Skip to main content

रोमान्स विथ मुझिक

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 25/10/2020 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो. आवजातला गोडवा, ताल-सुराचं ज्ञान, शब्दांवर टाकायचं नेमकं वजन तुम्हाला यथावकाश आपसूक जमायला लागतात. १. अँड्रॉइड तानपुरा हे फ्री अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन मोबाईलवर डाऊनलोड करा. त्यातला तानपुरा काळी एक किंवा तुम्हाला हा शब्द स्वरासारखा सहज उच्चारता येईल त्या स्केलला सेट करा. नाऊ यू आर ऑल सेट ! २. तुम्हाला फक्त ही सात व्यंजनं तानपुर्‍यात सेट केलेल्या ध्वनीशी जुळवायची आहेत : >, >, > , > , > इ (ई), > उ (ऊ), > अं कोणत्याही शांतवेळी हेडफोन लावा, सेट केलेला तानपुरा चालू करा आणि ही व्यंजनं स्वरासारखी म्हणून तानपुर्‍याच्या ध्वनीशी जुळवत म्हणा. तानपुर्‍याचा ध्वनी आणि तुमचं उच्चारण यांचा रेझोनन्स मॅच करत जा. नी सुरुवात करा. डोळे बंद ठेवा म्हणजे अवधान एकाग्र होईल आणि तुम्हाला रेझोनन्सचा नेमका फिल येईल. पहिला स्वर जुळता क्षणी तुम्हाला कमालीचा आनंद होईल. गाणं म्हणजे फक्त उच्चारणाला किती जोर लावायचा याचं भान आहे. या भानाचा नेमका अंदाज नसल्यानं आपला स्वर बेसूर होतो इतकाच काय तो सुरांचा फंडा आहे. वर सांगितलेली सर्व व्यंजनं शांतपणे तानपुर्‍याच्या ध्वनीच्या रेझोनन्सशी जुळवत म्हणत रहा. हा अत्यंत बेसिक रियाज़ आहे. त्यानं तुम्हाला उच्चारणाला लावायच्या जोराचं नेमकं भान येईल. एकदा हे जमलं की तुमची निम्मी तयारी झाली. ३. आता तुमच्या आवडीचं कोणतंही एक (आणि फक्त एकच) गाणं घ्या. सुरुवातीला एकच गाणं सिलेक्ट करणं आगत्याचं आहे कारण मनाची धरसोड वृत्ती प्रचंड आहे. हे जमत नाही की ते असं करत मनाच्या मागे गेलात तर सगळा प्रोजेक्टच फेल होईल. त्या गाण्याची लिरिक्स गीतमंजूषा या साइट वरुन डाऊनलोड करा; म्हणजे लिरिक्सचा सरळ स्क्रीन शॉट घ्या. गाण्यावर प्रेम याचा अर्थ गाण्याच्या शब्दांनी तुम्हाला मोह घातला आहे. तुम्हाला गाण्याची लिरिक्स पाठ आहेत आणि चाल तुम्हाला पक्की माहिती आहे. तुमची चाल इतकी पक्की आहे की लिरिक्सचा स्क्रीन शॉट समोर असेल तर तुम्ही ते गाणं सरळ चालीत म्हणू शकाल. गाणं तालात हुकण्याची फक्त दोनच कारणं आहेत. एक, लिरिक्स पाठ नसणं आणि दोन, चाल पक्की नसणं. यापरता तालात चूक होण्याचं तिसरं कारण जगात नाही. ४. आता तुम्हाला फक्त गाण्याच्या शब्दांचे स्वर करायचे आहेत की यू आर ऑलमोस्ट डन ! ते काम विशेष अवघड नाही, कसं ते पाहा: आया है मुझे फिर याद वो जालीम हे गाण्याचे शब्द आहेत. आता प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारणात (किवा एखादं अक्षर चालीत लांबवलं असेल तर त्या अक्षराच्या उच्चारणात) वरच्या पैकी कोणतं तरी एक व्यंजन आहे, तेवढं शोधलं की त्या शब्दाचा स्वर होतो; असा : आया (आ आ आ) है () मुझे.. (ऐ ऐ ऐ) फिर () या...(आ,आ,आ) ( ) वो () जा()लि(अं) एकदा तुम्हाला ही शब्दाचा स्वर करायची कॢप्ती जमली की तुमच्या आवजातला गोडवा तुम्हाला जाणवायला लागेल. हे काम तुम्हाल सगळ्या गाण्यातल्या तीन प्रकारच्या अक्षरांवर करायचं आहे : अ) शब्दातलं शेवटचं अक्षर ब) चालीत लांबवलेलं अक्षर क) चालीत ठहराव असलेलं अक्षर आता तुम्ही ठेक्यात गायला तयार झालात ! ५. स्म्यूल सोशल सिंगींग अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. हे अत्यंत उत्तम कराओके अ‍ॅप, १५० रुपयात वर्षभरासाठी उपलब्ध आहे (केवळ करोनामुळे !) आता रिदमचा एकमेव फंडा आहे, इअर फोन्स चढवल्यावर ठेका तुम्हाला मेंदूच्या बरोबर मधे (म्हणजे नाकाच्या इग्झॅक्ट मागे) ऐकू यायला हवा. आणि तो संपूर्ण गाण्यात तिथून हालता कामा नये. आता इअर फोन लावा, तुमचं आवडतं गाणं स्म्यूलवर सुरु करा आणि फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा. जोपर्यंत ठेका सेंटर होत नाही तोपर्यंत गाणं अजिबात म्हणू नका. एकदा ठेका सेंटर झाला की गाणं तुमच्या आतून आपोआप सुरु होईल ! डोळे बंद करुन ठेका ऐकत गाणं म्हणा. लिरिक्स समोर डिस्प्ले होतीलच पण त्यांचा फक्त अंदाज़ घेऊन, पुन्हा तालाबरोबर चाल जुळवा कारण लिरिक्स तुम्हाला पाठ आहेत आणि चाल तुम्हाला माहिती आहे. तिथं पॉज, रिज्युम (असाल तिथून पुन्हा सुरुवात) आणि रिस्टार्ट (पुन्हा पहिल्यापासून) अशा तीन्ही सोयी आहेत. गाणं संपल्यावर ते पब्लिक करुन (ते तिथे तुमच्याच चॅनेलवर रहातं, कुणी काही ऐकत-बिकत नाही); सेव करा. साधारण आठ-दहा दिवसात तुमच्या जीवनात सांगितिक रोमान्स सुरु होईल आणि ....... मग तो तुमची जन्मभर संगत करेल. ___________________________________________ लेखात सांगितलेलं गाणं तुमच्यासाठी इथे डेमो म्हणून अपलोड केलंय :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 49755
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे रिदम लयीचा स्पीड कंट्रोल करतो किंवा दर्शवतो हे सिद्ध होतं.

In reply to by संजय क्षीरसागर

तो फरक तालवादकासाठी आहे. गायकाला त्यानं काहीही फरक पडत नाही मग कुठल्याही गाण्याला मी तबलावादक म्हणून काहीही वाजवू शकतो? ठेका वेगात वाजवला तर लय द्रुत होईल आणि सावकाश वाजवला तर विलंबीत होईल हे तुम्हाला मान्य नाही का. गायकांनी दिलेल्या, सांगितलेल्या लयीमध्ये तालवादक ठेका धरतो. तो स्वतः लय फिक्स करत नाही,करू नये.

In reply to by तिरकीट

१. मी ठेक्याचं महत्त्व नाकारत नाही, त्यामुळेच गाणं खुलतं पण गायकाला फक्त बीटवर राहाण्याचं कौशल्य साधायचंय. एकदा मी रिदम सेंटर केला की तो रुपक असो की दादरा आणि तुम्ही ठेका कसाही लावा, रिदममधे गाण्यासाठी मला एका सिंगल बीटशी घेणं आहे. २. अर्थात ! लय गायक कंट्रोल करतो पण एकदा ताल सुरु झाल्यावर तालात गायचं म्हटल्यावर तालच लय कंट्रोल करतो आणि दर्शवतो. कदाचित तुम्ही गात नसाल त्यामुळे तुम्हाला गायकाच्या चित्तदशेची कल्पना नसेल. ती तालवादनाकडे पाहाण्याचा इक्झॅक्टली अपोझिट अँगल आहे.

In reply to by तिरकीट

तुमचा हा प्रतिसाद वाचून मला म्हणावेसे वाटते: ऐकूनी कोरडया ओढ्यातील दगड-गोट्यांचा खडखडाट झाले गहीरे पाणी नि:शब्द कारण त्याला कळून चुकले हा ओढा कोरडा आहे आणि भ्रमात आहे की आपण आहोत प्रशांत महासागर

In reply to by तिरकीट

@ तिरकीट हे पूर्ण चुकीचं वाक्य आहे तुम्ही सर्वज्ञांना असं कसं म्हणू शकता? इतकं औद्धत्य? अब्रह्मण्यम !! शिव शिव !! प्रस्तुत माहिती हि माझ्या किमान २० वर्षांच्या तबला शिक्षणानंतर कळलेली आहे. ती चुलीत घाला

In reply to by सुबोध खरे

तुमच्या प्रतिसादातला टोन कळला, पण खरंच शिकलोय हो, काय करणार त्याला.

तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे चित्रपट : दो दिल, संगीत : हेमंत कुमार, लिरिक्स : कैफी आझमी एकदा ताल सेंटर केला की प्रत्येक उच्चारण कसं बीटवर येतं हे या गाण्यातून कळेल. इअर फोन्स लावून ऐकलंत की ताल सेंटर करणं म्हणजे काय ते कळू शकेल (म्हणजे ताल नेमका मेंदूच्या मधोमध वाजतोयं हे कळेल). मग शब्द, त्यांचे अर्थ आणि चाल पक्की असेल तर तुम्ही तुमची एक छोटीशी मैफिल रंगवू शकता. ओरिजिनल गाणं तुमच्या गाण्याच्या आणि ऐकण्याच्या मधे येत नाही.

