सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174883
प्रतिक्रिया
559
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेठ ...
In reply to शेतमाल महाग आहे इथे by Rajesh188
उलट
In reply to शेतमाल महाग आहे इथे by Rajesh188
सध्याची शेती पद्धत
अनिरुद्ध जी, सहमत आहे .. पण
In reply to सध्याची शेती पद्धत by अनिरुद्ध.वैद्य
कृषि कायद्यातील त्रुटी-दाद-फायदा.
प्राध्यापक दिलीप बिरुटे सर.
In reply to कृषि कायद्यातील त्रुटी-दाद-फायदा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
2022 पर्यंत सरकारने शेतकरी
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे
तो एक जुमला होता.
In reply to 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे by आग्या१९९०
https://youtu.be/YcqVWFZXyaE
भवित्यावत संघर्ष हा होणारच
शेती विधेयक ही शेतकऱ्या चे
In reply to भवित्यावत संघर्ष हा होणारच by Rajesh188
वैचारिक गोंधळ टाळा !
In reply to भवित्यावत संघर्ष हा होणारच by Rajesh188
>>उद्या शेतकऱ्या chya जमिनी हडप करण्याचे प्रयत्न झाले तर 2 -३,
>>उद्या शेतकऱ्या chya जमिनी हडप करण्याचे प्रयत्न झाले तर 2 -३, किलोमीटर वर काश्मीर आणि खलिस्तान निर्माण होईल.>>
प्रभु इतकी मोठी विधाने करण्या पूर्वी फक्त दोन प्रश्नाची उत्तर द्या सरकारी हडेलहप्पीने कुळ कायद्यात अनेकांच्या शेकडो एकर जमिनी गेल्या त्यावेळी किती ठिकाणी काश्मीर आणि खलिस्तान निर्माण झाले? त्या फुकट मिळालेल्या जमिनी कुळांनी शहरीकरण होताना भरमसाठ किमतीत विकून टाकल्या आणि जमिनीचे मूळ मालक आज कंगाल आहेत. कसायला मिळालेली जमीन विकायचा त्यांना अधिकार होता का? या प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर आत्तापर्यंत सगळे फुकट मिळण्याची सवय झालेल्यांची बाजू घेत उगाच काहीतरी तारे तोडणे बंद करा. हा जुना लेख वाचा https://www.loksatta.com/vastu-lekh-news/information-on-agricultural-la… आणि त्यावर पण तुमचे मौलिक विचार मांडा!पळपुटे सरकार
ह्या आंदोलनात पंजाब वगळता इतर
उत्तम प्रश्न आणि त्याचं उत्तर
In reply to ह्या आंदोलनात पंजाब वगळता इतर by मराठी_माणूस
माहीती बद्दल धन्यवाद.
In reply to उत्तम प्रश्न आणि त्याचं उत्तर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेपटावर पाय ...
In reply to उत्तम प्रश्न आणि त्याचं उत्तर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे पूर्ण खरे नाही. माझाही हाच
In reply to शेपटावर पाय ... by चौकटराजा
सरकार समर्थक कन्फ्युज आहेत का
In reply to हे पूर्ण खरे नाही. माझाही हाच by एक सामान्य मानव
.
In reply to सरकार समर्थक कन्फ्युज आहेत का by Rajesh188
बाकी कायपण म्हणा
गहू आणि तांदूळ
पंजाबला 'गव्हाचे कोठार'उगाच म्हणतात का?
In reply to गहू आणि तांदूळ by Rajesh188
फाऊल....
In reply to पंजाबला 'गव्हाचे कोठार'उगाच म्हणतात का? by अनन्त अवधुत
आयात निर्यात धोरण
नक्कीच.
https://maharashtratimes.com
आता युएई पण भारतात गुंतवणूक
भारतातल्या लोकांना टीका
अम्बानी अदानी
In reply to भारतातल्या लोकांना टीका by रात्रीचे चांदणे
आताच राजस्थान सरकारने शेतीवर
तिढा सुटणार कसा ?
मोदी सरकार ची भूमिका
माफ करा पण गळा काढण्याशिवाय
In reply to मोदी सरकार ची भूमिका by Rajesh188
सरकारची पद्धत ..
In reply to मोदी सरकार ची भूमिका by Rajesh188
बापू
क्षमस्व...!
शेतकरी आंदोलक आणि चर्चा (फेरी आठवी)
एका हास्य कवी नी मस्त वर्णन केले.आहे.
मन की बाते सांगण्यात फालतू
In reply to एका हास्य कवी नी मस्त वर्णन केले.आहे. by Rajesh188
मन की बाते सांगण्यात फालतू
In reply to मन की बाते सांगण्यात फालतू by प्रसाद_१९८२
सध्या सरकार व शेतकरी संघटना
आज पण चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही
आता वाद न्यायालयावर विसंबून.
सरकारचा जो काही हेतू असेल तो
In reply to आता वाद न्यायालयावर विसंबून. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अडून राहणे ठीक नाही.
In reply to सरकारचा जो काही हेतू असेल तो by प्रचेतस
कांग्रेस सरकार असतं तर शेतकर्
In reply to अडून राहणे ठीक नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक समिती नेमली असती.
In reply to कांग्रेस सरकार असतं तर शेतकर् by प्रचेतस
इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे हा विषय नाही.
In reply to कांग्रेस सरकार असतं तर शेतकर् by प्रचेतस
सरकारने कायदे मुळीच रद्द करू
In reply to इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे हा विषय नाही. by Rajesh188
बिरुटे साहेब
In reply to अडून राहणे ठीक नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकार नी कायदे मागे घेतले नाहीत तर पुढे काय
बैठ्कीत होतं काय.
देशातलं स्वातंत्र्यानंतरचं
In reply to बैठ्कीत होतं काय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशातलं स्वातंत्र्यानंतरचं मोठं सर्वात लांबवर चाललेलं आंदोलन
बिरुटे सर द्वेष किती खालच्या पातळीवर पोहोचला आहे हि काळजीची बाब होते आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे ४ -५ वर्षे चालले होते. निदान मराठीच्या प्राध्यापकाने हे विसरून जावे हे अपेक्षित नाही. अशी अनेक आंदोलने वर्षानुवर्षे चालली उदा तेलंगण राज्यासाठी, बेळगाव मराठी एकीकरण गोवा मुक्ती आंदोलन तर ४० वर्षे चालू होते.खरे साहेब
In reply to देशातलं स्वातंत्र्यानंतरचं by सुबोध खरे
बळाचा वापर केला तर सरकार अडचणीत येईल
केवळ भंपक प्रतिसादच द्यायचा
In reply to बळाचा वापर केला तर सरकार अडचणीत येईल by Rajesh188
महेंद्रसिंग टिकैत किंवा
वाक्याशी सहमत.
In reply to महेंद्रसिंग टिकैत किंवा by जानु
अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे
Rajesh188 प्रभू
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
कुठले शेतकरी नाराज आहेत,
In reply to अन्याय होत असेल तर. त्याचा विरोध केलाच पाहिजे by Rajesh188
बरोबर आहे
In reply to कुठले शेतकरी नाराज आहेत, by धनावडे
नवीन कायद्या नी कंपन्या
In reply to बरोबर आहे by Rajesh188
करार न करण्याचे स्वतंत्र शेतकऱ्यांना असणार
In reply to नवीन कायद्या नी कंपन्या by सतिश गावडे
राजेशसाहेब
In reply to बरोबर आहे by Rajesh188
पण ज्यांना शेती करायचेय
In reply to बरोबर आहे by Rajesh188