी
असहमत,
In reply to अवघड असेल पण by मुक्त विहारि
जवळपास ३.५ च्या रनरेटनं धावा
बरोबरै. आणि पहिल्या
In reply to जवळपास ३.५ च्या रनरेटनं धावा by राघव
सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे.
उद्या
चौथी कसोटी पाचवा दिवस
१०० वर १
In reply to चौथी कसोटी पाचवा दिवस by तुषार काळभोर
आक्रमक
In reply to १०० वर १ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही चमत्कार घडला तरच सामना
३७ षटकात हव्यात १४५ धावा. सात
२१ षटकांत १०४ धावा. जवळपास ५
सामना जिंकणार ?
शीट...
In reply to सामना जिंकणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशी संधी पुन्हा येणे नाही.
In reply to शीट... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माय गॉड
वाशिंग्टनचा बेजवाबदार फटका.
In reply to माय गॉड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जवळ जवळ जिंकत आणलाय
पंत आहे
In reply to जवळ जवळ जिंकत आणलाय by तुषार काळभोर
१० हव्या
अजून ४ षटके आहेत
शार्दूलही जमा.
३ धावा हव्या आहेत.ठाकुर गेला.
अरे जिंकलो.
जिंकलो बे आपण....
जिंंकलो. मस्त जिंकलो.
जबरदस्त!
संस्मरणीय विजय आणि दीर्घकाळ
दौरा संपला
टिम इंडीयाचे
भारी मॅच झाली
पंतचे यष्टीरक्षण सुमार आहे.
In reply to भारी मॅच झाली by ज्ञानोबाचे पैजार
भारी जिंकलो!!
आता बहुतेक स्मिथ पुन्हा एकदा
याहू !!! लै म्हन्जी लैच खूष
सुरूवातीचे २ एकदिवसीय सामने