Skip to main content

१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/11/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे. इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्‍यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल. २. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत. मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे. दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्‍याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्‍याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच ! ३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा. आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते ! आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन ! ४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल. तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही ! हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे. ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल ! _________________________________________ हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्‍या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला. इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. काही भाग संपादित - मिपा व्यवस्थापन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 74075
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ नका.
म्हणजे तर्जनी आणि अंगठ्यात काही मिलिमिटरचे अंतर ठेवायचे असेच ना ?

In reply to by मराठी_माणूस

दोन्ही हातांच्या अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करायलाच हव्यात (पहिला फोटो पाहा), पण त्यांनी तयार झालेले गोलक एकमेकांपासून अस्पर्शित राहायला हवेत. या मागची थीम अशी आहे की या मुद्रेतून निर्विचारता आल्यानं सजगता वाढत जाते. गोलक एकमेकांना टेकले तर पुन्हा विचार सुरु होतील आणि इतर तीनही बोटं सरळ राहिली नाहीत तर झोप यायला लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

(पहिला फोटो पाहा) पाहीला , पण त्यात एकच हात दाखवला आहे. दोन्ही हातांचे गोलक कसे असावेत ते डोळ्यासमोर आणता येत नाहीय्ये

In reply to by संजय क्षीरसागर

हो , आत्ता तिकडे लक्ष गेले , पण तिथे चित्र दिसत नाही, तुम्ही सांगीतल्या प्रमाणे दुसर्‍या डीव्हाइस वर म्हणजे मोब. वर पाहीले तिथेही चित्र दिसत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

३. दोन्ही हाताची तीनही बोटं सहज सरळ राहातील असं बघा, आणि हे कळालं. पण सरळ राहतील म्हणजे कशी आणि कोणाला सरळ? पोटाला सरळ समांतर, तळवा आकाशाकडे --- की --- पोटाला तिरकी आणि हाताचे तळवे एकमेकांना क्रॉस करून छेदताहेत-तळवे आकाशाकडे असे? गोलक एकमेकांना दोन पद्धतीने स्पर्ष करू शकतात - एक म्हणजे एकमेकांना ग्रहणासारखे समांतर आणि एक म्हण्जे एकमेकांची टोके एकमेकांना स्पर्श करू शकतात. वरचे स्केच वरून पाहताना काढले आहे आणि हाताची तीनहीबोटे सरळ आहेत व एक तळवा दुसर्या तळव्यावर ठेवलेला आहे.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. तुम्ही पूर्ण माहिती न घेता भाष्य केलंय. तर ती नसलेली माहिती मी देतो. पहिली गोष्ट म्हणजे शिळा पडायची आजिबात काळजी नको. ती मच्छिंद्रनाथांनी स्वत:च्या योगसामर्थ्याने तोलून धरलेली होती. त्यांनी चौरंगीस तिच्याखाली बसवलं ते अनुसंधान पक्कं करायला. ही साधना स्वत:हून करता येण्याजोगी नाही. आपल्या आस्थेबद्दल आभार. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

याचे किती उघड अर्थ निघतात ते पाहा : १. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाच धोबीपछाड मारला आहे. २. सत्य चराचर व्यापून असून देखिल सिद्धत्त्वासाठी तुम्हाला असा अफाट मॅन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सत्य नाही. परिणामी या जन्मी तरी तुमचा चान्स हुकला आहे आता पुढच्या जन्मांची वाट पाहात राहा ! ३. कुठल्याही जन्मात असा सुपरमॅन तुम्हाला भेटला, तरी चौरंगीनाथांसारखं डेरींग करुन तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही या जन्म-मृत्यूच्या चक्रातच फिरत राहणार. तस्मात, आजपासूनच डेरींग वाढवायला सुरुवात करा. थोडक्यात, सध्याचं तुमचं डेरींग पाहता या जन्मी तरी तुम्ही एकदम छपरी आहात. ४. या अद्भूत चमत्काराची तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं ज्ञान चरचौघात प्रकट करायचं असेल तर अत्यंत विनयानं ही स्टोरी पुढच्यांना सांगा कारण विद्या विनयेन शोभते ! _________________________________________ गामाश्री, या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! श्रद्धेचा बागुलबुवा दाखवून सुशिक्षितांना सुद्धा किती हातोहात फसवता येतं याचं उत्तम प्रदर्शन तुम्ही यानिमित्तानं घडवून आणलंत. या आणि अशा अनेक उदाहरणंनी, ज्यांना पूर्वापार ग्रेट मानलं गेलंय त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, त्यांच्या पश्चात आध्यात्माची कशी वाट लावून ठेवली आहे आणि जनसामान्यांत नाहक, किती पराकोटीचा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय हे सांगणारा, या लेखमालेतला दुसरा भाग सादर करतांना मला झालेला आनंद किती रास्त होता याची कल्पना करा !

In reply to by गामा पैलवान

गापै, अतींद्रिय शक्तींचा गंध देखील ज्या माणसाला नाही त्याला अध्यात्म शिकवण्याचा व्यर्थ खटाटोप करू नका. या माणसाला अध्यात्म कशाशी खातात याची सुतराम कल्पना नाही, अतींद्रिय शक्तींचा काडीमात्र अनुभव नाही, अश्या माणसाशी बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे लक्ष्यात ठेवा. फक्त संक्षीना जाता जाता एक अनाहूत सल्ला देऊन जातो. जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर, आत्म परीक्षण करा, तुम्हाला जे गवसलय हे नक्कीच अध्यात्मातली विशेषतः हठयोगातली एक पायरी आहे, पण जे गवसलं आहे ते अंतिम सत्य नाहीये, कारण अंतिम सत्य मिळालेल्या लोकांच्या ठिकाणी दिसणारे एकही लक्षण तुमच्या ठिकाणी दिसून येत नाही. पण तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, तेव्हा प्रयत्न सुरू ठेवा, केव्हाना केव्हा तरी तुम्हाला सत्य गवसेल अशी शुभेच्छा देतो. यापुढे मी तुमच्या धाग्यावर प्रबोधन करायला म्हणून देखील येणार नाही.

In reply to by आनन्दा

बाय द वे, आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील. नक्की लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, मी यापूर्वी देखील काही अनुभव इथे लिहिले आहेत, त्यावर मला इतके छान प्रोत्साहन मिळाले आहे की आता मी या बाबतीत विरक्त झालो आहे. मला कोणालाही काही पटवून देण्यात रस नाही. कोणाला काही सांगावेसे वाटले तर सांगतो, पटणे न पटणे त्याच्या हातात. आता उपरोक्त सदस्याबद्दल बघा, ते स्वतःला लॉजिक चा बादशहा म्हणवतात, पण त्यांच्या लॉजिक मधल्या चुका काढून उघडे पडले की धागा वाचनमात्र होतो.. माणसाने आपल्या लॉगिकमध्ये चूक झाली तर ती खुल्या दिलाने मान्य करावी इतकीच अपेक्षा असते. ती स्वतःला पूर्ण करता येत नाही, इतरांची अक्कल काढायला मात्र हे सर्वत्र मोकळे.. इतके प्रोत्साहन असल्यावर आम्हाला काय कमी पडणार? तरी नशिबाने मी आडून आडून बोलत नाही, जे असेल ते थेट आणि संसदीय भाषेत मांडतो, तरीही इथल्या कोणाच्या चुका दळवल्या की दोष आमच्यावरच येतो, त्यामुळे आता इथे लिहायचे नाही असे ठरवलेले आहे.

In reply to by nanaba

या बाबतीतले माझे अनुभव आणि मते इथे मांडलेली आहेत. आणि मला याबाबत चर्चा करण्यात रस का नाही हे देखील मी तिथेच स्पष्ट केले आहे. कोठेतरी अतिच गैरसमज आले तर मगच मी लिहितो https://misalpav.com/comment/770627#comment-770627

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील ?
हा बघा तुमचाच अत्यंत मार्मिक प्रतिसाद ! (तो वाचून सकाळची सुरुवात प्रसन्न झाली आणि इतरांनाही मजा यावी म्हणून इथे देतो) : मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही

In reply to by गामा पैलवान

त्यांनी पूर्वी माझ्याबाबतीत, नाहक इतका हैदोस घातला आहे की त्यांच्यासाठी माझी दारं कायमची बंद झाली आहेत. थोडा फार का होईना तार्किक विचार असणारे इथे जे सदस्य आहेत त्यात तुम्ही एक आहात असं (तुमच्याशी आजपर्यंत झालेल्या संवादामुळे) मी मानतो. डोक्यावर शिळा तरंगवता येणं या भंपक मान्यतेला अतींद्रिय शक्ती की आणखी काय वाट्टेल ते म्हणा, तो फक्त मानणार्‍याचा त्याचूपणा आहे. शिळा तरंगवता येते तर बोईंग उडवता यायला काय हरकत आहे ? कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ? ऑइल क्रायसिसचा जागतिक प्रश्न एका झटक्यात संपेल ! अडाणी पण कावेबाज भक्तांनी स्वतःची दुकानं सुरु रहावीत म्हणून लावलेल्या या स्टोर्‍या आहेत इतकी साधी गोष्ट सुशिक्षितांना समजत नसेल तर अशिक्षितांचे हाल तर विचारायलाच नको. त्यामुळे दुसर्‍या लेखावरच्या प्रतिसादात मी म्हटलंय की इतक्या निर्बुद्ध मानसिकतेच्या खोलवर रुजलेल्या धारणांना माझ्या लेखनाचा शून्य उपयोग आहे. त्यांनी शिळा तरंगवणार्‍याची वाट पहावी आणि तरंगती शिळा डोक्यावर घेऊन अनुसंधान साधावं !

तर्जन्याची आयडीया भारी होती, मनातले विचार क्षणभर पॉज झाले खरे... बाकी चालू ठेवा. -दिलीप बिरुटे

समस्त मिपाकरांना कळवण्यात येते की त्यांनी सिद्ध महाराजांना डीवचू अन्यथा त्यांच्यासाठी सिद्ध महाराजांची दारं कायमची बंद होतील आणि मग त्या पामरांचा (सिद्ध महाराजांच्या अमृतवाणीत सांगायचे तर त्याचू आणि छपरी लोकांचा) उद्धार होणार नाही.

इथे सिद्ध महाराजांची दारं उघडायला कोणाला उचकी लागली आहे? आपणच हुशार आणि बाकी सगळे (सिद्ध पुरुष, संत, महंत, बुद्ध इत्यादी इत्यादी) महा मूर्ख असा आव आणणारा भंपक माणूस काय कुणाचा उद्धार करणार आहे?

Sorry for English. I couldn't resist sharing and my mobile is not allowing marathi typing. I will try to retype in marathi from my laptop later. Experience: I didnt feel much with this except momentary feeling of trance. I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe. Husband said he didn't feel anything. Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness. My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body". This was totally unexpected. And i found this damn interesting so sharing here. Thanks to Sanjay Kshirsagar for sharing this. I will try to see if i can feel what my 7 year old felt. :)

In reply to by nanaba

मजा म्हणून इंग्रजीतून लिहितो : The Meditation is absolutely Scientific. It is the Essence of My Understanding of Human Psychology. It is an Ultimate combination of Spirituality & Human Psychology. It Will work Instantly for Anyone, Anytime, Anywhere.
1. I didn't feel much with this except momentary feeling of trance.
That Exactly is Thoughtlessness !
2. I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe.
That is the Way to Test Any Method Scientifically, Great !
3. Husband said he didn't feel anything.
This Has Made me curious ! Please Make the Mudra exactly as shown in the Photos and Ask Him To Look Straight. If the Neck Tilts (of course to the left) the Thought Process continues.
4. Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness.
That is Exactly What Buddha Means By Shunyata : Emptiness !
6. My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body". This was totally unexpected.
Yes, Because the Entire Existence is Floating in an Infinite Emptiness. Now, Make Her a Dancer ! She Will Make Havoc ! She Will be a Dancer which the World Has Never Seen Before !
7. And i found this damn interesting so sharing here
I am Thrilled. You Stunned & Silenced Everyone Here.

In reply to by nanaba

माझं इंग्रजी फार कच्चं आहे. त्यामुळे प्रतिसाद मराठीत देतोय (दुसरा पर्याय नाहि ;) ) शरीराची एक विशिष्ट रचना करुन त्याचा अनुभव घेणे, तो शेअर करणे, चर्चा करणे वगैरे गोष्टी चालत राहातात. मोठी माणसं त्यातलं कभि खुषी कभि गम बघत असतात, ते ही ठीक. तुम्ही तुमच्या चिमुकलीचा अनुभव सांगीतलात म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. शरीराच्या काहि रचना करुन त्यातलं सुख अनुभव करण्यात काहि हरकत नाहि. काहि वेळेस त्यात थ्रील वाटणं, त्याची मजा घेणं हे देखील ठीक. पण शारीरात मॅनिप्युलेश करुन, मग ते साधं मांडी घालुन बसणं असो किंवा एखाद्या स्प्रींग प्रमाणे शरीराला पिळणे असो, त्यातले येणारे अनुभव हे शरीर जन्य आणि शरीर कन्स्युम्ड असतात याचं भान ठेवणं आवष्यक असतं. इथे चर्चीला जाणार्‍या प्रोसेसच उदाहरण घेऊया. कुठल्याही भौतीक वस्तुला बेलेन्समधे ठेवण्यात त्या वस्तुच्या सेन्ण्टर ऑफ ग्रॅविटीचे फार मोठे योगदान असते. ढोबळ मानाने बघितल्यास आपल्या शरीरात अस्थि आणि मसल वापरुन हि यंत्रणा राबवली जाते. शरीर उभं असताना, बसलं असताना, झोपल्या अवस्थेत किंवा इतर कुठल्याही अवस्थेत, आपली हाडं ट्रस प्रमाणे काम करुन ( ट्रस ... इंजीनियरींजच्या विद्यार्त्यांचा 'आवडीचा' विषय ;) ) वजन विभाजन करतात. मसल्स त्या अवस्थेला आवषयक ते बळ पुरवतात. शरीराची ठेवण आणि अवस्था या नुसार मेंदु हे सगळं कंट्रोल करत असतं. आपल्या डोक्याचं आकारमान जरि तुलनेने कमि असलं तरी त्याचं वजन बरच असतं. शरीराचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मानेच्या वरच्या भागाचं केल्क्युलेशन त्यानुसार होतं. या सगळ्या झांगडगुत्याला जर काहि स्टिम्युलस मिळालं तर वेगवेगेळे अनुभव सुरु होतात. एखादी ध्यानमुद्रा साधणे, स्वतःभोवती गोल फिरणे, आकाशपाळण्यात बसणे, या सगळ्यांमधे अल्टीमेटली शरीराच्या गुरुत्वीय केंद्राची चलबिचल सांभाळण्यात मेदु गुंतला असतो, त्याचेच अनुभव येत असतात. काहि अनुभव फार प्लेसंट असतात, काहि थ्रिलींग वाटतात, कहि एकदम नकोसे असतात. व्हर्टीगोचा प्रोब्लेम असो, किंवा अगदी नशापाणि केल्याने येणारी झिंग असो. या सर्व गोष्टी शारीरीक आहेत, त्यात अशरीरी असं काहि नाहि. हि सर्व बडबड या साठी, कि शरीराची मजा घेताना त्यामागची वस्तुस्थीती लक्शात न घेता त्याला भलतेचं लेबलं लावुन आपल्या मुलीच्या मनात चुकीच्या कन्सेप्टची पेरणी करु म्हणुन हा सावधतेचा इशारा. तसं बघितलं तर हे सगळं वयापरत्वे तिला कळेलच. पण प्रश्न एका कोवळ्या मनात चुकीच्या धारणांचं बिजारोपण होण्याचा दिसला म्हणुन टंकलं. बाकि आपण सुज्ञ आहात.

In reply to by अर्धवटराव

तुम्ही लिहिलेलं अत्यंत योग्य आहे. तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही. इन फॅक्ट ते सारखं सारखं करत बसायची जरुरी नाही हे ही सांगितलय. आणि त्यानंतर तिच्या इतर उचापतीत तिला आठवणही झालेली नाही. पण तुम्ही लिहिलेलं अगदीच योग्य आहे, पटलेलं आ हे. ती इतरांबरोबर असल्याने तिने ऐकले आणि ट्राय केले इतकेच. मला स्वतः करताही - ह्याबाबतीत वेगळं असं वाटतं की संक्षि म्हणतात ते खरे असेल तरी आपली मनाची, शरीराची तयारी नसताना केवळ हॅक सापडला म्हणून एखादी गोष्ट करत राहू नये. त्याचे काय दुष्परिणाम असू शकेल ते आपल्याला माहित नाहिये. हॅक च्या मागे जाण्यापेक्षा उपासना करून ती गोष्ट मिळवावी. आणि वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ती फायनल स्टेज असेल असेही माहित नाही आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती अगदीच शारीर क्रियाही असू शकते. मला इथल्या वादात पडायचे नसल्याने मी आधी हे सगळे लिहिले नव्हते. पण मला तिलाही न सांगता तोच अनुभव आला ह्याची मजा नक्कीच वाटली आहे.

In reply to by nanaba

तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे तिला इथली कारण मिमांसा, चर्चा वगैरे माहित नाहियेत. ते अंतराळ, शून्य वगैरे काहीच माहित नाही.

In reply to by nanaba

राहिला मुद्दा मनाची अविरत बडबड थांबवण्याचा... मनातले विचार थांबण्यासाठी कुठली साधना करणं हेच मुळी मानसीक रोगाचं लक्षण आहे. आणि तसली काहि साधनेला आध्यात्माच्या पेकेजमधे विकणं हि तर शुद्ध फसवणुक आहे - बुवाबाजी आहे. हे म्हणजे कसं, कि पहिले खा-खा खायचं.. आणि मग शरीरातली अनावष्यक चरबी कमि करायला जीम मधे घाम गाळायचा. आणि या मूर्खपणाला स्वतःच सेलीब्रेट वगैरे करायचं. त्यापेक्षा पोट आणि एकुणच शरीर जसं डिमांड करतं तसा आहार घेतला कि अनावष्यक चरबी मुळी जमा होणारच नाहि. तसच मनाचं आहे. पहिले सो कॉल्ड स्वच्छंद-फंद करायचे. मग मनाला गप्प करायला साधनेची टुम काढायची. त्यापेक्षा विवेकाने, प्रामाणीकपणाची वागणुक ठेवली तर मन करपणारच नाहि. मग अनावष्यक विचार थांबवणे वगैरेची भानगडच नाहि. पण नाहि. पहिले उचापती करायच्या. मग त्यावर साधनेचं मलम लावायचं. त्यापेक्षा किमान स्वतःशी प्रामाणीक राहिलं तर मन गरज असेल तेंव्हा धोक्याची जाणीव करुन देऊन प्राण रक्षण करेल, अन्यथा आनंदाने बागडत राहिल. इट्स अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट.

In reply to by nanaba

१. मला स्वतः करताही - ह्याबाबतीत वेगळं असं वाटतं की संक्षि म्हणतात ते खरे असेल तरी आपली मनाची, शरीराची तयारी नसताना केवळ हॅक सापडला म्हणून एखादी गोष्ट करत राहू नये.त्याचे काय दुष्परिणाम असू शकेल ते आपल्याला माहित नाहिये
आपल्या प्रतिसादातून मानवी मनाचे मनोज्ञ दर्शन घडते असे नमूद करतो. जे कष्टसाध्य ते योग्य आणि जे सहज ते टाकावू असा एक पारंपारिक गैरसमज आहे. यावरुन मुल्ला नसरुद्दिनचा एक विनोद स्मरतो, तो असा: मुल्ला रस्त्यानं लंगडत चाललेला असतो, वेदना त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत असते. मागून येणारा त्याचा मित्र ते दृश्य पाहून आपुलकीनं विचारतो "मुल्ला क्या तकलीफ़ है ?" त्यावर मुल्ला म्हणतो "तकलीफ़ कुछ भी नही बस एक जूता दस साईज का है और दुसरा आठ का" "अगर तुम्हे पता ही है तो दुकानसे ठीक साईजके जूते क्यों नही लिए ?" " ये तो मैं हमेशासे करता हूं . दुकानदार मुझे दस साईजकाही जूता देता है. लेकिन दस साईज के साथ मैं एक आठ का भी जूता खरिदता हूं और मिस-मॅच करके पहेनता हूं !" " ये तो कमाल हो गया ! इसमे क्या अक्लमंदी कै ?" "मियां, अक्लमंदीकी छोडो, घर पहुंचते ही जब जूते उतारता हूं तो जो सुकून आता है उसका मजा ही कुछ और है !" आपण जरुर कष्टसाध्य उपासना करावी पण अधूनमधून हा ज्योक ही आठवावा असे सुचवेन.
२. पण मला तिलाही न सांगता तोच अनुभव आला ह्याची मजा नक्कीच वाटली आहे.
अविरत चाललेली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यही उत्तम राहतं असा आमचा अनुभव आहे. हे आपणास गैर वाटत असल्यास तसे कळवावे. शिवाय पुरेशी संपन्नता आल्यावरही शांती नाही यावर ध्यान करण्याची पद्धत जगात सर्वत्र चाललेली दिसते. आपल्या कन्येला ही आनंदाचा अनुभव आला आणि आपल्याला त्याचा धसका वाटतो हे मात्र आमच्या आकलनापलिकडे आहे हे नम्रपणे नमूद करतो. प्रत्यक्ष आपणासही शांत वाटल्याचे आपण लिहिले आहे पण आपणास आता ते इतके सोपे कसे असेल याचा अचंभा वाटत आहे. त्यावर आम्ही असे नमूद करतो की आनंद आणि शांतता हे बाय डिफॉल्ट आपले स्वरुप आहे आणि स्वरुपाशी कनेक्ट होण्यात कोणताही धोका नाही. ओशोंचे आम्हास अशासाठी अप्रूप वाटले की स्वरुपोलब्धी ही सामान्यांनाही शक्य आहे; त्यासाठी सायासाची (संसार त्याग वगैरे) गरज नाही असा दावा आणि भरोसा देऊन त्यांनी प्रस्थापित आध्यात्माला शह दिला. साधरण दीड ते दोन लाख पुस्तकांचे समग्र वाचन करुन त्यांनी स्वतःच्या ध्यानप्रणाली विकसित केल्या. आम्ही ओशोंचा समग्र अभ्यास करुन एकच सोपी मेथड शोधली आहे असे (पुन्हा नम्रपणे) नमूद करतो

In reply to by संजय क्षीरसागर

ठरवलं आहे त्यांच्या विषयीचा आमचा अनुभव असा की काही वेळानंतर आपण प्रतिसादात वर काय लिहिलं आहे ते खाली येईपर्यंत ते विसरलेले असतात, असा आमचा अनुभव आहे. आमच्या आकलनानुसार ही मनाची योग्य स्थिती नव्हे त्यामुळे आम्ही त्यांना प्रतिसाद देणे थांबवले आहे. आपणासही खातरजमा करुन घ्यायची असेल तर त्यांच्याकडून लेखनाच्या लिंक्स मागवून ते लेख अभ्यासावे (विषेशतः मानसशास्त्रिय) असे सुचवेन आणि त्यातून आपल्या हाती काही लागल्यावर ते आम्हास ही कळवलेत तर बरे होईल. जगातल्या सर्व ध्यानप्रणाली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवण्याच्या प्रक्रिया आहेत कारण सर्व ज्ञानी लोकांनी असा निष्कर्श काढला आहे की अविरत चालू असलेली मेंटल अ‍ॅक्टीविटी हेच तणावाचं एकमेव कारण आहे. वेड लागलेला माणूस स्वतःशी बडबडतो हे आपण पाहिलेच असेल. त्याचा अर्थ असा की मनाची अ‍ॅक्टीविटी संपूर्णपणे आवाक्या बाहेर गेली आहे. मनाचा त्रास होण्यासाठी केवळ सदाचार उपयोगी ठरत नाही हे आतापर्यंतच्या जगण्यातून आपल्याही लक्षात आले असावे. त्यामुळे जसे पायाचा उपयोग नसतांना पाय हालवत राहणे उचित नाही तद्वत गरज नसतांना मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं श्रेयस आहे. याउप्पर आम्ही काय लिहावे ?

In reply to by संजय क्षीरसागर

Mazee awastha atta hya kshani pula nchya asami sarakhi zaliye. Tyanchehi pataley, tumachehi patatey. Lol. Yuktivad patatoy, pan something is missing ase atun vatatey.. Tumachya muddyanvar nakki punha vichar Karen. Lekichya babteet matra ardhavatravancha salla manaNar. Swataha karata punarvichar Karen.

In reply to by nanaba

होईल यात आम्हाला ही शंका नाही कारण अवघड ते श्रेयस हा सार्वत्रिक गैरसमज आहे. आमच्या अल्प मतीनुसार मात्र कुठलीही अवघड गोष्ट सोपी करणं याला आम्ही दाद देत आलो आहोत, बहुदा त्यामुळे आमचे जीवन सोपे झाले असावे असे वाटते. २. आपणास प्रतिसाद देतांना उत्तररात्र झाली असल्याने, आता झोपलो नाही तर उठायची वेळ होईल असा सूज्ञ विचार करुन आम्ही आवरते घेतले. तरी आपला अनुभव आमच्यासाठी इतका प्रेरणादायी होता की परवाच आमच्या मातोश्रींना तो विदित केला. त्याही गेली अनेक वर्षे सोहम नामक साधना मोठ्या श्रद्धेने करत. यात आलेला श्वास, गेलेला श्वास, त्याबरोबर सोहम उच्चारण आणि तिसर्‍या डोळ्यावर अवधान इतका सायास होता. अशी साधना करुन त्यांना झालेला एकमेव फायदा म्हणजे दिवसा झोप लागणे असे आमचे निरिक्षण झाले. त्यामुळे त्यांना अपराधभाव दाटून येत असावा असे आम्हास वाटते कारण आपली साधना कमी पडते त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होत नाही असे त्यांना राहून राहून वाटे. आम्ही त्यांच्या साधनेच्या डायवर्शनची जोखिम पत्करुन त्यांना आमची साधना पुन्हा एकदा करुन पाहा असे सुचवले कारण प्रस्थापिताविरुद्ध काही सोपे आणि सहज सांगणे म्हणजे रोष ओढवून घेणे आहे हे एव्हाना आम्हाला कळून चुकले आहे. आमची साधना करता क्षणी त्यांना प्रचिती आली (जी पूर्वीही आली होती पण आम्ही कुणा दिग्गजाचे उत्तराधिकारी नाही आणि कुणालाही दिक्षा वगैरे देऊन नसते बालंट गळ्यात घेत नाही कारण सर्व सिद्धच आहेत यावर आम्ही ठाम आहोत आणि `ज्याचे ओझे त्यानी उचलावे 'असा आमचा बालपणीपासूनचा शिरस्ता आहे) ; हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी सोहम साधनेचा रेटा मारणे चालूच ठेवले होते. परवापासून मात्र मातोश्रींनी सोहम साधनेला फाटा देऊन आमची साधना चालू केली आहे हे नम्रपणे नमूद करतो. देहात कुणीही नाही या आमच्या वस्तुस्थिती निदर्शक विधानाची त्यांना "असे बुद्ध म्हणतो " अशी पुस्ती जोडून कल्पना दिली (कारण `पुलंनी म्हटलंय' असं सांगितल्याशिवाय लोक काही ऐकायलाच तयार होत नाहीत, तीच परिस्थिती आध्यात्माची आहे). तर सांगायचे तात्पर्य असे की ' देहात कुणीही नाही याची प्रचिती येईल' या आमच्या विधानाने त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हे हेरले की 'आमच्या साधनेनी त्यांची मृत्यूची भीती शून्य होईल' कारण मरायला देहात कुणीच नाही; उतार वयात यापरता दिलासा तो काय ? ते एक तर आहेच पण खरा दिलासा आम्हाला मिळाला हे इथे नम्रपणे नमूद करतो कारण आमच्या मातोश्रींनी आम्हाला दाखवून दिले की साधनेत कोणताही धोका नाही. शिवाय त्यांच्या चालण्यातही सध्या उत्साह जाणवतो, आमच्या अल्प मतीला असे वाटते की देहात कुणीही नाही या आमच्या विधानाने (साधनेमुळे यथावकाश तो त्यांचाही अनुभव होईल) त्या आनंदात असाव्यात. तरीही आनंदाचे कारण विचारुन त्याचा विरस करु नये हे एक आम्हाला बालपणी समजले होते, अर्थात तारुण्यात मात्र जगातल्या सर्व अध्यात्माचा सर्वांगिण अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की आनंद हा आपला स्वभावच आहे त्यामुळे निष्कारण आनंदात राहणे हे उचितच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

महाराज या प्रतिसादातील स्वतःला अग्रलेखांचा बादशहा म्हणवून घेणाऱ्या नवा काळ दैनिकाची भाषा लेख लिहिताना तुम्ही वापरली तरी चालेल. स्वतःचा उदो उदो करण्याच्या सवयी मुळे तुमचे लेख वाचकांना आवडत नाहीत असे आमचे निरीक्षण आहे.

In reply to by nanaba

तुमच्या कन्फ्युजनचं कारण कदाचीत 'यांचा मार्ग विरुद्ध त्यांचा मार्ग' या विचारात आहे. हे सर्वप्रथम मनातुन काढुन टाका. प्रश्न मार्गाचा नसुन आपल्याला गरज कशाची जाणवते याचा आहे. तसंही मी काहि मार्ग वगैरे सांगितलेला नाहि. शरीर असो किंवा मन.. त्याचं अन्न काय असावं, काय सेवन केल्यास संपूर्ण वाढ आणि विकास होईल, स्वभावतःच त्यांची आनंदवृत्ती कशा विकसीत होतील.. हे सर्व निसर्गधर्माने ऑटोमॅटीक होत असतं. तो विकास तसा झाला नाहि आणि या गोष्टी आपल्या परिपक्व अवस्थेला पोचल्या नाहित तर मग प्रॉब्लेम सुरु होतात, आणि औषध घ्यावे लागते. आता काहि लोकांना त्या औषधाचच कौतुक असतं... पण निसर्ग स्वतःच सर्वोत्तम औषध आहे. त्याने नेमुन दिलेली लाईफ सायकल डोळसपणे बघा. आनंदात निरामय जगण्याचा तोच सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या मुलीला कशाप्रकारे डेव्हलप करायला बघताय? एक पॉलीसी म्हणजे संपूर्ण कंट्रोल. गरज वाटेल तेंव्हा तिने सांगेल ते काम करावं. अन्यथा गो फ्रीज. इथे परमोच्च कंट्रोल गाठावा लागेल. इतका कि प्रत्येक क्षणी आपण कंट्रोल होतोय हे देखील जाणवु नये. दुसरी पॉलीसी म्हणजे तिने स्वभावतःच परिपक्व व्हावं. मग तिला खुल्ला फ्री छोड दो... आपला विवेक वापरुन ति निर्णय घेईल. आणि स्वभावतःच आनंदात जगेल... या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या उक्तीप्रमाणे. इथे परमोच्च मॅच्युरिटी गाठावी लागेल. मनाचं देखील तेच आहे. मन कंट्रोल्ड हवय कि मॅच्युअर्ड. मनाला गुलाम करयचय कि मित्र. मन गुलाम होणं अशक्य आहे. मन मित्र होणं हि त्याची नैसर्गीक परिपक्व अवस्था आहे. सर्वात महत्वाचं... यात अध्यात्म वगैरे काहि नाहि. साधं सरळ मानसशास्त्र आहे, जैवीक प्रोसेस आहे.

In reply to by अर्धवटराव

हा धागा वाचल्यापासून मला जो प्रश्न पडला होता त्याचं हा प्रतिसाद नेमकं उत्तर आहे. लेखक ज्याला आपण लावलेला अध्यात्मातील अभूतपूर्व शोध समजत आहेत ती केवळ एक शारीरिक क्रिया आहे, बोटं गुंफा, गोलक बनवा आणि जबरदस्तीने त्यावर लक्ष केंद्रीत करा. नैसर्गिकता नाहीच त्यात. असलं विदेहत्व काय कामाचं. नजर हटली, बाजार उठला. :)
मनाचं देखील तेच आहे. मन कंट्रोल्ड हवय कि मॅच्युअर्ड. मनाला गुलाम करयचय कि मित्र. मन गुलाम होणं अशक्य आहे. मन मित्र होणं हि त्याची नैसर्गीक परिपक्व अवस्था आहे.
किती सुरेख वर्णन केलंय प्रगल्भतेचं. __/\__

In reply to by सतिश गावडे

गवि, तुम्ही संक्षीना नीट समजून घेत नाही आहात. संक्षीना असे म्हणायचे आहे की ही बोटे गुंफने म्हणजे ट्रिगर आहे, त्याने एकदा तुम्ही सत्य आहात, किंवा देह नाहीत हा अनुभव घेतलात की ती धारणा हळूहळू स्थिर होत जाईल, आणि मग तुम्ही आपोआपच कर्ता भावनेतून मुक्त व्हाल. तत्वज्ञान म्हणून यात काहीच चूक नाही, कदाचित कोणाला अनुभव येतही असेल, पण 1. मला नाही आला. 2. जे अनुभव कोणतेतरी शारीरिक बिंदू ट्रिगर होऊन मिळतात त्यांची मर्यादा इंद्रियजन्य असते, त्यामुळे ते अनुभव कालातीत नसतात. अध्यात्माचा मुख्य उपयोग तुमचे सत्य स्वरूप कळणे, त्यामध्ये केवळ देहभान विसरणे किंवा निर्विचार होणे अपेक्षित नसते, किंवा मी देह नाही ही या अनुभवाची पहिली पायरी आहे. अंतिमतः तुमच्या जाणिवा रुंदावत जाऊन तुम्ही विश्वाशी तदाकार होणे अपेक्षित असते. संक्षी त्या पातळीवर गेले आहेत का ते माहीत नाही, पण त्या पातळीवर गेलेल्या माणसासाठी सत्य ही सिद्ध करायची गोष्ट राहत नाही, साधना हा केवळ मार्ग राहतो, साध्य राहत नाही, आणि विश्वाशी तदाकार झाल्यामुळे सगळ्या विश्वाची स्पंदने अनुभवता येतात, आणि अशी तदाकारता प्राप्त झालेला माणूस आपोआपच सगळ्या विकारांपासून मुक्त होतो. हे लक्षण मला अजूनतरी दिसलेले नाही, पण तरीही मी हे लेखमाला वाचत आहे, कारण कदाचित संक्षीना काय सांगायचे आहे हे कदाचित पुढच्या भागात स्पष्ट होईल. केवळ आकांडतांडव करतात, वाद घालतात, अक्कल काढतात म्हणून ते भोंदू आहेत असे मी मुळीच म्हणणार नाही. संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की, पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे, ते येणारा कालच ठरवेल.

In reply to by आनन्दा

2. जे अनुभव कोणतेतरी शारीरिक बिंदू ट्रिगर होऊन मिळतात त्यांची मर्यादा इंद्रियजन्य असते, त्यामुळे ते अनुभव कालातीत नसतात.
माझा हाच मुद्दा होता. जास्त टंकायचा कंटाळा असल्याने प्रतिसाद थोडक्यात आटपला होता :) तुमच्या बाकीच्या मुद्द्यांशी सहमत आहे. जमल्यास कधीतरी प्रत्यक्ष चर्चा करु. मी तुमच्या शेजारीच राहतो, मात्र अजून भेटण्याचा योग आलेला नाही. :) तुम्ही बहूतेक नजरचूकीने हा प्रतिसाद गविंना उद्देशून लिहीला आहे. गविंच्या समोर मी एक सामान्य सदस्य आहे. :)

In reply to by सतिश गावडे

नामदेवाने भक्तीभावाने पांडुरंगाला नैवेद्य दाखवला, आणि श्रीहरी प्रत्यक्ष जेवला . म्हणुन नामदेव अधिकारवाणीने आजन्म भक्तीमार्गाचा प्रसार करत राहिला. त्याने चुकुनही 'नैवेद्य दाखवणे' हि भक्ती साध्य करण्याची 'प्रोसेस' आहे असा दावा केला नाहि. किंबहुना खरच भक्ती साध्य झाली असेल तर पांडुरंग केवळ नैवेद्य खाणार नाहि तर तुमच्या घरी येऊन पाटावर बसुन जेवेल हि भक्तीमार्गीयांची अनुभुती सांगितली गेली. चमनदेवाने केपिलरी अ‍ॅक्शनने गणपतीच्या मूर्तीला दुध पाजले. त्या अनुभवाने प्रचंड उल्हासीत होऊन आपणही भक्तीसिद्ध झालो आहो असा त्याने स्वतःचाच खरा-खोटा समज करुन घेतला. नामदेवासारख्या एकट्या-दुकट्याने देवाला जेऊ घातल्याचा अनुभव सांगितला. पण देवाला जेऊ घालण्याची सर्वांना, सर्वकालीन, आणि तात्काळ परिणाम दाखवणारी पद्धत कोणलाच जमली नाहि, अगदी नामदेवाला देखील. आपण प्रचंड बुद्धीत्तेचं प्रदर्शन करत इतकी सोपी पद्धत विकसीत करुन जगाला उपकृत केल्याचा भाव चमनदेवाच्या मनात दाटुन आला. अशा तर्‍हेने चमनदेव 'सिद्ध' झाला. पण आता आपलं सिद्धत्व इतरांकडुन पटवुन घ्यायची तडफड त्याच्या मनाला लागली. मग त्याने मिडीयावर धिंगाणा घालायला सुरुवात केली. विठ्ठलाने नामदेवाचा नैवेद्य ग्रहण करणं हा त्याच्या भक्ती अवस्थेचा परिपाक आहे. चमनदेवाचे गणपतीला दुध पाजणं हि एक भौतीक क्रीया आहे. इति नामदेव - चमनदेव फरक स्पष्टीकरण कमेण्ट संपूर्ण. अवांतरः हे केवळ एक रुपक आहे. त्याच्या आशयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष्य करुन, देव, भक्ती वगैरे कशा फोल आहेत असे फटाके वाजणं आता सुरु होईल बहुतेक ;)

In reply to by आनन्दा

संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की, पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे, ते येणारा कालच ठरवेल.
ह्यावर आता फिन्गर्स क्रॉस्ड म्हणायचीही सोय राहीली नाही.!

In reply to by आनन्दा

संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की,
सहमत.
पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे,
असहमत. हे कारण होऊ शकत नाही. तर हा कारणाचा परिणाम आहे. कारण नव्हे. कारण असे आहे की, ते जिथे पोहोचले आहेत, तो रस्त्यावरील मैलाचा दगड आहे. तो दगड सुचवतोय की रस्ता बरोबर आहे. त्याच बरोबर तो दगड असंही सुचवतोय की, रस्ता अजून संपलेला नाही. वाट अजून बरीच शिल्लक आहे. आत्ताशी फक्त चारी मुक्तिचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया झाली आहे. आता खरी वाटचाल सुरू होणार आहे. पण त्यांना वाटतंय की ते मुक्कामी पोहोचले आहेत. “देवाचिया द्वारी उभा क्षणभरी” असं जे माऊली म्हणतात, त्यातला हा जो “क्षण” आहे, तो क्षण ते अनुभवू शकले आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. पश्यन्तीच्या पलिकडे काहीकाळ तरी जाता येणे हे हजारोंमध्ये एकालाच जमते. कृपेशिवाय शक्य नसते. भले त्यांना त्याची जाणीव नसेल. पण जिथे धूर असतो, तिथे अग्नी नसेल असे कसे बरे होऊ शकेल? म्हणूनच त्यांच्या बाबतीत मी नेहमी संयमीत भाषेत बोलतो व लिहितो. त्यांना जो शांतीचा अनुभव आलाय, तिथूनच त्यांना पुढच्या प्रवासाची दिशा मिळो या उद्देशाने म्हणत असतो. ॐ शांती ॐ खर तर अध्यात्मिक प्रवासात कोण कुठे आहे याचे तर्क करू नये असे म्हणतात. (साधू होऊन साधू ओळखावा असं म्हणतात.) त्यांना ज्या स्थितीचा अनुभव आहे, तो मला आहे की नाही, हे मी एकदा मनोगतावर १० वर्षापूर्वी सांगितले होते. त्यावेळेस ते सांगणे ही माझी जरा चूकच झाली. पण त्याच अनुषंगाने मी आजही लिहितोय. याला कारण एकच. आनंदा तुमचे विचार. एकदम वेगळेपण लक्षात आल्याने मला राहवले नाही, आणि लेखमाला संपेपर्यंत थांबायचे विसरून गेलो. आनंदराव, तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा. 🙏

ध्यान या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या, अष्टावक्र या सांख्ययोगातल्या दिग्गजानं त्याच्या संहितेत अशी केली आहे : अनावधानस्य सर्वत्र ! जन्मतः आणि नंतर साधारण एक वर्षापर्यंत मुलाची जाणीव अनावधानस्य सर्वत्र अशी असते, पण नंतर मुलाला फोकसिंग करायला शिकवलं जातं. कारण कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी जाणीवेचा रोख (अवधान) त्या गोष्टीकडे ओरियंट होणं आवश्यक असतं. पुढेपुढे ही सवय इतकी भिनते की त्याला अनावधानात राहणं अशक्य होतं. इतर सजीव मात्र सहजपणे, गरज नसेल तेंव्हा अनावधानात असतात. हे अनावधानच खरं रिलॅक्सेशन आहे कारण ती जाणीवेची मूळ स्थिती आहे (The Default State of Consciousness). पुढेपुढे तर हा अवधानाचा कहर इतका वाढतो की गरज नसली तरी, व्यक्तीच्या अवधानाचा रोख सतत मेंटल अ‍ॅक्टीविटीकडे लागून राहतो. या अवधानामुळे असा लफडा होतो की मेंटल अ‍ॅक्टीविटी अविरत चालू राहते. अगदी झोपेत सुद्धा केवळ रात्री २ ते ४ च्या दरम्यान केंव्हा तरी ती आपोआप थांबते (सुषुप्ती) आणि केवळ त्यावेळी शरीर आणि मेंदू संपूर्णपणे रिलॅक्स होतो. माझी ध्यानपद्धती जागेपणी मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवते, भर दिवसा तुम्हाला सुषुप्तीची मजा घेता येते ! त्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशन येतं. जाणीव पुन्हा तिच्या डिफॉल्ट स्टेटला येते. लहान मुल ज्या अकारण आनंदात असतं ती स्थिती तुम्ही अनुभवता आणि याचं कारण आहे : अनावधानस्य सर्वत्र ! अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे. _______________________________________ डोक्यावर तरंगती शिळा घेऊन जीवाच्या धसक्यानं एकाग्रता साधणं हा शुद्ध निर्बुद्धपणा आहे कारण एकाग्रता हे कशावर तरी अवधान साधणं आहे आणि अवधान हेच टेंशनच मूळ कारण आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे. मी भाग दोन वर तुम्हाला विनोदी लेखक म्हटलं आहे आणि लेखाना विनोदी लेख ते उगाच नाही. लेखनाची उबळ आली की तुम्ही इथे येऊन काही तरी लिहीता आणि वर हे ही रेमटून देता की तुम्हाला जे कळलंय ते याआधी कुठल्याच ज्ञानी पुरुषाला कळले नव्हते. आणि आता ते इथे एका लेखात प्रतिसादात खरडल्याने समस्त मानव जातीचा उद्धार होणार आहे. असेच विनोदी लेखन अजून येऊ द्या. छान टाईमपास होतोय वाचताना.

In reply to by संगणकनंद

१. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल. २. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा. ३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

अनावधानस्य सर्वत्र !
हा श्लोक अठराव्या अध्यायातील आहे :
सर्वत्रानवधानस्य न किंचिद् वासना हृदि। मुक्तात्मनो वितृप्तस्य तुलना केन जायते॥१८- ८९॥
बाकी ह्याचाच अलिकडेच एक भारी श्लोक आहे >>>
न शान्तं स्तौति निष्कामो न दुष्टमपि निन्दति। समदुःखसुखस्तृप्तः किंचित्कृत्यं न पश्यति॥१८- ८२॥
निष्काम / सिध्द पुरुष शांत संत पुरुषांची स्तुती करत नाही कि दुष्टांची निंदा करत नाही. सुख दु:ख ह्यांना समबुध्दीने पहाणारा असा जो सिध्द पुरुष असतो त्याला काहीच कर्तव्य असे नसते ! मिपावरील एकमेव अद्वीतीय स्वयंघोषित सिध्द पुरुष ज्याप्रकारे " माझेच कसे योग्य" हे दाखवण्यासाठी प्रतिसादातुन लेखनातुन आकांडतांडव करत असताना दिसतात , प्रतिकुल प्रतिसद देणार्यांची निंदा अन खंडनमंडन करताना कालापव्यय करताना दिसतात , अख्ख्या जगाला शहाणे करुन सोडायचे कर्तव्य स्वतःच्या माथ्यावर घेऊन जिथे तिथे "मी ची लाल" करुन घेताना दिसतात , त्यावरुन त्यांच्या सिध्दत्वाविषयी शंका येते बस्स इतकेच. =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गीतेतली सिद्ध पुरुषांची व्याख्या बरोबरच आहे, किंवा संक्षि त्या व्याख्येनुसार स्वतःला सिद्ध म्हणत आहेत आणि ती सिद्धत्वाची व्याख्या सरसकट सर्वांना मान्य आहे असे ऍसंप्शन का ? (मला व्यक्तिगतरीत्या सिद्धत्व नावाच्या गोष्टीच्या अस्तित्वाची पण खात्री नाही. त्यामुळे, तुम्हाला त्यांच्या सिद्धत्वावर शंका येते हा त्यामुळे माझ्या दृष्टीने अत्यंत गौण मुद्दा असून, तुमच्या शंकेस आमचा काहीही आक्षेप नाही. :))

In reply to by आनन्दा

माझ्या मते त्यांच्या भावना दाखवणारी एक ओळ त्यांनी वापरली आहे. "मी सांगतो तेच गीतेत सांगितले आहे त्यामुळे मी बरोबर आहे" असे मला तरी वाटले नाही."

संजय क्षीरसागर, तुमचे हे दोन प्रतिसाद वाचले : १. https://www.misalpav.com/comment/1086862#comment-1086862 २. https://www.misalpav.com/comment/1086895#comment-1086895 माझी मतं सांगतो. १. @ गामा पैलवान : पूर्ण माहितीमुळे हा प्रकार अधिक फनी झालाय ! तुम्हांस चौरंगीनाथांच्या कथेची पूर्ण माहिती नाही. उघड अर्थ काढण्याच्या नावाखाली काही असत्य गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या आहेत. २. १. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाच धोबीपछाड मारला आहे. पौर्णिमा आणि अमावास्येला उधाणाची एकाच प्रकारची भरती येते. ही न्यूटनच्या गुरुव्र्षानाच्या सिद्धांतातली धडधडीतपणे दिसणारी त्रुटी आहे. पण लक्षांत कोण घेतो. मच्छिंद्रनाथांनी न्यूटनच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या बलांचा उपयोग केलेला असू शकतो. ३. सत्य चराचर व्यापून असून देखिल सिद्धत्त्वासाठी तुम्हाला असा अफाट मॅन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सत्य नाही. परिणामी या जन्मी तरी तुमचा चान्स हुकला आहे आता पुढच्या जन्मांची वाट पाहात राहा ! हा असला दावा मच्छिंद्रनाथांनी केलेला नाही. किंबहुना तुम्ही सोडल्यास इतर कुणीही केलेला नाही. ४. कुठल्याही जन्मात असा सुपरमॅन तुम्हाला भेटला, तरी चौरंगीनाथांसारखं डेरींग करुन तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही या जन्म-मृत्यूच्या चक्रातच फिरत राहणार. तस्मात, आजपासूनच डेरींग वाढवायला सुरुवात करा. थोडक्यात, सध्याचं तुमचं डेरींग पाहता या जन्मी तरी तुम्ही एकदम छपरी आहात. हा अर्थसुद्धा तुमच्या मेंदूतनं निघालेला आहे. तस्मात याचा छडा मी लावू शकंत नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की चौरंगीनाथ राजपुत्र होता. त्याचा राजा असलेला बाप डोक्याने भडक होता. रागाच्या भरात त्याने आपल्या पोराचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकला. मच्छिंद्र आणि गोरक्ष नाथांना तो हातपाय तुटलेल्या मूर्छितावस्थेत सापडला. त्यांनी त्याला राजाकडनं मागून घेतला. त्याला खांद्यावर वाहून हिमालयात आणला. नंतर त्याला गुहेत तपस्येला बसवला आणि अनुसंधानासाठी त्याच्या डोक्यावर शिळा टांगवली. प्रत्यक्षात ती शिळा मच्छिंद्रनाथांनी योगसामर्थ्याने तोलून धरली होती. सदर साधना चौरंगीने स्वत:हून स्वीकारली नव्हती. परिस्थितीशी जुळवून घेणे हा इतकाच उपाय त्याच्याकडे उरला होता. ५. या अद्भूत चमत्काराची तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं ज्ञान चरचौघात प्रकट करायचं असेल तर अत्यंत विनयानं ही स्टोरी पुढच्यांना सांगा कारण विद्या विनयेन शोभते ! असा अर्थ लावायची काहीही जरुरी नाही. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वत:च्या योगसामर्थ्याने भक्तहृदयी विराजमान आहेत. ६. या आणि अशा अनेक उदाहरणंनी, ज्यांना पूर्वापार ग्रेट मानलं गेलंय त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, त्यांच्या पश्चात आध्यात्माची कशी वाट लावून ठेवली आहे .... हे उदाहरण नवनाथ भक्तिसार ग्रंथात आहे. तुम्हांस विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. पण असंख्य भक्तांना याच्या पारायणाचे अनुभव आले आहेत. तुम्ही ज्याला अध्यात्माची वाट लावणे म्हणतात ती भोंदू लोकांनी लावून ठेवलेली आहे. प्रस्तुत उदाहरणांत भोंदूगिरी करणारा कोणीच नसल्यामुळे तुमचा हा दावा फोल आहे. ७. .... आणि जनसामान्यांत नाहक, किती पराकोटीचा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय .... कोण्या माणसात कसलासा न्यूनगंड उत्पन्न झाला तर मी, तुम्ही वा इतर कोणीही त्यास कारणीभूत नाही. ८. शिळा तरंगवता येते तर बोईंग उडवता यायला काय हरकत आहे ? तरंगणारी शिळा एकाच ठिकाणी स्थिर असते. याउलट बोईंग सतत पुढंपुढं सरकंत असतं. त्यामुळे या दोहोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ९. कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ? कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा. १०. ऑइल क्रायसिसचा जागतिक प्रश्न एका झटक्यात संपेल ! हे खरंय. पर्यायी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास तेलावरील अवलंबन कमी होईल. त्यामुळे तेलाचा प्रश्न कायमचा संपू शकेल. ११. अडाणी पण कावेबाज भक्तांनी स्वतःची दुकानं सुरु रहावीत म्हणून लावलेल्या या स्टोर्‍या आहेत इतकी साधी गोष्ट सुशिक्षितांना समजत नसेल तर अशिक्षितांचे हाल तर विचारायलाच नको. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा कर्ता परलोकवासी होऊन कैक शतकं लोटली आहेत. त्यामुळे हा दावा नवनाथ भक्तिसार ग्रंथास लागू पडंत नाही. बाकीच्या ग्रंथांचं माहित नाही. १२. त्यामुळे दुसर्‍या लेखावरच्या प्रतिसादात मी म्हटलंय की इतक्या निर्बुद्ध मानसिकतेच्या खोलवर रुजलेल्या धारणांना माझ्या लेखनाचा शून्य उपयोग आहे. त्यांनी शिळा तरंगवणार्‍याची वाट पहावी आणि तरंगती शिळा डोक्यावर घेऊन अनुसंधान साधावं ! शिळा तरंगल्याची घटना दैववशात घडली होती. कोणी मुद्दामहून ती साधना करायला गेला नव्हता. अशा घटनेविषयी तुच्छतेने शेरेबाजी करून तुम्ही विनाकारण ज्ञाताज्ञात शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की, एकवेळ शिळा तरंगवणारा सापडेल पण तुमच्या सल्ल्याने जीवन्मुक्त होणं अशक्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ? कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा. >>>> गापै याबद्दल 100 नमस्कार.. हे काम 50 रुपयात होणारे रामकृष्ण आठवले मला यांच्यावरून.. याबद्दल धन्यवाद!!

In reply to by गामा पैलवान

१. तुम्हांस चौरंगीनाथांच्या कथेची पूर्ण माहिती नाही ?
तुम्हीच दिलेल्या 'पूर्ण माहितीवर' माझा प्रतिसाद बेतला आहे ! हे आपल्या लक्षात आले नाही काय ?
२. पौर्णिमा आणि अमावास्येला उधाणाची एकाच प्रकारची भरती येते. ही न्यूटनच्या गुरुव्र्षानाच्या सिद्धांतातली धडधडीतपणे दिसणारी त्रुटी आहे.
आपल्यासारख्या तर्कपुष्ट व्यक्ती कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. भरतीचे पाणी मच्छिंद्रनाथांच्या शिळेप्रमाणे आकाशात तरंगत राहते काय ? (गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पुन्हा खालीच येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.) तरीही तसे विलोभनीय दृष्य आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिले असल्यास इथे मान्य होणार नाही. कृपया शास्त्रिय पुरावा म्हणून ऑथेंटिक लिंक द्यावी.
३. हा असला दावा मच्छिंद्रनाथांनी केलेला नाही. किंबहुना तुम्ही सोडल्यास इतर कुणीही केलेला नाही.
आपले मच्छिंद्रनाथ सत्य चराचर व्यापून नाही असे म्हणतात का ? तसे असेल तर त्यांच्या तशा विधानाची सप्रमाण कॉपी इथे पेस्ट करावी. ४.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की चौरंगीनाथ राजपुत्र होता. त्याचा राजा असलेला बाप डोक्याने भडक होता. रागाच्या भरात त्याने आपल्या पोराचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकला. मच्छिंद्र आणि गोरक्ष नाथांना तो हातपाय तुटलेल्या मूर्छितावस्थेत सापडला. त्यांनी त्याला राजाकडनं मागून घेतला. त्याला खांद्यावर वाहून हिमालयात आणला. नंतर त्याला गुहेत तपस्येला बसवला आणि अनुसंधानासाठी त्याच्या डोक्यावर शिळा टांगवली. प्रत्यक्षात ती शिळा मच्छिंद्रनाथांनी योगसामर्थ्याने तोलून धरली होती.
हे तर आपण अफाटच लिहिले आहे. पाय तोडल्यावर चौरंगीनाथ कसे बसू शकले ? असा प्रश्न आपल्यासारख्या विचारवंताला पडू नये काय ?आणि त्याही पुढे जाऊन हात नसलेली व्यक्ती कशाच्या आधारे बसेल ? असा किमान वाजवी प्रश्न आपण स्वतःला विचारला नाहीत काय ? किंबहुना हात आणि पाय अँप्युट केलेली व्यक्ती केवळ टोरसोवर उभी राहिलेली आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिली असल्यास इथे फोटो देणे. एखादे वेळी शिळेबरोबर चौरंगीनाथही योगसामर्थ्यानं हवेत तरंगत होते असा उल्लेख अनावधानाने ग्रंथात करायचा राहिला तर नाही ना ? याचा ही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी. एवढे सगळे झाल्यावर आपल्या या अभूतपूर्व प्रयोगाची सत्यता आयएमए कडून पडताळून घ्यावी आणि त्याची लिंक इथे दिली तर आम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
५. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वत:च्या योगसामर्थ्याने भक्तहृदयी विराजमान आहेत.
एकदा डो़कं वापरायचंच नाही हे ठरवल्यावर हे विधान मान्य करण्यावाचून भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.
६. तुम्ही ज्याला अध्यात्माची वाट लावणे म्हणतात ती भोंदू लोकांनी लावून ठेवलेली आहे. प्रस्तुत उदाहरणांत भोंदूगिरी करणारा कोणीच नसल्यामुळे तुमचा हा दावा फोल आहे.
टोरसो इंडीपेंडंटली बसू शकणं आणि त्याच्या डोक्यावर योग सामर्थ्यानं शिळा तरंगत ठेवणं या स्टोरीलाच भोंदूगिरी म्हणत असावेत असा एक सार्वत्रिक समज आहे. आपल्या तर्कबुद्धीला भोंदूगिरीचा काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे काय ? किंवा मराठी शब्दकोषात तसा बदल घडला आहे का ? असल्यास त्याचा पुरावा इथे सादर करावा.
७. कोण्या माणसात कसलासा न्यूनगंड उत्पन्न झाला तर मी, तुम्ही वा इतर कोणीही त्यास कारणीभूत नाही.
आपण ज्या धारिष्ट्यानं चित्तचक्षू चमत्कारिक कथा भर पब्लिक फोरमवर लिहिता आहात त्यावरुन आपल्याला कोणताही न्यूनगंड नाही असे सकृत दर्शनी दिसते. पण सामान्य लोक अशा स्टोर्‍या वाचतांना किमान बुद्धीचा वापर करतात असे वाटते, तेंव्हा त्यांना (पुन्हा थोडी बुद्धी वापरल्यास) न्यूनगंड येत असावा असे वाटते.
८. तरंगणारी शिळा एकाच ठिकाणी स्थिर असते. याउलट बोईंग सतत पुढंपुढं सरकंत असतं. त्यामुळे या दोहोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
प्रोपल्शन ही तरंगण्यानंतरची लगेचची पुढची पायरी आहे असा आमचा समज आहे. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झाले आहे काय ? तसे असल्यास कृपया कोणत्याही विमान कंपनीकडे चवकशी करुन इथे लेखी पुरावा सादर करावा.
९. कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा.
व्यक्तिगत योगसामर्थ्य लावणे हे ऑइल रिगच्या भव्य प्रोजेक्टपेक्षा कमी श्रमाचे आहे असे तार्किक अवलोकनावरुन वाटते. आपण ऑइल रिग प्रोजेक्टच्या खर्चाची आणि त्यासाठी होणार्‍या मानवी श्रमाची माहिती घेतली आहे काय ? शिवाय ऑइल बेसेसवर कब्जा मिळवणे या एका कारणावरुन जगात कशी युद्धे चालू आहेत याची आपल्याला कल्पना असावी. ती युद्धे हा परिश्रम नाही असे आपणास वाटत असल्यास तसे कळवावे.
१० आणि ११
ठीक आहे.
१२. शिळा तरंगल्याची घटना दैववशात घडली होती. कोणी मुद्दामहून ती साधना करायला गेला नव्हता. अशा घटनेविषयी तुच्छतेने शेरेबाजी करून तुम्ही विनाकारण ज्ञाताज्ञात शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की, एकवेळ शिळा तरंगवणारा सापडेल पण तुमच्या सल्ल्याने जीवन्मुक्त होणं अशक्य आहे
आपण शिळा तरंगवणार्‍याची जरुर वाट पहावी आमच्या साधनेनं लोक मुक्त होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जो इथे आलेल्या प्रतिसादांवरुन सिद्ध झाला आहे.

nanaba,
That is the Way to Test Any Method Scientifically, Great !
यांस प्रयोग जरूर म्हणता येईल. परंतु हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे. अशा प्रकारच्या टेस्टिंगसाठी हायपोथिसीस लागतं, जे प्रस्तुत प्रसंगात दावेदाराने ( म्हणजे संजय क्षीरसागर यांनी) स्पष्ट केलेलं नाही. हा प्रयोग असल्याने यांत ऑब्झरवेशन व इन्फरन्स ( = निरीक्षण व अनुमान ) आहेत, पण यांत कनक्लूजन ( = निष्कर्ष ) नाही. माझं हे मत विकीवरील माहितीवर आधारित आहे : https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

डायरेक्ट रिझल्ट आहे जो वैज्ञानिक सत्याच्या तीनही निकषांवर (निर्वैयक्तिकता, स्थल-काल निरपेक्षता आणि वारंवारिता) शाबित होतो. १) सदस्येनं कुणालाही काय रिझल्ट येईल याची कल्पना दिली नव्हती किंवा तिची स्वतःची काय रिझल्ट यावा याबद्दल कोणतीही गृहितकं नव्हती. शिवाय तिनी कोणत्याही प्रकारे रिझल्ट मॉनिटर केला नाही (rigorous skepticism about what is observed आणि cognitive assumptions can distort how one interprets the observation) २. हायपोथेसिसचा अर्थ जनरल स्टेटमंट आणि डिडक्टीव रिजनींगचा अर्थ अनेक शक्यतांमधून नेमक्या निर्णयाप्रत येणं असा आहे. तुमचं म्हणणंय की मी हायपोथेसिस मांडला नाही ? अहो लेखाचं नांवच १. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता आहे आणखी काय असतो हायपोथेसिस ? आणि कन्क्लूजनचं काय घेऊन बसलात ? डायरेक्ट रिझल्ट तुमच्यासमोर आहे ! ३. आणि निर्विचारता किंवा लेखिकेच्या मुलीला तत्क्षणी आलेला विदेहत्वाचा अनुभव इथे आणखी सहा आयडींनी इंडीपेंडंटली वेरिफाय केला आहे (शाविकु, गवि, टर्मिनेटर, चित्रगुप्त , प्रतिसादाची लेखिका आणि डिबी). लेखिकेची आई आणि मुलगी यांना लेखनाची काहीही माहिती नसतांना आणि सात वर्षाच्या मुलीला अध्यात्माची सुतराम कल्पना नसतांना विदेहत्वाचा अनुभव आला आहे, तिच्या शब्दात : " she felt as if she was flying without feeling d body". असो, त्यामुळे तुमच्या मुद्याला केवळ काही तरी खुसपट काढणं याव्यतिरिक्त काहीही अर्थ उरत नाही. हा घ्या तुमच्या लिंक मधला सायंटिफिक प्रोसेसचा नेमका उतारा _______________________________________________ It involves careful observation, applying rigorous skepticism about what is observed, given that cognitive assumptions can distort how one interprets the observation. It involves formulating hypotheses, via induction, based on such observations; experimental and measurement-based testing of deductions drawn from the hypotheses; and refinement (or elimination) of the hypotheses based on the experimental findings. These are principles of the scientific method, as distinguished from a definitive series of steps applicable to all scientific enterprises __________________________________________________ जितक्या नम्रपणे तुम्ही प्रतिसाद देता तितक्याच नम्रपणे सांगतो की तुमचं स्वतःचं फक्त निश्चित मत इथे मांडा. मला प्रतिसाद देतांना ( मी मागितल्याशिवाय) निष्कारण सपोर्ट लिंक्स देऊ नका. माझं इंग्रजी अतीउत्तम असलं, कोणत्याही लिंकचा मी यथोचित समाचार घेऊ शकत असलो आणि कोणत्याही फोरमवर कोणत्याही दिग्गजाशी मी इंग्रजीतून चर्चा करायला समर्थ असलो तरी अशा लिंक्स वाचायला मला वेळ नसतो !

केवळ याच धाग्यावर म्हणुन नाहि, पण इतरत्रही अशा प्रकारच्या चर्चेत तुम्ही जि चिकाटी दाखवता, भाषाशैली वापरता, मुख्य म्हणजे जो प्रामाणीकपणा दाखवता... त्याला _/\_ मतभिन्नता असणं स्वाभावीक आहे, आणि त्यानुषंगाने वाद-विवाद देखील आपसुक आलेच. पण समोरचा माणुस बदमाशी करत असला तरी आपला तोल ढळु न देता प्रामाणीकपणे चर्चा करत राहाणं सोपं नाहि. पुन्हा एकदा _/\_ _/\_

नेहमीप्रमाणे च ... मी मी मी ... भंकस .... वेळ वाया गेला ...

संजय क्षीरसागर, तुमचे हे दोन प्रतिसाद वाचले : १. https://www.misalpav.com/comment/1087043#comment-1087043 २. https://www.misalpav.com/comment/1087033#comment-1087033 माझी मतं सांगतो. १.
तुम्हीच दिलेल्या 'पूर्ण माहितीवर' माझा प्रतिसाद बेतला आहे
ही माहिती पूर्ण नाही. पूर्ण माहिती द्यायची झाली तर नवनाथ भक्तिसारातले लांबलचक अध्याय (३०, ३१, इत्यादि) लिहावे लागतील. २.
आपल्यासारख्या तर्कपुष्ट व्यक्ती कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती.
का बरं? पौर्णिमेस चंद्र व सूर्य विरुद्ध बाजूस असतात. मग भरतीचे दोन फुगवटे दिसणं तार्किक आहे. पण अमावास्येला सूर्य व चंद्र एकाच बाजूला असतात. तेव्हा पृथ्वीच्या पाठीमागील बाजूस उधाणाची भरती येणं न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत बसंत नाही. फार काय, ठाण्याला खाडीच्या जवळ मासुंदा तलाव आहे. खाडीला भरती येते, पण तलावाला भरती येत नाही. ही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांतली खोट आहे. ३.
भरतीचे पाणी मच्छिंद्रनाथांच्या शिळेप्रमाणे आकाशात तरंगत राहते काय ? (गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पुन्हा खालीच येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.)
हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू शकंत नाही, असा एक गैरसमज काही शतकांपूर्वी युरोपात प्रचलित होता. तशाच धर्तीचा हा बाळबोध प्रश्न आहे. ४.
तरीही तसे विलोभनीय दृष्य आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिले असल्यास इथे मान्य होणार नाही.
पण बोटांचे गोल गुंफून तत्काळ विदेहत्व प्राप्त होतं, हे मात्र इथे मान्य आहे. ५.
आपले मच्छिंद्रनाथ सत्य चराचर व्यापून नाही असे म्हणतात का ? तसे असेल तर त्यांच्या तशा विधानाची सप्रमाण कॉपी इथे पेस्ट करावी.
तुमचं हे विधान पार असंबद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ब्रह्मन् जरी एकसंध असलं तरीही वेदान्त, सिद्धान्त व धादान्त अशा तीन प्रकारच्या प्रचीती मानल्या जातात. ६.
पाय तोडल्यावर चौरंगीनाथ कसे बसू शकले ? असा प्रश्न आपल्यासारख्या विचारवंताला पडू नये काय ?
गुढघ्यापासून खाली पाय नसले तरी माणसं चक्रासनावर ( = व्हीलचेअर वर) बसतातच ना? मग खाली जमिनीवर नाही का बसता येणार? ७.
आणि त्याही पुढे जाऊन हात नसलेली व्यक्ती कशाच्या आधारे बसेल ? असा किमान वाजवी प्रश्न आपण स्वतःला विचारला नाहीत काय ?
बसला असेल टेकून भिंतीला. किंवा केली असेल काहीतरी व्यवस्था मच्छिंद्रनाथांनी. हा काही फार गहन प्रश्न नाही. ८.
एखादे वेळी शिळेबरोबर चौरंगीनाथही योगसामर्थ्यानं हवेत तरंगत होते असा उल्लेख अनावधानाने ग्रंथात करायचा राहिला तर नाही ना ? याचा ही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी.
बोटांचे गोल गुंफतांना थोडी दारू ढोसून बसलेलं चालतं का, याचाही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी. काये की सर्व प्रक्रिया एकदम आनंदी होऊन जाईल. जणू एखादा उत्सवच. ९.
एवढे सगळे झाल्यावर आपल्या या अभूतपूर्व प्रयोगाची सत्यता आयएमए कडून पडताळून घ्यावी आणि त्याची लिंक इथे दिली तर आम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हांस आचंबित करणे हे आमचे ध्येय नव्हे. १०.
एकदा डो़कं वापरायचंच नाही हे ठरवल्यावर हे विधान मान्य करण्यावाचून भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.
बोटांत बोटं घालून विदेहत्व मिळवायचं ठरवलं की भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो. ११.
टोरसो इंडीपेंडंटली बसू शकणं आणि त्याच्या डोक्यावर योग सामर्थ्यानं शिळा तरंगत ठेवणं या स्टोरीलाच भोंदूगिरी म्हणत असावेत असा एक सार्वत्रिक समज आहे.
धड जमिनीवर बसल्यावर त्याला खालून आधार द्यायला मांडीची हाडं शाबूत आहेत. बाकी, बोटांचे गोल गुंफून जीवनाचा उत्सव सुरू करणे याला हातचलाखी म्हणावं की बोटचलाखी? १२.
प्रोपल्शन ही तरंगण्यानंतरची लगेचची पुढची पायरी आहे असा आमचा समज आहे.
हा समज चुकीचा आहे. मोटार तरंगल्याशिवाय पुढे जाते. १३.
बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झाले आहे काय ?
नाही. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झालेले नाही. म्हणूनंच बोईंगची तुलना तरंगत्या शिळेशी करायची नसते. १४.
व्यक्तिगत योगसामर्थ्य लावणे हे ऑइल रिगच्या भव्य प्रोजेक्टपेक्षा कमी श्रमाचे आहे असे तार्किक अवलोकनावरुन वाटते.
हा तर्क चुकीचा आहे. ऑईल रिग मध्ये व्यक्तिगत परावलंबन नसते. याउलट व्यक्तिगत योगसामर्थ्य लावल्यास प्रचंड प्रमाणावर परावलंबन निर्माण होईल. १५.
आपण ऑइल रिग प्रोजेक्टच्या खर्चाची आणि त्यासाठी होणार्‍या मानवी श्रमाची माहिती घेतली आहे काय ?
तसंही पाहता केवळ तरंगत्या शिळेसारखं एका जागी तरंगून पुढेपुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुरस्सरणार्थ इंधनाची गरज लागेलंच. ते इंधन तेल वा तत्सम पदार्थांपासून मिळवावे लागेल. त्यामुळे व्यक्तिगत योगसामर्थ्य आणि तेलविहिर यांची तुलना यथायोग्य नाही. १६.
शिवाय ऑइल बेसेसवर कब्जा मिळवणे या एका कारणावरुन जगात कशी युद्धे चालू आहेत याची आपल्याला कल्पना असावी. ती युद्धे हा परिश्रम नाही असे आपणास वाटत असल्यास तसे कळवावे.
व्यक्तिगत योगसामर्थ्य वापरून युद्धे का म्हणून थांबवायची? त्यापेक्षा बोटांचे गोल गुंफून युद्ध थांबवणं फायदेशीर नाही का? १७.
आपण शिळा तरंगवणार्‍याची जरुर वाट पहावी
अवश्य पाहीन. असेल नशिबात तर शिळा तरंगावणारा मिळेल. अन्यथा माझा मी समर्थ आहेच. तसंही पाहता तरंगत्या शिळेखालची साधना सामान्य लोकांसाठी नाहीच. ज्याअर्थी तुम्ही मला शिळा तरंगवणार्‍याची वाट पाहायचा सल्ला देताहात त्याअर्थी मी असामान्य आहे अशी तुमची खात्री झाली असावी. तुमच्या या दिलदारीबद्दल आभारी आहे. :-) १८.
आमच्या साधनेनं लोक मुक्त होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जो इथे आलेल्या प्रतिसादांवरुन सिद्ध झाला आहे.
सूर्य उगवला आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यासाठी आम्ही प्रतिसाद मागवीत नाही. १९.
@ गामा पैलवान : इथे हायपोथिसिसचा प्रश्नच नाही ! डायरेक्ट रिझल्ट आहे
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नाही. २०.
.... जो वैज्ञानिक सत्याच्या तीनही निकषांवर (निर्वैयक्तिकता, स्थल-काल निरपेक्षता आणि वारंवारिता) शाबित होतो.
वैज्ञानिक सत्य नामक कोणतीही चीज या जगात अस्तित्वात नाही. २१.
शिवाय तिनी कोणत्याही प्रकारे रिझल्ट मॉनिटर केला नाही
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे. २२.
अहो लेखाचं नांवच १. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता आहे आणखी काय असतो हायपोथेसिस ? .... हा घ्या तुमच्या लिंक मधला सायंटिफिक प्रोसेसचा नेमका उतारा ...
माझ्या लिंकमधल्या उताऱ्यात hypotheses या शब्दाच्या एका उल्लेखाखाली दुवा आहे. त्यावर टिचकी मारली की हे पान उघडतं : https://en.wikipedia.org/wiki/Hypothesis या पानावर दिसतं की हायपोथिसिस सायंटिफिक म्हणून गणला जायला हवा असेल तर तो टेस्टेबल ( म्हणजे चाचणी करण्याजोगा ) असावा लागतो. मूळ वाक्य : For a hypothesis to be a scientific hypothesis, the scientific method requires that one can test it. तुमचा हायपोथिसिस सायंटिफिक म्हणवता तर मग तो टेस्टेबल आहे का? सांगोपांग चाचणी ( म्हणजे रिगरस टेस्टिंग ) करता येत नसल्यास सायंटिफिक हा शब्द वापरू नका म्हणून सुचवेन. २३.
आणि कन्क्लूजनचं काय घेऊन बसलात ? डायरेक्ट रिझल्ट तुमच्यासमोर आहे !
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे. २४.
त्यामुळे तुमच्या मुद्याला केवळ काही तरी खुसपट काढणं याव्यतिरिक्त काहीही अर्थ उरत नाही.
तुमच्या जो काही हायपोथिसीस आहे त्याची सांगोपांग चाचणी दाखवा आणि सायंटिफिक म्हणवून घ्या. २५.
जितक्या नम्रपणे तुम्ही प्रतिसाद देता तितक्याच नम्रपणे सांगतो की तुमचं स्वतःचं फक्त निश्चित मत इथे मांडा. मला प्रतिसाद देतांना ( मी मागितल्याशिवाय) निष्कारण सपोर्ट लिंक्स देऊ नका.
माझा युक्तिवाद ज्याच्यावर आधारित आहे त्या मजकुराचा स्रोत देणे माझ्या मते खुलेपणाचं लक्षण आहे. तुम्हांस तो वाचायचा वेळ नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. बाकी, सपोर्ट लिंका दिल्या तर इतका तिळपापड का होतोय तुमचा? २६.
माझं इंग्रजी अतीउत्तम असलं, कोणत्याही लिंकचा मी यथोचित समाचार घेऊ शकत असलो आणि कोणत्याही फोरमवर कोणत्याही दिग्गजाशी मी इंग्रजीतून चर्चा करायला समर्थ असलो तरी अशा लिंक्स वाचायला मला वेळ नसतो !
असं असेल तर मग सायंटिफिक हा शब्द वापरू नका. अन्यथा दुसरा पर्याय म्हणजे वेळात वेळ काढून सायंटिफिक प्रोसेस समजावून घेऊन त्यानुसार चाचणी करण्याजोगं हायपोथिसीस मांडणं हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आमच्या अल्प मती नुसार तीन मुद्यात त्याचा गोषवारा घेण्याचा प्रयत्न करतो. १. निर्विचारिता येईल हे आमचे हायपोथेसिस असून तत्क्षणी निर्विचारता येते हा तिचा रिझल्ट आहे त्यामुळे आमची ध्यानपद्धती, आपणास अपेक्षित असलेल्या सायंटिफिक मेथडनेही सिद्ध होते असे इथे नम्रपणे नमूद करतो. (आपल्या प्रतिसादातील मुद्दे १९ ते २६ बघावे) २. ' आपले खाली पडलेले पाकीट आपण लगेच उचलतो ही घटना म्हणजे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत धुडकावला ' असे आपणास वाटत असावे असे आपल्या एकूण प्रतिसादावरुन आम्हास वाटते. आमच्या मते ते केवळ बला-बलातील फरकामुळे शक्य होते, म्हणजे गुरुत्वाकर्षणापेक्षा पाकीटाच्या काळजीने व्यक्ती जास्त बलप्रयोग करते. तरीही पाकीट हाती लागल्यावर व्यक्ती त्याच स्थितीत उभी राहिली तर यथावकाश भुईसपाट होईल असे गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे आमचे आकलन आहे. आपला अनुभव काही वेगळा असल्यास प्रचिती घेऊन कळवावे. (आपले मुद्दे २ ते १८ पाहावे) ३. मुद्दा क्रमांक ८ मधे आपल्या स्वाभाविक नम्रतेचा तोल काहीसा ढळलेला दिसतो असे अतीनम्रपणे सांगावेसे वाटते. इथे आलेल्या प्रतिसादात एका सदस्येच्या ७ वर्षीय कन्येला जर विदेहत्त्वाचा अनुभव आला असे नमूद केले आहे तर आमच्या साधनेत मद्यप्राशनाची गरज नाही हे आपल्यासारख्या तर्कशुद्ध विचारसरणीच्या नजरेतून कसे सुटले बरे ? तरीही आम्हाला मद्यप्राशनाचा वैयक्तिक अनुभव असल्याने ते घेतल्यावर आपणाबरोबर जगही तरंगल्यासारखे वाटते हे बारीक खरे. त्यामुळे आपल्या शिळाप्रयोगात तसे तर झाला नसेल ना ? अशी पुसटशी शंका मात्र मनात येऊन गेली. आपल्यासारख्याच प्रगाढ श्रद्धा असलेले एक गांजाश्री इथे आहेत. कुणाच्याही कोणत्याही समस्येला ते गांजा मारा असा अनमोल सल्ला भर पब्लिक फोरमवर बिनदिक्कतपणे देत असतात. त्यामुळे तरंगाईतता साधण्यासाठी अध्यात्मिक जगतात गांजा ही मद्यपानापेक्षा श्रेष्ठ दर्जाची कॢप्ती समजण्याचा प्रघात असावा असे आमचे (अनुभवशून्य का असेना) पण निरिक्षण आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधल्यास शिळा तरंगती दिसावी यासाठी गांजा की मद्यपान अशी साद्यंत चर्चा करुन नेमका निष्कर्श येथे मांडावा असे सुचवेन. आमच्या अल्प मतीनुसार मात्र सर्व अस्तित्त्वच एका अथांग पोकळीत तरंगत आहे, खुद्द वसुंधराच तरंगाईत असल्याने आपल्या इवल्याशा आणि क्षणभंगुर देहाची ती काय वेगळी अवस्था ? असा आमचा एक तर्कशुद्ध आणि अनुभवसिद्ध सिद्धांत आहे . तस्मात देहाची तरंगाईतता अनुभवण्यासाठी कोणत्याही योग सामर्थ्याची आम्हाला कधी गरज भासली नाही. आम्ही आमच्या साधनेने विदेहत्त्व साधताच ती विनासायास उपलब्ध झाली. आमचा अनुभव इथल्या सदस्येच्या सात वर्षीय कन्येनं, या भानगडींची काहीही कल्पना नसतांना सुद्धा एंडोर्स केला त्यामुळे आम्हाला कमालीचा आनंद वाटला हे मात्र इथे नम्रपणे नमूद करायला हवे.

