गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो. आवजातला गोडवा, ताल-सुराचं ज्ञान, शब्दांवर टाकायचं नेमकं वजन तुम्हाला यथावकाश आपसूक जमायला लागतात.
१. अँड्रॉइड तानपुरा हे फ्री अॅप प्ले स्टोअरवरुन मोबाईलवर डाऊनलोड करा. त्यातला तानपुरा काळी एक किंवा तुम्हाला आ हा शब्द स्वरासारखा सहज उच्चारता येईल त्या स्केलला सेट करा. नाऊ यू आर ऑल सेट !
२. तुम्हाला फक्त ही सात व्यंजनं तानपुर्यात सेट केलेल्या ध्वनीशी जुळवायची आहेत :
> अ,
> आ,
> ए,
> औ,
> इ (ई),
> उ (ऊ),
> अं
कोणत्याही शांतवेळी हेडफोन लावा, सेट केलेला तानपुरा चालू करा आणि ही व्यंजनं स्वरासारखी म्हणून तानपुर्याच्या ध्वनीशी जुळवत म्हणा. तानपुर्याचा ध्वनी आणि तुमचं उच्चारण यांचा रेझोनन्स मॅच करत जा. आ नी सुरुवात करा. डोळे बंद ठेवा म्हणजे अवधान एकाग्र होईल आणि तुम्हाला रेझोनन्सचा नेमका फिल येईल.
पहिला स्वर जुळता क्षणी तुम्हाला कमालीचा आनंद होईल. गाणं म्हणजे फक्त उच्चारणाला किती जोर लावायचा याचं भान आहे.
या भानाचा नेमका अंदाज नसल्यानं आपला स्वर बेसूर होतो इतकाच काय तो सुरांचा फंडा आहे.
वर सांगितलेली सर्व व्यंजनं शांतपणे तानपुर्याच्या ध्वनीच्या रेझोनन्सशी जुळवत म्हणत रहा. हा अत्यंत बेसिक रियाज़ आहे. त्यानं तुम्हाला उच्चारणाला लावायच्या जोराचं नेमकं भान येईल. एकदा हे जमलं की तुमची निम्मी तयारी झाली.
३. आता तुमच्या आवडीचं कोणतंही एक (आणि फक्त एकच) गाणं घ्या. सुरुवातीला एकच गाणं सिलेक्ट करणं आगत्याचं आहे कारण मनाची धरसोड वृत्ती प्रचंड आहे. हे जमत नाही की ते असं करत मनाच्या मागे गेलात तर सगळा प्रोजेक्टच फेल होईल.
त्या गाण्याची लिरिक्स गीतमंजूषा या साइट वरुन डाऊनलोड करा; म्हणजे लिरिक्सचा सरळ स्क्रीन शॉट घ्या.
गाण्यावर प्रेम याचा अर्थ गाण्याच्या शब्दांनी तुम्हाला मोह घातला आहे. तुम्हाला गाण्याची लिरिक्स पाठ आहेत आणि चाल तुम्हाला पक्की माहिती आहे. तुमची चाल इतकी पक्की आहे की लिरिक्सचा स्क्रीन शॉट समोर असेल तर तुम्ही ते गाणं सरळ चालीत म्हणू शकाल.
गाणं तालात हुकण्याची फक्त दोनच कारणं आहेत. एक, लिरिक्स पाठ नसणं आणि दोन, चाल पक्की नसणं. यापरता तालात चूक होण्याचं तिसरं कारण जगात नाही.
४. आता तुम्हाला फक्त गाण्याच्या शब्दांचे स्वर करायचे आहेत की यू आर ऑलमोस्ट डन ! ते काम विशेष अवघड नाही, कसं ते पाहा:
आया है मुझे फिर याद वो जालीम हे गाण्याचे शब्द आहेत. आता प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारणात (किवा एखादं अक्षर चालीत लांबवलं असेल तर त्या अक्षराच्या उच्चारणात) वरच्या पैकी कोणतं तरी एक व्यंजन आहे, तेवढं शोधलं की त्या शब्दाचा स्वर होतो; असा :
आया (आ आ आ) है (ऐ) मुझे.. (ऐ ऐ ऐ) फिर (अ) या...(आ,आ,आ) द( अ) वो (ओ) जा(आ)लिम(अं)
एकदा तुम्हाला ही शब्दाचा स्वर करायची कॢप्ती जमली की तुमच्या आवजातला गोडवा तुम्हाला जाणवायला लागेल.
हे काम तुम्हाल सगळ्या गाण्यातल्या तीन प्रकारच्या अक्षरांवर करायचं आहे :
अ) शब्दातलं शेवटचं अक्षर
ब) चालीत लांबवलेलं अक्षर
क) चालीत ठहराव असलेलं अक्षर
आता तुम्ही ठेक्यात गायला तयार झालात !
५. स्म्यूल सोशल सिंगींग अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. हे अत्यंत उत्तम कराओके अॅप, १५० रुपयात वर्षभरासाठी उपलब्ध आहे (केवळ करोनामुळे !)
आता रिदमचा एकमेव फंडा आहे, इअर फोन्स चढवल्यावर ठेका तुम्हाला मेंदूच्या बरोबर मधे (म्हणजे नाकाच्या इग्झॅक्ट मागे) ऐकू यायला हवा. आणि तो संपूर्ण गाण्यात तिथून हालता कामा नये.
आता इअर फोन लावा, तुमचं आवडतं गाणं स्म्यूलवर सुरु करा आणि फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा. जोपर्यंत ठेका सेंटर होत नाही तोपर्यंत गाणं अजिबात म्हणू नका.
एकदा ठेका सेंटर झाला की गाणं तुमच्या आतून आपोआप सुरु होईल !
डोळे बंद करुन ठेका ऐकत गाणं म्हणा. लिरिक्स समोर डिस्प्ले होतीलच पण त्यांचा फक्त अंदाज़ घेऊन, पुन्हा तालाबरोबर चाल जुळवा कारण लिरिक्स तुम्हाला पाठ आहेत आणि चाल तुम्हाला माहिती आहे.
तिथं पॉज, रिज्युम (असाल तिथून पुन्हा सुरुवात) आणि रिस्टार्ट (पुन्हा पहिल्यापासून) अशा तीन्ही सोयी आहेत. गाणं संपल्यावर ते पब्लिक करुन (ते तिथे तुमच्याच चॅनेलवर रहातं, कुणी काही ऐकत-बिकत नाही); सेव करा.
साधारण आठ-दहा दिवसात तुमच्या जीवनात सांगितिक रोमान्स सुरु होईल आणि ....... मग तो तुमची जन्मभर संगत करेल.
___________________________________________
लेखात सांगितलेलं गाणं तुमच्यासाठी इथे डेमो म्हणून अपलोड केलंय :
वाचने
49755
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख वाचला आणि गाणेही ऐकले
@ ज्ञानोबाचे पैजार : तुमची दोन्ही एक्स्ट्रीम उदाहरणं
In reply to लेख वाचला आणि गाणेही ऐकले by ज्ञानोबाचे पैजार
पटलं..
In reply to लेख वाचला आणि गाणेही ऐकले by ज्ञानोबाचे पैजार
@ चिगो : अभार्स !
In reply to पटलं.. by चिगो
तुमच्या त्रासाबद्दल कल्पना नव्हती..
In reply to @ चिगो : अभार्स ! by संजय क्षीरसागर
@ चिगो : पुनश्च धन्यवाद !
In reply to तुमच्या त्रासाबद्दल कल्पना नव्हती.. by चिगो
@ चिगो : ही घ्या तुमची फरमाईश !
In reply to @ चिगो : पुनश्च धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
तिसरं कडवं कुठे मिळाले ?
In reply to @ चिगो : ही घ्या तुमची फरमाईश ! by संजय क्षीरसागर
@ मराठी_माणूस : ते स्म्यूलवरच होतं !
In reply to तिसरं कडवं कुठे मिळाले ? by मराठी_माणूस
मस्त
In reply to @ मराठी_माणूस : ते स्म्यूलवरच होतं ! by संजय क्षीरसागर
मस्त..
In reply to @ चिगो : ही घ्या तुमची फरमाईश ! by संजय क्षीरसागर
@ चिगो : थँक्यू !
