✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि ! शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.

A
Ashutosh badave यांनी
Tue, 01/12/2021 - 11:17  ·  लेख
लेख
आज काय घडले... joga paramanand तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत. अंगाला खडे टोचूं नयेत म्हणून एका भाविकाने त्यांना उंची पितांबर नेसवला. त्याची काळजी घेण्यासाठी जोगा नमस्कार जपून घालू लागले, त्यास देवळांत जाण्यास उशीर झाला. आरती केव्हांच होऊन गेली होती. देवाच्या भजनाच्या आड येणारा पीतांबर त्यांनी फाडून टाकला! देवाला गरिबी आवडते, श्रीमंती नाही. पंढरीनाथाचा प्रेमळ भक्त म्हणून जोगा प्रसिद्ध आहेत. सत्संगाची त्यांना अत्यंत प्रीति होती. यांची उपलब्ध कविता थोडी परंतु फार प्रेमळ आहे. 'लावण्यगुणसागर' परमात्मा हृदयांत प्रगटल्यावर जी अवस्था होते, ती त्यांनी "मेघश्याम पाहता आपोआप । डोळ्यां लागले वडप । अष्टहि सात्त्विकांचे रोप । हृदयआळां उगवलें ।। भक्तिभावें ओल्हावलें । प्रेमफळासी पैं आलें । नवविधा हे पिकलें । परमाब्द म्हणे जोगा। या अभंगांत सांगितली आहे. जोगा परमानंदांना परमेश्वरभक्तीबरोबरच संतसंगाचीहि विशेष आवड होती. 'रोमांच खरवितु खेदाचिदु डळमळितु । पाहता नेत्र उन्मीळितु' अशी अवस्था व्हावी, अष्ट सात्त्विक भाव प्रगट व्हावेत आणि प्रेमभरित अंतःकरणांत देव प्रगटावा, अशी यांची इच्छा होती. ‘राया विठोबावे डिंगर प्रेमें बोधले डुल्लती', असे संत प्रत्यक्ष सचिदानंदाचियामूर्ति' आहेत, संत हे 'माझे माहेर' आहे, अशी यांची भावना असे. जोगा परमानंदांच्या काळांत सर्वत्र 'ब्रह्मविद्येचा सुकाळु' झाला होता. पंढरीच्या विठोबाचे भक्त सर्व जातीत निर्माण होऊन त्यांनी समाजांत सत्प्रेरणा निर्माण केली. -७ ऑक्टोबर १३३८
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
1496 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

छान

निनाद
Wed, 01/13/2021 - 11:28 नवीन
उत्तम ओळख करू दिली. लेख अजून मोठा असता तरी चालले असते. असे अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

या संताबद्दल प्रथमच वाचण्यात

चौथा कोनाडा
Wed, 01/13/2021 - 17:32 नवीन
या संताबद्दल प्रथमच वाचण्यात आले. छोटेखानी पण उत्तम लेखन. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा