बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत
In reply to येडा कि काय ?? by कपिलमुनी
In reply to विसरलांत काय ९११ ? by गामा पैलवान
In reply to वटहुकूम? by फारएन्ड
In reply to वटहुकूम? by फारएन्ड
एक अध्यक्ष एक वटहुकूम काढून निवडणूक कोणत्या निकषांवर रद्द होईल हे ठरवू शकत नाही.हा वटहुकूम निवडणुकीच्या बराच अगोदर काढलेला आहे. २.
उद्या दोन्ही सभागृहांनी जरी एकमताने जरी हे ठरवले तरी कोर्ट ते बेकायदेशीर ठरवेल.घटनेत तशी तर्तोड असेल तर ती बेकायदेशीर कशी काय? ३.
मतदानाद्वारे अध्यक्ष निवडायचा हक्क हा प्राथमिक आहे. तो कायदा करून, वटहुकूम काढून कोणी काढून घेउ शकत नाही.निवडणुकीत घोटाळा झाला तर ती रद्द होते, हा नैसर्गिक न्याय आहे. अमेरिकी घटनाकारांनी यावर तरतूद केली आहे. ट्रंपचा वटहुकूम निवडणुकीत परकीय हस्तक्षेपास सहाय्य करणाऱ्या संस्थांची मालमत्ता जप्त करण्याविषयी आहे. ४.
पण तो निवडणूक हरला आहे.टपाली मतदानाच्या महाप्रचंड घोटाळ्याकडे कोणाचंच लक्ष कसं जात नाही? हा घोटाळा निवडणुकीच्या अगोदरपासून चर्चेत होता ना? ५.
त्याने खुशाल वटहुकूम काढला तरी सिस्टीम मधले चेक्स आणि बॅलन्सेस ते होउ देणार नाहीत.९११ च्या दिवशी साडेतीन हजार निरपराध लोकांचा खून झाला. एकतरी फौजदारी खटला उभा राहिला का गेल्या वीस वर्षांत ? कुठे गेले तथाकथित चेक्स आणि बॅलन्सेस ? वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन सापडली का कधी इराक मध्ये ? कुठे गेले तथाकथित चेक्स आणि बॅलन्सेस ? अमेरिकेत फेडरल जज हे आजीवन पद आहे. जस्टिस स्कालियाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू होतो. तो खून आहे हे शेंबडं पोरही सांगेल. कुठे गेले तथाकथित चेक्स आणि बॅलन्सेस ? सांगायचा मुद्दा काये की चेक्स आणि बॅलन्सेस या फक्त तोंडी लावायच्या गोष्टी आहेत. आ.न., -गा.पै.
In reply to चेक्स ? कसले चेक्स? by गामा पैलवान
In reply to अर्धवटराव by तात्या९१
In reply to पण एक कळत नाही. सत्ता पैसा by कानडाऊ योगेशु
In reply to मतदारसंख्या नेमकी किती? by गामा पैलवान
In reply to मतदारसंख्या नेमकी किती? by गामा पैलवान
In reply to १५ कोटी by फारएन्ड
In reply to माझ्या प्रश्नात थोडी दुरुस्ती करतो .... by गामा पैलवान
विकी चे रेफरन्स चालत नाहीत होअमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी आकडेवारी असलेलं एकही अमेरिकी अधिकृत संकेतस्थळ *.gov इत्यादि मला सापडलं नाही : https://www.google.co.uk/search?q=us+presidential+election+2020+official+result २.
एवढा मोठा ३ कोटी लोकांचा घोटाळा जो तुम्हाला विकि वर सापडला तो ट्रम्प ला माहिति नसेल का ?हाच प्रश्न मलाही पडलाय. तो जस्टिस स्कालीया कसा कुत्र्याच्या मौतीने मेला, आठवतोय? नको ते प्रश्न विचारले तर तशीच मौत आपल्याही नशिबी येईल अशी साधार भीती अमेरिकी न्यायाधीशांना वाटते आहे. आता, कुत्र्याची मौत नको असेल तर कुत्र्याची जिंदगी जगायला हवी किनई ? भाकरी दिसली, शेपटी हलवा; अथवा तिलाच, पायांत घालवा. आ.न., -गा.पै.