In reply to मस्त.. by चिगो
फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका
@ सोत्रि : शाब्बास ! तालाचा नेमका मुद्दा पकडला आहे.
In reply to फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका by सोत्रि
छान सुरमयी माहिती आहे.
@ Bhakti : धन्यवाद !
In reply to छान सुरमयी माहिती आहे. by Bhakti
मस्त
@ मराठी_माणूस : जसं जसं लोकांच्या जीवनात गाणं येईल
In reply to मस्त by मराठी_माणूस
मी बर्याच दिवसापासुन हे करत
In reply to @ मराठी_माणूस : जसं जसं लोकांच्या जीवनात गाणं येईल by संजय क्षीरसागर
@ मराठी_माणूस : छान !
In reply to मी बर्याच दिवसापासुन हे करत by मराठी_माणूस
काही karaoke Tracks मेमरी
In reply to @ मराठी_माणूस : छान ! by संजय क्षीरसागर
@ मराठी_माणूस : सोशल सिंगींग अॅपवर
In reply to काही karaoke Tracks मेमरी by मराठी_माणूस
तुमचा लेख आणि प्रतिसाद दोन्ही
@ अमर विश्वास : येस !
In reply to तुमचा लेख आणि प्रतिसाद दोन्ही by अमर विश्वास
स्वतःचे गाणे ऐकायची एकही संधी
In reply to @ अमर विश्वास : येस ! by संजय क्षीरसागर
@ अमर विश्वास : अर्थात !
In reply to स्वतःचे गाणे ऐकायची एकही संधी by अमर विश्वास
इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदांही यमनमधली सुरेख ट्यून एखाद्या रिसॉर्टच्या कराओकेवर, खुल्या आकाशाखाली एखाद्या सुरेल तरुणी बरोबर गात, तीन मिनीटांची का होईना आपणही मैफिल जमवू शकतो.तंतोतंत!
In reply to @ अमर विश्वास : अर्थात ! by संजय क्षीरसागर
@संजय क्षीरसागर
In reply to @ अमर विश्वास : येस ! by संजय क्षीरसागर
@ उपयोजक : एकूणात मन म्हणजे नक्की काय
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
मस्त संक्षी , नक्की करुन बघीन
@ राजाभाउ : ये बात !
In reply to मस्त संक्षी , नक्की करुन बघीन by राजाभाउ
जब वी मेट नावाच्या चित्रपटात
@ वीणा३ : "मै मेरी फेव्हरेट हूं " ! सॉल्लीड !
In reply to जब वी मेट नावाच्या चित्रपटात by वीणा३
आनंद म्हणजे स्वतःच्या कंपनीत खुश असणं !ओशो म्हणतात, सिद्ध किसीके विपक्षमे नही है, वो बस अपने पक्षमे आ गया है | पोस्टमधे सांगितलेला सराव तुम्हीही करा. आनंदात रहाण्याची आयडीया तुम्हाला कळली आहे. मी तर इथे एकसोएक गाणी अपलोड करीनच पण स्म्यूलवर आलात की नक्की कळवा... एखादं ड्युएट तुमच्याबरोबरही गायला मजा येईल. ऑल द बेस्ट !लिखाण आणि प्रतिसादात व्यक्त
@ शेखरमोघे : थँक्स अ लॉट !
In reply to लिखाण आणि प्रतिसादात व्यक्त by शेखरमोघे
सुरेख लेख
@ Jayant Naik : थँक्स जयंता !
In reply to सुरेख लेख by Jayant Naik
संक्षी,
@ शा वि कु : लाईफ म्हणजे तुम्हाला मिळालेला
In reply to संक्षी, by शा वि कु
छान अभिनंदन
चांगला आहे लेख.
माझे एक परिचित
In reply to चांगला आहे लेख. by चित्रगुप्त
@ उपयोजक : येस !
In reply to माझे एक परिचित by उपयोजक
माझे एक परिचित
In reply to चांगला आहे लेख. by चित्रगुप्त
बहुतांशी ४५ वयाच्या पुढचे
@ उपयोजक : प्रश्न बरोबर असला तरी
In reply to बहुतांशी ४५ वयाच्या पुढचे by उपयोजक
@संजय क्षीरसागर
In reply to @ उपयोजक : प्रश्न बरोबर असला तरी by संजय क्षीरसागर
@ उपयोजक : गाणी गाण्याचा छंद तुम्हाला
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
छान लेख ! चला सारे गाऊ या..
मुद्दा ५ सोडुन बाकी सहमत.
In reply to छान लेख ! चला सारे गाऊ या.. by कळस
@ : कळस : शाब्बास ! याला म्हणतात अनुभवातून आलेला प्रतिसाद !
In reply to छान लेख ! चला सारे गाऊ या.. by कळस
@ : कळस : शाब्बास ! याला म्हणतात अनुभवातून आलेला प्रतिसाद !
In reply to छान लेख ! चला सारे गाऊ या.. by कळस
गातांना आपलं गाणं आपण ऐकायला हवं.२. लिरिक्स हुकली तर स्वरापेक्षाही ताल हुकतो ! लिरिक्स बर्यापैकी नाही तर फुल पाठच हवीत. गाणं हे नाटकाच्या संहितेसारखं आहे. तुम्ही जगातला कितीही भारी नट स्टेजवर उभा करा, पाठांतर नसेल तर त्यानी माती खाल्लीच म्हणून समजा ! गाणं हा सांगितीक अभिनय आहे त्यामुळे लिरिक्स तर पाठ हवीतच आणि त्याही पुढे जाऊन त्यांचा अर्थ माहिती हवा. कारण भावाभिव्यक्ती अर्थ समजल्याशिवाय असंभव आहे.प्रत्येक गाणं ही गायकाच्या स्वानुभवाची सांगितिक भावाभिव्यक्ती आहेएकदम सही ! पण मेंदूतल्या गाण्याबरहुकूम गाणं नाही तर गाण्याचा महौल (मूड) लक्षात घेऊन गायला हवं. ४. पर्फेक्ट ! गाण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात : रोमँटिसिजम आणि स्वतःचं गाणं ऐकण्याची इच्छा. मग बाकी सगळं आपोआप जुळून येईल. ६. बरोब्बर !इंपॅक्टसाठी ते गाणं मूळ गायकाचं न राहता तुमचं व्हायला हवं !तुमच्या गाण्याची एखादी क्लिप इथे टाकाल का ? किंवा मला नक्की व्यनी करा. अशा सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार्स !कळस
In reply to छान लेख ! चला सारे गाऊ या.. by कळस
धन्यवाद..
वा खूप छान धागा आहे संक्षि.
@ विजुभाऊ : तालाचा एक बेसिक फंडा काढला आहे,
In reply to वा खूप छान धागा आहे संक्षि. by विजुभाऊ
@ विजुभाऊ : हे घ्या तुमच्यासाठी एक सोपं गाणं !
In reply to वा खूप छान धागा आहे संक्षि. by विजुभाऊ
प्रत्येक मुलगा कष्टाने आय आय
स्म्यूलवर, तुम्ही एखादी चांगलं गाणारी सहगायिका
रोमान्स विथ - मोह मोह के..
@ उन्मेष दिक्षीत : ये ब्बात !
In reply to रोमान्स विथ - मोह मोह के.. by उन्मेष दिक्षीत
ठेका आणि ताल
@ गामा पैलवान :
In reply to ठेका आणि ताल by गामा पैलवान
वेग व ताल
In reply to @ गामा पैलवान : by संजय क्षीरसागर
@ गामा पैलवान : अर्थात !
In reply to वेग व ताल by गामा पैलवान
ताल आणि ठेक्याबद्दल थोडेसे...
In reply to @ गामा पैलवान : अर्थात ! by संजय क्षीरसागर
@ तिरकीट : उत्तम प्रतिसाद !
In reply to ताल आणि ठेक्याबद्दल थोडेसे... by तिरकीट
.
In reply to @ तिरकीट : उत्तम प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
संगित कुठलेही असो
In reply to . by संजय क्षीरसागर
@ तिरकीट : पुन्हा बघा !
In reply to संगित कुठलेही असो by तिरकीट