Skip to main content

घडामोडी नोव्हेंबर २०२०

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 30/10/2020 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचने 88944
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

महाराष्ट्रावर सतत होणारी हिंदी न्यूज चॅनेल ची टीका मराठी लोकांना आवडत नाही. एक तर हिंदी आणि हिंदी भाषिक लोक एवढी डोक्यावर बसली आहेत नी महाराष्ट्र आणि मराठी लोकांना हिंदी विषयी तीव्र तिरस्कार आहे . आणि नेहमी महाराष्ट्र वर च टीका करणाऱ्या हिंदी न्यूज चॅनेल विषयी पण तिरस्कार आहे. इथे ठाकरे ऐवजी फडासविस जरी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी अर्णव वर अशीच कारवाई केली असती तरी लोकांनी फडणवीस सरकार चे समर्थ न केले असते. Bjp maharashtra मध्ये हे अर्णव साठी आंदोलन करत आहे ते राज्य द्रोही काम आहे असेच येथील जनता मानते . आणि त्या मुळे ह्या प्रकरणाचा bjp ल maharashtra मध्ये बिलकुल फायदा होणार नाही. तोटा मात्र नक्की होईल.

In reply to by Rajesh188

Rajesh 188, प्रतिसादाशी सहमत, अर्णव फक्त महाराष्ट्र goverment वरती टीकाच करत नव्हता तर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत होता. आणि हेच लोकांना आवडणार नाही. काही जरी झाले तरी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत. आवडो न आवडो त्यांना आदर द्यायलाच हवा.

In reply to by Rajesh188

काल टीव्ही वर , महाराष्ट्राचे एक मंत्री पत्रकारांना काही उत्तर देत असतांना, एक पत्रकार प्रश्न विचारुन हींदीत उत्तर द्या असे म्हणत होता. त्याला मंत्र्यांनी हींदीत उत्तर दिले. एरवी इथे राहाता तर मग इथली भाषा आली पाहीजे असे म्हणतो , मग पत्रकारांचे असे हट्ट का पुरवीले जातात.

In reply to by मराठी_माणूस

ह्यांचे एके काळचे लाडके संजय राउत तर उर्दु/हिंदीत शेरोशायरी करत असतात. कोणत्याही भाषेबद्दल आकस्/तिरस्कार असता कामा नये. निदान भारतात तरी. पण गेले काही महिने मसाला पुरवण्याचे काम आपले मराठी पुढारीच करत आले आहेत. त्यामुळे पत्रकारांचे कोंडाळे तुमच्या भोवती तयार होते. उ.दा. "सुशांत सिंग रजपूतचा खूनच झाला" नारायण राणे "दिशा सालियनवर बलात्कार करून तिला मारण्यात आले" नारायण राणे/नितेश राणे "उखाड लिया" संजय राउत. कंगनाचे अनधिक्रूत बांधकाम तोडल्यावर प्रतिक्रिया "आमचे मंत्री खिशात राजीनामे घेउन फिरत असतात" २०१४-१९ ह्या कालातील शिवसेनेचे नेहमीचे वक्तव्य. ईतर राज्यातील मंत्र्यांच्या अशा प्रतिक्रिया कधी ऐकल्या आहेत?

एकट्या अर्णबमुळे काहींचे हात शिवशिवताना दिसत आहे...:))) ज्यांना हे नक्की काय चाललयं हे समजुन घ्यायंच असेल त्यांनी ६ महिने पूर्वीचा अर्णब नावाचा सापळा हा व्हिडियो नक्की पहावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?

In reply to by मदनबाण

ज्यांना हे नक्की काय चाललयं हे समजुन घ्यायंच असेल त्यांनी ६ महिने पूर्वीचा अर्णब नावाचा सापळा हा व्हिडियो नक्की पहावा. याचा भाग दोन कालच आलाय :- अर्णब गोस्वामी नावाचा सापळा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellites

In reply to by मदनबाण

पण गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत ना? मग ते शिवसेनेचा फायदा करून देतील , एवढा? कारण अर्नब सह्सा राष्ट्रवादीवर ओझरती टीका करायचा. आणी राष्ट्रवादी व भाजपा दाखवायला शत्रू असले तरी एकमेकांमध्ये मधुर नाते आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राजकारणात कोणत्याच प्रसंग मधून सरळ अर्थ निघत नाही.जसे दिसते तसे ते नसते. राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास आहे तेच राजकीय विश्लेषण करू शकतात. राजकारणात डाव वेगळ्याच पैलवणावर टाकलेला असतो आणि चीत पट दुसराच कोणता तरी पैलवान होतो. राजकीय विश्लेषण करणे एवढे सोप आणि सरळ काम नाही.

In reply to by Rajesh188

राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास आहे तेच राजकीय विश्लेषण करू शकतात. राजकारणात डाव वेगळ्याच पैलवणावर टाकलेला असतो आणि चीत पट दुसराच कोणता तरी पैलवान होतो. राजकीय विश्लेषण करणे एवढे सोप आणि सरळ काम नाही
राजेश188 मग तुम्ही राजकारणातले प्रकांडपंडित आहात कि काय. ?? तुमचे मागचे प्रतिसाद पाहून असा प्रश्न पडला.. !!

अतिशय सुखद बातमी: लुप्त झालेली अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे ! https://www.loksatta.com/maharashtra-news/revival-of-agrani-river-in-sa…

In reply to by चौथा कोनाडा

मस्तच.. कौतुकास्पद.. !! अश्या कितीतरी नद्या आणि ओढे शेवटच्या घटका मोजत आहेत.. तिथेही असे काम होणे आवश्यक आहे. रच्याकने : ही नदीजोड प्रकल्प काय होता /आहे?? यावर कुठे काही काम झालेय का आजवर?

In reply to by बाप्पू

धन्यवाद, बाप्पू. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प हा प्रचंड खर्चीक असल्याने त्यावर हळूहळू प्रयोग होत आहेत असे दिसते. काही चाचण्या यशस्वी होत आहेत ही आनंदाची बातमी आहे ! https://www.lokmat.com/national/successful-test-river-jodh-project-narm… https://www.esakal.com/ahmednagar/river-connection-project-successful-w…

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा, उत्साहवर्धक बातमी आहे. हिच्यावरून डांबरखेडा येथे मोतीलाल पाटील यांनी गोमाई नदी नांगरून आजूबाजूच्या परिसराचा जलस्तर वाढवला होता त्याची आठवण झाली. संदर्भ : https://www.facebook.com/217103811726590/posts/1252976738139287/ यावरून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नदी नांगरण्याचे प्रयोग सफल झाले आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

व्वा गा.पै. जबरदस्त बातमी आहे. नदी नांगरण्या बद्दल प्रथमच वाचले. " वॉटर मॅन ऑफ शहादा " मोतीलाल पाटील यांचे मार्गदर्शन विविध जिल्ह्यात खुपच उपयोगी पडेल. मा. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्रप्रदेश राज्य शासनाने काही प्रकल्प राबवले होते, ते यशस्वी झाले असे वाचण्यात आले होते.

राष्ट्र प्रेमी एकमेव राजकीय पक्ष म्हणजे bjp आणि bjp चे डझन भर नेते म्हणजे देश असा एक चुकीचं पायंडा अर्णव आणि त्याच्या सारख्याच काही पत्रकार नी पाडला होता . त्यांच्या देशातील (म्हणजे डझनभर bjp che नेते) लोकांवर टीका केली की देशद्रोह असले काही तरी लॉजिक ते लावत होते. त्याचाच परिणाम म्हणून पत्रकार वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. आणि अशा काही मीडिया ग्रुप मुळेच मीडिया चे स्वतंत्र पणाला लागत आहे. आणि नेहमी देशाविरुद्ध च बोलायचे नेहमी भारतीय संस्कृती वर टीका करायची अशी एक दुसरी जमात पण आहे त्यांची वेगळी मीडिया आहे. आणि ह्यांच्या स्पर्धेत सत्य कुठल्या कुठे पळून जात aahe. एकंदरीत मीडिया चा दर्जा खूपच खालावला आहे. हा कसला चोथा स्तंभ ह्यालाच आता आधार देवून उभा करायची वेळ आली आहे . जो कोणत्याच बाजूला न झुकता सरळ उभा राहील.

In reply to by Rajesh188

एक राजेशभौ फिल्टर लावायला पाहिजे, म्हणजे मीडिया काहीही आडवं तिडवं बोलणार नाही, सगळं Rajesh१८८ सर्टिफायड... पूर्ण सत्य. It ain't the truth if it ain't Rajesh१८८ approved ! Get your news approved, order now. Call 188-188-188-881 ;)

अर्णव ची रवानगी तळोजा जेल मध्ये झाली.

@ माईसाहेब आजच्या लोकरंग मध्ये एक लेख आहे. त्यात तुमच्या अर्थव्यवस्थेविषयी शंकेची उत्तरे (अचूक आहेत का नाही माहिती नाही, पण तो मुद्दा लेखात हाताळलाय). - ऑक्टोबर मध्ये जी एस टी संकलन एक लाख कोटीहून अधिक झाले. - कारच्या विक्रीने मागील काही महिन्यांचा उच्चांक गाठला. अगदी corona पूर्व काही महिन्यात विकल्या गेल्या, त्याहून अधिक कार ऑक्टोबर मध्ये विकल्या गेल्या. - लॉक डाऊन मध्ये साधारण दोन आर्थिक गट होते. एक ज्यांचं उत्पन्नाचं साधन, स्रोत एकदम शून्य झाला. त्यांना गावी परतावं लागलं. त्यांची परिस्थिती खालावली. दुसरे, ज्यांचं उत्पन्न सुरू होतं. काही व्यावसायिक, बरेच शेतकरी, दुग्ध व्यवसायातील उद्योग, एक मोठा नोकरदार वर्ग ज्यांचं काम कदाचित बंद राहिलं पण पगार चालू राहिला. - मार्च ते जुलै - ऑगस्ट या दुसऱ्या गटातील लोकांकडे पैसा होता पण तो खर्च होत नव्हता. हे लॉक डाऊन मधील dolgona कॉफी, केक्स, जिलेबी वरून दिसलंच. एक (बहुसंख्य नव्हे) मोठा वर्ग खर्च करायला वाट बघत होता. साधारण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मार्केट बऱ्यापैकी चालू झालं. खर्च न केलेले लोक खर्च करू लागले. चार पाच महिने पैसा मुख्यत्वे खाण्या पिण्यावर खर्च होत होता. आता लोक मोबाईल व कार घेऊ लागले. ऑक्टोबर पासून जे विविध online सेल्स चालू आहेत त्यात हातोहात मोबाईल खपत आहेत. मोटासायकल खप वाढलेला नाही. कारचा खप मात्र खूप वाढलाय. यातून लक्षात येतं की खर्च कोणता वर्ग करतोय. लोकरंग मधील लेख. बोगदा अजून संपलेला नाही.. लेखक मंगेश सोमण

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद रे पैलवाना. Bajaj Auto’s domestic sales rose by 11 percent from 2,42,516 units in October last year to 2,68,631 units in October this year. Suzuki Motorcycle India Pvt Ltd (SMIPL) recorded 76,865 unit sales in October 2020. Breaking last year’s festive record, SMIPL registered a 3% jump in October 2020 overall monthly sales as compared to the same month in the previous year. https://www.financialexpress.com/auto/bike-news/two-wheeler-sales-octob… मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे असे दिसते आहे. मग दुचाकीची मागणी कुठे अडखळत आहे ते सोमण कोनत्या आधारावर म्हणतात? सणासुदीमुळे खरेदी जास्त झाली असे आता म्हणत आहेत. मग नंतर नव्या-वर्षाचे निमित्त म्हणून खरेदी जास्त झाली असे म्हणतील. असो. "आता लोक मोबाईल व कार घेऊ लागले" ते आधीही घेत होतेच. आणी आधी अर्थ्व्व्यवस्था 'अतिशय संकटात आहे" , अर्थ्व्यवस्थेने मान टाकलेली' आहे असे सगळे जण म्हणत होते. मग ही अशी ८/९ लाखाची खरेदी?.. सांगायचा मुद्दा- आपली अर्थ्व्यवस्था खरोखरच कधी खराब होती का ? ५०/६० हजारचे आय-फोन घेणारे लोक, ह्यांना नोकरी/धंद्याबद्दल काहीच चिंता वाटत नव्हती? जे ३०/४० लाखाच्या गाड्या घेतात त्यांना नक्किच हे असेच चालू राहील ह्याची खात्री असली पाहिजे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एप्रिल मध्ये आमच्या पगारात कपात झाली तेव्हा अशी चर्चा होती की लोकांना काही पर्याय नाही, ते सोडून नाही जाऊ शकत. पण लोक दणादण राजीनामा देताहेत, त्यांना नव्या नोकऱ्या मिळताहेत, नवीन लोक आमच्या इथे येताहेत. साला मंदी फक्त आमच्या पगारात आहे.

In reply to by तुषार काळभोर

खरे आहे. हल्लि तो 'जॉयनिंग बोनस' वगैरेही देतात असे ऐकले आहे. पुर्वी ओळखीने कुणी नोकरीने लागला की "वशिल्याने" लागला म्हणून हिणवत. आता कुणी कुणाला नोकरीला लावला की 'रेफेरल बोनस' देतात असे ऐकले आहे.

In reply to by शा वि कु

विक्रीचे कोणतेही आकडे सांगितले तरी १३० कोटी पैकी एवढेच? असे म्हम्टले तर गेल्या ५० वर्षात काहीच झाले नाही असे म्हणावे लागेल. जर्मन कंपनी बॉश ही साधारण वर्षाला २५,००० डिश-वॉशर्स भारतात विकत असे. हल्ल्लिच विचारणा केल्यावर एका डीलरने सांगितले की सध्या एकूण मागणी पाच लाखाची आहे. सहा महिन्यात ५ लाखाची मागणी. करोनाच्या भीतीने हा आकडा नक्कि वाढला. पण ३५-४०००० रुपयांचा डीश-वॉशर घेण्याची एवढ्या लोकांची ऐपत आहे.
गाडी घेणारे लोकं नक्की किती वाढले हे नक्की कळायला हवं.
९०% लोकांची पहिलीच गाडी असते. मर्सेडिझ्/ऑडी वगैरे घेणार्यांची ती दुसरी/तिसरी गाडी असते. मुद्द्दा हा आहे की "लाखो नोकर्या जात आहेत.. व्यवसाय बंद पड्त आहेत.." असे अर्थतज्ञ सांगत असताना सगळीकडेच खरेदीसाठी एवढी झुंबड कशी? राजकीय भूमिकेतून बाहेर येउन ह्यावर उहापोह व्हावा ही अपेक्षा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एक साधा गुगल सर्च केला. त्यात भारतात १००० व्यक्तींमागे २२ गाड्या असतात असे दिसून आले. बाकी १३०कोटीशी तुलना गंडली आहे, मान्य. पण तरीही 550 आणि 95000 इतकेच पुरेसे वाटत नाही. 95000 लोकांना नवीन गाडी घेणे परवडते ह्यातून मला खरंच काही वेगळं दिसत नाही. तुमचा प्रश्न नक्कीच योग्य आहे खरे.

In reply to by शा वि कु

त्या 22 पण कर्जाची सहज सुविधा आहे म्हणून. नाही तर गाडी घेण्याची ती पण आकडेवारी कमी होवू शकते. गाडी विकत घेतल्या नंतर त्या गाडीची सर्व्हिस,तिचे व्यवस्था करणे ह्या वर खर्च करण्याची क्षमता त्या गाडी मालक कडे नसते. पेट्रोल च्या दरात थोडी जरी वाढ झाली तरी ती सोसण्याची ताकत खूप गाडी वाल्या मध्ये नसते.

घरगुती वापराच्या वस्तू 0 रुपये भरून हफ्त्याने घरी घेवून जावू शकता जवळ जवळ सर्वच वस्तू वर ही सुविधा आता आहे. आणि त्या मुळे लोकांकडे पैसे नसले तरी चैनी च्या वस्तू खरेदी करण्याकडे जोर आहे. ज्या वस्तू वर अशी सुविधा नाही त्या वस्तूंच्या विक्रीत बिलकुल वाढ झालेली नसणार. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत हे सत्य च आहे. अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. अनेक व्यवसाय बंद पडलेले आहेत. बँकांचा नफा प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे. Apr मध्ये सर्वच कंपन्या नफा तोटा जाहीर करतील तेव्हा अजुन चित्र स्पष्ट होईल.

In reply to by Rajesh188

कॅनरा बँकेचा नफा ४४४ कोटी. गेल्या वर्षी त्याच तिमाहीत नफा होता-३६४ कोटी. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/earnings/canara-ban… एच डी एफ सीचाही नफा वाढला- https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/earnings/hdfc-bank-… एस बी आयचा नफाही वाढला- https://www.livemint.com/companies/company-results/sbi-net-profit-rises… आता हे आकडे फसवे आहेत असे म्हणणार का?

In reply to by Rajesh188

हे सगळं बोलयच्या आधी तुम्ही नेमका काय अभ्यास केलाय?? पप्पू ची भाषण ऐकलीत कि सामना चा अग्रलेख वाचला.. ??

भारतीय न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणे ची वारस आहे . न्यायालय पेशव्यांना ओळखत नाही असे सांगणारे रामशास्त्री प्रभुणे . बकवास नाटक बाज अर्णव चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

In reply to by Rajesh188

भारतीय न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणे ची वारस आहे . आपण कोणत्याही भ्रमात रहा पण अशी हास्यास्पद विधानं करून लोकांची दिशाभुल करू नका. या अधुनिक रामशास्त्र्यांच्या नेमणूका कशा होतात हे माहीत नसेल तर अभिषेक मनू सिंघवी हे नाव आठवा. या पद्धतीने लायकी नसतान वर चढवलेल्या या अधुनिक रामशास्त्र्यां कडुन कपिल सिब्बल सारखे वकिल तीस्ता सेटलवाड साठी फोन वरून जामिन मिळवतात. .यांच्या कडून याकुब मेमन या आतंकवाद्याची फाशी स्थगीत करण्या साठी रात्री 2 वाजता कोर्ट बसवले जाते. यांच्य कडून चिदंबरमला 22 वेळा जामिन मिळतो. याच्या पैकीच एक अभय ठिपसे हे नाव ऐकले असेल. निवृत्ती नंतर या अधुनिक रामशास्त्र्यांनी कॅांग्रेस मधे प्रवेश केला व त्यांना नीरव मोदीचे होउ घतलेले प्रत्यार्पण थांबवण्या साठी कायदेशीर सल्लागार म्हणून पाठवण्यात आले.

मतदान यंत्रांची संख्या कोवीडमुळे वाढवलीय. मतदानाला गर्दी होऊ नये म्हणून एका यंत्रात जास्तीत जास्त १००० मतेच असणार आहेत. पण कल पाहाता धीरज पासवानमुळे सगळीकडे टफ फाईट होतीय. तो जर वेगळा लढला नसता तर राजद 30 जागांवर आघाडीवर असती. तेजस्वीसुध्दा पिछाडीवर असता. भाजप व जेडीयू यांच्या जागांत फारसा फरक नसता. धीरजच भवितव्य उज्वल दिसतंय. ७% पेक्षा जास्त मतं मिळवतोय पठ्ठ्या! नितीशकुमारच्या कोलांटउड्यामुळे त्याचीच वाट लागलीय. कारण नसता संपलेल्या लालूंना प्रथम रक्तदान केलं. त्याने धृवीकरणाला चालना मिळून भाजपाला मोठ केलं. इतिहासातून कोणि शिकतच नाहीये!!! मतदान यंत्रांची संख्या यावेळेस 63% जास्त आहे. थोडक्यात मुंबई मनपा निवडणुकीचे डावपेेच आखाायला आता सुुरवात होईल. लोकं विचार कसा करताहेत ते कळले. माझा निवडणूकीतला रस संपला. समाप्त.

😀


आज कळलेली एक बातमी अशी - केन्द्र सरकार दरवर्षी कर्मचार्‍यांना LTA देते.. यावर्षी करोनामुळे कोणी प्रवास करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यावर सरकारने असा उपाय काढला आहे की - कर्मचार्‍यांना भत्ता दिला, पण अट घातली की या भत्त्याच्या तिप्पट रकमेची खरेदी करयाची, आणि ती बिले सबमिट करायची, मग तो भत्ता मिळेल असे काहीतरी, (किंवा त्यावर कर आकारला जाणार नाही असे देखील असेल कदाचित) पुढच्या काही महिन्यात मार्केट अचानक उठले तर त्याबद्दल आश्चर्य वाटायचे कारण नाही.

In reply to by आनन्दा

तळागाळातील कष्टकर्‍यांची झालेले हाल, या पार्श्वभुमीवर केन्द्रीय कर्मचार्‍यांसाठीच्या या निर्णयावर बरीच टीका झालेली आहे. १ रू मिळवण्यासाठी खिश्यातले आधी आपल्या खिशातले ३ रू खर्च करायचे आणि नंतर त्याच्या खरेदी पावत्या जमा करून १ रू मिळवायचा हा द्रविडी प्राणायाम झाला. या निर्णयाची अंमलबजावणीचा अभ्यास करणं रोचक ठरेल.

In reply to by चौथा कोनाडा

कष्टकर्यांचे हाल वगैरे ठीक आहे.. पण माझे एक परीक्षित सांगत हॉटेवकी त्यांच्याच माहितीत आतापर्यंत 50 लाखाची खरेदी झाली आहे.. 2005 चा वेतन आयोग आठवतो का?

In reply to by आनन्दा

या विषयी आणखी तपशिल वाचायला आवडतील ! (एक शंका: खोट्या पावत्या वै अशी क्लुप्ती तर नाही ना शोधली ?)

In reply to by चौथा कोनाडा

नाही हो, 2005-6 ला जो मोठा बुल रन झाला त्यात माहिती ता तंत्रज्ञान यासोबत वेतन आयोगाचा मोठा सहभाग होता. 2005चा आयोग थोडा दिले झाला होता, आणि फरक किंवा विलंबाची भरपाई म्हणून लोकांच्या हातात काही लाख पडले होते.. हे पैसे लोकांनी साठवण्याच्या ऐवजी खर्च केला, घर आणि गाडी घ्यायला, अबी त्याची परिणती एका मोठ्या बुल रन मध्ये झाली असे ऐकले आहे..

म्हणे....तेजस्वी यादव हरले हे मानायला आम्ही तयार नाही. . . . नका मानू म्हणावं, तूम्ही डोळ्यांवर झापडं लावली म्हणून सत्य थोडीच लपणार? बाकी स्वतःच्या पक्षाने नोटा पेक्षाही कमी मते मिळवुन माती खाल्ली याकडे सोयीस्कर डोळेझाक केलीच.

In reply to by सॅगी

+१ आणि हे स्वयंघोषित चाणक्य कदाचीत आम्रविकेत बायड्न ला पाऊस पॅटर्न वापरुन सत्ता मिळवुन देत होते म्हणुन त्याना बिहार निवडणुकीत लक्ष देता आले नाही. https://www.esakal.com/pune/ncp-precident-sharad-pawar-commented-about-…

मुख्यमंत्री पद असून सुद्धा जेडीयू ची ताकत कमी झाली आहे. ती कमी झाली की भारतीय जनता पक्ष नी कमी केली ह्याचा विचार नितीश कुमार नक्कीच करतील. आता विरोध नाही केला तर पुढील 5 वर्ष नंतर jdu चे 5 आमदार तरी निवडून येतील का. नितीश कुमार नी संजय राऊत ह्यांचा आत्ताच सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यांना मुख्यमंत्री पद तर मिळेलच पण पक्ष सुद्धा मोठा करायची संधी मिळेल.

In reply to by Rajesh188

नितीश कुमार नी संजय राऊत ह्यांचा आत्ताच सल्ला घेणे गरजेचे आहे.
. . कशासाठी? स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी की काय?

अर्णबला वाचवण्यासाठी हर तह्रेचे प्रयत्न चालु आहेत. आता माननीय न्यायमुर्ती कोणाच्या मर्जीतले आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे. CBI,ELECTION COMMISSION,RBI,MEDIA,ED,SUPREME COURT court.....ह्या सर्व संस्था कोणासाठी काम करत आहेत हे तठस्थ पणे बघीत्ल्यावर सह्ज समजुन येइल. अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर त्वरित सुनावणी का?; SCBA च्या अध्यक्षांचा पत्राद्वारे सवाल निष्पक्ष वर्तणूक नाही “तुमच्या नेतृत्वाखाली रजिस्ट्री करोना महासाथीदरम्यान गेल्या आठ महिन्यांपासून केस लिस्टींगमध्ये निष्पक्ष असल्याचं दिसत नाही. एकीकडे हजारो जण तुरूंगांमध्ये आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केले्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्यांना अनेक आठवडे महिने लागतात. अशातच जेव्हा गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात दाद मागतात तेव्हा त्यांची याचिका त्वरित का आणि कशी लिस्ट केली जाते,” असंही दवे यांनी आपल्या पत्राद्वारे विचारलं आहे. ऑटो प्रणालींसह छेडछाड का? – दवे खटले कंप्म्युटराईज्ड पद्धतीनं ऑटोमेटिक लिस्ट होत असताना सिलेक्टिव्ह लिस्टींग का होत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. “असं का होत आहे की खटले इकडे तिकडे फिरवले जात ाहेत आणि तेदेखील काही खास खंडपीठआंकडेच? सर्व नागरिकांसाठी आणि सर्व वकिलांसाठी ऑन रेकॉर्ड (AORs) साठी योग्य आणि निष्पक्ष प्रणाली का उपलब्ध नाही?,” असा सवालही त्यांनी केला. (वरील बातमी source Loksatta) आजचा व्हिडीओ :-सूर्य पाहिलेला माणूस

In reply to by गोंधळी

सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे
आता माननीय न्यायमुर्ती कोणाच्या मर्जीतले आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे.
याच न्यायाने, उच्च न्यायालयाने अर्णबला जामीन नाकारला, म्हणून उच्च न्यायालयातले न्यायमूर्ती कोणाच्यातरी मर्जीतले आहेत...असाही युक्तिवाद करता येईल...नाही का?

In reply to by सॅगी

याच न्यायाने, उच्च न्यायालयाने अर्णबला जामीन नाकारला, म्हणून उच्च न्यायालयातले न्यायमूर्ती कोणाच्यातरी मर्जीतले आहेत...असाही युक्तिवाद करता येईल...नाही का?
नाही करता येणार.. तशी बोंब ठोकायची परवानगी फक्त एका विशिष्ठ वर्गाला च आहे..