In reply to इन्टरनेट वर आपण शोधु तशी by सुकुमार
तुम्ही २४ कोटींशी जी तुलना करत आहात, ती २४ कोटी "नोंदणीकृत" मतदार नव्हेत. वयोगट धरले तर मतदान करू शकणारे एकूण किती लोक अमेरिकेत आहेत त्याचा तो नंबर आहे.१६ कोटी मतदान हे ६६% असल्याचा दावा वॉशिंगटन पोस्टने केलेला आहे. हाच आकडा इतर अनेक वृत्तपत्रांत व वाहिन्यांत आढळून येतो. हा दावा जर खरा नसेल तर मग नोंदणी झालेल्या मतदारांची नेमकी संख्या किती ? आणि ती कुठे सापडेल? आता याच्याशी निगडीत : https://www.misalpav.com/comment/1089352#comment-1089352 २.
याला कसलाही पुरावा गेल्या महिन्याभरात अनेक रथी महारथींनी प्रयत्न करून सुद्धा सापडलेला नाही.असं असेल तर मग अमेरिकेच्या अधिकृत संकेतस्थळांकडून मतदानाचे अधिकृत आकडे का जाहीर केले जात नाहीत? आज मतदानास पन्नास दिवस पूर्ण झाले. तरीही अधिकृत आकडेवारी का बाहेर येत नाही? तसंच राष्ट्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल ४५ दिवसांत बाहेर यायला हवा होता, तो कोणी दाबून ठेवलाय? ३.
इतक्या मोठ्या प्रमाणावर फ्रॉड झाला आहे हे दाखवणारा एकही पुरावा कोर्टापुढे आलेला नाही.राज्यनिहाय मतदार नोंदणीची बेरीज राष्ट्रीय मतदार नोंदणीशी न जुळणं हा मोठा फ्रॉड नाही, तर दुसरं काय आहे? ही तफावत थोडीथोडकी नसून तब्बल अडीच कोटी मतदार इतकी प्रचंड आहे. ४.
पुरावे वगैरे बद्दल कोर्टाबाहेरच राळ उडवून दिली गेली, मीडियामधे नुसते कागद नाचवले. प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा काहीही दावे केले नाहीत.याबद्दल अधिक वाचायला आवडेल. ५.
यात त्यांनी ज्या गोष्टींबद्दल आरोप केलेत ती प्रत्येक गोष्ट निवडणुकीआधी किमान काही दिवस जाहीर होती. ट्रम्प व रिपब्लिकन्स ना भरपूर वेळ होता तेव्हाच दावे दाखल करायला. तेव्हा त्यांनी वेळ घालवला. आणि नंतर जागे झालेट्रंपचमू आधीपासनं लढंत होताच. निवडणुकीच्या आधी दाखल केलेला हा एक खटला सापडला : https://www.pubintlaw.org/cases-and-projects/federal-court-delays-trump-campaign-election-lawsuit/ समजा ट्रंप नंतर जरी जागे झालेले असले तरी या क्षणी इथे अमेरिकी जनतेच्या कौलाचा प्रश्न निर्णायक आहे. ट्रंप कितीही आळशी असले तरीही, आज अमेरिकी जनतेचा कौल पणास लागला आहे. ६.
त्यांचे "आरोप वर्तुळ" वाढत जाउन शेवटी ट्रम्प व त्याचे कट्टर चाहते सोडले तर इतर सर्व चोर आहेत इथपर्यंत हे आलेले आहे.मतदान यंत्राचं लेखा परीक्षण व्हायला हवंय ना? ते कोणी करायचं? शिवाय ट्रंपनी मिळालेल्या ७.४२ कोटी मतदारांचा अव्हेर का म्हणून करायचा? ७.
मी वर्णन केलेली वरची प्रत्येक गोष्ट ही रिपब्लिकन व कॉन्झर्वेटिव्ह मीडियामधून खात्री करून घेतलेली आहे.मीडियाकडून खात्री झालेली वार्ता खरी असेलंच असं नाही. अधिकृत आकडे प्रसारित होईपर्यंत मी तरी मीडियावर विश्वास ठेवणार नाही. ८.
