Skip to main content

शब्द झाले मोती.. - २

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही. उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 179525
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

कधी कधी शेवटचं पान म्हणुन जे लिहितो आपण, ती सुरवात असते नविन गोष्टीची. ~~~~₹~~~~ नविन अमृता प्रीतम बद्दल -(इमरोज बद्दल माहिती होते ) त्याचे शब्द स्पर्श बनत होते, आणि तुझे रंग त्या स्पर्शाला नविन रूप देत होते. अश्या वेळी या नात्यांना नावाची गरजच उरत नाही., पवित्रच ते.

भटाचे कँटीन .. चहा.. कॉलेज.. आज माझे मन उडत जाते आहे पुन्हा कॉलेज ला २०००-०२ सालामध्ये.. माणसाचे असेच असते, त्याच्या आयुष्यातील सर्वात आवडता काळ जो असेल तो त्याला सतत आठवत राहतो.. ,माझे त्या पेक्षा वेगळे काय ?.. ------------------------------------------------ शिरुर ला बीसीएस ला दूसर्‍या वर्षाला गेलो आणी आमच्या कँटीन वार्‍या जास्तच वाढल्या.. जास्त चहाची सवय तेंव्हाचीच .. श्रीदेवीलाल भट ह्याचे ( ह्यांचे तेंव्हा ही बोलत नव्हतोच) तेंव्हा कुकडी कॉलणीत चहा आणि वडापाव चे कँटीन होते.. सी.टी.बोरा ला जवळच लागुन असल्याने बरेच जण तेथेच पडिक असत.. कुकडी प्रकल्पाच्या पाटबंधारे खात्यासाठी ते कँटीन होते खरे. त्याच्या दोन चार मळकट अश्या निळ्या टेबल वर आमचे कित्येक तास गेले त्याची गणती नाहीच..माझा आणि सरिताचा सगळा अभ्यास तिथेच झालेला.. एकदा इंग्लिश च्या तासाला मित्राची बहिण डायरेक्ट आमच्या वर्गाकडे गेली.. इंग्लिश चा तास चालु होता.. आता कसे तरी ह्या इंग्लिश ला आम्ही बारावीत मागे सोडले होते, तरी कोणत्या जास्त अक्कल असणार्‍या माणसाला हा विषय पुन्हा बिसीएस ला आमच्या मागे लावण्याची बुद्धी झाली होती माहीत नाही.. हा तर मित्राची बहिण पुण्यावरुन थेट वर्गात गेली.. मॅडम ला तीने विचारले, तीच्या भावाबद्दल.. तर मॅडम चे उत्तर - " ते सगळे तुम्हाला वर्गात नाही, तर भटाच्या कँटीनला सापडतील, ते तिकडेच पडिक असतात दिवसभर.. कँटीन म्हंटले की चहा आठवतो आणि त्याच बरोबर सर्वात जास्त आठवत राहतात सरिता आणि शशी... सरिता.. माझ्या आयुष्यातील माझी पहिली मैत्रीण.. आता ही पुण्यात घर घेताना आम्ही जवळ जवळ घर घेतले आहे.. शशी आपला आता पर्यंतचा सर्वात चांगला रुम मेट, मस्त आठवणी.. तो ही पिंपळे सौदागर ला राहतो.. (अजुनही आमचे सर्वांचे घरी जाणे येणे आहे, तसेच.. आमची स्वप्ने आहेत की म्हतारे झाल्यावर ही आपण पुन्हा पुन्हा भेटायचे तसेच.. कधी कॉलेजला चक्कर मारायची ... ) हा तर चहाची सवय कशी लागली ते सांगतो ... एक तर भटाचा चहा भारी.. त्यात वडापाव तर क्या कहना... आपण गणिताचे टॉपर .. सरिता थेअरी विषयात अग्रेसर आणि इंग्रजी येत असल्याने इंग्रजीत हुशार.. दोघे आम्ही शेवटच्या बेंच वर बसायचो.. आमची मैत्री भांडणांपासुन सुरु झालेली .. मला चांगले आठवते, भांडणे असले तरी नंतर आम्ही बोललो होतो.. माझ्या एलेक्टॉनिक्स च्या नोट्स तीला हव्या होत्या.. आपल्याला तेंव्हापासुन आपल्या अभ्यासाचा कधी गर्व नव्हता.. मग आमची भांडणे हळु हळु मिटुन गेली.. आपल्या नोट्स मुळे ती थँक्स म्हणाली होती.. कोणती तरी मुलगी आपल्या धन्यवाद बोलते आहे, हेच तेंव्हा आपल्या साठी अप्रुप होते. तीच्या राणी हॉस्टेल च्या सगळ्या मुली तीला म्हणत , अग तो कसा भांडतो.. कसा कँटीन ला टुकार पोरांच्यात पडीक असतो.. तु का बोलते त्याच्याशी... पण त्या इतर मुलींना माहीत नव्हते.. दोन टुकार माणसे कायम एकत्र येतातच :-)) आणि नंतर आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो.. सरिता मग मला इंग्लिश स्पष्ट बोलायला शिकवणार होती.. आमच्यात जो मराठी बोलेन त्याच्या वर एक चहा, मग त्याने दुसर्‍याला चहा पाजायचा, असे ठरले आणि आमचा चहा जो वाढला तो वाढलाच .. इंग्लिश च्या पार काळ्या ठिकर्‍या पडल्या.. घरा पासुन लांब कॉलेजला असल्यावर, मेस मध्ये पोट भरत नसतेच ( मेस वर मला एक लेख लिहावा लागेल, येव्ह्ड्या मेस मला बदलाव्या लागल्या, नंतर लिहितो ) मग कँटीन च आमचा जोडीदार असे.. शनिवार पुर्ण आणि रविवारी सकाळी कँटीन उघडे असायचे, त्यामुळे तर मोकळे कँटीन हेच आमच्या अभ्यासाचे ठिकाण झालेले.. भटाचा मी सर्वात आवडता गिर्हायीक होतो, कारण माझ्या बरोबर कायम खुप लोक बरोबर येत असत.. ७.३० ला, माझे डी.फार्म चे फ्रेंड यायचे थिटे कॉलेजला कँटीन नव्हतेच. ८:३० ला आमचे बिसीएस चे सर आणी मी.. तेंव्हा इतर फिजिक्स आणि इतर कॉलेज मधील स्टुडंट ला मी कॉम्प्युटर चा शिक्षक वाटायचो.. उंची जास्त असल्याने वाटत असेल :-)). ९:३० ला मी आणि सरिता त्या नंतर पार प्रक्टीकल ची वेळ होई पर्यंत मी तेथेच पडीक असे.. नंतर शशी आणि मी.. नंतर संध्याकाळी परत मी आणि सरिता आणि कधी कधी शशी.. निकम सर प्रिन्सिपल होते.. खुप कडक , त्यांनी नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कँटीन ला जाऊ नये असे फर्मान काढले होते.. अशी आपली ख्याती होती... मेस ला कंटाळुन एक वर्ष मी रुम वर स्वयपाक केलाय. सरिता यायची मदतीला..ती आमच्या बरोबरच जेवायची. ती आमच्या मुलांच्या रुम मध्ये पण एकटी मुलगी कशी येऊ असली नाटके करत नव्हती.. पण स्वयपाक मीच भारी करत होतो, तीच्या पेक्शा ही.. आपल्या गोलगरीत भाकरी आणि कालवण क्या कहना.. शशी मसाले भात भारी करायचा.. रोज आम्ही मसाले भात आणी बाजरीच्या भाकरी करत असू... पण इतके असुन ही चहा मात्र आम्ही घरी बनवत नव्हतो... चहा म्हणजे भटाचाच.. भट पण मला, मी आल्यावर नविन चहा ठेवायचा,, जुना चहा आपल्याला आवडत नव्हता.. माझे नखरे चालवले जायचे तेथे.. नंतर मी वडापाव आणि चहा ची मेस लावली होती भटाकडे... अशी वडापाव ची मेस लावणारा आता पर्यंत तिथला मी एकटाच असेल... तेंव्हा पासुन वडापाव आणि चहा मला एकत्रच लागतो..ती सवय अजुनही तशीच आहे.. सरिता आणी माझ्या भांडणाचे अनेक किस्से इथलेच.. बेन सरिताची रुम मेट होती.. ती म्हणायची, अरे तुम्ही रोज भांडणे करता तर मग परत बोलता का ? तीला नेहमी हा प्रश्न पडायचा... ती खुपच भोळी होती.. आम्हाला मात्र तीच्यावर खुप हसु यायचे.. सरिता आणी मी दोघे ही खुप भांडणप्रीय.. पुर्ण बिसीएस ला आमच्या नादाला कोणी लागत नसे.. बेन भात खाताना खुप घाण पद्धतीने पुर्ण बोटे भरवून खायची.. कधी ती आमच्याबरोबर जेवत असली तर मी तीला म्हणायचो.. एक तर मी आधी जेवतो नाही तर बाई तु जेव आधी.. मला कसतरी होते.. बेन च्या घरी चहा कोणी पित नव्हते.. ती गोवन होती.. कॉलेज संपल्यावर भवानी पेठेत तिच्या घरी गेलो तर ती माझ्या साठी चहा देत असे.. आणि इतरांना कोकम सरबत.. आपल्याला चहाच लागतो म्हणुन चहा.. पण तीच्या घरातला चहा अतिशय घाण होता.. तीने मी येणार म्हणुन सकाळी चहा करुन थर्मास मध्ये ठेवलेला असायचा.. कसे कळणार बेन तुला मला नुकताच केलेला चहा आवडतो :-)), तीच्या आईमुळे, छान आहे छान आहे म्हणुन तसला काळा चहा प्यायचो.. कसे सांगणार काय ते .. बॉटनीतील कोरडे, फिझिक्स चे गायकवाड आणि केमिस्ट्री चे (नाव विसरलो) असे सगळे लॅब असिस्टन्स आणि माझी ही चांगली मैत्री झालेली होती.. बॉटनीचे काळे सर पण आमच्या बरोबर कॅंटीन ला यायचे... तेंव्हा या कँटीन बरोबरच तुषार चे मोठे कॅंटीन सुरु झाले, आणि काही मित्रांबरोबर आम्ही तिकडे ही पडीक राहु लागलो.. कॉलेज हळु हळु जाणेच बंद झाले.. तुषार च्या कँटीनला पांडु नावाचा माणुस काम करायला होता.. तो काय करायचा. कोणाला चहा पाहिजे असला तरी कीटली घेवून जायचा आणि माझ्या कपात चहा द्यायचा जाता येता.. तुषार मित्रच झाला होता आपला.. पांडु ने कितीही चहा असेच दिले तरी मी सर्व चहाचे पैसे द्यायचो.. मिठाची जशी बेइमानी नसते , तशी आपली चहाशी बेइमानी नाही म्हणजे नाही.. माझे लग्न २०११ एंड ला झाले, त्या नंतर बायकोने तेथुन बाहेरुन परिक्षा देता येइल असा बीए चा फॉर्म भरला होता.. तेंव्हा तीच्या बरोबर तिकडे गेलो होतो.. येव्हडे सगळे शिपाई, लॅब असिस्टंट.. शिक्षक.. सगळे भेटायला आले होते मला, सगळे पुन्हा कँटीन ला गेलो , बायको ला आश्चर्य या गोष्टीचे होते की २००२ नंतर कॉलेज सोडले तरी १० वर्षा नंतरही, ही सगळी लोक कसे ओळखतात मला..सगळे कसे प्रचंड बोलतात असे तीला वाटले होते.. मग मी उगाच शायनिंग मारली.. पण तरी आपल्या कॉलेजच्या कारनाम्यांबद्दल तीला कोणी काही सांगितले नसेलच ही खात्री होतीच. :-)). अश्या पद्धतीने दिवसाला कमीत कमी मी १५-१८ कप चहा पित असे.. अजुनही ५-७ कप चहा होतोच होतो.. लास्ट इअर ला मी धाडवे क्लास लावला होता पुण्यात.. तेंव्हाच पुण्यात जास्त फिरलोय मी ... तेंव्हा स्वारगेट पासुन टिळक रोड पासुन जंगली महाराज शिवाजी नगर पर्यंत सर्व चहाच्या दुकानात मी चहा प्यायचो.. आपले मित्र असायचे बरोबर.. कोंण कोण वैतागायचे.. शक्ती स्पोर्ट च्या समोर क्लास होता म्हणुन अंबिका आणि तिळक ला खुप पडीक असायचो .. चहा बद्दल च्या अश्या कित्येक गोष्टी आहेत , ते सांगायला खुप पाने जातील.. त्यामुळे थांबतो.. अजुनही अक्सेंचर फुरसुंगीला आपण गेल्यावर, कँटीन ला आपल्याला नविन चहा करुन मिळतो, आपले मित्र माझ्या बरोबर आल्यावर तोच चहा पितात.. चहा आपले प्रेमच... - गणेशा

In reply to by गणेशा

माझ्याच साठी : शशी ने हे वाचले आता... आणि अजून मेस बद्दल त्याच्या बद्दल लिही सांगितले.. आणि मसाला चहा तो भारी करतो म्हणुन गेट वर बोलावले 6 ला... वा चाललोय आता मी.. मसाला चहा प्यायला... तो बनवून आणणार आहे... मित्र असेच असतात, मनापासून.. मनापर्यंत जपलेले...

ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच Youtube - दिवस तुझे हे फुलायचे Gaana.com - दिवस तुझे हे फुलायचे -------- शनिवारी आराध्या आली घरी, आणि आम्ही दोघांनी ठरवले आमच्या 'हि'ला चिडवायला पाहिजे जरा.. म्हणुन हे विडंबन ---------------------------- दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे गाडीत चरत जाणे वाटेत जिलेबी खाणे गाडीत चरत जाणे वाटेत जिलेबी खाणे वड्यात मन हे गुंतायचे वड्यात मन हे गुंतायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी श्वासात दम हे लागायचे श्वासात दम हे लागायचे श्वासात दम हे लागायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे थरारे लोखंडी दार सोसेना अंगाचा भार थरारे लोखंडी दार सोसेना अंगाचा भार डोळ्यांनी जखमी करायचे डोळ्यांनी जखमी करायचे डोळ्यांनी जखमी करायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे तुझ्या त्या फोटोच्यापाशी थांब तू यडे जराशी तुझ्या त्या फोटोच्यापाशी थांब तू यडे जराशी पापण्या मिटून बसायचे पापण्या मिटून बसायचे चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे -- शब्दमेघ ( 9 June 2020, 10:56 pm)

जाड्या भरड्याची आत्मकथा, आत्मकथा कशाची डोंबलाची? मला सांगा, रडगाण्याला कोणी आत्मकथा म्हणेल का? असंही म्हणा, कुणाला वाटेल आपण जाड, स्थुल, थोराड, ढोल्या, गणपती, अगडबंब असावं? पण आहे याला काय करणार तरी काय? आता अर्थातच लागतंय पोटाला तेवढंच खातो ना. आता तुम्हाला म्हणुन सांगतो ही वाऱ्याने हलणारी हडकुळी जमातच बदमाश असते, पायलीचं खातील पण मांस म्हणाल तर गुंजभर चढणार नाही. आम्ही मात्र वारा पिऊन राहुदेत, काटा एक ग्राम मागे सरकेल तर काय बिशाद बेट्याची. साला तुम्हाला सांगतो सगळे एकजात भेदभावी रे. तो वजनकाट्याचा विनोद पण पुराणात जमा झाला आता, हापिसात कोणी त्याच्या खुर्चीवर बसुन देत नाही. रिक्षा वाले पण खुपच बदमाश, बदमाश कसले निर्दयी म्हणायला हवं. दोन सीट चे पैसे मागतात. आता आहे थोडंसंच जास्त म्हणुन काय दर रोज टपल्या मारून दुर पळावं का या हडकुळ्यांनी? सापडु तर देत एकदा साला चिरडून टाकतो की नाही बघाच. काय तर म्हणे जगात दुष्काळ आमच्या मुळेच पडतोय. वा रे वा. चला भुक लागली आता. काही तरी खाऊन घेतो.

In reply to by भीमराव

हा हा हा भारी लिहिले आहे..
आता तुम्हाला म्हणुन सांगतो ही वाऱ्याने हलणारी हडकुळी जमातच बदमाश असते, पायलीचं खातील पण मांस म्हणाल तर गुंजभर चढणार नाही. आम्ही मात्र वारा पिऊन राहुदेत, काटा एक ग्राम मागे सरकेल तर काय बिशाद बेट्याची. साला तुम्हाला सांगतो सगळे एकजात भेदभावी रे.
एकदम भारी..