In reply to by बाप्पू

तर फेसबुकवर खालील पोस्ट वाचायला मिळाली .इथल्या जाणकार लोकांनी मत मांडावे "If we don't interfere in this case today, we will walk on a path of destruction" हे वाक्य आहे आज अर्णब गोस्वामीच्या केसवरील सुनावणीच्या वेळी माननीय सुप्रीम कोर्टाने वापरलेले... हेच वाक्य मी स्वतःला वापरून काही मुद्दे वकील म्हणून उपस्थित करत आहे, माझी चूक असेल तर मला कृपया दुरुस्त करा... 5/5/2018 ला अन्वय नाईक आणि त्याच्या आईने आत्महत्या केली. अन्वय नाईकने मरताना जी चिठ्ठी लिहिली त्यात त्याने अर्णब आणि इतर दोघांची नावं टाकून लिहिले की माझे पैसे या लोकांनी दिले नाहीत म्हणून मी आत्महत्या करत आहे. त्यानुसार अलिबाग कोर्ट मध्ये section 306 of IPC नुसार गुन्हा नोंद झाला. Section 306 - म्हणजे एखाद्या माणसास जर आत्महत्येस प्रवृत्त केले तर अशा गुन्ह्यास 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. ज्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यात आरोपीस अटक करावी लागते किंवा अशी अटक वाचवण्यासाठी आरोपीने अटकपूर्व जामीन घ्यावा लागतो. अटकपूर्व जामीन हे सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट देऊ शकते. म्हणजे जर सेशन कोर्टने जामीन नाही दिला तर हायकोर्ट आणि हायकोर्टाने नाकारला तर सुप्रीम कोर्ट... असा गुन्हा दाखल झाला की तात्काळ पोलिसांनी आरोपीस अटक करायला हवी होती, कारण अटक केल्याशिवाय चौकशी करता येत नसते. जर आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला तर कोर्टसुद्धा सांगते की आरोपीने पोलीस तपासात मदत करावी म्हणून... मग अर्णबला यापूर्वीच अटक झाली होती का..? आणि नसेल झाली तर त्याने अटकपूर्व जामीन मिळवली होती का..? 2019 मध्ये तत्कालीन तपास अधिकाऱ्याने A समरी रिपोर्ट तिथल्या न्यायालयात दाखल केला. A समरी म्हणजे काय..? where there is no clue whatsoever about the culprits or property or when the accused is known but there is no evidence to justify his being sent up to the Magistrate for trial.. म्हणजेच, सध्याच्या तपासमध्ये आरोपी विरोधात कुठलाही सकृतदर्शनी पुरावा मिळत नाही , म्हणून सदरची केस चालवण्याची गरज नाही असे पोलिसाने न्यायालयास सांगणे. पण या केसमध्ये आरोपीस अटक न करताच कसे काय तपास पूर्ण केला..? आता 2020 मधील घडामोडी.. एकदिवस अचानक नाईकच्या केसमध्ये पुरावे सापडले म्हणून अर्णबला पोलिसांनी अटक केली.. A समरी केसमध्ये मा. न्यायालयाची पूर्व परवानगी न घेता केस री-ओपन करता येते का..? Section 173(8) of Cr p c अन्वये, A समरी झालेली केस री-ओपन करण्यासाठी मा. न्यायालयाची परवानगी घेणे गरजेचे असते. मग अर्णबच्या केसमध्ये अशी परवानगी घेण्यात आली होती का..? ऑक्टोबर 2020 मध्ये तपास अधिकाऱ्याने अलिबाग न्यायालयात अशा परवानगीचा अर्ज दाखल केला होता, त्यावर न्यायालयाने ‘seen and filed’. असा शेरा मारला होता. त्यानंतर त्याच न्यायालयाने section 164 खाली एक स्टेटमेंट देखील रेकॉर्ड केले आहे. याचाच अर्थ न्यायालयाने पुन्हा चौकशी करण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच मा. सुप्रीम कोर्ट च्या Rama Choudhary vs State of Bihar नुसार under Section 173 (8) Cr.P.C., the law does not mandate taking prior permission from Magistrate for further investigation, even where a charge sheet is filed, as carrying out further investigation is a statutory right. म्हणजेच A समरी मधील केसची पुन्हा तपासणी करण्यास न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी अर्णबला अटक केली. एकदा अटक केल्यानंतर त्या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले जाते. न्यायालयाला वाटले यात तपास करणेसाठी आरोपीस पोलीस कस्टडी मध्ये देणे गरजेचे आहे, तर न्यायालय आरोपीस पोलीस कास्टडी (PCR) मध्ये पाठवते आणि जर न्यायालयास वाटले यामध्ये तपासाची गरज नाही तर न्यायालय आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठवते. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असेल तर तो जामीन अर्ज दाखल करू शकत नाही पण न्यायालयीन कोठडीत असेल तर तो तात्काळ section 439 नुसार जमीन अर्ज दाखल करू शकतो. या केसमध्ये अर्णबला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते मग प्रश्न पडतो त्याने तात्काळ जामीन अर्ज दाखल न करता थेट हायकोर्टामध्ये याचिका का दाखल केली..? अर्णबने आर्टिकल 226 खाली हिबसकार्पस ही याचिका दाखल केली होती. हिबसकार्पस याचिका म्हणजे काय..? एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीर पकडून ठेवल्यास ती व्यक्ती थेट हायकोर्टमध्ये हिबस कार्पस ही याचिका करून सदरील पकडणे बेकायदेशीर असून त्या व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बाधा आणणारे आहे असे सांगून त्या व्यक्तीस थेट न्यायालयाच्या समोर हजर करण्याचे आदेश हायकोर्टाकडून घेणे होय. ही याचिका कोणीही बेकायदेशीर पकडून ठेवल्यावर दाखल करता येते. यावरून एक तर निश्चितच आहे की, हिबस कार्पस ही केवळ बेकायदेशीर पकडल्यावर दाखल करता येते. मा. सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयानुसार B. Ramchandra Rao (Dr) Vs. State of Orissa if the Petitioner is in custody pursuant to the remand order by the jurisdictional Magistrate in connection with the offences under investigation, the Writ of Habeas Corpus is not maintainable. म्हणजेच एखादा व्यक्ती जर न्यायालयाच्या आदेशानुसार जेलमध्ये असेल तर हिबस कार्पस ही याचिका लागू होत नाही. आता मूळ प्रश्न अर्णबची अटक बेकायदेशीर होती का..? याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण पोलिसांकडे त्याच्या अटकेचे वॉरंट होते. तसेच section 306 हा दखलपात्र गुन्हा असून त्यात अटकपूर्व जामीन नाही घेतला तर अटक ही अनिवार्य आहे. मा. हायकोर्टाने हिबस कार्पसनुसार त्याला जामीन न देता, त्यास ट्रायल कोर्टमध्ये जामीन अर्ज दाखल करून रीतसर जामीन घेण्यासाठी सांगितले होते. तसेच मा. हायकोर्टने हे देखील सांगितले होते की, असा जामीन अर्ज दाखल केल्यापासून 4 दिवसात त्यावर ट्रायल कोर्ट ने निर्णय घ्यावा. म्हणजेच अर्णबला तिकडे विलंब होणार वगैरेचा काहीही संबंध नव्हता.. आता यावर अर्णबने ट्रायल कोर्ट मध्ये न जाता थेट हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने तात्काळ प्रकरणात सुनावणीच्या तारीख पण दिली. वास्तविक कित्येक केसेस ज्या इतक्याच किंबहूना जास्त महत्वाच्या आहेत त्यावर सुप्रीम कोर्ट तारखाच देत नाहीये. यावर सुप्रीम कोर्टाच्या बारचे अध्यक्ष श्री दवे यांनी देखील सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीला पत्र पाठवून याचा जाब विचारलेला आहे. एवढे सगळे असताना आज सुप्रीम कोर्टाने अर्णबला इंटेरियम जामीन मंजूर केला आहे. जामीन आदेशात मा. सुप्रीम कोर्टाने खालील प्रकारे आदेश पारित केले आहेत.. We are of the considered view that the High Court was in error in rejecting the applications for the grant of interim bail. We accordingly order and direct that Arnab Manoranjan Goswami, Feroz Mohammad Shaikh and Neetish Sarda shall be released on interim bail, subject to each of them executing a personal bond in the amount of Rs 50,000 to be executed before the Jail Superintendent. They are, however, directed to cooperate in the investigation and shall not make any attempt to interfere with the ongoing investigation or with the witnesses. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की, अर्णब आणि इतर दोघांना 50000 रु च्या जातमुचलक्यावर जेलरने सोडावे. सुप्रीम कोर्ट ने आदेशात सांगितले आहे की 50000 रु चा बॉण्ड जेलर कडे सादर करावा, Cr P C च्या कुठल्या कलमनुसार असे आदेध कोर्ट जेलर ला देऊ शकते हे मात्र नाही कुठेही सांगितले. अर्णब व इतरांनी चालू तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये आणि केस मधील साक्षीदारांना त्रास देऊ नये असे देखील कोर्ट पुढे सांगत आहे. म्हणजेच नाईक केस मधील A समरी रिपोर्टनंतर सुरू झालेला तपास सुप्रीम कोर्टाला मंजूर आहे, म्हणजेच अर्णबची अटक ही हिबस कार्पस ही याचिकेनुसार बेकायदेशीर अटक नाही यास देखील दुजोरा मिळत आहे. मग जर अटक बेकायदेशीर नसेल तर सुप्रीम कोर्टाने जामीन का मंजूर केला हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. अर्णब सारख्या केसेस चा आधार घेऊन उद्या कुणीही आशा प्रकारे जामीन मागू शकतो. कायद्याने एक प्रोसिजर दिलेली आहे आणि ती बंधनकारक आहे पण नेमके आशा हाय प्रोफाइल केसेस आल्या की कायदा कसाही वापरला जातो हे खूपच घातक आहे. आजही कित्येक वकील आहेत ज्यांच्या केसेसला तारीख मिळत नाही. कित्येक महत्वाची मॅटर्स निकालाच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहेत. आजही न्यायव्यवस्था ही अतिमहत्त्वाच्या बाबीत येत नाही असे कोर्टाने एका निकालात म्हटले आहे. हे सारे अनाकलनीय आहे. आपण यावर बोलले पाहिजे, आज जर गप्प राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत... ऍड. महेश भोसले हायकोर्ट, औरंगाबाद. ( हा प्रतिसाद मायाबोली या स्थळावरुन घेतला आहे.) आक्षेप हा आहे की काळ्या रंगाला तो काळा नसुन तो सफेद्च कसा आहे हे ठसवल जात आहे. आता काळ्या रंगाला काळा म्हणायच की सफेद हे तुम्हीच ठरवा.

In reply to by गोंधळी

गोंधळी, मजकूर इथे चिकटवल्याबद्दल आभार. एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाची अब्रू नको तितकी उघडी पडंत आहे. न्यायाधीशांच्या नेमणुकांची कॉलेजियम पद्धत बंद करून त्या स्पर्धात्मक रीतीने (केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत) व्हायला हव्यात. आ.न., -गा.पै.

In reply to by गोंधळी

म्हणजेच, सध्याच्या तपासमध्ये आरोपी विरोधात कुठलाही सकृतदर्शनी पुरावा मिळत नाही , म्हणून सदरची केस चालवण्याची गरज नाही असे पोलिसाने न्यायालयास सांगणे. पण या केसमध्ये आरोपीस अटक न करताच कसे काय तपास पूर्ण केला..?
त्यांच्या वकिलांनी हा मुद्दा २०१९मधे उपस्थित केला नाहि का? नाईक कुटुंब तसं बरच हाय प्रोफाईल लोकांशी संबंध ठेऊन होतं असं दिसतं, अगदी आजच्या सत्ताधार्‍यांशी देखी.ल. कोणिच सल्ला दिला नाहि? अर्णवला वाचवायला सर्वपक्षीय नेतृत्व कार्यरत होतं? एक वर्षाने एकदम एक नवीन पुरावा सापडला? जर केस क्लोज झाली होती तर हे पुरावा शोधनाचं काम पोलिसांनी स्वयंप्रेरणेने केलं ? बरेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. असं म्हणतात कि पोलिसांना / न्याय व्यवस्थेला खरच मोकळ्या हाताने काम करु दिलं तर आज दिसतय तेव्हढी काहि सुस्त नाहि ज्युडीशिअरी.

In reply to by अर्धवटराव

नाईक कुटुंब तसं बरच हाय प्रोफाईल लोकांशी संबंध ठेऊन होतं असं दिसतं, अगदी आजच्या सत्ताधार्‍यांशी देखी.ल.
संदर्भ समजेल का ?

In reply to by शा वि कु

तसेही त्यांच्या बिझनेसचं स्वरुन बघता उचभ्रू लोकांशी संबंध सहाजीकच येत असावा.

In reply to by गोंधळी

बाकी हे मुद्दे सरकारच्या वकिलाने कोर्टात मांडले नाहीत काय? की फक्त सोशल मीडिया वरती मांडायला ठेवले होते? का वकील पण भाजपला फितूर आहे?

In reply to by सॅगी

केस जर trial court मध्ये चालू आहे तर जामीन त्याच न्यायालयात मांगा असे उच्च न्यायालय नी म्हंटले आहे. स्टेप वाइज या असे सांगणे गैर नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जामीन न देता trial court मध्ये च जामीन अर्ज करा असे सांगायला पाहिजे होते. देवाच्या दर्शनाला vip लोकांसाठी वेगळी लाईन असते म्हणून न्यायाच्या देवालयात पण तशी च लाईन असावी हे नक्कीच चुकीचं आहे. भेदभाव करणार नाही अशी राज्य घटना च सांगते मग अशी vip treatment shrimant लोकांना देणे हा भेदभाव नाही का?

In reply to by Rajesh188

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जामीन न देता trial court मध्ये च जामीन अर्ज करा असे सांगायला पाहिजे होते. कोव्हीड मुळे उंदीर मारण्याचा विभाग बंद झाला काय?

In reply to by गोंधळी

मुंबईत 20000च्या वर अनधिकृत बांधकाम असताना फक्त कंगनाच्या घरावर JCB कशासाठी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तेच या प्रश्नाचं पण आहे.

शेवटी माणसच ती.त्या मुळे न्याय देताना भेदभाव हा होतोच. कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या रोबोटिक न्यायाधीश ची नियुक्ती न्यायव्यवस्थेत होणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर न्यायदानाचे काम हे माणसाने करणे मानवी हिताचे नाही मानवी न्यायालय ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोबट च्या हाती देणे गरजेचे आहे. त्या क्षेत्रात एक पण माणूस नको.

In reply to by Rajesh188

मिसळपाव वर सुद्धा प्रतिसाद रोबोनेच साधक बाधक विचार करून टाकावा काय? म्हणजे इथे उगाच धूर काढणाऱ्यांचं दुकान बंद होईल.

Goswami was arrested by Raigad police from his Mumbai residence on November 4 morning following which the CJM of Alibaug remanded him to 14-day judicial custody till November 18. The prime argument raised in the HC petition is that the police has no power to suo moto re-open the case without getting a judicial order after the Magistrate passed a closure order in the case in 2019 based on the report submitted by police then. :- म्हणजे अटक बेकायदेशीर होती ? संदर्भ :- Arnab Goswami to spend another night in custody as the hearing gets postponed to Saturday: Here is what Harish Salve said in court Salve : CJM has stated in the order "it seems that the arrest of the accused(Arnab Goswami) is illegal". इति :- Live Law Salve : You have commercial disputes with different people for over two years. You don't file a suit. You have creditors beating at your door. You kill yourself. There cannot be FIR for abetment to suicide for this. इति :- Live Law अधिक इकडे :- The Guardian For One And All Or The Judiciary Is The Sentinel Qui Vive

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Why INS Vagir – Indian Navy’s New French-Origin Submarine Can Be A ‘Silent Killer’?