लोकहो,
नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेला एक लेख सापडला : https://www.forbes.com/sites/chuckdevore/2020/09/25/election-fraud-in-a…
सांगायचा मुद्दा असा की ट्रंप भरगोस मतांनी विजयी झालेले असूनही बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. असा प्रकार पूर्वी २००० साली लहान प्रमाणावर घडला होता. त्यावेळेस बावळट बुश विरुद्ध अल गोर अशी लढाई होती. अल गोर याच्याकडे अधिक मतसंख्या होती. मात्र अमेरिकेतल्या नियमानुसार ज्या राज्यात उमेदवाराकडे ५०% हून जास्त मतसंख्या असते त्या राज्याच्या सर्व खासदार जागा विजयी उमेदवारास मिळतात. उदा. : क्यालीफोर्नियाच्या ५५ जागा आहेत. तर तिथे विजयी होणाऱ्या उमेदवारास सर्व ५५ जागा मिळतात. तशाच इतर ४९ राज्यांतल्या जागा त्या त्या विजयी उमेदवारास मिळतात. अशा रीतीने जो उमेदवार जास्त खासदार पैदा करेल तो विजयी धरला जातो. जनतेकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पराभूत उमेदवारापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. साधारणत: ज्या उमेदवारास जनतेकडून जास्त मतं मिळतात त्याचे खासदारही जास्त निवडून येतात.
पण २००० साली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस झाम्या बुशला अल गोर पेक्षा कमी जनतामतं मिळाली होती. पण दोघांच्या खासदार जागा तुल्यबळ होत्या. फक्त फ्लोरिडाचा निकाल यायचा बाकी होता. तिथल्या जागा ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष होणार होता. तेव्हा फेरमोजणी झाली होती. तिच्यात घोटाळे करून झाम्याला विजयी घोषित करण्यात आलं. अल गोर ने जास्त खळखळ न करता निमूटपणे पराभव स्वीकारला. मात्र ट्रंप असा सहजासहजी ऐकणारा नाही.
ट्रंपतात्यांना हा निवडणुका चोरण्याचा प्रकार ठाऊक होता. त्यांनी २०१८ साली १३८४८ क्रमांकाचा एक वटहुकूम ( = अध्यादेश = executive order ) पारित करून घेतला. त्यानुसार जर अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला असेल तर त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची मालमत्ता व पैसे जप्त करता येतात. हा हस्तक्षेपाच अहवाल निकाल लागल्यापासून ४५ दिवसांत गुप्तचरखात्याच्या प्रमुखाने तत्कालीन अध्यक्षास ( = ट्रंप ) सादर करायचा असतो. याचे संयुक्त सादरकर्ते अटर्नी जनरल ( विलियम बार ) व राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (जॉन रॅटक्लिफ) हे आहेत. हे दोघेही ट्रंपने नेमलेले आहेत. या वटहुकूमाची (कंटाळवाणी व लांबलचक ) प्रत इथे आहे : https://www.presidency.ucsb.edu/documents/executive-order-13848-imposin…
हा अहवाल सदर करायची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यांत परकीय हस्तक्षेपाचे पुरावे असणार. त्यानुसार ट्रंप सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. ट्रंपतात्यांच्या चमूने खटला दाखल केलेला आहेच (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Post-election_lawsuits_related_to_the_202… ). अशा वेळेस निवडणुकीत परकीय हस्तक्षेप उघड झाला तर तिचे निकाल रद्दबातल ठरणार आहेत. असं झाल्यास मग सद्य प्रतिनिधीगृहाचे ( = House of Representatives ) सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडतात आणि सिनेटचे सदस्य उपराष्ट्राध्यक्ष निवडतात. प्रतिनिधीगृह सिनेटपेक्षा वरच्या दर्जाचं मानलं जातं. आता प्रतिनिधीगृहाची रचना अशी आहे की प्रत्येक राज्यास एक सदस्य म्हणजे एक मत उपलब्ध आहे. या गृहात ट्रंप यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रद्द निवडणुकीद्वारे ट्रंप घटनादत्त मार्गाने परत राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
x----------x----------x
लेख त्रोटक व विस्कळीत आहे, हे मान्य. एक गोष्ट लक्षात आली म्हणून जरा घाईघाईत लिहिलंय. लिहिण्यामागे कारण काय ते सांगतो. भारतीयांनी ट्रंप यांना पाठींबा द्यावा हा मुख्य हेतू आहे. ट्रंप परत अध्यक्षपदी बसले तर बोल्शेविकांना चांगलाच दणका बसेल. रशियात १९१८ साली झारची हत्या करून सर्वत्र अराजक माजवून बोल्शेविक सत्तेत आले. तोच प्रकार त्यांना अमेरिकेत करायचा आहे. सोव्हियेत क्रांती हे थोतांड आहे हे वेगळे सांगणे नलगे. बोल्शेविक जर अमेरिकेत जनतेला फाट्यावर मारून सत्तेत आले तर त्यांचं धार्ष्ट्य वाढेल. मग भारतातही ते उचल खातील. नक्षली हे भारतीय बोल्शेविक आहेत. ते फुकटचे माजतील. त्यांची भारतातली मस्ती आटोक्यात आणायची असेल तर अमेरिकेतच त्यांना बांबू लागलेला बरा, नाहीका? वेळच्या वेळी भारतीय जनतेच्या ऐक्याची चुणूक दाखवायला हवी.
चर्चा सुरू करूया.
आपला नम्र,
-गामा पैलवान
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही बघितला ....
In reply to गामाजी तुम्ही किंग्समन ३ by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
मी हा चित्रपट बघितलेला नाही.
आ.न.,
-गा.पै.
@ अमरेंद्रः किंग्समन ३ कुठे उपलब्ध आहे ?
In reply to गामाजी तुम्ही किंग्समन ३ by अमरेंद्र बाहुबली
@ अमरेंद्रः किंग्समन ३ कुठे उपलब्ध आहे ?
लहानपणी रासपुतीनबद्दल वाचलेले असल्याने मला त्या व्यक्तीबद्दल अजूनही कुतुहल आहे.
काका
In reply to @ अमरेंद्रः किंग्समन ३ कुठे उपलब्ध आहे ? by चित्रगुप्त
कुठं सिनेमे पाहून Rasputin कळतो!
हे वाचा त्यापेक्षा राव तुम्ही , अगदीच संक्षिप्त Rasputin लीलामृत हवे असल्यास हे गाणे ऐकणे
ट्रंपूतात्यांच्या फ्लोरिडास्थित निवासस्थानी धाड
लोकहो,
ट्रंपूतात्यांच्या फ्लोरिडातल्या मार-ए-लागो येथल्या निवासस्थानी संघराज्य अन्वेशक यंत्रणेने ( FBI ने ) धाड टाकली आहे. ही अल्पवेळ चालली. संबंधित बातमी : https://www.bbc.com/marathi/international-62473843
या धडीत काहीही हाती लागलं नाही अशी खबर आहे. त्यामुळेच की काय धवलगृहाने ( व्हाईट हाऊस ने ) स्वत:स धाडीपासनं अलिप्त असल्याचं घोषित केलं आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे, ते ओळखा पाहू !
न्यूयॉर्कचे माजी पोलीस आयुक्त बर्नार्ड केरिक यांनी उघडपणे ट्रंप यांच्या हत्येची भीती वर्तवली आहे. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.dailymail.co.uk/news/article-11095219/Former-NYPD-Commissio…
दिवसेंदिवस अमेरिका खिळखिळी होत आहे.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : इव्हानाबाईंचा मृत्यू अपघात होता की हत्या?
Sources confirmed to CBS News
In reply to ट्रंपूतात्यांच्या फ्लोरिडास्थित निवासस्थानी धाड by गामा पैलवान
मर्यादाभंग
In reply to Sources confirmed to CBS News by कॉमी
कॉमी,
रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याच्या मते हा मर्यादाभंग आहे.
तुम्ही दिलेल्या लेखातून हे वाक्य उद्धृत करतो :
आ.न.,
-गा.पै.
रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा
In reply to मर्यादाभंग by गामा पैलवान
रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा कायदेभंग आहे की नाही हे ते अजून पाहणार आहेत.
तुम्ही आजिबात काँटेक्स्ट दिला नव्हता. ट्रम्पच्या घरावर धाड पडली कारण त्याच्याकडे (आणखी) गुप्त कागदपत्रे आहेत असा संशय आहे. संशय घेण्यास कारण राष्ट्रीय माहितीगार (आरकाईव्ह) ने आधीच १५ बॉक्स गुप्त कागदपत्रे ट्राम्पच्या घरातून मिळवली आहेत. मुळात क्लासिफाईड कागदपत्रे बापाचा माल असल्यासारखं स्वतःच्या घरात घेऊन जाण्याचा आगाऊपणा ट्रम्पने केला हे तुम्ही अजिबातच उल्लेखल नाही. सदर धाड आणखी क्लसिफाईफड कागद घरात आहेत अश्या संशयावर मारली होती.
केवळ इतकेच नव्हे, तर डिपार्टमेंट ऑफ जस्टीस चे अधिकारी ट्रम्पच्या घरी सुद्धा आधी गेले होते, आणि तिथे हे झाले- जून-जुलै मध्ये.
म्हणजे, गुप्त कागद हा बाब्या घरी घेऊन जाणार. अर्धवट कागद परत करणार. घरी कागद घ्यायला लोक आले की त्यांना हा मदत नाही करणार. मग घरी रेड पडली कि त्याचे समर्थक त्याच्या जीवाला धोका असल्याच्या ष्टोऱ्या बनवणार. वा वा, मज्जाणी लाईफ.
सदर रेड मध्ये कागद सापडले आहेत असे दिसते.
गोपनीय कागदपत्रं सापडली म्हणे ....
In reply to रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा by कॉमी
कॉमी,
गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला ट्रंप मूर्ख आहे का ! असले कागद जर कोणी धवलगृहाच्या बाहेर घेऊन गेला तर ते नष्ट करण्यासाठीच असतात. घरी ठेऊन काय लोणचं घालायचंय !
बाकी, ट्रंपना लावला तोच न्याय हंटर बिडेनला लावलेला दिसंत नाही. तो जो बिडेनचा मुलगा आहे म्हणून. युक्रेनी आस्थापानांशी त्याने केलेले भ्रष्ट व्यवहार उघड्यावर पडलेत. पण लक्ष कोण देणार !
आ.न.,
-गा.पै.
गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला
In reply to गोपनीय कागदपत्रं सापडली म्हणे .... by गामा पैलवान
ट्रम्प कडे मार ए लागो मध्ये पंधरा बॉक्स भरून गोपनीय कागदपत्रं होतीच कि, जी आरकाईव्ह ने पुन्हा मिळवली. तो घरी कागदपत्रे घेऊन गेला होता हे तर शंभर टक्के माहीत झालेली गोष्ट आहे आता. आता तो तुमच्या निकषाने मूर्ख का स्वार्थी का पाताळयंत्री हे तुम्हीच ठरवा बुवा.
जरूर लावावा बुवा. जी काय ड्यु प्रोसेस आहे ती करावीच कि. त्याबाबत सहमत आहे.
ट्रम्पने सुद्धा यापूर्वी, बायडन बद्दल वाईट साईट माहिती काढण्यासाठी युक्रेनसाठी कायद्याने पास झालेला मदतनिधी त्याला तसं करण्याचा अधिकार नसताना अडवून ठेवला होता, त्याचा सुद्धा तपास व्हावा आणि योग्य ती शिक्षा ट्रम्पला व्हावी. हे तुम्ही मान्य करालच.
मजेचा भाग
In reply to गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला by कॉमी
म्हणजे ट्रंप तात्यांनीच कायद्यात बदल करून गोपनीय कागदपत्र अधिकार नसताना बाळगणे किंवा नष्ट करणे ह्याची शिक्षा एक वर्षावरून पाच वर्षे केली होती.
:)
In reply to मजेचा भाग by अनन्त अवधुत
हॅहॅहॅ
ट्रंप ह्या अत्यंत बेदरकार
In reply to रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा by कॉमी
ट्रंप ह्या अत्यंत बेदरकार माणसाने व्हाईट हाउस च्या रेकॉर्ड कीपींग टीम ला अक्षरशः वात आणला होता. खरे तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो पेपर वापरतात, मग तो भले बे दुने चार असली आकडेमोड जरी असेल तरी तो पेपर कायद्यानुसार नॅशनल अर्काईव्ह च्या ताब्यात जायला हवा हा नियम असताना ते पेपर फाडुन फेकने, कचरा कुंडीत टाकणे अगदी टॉयलेट मधे फ्लश करणे असले उध्योग ह्या माणसाने केले.
मुळात क्लासिफाईड कागदपत्रे त्याच्या ताब्यात आता नसायला हवीत. तो काही राष्ट्राध्यक्ष नाही. असे असताना ती कादग्पत्रे सापडणे हाच गुन्हा आहे.
आता ट्रंप भाउ व्हिक्टीम कार्ड खेळतील .. नेहेमीसारखे ..
धवलगृहाची भूमिका अलिप्त का
In reply to ट्रंप ह्या अत्यंत बेदरकार by सुक्या
धवलगृहाची भूमिका धाडीपासनं इतकी अलिप्त का, इतकाच माझा प्रश्न आहे.
-गा.पै.
का बरं ? ते अलिप्त भूमिकाच
In reply to धवलगृहाची भूमिका अलिप्त का by गामा पैलवान
का बरं ? ते अलिप्त भूमिकाच घेणार कि. ईडीची धाड पडल्यावर मोदी काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीच धाड घालायला सांगितली असं म्हणतात काय ?
तेच तर म्हणतोय मी ....
In reply to का बरं ? ते अलिप्त भूमिकाच by कॉमी
कॉमी,
अहो, तेच तर म्हणतोय मी. बलाग्रहकांची ( ED ची ) धाड पडल्यावर पंतप्रधान कार्यालय कसलीच प्रतिक्रिया देत नाही. पण धवलगृह मात्र तत्परतेने स्वत:स अलिप्त ठरवून घेतंय.
आ.न.,
-गा.पै.
अलिप्त असणे अपेक्षितच आहे.
In reply to तेच तर म्हणतोय मी .... by गामा पैलवान
अलिप्त असणे अपेक्षितच आहे. त्यात नवल कसले ?
धवलगृहाचे जरा वेळ बाजुला ठेवा
In reply to धवलगृहाची भूमिका अलिप्त का by गामा पैलवान
धवलगृहाचे जरा वेळ बाजुला ठेवा? जरावेळ. ओके?
आता मला सांगा "ट्रंप कडे क्लासिफाईड कागद पत्रे सापडली की नाही?" ती त्याने का नेली? तुम्ही म्हणता की डीस्ट्रोय करायला नेली होती. मग कायदा काय सांगतो? ती कागद्पत्रे ट्रंप आपल्या कडे ठेउ शकतो का?"
या प्रश्नांची उत्तरे द्या. मग एफ्बीआय ने धाड का टाकली ते बघा.
कुठवर आले बोल्शेविक ? काही
कुठवर आले बोल्शेविक ? काही अपडेट्स ?
झाली बळकावून अमेरिका
In reply to कुठवर आले बोल्शेविक ? काही by कॉमी
कॉमी,
झाली बळकावून अमेरिका.
जाताजाता : बिडेनला नेमकी किती मतं पडली? घोषणा झाली का?
आ.न.,
-गा.पै.
हत्तीच्या, असे आहे होय,
In reply to झाली बळकावून अमेरिका by गामा पैलवान
हत्तीच्या, असे आहे होय, बोल्शेविकांचे पुनःश्च अभिनंदन.
काय काय केलं मग बोल्शेविकांनी सत्ता मिळवून ? का जैसे थे ?
बिडेनची मतं तेव्हा सांगितलेली तितकीच आहेत.
झाली बळकावून अमेरिका.
चला हे तरी एक काम चांगलं झालं. (म्हणजे पुर्ण झालं). नाहितर जगात असे कितीतरी प्रश्न लटकत पडलेत.
मग नायतर काय?
In reply to झाली बळकावून अमेरिका. by धर्मराजमुटके
मग नायतर काय?
एकदाचं ते करोना आणि त्यावरची लस हे दोन्ही थोतांड असल्याचे सिध्द व्हावे. ते पण लै लटकत ठेवलंय.
होलसेल मधी २०२०, २१ डीलीट मारले तरी चालेल. सगळे थोतांडच होते असे ठरले तरी चालेल.
एकदाचं ते करोना आणि त्यावरची लस हे दोन्ही थोतांड असल्याचे सिध्द
ते काम पण कॉमीं मुळे लटकत पडलयं. त्यांना काही च्या पाणी देऊन तो ही प्रश्न सुटतो का ते बघायला पाहिजे. :)
म्हणे बिडेन जिंकलाय ....
कॉमी,
१.
तुमचं नावंच मुळी कॉमी आहे. तुम्हांसच अधिक चांगलं ठाऊक असणार. पण त्याचं काये की झोपेचं सोंग घेतलेल्याला उठविता येत नसतं.
२.
राज्यनिहाय मतांची बेरीज मलाही करता येते.
पण संघाराज्याची अधिकृत घोषणा कुठाय? ( Where is the Federal Agency's official declaration ? ) नोव्हेंबर २०२० पासून आजतागायत झालेली नाही. पुढे कधी होईल याची शाश्वती नाही. आणि म्हणे बिडेन जिंकलाय.
आ.न.,
-गा.पै.
तुमचं नावंच मुळी कॉमी आहे.
In reply to म्हणे बिडेन जिंकलाय .... by गामा पैलवान
म्हणजे तुम्हाला माहिती नाही म्हणा कि.
आणि मी भारतात राहतो हो, तुम्ही किमान यूकेत तर राहता, तेव्हढे माहित असावे असे वाटले. आणि इतके प्रतिसाद हिरीरीने देता म्हणून काहीतरी कल्पना आहे असे वाटलेले.
हायला हे कसले बोल्शेविक म्हणायचे. सत्ता आली तरी काही म्हणजे काही सुद्धा केलं नाही. नुसते बसलेत भांडवलशाही कुरवाळत. आणि गंमत म्हणजे ह्या बोल्शेविक (डेमोक्रॅटीक) पक्षाला सगळे पैसे पण ह्या भांडवली कंपन्या पुरवतात. अतिश्रीमंत लोक पुरवतात.
हा काय प्रकार ? ट्रम्प आणि ओबामा ची दाखवा बघू, मग तशी बिडेनची आहे का बघूया.
बोल्शेविक, निवडणूक निकाल, वगैरे
In reply to तुमचं नावंच मुळी कॉमी आहे. by कॉमी
कॉमी,
१.
ह्यांत गंमत ती कसली? हे तर ऐतिहासिक तथ्य आहे.
२.
२०१६ ( ट्रंप ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections201…
२०१२ ( ओबामा ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections201…
एव्हाना इथे २०२० ( बिडेन ) चे निकाल दिसायला हवे होते. पण ते दिसंत नाहीत : https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-and-voting-i…
आ.न.,
-गा.पै.
इथे बघा-https://www.google
In reply to बोल्शेविक, निवडणूक निकाल, वगैरे by गामा पैलवान
इथे बघा-
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.fec.go…
आणि भांडवलशाहीचा पुरस्कारच
In reply to बोल्शेविक, निवडणूक निकाल, वगैरे by गामा पैलवान
आणि भांडवलशाहीचा पुरस्कारच करणारी आणि भांडवली कंपन्यांनी फंड केलेली पार्टी बोल्शेविक म्हणजे प्रचंड मोठा विनोद आहे. बोल्शेविक म्हणे, उगाच काहीही शब्द फेकणे आहे हे म्हणजे.
पाकिस्तानातही निवडणूक चोरली
घ्या, आता पाकिस्तानातली निवडणूकही करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतमोजणीत इमरानखानाची माणसं पुढे होती तिथे रात्रभरात पराजित म्हणून घोषित झालीत. बातमी : https://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/pakistani-courts-flo…
अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकीत पाकिस्तानची गृहयुद्धाच्या दिशेने दिमाखदार वाटचाल ! लगे राहो भाई !!
-नाठाळ नठ्या
लोकसभा निवडणूक २०२४ : नोटाचे आकडे जुळंत नाहीत
दैनिक सनातन प्रभात वृत्तपत्राने 'यापैकी नाही' अर्थात None of the Above या पर्यायास पडलेल्या मतांची बेरीज जुळंत नसल्याची माहिती उघड केली आहे. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://x.com/SanatanPrabhat/status/1804883928941298157
हा निवडणूक गैरप्रकार आहे का? की मतमोजणीत अजाणता राहिलेली त्रुटी आहे? जे काही असेल ते लवकरात लवकर दुरुस्त व्हायला हवं. निवडणूक आयोगाकडून सत्वर खुलासा अपेक्षित आहे.
स.प्र. ची बातमी : https://sanatanprabhat.org/hindi/101157.html
-नाठाळ नठ्या
भाजपचे शासनही हवे आणि
In reply to लोकसभा निवडणूक २०२४ : नोटाचे आकडे जुळंत नाहीत by नठ्यारा
भाजपचे शासनही हवे आणि प्रामाणिकपणाही हवा? कसं शक्यय?
शासन वेगळे
In reply to भाजपचे शासनही हवे आणि by पॅट्रीक जेड
निवडणूक आयोग शासकीय संस्था नाही.
-ना.न.
ते सांगायला झालं.
In reply to शासन वेगळे by नठ्यारा
ते सांगायला झालं.
परत एकांगी. अहो काँग्रेस, सपा
In reply to भाजपचे शासनही हवे आणि by पॅट्रीक जेड
परत एकांगी. अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम पक्ष अनेक वर्ष बूथ capturing करूनच जिंकत होते, त्या बदल तुम्ही कधी बोलला नाहीत. त्या वेळी पण निवडणूक आयोग काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधला होता ना? शेषन यांनी ती परिस्थिती सुधारली ना? तुम्हीच सांगितले ना की 2009 मधे बिजेपी evm ला विरोध करत होती आणि काँग्रेस पुरस्कार, मग त्या वेळी आज पेक्षा वेगळे असे काय होते?
अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम
In reply to परत एकांगी. अहो काँग्रेस, सपा by टीपीके
अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम पक्ष अनेक वर्ष बूथ capturing करूनच जिंकत होते फेका आणखी मोठ्या फेका. अगदी आपले शेठ फेकतात त्यापेक्षा मोठ्या फेका. काँग्रेसने अस केलं असतं तर आज भाजप नावाचा पक्षच अस्तित्वात नसता. काँग्रेसने लोकशाही जपली म्हणूनच आज भाजपला ती पायदळी तुडवता येतेय.
फालतू प्रतिवाद करू नका, याच
In reply to अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम by पॅट्रीक जेड
फालतू प्रतिवाद करू नका, याच तर्काने मग आत्ता काँग्रेस किंवा इतर पक्षांना ह्या २३६ जागा मिळाल्या नसत्या. आम्ही नाही तुम्हीच मोठ्या मोठ्या फेकता.
अर्थात रेटून सतत खोटे बोलणे तुमच्या नोकरीचाच भाग आहे म्हणा. या वेळी पगारवाढही चांगली मिळाली असेल ना?
२०२४ ची निवडणूक आलीपण ?
अरे, आजून २०२० च्या निवडणुकीचे अधिकृत निकाल प्रसिद्ध झालेले नाहीयेत. २०२४ ची निवडणूक कसली घेताहेत अमेरिकेत ! हीस खरंतर चिवडणूक म्हणा.
२०२० चे निकाल इथे मिळंत नाहीत : https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-results-and-…
पूर्वीच्या निवडणुकांचे मात्र मिळतात. अमेरिकी निवडणुका हा एक भला थोरला घोटाळा आहे.
-नाठाळ नठ्या
खोटे बोला पण रेटून बोला
In reply to २०२४ ची निवडणूक आलीपण ? by नठ्यारा
https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-results-and-…
हया आधी सुद्धा दिलेले.
https://www.misalpav.com/comment/1150771#comment-1150771
लिंक खोलत्येय का?
In reply to खोटे बोला पण रेटून बोला by कॉमी
कॉमी,
ती लिंक उघडंत नाही.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
उघडतीये की
In reply to लिंक खोलत्येय का? by नठ्यारा
उघडतीये की
टंकाळा
गेली अडीचहून अधिक वर्षे जे या धाग्यावर लिहायचे होते ते टंकाळ्यामुळे राहून जात आहे.