अरे वा गणेशा, भलताच हिट झाला की धागा... चक्क शिफारसीत घेतला गेला? क्या बात है.. अभिनंदन.. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपला आशिर्वाद..धन्यवाद..
चक्क शिफारसीत घेतला गेला धागा.
म्हणजे काय? मला माहीत नाही हे काय ते

चित्रकला मला आवडायची खुप.. लहानपणी 7-7 तास बसून मी मोठ्ठे मोठ्ठे चित्र काढत असे... गावाला होतो, सो कधी क्लास लावता आला नव्हता.. कलरींग कोणी शिकवले नाही.. आणि कसले कसले कलर्स असतात हे हि मला माहीत नव्हते... त्यामुळे फक्त पेन्सिल चित्रे मी काढत असे.. कुठल्याच exam दिल्या नसल्याने, पुढे अभिनव ला आपल्याला पायरीवर पण उभे केले नव्हते.. चित्रकला दहावी नंतर जी सुटली ती आराध्या बरोबर चित्र काढे पर्यंत.. आराध्या बरोबर चित्र काढताना मज्जा येते.. आज पेंटिंग काढायचे ठरवले.. तीच्या शाळेसाठी.. कलर्स आपल्याला येत नाही.. पण म्हटले चला चूक तर चूक आज पासून नविन दुनियेत जावू.. असे हि.. There is no beauty without color... दोघांची पेंटिंग्स.. 1 2

आज पुन्हा माझे मन जाते आहे , बिसीएस च्या पहिल्या वर्षाला ... कॉलेजला गेल्यावर कंप्युटर पहिल्यांदा हातळलेला.. मग आठवल्या सगळ्या गोष्टी ..अ‍ॅडमिशनच्या वेळेस झालेले हाल, रुम शोधताना पावसात झालेले हाल.. ( हे नंतर लिहिल). आता खास आठवल्या सगळ्या गोष्टी , फजिती ज्या कंप्युटर मुळे झाल्याला.. ----------- दोन महिना उशिरा अ‍ॅडमिशन झाल्याने जवळ जवळ सगळ्या विषयांचे अभ्यास पुढे गेले होते.. मला तर काही कळत नव्हते.. वेगळे गाव. वेगळे लोक.. पहिल्यांदा रुम वर राहिलेलो.. इंग्रजी फाडफाड बोलणारे बाकीचे विद्धार्थी.. पोरं पोरी पण एका बेंच वर बिंधास्त बसायची .. आपल्याला गावाकडुन आल्याने हे सारे नविन.. बरं इंग्रजी आपल्याला कायम आडवी जात आलेलीच.. तशी आपली मराठी पण कुठं दिवे लावती म्हणा.. असो , सगळ्यात आपला वांदा झाला तो कंप्युटर आणि इलेक्टॉनिक प्रॅक्टीकल यांचा, हे विषय मला आधी कधीच नव्हते, कंप्युटरला तर आपण हात पण कधी लावलेला नव्हता.. कंप्युटर च्या प्रॅक्टीकल ला मला मंडलिक सरांनी पहिल्यांदा अप्लिकेशन्/बायोडाटा असले काही तरी टाइप करायला सांगितले होते.. पहिलाच दिवस आपला कंप्युटर वर.. मशिन स्टार्ट करायचे गोल बटण सिपीयु मध्ये नक्की कुठे आहे तेच सापडायला चाचपडलेलो मी. नंतर श्याम ने मला वर्ड ओपन करुन दिले, आणि सांगितले यात लिही.. मी एका हाताने टाइप करायला लागलो .. N नंतर A नंतर M नंतर E , त्या पुढे ..G A N E S H मंडलिक सर आले, अरे हे काय करतोय .. दोन हाताने टाईप करायचे असते राजा.. आणि मग आम्ही आमचा डावा हात किबोर्ड वर ठेवला.. तेंव्हा जी बोटे फिरतायेत ती आज पर्यंत त्यांच्या नशिबी ही काळी पांढरी बटणे बडवण्याशिवाय काही उद्योग राहिला नाही.... श्याम माझा रुममेट होता.. पहिल्या दिवशी मागच्या बेंच वर ओळ्ख झाली होती, आणि बारामतीचा त्यात, म्हणुन मी त्याने पाहिलेल्या रुम मध्ये रहायला गेलो.. श्याम बीई २ वर्ष फेल होउन आला होता.. गावाला त्याच्या भावाचे कंप्युटर इन्स्टीट्युट होते, तो पण तेथे शिकवायचा, म्हणुन त्याला कंप्युटर चांगला यायचा.. आपल्याला वाटले हा शिकवेल आपल्याला.. पण कसले काय सगळ्या प्रॅक्टीकल ला बॅचेस पडल्या होत्या, कंप्युटर येणारे, अनुभव असणारे 'अ' बॅच ला, ब मध्ये थोडे थोडे माहित असणारे, राहिलेले 'क' मध्ये.. आणि ज्यांना काहीच कशाचा गंध नाही ते 'ड' मध्ये. त्यात आम्ही उशिरा आलेलो आणि काही माहित ही नाही म्हणुन 'ड' मध्ये गेलेलो .. आपल्याला लहानपणापासुन असल्या मुलांच्यात राहायला आवडते.. त्यात मागचा बेंच फिक्स असल्याने आपले मित्र ही असलेच.. उलट मी आनंदाने 'ड' मध्ये गेलो.. हुषारकी दाखवणारे आपल्याला आवडत नव्हते आणि नाहीच.. श्याम पण बाकी तसा 'ढ' होता, पण कंप्युटर येत असल्याने 'अ' मध्ये होता, मग त्याने तिकडे लय पांचट वरण भात टाईप पोरं पोरी आहेत म्हणुन 'ड' बॅच घेतली. कारण दिले की आमची रुम लांब आहे, एकत्र जाता येइल हे. आम्ही खरेच लांब राहत होतो, डोंगरा पलिकडे, 'षटकार' कॉलनी मध्ये.. श्याम आपल्याला शिकवायचा की घाबरावयचा हेच कळत नव्हते.. मला त्याने कंप्युटर कसे येते , ह्याव न त्याव सांगितले होते. प्रॅक्टीकल ला तो आपल्याला सांगायचा, ह्या सरापेक्षा आपल्याला लय येते, ह्याने कुठली पण फाईल. फोटो कुठे पण ठेवुद्या मी ती शोधुन काढतो.. आम्ही मग आ वासुन बसायचो.. किती येते ह्याला.. मी विचारले होते, कसे रे तुला कसे कळते.. तो म्हणला होता, तुला लगेच नाही कळणार रे.. मग तो आम्हाला एखादा फोटो कुठल्याश्या फोल्डर मध्ये ठेव म्हणायचा.. आणि नंतर तो शोधुन द्यायचा.. आम्हाला तो एकदम आमचा मसिहा वाटायचा... वर्गात मंडलिक सरांनी, लॉन्ग फॉर्म सांगा म्हणुन काही प्रश्न विचारले.. CPU चा ? कोणी तरी बरोबर उत्तर दिले.. नंतर विचारले GUI. अरे हा शब्द मी माझ्या जिंदगीत कधी ऐकला नव्हता. निशांत आमच्या वर्गात इंग्रजी ही फाडफाड बोलणारा आणि 'अ' बॅच चा मुलगा होता.. त्याने लगेच उत्तर दिले Graphic User Interface ... इतके अवघड त्याला येतेच कसे असा उलट प्रश्न माझा मलाच पडलेला... पॅक्टीकल ला श्याम ने आम्हाला आणखिन एक जादु दाखवणार म्हणुन सांगितले होते, मी आणि अच्युत (आमचा दूसरा रुम मेट) त्याच्या बाजुला बसलो. मग त्याने काही तरी केले आणि एका फोल्डर मधुन पाणे दुसर्‍या फोल्डर मध्ये जायला लागली.. मग मी त्याला म्हणालो हे कसे काय केले रे ?.. मग तो म्हणाला तुम्हाला नाही कळायचे .. सांगेन मी नंतर.. मग त्याने इकडची फाईल तिकडे कशी गेली त्याने कशी तिकडे टाकली हे दाखवले.. आणि आमचे प्रॅक्टीकल तेथेच संपले.. इलेक्टॉनिक चे पण तसेच हाल होते, पण हळु हळु ते जरा सोप्पे जायला लागले होते, पण कंप्युटर म्हणजे महा अवघड काम. पास्कल ला तर आपल्याला काय ते **** वाले प्रोग्रॅम फॉर लुप मध्ये कसे प्रिंट करायचे तेच कळत नसायचे.. , वेरिएबल म्हणजे काय हे कळत नव्हते. श्याम ने सांगितले होते. त्यात आपण काही तरी साठवु शकतो म्हणुन ते घ्यायचे असते.. मग त्याने स्वॅप चा प्रोग्रॅम सांगितला होता.. आणि कसा त्याने वेरिएबल वापरुन तो केला हे आम्ही पाहत होतो.. ईंटीजर लिमिट कीती पर्यंत असतात, एक जीबी म्हणजे किती केबी ह्यात आमच्या थेअरी चे तास चालले होते.. मग आम्हाला डॉस चे प्रॅक्टीकल होते, मला डॉस म्हणजे ऑपरेटींग सिस्टीम येव्हडेच माहीत होते.. मग सीडी कमांड वगैरे सरानी शिकवल्या होत्या.. पण बाकी काहीच येत नव्हते. श्याम शिकवणार होता.. त्याने बेसिक ५ सांगितल्या आणि ह्या पुढचे तुम्हाला झेपणार नाही रे पेंद्यांनो येव्हडेच बास, असे म्हणुन आम्हाला गप केले होते. त्याच्याकडे खुप फ्लॉपीज होत्या, येव्हड्या फ्लॉपी त्याच्या कडे म्हणजे तो खुप काही तरी मोठा माणुस आहे असे वाटायचे.. त्यात त्याने कसलासा प्रोग्रॅम केला होता असे सांगत असे तो.. आपल्याला लय अप्रुप त्याचे.. अशी आमची सेमिस्टर झाली होती, नशिब आम्हाला वार्षिक पॅटर्ण होता... आपल्याला वर्गात पण तसे तेंव्हा कोणी ओळखत नव्हते. वार्षिक परिक्षेला मी गणिता सह टॉपर आलो होतो आणि श्याम ८ विषयात फेल झाला होता, तिन्ही गणित आणि दोन्ही स्टॅट त्याचे उडाले होते ..

आज राघव यांच्या जुन्या कवितेला रिप्लाय लिहिताना खालच्या ओळी लिहिल्या.. तुझ्याच आठवांचे गीत माझ्या मनात आई.. तीच चंद्रभागा सुरांची..अन तू माझी विठाई... आणि मग आठवले मीच आधी लिहिलेले हे लिखान.. खरे तर मागचे लिखान मी येथे देत नाही.. पण सेम भावना आज हि आहेत माझ्या.. अगदी तश्याच.. म्हणुन येथे पुन्हा देतोय.. ---------------------------------- सहज संध्याकाळी तळ्याच्या काठावर बसलो होतो.. पुढे हिरवी झाडे मिरवीत टेकडी उभी होती. सूर्य, प्रकाशाचे दोर समेटुन घेत होता, वारा लाडीक स्वताशीच गात होता.. अंधाराची चाहुल लागुन पाखरे घरट्यात परतत होती.. आणि मला तुझी आठवण आली आई.. आता कीती बदललेत संदर्भ.. अर्थांसहित.. तु तिकडे दूर.. अन मी ? मी गुरफटलोय ह्या जगात, पुर्णता:. अजुनही श्वासांच्या फडफडीमध्ये जगतो आहे संकोचुन. तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये अजुनही मी माझाच विचार करतोय का ? काय माहीत. पण आई तु तुझ्याशिवाय माझा विचार करत असेच आयुष्य घालवले .. मला का कळाले नाही..? आज तू दूर, तुझी आठवण येते , माझ्याशिवाय तुला कधी सनाला पोळीचा एक घास गोड लागत नव्हता.. माझ्या फोनवरील २ शब्दांसाठी तुझे कान आतुरलेले असायचे.. आणी मी ? मी काय विचार करायचो... शेजारील झाडाच्या उंच फांदीवर .. घरट्यात.. चिमनी तिच्या पाखरांना बिलगत असल्याचे दिसले.. आतुर पिल्ले बेंबीच्या देठापासुन जणू किलकिल करत होती .. माझे ही तसेच झाले आहे .. विचारांच्या गर्तेत मी ओढला जातोय .. सूर्य आता क्षितिजापाशी शेवटच्या घटका मोजत आहे, रंगांची उधळण करुन जाता जाता काळोखाशी आज होळी खेळण्याचा तर त्याचा माणस नसेल ना ? पण काय उपयोग काळोखाच्या खोल गर्भात हे रंग स्वताचे अस्तित्वच विसरुन जातील. अन क्षितिज साम्राज्यावर रातीच्या काळोखाचा झेंडा फडकेल. पण असा विचार माझ्या मनात आज आता का येतो आहे.. ? निसर्गाच्या कुशीत रमणारा मी.. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर जीव ओवाळुन टाकणारा मी .. पण.. मी तुझी कुस ही नाही विसरलो आई.. हा, वाटा अस्पष्टश्या झाल्यात पण त्या वाटेवरुन मी पुन्हा तुझ्याकडे येतो आहे.. तुझ्याकडे.. आनंदाचे कारंजे मनात थुई थुई नाचत आहे.. बगळ्यांची अर्धगोलाकार रांग क्षितिजालाही छेद देवून दूर चालली आहे.. समोरील टेकडी शांत आहे. झाडावरील चिमणीच्या पिल्लांची पण किलबील थांबली आहे. आणि त्या निरव शांततेत माझ्या पावलांचाच तो काय फक्त आवाज आहे... --- गणेशा

प्रिय वसुंधरे, तू म्हणशील," हे 'प्रिय' काये रे बेफिकीर, टुकार ढगा.,एकतर तुझा स्वभाव हा मुळात कोठे ही भरकटणारा.. तुला पाहिजेल तसा... स्वैर." पण असुदे, मी असाच.. आज मला तुझी आठवण आली.. का नाही येणार ? आषाढ चालु होउन दोन तीन दिवस होऊन गेले.. आषाढ माझा आवडता महिना.. तू नाही का म्हणत असते मला.. काळा काळा कापुस पिंजला रे ... मी असाच अवखळ..भारदस्त.. तु हळवी.. शांत.. मी कोसळलो की तु माझ्याकडे स्तब्ध होउन पाहत राहते.. मनापासुन.. आणि मग तुझा तो अबोल मृदगंध पसरतो सगळीकडे हवा हवासा.. तु ही नटते हिरवा शालु परिधान करुन .. आणि पुन्हा मग असा वेंधळा मी दिसलो, की माझ्यावरती तू डोळे वटारुन पाहतेस.. मग मीच ओशाळतो.. माझा काळा रंग तुझ्या हिरव्या शालु ला शोभत नाही असे समजून, मग मी पांढर्‍या शुभ्र रंगाची दुलई घेवून येतो तुझ्याकडे.. तेंव्हा मात्र माझी इच्छा असते, मी सोडून तुला कोणीच पाहायचे नाही.. तु फक्त माझीच...आपलं हे असच असतं.. मग उनाड वारा मध्येच घोंगावतो, विजेच्या तारा तुटतात.. तू तुझी चिंब ओली .. मी धुसर, अस्पष्टसा... मी मग दूर जाताना तुझ्या पानाफुलात माझे श्वास अडकतात अध्ये - मध्ये. मला भास होतो तू आवाज देती आहेस असा.. मागे वळून पाहतो तर मला दिसते फक्त क्षितिज रेघ ..तुझ्या माझ्या मधली.. कदाचीत तुझ्या हातात ही क्षितिज रेघच सापडते, माझ्या ऐवजी... तुझाच मेघ.. --- शब्दमेघ , आषाढ शु. ४, २५ जून २०२०, २०:२०

मेघ, हो फक्त मेघ! प्रिय ,लाडका ही विशेषण लावुन मी तुला परका करणार नाही.. तु परका नाहीच म्हणा.. तुझ्यामुळेच तर मला माझा साज-शृंगार अन् दरवळ मिळतो.. तुझ्यामुळेच तर मी माझ्या लेकी-बाळींना पोसु शकते.. पण तिथेही तु तुझ्यातल्या लहान मुलासारखाच वागतो.. कधी आगाऊ कारट्यासारखा येतोस अन् मला थेंबभर भिजवुन तहानलेली ठेवतोस तर कधी इतका बरसतोस कि "आता आणखी नको रे बरसु" अस तुला रागे भरावं. वाटत.. पण तुझा लहरी स्वभाव! म्हणुन मग तुला ओरडत ही नाही. कुणास ठाऊक रुसुन दडी मारुन बसलास तर? आषाढ तर सुरु झालाय पण तु अजुन का दडून बसलाय?? तुझ्या वाटेकडे नजर लावुन बसलेली.. - तुझीच वसुधा

प्रिय वसुंधरे, आज वाटतंय, तुझ्यापाशी यावं.. मनमोकळं. तुझा हात घट्ट पकडवा.. तुझ्या मिठीत शिरावे.. शेवटच्या श्वासापर्यंत.. अस्तित्व संपवून घ्यावे तुझ्या मिठीत... तुला जाणवतील.. माझ्या हृदयाची अनियमित स्पंदने.. मध्येच तुला तेथे चिमण्यांची किलबिल ऐकू येईल.. रंगीत रंगांच्या काही छटा मध्येच दिसतील हि.. मी मात्र डोळे बंद करून घेतलेले असतील.. बंद डोळ्यात पाणी लगेचच साठत जाते, आणि डबडबल्या डोळ्यात किती आठवणी तरंगत असतात.. काय सांगू..? शाप आहे माझ्या डोळ्यांना.. ते उघडले की पाणी उडून जाते.. म्हणूनच कदाचीत तू हवेचे कुंपण घातले आहे माझ्या भोवती.. माझ्याचसाठी.. आवडीच्या गोष्टींना अशीच कुंपणे का घालावी लागतात गं..? माहीत नाही.. पण तुझ्या वाऱ्याचे हात तू माझ्याभोवती गुंफ़ुलेले असतात.. मी मात्र तरी पाझरतो.. निघून जातो.. तुझ्या हिरव्याकंच गवताच्या भाळी माझ्या पाऊलखुणा सापडतात कधी कधी.. दवबिंदू ल्यालेल्या.. तुझाच मेघ... - शब्दमेघ

मेघ, तुझ्या अस्तित्वावर च तर माझे अस्तित्व टिकुन आहे.. तु तुझ्या भावना मुक्त करतोस अन् तुझ्या नेत्रजळानेच तर मला उशाप मिळतो.. उशाप माझ्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या बाळांना सुख देण्याचा., उशाप नानाविध सुगंधी रंगबेरंगी फुलांची मुक्तहातांनी उधळण करण्याचा.. हे दान मी तु दिलेल्या ओलाव्याने करते.. तु मुक्तविहार करु शकतो.. तरी स्फुंदत स्फुंदत रडतो.. मला दोन्ही करता येत नाही.. अंतराळात कोणीतरी आखुन दिलेल्या कक्षेत स्वतःभोवती फेर धरत जगायचं.. आणि रडायच म्हटल तर पाण्याऐवजी तप्त लाव्हारस! असा शाप युगेयुगे सोसणारी मी.. तुझ्या मायेने शृंगारते.. बहरते.. आणि तुझ्या आकांताची वाट पाहात राहते..

प्रिय वसुंधरे.. मी एक ढग.. साधा ढग. तूझा ढगोबा.. कधी कधी तुझ्या वाऱ्याचा हात माझ्या गालावरून फिरू लागला की मला मध्येच आईची आठवण येते.. ती पण मला ढगोबाच बोलायची. तू मात्र माझी सखी.. मैत्रीण.. प्रिय. एकदा आठवते आपल्यात खुप भांडणे झाली होती.. त्या समुद्रावरून. तो अजूनही तुझ्या पायाशी लोळण घेतो बघ.. आपल्याला तसले जमत नाही.. आपला स्वभाव असाच हट्टी. तू म्हणतेस, मी खुप कठोर बोलतो, कधी कधी. "तुझ्या माझ्यात नातं असलं तरी त्यात एक व्यवहार आहे, साधा वाटलो तरी माझ्याकडे तलवार आहे.. माझ्या तरल शब्दांनाहि धार आहे.. " असलेच काहीपण मी बोलत गेलो होतो आणि गेलो दूर उडून डोंगरापलीकडे. मग मात्र तू रडत बसलीस.. मी पाहिले होते तुला हलकेच.. पण मी रागावलो कि माझा पण राहत नाही.. पण नंतर हलकेच हृदयात कोवळी वीज चमकते तुझ्या ओढीची.. भांडणे विसरून मी पुन्हा तुला पाहायला येतो. तू मात्र अजूनही तशीच असते रागावलेली. मग हलकेच मी झाडावर चढून बसतो. तू बोलत नाहीच.. मग मी पालखी बनून येतो तुझ्या दारी.. तुला मनवायला. तू माझ्याकडे पाहत पण नाही. पाना फुलांच्यात जाऊन मग मी तुझ्यासाठी गाणे गातो तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष करतेस. मग मी वेगवेगळे आकार घेतो, तुला हसवायला.. तू चिडलेलीच असते. तुला रंगाचं खुप अप्रूप आहे पहिल्या पासून. मग मी सूर्याकडे जातो, त्याची मदत घेतो. तो माझ्यावर रंगाचा वर्षाव करू लागतो संध्याकाळी.. मला लाल रंग आवडतो.. तुला हिरवा. मी लाल रंगाचीच उधळण करतो..तुला काय वाटते काय माहीत, तू तुझ्या हिरव्या साडीत गाल फुगवून उभी असते.. तुला माहीत आहे मला हिरवी साडी खुप आवडते पहिल्या पासून. मग अलगद मी तुझ्या भोवती पिंगा घालतो.. आणि तुझ्या हातांना हातात घेत ताऱ्यांचे रूपडे बघत तिथेच बसतो.. तुझ्याचसाठी. तुझाच मेघ.. - शब्दमेघ..

घर shift करतानाच्या आठवणी आठवल्या.. लिहिलेल्या पुन्हा देतो.. नुकतेच घर शिफ्ट केले. जुन्या घराच्या काही आठवणी लिहावे म्हणत होतो .. पण काही केल्या लिहिताच येइनात.. कीती आहेत त्या आठवणी? .. कधी एक गोष्ट आठवते तर लगेच दुसर्या गोष्टीमुळे मन भावुक होते.. त्यामुळे काही निटसे लिहिताच येत नव्हते. तरीही काही तरी लिहित आहे .. व्यवस्थीत नाहीये जास्त पण मनाच्या हळवेपणामुळे नाही लिहु शकत आहे चांगले .. जसे आठवत आहे तसेच शेअर करावेशे वाटत आहे म्हणून आपणा समोर देतो आहे --- मी पहिलीत जावु लागलो तेच आमच्या छोट्याश्या पण मस्त घरातुन . शाळा जवळच होती पण रेल्वे लाईन मुळे आई सोडवायला यायचीच आणि माघारी नेहण्यासाठी यायची ... घरी आल्यावर छोट्याश्या ताईडी बरोबर खेळण्यात कसा वेळ जायचा कळायचा नाही. आता घर सोडताना सर्व जागा .. त्यांच्या आठवणी मनात घर करुन राहिल्या आहेत. तीच ताइडी आता तिला ही गोड असे पिल्लु आहे .. तीच कीती गोड दिसायची.. दात किडकी म्हतारी असे म्हणत आमची होणारी भांडणे .. भातुकली मध्ये तीने आणि दिप्ती ने माझ्यासाठी घराच्या बागेत केलेली बाभळीच्या पाल्याची भाजी आणि कधी कधी घरातील शेंगदाण्याचा कुट आणि आवर्जुन पाहुणा म्हणुन बोलवल्यावर .. पाटावर बसलेला मी अजुन स्पष्ट आठवत आहे. घर सोडताना, एक जुना पडलेला बॉल पाहुन, पाच रुपये चोरुन रबरी बॉल आणल्याने ५ तास अंगठे धरलेलो मी पण आठवले .. घराच्या रुम्स कमी पडत होत्या म्हणुन शेजारील आर्ध्या बागेत पुन्हा नविन घरासाठी पाया घालतना .. तेथील मोगरा , जास्वंद, जाई आणि आमची भातुकलीची जागा मन भरुन पाहुन घेतले होते ..आणि राहिलेल्या अर्ध्या बागेत आता झाडांचीच गर्दी होउ लागली होती .. घराचा पाया भरताना वडलांनी उचललेले दगड आणि आई ने केलेली मदत अजुन आठवते आहे. घर कसे का असेना पण आई जेंव्हा म्हंटली ना .. ओटा बांधताना आम्ही लांबुन माती आणली होती घम्याल्या मध्ये .. स्वताच्या हाताने बांधलेले घर सोडताना कसे तरी होते .. मला ही तसेच वाटत होते घराच्या एका एका इंचा मध्ये ही बर्याच गोष्टी दडल्या आहेत. दारात तासा पेक्षा ही जास्त वेळ रांगोळी काढणारी तायडी आठवली.. लहानपणी आई ने टिपक्यांचे कासव काढल्यावर आम्ही वाकडे तिकडे काढलेले मोर आणि कसलेसे प्राणी आठवले . बागेतील कडेला उभे असलेले नाराळाचे झाड .. आणि जास्वंदाची वेगळी वेगळी फुले असणारी झाडे आमच्याकडे पहात होती. लहान लहान झाडे आम्हाला आता कोण बघणार म्हणुन नाराज दिसत होती. मला सिताफळ खुप आवडते म्हणुन पुरंदर च्या सिताफळाचे आलेले झाड हळुच माझ्याकडे डोकावत होते.. घरात आवरताना.. सापडलेल्या जुन्या गोष्टी मन त्या त्या काळात न्हेत होत्या. एक ग्रिटींग सापडले तरी ते वाचताना .. त्याच्यावर फ्रॉम म्हणुन असणारे नाव वाचले की तो काळ त्या आठवणी पुन्हा मनात घर करत होत्या. इवल्याश्या घरातील २५ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर पटकण तरळुन जात होता. एकदाचा तो दिवस उजाडलाच जेंव्हा आमचे सगळे सामन घेवुन गाडी निघाली ... आई आणि शेजार्यांच्या डोळ्यात पाणी होते. समोरच्यांचा मुलगा आई साठी रडत होता. आमचे घर - माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी अस्याच मागे ठेवुन आम्ही नविन घरी चाललो होतो . ज्या उरुळी कांचन ला जाताना UK ला जातो आहे म्हणुन मित्रांच्यात हस्या निर्माण करत होतो .. त्या UK ला सोडुन जाताना माझ्या मित्र , शाळा , कॉलेज च्या आठवणींना बिलगुन मन अगदीच भारावलेले होते .. घर आम्ही विकले नाही त्यामुळे पुन्हा येथे येता येइल त्या काळाला हळुच अनुभवता येइल हाच तो काय आनंद होता .. बाकी या आठवणी अश्याच वेड्या एकदम मन हेलावुन टाकतायेत ..

अबके कुछ दोस्तोंसे रूपये कर्ज लेने है वसूलने की वजह मिलने का सबब तो बने सं - दी - प

खुप दिवसानी मिसळपाव वरती आले, नविन आठ रिप्लाय आलेले होते, भराभर वाचले. मेघ-वसुंधरा पत्र - संवाद खुप्पच सुंदर. वार्‍याचे हात ही कल्पनाच आवडली. परंतु वसुधा-ढगोबा नाते किती सुंदर. मी काही तरी सुचते का पाहते. समुद्र ?

@ मेघ आणि @ वसुधा, +++++++++++++++++ माझ्यावरुन भांडण ? म्हणुनच मला वाटते, कुणी जवळ नसावे. जगावं असं एकटे, शांत. कोणीच नसावे भोवती. सगळीकडं असावे धुकं धुकं, मनाशी मनाचेच चालावेत खेळ. हा हट्टी ढग, माझ्याकडे येतो आहे असा मला मग भास होतो. तो कायम हुल देत राहतो. त्याची सर पण आली आली म्हणता म्हणता येत नाहीच. जस आपल्या इवल्याश्या चिमटीत आकाश येत नाही., रात्री दिसणारे तारे तर मनाच्या खिडकीतुन आत झिरपत नाहीत, अगदी तसाच हा भास होतो, या वेंधळ्या ढगाचा. मग मी माझ्या किणार्‍यावरती येतो, वाळुत रुतलेली होडी तिथे असते, उंचच उंच झाडे दिसतात मला. माझ्या संगीताच्या तालावर मंत्रमुग्ध झालेली वसुधा दिसते मला. मला आवडते वसुधा. मी तासन तास किणार्‍यावर तीच्याशी बोलत बसतो. तीच्या उडणार्‍या बटा कीती सुंदर दिसतात, मला चंदेरी साडीत ती आवडते. त्या ढगाला मात्र ती हिरव्या साडीत आवडते. चंदेरी साडीत ती एकदम मला जलपरीच वाटते. ती मला संगीत वाजवण्यास सांगते, मग मी एका लयीत माझ्या लाटांनी सप्तसुर छेडतो. वसुधा मेघमल्हार गाते मग. मेघ येतो मग हळुच तेथे. कदाचीत तो वाट पाहत असतो कधी ती बोलावते ते. तो येताना चंद्राचा संदेश घेवून येतो माझ्यासाठी. मी ही हसतो मग त्याला मिठी मारुन. आताशा तरीही का मला वाटते, कुणी जवळ नसावे. जगावं असं एकटे, शांत. कोणीच नसावे भोवती. सगळीकडं असावे धुकं धुकं, मनाशी मनाचेच चालावेत खेळ. - समुद्र .

@ मोगरा, मस्त लिहिले आहे. लिहीत रहा..

कॉलेज -३ (पुर्वार्ध) ------------------------ ( नाव बदलले आहे) अलिकडे लिखान पुन्हा कमी झाले. हरकत नाही. काम , मुलगी, फॅमिली महत्वाची.. माणुस एकदा वेगवेगळ्या भुमिका साकारायला लागला की त्यातील प्रायोरिटीज त्याला आपोआप कळतात आणि त्या प्रमाणे तो वागत राहतो. माझे तरी वेगळे असे काय ? त्यात बाप ही माझी सर्वात आवडती भुमिका... इवल्या इवल्या चिमणीबरोबर खेळाण्यात वेळ अगदी मस्त जातो. त्यात लिखान ही माझी तशी कधी प्रायोरीटी झालीच नाही.. कविता लिहायचो तेंव्हा ही नाही. कित्येक मित्रांनी पुस्तके काढली.. नंतर प्रोग्रॅम्स केले. असले आपल्याला कधी जास्त रुचले नाही.. १२-१३ वर्षांपुर्वी थोडेफार कसल्याशा प्रोग्रँम चा मी पार्ट होतो.. पण तसले कधी नंतर वाटले नाही.. असेच असते. प्रायोरीटीच म्हणाल तर, माझी पहिली प्रायोरीटी बाप म्हणुन.. दूसरी निसर्गात मनसोक्त फिरणे.. या पलिकडे जास्त विचार केला नाही... पण मैत्री ही प्रायोरीटी नाही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच आहे. हा तर काय सांगत होतो... काल सहज जया बरोबर बोलत होतो, कॉलेजचे चहा चे आणि मित्रांचे असे माझेच लिहिलेले भाग, बोलताना तीला दिले चाट वर. ती म्हणाली तीच्या बद्दल काहीच का लिहिले नाही.. मग मला वाटले आपण लिहायला हवे होते तीच्याबद्दल.. कॉलेजच्या दिवसांचे सोनेरी दिवस तीच्या शिवाय पुर्ण झालेच नसते.. पण मी एक स्वैर मुक्त .. माझ्यातच गुरफटणारा..हळवा पण बेडर. लिहिताना मनाच्या असंख्य धाग्यांना सांधताना कुठे एखादा धागा उसवला तर ? तो एकही धागा उसवलेला मला नकोय आता. आयुष्याच्या या अश्या वळणावर माणसाला निस्सिम मैत्री हवी असते. भुतकाळात गोड वाईट काळ ज्यांच्या बरोबर घालावला त्यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत हवी असते. म्हणुन लिहिताना जुन्या जवळच्या मैत्रीणी बद्दल लिहिणे अवघड वाटले होते.. माझ्या आयुष्यात, माझ्या सर्व मैत्रीणींमध्ये मी अजुनही सर्वात जास्त रिस्पेक्ट करत असेल तर तो जयाचा... त्यामुळे तीच्या बद्दल लिहिताना पुन्हा एक अनामिक हुरहुर मनात दाटते आहे.. असो, आता १८-२० वर्ष झाली गोष्टीला.. आणि आता तरी येव्हडे मनावरची बंधणे झुगारुन लिहिता आले पाहिजे.. माणुस हा असाच असतो.. तो प्रमाणापेक्शा जास्त विचार करतो, खरे तर माणसाने नैसर्गिक राहिले पाहिजे.. मी तसा नैसर्गिकच आहे, पण कधी कधी असे होते.. त्यात वावगे ते काय ? तर लिहितो आता.. क्रमशा:

In reply to by गणेशा

.लिहिताना मनाच्या असंख्य धाग्यांना सांधताना कुठे एखादा धागा उसवला तर ? तो एकही धागा उसवलेला मला नकोय आता. ......खरय रे मलापण भुतकाळ आठवायच म्हणलं की असेच वाटत......म्हणून कविता जवळची वाटते...अनेक अर्थ घेऊन असते ती... .गणेशा तु खुप हळवा आहेस...पण मनाने चांगला आहेस... नाही तुटणार माणसं .. लिहून​ छान रहा.

कॉलेज -३ (उत्तरार्ध..) - Maroon Red color - - - - - - - - - - - - - - - - - - - काय लिहु.. कॉलेज संपले की अश्या Blank spaces उरतात आपल्याकडे.. कोणाला त्या Blank spaces मध्ये निखळ मैत्री आठवते.. कोणाला अभ्यास आठवतो.. अभ्यास आठवणारे नक्कीच Hopeless असतील.. काही जन तेंव्हा कॉलेजला निरस तोंडाने जात असतील आणि तसलेच तोंड घेवून माघारी येत असतील त्यांना आता या Blank spaces मध्ये काय वाटत असेल हा PHD करण्याचा विषय ठरु शकेल. काय ? मला काय आठवते त्या Blank spaces मध्ये? मला मैत्रीणी आठवतात...  हसायला काय झाले त्यात ? होत्या आपल्याला छान छान मैत्रीणी.. कँटीन- कट्ट्यावर बसणारे मित्र होते.. त्या पेक्षा पण जास्त बेडर मैत्रीणी होत्या.. मैत्रीणीं बद्दल लिहु ? मी लिहिले की, ते त्यांना आवडणार नाही.. आणि नाही लिहिले तरी त्यांनाच आवडणार नाही.. असेच असते हो.. मुली म्हणजे कंन्फुजन.. तुम्ही १ म्हणाला की त्यांनी २ म्हणालेच पाहिजे.. असते असेच.  त्या २ म्हणाल्या की तुम्ही २ च म्हणायचे.. ३ म्हणाला की संपले .. आता तुम्ही म्हणाल Maroon Red color का नाव ठेवले ह्या लेखाचे. तो कलर सर्व मुलांना घायाळ करण्यालाच जन्माला आलाय. त्यात आमचा काय दोष. च्यायला, एक गुलाबाचे फुल देताना, त्या गुलाबाला लाल होता आले नाही साधे..'समस्त लाल गुलाबांनी काटे टोचणारच' या संघटनेने याचा निषेध करायलाच हवा. Maroon Red color म्हंटला की मला आठवतो, तो मावळणारा सूर्य... घोडनदी मध्ये तो मावळत असताना असाच Maroon Red होत असे. आपल्याला आवडतो हा रंग. कधी कधी तो गालावर पण कीती शोभुन दिसायचा .. नाही नाही मला तो तीच्या गालावर शोभुन दिसायचा असे म्हणायचे आहे. कोणाच्या गालावर तो रंग कोणी उमटवला असेल तर त्यांच्या इतके दुर्भाग्य कोणाचे नाही. गणिताच्या उभ्या आडव्या फॉर्मुल्याने, कोणाचे काय कधी भले झाले माहीत नाही.. बर्याच जणांचे त्याने वाटोळे केले हे मात्र खरे. मला तर कधी कधी वाटायचे हा कंप्युटर कोणत्या मुर्खाला शोधायची हुक्की आली काय माहीत. चांगले चालु होते ना राव त्याच्या शिवाय. पण नाही. हे असले शोध हे समस्त कॉलेज जनांना बांधुन ठेवण्याचे वेगवेगळे प्रयोग असावेत असे मला वाटायचे.. कंप्युटरचा प्रयोग यशस्वी झाला इतकंच. c & data structures मात्र आपल्याला लय आवडायचं.. आमच्या प्रॅक्टीकल ला एका कंप्युटर वर दोन जन प्रोग्रॅम करायचे.. माझ्या बरोबर माझी ढापणी मैत्रीण जया बसायची. तीला मग मी वहित लिहिलेले लॉजिक, टाईप करायला लावायचो. तीला टाईपिंग च्या क्लासला तीच्या वडिलांनी या साठीच लावले असेल .. असते दूरदृष्टी कोणाकडे .. आपण काय बोलणार ? थोडं मास्टर डिग्रीला पण पाठवले असते तर काय बिघडले असते त्यांनी, मला विचारायचे होते ना, मी सांगितले असते. म्हणजे अजुन तीन वर्ष पिडलं असतं जरा. नंतर मास्टर्स ला मला टायपिस्ट मिळाली नसल्याने जावा लँग्वेज मला नीट आली नाही.. आता हे कोण भरुन देणार मग ? आपला आवाज ऐकला असता तर एस.पी बालासुब्रमण्यम ने जीव दिला असता, तरी आपण सार्‍या वर्गात गाणे म्हणालो होतो.. आपल्याला आवडायचे असले कायपण.. कसेपण..एस.पी माझा आवडीचा गायक... आपला आवाज मात्र धडकन च्या सुनिल शेट्टीला सुट व्हायचा पार... :-) भांडण , आणि मी ?  कभी नही... उलट सगळेच माझ्याशी भांडायचे, म्हणुन नाइलाजाने मला बचाव करायला थोडे बोलावे लागायचे. :-)) एक मैत्रीण - सोनाली, मात्र माझ्याशी कधी भांडली नाही, तीला तन्वीर स्टॅच्यु म्हणायचा. मग कशी भांडेल ती ? ती होतीच स्टॅच्यु सारखी.. एक्स्प्रेशन लेस :-)). सरिता आणि मी रोज भांडायचो ... आणि रोज भांडता यावे म्हणुन रोज पुन्हा बोलायचो.. एकदा बेन ने विचारले, तुम्ही येव्हडे भांडता तर मग बोलता कशासाठी.. बेन ला काही म्हणजे काही कळत नव्हते बाबा. बेन ला जेवताना मी, आधी तू जेव बाई म्हणत असे.. तीने भात खाताना, त्यात अखंड बुडालेली बोटे पाहुन मला कसे तरी व्हायचे. कोणाकोणाचे हदय कोणात तरी अखंड बुडायचे, आणि तीची बोटे भातात अखंड बुडायची.. हे भगवान. मुलींच्या प्रॉपर्टी कडे मी बघत असे कायम. बरेच जन बघतात, त्यात नवल ते काय ? एक शत्रु पक्षातील सारिका , रस्त्याने जाताना नेहमी मुलांकडे बघायची, आणि मग बोलायची.. ये तो बघ माझ्याकडे कसा बघतोय.. तीला याचे उत्तर सैराट मधल्या परश्या ला द्यायला लागले पार - तु कशाला बघते म्हणुन. नागराज जर तेंव्हा आमच्या कॉलेज जवळ फिरत असता तर आर्ची म्हणुन हिलाच घेतली असती त्याने. बघती म्हणुन.. हीनी तर एकदा कहर केला होता, मी कसा दिसतो, तु कशी , तु त्याच्या बरोबर कश्याला असते असे आमच्या टाएपिस्ट कम फ्रेंड ला सांगितले होते. असतात असल्या पोरी कॉलेजला.. नाटकी मुली पण असतात काही, आपल्या सदैवकाळ मैत्रीणी त्या होउ शकत नाहीत, पण झाली होती एक जयामुळे -अनु. एकदा वर्गात ती नाटकी बोलत असताना, मी तीला म्हणालो होतो तु एव्हडे नाटकी का बोलते गं, तुला साधे सरळ बोलायला काय होते ? नंतर चे किस्से नंतर. नाही नाही गैरसमज करु नका आपल्याला मित्र पण खुप होते आणि आहेत. पण मित्रांना या वरच्या Blank spaces मध्ये नाही टाकता येत. त्यांनी आपली सारी space व्यापलेली असते... अजुनही... कायमची(लिहिल नंतर).   कॉलेज मैत्रीणींचा जन्म हा नेहमी दुसर्‍याच्या गळ्यात माळ टाकून त्याच्या घरची धुणी भांडी करण्यासाठीच झालेला असतो. अरे एकीने तरी थांबायचे ना, मी लग्नानंतर वॉशिंग मशीन घेतली असती.. पण ह्यांना काय घाई झालेली असते धुणं धुण्याची काय माहीत. *** त्या क्षणांच्या असंख्य रांगोळींचे ठिपके मनात उमटतात बर्याचदा.. कधी डोळ्यात पण... कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मात्र तो Maroon Red color चा सूर्य कायमचा मावळत होता, पुन्हा न येण्यासाठी.. कॉलेजच्या त्या असंख्य क्षणांच्या रांगोळी मनात सरकन तरळून गेल्या.. डोळे पाण्याने डबडबले, आणि तो Maroon Red color हळु हळु डोळ्यात विरघळत गेला..कायमचा. तो मावळतीला जाताना, तीच्या डायरीत असलेल्या कुसुमाग्रज यांची कविता जणू बोलत होता असा भास झाला...            "उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे, मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे,           तक्रार नाही, खंत नाही पुर्तीसाठी प्रवास असतो, केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो " तो Maroon Red color चा सूर्य मिटताना, टुकार ढग मध्येच त्याचा रंग स्वता घेवू पाहत होता.. हलकासा.  त्याला वाटले असेल, क्षितिजाच्या पलिकडे असणार्‍या सूर्याला दिसतील हे रंग , त्याच्या पापण्यांच्या कडा ही मग सोनेरी झाल्या होत्या.. पण पण थोडावेळच.. मग रात्र झाली. कॉलेजच्या असंख्य क्षणांचे टिमटिमणारे असंख्य तारे अजुनही ती रात्र उचलुन धरते.. रात्र हीच खरी सोबती.. आपल्या सावल्याही जेंव्हा साथ सोडतात तेंव्हा ही रात्रच असते आपल्या सोबत. *** आता अलिकडे इतक्या वर्षांनी मात्र, मला पुन्हा वाटते, सार्‍या मैत्रीणींचे धुणं धुवुन कडक झालेले हात पुन्हा हातात घ्यावेत आणि फिरावे मनसोक्त. मैत्रीच्या त्या निखळ नात्याला पुन्हा फुंकर घालावी.. त्या सोनेरी कडा ल्यालेल्या ढगाची पालखी बनवुन पुन्हा फिरावे स्वैर..मुक्त..स्वछंद.. वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्‍या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red color ने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे ? अनेक संध्याकाळ विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे Maroon red मैत्रीचे color पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे ? - गणेशा.

काय लिहिलंय एकेक! कसं सुचतं सगळ्यांनाच कुणास ठाऊक ? पण अप्रतिम लिहिले आहे. मिपावरच्या लेखनाला या मोत्याच्या माळेने सुशोभित केले एवढं नक्की!

श्वेता ताई, संदिप आणि palambar धन्यवाद मनापासून.. सिनेमा :-)) :-)) तसे म्हणाला म्हणुन एक मनातले.. Maroon color हा कॉलेजचा भाग मी मनापासुन लिहिला.. पण खुप हळवा झाला तो.. maroon red ड्रेस घालणारी साठी होता तो.. :-)), नाही देऊ शकलो येथे.. आणि तो येथे दिला नाही, तो आतापर्यंतचा सर्वात भारी भाग होता.. हा उत्तरार्ध त्या नंतर लिहिला येथे दिलेला :-)) ---

@ मन्या.. तुझी नजर कविता वाचली आणि हे सुचले.. ___________________ 'नजर' कैद पाऊस पडला की चिखल व्हायचा.. लोखंडी सळई घेऊन त्यात ती रुतवत चालायचो आम्ही.. कागदी होड्यांचे तर मनाच्या कप्प्यात पार टायटॅनिक झालंय.. पाऊस असाच.. नंतर तो तिच्या सहित यायचा.. तिच्या ओठांवरील पाऊस पिऊन टाकायचो मी, गुलाब पाकळ्यांचे अर्कच जणू.. घट्ट कपड्यात मग तो हि ओशाळल्या सारखा व्हायचा.. आता मनाच्या कप्प्याचा शोध कोणीच घेत नाही.. त्याकडे फिरकायला कोणालाच सवड नाही.. 'नजर' लागली सगळ्याला.. वेळेला ही.. पाऊस मात्र बरसत असतो अजूनही.. सताड.. तिला दिलेल्या असंख्य गुलाब पाकळी चुंबनांचे तो हिशोब मागत येतो.. वेड्या सारखा.. मी ते देऊच शकत नाही.. कसे देऊ? पाऊसासारखे आणि तिच्या सारखे पण असे हिशोबाने जगणे मला कधीच जमले नाही.. म्हणून आताशा आभाळ दाटून आले कि माझी 'नजर'कैद पुन्हा सुरु होते... -- शब्दमेघ

In reply to by गणेशा

काही सुचलाय पहा .. सरींना कोसळण्याची फारच घाई.. अडकवून मेघांत राहणं तिला जमलंच नाही.. हिरवाई लेवून पाहत राहिली मेघांकडे त्याचे हात झेपावलेले असतील का ? तिला कवेत घेण्यासाठी... हजार प्रश्न सरीच्या नजरेच्या कैदी भोवती.. -सरीवर सरी

In reply to by Bhakti

सरीवर सर येत राहते कायम.. अन येताना मात्र नेहमी हजार प्रश्न घेऊन येते.. पण मी उत्तर देत नाही.. उत्तर देण्यात अर्थच नसतो.. पण आज सांगतो एक ऐक.. . . . जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही.. तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर आता बाभळी शिवाय काहीच येत नाही..

In reply to by गणेशा

सर अशीच कोसळत राहिली तिच्या नैसर्गिक स्वभावानं रूजून फुलांच बहार सांडले गंध दरवळ दूरवर पसरले . . . तिला उत्तर माहीत होते मेघांच तरी जाणिवपूर्वक कोसळली ....हं..पण शेवटची..

In reply to by गणेशा

सर अशीच कोसळत राहिली तिच्या नैसर्गिक स्वभावानं रूजून फुलांच बहार सांडले गंध दरवळ दूरवर पसरले . . . तिला उत्तर माहीत होते मेघांच तरी जाणिवपूर्वक कोसळली ....हं..पण शेवटची..

तुमच्या लिखाणाचे कौतुक करावे इतके शब्दच नाहीत माझ्याकडे गणेशजी!

आराध्या- १ आराध्या झाली आणि माझे जग पुर्ण बदलुन गेले.. तीचे इवलेसे हात हातात घेतल्यावर किती मस्त वाटायचे, ती माझे बोट अलगद पकडायची.. ते फिलिंग खरेच ग्रेट.. या सारखा आनंद जगात दूसरा नाही. नंतर घोडा घोडा खेळताना पण मग किती मज्जा यायची शब्दांचे असंख्य डबे जरी मी जोडत असलो , तरी वळणदार अक्षरांच्या.. काना, मात्रा, वेलांटी, हुकार यांच्या वर नजर टाकताच सुखवणार्‍या भावनांच्या अश्या असंख्य ओळी म्हणजेच मुलगी.. तीच्या शिवाय शब्दांना स्वर नाही..सितारीचा झंकार नाही.. तबल्याचा ताल नाही.. तिच्याशिवाय जगण्यात निर्मळता नाही..आरसपाणी स्वप्ने नाहीत.. मायेने जवळ येऊन गळ्याभोवती फुलांचे हात नाहीत.. *** आराध्या ११ महिन्यांची असताना तीला आम्ही बेबी कॅरीअर कांगारु बॅग मध्ये घेवून देवगिरी किल्ल्यावर गेलो होतो, वेरुळ-अजिंठा तीची पहिली ट्रीप. देवगिरी माझ्या लिस्ट मध्ये खुप आधी पासुन होता, पण पुण्या पासुन लांब असल्याने बर्याचदा तिकडे जाण्याचा प्लॅन रखडला जायचा, आराध्याचा मात्र तीने पाहिलेला पहिला किल्ला देवगिरी :-)).. नंतर तीला घेऊन आम्ही लोहगड,सिंहगड आणि माझा आवडीचा रायगड केला. ३ वर्षांची असताना तीने माझ्या हाताला धरुन चालत पावसात तिकोणा ट्रेक केला.. तसा तीच्या मानाने अवघड किल्ला. पण अर्जुन आणि मल्हार हे मित्र असल्यावर तीला त्याचे काही वाटले नाही... (योगेश आणि चेतन या माझ्या बालपणीच्या मित्रांची ही मुले, याचे फोटो जोडतो आहे खाली ...) नंतर ५ व्या वर्षाच्या बर्थडे पासुन आम्ही त्या दिवशी ट्रेकिंग ला किंवा फिरायला जायचे ठरवले, पाचव्या वर्षी आम्ही जंगलात अंधारबनात गेलो होतो. आराध्या आपली नेक्स्ट ट्रेक पार्टनर.. *** मला पाण्याची प्रचंड आवड.. पण मला स्विमिंग येत नव्हते, पावसात गडांवर फिरताना तर पाऊस अंगावर झेलताना काय मस्त वाटते.. आराध्याला पण पाऊस आवडतो.. लवासा ला गेल्यावर आम्ही कितीवेळ पावसात भिजतो... मागे वल्ली मित्रा बरोबर कोरीगड ला गेल्यावर त्या पायर्‍यांवर तर मी अक्षरसा लोळलेलो त्याला अजुन आठवते. पाण्या बद्दल आपल्याला खुप प्रेम..खुप आवड..खुप ओढ.. मला नेहमी वाटायचे आराध्याला चांगली स्विंमिंग आली पाहिजे, मी शिकवेन तीला स्विंमिंग असे वाटायचे आणि मग अरे आपल्याला स्विमिंग येत नाही ही खंत वाटायची. मग आता माझ्या या तीशी मध्ये मी स्विंमिंग चा प्रोफेशनल क्लास लावला. सरांनी छान शिकवले, मी ऑफिस च्या आधी आणि ऑफिस च्या नंतर अश्या दोन्ही वेळेस स्विंमिंगला जावू लागलो, आणि आश्चर्य मी फक्त तीन दिवसात स्विमिंग शिकलो.. आणी मग मी तासन तास स्विंमिंग करायला लागलो, सर म्हणायचे आता काय डायरेक्ट ऑलंपिक ला जायचे आहे काय इतके स्विंमिंग करताय ते.. आराध्या तेंव्हा २ वर्षाची होती.. मी एकदिवस आवडीने तिला स्विंमिंग ला न्हेले माझ्याबरोबर, तिच्या पोटाला हात लावून तीला मी पाण्यावर फिरवलेले तीला खुप आवडले.. नंतर ती ३ वर्षाची झाल्यावर तीला क्लास लावला, तेंव्हा मात्र ती नंतर पाण्यात उतरायला घाबरत होती... मग मात्र मी स्वता पाण्यात उतरुन तीला श्वास कसा घ्यायचा.. कसे पाय मारायचे हे शिकवु लागलो, तीच्या मॅडम पण तीला शिकवत असत. सिमिंगला जाताना तो आठवडा ती रडायची, आली नाहीतर हॉस्टेल ला टाकणार तुला असे म्हणुन मग मी तीला न्हेत असत. तीला खरेच वाटायचे की स्विमिंग नाही आले की हॉस्टेल ला जावे लागेल. आराध्याला १० दिवसात स्विंमिंग यायला लागले.. मला खुप खुप आनंद झाला.. आणि तीला .. ती पाण्यातुन बाहेरच येत नव्हती.. तीच्या मॅडमने तीला मग डोल्फीन, बटरफ्लाय असले स्ट्रोक पण शिकवले.. मी ब्रेथ स्ट्रोक शिकवला होता... मी माझ्या आवडी, माझे स्वप्न तीच्यावर लादत होतो की पुढे आनंद देणार्‍या गोष्टी तीला शिकवत होतो हे येणारा काळ ठरवेन.. पांढर्‍या शुभ्र कागदावरती.. माझे शब्द फक्त तुझ्या साठी.. या शब्दांचेच मग होईल गाणे.. तुझे माझे ..आपलेच... मग कागदाचेच त्या होईल एक विमान.. उडणारे.. मुक्त..स्वछंद... भिरभिरत्या वार्‍यावरती, शब्द माझे उडतील सैरावैरा.. स्पंदने ही माझी घेतील सूर मग, तुझ्या घुंगुर - पैंजणांचे त्या सूरांबरोबर तु गाशील का मग माझे शब्द .. माझे गाणे.. जे असेल फक्त, तुझे माझे.. आपलेच.. तेंव्हा आभाळभरुन सुद्धा उरेल का गं मागे, माझ्या आठवणींचे हे जग.. पावसाच्या पाण्यात दिसेल का गं मग, माझ्या अस्तित्वाचे ढग.. ----------- गणेशा आराध्या - अर्जुन आराध्या - अर्जुन . malhara मल्हार- आराध्या - अर्जुन . अंधारबन अंधारबन . 1 मला स्विमिंग आल्यावर . 1 आराध्याला स्विंमिंग आल्यावर... ---------------------------

In reply to by गणेशा

वाह ..बाप-लेकीची जोडी भन्नाट आहे.लेकीला पुढे खरच चौकस नवनवीन असंच छान छान शिकवित रहा ..आणि पालकाची भूमिका साकारताना आपणही नवीन शिकत राहतो... आराध्याला शुभेच्छा..

जेंव्हा प्रश्नच प्रश्नांची उत्तरे असतात तेंव्हा भावनांना काहीच अर्थ उरत नाही.. तीच्या माझ्या आठवणींच्या बांधावर आता बाभळी शिवाय काहीच येत नाही.. - शब्दमेघ
सरीला उत्तर माहीत होते मेघांच तरी जाणिवपूर्वक कोसळली ....हं..पण शेवटची.. - भक्ती
सरीला मेघ कधीच सापडत नाही नजरकैद त्याची मात्र कधीच सुटत नाही.. बांधावरच्या बाभळीला ही मग बहर येतो.. आठवणींना मात्र तिच्या गावचा पत्ताच नसतो.. -- शब्दमेघ (एक विनंती.. रिप्लाय देताना छान.. सुदंर अशी एकोळी रिप्लाय नका देऊ.. त्याने लिंक तुटते.. उलट असेच रिप्लाय मस्त वाटतात.. आणि रिप्लाय ला रिप्लाय लिहिताना खुप छोटे छोटे आकार होतात रिप्लाय चे.. म्हणुन सरळ main प्रतिसाद मध्ये असा रिप्लाय द्या सर्वात शेवटी.. जसा हा रिप्लाय दिलाय तसा मध्ये दुसरा रिप्लाय आल्याने मागचे थोडे प्रतिसाद येथेच डकवलेत )

This is my first english poem. I am not good in english too.. but just in the morning i thought i can try at least once.. ---------- Shadows ____________ You hurt me.. hurt me a lot You hurt me.. hurt me a lot I couldn't lie 'cause we wrote a story in which you were my queen baby But You left me with all those memories like sun left to the sky now all shadows of them still haunts me sometimes I am tired, want to forget which happend between us But I can't I can't your dimples are engraved in my heart that burns me a lot you are still in my thought which keep me alive like a Tequila shot I couldn't lie 'cause we wrote a story in that you were my queen baby I can read you in all that messy things I can feel you in that scattered things you may think I'm insane But I'm not I am not You hurt me.. hurt me a lot hurt me a lot hurt me a lot --- शब्दमेघ

मन रे तू काहे खेल रचाय? जग सारा घुमाय, बैठ बिठाय मत कहे ठहर ठहर जे कोसों दूर है ठाय कब कही अब ना चल जे पास नदी जल बहाय मन रे तोरा खेल गजब मिल सके ना उसे दिखाय पास जे चमके सोनरसयी उसे मोह के फांसा बताय मैं राही इस राह अकेला ढूंढू साथी कही मिल जाय जो मैं देखूं तू मुसकाय बात भीतर की जान जाय मन तू कहाँ का है राजा? जरा आके सामने दिखाय देखूं मैं भी तुझे परखके जो तू दिखे जैसा जताय सं - दी - प

मेरी पहली उर्दु मिश्रीत काव्यपंक्तीयाँ... शरीक-ए-ज़हर ये गुल मेरी, आँखों मे शमा ये सुलगती रही तीर-ए-इश्क ने लिखी थी मौत, जा जिंदगी तुझपे उधार रही ------ शब्दमेघ

कुछ पंक्तिया ... तीर ए शमा थी कातीलानी आधी बसी मुझमे मेहरबानी जिंदा तो हू अब गम नहीं दिलकी जख्मोपर नाम तुही..

@गणेशा खुप दिवसांनी आले, आणि काय लिहलंय वाहः वाह कॉलेज काय, english काय. छान झालंय, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता थोडा वेगळा mood पेरते. __________________________________ ऑनलाईन शाळा म्हणजे अगदी डोक्याला शॉट असतो. मुलीला कंप्यूटर लावून देऊन, zoom वर बसायचे, हा, पान नंबर 23 सांगितलं आहे गं.. 3 + 4 किती सांग बघू ? अरे आता शाळा तिची आणि शाळेवरची कसरत मी करतेय. त्यात शिऱ्या चे घरून काम, डोक्याला ताप नुसता.. Yes yes., हा हा., definatly., आज., नक्की., Exactly., you guys did funtastic job. काय? हे काय आहे? काय वाटतेय तुम्हाला? अहो अशी वाक्य झाली की चहा ची order येते बाकी काही नाही.. Yes yes., आज., नक्की अगं चहा कर गं एक कप कडक. कधी कधी तर वाटते, त्या नेटची ऐशी का तैशी., आता कळाले मला आयटीतले नवरे का करू नये. चहा ढोसायचा., आणि ढेरी वाढवायची. पोस्ट बरोबर ह्या दोन्ही गोष्टी वाढलेल्याच पाहिजेत., नाही तर प्रमोशन रद्द करतात की काय? काय माहित. आणि एक, parents whats app group वेगळा, School madam group वेगळा. बरं मॅडम शिकवताना बायकांनी गप बसायचे ना? नाही, मॅडम हे कसे हो? नाही पहिला हुकार की दूसरा? कुठली लाल कलरची नोटबुक वापरायची की पिवळया? अरे सांगितले ना कितीदा. आणि मॅडम ला काय शिकवताय आता. तेव्हडेच बघायचे राहिले होते रे.. अश्या सगळ्या कसरती झाल्यावर, दोन घास तोंडात टाकायला बसले की ह्या शिऱ्या चे कॉल चालू होतात.. Yes, sure..actually.. अगं? तुम्हाला सांगतेय, कश्या एक एक जनी सुग्रास पदार्थ बनवून फोटो टाकतात बाई, मला तर चपात्या करायला पण नको नको होते. चला पुन्हा बोलते. नाहीतर आजच सगळं संपेल. ~ मोगरा.

तुम्हाला सांगतेय, कश्या एक एक जनी सुग्रास पदार्थ बनवून फोटो टाकतात बाई, मला तर चपात्या करायला पण नको नको होते चला पुन्हा बोलते. नाहीतर आजच सगळं संपेल. _____________________________________________________________________________________________________________ खरंय बाई.पहिल्यांदा किती किती उत्साह होता स्वयंपाकाचा नव नवीन पदार्थ करायचे .अगदी मास्क ,सोशल Distance पाळून सामुग्री आणायचे.अगदी सुपर हिरो असल्याच्या आवेशात.रवा आणि मैदा आख्या स्त्री जातीने या जगातले संपले असतील.:)फोटो काढले,पण पोस्ट नाही करावे वाटले ..उगाच ओर्डर आली तर.. मुलीच्या online अभ्यासा बाबतीत मी सुखी आहे.मुळात लेकीला शाळा आवडत नाही.तेव्हा ठरवलं असाही online शिकायची सक्ती नको.काळाची गरज आहे पण ..झूम हा फारच गुळगुळीत option आहे. मानसिक शास्त्रानुसार विद्यार्थ्यांना अर्धा तास lecture शाळेतील योग्य आहे.इथे तर online शिकवण आणि शिकण म्हणजे पालकांची आणि शिक्षकांची कसरत अधिक आहे.त्यामुळे ३+४=७ ऐवजी चित्रकला,योगा,क्राफ्ट या activity अधिक असायला हव्या.त्यात पालकांचा सहभाग जास्त ही या lockdown शिक्षणातील तर्हा आहे.कारण लहान असो वा मोठी मुल सध्या प्रत्यक्ष मित्रांशिवाय त्यांना शिकावं लागतंय.म्हणजे discussion हा प्रकार घरातल्या घरात ४ डोक्यामध्ये online असल्याने थोडा लोड होत आहे.:) सुरुवातीला मुलीबरोबर बरोबर आम्ही खूप चित्रे काढली.नवऱ्याला हौस. चित्र काढून पोस्ट करायची..तो करायचा ..मला नाही जमल.आता तर नवीन activity करायचा सुद्धा कंटाळा आलाय.मुलीला म्हणते काय करायचं ते कर .जेवढा पसारा करायचा आहे तेव्हढा कर.मी आवरेन.ती मग नैसर्गिकपणेच शिकते त्यातून नवीन काहीतरी ,त्यात मी सुधारणा तिला करून देते. सध्या सुधारणा हीच आपल्या हातात आहे ती चांगली शिकवली पाहिजे. lockdown मध्ये म्हणशील तर..gallary ने खूप काही दिलंय.इथे थाळ्या वाजवून gallary ची नवीन ओळख झाली.चिनी गुलाबाच्या 2 कुंड्या तिथे आल्या..चिनी गुलाब लावायला सोपा आहे.पण याची फुलं मात्र दरवेळी वेगवेगळ्या रंग संगतीची येतात.अगदी जादुच वाटते.रोज वाट बघायची.. आज कोणत्या रंगांची फुलं आली.मोबाईलमध्ये फोटो जमा करायची आणि पाहत राहायची.त्यातच starmaker चा शोध लागला.एका निवांत वेळी gallary मध्ये बसून गाण्याची जुनी आवड परत उफाळून आली.खूप खूप गाणी गायली. वेळ होता म्हणून youtube वर कसे channel सुरु करायचं ते शिकले.शिकत राहावे नवीन काहीतरी . gallary तला सुखाचा काळ म्हणजे संध्याकाळ...मुलीबरोबर ढगांच्या गप्पा मारायच्या.आधी निरभ्र असलेल आकाश..आताशा सावळ्या मेघांनी ,कधी लाल ..केशरी..निळसर छटा उधळत येत ..तेव्हा किती रम्य -मोहक दिसतं.पाहत राहावं वाटत.तर संध्याकाळी१८-२० वयोगटातील तरुण मुल tiktok साठी व्हिडीओ तयार करायची ,ते पाहतांना मनोरंजन व्हायचं.आता तर ते पण ban हा हा .नटून थटून कोणी नाचायचं..छान वाटायचं.मोराचं नाचण पाहून जस डोलावं तसे डोलायची .आप्तस्वकीयांची फोनवर बोलत तर कधी गुगल ,whats app व्हिडीओ कॉल विचारपूस करत डोलणारी लोकं पाहिलं की छान वाटत की .. “दूर के अपने पास आते है चेहरे दिल मे समा जाते है” सुरुवातीला लवकर उठून योगाची नाटकं केली.उंबराच्या झाडावर पाखरांचा मंजुळ आवाज पार्श्वसंगीत म्हणून असायचा.आता ते अति वाटायाला लागलंय तेव्हा जमेल तस व्यायामाची आवड जोपासते.यात सुद्धा इंटरनेट च्या cure.fit app ची विशेष मदत झाली. कोरोनाने माणसाला पुन्हा स्वत:च्या आत डोकवायला भाग पाडलंय....काळचक्र फिराव तस आंतरिक भावनांचा शोध घेण्यास भाग पाडलंय.लिखाणानी या वर्षाच्या सुरुवातीलाच रुंजी घातली होती.ओढून ओढून आणलेलं लिखाणातल मन पुन्हा हळू हळू रमायला लागलंय.यातपण कोणी वाचाल तर उत्साह वाढतो.हो की नाही. चल बेसिनमधली भांडी आणि मुलीने घातलेला पसारा बोलवत आहे....मालकीण बाई आमच्याकडेपण पहा म्हणून... -भक्ती

आज पुन्हा तुझा धागा वाचला.रोज नवनवीन अनुभवायला मिळतंय.वाटा वाटा वाचाल पुन्हा ..हसू आल मला माझाच .. आवडणाऱ्या लोकांना अजून रंगवायच राहूनच गेलं.:)तर आज जरा मित्रांविषयी लिहाव म्हणालं. काल नयनाचा मेसेज आला ..मरायच्या आधी सगळ्यांनी व्हिडीओ call करुया खूप कंटाळा आलाय ..बायकांनी इतक पुरलं असत ना स्वत: संसारात की मैत्रीणीना वेळ द्यायचं राहतच.नाही तर तेल ,भाजी संपली.हे करायचं ते घ्यायचंय याला आयुष्य पडलंय.पण जरा वेळ काढावा वाटतो. “वेळ पळत राहते तेव्हा... काळाच्या घड्याळ्यात शिरून काटे फिरवावे नाहीतर तिथेच गोठून ठेवावा तो काळ आपण मुक्त होई पर्यंत ...” तर तो वेळ मी काढते ..पण आज मित्रांची आठवण काढते अगदी शाळेपासूनचे ... माझ्या शाळेतले मुल खूप चम्पू होते.हे तेलाची बाटलीच ओतून यायचे काय डोक्यावर काय माहित.:)आमच्या वर्गात पहिला नंबर मुलींचाच असायचा.पाचवीला श्रीक्या आणि मी प्रधानमंत्री होतो..मी असली डेंजर होते.पोर रडयाचेच.बाईना नाव सांगेन म्हणून धमकी द्यायचे.तुष्क्या आणि मी तर मारामारी केली होती.तो ४.५५ मिनिट म्हणजे ५ वाजायच्या आधी..घंटा व्हायच्या आधी वर्गातून पळून चालला होता.काही नियामांची कदर आहे की नाही तुला? म्हणाले होते मी .तुष्क्याचा राग आता आता गेलाय ह्या गोष्टीहून आता आम्ही चांगले मित्र आहोत. मी चांगल लिहित ..लिहित राहा अस शाळेच्या मित्रांमधून सांगणारा तो आणि श्रीक्या .श्रीक्यान लग्न केल की नाही?तो आता कसा दिसतो? मला माहीतच नाही ..फार कमी बोलतो.,मी लिहिलेलं सगळ वाचतो.दाद देतो.त्याचा आणि माझा अजून एक समान दुवा म्हणजे गणपती..इतकी सुंदर मूर्ती बनवतो तो.साक्षात्कार होतो..प्रसन्न वाटत. सुग्या नुसता हसायचा. मी दोन वर्षापूर्वी याला असं पिडलं.कारण याला रागच नाही येत. निश्या ..तुष्क्याच्या लग्नात आम्ही खूप दिवसांनी भेटलो.हाच काय मी उधार देण लागते काय माहित असा लूक देतो की बस..मी पण आता बिनधास्तपणे त्याला काळ्या चिडवते. बाकी पोर लयी बिझी आहेत.कधी कधी त्यांच्या क्षेत्रातलं अनुभव सांगतात. ११-१२वीला माझे कोणीच मित्र नव्हते.वेळच नव्हता.Bsc.ला परत मित्र व्हायला लागले ते सगळे Msc पर्यंत तेच होते.हे पण मवाळ..पुस्तकातले किडे...कवड्या परीक्षेला माझ्या मागेच असायचा...आंघोळ करायचा की नाही काय माहित...गबाळा होता ..आता HOD आहे.विज्या आधी शांत वाटायचा ..आता आमच्या batch मधून हाच नोबेल आणणार एवढा पुढे गेला आहे..पण याची राजकीय मत दुबळी बाजू आहे.आपण ज्या हुद्द्यावर आहोत त्यानुसार निष्पक्ष तो नाही ..याचा मला खेद वाटतो.जाऊ दे मला काय करायचं. पुढचा मित्र म्हणजे केड्या..गजनी सिनेमा पाहिल्यावर lab मधला उंदीर मारायला ह्याने खूप ड्रामा केला. पिपेट stand घेऊन अख्खी lab पालथी घातली. साहूल...ह्याला आम्ही आगलाव्या चिडवायचो...एकवेळ पोरी बऱ्या..एवढ्या पटकन हा इथली बातमी तिथ पोहचावायचा.ह्याने कुरियर अजेन्सी काढायला पाहिजे होती.याच रडगाण अजूनही सुरु आहे. हा बहुतेक असाच मरणार. नव्या,नित्या खूप फोकस्ड होते.आनंदी आहेत .दोघानाही एकच परी पाहिजे होती..पण तिला तिचा तिसराच राजकुमार अमेरिकेत सुखी ठेवतोय ..हा हा...तेव्हा पेटून दोघांनी असल्या सुंदर बायका केल्या....वा रे वा रे...क्या जलनकी आग..आग लागो असल्या जळक्यांना...कॉलेज सुटलं आणि हे मित्रपण सुटले. आता मी पण समजूतदार झाली होती.मंगल्या हा माझा मित्र ..अत्यंत हुशार ..किडकिडीत..ह्याच्या डोक्यात एक ..बोलण्यात एक..आणि करायचा तिसर....ह्याची आई सुगरण होती.हा कमी जेवायचा.मग ह्याचा डब्बा मीच संपवायचे.बोट चाटीत राहावे असे एक एक पदार्थ असायचे.मंगल्यामुळे आम्ही पावसाळी सहल काढली होती. हिरवा रंग ..पाण्याचे थेंब..त्यात फुटले मग आनंदाचे कोंब....मस्त मस्त.. मंगल्या सध्या कोणाशीच बोलत नाही.हिशोबी प्राण्यांचे असेच असते. नंतरचे मित्र सगळे माझ्याहून लहान होते.तरी मी खूप साधी..माझीच परीक्षा घ्यायचे उगीच ..हा हा... आणि सगळ्यांना समजून घ्यायचे ..परवा हर्षलचा वाढदिवस होता..म्हणाला हर्षल नाही हो “हर्षद” ह्याची माझी केबिन शेजारचीचपण..ह्याला मी हर्षलच म्हणायचे..नावात काय आहे ..म्हणलय नां कोणीतरी. शेखू आणि माझी मैत्री उतार चढावांची..कधी भांडलो नाही.पण रुसवे फुगवे चालायचे.शेखुला कोरोनाच्या काळात लग्न करायची काय गरज होती.तेवढंच ह्याच्या लग्नात मौज करायला मिळाली असती. अजून खूप मोठी लिस्ट आहे लिहीन पुन्हा... -भक्ती

