गोठलेले शब्द या जालिंदरांच्या कविता संग्रहातील एक कविता येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक हा संग्रह माझ्याकडे नाही. पण ती कविता कधीकाळी त्यांच्या 'भाषणाच्या बदल्यात भाकरी' या भाषणादरम्यान त्यांनी म्हटली आणि मी लिहून घेतली होती असे फिकट आठवते आहे. एखादेवेळी ही कविता त्या संग्रहात संग्राहित केली नसण्याची शक्यताही आहेच. पण आस्वाद घ्यायला काय हरकत? माझ्याकडील कविता एका जीर्ण पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने लिहिली होती. कवितेतील काही शब्द वृत्त-मात्रांत बसत नसतील तर दोष त्या कागदाच्या प्रतिचा अथवा शाईच्या टिकून न राहण्याच्या गुणधर्माचा आहे.
दक्षीण धृवावर तीस किलोमिटरने अंदाज चुकून हावईछ्त्रीतून खाली उतरलेले जालिंदर जलालाबादी पेंग्वीनच्या थव्यात उतरले. तीथले वातावरण ते त्यांच्या गोठलेल्या शब्दांत कसे वर्णन करतात ते पाहा.
*
किती बर्फ साठला युगानुयुगे तो
की वातावरण नुसते गोठून होते
पृथ्विच्या धृवावर असे काय झाले
की पक्षी सगळे स्तब्ध नि:शब्ध होते
**
पाण्यावरुन आकृती या हिमाच्या
तरंगती जशी मेरु-मांदार असावीत
की मागे तयांच्या कुणी गूढ गणिती
असेल का? विचारून पडलो बुचकळ्यात मी
***
या कवितेची प्रेरणा जालिंदरजींनी धनंजय यांच्या धुकट सकाळ या कवितेतून घेतली आहे की धनंजयांनी जलालाबादींचे स्मरण करुन त्यांची कविता लिहिली होती या वादात आम्ही पडू ईच्छित नाही. या दोन्ही कवितांचा आस्वाद घ्यावा असे आम्हांस वाटते.
जाताजाता रसग्रहणाबाबत थोडे :- कवितेमध्ये आलेला गणिती हा, 'हिमनग एक अष्टमांश पाण्याच्यावरती की खाली की कसे?' याचा शोध घेणारा आहे. जालिंदरांची प्रतिभा वातावरणाचे वर्णन करण्यात फक्त गुंगली नसून ती निसर्गाचे गूढ नियम शोधणारी बुद्धीनिष्ठ आणि सूचक आहे हेच यावरुन आम्हांस दिसते.
--लिखाळ.
(आम्ही उरलो टंकलेखनापुरते)
Taxonomy upgrade extras
वाचने
5825
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास...
जालिंदरां
In reply to खल्लास... by श्रावण मोडक
'जालिंदर
जालिंदरां
In reply to 'जालिंदर by निखिल देशपांडे
अहाहा ..
अतिशय थंड
In reply to अहाहा .. by पहाटवारा
ठ्ठो !
जय हो बाबाकी!
कष्टपूर्व
In reply to जय हो बाबाकी! by प्रमोद देव
प्रमोदकाक
In reply to जय हो बाबाकी! by प्रमोद देव
शेवटचा
In reply to जय हो बाबाकी! by प्रमोद देव
प्रतिक्रि
ठ्ठो !
कहर!!!
मस्तच
वा!
प्रो.
In reply to वा! by आंबोळी
ठ्ठ्यॉ...
लै भारी!
मला लोकसंगीत वाटले होते :-(
हे सर्व
In reply to मला लोकसंगीत वाटले होते :-( by धनंजय
शॉल्लिट...
In reply to हे सर्व by भडकमकर मास्तर
सहमत!!!
In reply to हे सर्व by भडकमकर मास्तर
धन्य
In reply to मला लोकसंगीत वाटले होते :-( by धनंजय
राजकारण
In reply to मला लोकसंगीत वाटले होते :-( by धनंजय
साहित्यचौर्य
In reply to मला लोकसंगीत वाटले होते :-( by धनंजय
हा हा हा ..
In reply to मला लोकसंगीत वाटले होते :-( by धनंजय
भयंकर आहे