✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आज काय घडले ... पौष शु. ४ प्रभू रामचंद्र-बिभीषण-भेट !

A
Ashutosh badave यांनी
Sun, 01/17/2021 - 12:47  ·  लेख
लेख
ram bibhishan bhet पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली. लंकेला आग लावून मारुति गेल्यानंतर रावण पुढे काय करावें या विचारांत असतां बिभोषणाने सुचविले- "राम धर्माने लढत आहे. तेव्हां युद्धाग्नि पेटण्यापूर्वीच त्याची धर्मपत्नी परत करावी." पण मदोन्मत्त झालेला रावण, कुंभकर्ण, इंद्रजित् यांना हा सल्ला काय म्हणून पसंत पडावा ? शेवटी "बंधो, धर्माचा मार्ग सोडून आपण वागत आहांत, नीतीचे आणि हिताचे बोलणें तुम्हांला रुचत नाही" असे म्हणून विभीषण तडक रामाकडे येण्यास निघाला. उत्तम अलंकार घातलेला, गदा, खड्ग, आदि आयुधे घेतलेला राक्षस पाहतांच वानरसैन्यांत गडबड उडाली, परंतु बिभीपणाने समजाविलें, 'वानरांनो, मरणाऱ्याला जसे औषध रुचत नाही, तसेच माझा उपदेश रावणात पचला नाही, आज मी रामचंद्रास शरण आलो आहे. -" ही वार्ता ऐकून सुग्रीवादि वानरांचा बिभीषणावर विश्वास बसला नाही; पण रामचंद्रांनी म्हटले, "सुग्रीवा, शरणागताला अभय द्यावे. त्याचा त्याग करूं नकोस, मग तो बिभीषण असो वा रावण असो." त्यानंतर बिभीषण पुढे झाला आणि त्याने रामाच्या पायांवर डोके ठेवून 'आत्मनिवेदन' केले. रावणाच्या सामर्थ्याचंहि खरे वर्णन त्याने केले. आणि म्हटले, " लंकेवर हल्ला करून राक्षसांचा नाश करण्यास मी तुम्हांस जिवापाड साह्य करीन." आणि यानंतर राम-बिभीषण यांनी एकमेकांना आलिंगन दिले. रामाज्ञेवरून लक्ष्मणाने समुद्राचे पाणी आणले. ते घेऊन राम बोलले रावणाला प्रहस्त इंद्रजितासह ठार करून तुला लंकेच्या राज्यावर बसवनि. हे पहा आतांच राज्याभिषेक करतो. तेव्हां सर्वे वानरांना 'धन्य राजा रामचंद्र' म्हणून रामचंद्राच्या औदार्याचा जयघोष केला. या राज्याभिषेकानंतर राम, लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण, अंगद, हनुमान, इत्यादि लोक समुद्र कसा ओलांडावा याचा विचार करण्यास बसले आणि त्या दृष्टीने तयारीस प्रारंभ झाला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1648 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

चित्राची शैली कुठली आहे? राम

कानडाऊ योगेशु
Sun, 01/17/2021 - 20:15 नवीन
चित्राची शैली कुठली आहे? राम लक्ष्मणाला दाढी दाखवली आहे.ती ही आधुनिक पध्दतीची. मला हा प्रश्न नेहेमी पडत आलेला आहे कि राम लक्ष्मणाची जी पारंपारिक चित्रे असतात त्यात त्यांना नेहेमीच तुळतुळीत अशी दाढी केलेली असावी असेच का दाखवतात बरे?
  • Log in or register to post comments

चित्रकाराची सही बाळासाहेब

प्रचेतस
Mon, 01/18/2021 - 09:36 नवीन
चित्रकाराची सही बाळासाहेब १९१२ अशी दिसते आहे, औंध संस्थानचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

पौष शु. ४ म्हणजे इंग्रजी

टवाळ कार्टा
Sun, 01/17/2021 - 20:58 नवीन
पौष शु. ४ म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार कोणती तारिख
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा