मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव
मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव
झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव
एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव
- पाषाणभेद
०१/११/२०२०
काव्यरस
वाचने
12095
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन
In reply to मस्त by प्रचेतस
अरे रे पाभे... तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती
In reply to जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन by पाषाणभेद
पुण्यातली मिसळ हि खरी मिसळ
In reply to जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन by पाषाणभेद
+111
In reply to जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन by पाषाणभेद
मिसळथाळी हि खरी मिसळ नाहीच.
In reply to जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन by पाषाणभेद
पुण्यातली मिसळ हि खरी मिसळ नव्हेच.
मोड आलेले मूग अथवा मटकी यांचे
मिसळीत आहे सारे गुण
+१
In reply to मिसळीत आहे सारे गुण by विजुभाऊ
आधी सुन्न लिहीले होते.
In reply to मिसळीत आहे सारे गुण by विजुभाऊ
मस्त! :)
काव्यमिसळ!
मिसळ अन वाद यांचे अनोखे नाते
टिंबर मार्केट आणि
चवीने खाणार....