मी भारतीय नागरिक असलो तरी दीर्घकाळापासून नोकरीमुळे अमेरिकेत वास्तव्यास आहे. इथे राहत असल्यापासून २००८ पासूनच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका पाहत आलो आहे. वेळोवेळी माझे शेजारी व कामाच्या ठिकाणच्या अमेरिकन सहकार्यांशी चर्चाही करत आलो आहे.
काही अपवाद वगळता बहुतांश अमेरिकन लोकांचा मला भावलेला गुण म्हणजे, त्यांचा राजकीय कल कसाही असला तरीही त्यांना त्यांची व्यवस्था भ्रष्ट झालेली अजिबात खपत नाही. सरकार बदलले म्हणून नोकरशहांच्या काम करण्यात बदल घडत नाहीत. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत निकाला बदल घडेल एवढ्या प्रमाणावरची हेराफेरी होणे हे अशा लोकांमुळे अशक्य आहे.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इथले दोन्ही मोठे पक्ष जवळजवळ तुल्यबळ असतात. अंदाजे निम्म्या-निम्म्या राज्यांत दोघांचीही सत्त्ता असते. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत पक्षातून विजयी पक्षात घाऊक प्रमाणात पक्षांतर होत नाही. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकींमध्ये विजेते व पराभूतांच्या मतांच्या टक्केवारी खूप मोठा फरक आढळून येत नाही (बरेच जुने काही अपवाद वगळता). त्यामुळे कुठलाही एक पक्ष दुसर्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करू देईल हेच मुळात शक्य नाही.
२०२० च्या निवडणुकीतील निकालांबाबत पारंपरिक रिपब्लिकन पक्षातून फारसे आक्षेप घेतले गेले नाहीत. रिपब्लिकन उपाध्यक्ष व रिपब्लिकन सिनेटर्स व काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या डेमोक्रॅटिक सहकार्यांबरोबर नेहमीची प्रक्रिया पार पाडून निकालांवर शिक्कामोर्तब केले.
मिपाच्या पहिल्या दशकात सक्रिय असणार्यांमधे अनेक अभ्यासू मिपाकर अमेरिकास्थित व अमेरिकन नागरिक होते जे गेल्या सहा-सात वर्षांत फारसे सक्रिय राहिले नाहीत. मिपावर भारतीय नागरिकांनंतर मिपाकर असण्यात अमेरिकन नागरिकांचाच दुसरा क्रमांक असावा. असाच धागा एका दशकापूर्वी आला असता तर तेव्हाच्या अमेरिकास्थित सक्रिय मिपाकरांनी जोरदार प्रतिवाद केला असता.
बहुधा धागाकर्ते अमेरिकेत कधीही दीर्घकाळ राहिले नसावेत असा अंदाज आहे.
अमेरिकेतल्या निवडणुक प्रक्रियेत मला भावलेली गोष्ट म्हणजे अनेक राज्यांतली 'Early Voting' ची सुविधा. प्रत्येकाला मतदानाच्या दिवशीच मतदान करणे शक्य नसते. काही राज्यांत दोन आठवडे किंवा काही राज्यांत ४५ दिवसांच्या कालावधीत मतदान करता येते.
लोकांना कोण विचारतो?
In reply to टंकाळा by श्रीरंग_जोशी
श्रीरंग जोशी,
मी अमेरिकेत फारसा राहिलेलो नाही. अमेरिकन लोकं कितीही चांगले असले तरी त्यांना विचारतो कोण? जनसंहारक अस्त्रे सापडली का? ९११ रोजी ३५०० निरपराध लोकांचा खून झाला, एकतरी फौजदारी खटला उभा राहिला का? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आंतोनिन स्कालीया संशयास्पद प्रकारे मृतावस्थेत सापडला. काही झालं का पुढे? कोणी कसला भरवसा द्यायचा? अमेरिकेचं अधिकृत संकेतस्थळ २०२० च्या निवडणुकीची माहिती देत नाही. आणि चाललेत आपले २०२४ च्या चिवडणुका खाजवायला.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
तात्या पुन्हा आले
तात्या पुन्हा आले
आता बोलशेवीक नाहीत हा. कारण
In reply to तात्या पुन्हा आले by diggi12
आता बोलशेवीक नाहीत हा. कारण आता निकाल मनासारखा लागला आहे.
यू आर डेड राईट सर!
In reply to आता बोलशेवीक नाहीत हा. कारण by कॉमी
ट्रंपूतात्या भारताला कमी हानिकारक आहे असा माझा अंदाज आहे. बोल्शेविक मागे सरले हे ही नसे थोडके. तात्यांनी झोपाळा राज्यांत आपली फिल्डिंग चोख लावली. त्यामुळे २०२० सारखे पहाटे ३ वाजता मतदानाचे निळे आकडे फुगले नाहीत. तसले प्रकार या खेपेस वेळीच पकडले गेले. असं ऐकिवात आहे.
-नाठाळ नठ्या
तात्या निवडून आल्यामुळे
तात्या निवडून आल्यामुळे अमेरीकन डेमोक्रॅटस पेक्षा जास्त दुख लोकसत्ता कारांना झालेले दिसते. गेले दोन-तीन दिवस त्यावरच अग्रलेख पाडायचे काम चालले आहे.
मी नाही त्यातली, कडी लावा आतली .... !
कॉमी,
उघडली हो एकदाची. या दुव्यावर निकाल पीडीएफ स्वरूपात आहेत : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections201…
हुश्श. मिळालं एकदाचं निकालपत्र. पण हा दुवा मूळ संकेतस्थळावर उपलब्ध नाहीये. मी नाही त्यातली, कडी लावा आतली .... ! असो.
तर आता अधिकृत आकडे उपलब्ध झालेले आहेत. वरील दुव्यावरच्या पीडीएफ पान क्रमांक ११ वर एकूण मतसंख्या दिलेली आहे १५,८४,२९,६३१ ( अक्षरे पंधरा कोटी चौऱ्यांशी लाख एकोणतीस हजार सहाशे एकतीस). म्हणजे सुमारे १६ कोटी.
आता राज्यनिहाय मतदानसंख्या असलेला दुवा देतो : https://web.archive.org/web/20230423234912/https://worldpopulationrevie…
या दुव्यानुसार एकूण नोंदलेले मतदार आहेत २१,४२,८६,२२७ ( एकवीस कोटी बेचाळीस लाख शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस ).
टक्केवारीसाठी छोट्या संख्येस मोठ्या संख्येने भागूया. १५,८४,२९,६३१ भागिले २१,४२,८६,२२७ = उत्तर ७३.९३३६ %
याचा अर्थ नोंदलेल्यांपैकी सुमारे ७४ % लोकांनी मतदान केलं. मग ६६ % आकडा कुठनं आला? ७४ % ची टक्केवारी घसरून ६६ % वर कशी आली? खोटं कोण बोलतंय ? अमेरिकी माध्यमे ? की तिथली निवडणूक यंत्रणा ?
माझ्याकडून अनावधानाने चूक झाली म्हणून माझ्यावर खोटं बोलल्याचा आरोप केलात. प्रत्यक्षांत कोण खोटं बोलतंय ते कळलं असेल अशी आशा आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
तुम्ही सगळं नीट समजून तपासून
In reply to मी नाही त्यातली, कडी लावा आतली .... ! by नठ्यारा
तुम्ही सगळं नीट समजून तपासून घ्या. मग बोलू. उगाच एखाद दुसरा आकडा इकडचं तिकडचं न वाचता उचलून नको.
साधा सोपा प्रश्नं ....
In reply to तुम्ही सगळं नीट समजून तपासून by कॉमी
साधा सोपा प्रश्नं आहे : राज्यनिहाय बेरीज केलेली नोंदणीकृत मतदारांची संख्या २१ कोटी ४५ लाख आहे. तर मग राष्ट्रीय नोंदणीकृत मतदारसंख्या २४ कोटी कशी काय?
-नाठाळ नठ्या
कशाचा कशात पायपोस नाही.
In reply to साधा सोपा प्रश्नं .... by नठ्यारा
कशाचा कशात पायपोस नाही. राज्यनिहाय बेरीज तेवीस सालची आणि तुलना वीस सालाशी.
म्हणून म्हटलं आधी स्वतः उगाच काहीही लिहिण्यापेक्षा क्रिटिकली विचार करा आणि नीट वाचा. अर्थात तुमची ष्टाईल आहे म्हणा की आपल्याला आवडेल तेव्हढेच वाचुन वाट्टेल ते अर्थ काढायचे.