@ शब्दमेघा., मी मिपा वर आले की पहिला हा धागा शोधते., आजकाल येथे लिहिणे कमी केले आहे काय? ~~~~~~~~~~~~~~ बाहेर पाउस पडतोय.., पाण्याच्या धारा वाहतायेत आणि. काळाची असंख्य जळमटे उगाच श्वास रोखून धरायला लावतात., कधी कधी तर कोंडमारा होतो., भावनांचा चिखल म्हण हवं तर. मुंबई चा समुद्र, आताही असंख्य लाटा उधळत असेल नाही. तुझ्या माझ्या आठवणींचा नेकलेस,अजूनही त्या लाटा आनंदाने झेलत असेल. पुण्यात मात्र पाउस तसा पडत नाही., असंख्य लाटा अंगावर घ्यायला येथे मिळतही नाही.

@ मोगरा.. धन्यवाद. तसे या धाग्यावर लिहिणे कमी झालेय खरे, काम आणि सायकल च्या धाग्यामुळे दुर्लक्ष झाले आहे. लिहिल पण. कॉलेज च्या वेळेस च्या मेस बद्दल लिहायला घेतले होते. राहिले आहे. ---- पण तू मुंबई म्हणाली आणि मन तिकडे गेलं, 2007-2014 माझा मुंबईतला काळ.. मस्त दिवस.. लिहिल मुंबई वर पण नंतर कधी सवडीने. तुर्तास मुंबई ची आठवण झाली, म्हणुन मुंबई वर मी 2007-08 ला लिहिलेली कविता येथे पुन्हा देतो.. या कवितेला नंतर खुप नावे चिकटली.. पण असो.. खालील प्रतिसादात देतोय..

स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे मराठीचा मान मुंबई महाराष्ट्राचा अभिमान मुंबई देशाची शान मुंबई आमचा प्राण मुंबई स्वप्नांचे पान मुंबई......... ---------- गणेशा

आता एवढच सुचलय आई भावनेचा ढग बरसला मग ओलावा मातीला हळू बिलगला रोपट मायेचं नात जीवनाचं फुलं लगडली सडा ओंजळी!! -सरीवर सरी

आज बर्याच दिवसांनी, माझ्या या धाग्याची आठवण झाली.. जेंव्हा येइल तेंव्हा जे सुचेल ते , किंबा जे आठवले ते जसे आहे तसे लिहिणाअर म्हणुन हा धागा सुरु केला.. पण बर्याचदा डायरी सम लिहिण्याची सवय नसल्याने हे लिखान मागे पडतेच ... आता पुन्हा या बिझी आयुष्यातुन काही वेळ काढुन लिहावे म्हणतोय बघु.. सुरुवात कविते मार्फत करतोय .. खरे तर कविता येथे जास्त लिहिणाअर नव्हतो.. पण आता ही जी कविता आपल्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहिणार होतो, ती राहिली ती राहिलीच म्हणुन पुर्ण करतो येथे आणि येथेच ठेवतो .. दिवाळी अंकाचे म्हणाअल तर लिखाण मनापासुन झालेले असेल तर देण्यात अर्थ आहे, उगाच द्याय्चे म्हणुन कसे ही शब्द ओढुन देण्यात पॉईंट वाटला नव्हता ... असो तर पुन्हा सुरु करतोय माझे 'शब्द झाले मोती' बघु कुठपर्यंत जातोय ते

मी पण डायरी वगैरे काही लिहीत नाही.पण तुझ्या या धाग्यावर मित्रांविषयी लिहले.आणि श्रीक्या विषयी लिहिले..काय आश्चर्य श्रीक्याशी मी बोलले आणि आता तो माझा चांगला मित्र झालाय :).

आज खूप दिवसांनी laptop उघडला.महिना दीड महिना दुखण्यातच गेला.मराठी app वर पण मोबाईलवरूनच लिहायचे.या धाग्यावर लिहितांना उगाच वाटते आपण खूप सुखी आहोत.:) सांजवेळ आहे,बाहेर झाडावर घरी परतलेल्या चिमण्यांचा मस्त चिवचिवाट आहे. तर या धाग्यावर पहिला लेख गणेशाच्या मुलीच्या जन्माचा आणि नावाचा वाचला.माझ्या मुलीचा जन्म हि सुद्धा माझ्या आयुष्याची दुसरी नांदी आहे.तिच्या नावची सुद्धा खूपच गंम्मत आहे. माझ्या मुलीचा जन्म नवरात्रीतल्या अष्टमीचा ..डॉक्टर हिचा जन्म झाल्या झाल्या म्हणाले ‘दुर्गा’ झाली हो.माझी पोर नवसाची ..तेव्हा मी तीच नाव ‘संतोषी’ असे देवीच ठेवणार होते.पण पुढे जाऊन पोरगी मलाच जाब विचारत बसली असती म्हणून हे नाव नाही ठेवलं. आम्ही नवरा-बायको म्हणजे दोन ध्रुव आहोत.नावावर सुद्धा आमच एकामत नाही झाले.मला राधिका नाव ठेवायचे होते.राधा ,राधिका नावातच किती गोडवा आहे .कोणी सुंदर घुंगरू घालून इकडे तिकडे बागडणारी गोड मुलगी डोळ्यासमोर उभी राहते .पण कोणीच पसंती नाही दिली.नवरा म्हणाला ‘गौरी’ नाव ठेवूया.मी म्हणाले एका घराआड एका घरात गौरी आहेत ,एवढं कॉम्मोन नाव नको.आमच्या सासुबाईवर टीव्ही सिरीयाचा पगडा म्हणाल्या ‘शुभ्रा’ नाव ठेवूया.म्हणाल घरातच सिरीयालची पात्र नकोत.:) मला वाटत होत ‘मेधा’ वा ‘सखी’ नाव ठेवाव..कोणालाच नाही आवडल.दोन अक्षरी अपभ्रंश नाही होत . शोधता शोधता ‘गिरीजा ‘ नाव मला आवडलं.म्हणजे जजन्मादिवसाची आठवण ती नवरात्रीची!!आणि देवीचीही कृपा तिच्या सतत बरोबर असेल.गिरीजा म्हणजे पार्वती..इष्ट देव गणपतीची माता! आता तरी सगळ्यांना नाव आवडत .शाळेत होऊ शकतात अपभ्रंश पण ते ती खोडून काढेल कारण तिला तीच नाव खूप आवडत ..वेगळ आणि आईने दिलेले.

श्रुंगार्/प्रेम काव्य हा माझा प्रांत मुळीच नाही, पण चंद्र माझ्या कुशीत आहे, नंतर ही दिवाळी अंकासाठी श्रुंगार कविता लिहिण्याचा केलेला अर्धवट प्रयत्न येथे देतोय.. आणि अत्यंत खेदाने म्हणावे लागेल मिपाच्या इतक्या वर्षात मी एकदाही दिवाळी अंकात भाग घेतला नाही.. -------------- उमलत आहे पहाट अजुनी तरी मिठी तुझी ना सैल व्हावी गुंफलेली रातराणी तू कोवळी वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी || आर्जवे मेघांची अजुनी या ओठांवरती अबोलीची फुले कर रीती तू त्यावरती मग चढेल रंग गुलाबी हळुच शब्दांना अन उमटेल स्वर मालकंस स्पर्शांना अशीच राहुदे चंद्रशेज.. माझ्या खांद्याची, अन हळुच ओढ पांघरुण चांदण्यांचे ..पाठीवरती अशीच राहुदे आभाळमाया.. केसात तुझ्या माळलेली लाजतील पहाट किरणे ही ओलांडण्यास त्याला... उमलत आहे पहाट अजुनी तरी मिठी तुझी ना सैल व्हावी गुंफलेली रातराणी तू कोवळी वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी || - शब्दमेघ अपुर्ण , १५ ऑक्टो २०.

In reply to by गणेशा

अशीच राहुदे चंद्रशेज.. माझ्या खांद्याची, अन हळुच ओढ पांघरुण चांदण्यांचे ..पाठीवरती . . गोंदण उमटले त्या चांदण्यांचे.. भावस्पर्श उगा ते आसुसलेले.. रातराणीसम धुंद गंधाळलेली.. वीजफुलांची अजुनी बरसात व्हावी ||

छान आवडली.

हे लिहायला मी कोणी डिसले गुरुजींप्रमाणे क्रांतिकारी नाही पण प्रामाणिक काम केलेली एक साधी शिक्षिका होते ..काल त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा...आणि हा ११ वर्षांचा तप काहीसा शिक्षणाचा उहापोह करते. “तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना बळ द्या ते छाटू नका..”हे जर माझ्या त्या वेळच्या विभागाच्या प्रमुखांना कोणी त्यांच्या बालपणीच्या शिक्षकांनी सांगितले असते तर सूड बुद्धी ठेवत ते माझ्याशी असे वागले नसते.असो...तो प्राक्तनाचा भाग समजून आणि देव त्यांना या पुढे भेदभाव न करण्याची बुद्धी देवो! (खेद असा कि हि बुद्धी त्यांना अजून नाही आली)असे म्हणत मी तो गुणप्रत्रकाचा कागद नजरेआड केला.पण हरेल ती भक्ती नाही.प्राक्तानाने पुन्हा एक संधी दिली.आवडते ज्ञानदानाचे काम करण्याचे..आवडत्या क्षेत्रात करायचे!! प्रयोगशाळा तर अलहिदाच होती.तरीही ती आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द होती.मला आठवतय रसायनांचा तुडवडा होता तेव्हा मी होम पद्धतीने धुण्याची पावडर वापरत dna आयसोलेट करून दाखवला.अजूनही त्या वर्गातील मुले मला भेटले कि तो प्रसंग आठवून सांगतात. पुढे अनेक अनेक प्रोजेक्ट केले.त्यातला पुढचा प्रोजेक्ट म्हणजे synthetic seed बनविण्याचा..अंतिम सादरीकरणाच्या वेळी “कोण आहे गाईड ?” ..असे म्हणत माझ्याकडे कौतुकाच्या नजरेने माझ्याकडे mpkv च्या वरीष्ठ संशोधकांनी पाहिले. त्या नंतर माझ्या प्रत्येक विध्यार्थ्याला मीच गाईड म्हणून पाहिजे होती..अक्षरशः मी गाईड असल्यावर विद्यार्थी घोड गंगेत न्हाऊन निघाल्यासारखे आनंदी व्हायचे. काही चुका झाल्या म्हणजे पेपर प्रदर्शित करण्यात माझा रस नसणे,वा पेटेंटसाठी काम न करणे ..पण माझ उदिष्ट केवळ १००% ज्ञान देणे हेच होते.या गोष्टी गौण होत्या. तरीही एकदा आकाशवाणीवर उतीसंवार्धन या विषयावर एक मुलाखत दिली तेव्हा कुठे माझ्यावर माझ्या जुन्या शिक्षकांनी विश्वास ठेवला.अर्थात माझे विश्व तर माझे विध्यार्थी हेच होते..कोणत्याही अपेक्षांच्या पार पुढे होते मी!! डिसले गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे आनंद घेत काम करा ध्येय घेत नाही! अशाप्रकारे पुढे संधी मिळाली तर काम घडो!! टीप:पुढ जे होईल ते ..नाहीतरी माझी वंशाची पणती आहेच शिक्षणातले प्रयोग करायला. :-) -भक्ती

बाभळीच्या झाडावरून एक हिंदी कविता आठवली जी माझी आवडती आहे. एक नाजूक कळी आणि बाभूळ अशी परस्परविरोधी भाव असणारी रूपकं घेऊन ही कविता रचली गेली आहे. दो जीवन कली निगाह में पली, हिली-डुली कपोल में, ह्र्दय-प्रदेश में खिली, तुली हंसी की तोल में| गरम गरम हवा चली, अशान्त रेत से भरी, हरेक पंखुरी जली, कली न जी सकी, मरी| बबूल आप ही पला, हवा से वह न डर सका, कठोर जिन्दगी चला, न जल सका, न मर सका| - केदारनाथ अग्रवाल सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

ह्र्दय-प्रदेश में खिली, तुली हंसी की तोल में|

विद्यार्थ्यांचे मन वाचायचे असेल तर त्यांच्या वहीचे शेवटचे पान पहावे.अशीच पसारा आवरताना जुनी जनुकीय अभियांत्रिकीची वही सापडली...पहिली पान वाचतांना ,हळूच शेवटचे पान पाहिले..अर्थात माझ्या त्यावेळच्या वह्यावर काय सापडणार तर कविता  विशेष म्हणजे हि कविता त्याच्यासाठी लिहिलेली त्याच्याबरोबर असतानाची एकमेव कविता..ती आता सापडावी म्हणजे आश्चर्यचं ... बहुतेक मी तेव्हा आंतरजालावर नव्हती दिलेली ..आधीच खूप कविता अदृश्य झाल्या आहेत ,तेव्हा त्याच्यासाठीची हि कविता अदृश्य होण्याआधी इथे लिहिते.. तो तसाच नेहमी दाराच्या बागेतून येणारा अप्रतिम जगावेगळ माझ्या ओंजलीत देणारा तो तसाच मला स्वत: बोलक करणारा मात्र मी त्याला बोलक करायची वाट पाहणारा तो तसाच नात त्याच माझ मलाही न सांगाणारा पण कवाड त्याच्या मनाची माझ्यासाठी उघडणारा तो तसाच,मला माहित नाही होईल का तो माझा? रंगेल त्याचे आयुष्य सप्तरंगाने माझ्या पण तो ...स्मरेल ...कायमच -भक्ती

एका मोहिमेसाठी जाहिरात बनवायची आहे? काम करताल का? आधीच घरात बसून कंटाळा आलाय त्यात जर असे नवीन काहीतरी करायला मिळतेय ..करूया म्हणल.मानधन अगदीच कमी पण कंपनी मोठी होती.मग त्यांनी कागदपत्रे पाठविली.नीट न वाचता सुरु केल्यामुळे चुकीच्या वस्तू वापरल्या .मग पुन्हा ते ज्या उत्पादनाची जाहिरात करायची होती ती २- ३ वेळा आणली.आता स्क्रिप्ट त्यांनी पाठवली होती.खरच पाठांतराची सवयच राहिली नाही.तेव्हा परत परत मोबाईलमध्ये प्रसंग चित्रित करावे लागायचे.इनमिन ८-९ वाक्य पण मोबाईल सुरु झाला कि गोंधळच उडायचा.१०-२० टेक घ्यावे लागले.अर्थातच मला नाटकं कधी जमली नाही..तेव्हा थोडा खोटेपणा वाटलाच ..असो..पण अशी संधी घरबसल्या कोण देणार.. मग आली एडिटिंगची वेळ .बापरे सांगते ४ दिवस लागले.त्या कंपनीला जेव्हा जेव्हा पाठवायचे तेव्हा हे असे ते असे करत करत खूप खूप तास लावले.एव्द्याच मिनिटात बसावा, असेच सबटायटल टाका (यासाठी मला १ तास लागला) शेवटचा दूरचित्रवाणी पाठवला तेव्हा..तुम्हा पुन्हा चित्रित कराल का ?विचारणा झाली. मी जरा का कु केली ..तर तेव्हा ५०% रक्कम वाढवून देतो म्हणाले(अरे वाह आधी माहित असत तर अजून २-३ चुकीचे शूट केले असते.).मग पुन्हा काही प्रसंग पुन्हा चित्रित केले. पुन्हा ते जोड एडीट करा,पुन्हा ५९ सेकांदात बसवा.त्यांना पाठवला,अप्रूव्हल झाला तर सांगतो...म्हणजे गायी भैस पानी मै!!चित्रीकरण ठीकठाक होते.पुन्हा मग मेसेज केला की प्रदर्शित केला.छान वाटले.संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण मेहनत जी करावी लागली त्यामुळे कार्यपूर्तीचा आनंद होता. खरोखरी धन्य ते कलाकार ..निर्मिती,छायाचित्रण,संकलन आणि अजून कितीतरी बाजू....

My heart is always full of love So mind is like one gypsy alive.. Glass is filling with fairy wine Makes days with colored n divine.. Though path lighting by thunder Slowly why followers got disappeared? I viewed through kaleidoscope apparently Furious object stacked in eyes fearlessly.. -भक्ती

My heart is always full of love So mind is like one gypsy alive.. Glass is filling with fairy wine Makes days with colored n divine.. Though path lighting by thunder Slowly why followers got disappeared? I viewed through kaleidoscope apparently Furious object stacked in eyes fearlessly.. -भक्ती

आज सौंदाळा यांच्या मुळे पुन्हा हा धागा वाचण्यात आला.. पुन्हा अनेक आठवणी आणि अनेक लेख पाहून छान वाटले.. इतरांच्या हि तितक्याच गोड प्रतिसादा मुळे आणि त्यांच्या अनुभवाने छान वाटले.. पुन्हा येथे लिहावे असे वाटते आहे.. वेळ मात्र खूप कमी असल्याने अवघड वाटते आहे... पण या सर्व आठवणीत शाळा आणि कॉलेज च्या आठवणी जास्त मनाला हलवून सोडतात.. त्यातील गणपती लेखमाला ला धागा येथे देतो पुन्हा.. त्यावेळेस कुठे अन्य ठिकाणी लिहलेले accept नव्हते म्हणुन तो इकडे दिला नव्हता.. देतो आणि पुन्हा लिखान चालू करतो हळू हळू..

नोट : नावे बदलली आहेत पुन्हा.. -- Maroon color तू हसलीस की, फुले उमलू लागतात, आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात. तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा.. मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक.. सुंदर.. नितळ.. ह्या ओळी मनावर कोरल्या गेल्या त्या कायमच्या. त्या काळी मी लिहीत नव्हतो, तरीही मीही एक डायरी घेतली होती तेव्हा. त्याच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेले 'आते जाते, हसते गाते, सोचा था मैने मनमे कई बार' हे गाणे अजूनही तसेच आहे, तुझ्या नावासहित. आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले... * * * तर, हा काळ आहे २०००-०२चा. तेव्हा आजकालच्यासारखे मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस, फेसबुक असले social life नव्हते. तुमच्या भावना ह्याच उत्कट होत्या. तेव्हा वाटणार्‍या गोष्टींमध्ये एक अनामिक हुरहुर दाटलेली असायाची.. एक ओढ असायची.. वाट पाहणे असायचे. बरेच काही.. मेघा खूप शालीन मुलगी, रेखीव. तिच्या दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. मला आवडायच्या त्या. तेव्हा कविता लिहीत नव्हतो मी. लिहीत असतो, तर त्या चंद्रखळ्यांवर असंख्य कविता लिहिल्या गेल्या असत्या, इतक्या त्या आवडायच्या मला. मेघा शांत, सुशील, कमी मित्र असलेली मुलगी. मी त्याउलट, खूप बोलका, टुकार, कँटीनला पडीक असलेला, मुक्त.. स्वैर.. स्वच्छंद. मेघाला मात्र फक्त दोन मित्र - एक मी आणि दुसरी मनाली. मनाली ही अतिशय सालस मुलगी. मेघामुळे माझी तिच्याशीही खूप छान मैत्री झाली होती. नंतर आमच्या तिघांचा असा ग्रूप तयार झाला होता. मला मात्र खुप जास्त मित्र-मैत्रिणी होत्या. आपला स्वभाव बोलका. त्यामुळे माझे ग्रूपही जास्त. मी तेव्हा खूप भांडायचो खरे. आता हसू येते, पण तेव्हा मी नक्कीच वेगळा होतो. पटकन रिअ‍ॅक्शन, पटकन प्रेम, पटकन भांडण.. मेघाची आणि माझी मैत्री झालीच कशी? असा प्रश्न मला पडायचा कधी कधी. ती इतकी नाजूक, सुंदर, गोरीपान, शालीन.. मी इतका बेडर, सावळा, उंच, धिप्पाड, भीडभाड न बाळगता कसेही बोलणारा, माहीत नाही. पण मी तेव्हा ही खूप respect करायचो तिचा. तेव्हा त्या सर्व गोष्टींना respect म्हणतात हे माहीत नव्हते, इतकेच. खरे तर ती होतीच तशी, जीव लावावी अशी. प्रेमात अखंड बुडून राहावे अशी. तिने maroon colorचा, बुट्ट्या असलेला ड्रेस घातल्यावर तर ती खूप सुंदर दिसायची. मला खरे तर मुली आवडायच्या त्या ब्लॅक ड्रेसमध्ये, पण ह्या maroon colorच्या ड्रेसमुळे मात्र मला ह्या याही कलरचे खूप आकर्षण झाले होते. मेघाचा बॉब कट असायचा. कधीकधी तिचे सिल्की केस डोळ्यांपुढे यायचे. मला तिच्या केसाला हात लावून ते मागे सारण्याचा मोह व्हायचा. कधीकधी तिने डोळे वटारले तरी तो मोह मी पूर्ण करायचो. त्या काळी आपल्याला आवडणार्‍या माणसाबद्दलच्या भावना अशाच असायच्या मर्यादेत. मेघा मर्यादेचा अतीव पुतळा होती. ती खडूसही होती. सुरुवातीला तिला माझ्या भावनांचे जास्त काही पडले आहे की नाही, असे मला नेहमी वाटायचे. मी पहिल्यांदा तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितल्यावर तर ती किती भडकली होती. टुकार हा तिने तेव्हा मला म्हटलेला शब्द अजून आठवतो. नंतर काही काळ असाच गेला. नेमके शनिवारीच हे सगळे घडायला हवे होते का? सोमवारपर्यंत वाट पाहणे म्हणजे काय, हे आता त्या खडूस मुलीला कोणी सांगावे असेच वाटत होते मला. सोमवार आला, गुपचूप पुन्हा आम्ही प्रॅक्टिकलला बसलो, न बोलता. प्रॅक्टिकललाही आमचा एकच कॉम्प्युटर होता, कोपर्‍यातला. दोघे एकत्रच तासन तास c and data structuresचे प्रोग्रॅम करत बसायचो. इतके की मी त्या विषयात पहिला आलो. नंतर कंपनीतही त्याचा जास्तच उपयोग झाला :-)) तर गुपचुप बसणे हे आपल्या स्वभावात नव्हते. पुन्हा बोलणे, पुन्हा आर्जवे.. "फक्त मैत्रीण म्हणून आपल्याला जमणार नाही तुझ्याकडे बघायला" असली असंख्य वाक्ये माझ्याकडे होती. मी माझे नेहमीच खरे करत आलो आहे. तेव्हाही मी आतासारखाच होतो या बाबतीत. *** मेघा माझ्याबरोबर कँटीनला येत नव्हती जास्त. खूप कमी वेळा आम्ही कँटीनला गेलो असू. एकदा ती माझ्याबरोबर भटाच्या कँटीनला आली होती. तुषारच्या कँटीनपलीकडे गुलाबाचे झाड होते, त्याचा गुलाब तोडून मी तिच्यासाठी आणला होता. हाय, तो गुलाब चक्क पांढरट पिवळट होता. लाल नव्हता. ती हसत होती. मी देताना म्हणालो, "देणार्‍याच्या भावना महत्त्वाच्या, कलरचे काय एवढे.." मी खूप वाया गेलेलो आहे असे कोणाचेही म्हणणे असेल, पण तरीही मी पहिला आलो सेकंड इअरला. आपले असेच असते. जे करायचे ते मनापासून, मग तो अभ्यास असो वा प्रेम वा मैत्री. गणित आणि c and data structuresमध्ये संपूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिल्या काही जणांत होतो, असे सरांनी सांगितले मला. मी हुशार होतो. पण टिपिकल वरणभात, सोज्ज्वळ हुशारपण आपल्यात नव्हते. आपल्याला जे यायचे ते असेच यायचे नॅचरली. मग आम्ही एकत्र अभ्यास करू लागलो. एकत्र अभ्यास हा कॉलेज सोडून भेटण्याचाही एक मार्ग होता आमचा. मला आवडायचे शिकवायला. किती किती अभ्यास करायचा म्हटले, तरी एक एक टॉपिक मी चुटक्लीसरशी संपवून टाकायचो. मग उगाच असंख्य गप्पांत आमचे तासन तास जायचे. ते तास, त्या गप्पा पुन्हा मिळतील का मला पुन्हा? असा प्रश्न माझे मन कायम मला विचारत राहते. तेव्हा आमचे एक सूत्ही होते - 'more study - more confusion - less marks, less study - less confusion - more marks." तिला तिच्या डायरीतल्या कविता, लेख वाचायला आवडायचे. 'बस होती चिंचवडची' ही कविता तर मी तिला कितीदा म्हणायला लावायचो. ती कविता ती खूप छान म्हणायची. तेव्हा मी स्वत: कधी आयुष्यात कविता लिहीन असे वाटले नव्हते. कदाचित मी कविता लिहिण्याला हे सारे प्रसंगच कारणीभुत आहेत. असो. *** मेघा माझ्यापेक्षा मोठी होती. वागण्यानेसुद्धा. मेघाचे डोळे खूप काळेभोर, मस्त होते. मी नंतर तिला बर्‍याचदा चश्मा काढायला लावायचो. बर्‍याचदा तिच्या डोळ्यात बघायचा हट्ट करायचो मी.. मी ऐकत नव्हतोच :-)) मी खूप हळवा होतो तेव्हा. मेघा हसायची माझ्या हळवेपणावर कायम. मेघा होतीच तशी, ती कुठल्याही गोष्टीवर मनमुराद हसू शकत असे. एखादी गोष्ट मिळाली नाही, तरी त्या गोष्टीकडेही ती हसत पाहू शकत असे. मला असले वागणे कधी जमत नसे. 'धडकन' रिलीज होण्याआधीच माझे 'तुम दिल की धडकन मे.. रहते हो,. तुम रहते हो' हे गाणे पाठ होते. माझा आवाज चांगला नव्हता. पण सर्व वर्गात मी हे गाणे तिच्यासाठी गायले होते, तेही पूर्ण. ते गाणे तेंव्हा मला इतके यायचे की त्याचे म्यूझिकसुद्धा मी तसेच गायचो. हे गाणे मी मेघाला dedicate केले होते. नंतर तो पिक्चर रिलिज झाला आणि त्या देवसारखाच मी आहे असे तिचे म्हणणे होते :-)) आणि असे म्हणून ती हसत असे. पुढे नंतर तिने वर्गात 'आते जाते, हसते गाते | सोचा था मैंने मन में कई बार | वो पहली नज़र, हलका सा असर |करता है क्यों दिल को बेक़रार' हे गाणे गायले होते. मला खूप आवडले हे. तिला लता मंगेशकरने गायलेले 'होठों की कली कुछ और खिली' ह्या ओळीपासून हे गाणे जास्त आवडायचे. मला एस.पी, बालासुब्रह्मण्यमचे कडवे आवडायचे. एस.पी. माझा आवडता गायक. अजूनही मी त्याची कित्येक गाणी ऐकतो. विशेष म्हणजे आराध्यालाही नेमके 'आते जाते, हसते गाते' हेच गाणे आवडते. आराध्या आणि मी गाडीवर जाताना नेहमी 'मेरे रंग मे' हे गाणे म्हणतो, पण तिला 'आते जाते' हे गाणे आपोआप कसे आवडायला लागले, माहीत नाही. कधीकधी तर ती चक्क "पप्पा, आते जाते लावा ना" असे म्हणते. आराध्याचा जन्मही जानेवारीमधलाच. आम्ही रूमवर आते जाते गाणे म्हणायचो. मी एस.पी.चे कडवे म्हटल्यावर ती लताचे कडवे म्हणत असे. ती जेव्हा तिच्या गावी जाणार असे, तेव्हा मला उगाच 'आँख हे भरी भरी, और तुम मुस्कुराने की बात करते हो' हे गाणे म्हणून चिडवायची.. मी चिडलो की मात्र ती पुन्हा एस.पी.चे आणि लताचे गाणे म्हणायची - 'तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है , पलभर की जुदाई फिर लोट आना है?' तेव्हा मला ऐश्वर्या राय आवडायची खूप. मेघालासुद्धा ऐश्वर्या रायच आवडायची. माझ्या एका वहीवर ऐश्वर्याचे चित्र होते. ती वही मला खूप प्रिय होती. मेघा मात्र प्रीती झिंटासारखी दिसायची. अगदी तसीच अवखळ वाटायची कधीकधी. मेघाला टीव्ही सिरिअल्स आवडायच्या बहुतेक. मला तसल्यात काही रस नव्हता. तिला 'कसोटी जिंदगी की' आवडायची, मी त्याचा एकही भाग बघू शकत नव्हतो. *** साडी डेला मेघा खूप सुंदर दिसत होती.. मला हिरवी साडी आवडते, हे मी नव्हते सांगितले तिला कधी. तिने Maroon redच साडी घातलेली. तिला मी पाहतच बसलो होतो. मेघा जवळ आल्यावर "मेघा, तू आता मोठी झालीस" असे तन्वीर म्हणाला होता. तो फोटो तिने तिच्या वडलांना दाखवला होता, तेव्हा तेसुद्धा तिला "मेघा, आता तू मोठी झाली" असे म्हणाले होते. हिने आम्हाला मारलेलाच डायलॉग तेथे मारला - "मी आहेच मोठी." तिने काढलेला तो फोटो मी माझ्याकडे ठेवून घेतला नंतर, तिच्या आठवणीसाठी. आम्ही कॉलेजनंतर पुन्हा भेटणार नाहीच असे तिला कदाचित म्हणायचे होते. मी माझ्या स्वप्नातही असे विचार करू शकलो नव्हतो. पण मी कितीही बेधडक असलो, तरी मात्र मी कधी माझ्या मर्यादा तोडून तिला त्रास होइल असे वागलो नाही. ते चूक की बरोबर हे तीच सांगू शकेल, मी नाही. तिच्या त्या फोटोचे मी खूप छान स्केच बनवले होते. आहे अजून माझ्याकडे ते. आम्ही कॉलेज संपल्यावर काय काय करायचे, कुठे कुठे अ‍ॅडमिशन घ्यायची, कसे पुढे जायचे असे बोलत असू. मी आयुष्यात तुझ्यासोबत असेन असे मी नेहमी म्हणत असे. मी MCS करणार होतो. मेघाला वाटायचे MCA करावे, ते जास्त चांगले. मेघा पुढे बहुतेक शिकणार नव्हती आणि मी तिला पुण्याला अ‍ॅडमिशन घे म्हणायचो. मी कितीही माझ्या म्हणण्यासारखे झाले पाहिजे म्हणालो, तरी ती तिच्याच म्हणण्याने वागायची. आम्ही खरेच वेगळे होतो.. खुप वेगळे.. तरी एकत्र. मी नंतर, तिचे तेव्हा म्हणणे होते ते म्हणुन MCAला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र मी कॉलेजला कधी नीट गेलोच नाही. मी दुसर्‍या वर्षाला असतानाच मॉड्युलर या कंपनीत सिलेक्ट झालो आणि कॉलेजने मला दुसर्‍या वर्षापासून तिकडे काम करण्याची परमिशन दिली (मोड्युलरचे चार भाग मी आधी लिहिले आहेतच). मास्टर डिग्रीला कॉलेजला मी कधीच रमलो नाही. कारण तिथे तू नव्हतीस मेघा. मी अभ्यासही केला नाही. मला मास्टर डिग्रीला अमोल सोडला तर कोणी मित्रही नव्हते. नशीब, तेथेही मी असाच अभ्यास न करताही पेपरच्या आदल्या दिवशी काही वाचून फर्स्ट क्लास मिळवला. *** आमच्या लास्ट इअरच्या परीक्षा झाल्या, तरी ३-४ दिवस मी माझ्या घरी निघून आलो नाही. तेथेच रूमवर राहिलो. रोज उद्या जातो म्हणायचो आणि सकाळी लँडलाइनवर फोन करून मेघाला बोलावून घ्यायचो. शेवटी तो दिवस आला तो कसा विसरेन मी.. आणि मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. मनालीसुद्धा रूमवर आली होती काही वेळाने, मेघापाठोपाठ. मेघानेच बोलावले होते तिला, असे मला वाटते. नंतर त्या दोघींना सोडायला मी हडको कॉलनीतून सैनिक कॉलनीत जाईपर्यंत बरोबर गेलो. मेघाचा त्या दिवसी Maroon कलरचाच ड्रेस होता. माझ्या आवडीच्या कलरचा. तिला तेव्हा मी सोडायला जाताना मनात किती स्वप्ने घेऊन चाललो होतो.. तिला शेवटचे पाहताना हेच शेवटचे असे वाटले नव्हते. निरोपाची वेळ आल्यावर नेमके मला खूप खूप बोलावेसे वाटत होते. कॉलेजच्या सर्व आठवणींना ओंजळीत पुन्हा घ्यावे वाटत होते. पण ती रस्त्याच्या त्या कडेला जाईपर्यंत माझे शब्द ओठांआडच अडकले. नेहमी रस्त्याने चालताना मी रस्त्याच्या बाजूला चालायचो आणि ती आतल्या बाजूला, आता आराध्याला घेऊन चालतो तसे. आता मात्र आमचे रस्तेच वेगळे होणार होते. हलकेच तिने मागे वळून पाहिले, माझे संयमाचे बांध हळूच सुटले आणि रिकामे हात हलत राहिले... *** नंतर अनेक दिवस गेले. लँडलाइनवर कधीतरी बोलणे व्हायचे. मेघाने पुढे कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली नाही. तिच्या लग्नाचे काही चालले आहे, कधी ती बोलली नाही. एका १० जूनला तिचा फोन आला नाही, म्हणून मी १२ जूनला रागावून फोन केला होता - २१०६६. तेव्हा असलेच नंबर असायचे. आतासारखे मोठे नंबर तेव्हा कधी नव्हते. तेव्हा तिने मला सांगितले की तिचे लग्न झाले आणि मी ख्कूपच हळवा आहे म्हणून मला तिने मुद्दाम बोलावले नाही. मी म्हणालो तिला, "आलो असतो मेघा मी तुझ्या लग्नाला, बोलवायचे तरी." ती तेव्हा खूप खूश वाटत होती.. मी अभिनंदन केले का.. मला आठवत नाही. तिने मला त्यांचे गाव आणि नाव सांगितले. भेटू म्हणाली बहुतेक तिकडे. ती हसत बोलत होती. मीसुद्धा खोटे हसू आणले होते ओठांवर. नंतर मी 'आते जाते हसते गाते', 'तुम दिल की धडकन मे', 'तुमसे जुदा होकर' ही सगळी गाणी माझ्या mp3 playerला ऐकली.. काही वर्षांनी मी माझ्या भावना शब्दातून लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मला नवी दुनिया सापडली - कवितेची. मी इतका भारी लिहीत नव्हतो तेव्हा, पण माझी पहिली कविता क्खूप हिट झाली. तिचे नाव होते - 'माझी तू.. त्याची होताना..' या कवितेची असंख्य विडंबने झाली. स्टेजवर असंख्य once more या कवितेला मिळाले आणि 'शब्दमेघ' हा माझाच मी नवीन पुन्हा जन्मला आलो. नंतर १४ वर्षे मी तिचे नाव कधीच कोठे सर्च केले नाही. तिला कसलाच भेटण्याचा प्रयत्न माझ्या मनात आला नाही. मी कोणालाच तिच्याबद्दल कधी विचारले नाही. शब्दमेघ होऊन मी असाच फिरत राहिलो.. मुक्त.. स्वैर..स्वछंद.. एक शापित मेघ जणू. कवितेतुन गझलकडे येण्याचा असफल प्रयत्न केला, तेव्हा 'सार्‍या उदास वाटा कापित चाललो मी, होउन मेघ काळा शपित चाललो मी' हा पहिल्या गझलेचा पहिला मतला मी लिहिला. नंतर मला चुकून काही संगीतकारांबरोबर काम करण्याचा योग आला, मी एका अल्बमला प्रेमिकेने सजणाला बोलवायचे गाणे लिहिले, ते खरे तर माझे मन होते का? माहीत नाही. एकदा मात्र मी आपल्या कॉलेजला गेस्ट लेक्चर द्यायला गेलो होतो, नेमके मेघा आपण ज्या वर्गात बसायचो तोच वर्ग होता. नंतर सगळे विद्यार्थी गेल्यावर मी तू बसायची, त्या तिसर्‍या नंबरच्या बाकावर शेजारी जाऊन बसलो होतो. *** दिवस असेच बदलत गेले... माणसाचे आयुष्य पुढे पुढे जात राहते. त्या क्षणांच्या असंख्य रांगोळ्या मनात मात्र उमटत राहिल्या. तुळशीहूनही पवित्र असणारे आपले नाते माझ्या मनात मी आठवत असे. मग माझे मलाच वाटे - आपण पुन्हा भेटू का कधी? भेटलोच तर काय बोलू? आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले - 'दिवस सरत जातात, तशी आपल्या आठवणींची फुलं बनत जातात.' *** आता अलीकडे इतक्या वर्षांनी मात्र मला पुन्हा वाटत होते, आपण पुन्हा भेटावे, तेव्हाचे सगळे सोडून द्यावे आणि मैत्रीच्या निखळ नात्याला पुन्हा अनुभवावे. जे तेव्हा फक्त मैत्रीचे निखळ नाते निभवायचे राहून गेले, ते पुन्हा निभवावे.. काय हरकत आहे? थोडा वेळ काढायला हरकत नक्कीच नाही. एवढा विश्वास आपल्यात नक्कीच आहे. आता तर हसू येईल, पण मला वाटते पार तुझे पांढरे केस झाल्यावर आणि माझ्या डोक्यावरचे केसच निघून गेल्यावरही भेटत राहावे.. भांडत राहावे.. बोलत राहावे. .. गोड-कडू आठवणींचे विणून अस्तर, पुन्हा त्या ढगांच्या पलीकडच्या निळ्या आकाशाकडे पाहत बसावे. काय हरकत आहे? वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्‍या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red कलरने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे? अनेक संध्याकाळी विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे मैत्रीचे रंग पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे? उद्या मी असेन-नसेन, तेंव्हा माझ्या नावाने मैत्रीचे तोरण तू बांधण्यापेक्षा, मैत्रीचा हात हातात घेऊन पुन्हा जगावे.. आपल्यासाठी. मी असाच आहे, वेगळा. माझा आवाज, त्याचा टोनही असाच वेगळा. पण त्यात आपुलकी आहे, विश्वास आहे, नितळ भावनेचा एक ओलावा आहे त्यात. म्हणुन म्हणतो, काय हरकत आहे? आणि मेघा, मला आनंद वाटला आपण पुन्हा भेटलो १८ वर्षांनी.. निखळ ..नितळ.. तू अजूनही तितकीच शालीन. मला खूप अभिमान वाटला आपला, आपल्या विश्वासाचा - गणेशा

विं दा क रं दी क र यांची कविता सुखाच्या शोधांत फ़िरते पॄथ्वी घेऊन हातांत चंद्राचा चोरकंदील! आणि फ़िरतात त्याच्याच शोधांत पृथ्वीची पोरे अतॄप्त मुशाफ़िर! ओसाड पॄथ्वीची सुखाच्या शोधांत जंगले पिंजणा~या माझ्या मुशाफ़िर! थांब जरासा; आपल्या बाळांच्या विस्कळीत केसांतून फ़िरव बोटे. पहा असेल सांड्लेले सूख तेथेच लपलेले! माझ्या मुशाफ़िरा! थांब जरासा; वादळी जीवनाच्या सहस्त्र स्वप्नांनी जागृत होऊन आकाश पिंजण्य़ापूर्वी पहा रे आपल्या उशीच्या खाली; असेल तेथेही सूख दड्लेले! माझ्या मुशाफ़िरा ऐक,ऐक, दमलेल्या भागलेल्या नाजुक हातांनी आत्ताच दिलेल्या खरपूस ,खमंग लसणीच्या फ़ोडणीचा चर्र आवाज; आणि तव्यावर उडू पाहणा~या भाकरीची फ़डफ़ड! ऐक,ऐक, खळ्यांच्या कोप~यावरील मोहरलेल्या आंब्याच्या विशाल वॄक्षावर डॊके टेकून टिकाळी शोधणा~या रसाची कुजबूज: "स्थीर राहूनही वाढते उंची; जातात पाळे खोल खोल; स्थीरतेचाच बुरखा पांघरून जगते गती निराळ्या पातळीत !" याच गतीला असते शोधीत सुखाचे भूत बंदिस्त स्थितीतून होण्या विमुक्त. सुखाचे भूत- जे काढते सर्वांची कळ; आणि लपते त्यांच्याच सावलीच्या मिस्किल अंधारांत! -विं दा क रं दी क र ~~~~~~~~~~~~~~~~~~` सुखाच्या शोधांत-रसग्रहण अनंत काळापासून अगदी मानवाच्या निर्मीतीच्या पासून सुखाचा शोध चराचर सृष्टी सुखाच्या शोधात आहे...सूर्य हेलियम शोधात,पृथ्वी जीवननिर्मितीच्या सुखात,चंद्र प्रकाश आनंदाच्या शोधात..यापुढे अफ़ाट मानव सुद्धा सतत सुखाच्या शोधात आहे...त्याचा हा घडा कायम डगमगतच असतो.. विंदानी सदर कवितेत ह्याच सुखाच्या शोधाच्या मिस्किल गोंधळात,आजुबाजुचे अमूल्य सुख दूर्लक्षित केले आहे हे सांगितले आहे.जसे माझ्या मुशाफ़िरा! थांब जरासा; वादळी जीवनाच्या सहस्त्र स्वप्नांनी जागृत होऊन आकाश पिंजण्य़ापूर्वी पहा रे आपल्या उशीच्या खाली; असेल तेथेही सूख दड्लेले! इवलस हे सूख लाखमोलाच! आयुष्यात मनपाखरू स्पप्नाच्या आकाशात घारीसारखे फ़िरते ’स्वप्नाचे भक्ष्य ’मिळवण्यासाठी .हो कोणालाही हे सूख झदप घालूनच मिळवायच असत...त्यात तो एक विसावा हरवतो कायमचा...ही आहुती का?सुखाच्या शोधासाठी.. कवितेतील शेवटच्या ओळींनी ह्या सुखाचा गॊंधळ विंदांनी काहीसा सोडविले..नव्हे सुखाचे मर्म सांगितले आहे... स्थीर राहूनही वाढते उंची; जातात पाळे खोल खोल; स्थीरतेचाच बुरखा पांघरून जगते गती निराळ्या पातळीत !" याच गतीला असते शोधीत सुखाचे भूत बंदिस्त स्थितीतून होण्या विमुक्त. सुख हे त्या वृक्षासारखे आहे..खोल पाळे मुळे गाडून घ्यायची, व रसदार फ़ळे वर्षांवर्षे सुखाने मिळ्वायची,कुजबुज रसाची ऐकायची अनुभवायची चेतनेने... माणसाने देखील सुखची सीमा मनात रूजवावी ,सुख मनात रूजवाय्च,सुखाला कायम नाविन्यपूर्ण रूप द्यावे,पहावे..सुख नूतनीक्षम आहे.आनंदाच,सुखाच झाड मनात लावाव पापण्या मिट्ल्यावर होणा~या मिणमिणत्या धुंद काळोखात जे सूख लपलेले आहे ..ते डोळे उघडे ठेवून शोधावे..नक्कीए जवळ्च असेल हे सूख!! विंदानी सुखसागराच्या किना~यावर आपल्याला पोहचवले आहे.उडी मारूयात.. या कवितेतील काही रूपक अप्रतिम आहेत मनावर अलगद परिणाम करतात, चंद्रचा चोरकंदील,सांडलेले सुख,रसाची कुजबूज,सुखाचे भूत. -भक्त्ती(२००८) संदर्भ:मृदगंध दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यातील सुखाचा अर्थ संसारात पडल्यावर जास्त उमगल. अन्नपूर्णाच रूप घेत जीवांना अन्नाचे मोती देण्यात वेगळेच सुख आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ फेबुने सकाळी हि सुंदर आठवण दिली.किती सुंदर आणि अलगद लिहलय..आता रसग्रहण करते पण लिहण्यासाठी धीर होत नाही.किती निरागसपणे लिहलय मी कि दुसर आणि चौथ कडव नंतर उमगल ......आता तर सर्व कडव उलगडले आहेत....पण दुसरा कडव म्हणजे संसारमांडवातील खरी घटीका... जंगले पिंजणा~या माझ्या मुशाफ़िर! थांब जरासा; आपल्या बाळांच्या विस्कळीत केसांतून फ़िरव बोटे. पहा असेल सांड्लेले सूख तेथेच लपलेले! सहावे कडव म्हणजे आता मला पूर्ण कळल आहे....धावाधाव कशासाठी करायची आणि किती करायची ...कधी स्थिर व्हायच ..सगळ सगळ प्रत्येकाने ताडल पाहिजे...जरा विसावू या वळणावर गाण गायल पाहिजे. स्थीर राहूनही वाढते उंची; जातात पाळे खोल खोल; स्थीरतेचाच बुरखा पांघरून जगते गती निराळ्या पातळीत !" विंदाच्या आठवणी आहेत ...पुण्यातल्या साहित्य संमेलनात मी एकटीच गेले होते ...तेव्हा विंदा त्याचे अध्यक्ष होते ...एवढ्याशा साध्या मोबाईल मध्ये मी त्यांचे आवाज रेकॉर्ड केले होते...खुपदा ऐकायचे....अजून एक डायरी सापडलीय ...खजिनाच ...पुण्याला सहा महिने होते त्या आठवणीतल एक फुलं सापडलंय....चाफा ..वेळ मिळाला कि नक्की लिहेल.... चला खूप खूप काम पडली आहेत... 

तर चाफ्याविषयी मी इथे लिहील आहे ,वर्ष २०१० हे लिहायचं राहिलं.शब्द मोतीवर जुन्या आठवणी लिहिताना बासरीमधून मंजुळ धून उठतेय असे वाटते.लिहितांना पुन्हा मन पाकळ्यासम हलक होत जातंय... https://misalpav.com/node/48541 तर ह्या छोट्याशा आठवणीपासून सुरुवात करते....मी अशीच जगते मनमुराद ...कोणी काहीही बोलो...आपली तत्व आपला आनंद :-) ... . . असा चाफा लहानपणापासून लागल्यापासून नाही तर कळायला आवडतो.पेशव्यांच पुणे आपल्याला आधी फार आवडायचं...खुणवायच.मी धडकले सदाशिव पेठेत..पेठेपासून टिळक रोड पर्यंत माझा सकाळी ७ आणि दुपारी ४ वाजता कामासाठी पायी वाट असायची.सकाळी सकाळी चिमण्या गणपतीच दर्शनाने सुरुवात व्हायची.(जुने काही आठवतेय का म्हणून map पाहतेय.) जातांना रस्त्यांनी अनेक हॉटेल,दुकान ,गणपतीची मारुतीची मन्दिरे लागायची.दुपारी ताक प्यायचे.तेव्हा सब्जा ,मसाला असे काही काही नसायचं.जवळच प्रसिद्ध सुजाता मस्तानी होती...कमी वेळा प्यायले आकर्षण होत,पण महाग होती. .त्या रस्त्यावरच एक शंकाराच मंदिर होत ,तिथ हे चाफ्याच झाड होत .. ऊंच ..फुलांचा सतत सडा पडायचा..हळूच फुलं उचलायची आजही ती सवय आहे...कोणत्याही फुलांकडे मी सहजच खेचली जाते. सप महाविद्यालय आवडायचं तेव्हा मुद्द्दाम त्या रोधून घरी जायचे.दुर्वांकुरला एकदा दोनदा गेल्याच आठवतेय ,विशेष काही वाटल नाही. हे अस स्थान,निर्देशक फार काही लक्षात राहत नाही.लक्षात राहतात ते प्रसंग आणि चांगली माणस.. पुण्यातली माणस लिहिते हळू हळू. :-)