Skip to main content

काडीमोड घेताना दुसरा नवरा व कुटुंबाची निवड

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी सोमवार, 23/11/2020 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/47886 सध्या नवीन नवरा शोधत आहे. स्थळे पाहत आहे. एकाने होकार दिला आहे. त्यानंतर सध्याच्या नवर्याला नारळ दिला. सध्या सामानाची बांधाबांध करत आहे . माझ्या आजपर्यंतच्या वैवाहिक जीवनात अगोदर होकार देऊन स्थळे शोधायचा प्रकार केला नाही ; पण भरपूर बायका असे करताना दिसल्या. कमी कालावधीत नववधू सेटल होईल अशा मुलीला पुरूष प्राधान्य देतात असे ऐकून आहे . लवकरात लवक्र लग्न करणे हा जास्त दागिने मिळवण्यचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही. आता डेटिंगसाठी भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नवर्याशी काडीमोड घेत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “दुसरा कुणी तयार झाला आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर डेट अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पत्रिका जमली आहे की नाही ते सांगत नाहीत, पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके होणार्या नवर्याला काय सांगावे ? नविन स्थळ येत आहे की नाही? एका मुलाच्या मामीने मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते. समजा, नवीन स्थळ आकर्षक वाटलेच तर होणार्या नवर्याच्या लोकाना काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय वराची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत २ बी एच के , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय लहान कुटुंबातील भरपूर काम , धुणी भांडी,गॅस गेला तर चुलीवर जेवण ह्यातुन नवर्याने सोडण्याची भीती हे ही अनुभवून झालेय . पूर्वी सतत नवरे बदललेले नाहीत पण बराच अनुभव गाठीशी आहे. नवरेही दागिने किती देणार ह्यापेक्षा तुम्हला माहेरून किती मिळाले ह्यावर आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?

वाचने 16157
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

इथूनपूढे मिसळपाववर काहीच लिहायचे नाही हे आता नक्की झाले , अर्थात त्यामुळे खूप नुकसान होणार नाहीच पण गट तट पाडून इथे कसा कंपू आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

In reply to by जेडी

जे डी भाऊ एन्जॉय करा हो. एखाद्या लेखाचे विडंबन येणे हे मिपाच्या हॉल ऑफ फेम मधे एन्ट्री मधे मिळाल्या सारखे आहे. लेख कविता यांचे विडंबन हे मिपावर हे चालतेच. त्यामुळे तर मिपा जिवंत आहे.

In reply to by जेडी

जेडीताई, एकाद्या धाग्याचे विडंबन होणे हा मिपाचा विशेष पुरस्कार समजला जातो ! मिपाचा असा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन & आणी पुढील वाटचालीस हसतहसत शुभेच्छा ! 😆

कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी देतो, पेन्शन काय मिळेल याची कम्पॅरिझन त्या त्या कंपनीच्या एच आर सोबत डिस्कस करत रहा. प्रोफेशनल एथिक्स ठेवायलाच हवेत

आयला जाम हसलो.. जेडीताई वाईट वाटून घेऊ नका.. प्रत्येक वेळेस विडंबन म्हणजे खिल्ली नसते.. खिळाडूपणाने घ्या असे सुचवेन. इथले प्रतिसाद बघा, त्यातला एकही प्रतिसाद जर तुमची खिल्ली उडवणारा आला तर जरूर परत न लिहायचा विचार करा.. नाहीतर विडंबनाचा आनंद घ्या!

In reply to by आनन्दा

असे फर्मास विडंबन 'एक अरसे बाद' वाचायला मिळाले. जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते. मिपावर बागडण्याचा मनसोक्त आनंद मिळवायचा असेल तर 'विडंबकाचा आयडी असावा ऑनलाइन' हे ब्रीदवाक्य जाणून असावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.
अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो. बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच. त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.

कोणत्याही नवऱ्याला होकार देण्याअगोदर त्याच्या याआधीच्या बायकांशी चर्चा जरूर करा.

In reply to by चलत मुसाफिर

हेच लिहायला आलेलो नोकरी असो किंवा छोकरी....अनुभव फार महत्वाचा असतो =))

माईसाहेबाना साष्टांग दंडवत ! इथे कदाचित बायको म्हणून राहण्यापेक्षा ष्टेपणी म्हणून राहण्याचे सुद्धा काही फायदे तोटे असतील तर तेही पाहावेत म्हणे !

माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून असे फर्मास विडंबन लिहून विरंगुळ्याचे चार क्षण आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आणि तुम्हाला त्यासाठी प्रेरित करणाऱ्या जेडी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏 जेडी ताईं वरती अनेक मान्यवरांनी लिहिल्याप्रमाणे एक विनोद म्हणूनच ह्या विडंबनाकडे पहा आणि आनंद घ्या अशी तुम्हाला आग्रहाची विनंती! आणि माईसाहेब तुम्हीपण तुमच्या प्रतिभेला न्याय देत खुमासदार लेखन करत रहा असा तुम्हाला विनंतीवजा आग्रह!

बर्‍याच दिवसांनी गंमत आली. माईंना (पहिल्यांदाच) दंडवत...!! बाकी नानांची काळजी वाटते. त्यांच्याशी जाता जाता भांडू नका. परतीचा मार्ग मोकळा ठेवा.

या भलत्याच माडर्न माईसाहेब निघाल्या. "आमच्या यांचे असे मत आहे " या पालुपदावरुन आमचा असा समज झाला होता की माइसाहेबांची आणि "यांची" साताजन्माची गाठ मारली गेली आहे, अगदी सरकारी नोकरी सारखी. पण कसचे काय? आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. लेखच नाही तर प्रतिसाद पण भारी... :)

In reply to by ताजे प्रेत

आहात ते कमी आहे का? तुमच्या चुरचुरू बोलणाऱ्या जिभेला डाग द्यायला पाहिजे!!

नवरा बदलून मिळेल अशी बिझनेस आयडिया लोकांच्या डोक्यात येवू शकते आणि तशी वेबसाईट भविष्यात चालू झाली तर आश्चर्य वाटून घेवू नका.

खुमासदार!! (प्रेरणेपेक्षा विडंबनावर जास्त प्रतिसाद आल्याने विडंबन कमालीचे यशस्वी)

ए माई तुझे हे विडंबन पाहून तू नवर्याला सोडण्याचा आणभाव घेतलेला दिसतोय ! फर्मास विडंबन व प्रतिसाद तर एक्सो एक भारी ! मस्त !