✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवघे भरून आले..

र — राघव, Wed, 01/06/2021 - 19:51
सोडून सांजवेळी जाता कुणीतरी ते घर मोकळेच होते.. अवघे भरून आले.. विसरावयास बसता आठव अचूक भिडतो अवकाश पोकळीतील, अवघे भरून आले.. मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी.. अवघे सरून गेले.. अवघे भरून आले.. होता मनात बहुदा तो शब्द ओळखीचा.. निरभ्र अभ्र सारे अवघे भरून आले.. -- त्या थोटकात पुन्हा हिरवाच कोंब होता.. नाविन्य पालवीतून अवघे भरून आले! -- -- त्या संध्याकाळी अचानक काहीतरी निसटून गेल्याची भावना झाली.. ती हुरहुर अगदी टीपेची होती.. जशी आली तशीच गेली..! अत्यंत गहिरं आणि जड असं काहितरी मनाला भिडलं होतं हे मात्र खरं. डोळे मिटून थोडावेळ बसलो होतो. त्यावेळी मागे पाहिलेलं एक दृष्य डोळयांसमोर तरळून गेलं.. एका तोडलेल्या मोठ्या झाडाच्या उरलेल्या खोडातून, एका बाजुनं छोटीशी डहाळी पालवी घेऊन फुटली होती.. ते दृष्य आठवलं आणि मग मन जरा शांत झालं. त्या भावना शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न. राघव

प्रतिक्रिया द्या
3290 वाचन

💬 प्रतिसाद (7)

सुंदर

Bhakti
Wed, 01/06/2021 - 22:31 नवीन
मायेस ओतणारी.. ती ऊब सांत्वणारी.. अवघे सरून गेले.. अवघे भरून आले..
  • Log in or register to post comments

आहाsss सुरेख

प्रचेतस
Wed, 01/06/2021 - 22:35 नवीन
आहाsss सुरेख
  • Log in or register to post comments

आहा! क्या बात!

प्राची अश्विनी
गुरुवार, 01/07/2021 - 11:08 नवीन
आहा! क्या बात!
  • Log in or register to post comments

सुंदर

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/07/2021 - 11:32 नवीन
फारच सुरेख, आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

:-)

राघव
गुरुवार, 01/07/2021 - 12:04 नवीन
सगळ्यांना धन्यवाद! तुमचे प्रतिसाद बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

फारच सुरेख!

मूकवाचक
गुरुवार, 01/07/2021 - 13:54 नवीन
का कुणास ठाऊक, सारांश चित्रपटाचा शेवट आठवला हा धागा वाचल्यावर.
  • Log in or register to post comments

ओह्ह..

राघव
गुरुवार, 01/07/2021 - 20:34 नवीन
ओह्ह.. सारांश बघीतला नाही अजून.. आता बघावा लागेल. अनुपम खेर चा ना?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा