✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घडामोडी डिसेंबर २०२०

ख
खेडूत यांनी
Tue, 12/01/2020 - 10:24  ·  लेख
लेख
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे. या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत. कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील? मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64759 वाचन

💬 प्रतिसाद (210)

प्रतिक्रिया

डिसेंबर २०२० सुरू झाल्याने

मराठी_माणूस
Tue, 12/01/2020 - 11:51 नवीन
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.
अगदी वेळेत धागा काढला आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

तुषार काळभोर
Wed, 12/02/2020 - 10:34 नवीन
डिसेंबराचा धागा नोव्हेंबरात (किंवा ऑक्टोबरात) काढायचा मोह टाळून डिसेंबरात काढून प्रगल्भता दाखवल्याबद्दल अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 12/01/2020 - 11:52 नवीन
आमच्या राष्ट्रवादीच्या सुप्रियाताईनी पहिला घडा मोडलाच! " कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं." https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-supriya-sule-uttar-pradesh-cm-yogi-adityanath-mumbai-bollywood-sgy-87-2342391/ बॉलिवूड म्हणजे काही २/४ कंपन्यांचा समूह नाही की कापड गिरण्या नाहीत.बोलिवूड मुंबईचे म्हंटले तरी ह्यांचे अर्धे शूटिंग युरोपात व भारतातल्या ईतर ठिकाणी- राजस्थान्,हिमाचल.. वगैरे होते.
  • Log in or register to post comments

असं कसं असं कसं...

सॅगी
Tue, 12/01/2020 - 14:18 नवीन
अहो "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" चे पुर्ण शुटींग बारामतीला झाले होते....आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

>मात्र चर्चा करताना

साहना
Tue, 12/01/2020 - 13:28 नवीन
>मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. अशी अपेक्षा ठेवायला हे काय annals of mathematics आहे काय ? इथे सध्या थालीपीठाच्या रेसिपी वरून सुद्धा भांडणे होतात. (this is स्पार्टा च्या तालावर => थिस ईस मिपा )
  • Log in or register to post comments

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 12/01/2020 - 17:27 नवीन
"लहान्पणापासुन माझ्यावर पटेल्/नेहरू ह्यांचा प्रभाव राहिलेला आहे. माझा कॉन्ग्रेसच्या विचारधारेवर विश्वास आहे. मी दीर्घ काळ आता काँग्रेस्मध्येच राहणार आहे" उर्मिला मातोंडकर( मार्च- २०१९) https://www.rediff.com/news/report/cong-fields-urmila-matondkar-from-mumbai-north-seat-lok-sabha-2019/20190329.htm आज- उर्मिलेचा शिवसेनेत प्रवेश! राजकीय विचारधारा वगैरे राजकीय अभ्यासकांसाठी व आंतरजालावर फावल्या वेळेत बौद्धिक कुस्ती खेळण्यासाठी असतात असे ह्यांचे मत Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अजुनही सुंदर दिसते हो !

धर्मराजमुटके
Tue, 12/01/2020 - 19:53 नवीन
अजुनही सुंदर दिसते हो मातोंडकरांची उर्मिला ! असे आमच्या हिचे मत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

चाळीशीनंतर

उपयोजक
Tue, 12/01/2020 - 22:23 नवीन
दात थोडे पुढे आलेत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/22/2020 - 18:54 नवीन
अजुनही सुंदर दिसते हो मातोंडकरांची उर्मिला..!
असेच म्हणतो....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

खोबरं

उपयोजक
Tue, 12/01/2020 - 22:22 नवीन
तिकडं चांगभलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

खोबरं झालं देखील?

खेडूत
Tue, 12/01/2020 - 22:35 नवीन
खोबरं झालं देखील? त्या सतरंज्या का काय उचलणार आहेत म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

कॅनडाला चिंता शेतकरी आंदोलनाची

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 12/01/2020 - 20:05 नवीन
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांना भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल काळजी https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/farmers-protest-canadian-pm-justin-trudeau-expresses-concern-says-in-touch-with-indian-authorities/videoshow/79507868.cms कॅनेडियन संसदेत भरमार पंजाबी खासदार असल्याचा परीणाम असावा बहुतेक. पण आमच्या अंतर्गत मामल्यात यांनी ढवळाढवळ का करावी?
  • Log in or register to post comments

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो

बाप्पू
Tue, 12/01/2020 - 20:31 नवीन
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांना भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल काळजी
पंजाबी लोकांची वोट बँक.. बाकी दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

व्होट बँक महत्वाची

Rajesh188
Tue, 12/01/2020 - 22:39 नवीन
निवडणूक जिंकली तरच सत्ता मिळते त्या साठी व्होट बँक सर्व नाच हवी. तो नैसर्गिक नियम आहे.
  • Log in or register to post comments

देव दिवाळी आणि शेतकरी आंदोलन

कपिलमुनी
Wed, 12/02/2020 - 00:52 नवीन
आपले पंतप्रधान शेतकरी आंदोलनाकडे लक्ष ना देता वाराणसीत पूजा पाठ करण्यात मशगुल आहेत. मोदीजी आणि भाजप विषयांतर करण्यात खुप तज्ञ आहेत.देशात आंदोलन चालु असतांनाच हा धएमिक चा कार्यक्रम मुद्दाम करण्यात आला जेणेकरुन शेतकरी मुद्द्यांवरुन टिका करतांना जाणीवपुर्वक कार्यक्रमाचा उल्लेख व्हावा व भाजप आयटी सेलला हिंदुविरोधीचे चित्र उभे करायला सोपं जावो. जेव्हा जेव्हा आंदोलन होतात, त्याला धार्मिक किंवा अँटी नॅशनल चा रंग दिला जातो ,कधी आर्मी चा तर कधी धर्माचा मुद्दा काढून आंदोलन भरकटवली जातात. फेक व्हिडीओ , व्हाट्सएप, पेड पत्रकार यांच्या साहाय्याने चारित्र्य हनन केले जाते. किंवा मग या देव दिवाळी टाईप ची रंग सफेदी केली जाते. मोदी हे हिंदू आहेत त्यांनी पूजा अर्चा जरूर करावी,पण त्यासाठी वाढवलेल्या दाढी सोबत संन्यास घ्यावा. लोकनियुक्त पदावर बसून हरी हरी करू नये. देशात जी आंदोलने चालू आहेत , प्रश्न आहेत ते सोडवावे.
  • Log in or register to post comments

लोकनियुक्त पदावर असताना

रात्रीचे चांदणे
Wed, 12/02/2020 - 07:14 नवीन
लोकनियुक्त पदावर असताना गुरुद्वारा त जाऊ शकतात दर्ग्या वर चादर देऊ शकतात तर पूजा पाठ का नाही करू शकत. मुळात भारता सारख्या देशात 12 महिने ही आंदोलने चालूच असतात आणि मोदींनी वाराणसीत फक्त पूजा पाठच केला नाही तर प्रयागराज ते वाराणसी 73 किलोमीटर 6 लेन रोड ची पायाभरणी पण केली आहे त्याच बरोबर काशी विश्वेश्वर कॉरिडॉर ची पाहणी केली. सरकार ने आंदोलक शेतकर्या बरोबर चर्चा केली पाहिजे हे मात्र बरोबर आहे आणी काल चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. पण त्या साठी मोदीच पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. माझे तर स्पष्ट मत आहे की ह्या आंदोलना पेक्षा 100 पटीने जरी मोठी आंदोलने झाली तरी सरकार ने अत्ता केलेले कायदे माघे घेऊ नयेत. सद्ध्या असलेल्या बाजार समित्यांना आणखी एक पर्याय दिला तर बिघडले कुठे? शेतकरी ठरवतील की आपला माल कुठे विकायचा ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आंदोलकांची तोडफोड आणि

बाप्पू
Wed, 12/02/2020 - 09:07 नवीन
आंदोलकांची तोडफोड आणि आकांडतांडव बघता ते खरेच आंदोलक आहेत कि गावगुंड असा प्रश्न पडतो. नेमका कोणत्या गोष्टींना विरोध आहे ते आजवर समजले नाही. फक्त गोंधळाची परस्थिती निर्माण करून सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी चाललेला आटापिटा आहे. सेम CAA and NRC च्या वेळी झालेलं. एक विशिष्ठ कम्युनिटी - देशातून हाकलून लावतील, कॉन्सट्रेशन कॅम्प मध्ये घालतील असा प्रचार ( जाणीवपूर्वक ) करून सरकारविरोधी वातावरण तयार करत होती. मुल जन्माला यायच्या आधीच त्याचे मुंडन करायचे असा काहीसा प्रकार आहे. बाकी टोप्या घालून चादर चढवणे, इफ्तार पार्ट्या साजऱ्या करणे, गुरुद्वारात जाणे असे प्रकार आजवर चालत होते पण कोणी मंदिरात जाऊन पूजा पाठ केला तर लगेच पार्श्वभागात जळजळ होणार. हिंदू बहुसंख्य असून पण आणि आपल्या देशाची हीच मुख्य संस्कृती असून सुद्धा ती फॉलो केली कि लगेच फुरोगामी ओरडायला लागतात.. सेक्युलॅरिझम म्हणजे हेच का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नारे

