Skip to main content

लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)

लेखक मि.इंडिया यांनी बुधवार, 08/04/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
(फोटो अद्ययावत केले आहेत. पिकासा वरून अडचण येत होती त्यामुळे फ्लिकरला टाकले आहेत. तसदीबद्दल क्षमस्व.) सर्वसाधारणपणे आपल्याकडे water lilly ला कमळ म्हटले जाते. पण Lotus म्हणजे कमळ हा प्रकार वेगळा असतो. याची पाने पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात. जवळजवळ दीड वर्षांनी माझ्याकडे कमळास फुले आली आहेत. प्रदीप

वाचने 15410
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

छानच आहेत लक्ष्मी कमळं. ४थ्या /५व्या इटूकल्या सुवर्णकमळाबरोबरचे हे सद्गृहस्थ कोण ? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

छान आहेत कमळं! प्रत्यक्षात पहायला अजुन मजा येईल. धन्यवाद प्रदीप. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

कमळ भारीच आहे. जमीनीच्या इतक्या वरती ते येते हे आश्चर्यच आहे. आकाराने सुद्धा चांगले मोठे आहे. याची अजून काही माहिती द्या ना. सध्या एकच चित्र दिसत आहे. पण या आधी तुम्ही जे दुवे दिले होते तेथे सर्व चित्रे पाहिली. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

विकिपेडियावर निलंबु या वर्गात कमळाची माहिती आहे. कमळाची अधिक माहिती. मि.इंडिया लिहितात त्या प्रमाने लोटस आणि वॉटरलिली या वेगळ्या आहेत. कमळाची पाने पूर्ण गोल असतात तर वॉटरलिलीच्या पानाला एक छेद असतो असे मी दिलेल्या विकिपेडियाच्या पहिल्या दुव्याच्या शेवटी लिहिले आहे. -- लिखाळ.

कमळ सुंदर आहे... :) (हे स्वतः मि.इंडिया आहेत तर मग मोगॅम्बो कोण असेल ?) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

In reply to by मि.इंडिया

कर्णलरावांनी ढिगाने अपलोड केलेल्या फोटूंमुळे कदाचित त्यांणा अडचण येत असावी .. कमळ छाण आहे

दुसरा फोटु अत्ता दिसला !!! आणि आपण ही दिसलात. :) हे कमळ आहे का कमळा !!! एव्हढ मोठ कमळाच पान मी कधीच पाहिल नव्हतं,,,जमिनीपासुन इतक्या इंचीवर येणार हे कमळ मी प्रथमच पाहतोय. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

मगापासून १० वेळा जा धाग्यावर आले.. अद्ययावत असे वाचून. पण ही कमळे मला दिसत का नाहीयेत.. ~X( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान चित्र आहेत! तात्या. संपादन करून सुधारणा केली आहे. आता मला चित्र दिसत आहेत. अन्य मंडळींचा काय अनुभव?

In reply to by स्वाती दिनेश

कमाल अहे! जाऊ द्या, सोडून द्या! मिपावर चित्रे जर सहजतेने दिसावयाची असतील तर आधी ती फ्लिकरवरच चढवली पाहिजेत!

मला संशय येतोय. १ एप्रिल तर गेला पण काहि लोकांना दिसतोय काहि लोकांना नाहि आणि यांचे नाव पण मि. ईंडिया आहे. मी पण दिसले आणि छान छान असे म्हणु का?

सुरेख आहे कमळ! दिल खूष झालं!!! याचं काय बी मिळतं का? की तुम्ही कांदेच लावलेत? जरा कळवा...

लाल चष्मा घालून ही पाहिल. या मि. इंडियाचे फूल काही दिसले नाही. ~X( आज १ एप्रिल तर नाही ना? मीनल.

अरे असं काय करताय? मला तर दोन फोटो दिसताहेत! एकात लक्ष्मीकमळ आणि मि. इंडियांचं मुखकमल दिसतंय आणि दुसर्‍यात लक्ष्मीकमळाचा क्लोज अप!! की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?:) का हो मि. इंडिया? जरा खुलासा करा...

In reply to by पिवळा डांबिस

की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का? हो बहुतेक.. कारण मी पण पाहिलं... :-)

In reply to by यशोधरा

याचे कांदे / बिया कुठे मिळतील खरच माहीत नाही. मुळात बियांनी येते का हेच नक्की ठाउक नाही. मी कंद लावला होता. जवळजवळ दीड वर्षांनी फुले आली आहेत. अजूनतरी नविन कंद आले नाहियेत. आल्यास मी देऊ शकीन. प्रदीप

In reply to by पर्नल नेने मराठे

क्षमस्व L) पिकासा वरून बहुधा अडचण येत असावी. आता फ्लिकर वर टाकले आहेत. प्रदीप

अहो मि.ईंडीया, आम्हाला कमळ दिसतच नाही आहे !!.. :''( आम्हाला काही झेपत नाही आहे कि हे फोटो कसे बघायचे ते

परत एकदा अद्ययावत बघून आलो इकडे आणि काय आश्चर्य...दिसले बॉ एकदाचे कमळ आणि मि. इंडिया!!! हुश्श्श !!! -अनामिक

खर आहे. लाल चश्मा ही लागला नाही. दिसली कमळ. पण तुम्हाला किती दिसली? मला ३ ---२ लक्ष्मी कमळ. आणि पि.डा.च्या भाषेत सांगायच तर १ मुखकमल. :)) मीनल. अवांतर: मी तर आजकाल लेख वाचायच्या आधी पि.डा. च्या प्रतिक्रिया शोधते आई शपथ ,सॉलिड असतात!

दादा कमळ बघ. दादा नीलकमल बघ. दादा घाबरु नकोस. उजवीकडे आहे ते कमळ आणि डावीकडे आहे ते नीलकमल. दादा उजवा हात कोणाचा हे मात्र विचारु नकोस.