बापरे! बरीच चर्चा झालीय. मायबोलीवरच्या नानबांची पण उपस्थिती! पण ही लेखमाला आहे असे कळतंय. ती लेखमाला संपेपर्यंत तरी मी निवांत बसणार आहे.

ज्यांनी आमच्या धाग्यावर न येण्याचा पण केला होता ते ही आता इथे येऊन ठेपले आहेत. अर्थात, हा पब्लिक फोरम असल्याने कुणाला कुठेही जाण्याचा हक्क आहे पण सद्य परिस्थिती हे आमचे सुदैव समजावे का त्यांचे दुर्दैव या विचारात आज आम्ही आहोत हे मात्र नक्की. आमच्या अल्पमतीने आम्हाला असे वाटते की : १. शिळा तरंगवणारे, डेड मॅनला उठवणारे, श्रीहरीला लंच भरवणारे (हे आज आम्हाला नव्याने समजले हे पुन्हा नम्रपणे नमूद करतो), झालेच तर मान्यताप्राप्त ग्रंथातून दिव्य उतारे कॉपी पेस्ट मारुन त्यावर निरुपणात्मक भाष्य करणारे आणि इतकेच काय तर संकेतस्थळाच्या अधिकृत धोरणातल्या क्रमांक चारच्या नियमाला धुडकावून सरळसरळ व्यक्तिगत प्रतिसाद देणारे असे सगळे एकावेळी उपस्थित असून ही आम्ही सिद्धत्त्वाची घोषणा करतो आणि धाग्याचा रंग जरा ही बदलू देत नाही हे काय गौडबंगाल असावे ? असा प्रश्न त्यांना पडला असावा असे आम्हास वाटते. २. इतकेच काय कमी होते तर इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हा स्वरुपोलब्धीतला एकमेव अडथळा आहे असे भर पब्लिक फोरमवर जाहीर करण्याचे धारिष्ट्य दाखवून आम्ही सर्वांच्या हृदयाच्या तारा छेडल्या असाव्यात, असा ही एक रास्त कयास आहे. आमच्या स्वल्पमती नुसार एकवेळ सेक्सवर खुली चर्चा होईल पण स्वतःला इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स आहे ही उघड गोष्ट लपवण्यातच सारी मानवता गुंतली आहे. त्यात आम्ही सुरुवातीला असे विधान केले की जर सत्यच चराचर व्यापून आहे तर स्वतःला सत्य न समजणे हाच अहंकार आहे त्याचा प्रतिवाद त्यांना धाग्यावर करणे अवघड होऊन बसले असावे. ३. आता बहुजनांना हा डबल ट्रबल झाला असावा असे आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन सांगते. म्हणजे साधना केली तर विचार थांबतील, त्यामुळे यथावकाश आपल्या भन्नाट स्टोर्‍या केवळ आपल्या मेंदूशिवाय कुठेही नव्हत्या हे उमजून मोठी पंचाईत होईल हा एक धसका. आणि आपल्याला इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असल्याने आपण स्वतःला सत्य समजत नाही ही उघड गोष्ट मान्य करायची तर तो ही एक अनावस्था प्रसंग. ४. तर ते एक असो, बहुजन हितार्थ असे सांगावेसे वाटते की : आपण देहात आहोत हा एकमेव भ्रम व्यक्तिमत्त्वाचा भास निर्माण करतो > व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे > उधृत केली साधना तुम्हाला निर्विचारातून विदेहत्त्वाकडे नेईल > त्या वेळी तुमच्या लक्षात येईल की देहात कुणीही नाही > त्यामुळे तुमची मृत्यूची भीती संपेल आणि > तुम्ही अमृताला उपलब्ध व्हाल > जे तुम्ही आता या क्षणी आहातच पण देहाच्या (भासात्मक) बंदीवासामुळे तुम्हाला तो उलगडा होत नाही. आता या उप्पर काय करायचे ते प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवावे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

शिळा प्रकरण उहापोहात जास्तच वेळ घालवला.थोडं असं पाहा. मच्छीन्द्रनाथांचा जन्म ब्रम्हाचे वीर्य माश्याने गिळल्यामुळे झाला. वालखिल्य ऋषींची जन्मकथा तर अजून गमतीशीर. असेच कुठेकुठे ब्रम्हाचे आणि सूर्याचे इत्यादींचे वीर्य चित्रविचित्र ठिकाणी पडून अनेक ऋषीमुनींचा जन्म होतो. उदा- हत्तीच्या कानात, वाघाच्या पायावर इत्यादी. ह्या सगळ्या रुपककथा आहेत. शिळा उचलून धरणे सुद्धा. त्यामुळे शिळा खरोखरीच कोणी उचलून धरलेली कि नाही हा गौण मुद्दा आहे. त्यातला गर्भित अर्थ काय आहे हे एक्स्पर्ट सांगू शकतील.

In reply to by शा वि कु

१. .
थोडं असं पाहा. मच्छीन्द्रनाथांचा जन्म ब्रम्हाचे वीर्य माश्याने गिळल्यामुळे झाला. वालखिल्य ऋषींची जन्मकथा तर अजून गमतीशीर. असेच कुठेकुठे ब्रम्हाचे आणि सूर्याचे इत्यादींचे वीर्य चित्रविचित्र ठिकाणी पडून अनेक ऋषीमुनींचा जन्म होतो. उदा- हत्तीच्या कानात, वाघाच्या पायावर इत्यादी.
या लक्षणीय कथा सांगून एकतर आपण शरीरशास्त्राचे सर्वज्ञात आणि सर्वमान्य नियम एका क्षणात धुडकावून लावले आहेत असे आम्हास वाटते. किमान स्वतःच्या जन्माची कथा आपण ऐकली असती तर आपल्याकडून असे औधृत्य झाले नसते असे ही वाटून गेले. शिवाय शरीरशास्त्राचा अभ्यास नसलेले अशिक्षित सुद्धा, स्वानुभवाधारित असा थोडाफार विचार करु शकले तर या कथा ऐकून अचंबित होण्याची शक्यता शून्य असावी. ते एक असो, सामाजिक दृष्ट्या सुद्धा अशी इथे-तिथे सांड-लवंड बरी नव्हे, असा ही एक भाबडा विचार मनाला स्पर्शून गेला. या मानसिक धक्यातून सावरत पुढे वाचले असता थोडा दिलासा मिळाला हे मात्र नमूद करण्या जोगे आहे. २.
ह्या सगळ्या रुपककथा आहेत. शिळा उचलून धरणे सुद्धा. त्यामुळे शिळा खरोखरीच कोणी उचलून धरलेली कि नाही हा गौण मुद्दा आहे. त्यातला गर्भित अर्थ काय आहे हे एक्स्पर्ट सांगू शकतील.
या प्रकारच्या कथा ग्रंथात सुरुवातीलाच उधृत केल्या आहेत असे आम्हास येथिल तर्कनिष्ठ सदस्य श्री गापै यांच्या प्रतिसादातून नुकतेच समजले. त्यामुळे शिळा तरंगवणे काय की डेड स्टेनोला हाक मारुन उठवणे काय की श्रीहरी यांना जेवू घालणे काय या कपोलकल्पित घटना आहेत असे इथले कुणीही सदस्य मानत नाहीत हे आपल्या अजून लक्षात आले नाही काय ? अन्यथा आम्हाला इतका प्रतिसाद प्रपंच का करावा लागला असता बरे ? आमच्या अल्पमती नुसार सदर कथांमागे एकच रहस्य असावे ते असे की सर्व भक्तगणांना कमालीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स यावा कारण सर्वांचा जन्म नॉर्मल-कोर्समधे इंटरकोर्स होऊन झालेला असतो. मग त्यांनी त्या कथा जशाच्या तश्या पुढे सरकवाव्या आणि पुढच्यांनी त्या विचार न करता डायरेक्ट `हृदयस्थ कराव्या ' ! नाही तर या चित्त-चक्षू चमत्कारिक कथा हजारो वर्षानंतर आज २५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या? याचा आपण विचार करावा. आणि तो विचार करुन झाल्यावर आज इथले सन्माननीय सदस्य, आमच्या एका सोप्या ध्यानपद्धतीची प्रचितीच न घेता ती परस्पर बाद ठरवून; आमच्याशी नाहक वाद घालून आम्हाला अहंकारी, अतींद्रीय शक्तींची माहिती नसलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी दूषणे देऊन त्या कथा प्राणपणाने का जपत असावेत बरे ? याचाही मागोसा घ्यावा असे सुचवेन. याप्रकारे आपला समग्र अभ्यास झाल्यावर आमच्या दुसर्‍या लेखात आम्ही इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हाच सत्योपलब्धित एकमेव अडथळा आहे असे का म्हटले असावे बरे ? हे एखादे वेळी आपल्याला उलगडण्याची शक्यता आम्हास वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

माझा (निनावी) उल्लेख केला आहात म्हणून सांगतो, एका काळ्या जादूचा मी एकदा अत्यंत ओझरता अनुभव घेतला आहे, आणि त्या ओझरत्या अनुभवाने माझे अशी काही पिवळी झाली होती की आता विज्ञाननिष्ठ अध्यात्म म्हटले की हसायलाच येते. मी इतरत्र देखील सांगितले आहे, मी सत्य पाहिलेले नाही, पण सत्याचा आणि अतींद्रिय जगाचा अत्यंत ओझरता अनुभव घेतलेला आहे, आणि तो इतका तीव्र आहे की सत्य म्हणजे काय असेल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरलेली नाही, आणि त्याचबरोबर या जगात आपण किती छोटे आहोत याचा देखील अनुभव दुर्दैवाने मी घेतला आहे, त्यामुळे त्याबद्दल देखील मला शंका उरलेली नाही. संक्षी परत सांगतो - तुम्हाला जे मिळाले आहे ते काहीतरी ठोस आहे यात वाद नाही, पण इतरांना नावे ठेवणे, तीव्र तर्कवाद , अपलाच मार्ग खरा आणि बुद्धीच्या बळावर सत्य जाणण्याचा प्रयत्न करणे हे मला तुमच्या पुढील वाटचालीच्या दॄष्टीने धोकादायक वाटते. तुम्हाला अनुयायी मिळतील, नावाजणारे लोक मिळतील पण तुमची प्रगती थांबेल. वर शाम भागवत काय म्हणत आहेत ते देखील वाचा. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच. तुमच्या वाटचालीस शुभेच्छा! इत्यलम|