महेंद्रसिंग साथी
Wed, 12/02/2020 - 09:18 नवीन
खलिस्तान जिंदाबादचे नारे किंवा जे इंदिरा गांधींचे केले तेच मोदींचे पण करू अशा घोषणा म्हणजे अ‍ॅन्टी नॅशनलच असाव्यात. मोदीविरोधी कॅम्पमध्ये असल्या प्रकारांना मोठे देशभक्तीचे प्रतीक मानले जात असेल तर क्ल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आपले पूज्य युग पुरुष

सुबोध खरे
Wed, 12/02/2020 - 09:51 नवीन
आपले पूज्य युग पुरुष (मफ्लरवाले) दुटप्पी पण कसा दाखवत आहेत तेही पाहून घ्या. एकीकडे पंजाब मध्ये पुढेमागे जागा मिळवायच्या लोण्याच्या गोळ्याकडे नजर लावून शेतकऱ्यांच्या( तेही संशयास्पद आहे म्हणा) आंदोलनाला पाठिंबा द्यायचा त्याच वेळेस या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय राजपत्रात नोंद हि करायची. शिवाय आंदोलनकर्त्यांची मागणी आहे कि त्यांना शेतात राब जाळण्याची परवानगी असावी त्यालाही यांचा विरोध आहे. त्यातून श्री मोदी याना विरोधासाठी विरोधहि करायचा वृत्तीच हलकट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत.

शा वि कु
Wed, 12/02/2020 - 10:24 नवीन
खलिस्तानी म्हणुन शिक्का मारला, विषय सन्पला. देशद्रोही म्हणुन शिक्का मारला, विषय सन्पला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आजचा लोकसत्ताचा अग्रलेख

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 12/02/2020 - 11:48 नवीन
तसा मी गिरिश कुबेर यांचा पंखा नाही, पण तरीही कधी कधी हा माणुस बरोबर लिहितो. https://epaper.loksatta.com/2909563/loksatta-pune/02-12-2020#clip/56731336/4878f9c7-4877-4504-9213-51e04683ba49/1595.5555555555557:764.4499011329533/topclips चायनाची पाण्याने जग/शेजारी देश नियंत्रित करायची पाताळयंत्री योजना(मोदींच्या गंगापूजेच्या पार्श्वभूमीवर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बातमी महत्वाची आहे...

अर्धवटराव
Wed, 12/02/2020 - 18:16 नवीन
पण तिथे उगाच गंगापूजन मधे आणायचं कारण नव्हतं. बातमी भलत्याच वळणावर न्यायची काय खोड आहे देव जाणे. भारतीय नद्यांची तब्येत नाजुक आहे हे खरं आहे. गंगा शुद्धीकरण थोडंफार झालय पण अजुनही प्रचंड स्कोप आहे. पण थ्री गॉर्जेस धरणाचं कौतुक करताना तिथल्या नद्यांची काय हालत झाली आहे हे पुढे आणत नाहि कुबेर महाशय. एक मोठं धरण बांधलं तर तेव्हढच मोठं नर्मदा बचाव आंदोलन झालं... चीन मधे असं काहि होतं का? बातमी सनसनाटी करण्याच्या नादात आपण लोकशाही राज्यपद्धतीला दुर्बळ दाखवण्याचा मुर्खपणा करतोय हे ही जाणवु नये या महाशयांना... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

देशात जी आंदोलने चालू आहेत ,

प्रसाद_१९८२
Wed, 12/02/2020 - 15:44 नवीन
देशात जी आंदोलने चालू आहेत , प्रश्न आहेत ते सोडवावे. -- मोदी-शहाना शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे अजिबात ज्ञान नाही. काय तर म्हणे शेतकर्‍यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवू. याशिवाय या दोघांनी पोलीसांना बळाचा वापर करायचा नाही असा देखील आदेश दिलाय. हॅट याला आंदोलन हाताळणे म्हणतात ? खरे तर शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे ज्ञान, मोदी-शहांनी शरद पवारांकडून शिकायला पाहीजे, मावळ मधे कसे हाताळले होते शेतकरी आंदोलन, पोलीसांमार्फत डायरेक्ट गोळीबार करुन, शेतकर्‍यांना थेट ढगात पाठवून शरद पवारांनी त्यांच्याबरोबर न्याय केला होता. याला म्हणतात किसान आंदोलन हाताळणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