अनेक रिपब्लिकन्सही याला आता विटले आहेत.इतक्या लवकर विटले? मग जनतेची काय हालत झाली असेल. पण मग कोणी ट्रंप यांच्या विरोधात जनता आघाडी का उघडंत नाहीये? असो. सांगायचा मुद्दा असा की ही निवडणूक वाटते तितकी सरळ अजिबात नव्हती. भारतात असलं काही घडू नये ही काळजी आपल्याला घ्यायला हवी. आ.न., -गा.पै.
In reply to फारएन्ड, by गामा पैलवान
ती अगदी मतदानाच्या दिवशीही बदलू शकते कारण काही राज्यांत त्या दिवशी सुद्धा नोंदणी करता येते.हे जरी खरं असलं तरी राज्यनिहाय नोंदणीकृत मतदारांची बेरीज राष्ट्रीय नोंदणी इतकी हवी ना? ती जर जुळंत नसेल तर मत नोंदणीत घोटाळा आहे. म्हणजेच यादीत बोगस मतदार आहेत. मग निवडणुकीचे निकाल विश्वासार्ह कसे मानायचे? २.
राज्यांमधल्या नोंद केलेल्या मतदारांची संख्या एकूण संख्येशी जुळते की नाही त्याची मला कल्पना नाही. राज्याराज्यांतून सगळे टॅली करतील तेव्हा ती जुळेल.तुम्हालांच काय, मलाही त्याची नाही. खरंतर आज या क्षणी ( दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी ग्रीनिच प्रमाणवेळ २१०० वाजता ) कुणालाही नाही. म्हणून तर मी अधिकृत आकडेवारी शोधंत होतो. राज्यनिहाय आकडेवारी त्या त्या राज्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तरीपण राष्ट्रीय आकडेवारी अस्तित्वात नाही. जो काही आकडा आहे तो वॉशिंगटन पोस्ट वगैरे खाजगी वाहिन्या व वृत्तपत्रांत छापून आलेला आहे. आणि तो आकडा राज्यनिहाय बेराजेशी जुळंत नाही. मग त्यावर कितपत विश्वास ठेवायचा? ३.
पण ती जुळत नाही असे जरी एक मिनीट धरले तरी तो एकदम मोठा फ्रॉड होत नाही आपोआप.ही आकडेवारी न जुळणं हा घोटाळा ( = फ्रॉड ) नाही तर दुसरं काय आहे? ४.
पण त्यातून फ्रॉड आहेच व तो बायडेन साइडनेच आहे ही फार मोठी उडी आहे.बिडेनच्या बाजूने नसेल तर ट्रंपच्या बाजूनेही झालेला असू शकतो ना? ट्रंपने घोटाळा करूनही तो निवडणूक हरला असंही म्हणता येईल. अमेरिकन नागरिक पूर्णपणे फाट्यावर मारले गेलेत, त्याची दखल कोणी घ्यायची? ५. पण ज्या कायद्यांविरूद्ध त्याने/त्याच्या कॅम्पेनने ४०-५० खटले दाखल केले ते कायदे किमान एक वर्ष आधीपासून प्रचलित होते. यांतले काही खटले निवडणुकीच्या आधीपासून दाखल होते. म्हणजेच २०२० च्या निवडणुकीत घोटाळे करण्यासाठी प्रचलित कायद्यांतील त्रुटींचा उपयोग करून घेतला गेलेला असू शकतो. ६.
पण पेनसिल्वेनियाने "मेल इन वोट्स" हा दुसरा प्रकार ग्राह्य धरून तो कोणालाही करता येइल असा कायदा केला.धडधाकट माणसाला घरून पत्र पाठवून मतदान करायची गरज काय मुळातून? त्याने हवं तर मतदान केंद्रावर जावं. नको तर घरी बसावं. उगीच पत्राद्वारे मत नोंदायचा हेका कशासाठी? त्यामुळे ही तरतूद मला कमालीची संशयास्पद वाटते आहे. ७.
तर हा कायदा एक वर्षापूर्वी रिपब्लिकन सद्स्यांनीच पेनसिल्वेनिया असेम्ब्लीत आणला.याचा अर्थ ट्रंपला घोटाळा करायचा होता, असाही आरोप करता येईल. पण त्याला जमलं नाही. हा अमेरिकन लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर गुन्हा नाही का? ८.
...त्यातून दिसलेल्या त्रुटी, चुका, फ्रॉड काहीही म्हणा - त्याची संख्या इतकी नव्हती की निवडणुकीच्या एकूण निकालावर त्याचा काही परिणाम होईल.पण २४ कोटी मतदारांत २.५ कोटी बोगस मतदार असतील तर तो मोठा पुरावा आहे. ९.
लक्षात घ्या - लाखांच्या संख्येने मते रद्द करायला पुरावेही तितके सबळ हवेत. इथे पुरावेच नव्हते व फ्रॉडचा दावाही नव्हता.इथे फ्रॉडचा दावा नव्हता कारण घोटाळा २०२० च्या निवडणुकीत झाला आहे. पेनिसिल्व्हेनिया हे एक राज्य आहे, जिथे मर्यादित प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. बग बाकीच्या राज्यांची हमी कोण घेणार? १०.
त्यामुळे निवडणुकीनंतर एकूण प्रकार असा चालला होता, की एक रॅण्डम घटना, नंबर्स काढायचे. ते खरे असोत वा संदर्भ सोडून काढलेले. ते लोकांपुढे नाचवायचे. मग "हे आहे म्हणजे इतका मोठा फ्रॉड झालाच आहे" हे पुन्हा पुन्हा रटवत राहायचे. ते रीतसर फेटाळले गेले, की एक दुसरी पुडी सोडून द्यायची व पुन्हा सगळे तेच प्रकार. गेला दीड महिना हेच चालले आहे. खटल्यांचा स्कोअर साधारण ३८-१ होता. म्हणजे ३८ पैकी एका केस मधे अनुकूल निकाल. तो निकालही किरकोळ स्वरूपाचा होता, मतमोजणीच्या निरीक्षकांबद्दल.हे माझ्यामते पूर्णपणे खरं नाही. जॉर्जियाच्या सिनेट समितीने निवड झालेल्या खासदारांना ग्राह्यता प्रमाणपत्र देऊ नये अशी शिफारस केली आहे : https://100percentfedup.com/breaking-ga-senate-committee-releases-damning-report-on-election-fraud-recommends-de-certifying-electors/ असो. नोंदवण्याजोग्या दोन घटना : १. काही राज्यप्रतिनिधींना BLM व ANTIFA यांची भीती वाटंत असल्याने ते निवडणूक घोटाळ्याविरुद्ध लढायला नाखूष आहेत : https://newsthud.com/the-cats-is-out-of-the-bag-heres-the-real-reason-why-state-legislators-wont-fight-election-fraud/ २. सद्य उपाध्यक्ष माईक पेन्स घोटाळेबाज निकाल फेटाळू शकतो. नव्हे, ते त्याचं कायदेशीर कर्तव्य आहे : https://nationalfile.com/law-prohibits-pence-from-accepting-electoral-votes-from-fraudulently-certified-states-constitutional-lawyer/ एकंदरीत अनेक अमेरिकी संस्थांना निवडणुकीच्या निकालांविषयी संशय आहे. पण पेन्स तर ६ जानेवारीच्य अधिकृत निकालानंतर परदेशी चाललाय : https://nationalfile.com/pence-plans-to-oversee-january-6-electoral-college-vote-then-leave-america-for-israel/ तो अमेरिकेबाहेर पळून तर चालला नाहीये? असो. जे आहे ते असं आहे. आ.न., -गा.पै.
In reply to यावरुन आठवलं by श्रीरंग_जोशी
In reply to सिडनी पॉवेलचं संकलन by गामा पैलवान
In reply to निवडणूक घोटाळ्याविषयी ट्रंपूतात्यांचं भाषण .... by गामा पैलवान
In reply to कोठे दाबले आहे? by फारएन्ड
In reply to मी सत्ता सोडणार नाही .... by गामा पैलवान
आणि पुरावे भाषणांत उलेख करून, पार्किंग लॉट्स मधे नाचवून काय उपयोग? ते कोर्टात योग्य केस लढवताना सादर केले पाहिजेत. देशातील निष्णात वकील नेमलेले होते. त्यांनी काय केले? मोठमोठ्या वल्गना केल्या. त्यांना ही प्रोसेस, न्यायालयाचे नियम, कोणती केस कोणत्या न्यायालयात उभी राहायला हवी हे माहीत नव्हते? राज्याच्या कोर्टाच्या अखत्यारीतील खटला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टापुढे न्यायचा. त्यांनी दखल घेतली नाही की आमचे ऐकलेच नाही हो म्हणायचे. नाहीतर एक वर्षापूर्वी रिपब्लिकन लोकांनीच आणलेले आणि पास झालेले बिल घटनाबाह्य आहे म्हणून आता तक्रार करायची. नाहीतर अॅफिडेव्हिट्स, स्टॅटिस्टिक्स वगैरे गोष्टी "पुरावे" आहेत म्हणून छातीठोकपणे सांगायचे. प्रत्यक्ष कोर्टात दोन वेगळ्या काउण्टीज मधे नियम वेगळे लागले गेले म्हणून आख्खी इलेक्शन रद्द करा अशी मागणी करायची. ते झाले नाही की "इतके ढळढळीत पुरावे देउन सुद्धा..." राग आळवायचा. हेच चालले आहे.त्याचं असंय की अमेरिकी न्यायालयांत निवडणूक खटले दाखल करायची विहित प्रक्रिया अस्तित्वात नाही. इथे एक इंग्रजी लेख आहे : https://www.bbc.com/news/election-us-2020-54724960 त्यानुसार :
"There's no standard process for bringing election disputes to the Supreme Court" says Prof Richard Briffault of Columbia University Law School. "It's very unusual and it would have to involve a very significant issue."भारतात असं काही घडलं असतं तर न्यायाधीशांनी स्वत:हून ( = स्यू मोटो ) एखादं मंडल स्थापन करून सर्व खटले एकत्रितरीत्या चालवले असते. अमेरिकी न्यायालयांना इतकी किमान सक्रियताही ( = minimal activism ) दाखवावीशी वाटू नये? काय अर्थ उरला तिथल्या न्यायपालिकेस? बरेचसे न्यायाधीश चक्क विकले गेलेले दिसंत आहेत. त्यांच्या नि:पक्षपणाचा भरवसा कुणी द्यायचा? जणू अमेरिकी घटनाकारांना न्यायालयाची भावी अगतिकता दिसली असावी. म्हणून त्यांनी न्यायालयाला बगल देऊन नवीन राष्ट्राध्यक्ष निवडायच्या तरतुदी ठेवल्या आहेत. अर्थात ट्रंपनी कुण्या एका मार्गावर पूर्णपणे अवलंबून न राहता मिळतील तितके मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून ट्रंप यांनी भारंभार खटले दाखल केलेले दिसताहेत. असो. ट्रंप ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आ.न., -गा.पै.
In reply to ट्रंप यांचे दावे व अमेरिकी इतिहास by गामा पैलवान
अमेरिकन सुप्रीम कोर्टात" ते "थेट" दाखल करायची प्रक्रिया नाही. खालच्या कोर्टांमधून वर सरकत गेलेले खटले इतर सर्व खटल्यांप्रमाणे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.घटनात्मक पेचप्रसंग उद्भवला असतांना अमेरिकी न्यायपालिका थेट खटला दाखल करून घेत नाहीये. अमेरिकी जनतेने यांतच काय समजायचंय ते समजून घ्यावं. अमेरिकी राजकीय व्यवस्थेस आग लागली आहे आणि न्यायालय नीरोप्रमाणे नियमांचं तुणतुणं वाजवीत बसलं आहे. असो. ट्रंप माझा खास आवडता नाही. तसंच बिडेन माझा खास नावडता नाही. तरीपण ट्रंप ज्या पद्धतीने हाकलला जातोय ती भयंकर आक्षेपार्ह आहे. हा प्रकार भारतात होऊ शकतो. तो होऊ नये इतक्यापुरतीच माझी आस्था सीमित आहे. चर्चेबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
In reply to घटनात्मक पेचप्रसंग आणि नीरोवादी अमेरिकी न्यायालय by गामा पैलवान
In reply to सॉरी by फारएन्ड
स्रोत : https://twitter.com/russdiamond/status/1343622485946880007
परिपत्रकात लिहिलंय की निवडणुकीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबद्दल या आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं.
आ.न.,
-गा.पै.In reply to हे ही वाचा by फारएन्ड
येडा कि काय ??