रागदारीवर आधारित हिंदी गाणी म्हणणं हा त्या रागाशी परिचित होण्याचा सर्वात सोपा आणि अत्यंत मोहक अनुभव आहे. सोनूरिन नांवाच्या एका युवतीनं स्म्यूलवर हे सोलो गाणं, द्वंद्व गीत म्हणून गाण्यासाठी इन्वाइट पाठवला होता. इअर फोन्स लावून ऐकलंत तर तुम्हाला कोणत्याही तालात किती सहजतेनं गाता येतं आणि शास्त्रीय संगीत न शिकता सुद्धा रागात बांधलेल्या बंदिशीनी एक छोटी मैफिल कशी सजवता येते याची कल्पना येईल. ______________________ छू लेने दो नाजूक होटोंको संगीत : रवी गीत : साहिर लुधियानवी मूळ गायक : रफी .

आज की मुलाकात बस इतनी - विथ सौम्या चित्रपट : भरोसा संगीतकार : रवि गीतकार : राजिन्दर कृष्ण मूळ गायक : लता मंगेशकर, महेन्द्र कपूर _________________________________ जलद गाणी म्हणतांना तुम्हाला शब्द, चाल आणि भवाभिव्यक्ती यांचं एकावेळी भान ठेवावं लागतं. नुसते शब्द बरोबर आले तर ते पाठांतर होईल, चाल लक्षात राहणं ही स्मृतीची एक वेगळीच फॅकल्टी आहे ( म्युझिकल मेमरी); त्यामुळे गाणं म्हणतांना नुसतं फोकसिंग होत नाही, आनंदपण होतो. जलद गातांना अत्यंत कमी कालावधीत शब्दातून भाव व्यक्त करावा लागतो; त्याची मजा काही औरच आहे. ऐका आणि तुम्ही पण ट्राय करा. .

चाल माहिती होती पण पूर्वी हे गाणं कधीही म्हटलं नव्हतं. फेवरिट लिस्टमधे नसल्यानं लिरिक्सपण पक्की पाठ नव्हती. सहगायिकेचा साधासा आवाज ऐकून एकदम म्हणायचा मूड आला. ऐनवेळी हे गाणं रफीचं आहे का किशोरचं ते ही कन्फ्युजन होतं. ही नेमकी स्वतःच्या स्टाईलमधे म्हणायची संधी होती ! चित्रपट : गंगा की लहरें संगीतकार : चित्रगुप्त गीतकार : मजरूह सुलतानपुरी मूळ गायक : किशोर कुमार / लता मंगेशकर

पहीलं गाणं ऐकल्या नंतर दुसरे ऐकावेसे वाटले नाही, बाकी तुमचे चालू द्या. मी माझे प्राजंळ मत मांडले, वाद घालण्यात रस नाही.

In reply to by सुचिता१

जे इंटरेस्टेड आहेत त्यांना गाता यावं यासाठी ही पोस्ट आहे. इथे जितकी गाणी अपलोड होतील आणि त्यावर विधायक टिका / कौतुक काय होईल त्यातून सर्वांना गाण्याचा हुरुप येईल असा हेतू आहे.

सुरुवात सोप्या गाण्यानी करुन तुम्ही यथावकाश मोठ्या फ्रेजेस असलेली आणि तालाशी खेळणारी गाणी म्हणू शकता. ऐका : ओ सनम तेरे हो गए हम - विथ आर्ची गीतकार : शैलेन्द्र, गायक : लता - रफी, संगीतकार : शंकर जयकिशन, चित्रपट : आई मिलन की बेला

काराओके व्यवस्थित पणे आणि थोडासा प्रयत्न करून कधी वापरले नव्हते. त्यामुळे स्टारमेकर नावाचे चकटफू ऍप घेऊन प्रयत्न केला. स्टारी स्टारी नाईट- डॉन मॅकलिन
विंग्रजी उच्चार काही ठिकाणी अस्पष्ट आहेत म्हणून लिरिक्स देतो:
Starry, starry night Paint your palette blue and grey Look out on a summer's day With eyes that know the darkness in my soul Shadows on the hills Sketch the trees and the daffodils Catch the breeze and the winter chills In colors on the snowy linen land Now I understand What you tried to say to me And how you suffered for your sanity And how you tried to set them free They would not listen, they did not know how Perhaps they'll listen now Starry, starry night Flaming flowers that brightly blaze Swirling clouds in violet haze Reflect in Vincent's eyes of china blue Colors changing hue Morning fields of amber grain Weathered faces lined in pain Are soothed beneath the artist's loving hand Now I understand What you tried to say to me And how you suffered for your sanity And how you tried to set them free They would not listen, they did not know how Perhaps they'll listen now For they could not love you But still your love was true And when no hope was left in sight On that starry, starry night You took your life, as lovers often do But I could have told you, Vincent This world was never meant for one As beautiful as you Starry, starry night Portraits hung in empty halls Frameless heads on nameless walls With eyes that watch the world and can't forget Like the strangers that you've met The ragged men in the ragged clothes The silver thorn, a bloody rose Lie crushed and broken on the virgin snow Now I think I know What you tried to say to me And how you suffered for your sanity And how you tried to set them free They would not listen, they're not listening still Perhaps they never will