काल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/22/2020 - 19:02 नवीन
आपले पंतप्रधान शेतकरी आंदोलनाकडे लक्ष ना देता वाराणसीत पूजा पाठ करण्यात मशगुल आहेत.
दिल्लीत कुठे तरी पहाटेच गुरुद्वारात माथा टेकायला गेल्याचीही बातमी पाहण्यात आली होती. बाकी आंदोलनाला परदेशी फंड मिळाल्यावरुन आंदोलनात धरपकड करुन आंदोलनातील धग कमी करतील, आंदोलन मोडून काढतील असे वाटते. बाकी, मुद्द्याशी सहमत आहे.
मोदी हे हिंदू आहेत त्यांनी पूजा अर्चा जरूर करावी,पण त्यासाठी वाढवलेल्या दाढी सोबत संन्यास घ्यावा. लोकनियुक्त पदावर बसून हरी हरी करू नये.
वाढलेली दाढी मला वाटतं, नाताळ सणापर्यंत ठेवतील. सांताक्लॉजची देशाला काहीतरी नवीन भेट वगैरे अशी काहीतरी आयडिया असावी. पण छान दिसतात पंतप्रधान दाढी वाढवलेली अवस्थेत. रामायण मालिकेत ते ऋषिवगैरे असायचे तसे. आपलेपण वाटतं त्या रुपात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अहाहा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/23/2020 - 16:52 नवीन
Image removed. जागतिक लेवलवर नेत्यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली तर आपला पहिला क्रमांक नक्की असेल. नंबर एक नाटकी राजकीय व्यक्तिमत्व. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकाद्या धर्मस्थानाला भेट देणे

प्रसाद_१९८२
Wed, 12/23/2020 - 17:39 नवीन
एकाद्या धर्मस्थानाला भेट देणे/दर्शन घेणे हे नाटकी कसे ? आणि वेशभुषा स्पर्धा कश्याची ? गुरुद्वार्‍यात जाताना 'उघड्या डोक्यानी जाऊन नये' हा सर्वमान्य संकेत आहे, मोदींनी तो पाळला, तर यात नाटकीपणा काय आहे? --- मोदी निदान निवडणुकीच्या काळात, हिंदू मतदारांना खूष करण्यासाठी 'मंदीर रेस'चे कार्यक्रम तरी करत नाहीत. तुमचा मोदी विरोध दिवसेंदिवस हास्यास्पद होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर

सुबोध खरे
Wed, 12/23/2020 - 20:03 नवीन
बिरुटे सर आपल्याला निवडक विस्मरण होतंय. किंवा मोदी द्वेषामुळे असं होतंय. मागे मुसलमान मौलवींनी त्यांना टोपी( तकिया किंवा कुफी) घालायला दिली होती तेंव्हा त्यांनी राजकीय फायदा वगैरे कडे लक्ष न देता ती घालण्यास सर्वांच्या समोर नकार दिला होता.असे एकदा नव्हे तर बऱ्याच वेळेस घडले आहे. हि हिम्मत दाखवणारे नेते भारतात नगण्य. बाकी गुरुद्वारात जाताना बोडक्या डोक्याने जात येत नाही याचा विसर पडला काय? आणि भगवी टोपी तर ते लहानपणापासूनच घालत आले आहेत. आणि शीख हा हिंदू धर्माचा एक पंथ असूनहि पंडित नेहरू यांनी त्याला राजकीय फायद्यासाठी वेगळा धर्म म्हणून मान्यता दिली हेही लोक विसरले आहेत. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे नाव "हर"मंदिर साहेब हे आहे हेही लक्षात घ्या. पाटण्याच्या गुरुद्वाराचे नाव सुद्धा हरी मंदिर आहे बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नौटंकीचा महानायक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/24/2020 - 08:14 नवीन
डॉक्टर साहेब, गेली अमुक वर्ष काय झालं. धुमुक वर्ष काय झालं. स्वांतंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात राजकारण्यांंनी काय केलं. विकासाचं काय अध:पतन झालं. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी अराजकता माजते, देश संकटात असतो, धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा एक अवतारी पुरुष जन्माला येतो, हे मत 'भक्तांना' मान्यच आहे. चला आता सध्याच्या सरकारावर बोलू काही. दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ शोधायचा झाल्यास मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ? ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ? तर असे काही दिसत नाही. सध्या शेतक-यांचे जे आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाने सरकारची नामुश्की वाढवलेली आहे. पंजाब-हरियाणा या भागातील शिख बांधव या आंदोलनात ज्या तयारीने उतरुन आपला संघर्ष तीव्र करीत आहेत, तेव्हा मीही आपलाच आहे, हे दाखविण्यासाठीचं एक नवं ढोंग तातडीने करावे लागले इतकाच त्या नौटंकीचा आणि बहुरूपीचा अर्थ असावा असे वाटते. >>>बाकी चालू द्या. अधुन मधुन चालूच आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ

प्रसाद_१९८२
गुरुवार, 12/24/2020 - 10:16 नवीन
दर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ शोधायचा झाल्यास मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ? ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ? -- यालाच अंधद्वेश म्हणतात. प्रतिसाद लिहियाच्या आधी निदान माहिती तरी घ्यायची की पंतप्रधान मोदींनी नेमके त्याच दिवशी रकाबगंज गुरुद्वार्‍याला भेट का दिली होती ती. कारण त्या दिवशी गुरु तेगबहादूर यांचा शहिद दिन होता. आणि तुमच्या माहितीसाठी त्यांनी गेल्या डिसेंबर मधे देखील इथे जाऊन दर्शन घेतले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ढोंग

सॅगी
गुरुवार, 12/24/2020 - 10:33 नवीन
मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ?
आंदोलनाच्या नावाखाली चालू असलेल्या ढोंगाला उत्तर द्यायला म्हणुन गेले असतीलही बहुदा...आणि जरी गेले तरी विरोधकांच्या पोटात का दुखावे? एकीकडे "अमुक वर्ष काय झालं. धुमुक वर्ष काय झालं" याबद्दलच्या प्रश्नांवर सोयिस्कर मौन बाळगायचे आणि त्याचवेळी "ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ?" किंवा का जात नाहीत असेही प्रश्न विचारायचे...फारच विनोदी आहे बुवा हे सगळे! बाकी "असे काही दिसत नाही" असे जेव्हा (आणि ज्या कॉन्फीडन्सने) तुम्ही म्हणताय त्याअर्थी मा. पंतप्रधानांचे सगळे शेड्युल तुम्हाला माहिती आहे असे दिसते. =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा !

सॅगी
Wed, 12/23/2020 - 21:51 नवीन
किती ती पोटदुखी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक लेवलवर नेत्यांची

बाप्पू
Wed, 12/23/2020 - 23:57 नवीन
जागतिक लेवलवर नेत्यांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली तर आपला पहिला क्रमांक नक्की असेल. नंबर एक नाटकी राजकीय व्यक्तिमत्व. :) -दिलीप बिरुटे
पाहिला क्रमांक नक्कीच नसेल, कारण ती जागा पप्पू महाशयांनी आधीच बुक करून ठेवलीये. कधी दलित माणसाच्या घरी जेवण करतानाचे फोटसेशन करतील तर कधी स्वतः ला जनेयुधारी ब्राम्हण सिद्ध करतील.. कधी आपला फटका खिसा ( कि फाडलेला खिसा ) भर सभेत दाखवतील तर कधी लाखो रुपयांचे जॅकेट घालून मिरवतील. कधी (खरं तर बऱ्याच वेळेला ) जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या हणतील तर कधी ख्रिशचन बनून आजोळी निघून जातील. निदान मोदी हिंदू आहेत आणि फक्त मतं मिळवण्यासाठी टोप्या घालत नाहीत. आणि हे फार धाडसी आहे. कारण आजकाल सेक्युलरिजम म्हणजे हिंदूंना शिव्या घालणे आणि बाकीच्यांच्या दाढ्या कुरवाळणे. आणि इतरधर्मीयांची मते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे. बाकी गुरुद्वारा मध्ये जाताना डोक्यावर फडके बांधणे यात चुकीचे काय आहे?? आणि शीख हा काही वेगळा धर्म नाही. हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे तुमची जळजळ का होतेय ते समजत नाही. प्रतिसाद संपादित. वैयक्तिक चिखलफेक करु नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,

मामाजी
गुरुवार, 12/24/2020 - 10:23 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, "बायका बायकांकडे जितक्या निरखून बघतात तितके पुण्याचे पेन्शनर सुद्धा बघत नाहीत.." हे पुलंच असा मी असामी मधील वाक्य आठवल. कारण माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे परदेश दौर्यावर जाताना प्रसिद्धीसाठी आपल्या बरोबर विविध वृत्तवाहीन्यांच्या 40 ते 50 पत्रकारांचा ताफा घेउन जात असत. याच्या उलट मोदिं बरोबर फक्त दुरदर्शनचे 1 ते 2 पत्रकार असतात. कारण गेली 18 वर्षे या मोदिद्वेष्ट्यांनी विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व सोशलमिडिया वरून त्यांन वारेमाप प्रसिद्धि दिलेली आहे व अजुन ही देत आहेत. त्यामुळे मोदिंना पक्के ठाउक आहे की " माझे द्वेष्टे मला जितकी प्रसिद्धी देतील तितके माझे भक्तसुद्धा देणार नाहीत" त्या मूळे मोदि स्वत: असे फोटो जाणीवपूर्वक टाकत असतात व मोदिद्वेष हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे मानणारे त्यांचे द्वेष्टे त्याला वारेमाप प्रसिद्धी देण्याच्या मागे हात धुवून लागतात. त्यामुळे मोदिंचा फोटो टाकुन काहीही कारण नसताना त्यांना प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

https://www.news18.com/news

सुबोध खरे
Wed, 12/02/2020 - 09:54 नवीन
https://www.news18.com/news/india/amid-support-to-farmers-stir-kejriwal-govt-notifies-one-farm-law-examining-the-other-two-3134222.html
  • Log in or register to post comments

पहिली पण अशी आंदोलन होत होती

Rajesh188
Wed, 12/02/2020 - 10:36 नवीन
पहिली अशी आंदोलन सरकार विरूद्ध होत होती. कधी कधी ती आंदोलन हिंसक रूप सुद्धा घ्यायची पण कधी त्यांना देश द्रोही ठरवलेले ऐकण्यात नाही.
  • Log in or register to post comments

का नाही ठरवले?

सॅगी
Wed, 12/02/2020 - 10:44 नवीन
कधी कधी ती आंदोलन हिंसक रूप सुद्धा घ्यायची पण कधी त्यांना देश द्रोही ठरवलेले ऐकण्यात नाही.
का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन? हिंसक आंदोलने करुन सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणे हे देशद्रोहाचेच लक्षण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

का नाही ठरवले?

सॅगी
Wed, 12/02/2020 - 10:44 नवीन
कधी कधी ती आंदोलन हिंसक रूप सुद्धा घ्यायची पण कधी त्यांना देश द्रोही ठरवलेले ऐकण्यात नाही.
का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन? हिंसक आंदोलने करुन सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणे हे देशद्रोहाचेच लक्षण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कसे

महेंद्रसिंग साथी
Wed, 12/02/2020 - 11:19 नवीन
का नाही ठरवले? कोणी रोखले होते ठरवण्यापासुन?
कसे ठरवणार? जर सत्तेत बसलेलेच परदेशातील गुप्तचर संघटनेच्या पेरोलवर असतील तर इतरांना देशद्रोही कोणत्या तोंडाने ठरवणार? मित्रोखिन आर्काइव्ह, ताश्कंत फाईल्स मध्ये हे कळेल. युअर प्राईम मिनिस्टर इज डेड पुस्तकातून लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूशी संबंधित अनेक संशयास्पद गोष्टी कळतील. इतकी वर्षे असले लोक सत्तेत होते. डोळे उघडे ठेऊन बघितले की सगळे काही कळते पण डोळे बंद करून किंवा मोदीद्वेषाचा चष्मा लावूनच जगाकडे बघायचे असे ठरविले असेल तर असल्या गोष्टी समजायच्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

बरोबर

सॅगी
Wed, 12/02/2020 - 11:56 नवीन
आणि फार मागे जायचीही गरज नाही, चीनकडुन डोनेशन कोणी स्विकारले होते हे ही जगजाहीर आहे. काँग्रेस ही भारताला लागलेली कीड आहे हे मत दिवसेंदिवस ठाम होत चालले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

फेकूचंद

कपिलमुनी
Wed, 12/02/2020 - 14:45 नवीन
एवढे आहे तर करावी अटक ! नुसता आरोपाच धुरळा ! 6 वर्षे सरकार आहे, का नाही अटक करत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

करतील की

सॅगी
Wed, 12/02/2020 - 15:18 नवीन
काय घाई आहे....
6 वर्षे सरकार आहे
पुढची ६० वर्षेही राहील.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बाकी

सॅगी
Wed, 12/02/2020 - 15:19 नवीन
पप्पूचंदांपेक्षा हेच बरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/22/2020 - 19:05 नवीन
पप्पूचंदापेक्षा 'गप्पूचंद' बरे असे हवे होते. -दिलीप बिरुटे (गप्पूचंदाचा फॅन) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

करायचं आहेच. आधी लीगल

पिनाक
Fri, 12/04/2020 - 18:09 नवीन
करायचं आहेच. आधी लीगल मार्गाने, आणि नाही जमलं तर अपघात पण घडवायचा आहे. नंतर बोंबलू नका अन्याय झाला वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

करदात्यांच्या पैश्यावर गब्बर

साहना
Wed, 12/02/2020 - 11:27 नवीन
करदात्यांच्या पैश्यावर गब्बर झालेल्या ह्या "शेतकऱ्यांची" चांगलीच जिरली पाहिजे. ह्या लोकांना माझी शून्य सहानुभूती आहे ! मोदीजींनी एकदम अढळ राहावे. आंदोलने करणारे हे "शेतकरी" नक्की कोण आहेत तर मंडी ह्या प्रकारातून सामान्य शेतकऱ्याचे रक्त पिणारे पिपासूं ! त्यातील एकाचा हा इंटरव्यू वाचा (हा माणूस दलाल असून स्वतःला शेतकरी म्हणवत आहे ) https://www.rediff.com/news/interview/farmers-agitation-does-modi-understand-farming/20201201.htm तर म्हणे १०० किलो मागे मंडी ह्या प्रकारात त्यांना सरकारला १.५ रुपये कर द्यावा लागतो. हा कर म्हणे खाजगी व्यापाऱ्यांना द्यावा लागणार नाही. पण खाजही व्यापाऱ्यांना स्वतःची मंडी स्वतःच बांधावी लागणार आहे त्यात त्यांना सरकारपेक्षा जास्त खर्च येणार आहे. निकृष्ट दर्जाचा शेतमाल निर्माण करायचा मग खूप मोठा MSP ठरवून सरकारला विकून गब्बर व्हायचे. वरून टॅक्स वगैरे काहीही लागत नाही. पाणी फुकट, वीज फुकट, वरून कर्जमाफी. नोकरीपेशा सामान्य मध्यमवर्गीयांच्या पैश्यावर हे लोक खूप काळ साप बसून नाचत आले आहेत. ह्यांचे दिवस आता भरले आहेत हे पाहून मनाला सुखप्राप्ती होते. ह्या दलालाच्या स्वतःच्या शब्दांत : >Once the APMC mandis shut shop, the farmers will be at the command of these private players who will drive down their prices -- contrary to them paying higher prices till the APMCs shut down -- to maximise their own profits. That's what the Ambanis did with the telecom sector. APMC वाले दलाल आधीपासूनच शेतकऱ्यांना लुटत आहेत. अंबानी ह्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून सर्व ग्राहकांना चांगली जिओ सेवा दिली आहे, आणि हे सर्व त्यांनी उपकार म्हणून नाही तर स्पर्धेमुळे केले आहे. चुकून त्यांचा पाय घसरला कि एरटेल, वोडाफोन इत्यादी त्यांचे ग्राहक चोरायला मागेपुढे पाहत नाहीच. अशीच स्पर्धा शेतमालाला झाली तर अंबानी, अडाणी आणी इतर लोक भांडून शेतकऱ्याला जास्त फायदा देतील. कुठल्याही खऱ्या शेतकऱ्याला थोडीफार जरी अक्कल असेल तर त्याने APMC वाल्या दलालांना जराही समर्थन देऊ नये हीच मागणी. टीप : लेखिकेने शेती केली आहे. शेतीमाल विकला आहे, गायीचे दूध काढले आहे. अजून सुद्धा एक बागायत बाळगून आहे !
  • Log in or register to post comments

APMC

महेंद्रसिंग साथी
Wed, 12/02/2020 - 11:36 नवीन
वेगवेगळ्या ठिकाणी APMC मध्ये या राजकारण्यांचे पिट्टेच बसले आहेत. शेतकर्‍यांवरील APMC मधेच माल विकायचा हे बंधन काढले आणि ते सगळ्यात चांगली किंमत येईल अशा कुठल्याही ठिकाणी आपला माल विकायला लागले तर APMC वाल्यांच्या पोटावर पाय येईल म्हणून शेतकर्‍यांच्या नावाने हे आंदोलनाचे ढोंग चालू आहे. आणि या आंदोलनात खलिस्तान समर्थनार्थ उघडउघड घोषणा होत असताना दिसल्या तरी त्या घोषणा देणार्‍यांना देशद्रोही म्हणायचे नाही कारण ते मोदी सरकारविरोधात आहेत असा अतिहुषार लोकांचा अनाकलनीय पवित्रा असतो. जर खलिस्तानच्या घोषणा कोणी देत असेल तर तो देशद्रोहीच. तुमचे नेहमीचे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गळचेपीचे, सरकारविरोधात असलेल्या सगळ्यांना देशद्रोही म्हणतात असले बुळबुळीत तुणतुणे बास झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

शेवटी टीप लिहिलीत हे बरे

बाप्पू
Wed, 12/02/2020 - 15:34 नवीन
शेवटी टीप लिहिलीत हे बरे केलेत. अन्यथा तुम्हाला शहरी किडा समजून तुमच्या प्रतिसादाला ग्रामीण vs शहरी किंवा शेतकरी vs नोकरदार असा स्वरूप देऊन सॉ कॉल्ड शेतकरी संघटना तुमच्यावर तुटून पडल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

पुरस्कार वापसी

महेंद्रसिंग साथी
Wed, 12/02/2020 - 12:01 नवीन
शेतकरी आंदोलनामुळे 'व्यथित' झालेले खेळाडू त्यांना मिळालेली पद्मश्री आणि इतर पुरस्कार ५ डिसेंबरला परत करणार आहेत. पाच तारखेपर्यंत का थांबत आहेत? आजच परत करा की. आणि पुरस्कार परत करायला स्वतः दिल्लीला जायची गरज नसते. पोस्टाने/कुरियरने पण राष्ट्रपती भवनात पद्मश्रीचे मेडल पाठवता येते. बाबा आमट्यांनी तसे पाठवले होते. जर पोस्टाचा/कुरियरचा खर्च परवडत नसेल तर मी स्पॉन्सर करायला तयार आहे. मावळमध्ये पाणी मिळावे म्हणून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला आणि त्यात एक शेतकरी मारला गेला होता तेव्हा किती जणांनी आपले पुरस्कार परत केले होते? की त्यावेळी दिल्लीत आणि मुंबईत धर्मनिरपेक्ष सरकार असल्याने लोक मेले तरी त्याकडे दुर्लक्ष करायची फॅशन होती? https://www.loksatta.com/desh-videsh-news/farmers-protest-30-medal-winners-back-farmers-ready-to-return-their-awards-scsg-91-2343400/
  • Log in or register to post comments

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते त्याचे काय झाले

Rajesh188
Wed, 12/02/2020 - 13:34 नवीन
काळा पैसा परत आणणार होते त्याचे काय झाले? गंगा स्वच्छ करणार होते, झाली का स्वच्छ? 15 लाख देणार होते त्याचे काय झाले ,दिले का? मल्ल्या,निरव,दाऊद ल फरफटत आणणार होते . आणले का? स्वच्छ भारत अभियान चालू होते. झाला का स्वच्छ भारत. स्किल इंडिया स्टार्ट up इंडिया Make in India. ह्याचे काय झाले? चीन वर बहिष्कार टाकून चीन घाबरून गेला. जनतेनी चिनी समान वर बहिष्कार टाकावा असे सांगायचे आणि चिनी कंपन्यांना भारतात सरकार नीच कॉन्ट्रॅक्ट द्यायचे हे मात्र चालू आहे. ह्या सरकार नी नक्की काय केले. फक्त आधार ,कार्ड,pan card . Bank खात्याला,गॅस कनेक्शन जोडले. बँकेत ठेवलेलं पैसे बुडालं तरी त्याची जबाबदारी घेणे टाळले. सर्व ठिकाणी जनते कडून टॅक्स वसूल करायला suravat केली. बँकांची बुडीत कर्ज वाढवली जी उद्योग पती नी घेतली होती आणि ती माफ पण केली. का आणि कसा विश्वास ठेवेल माणूस ह्या सरकार वर.
  • Log in or register to post comments

व्हाट्सअप वरून साभार हे

बाप्पू
Wed, 12/02/2020 - 15:35 नवीन
व्हाट्सअप वरून साभार हे लिहियला विसरलात वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा