Skip to main content

घडामोडी नोव्हेंबर २०२०

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 30/10/2020 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचने 88944
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

करून प्रदेश हळूहळू ताब्यात घेण्याचा नवीन वसाहतवाद आहे.

फ्रांस प्रकरणात शार्ली हेब्दो ने एर्दोगन चं भारी कार्टून काढलंय, याच प्रकरणाचा निषेध म्हणून लोकनियुक्त पंतप्रधान सर्वश्री इम्रान खान यांनी संसदेत फ्रान्स मधून राजदूत परत बोलवण्याची घोषणा केली होती, पण फ्रांस मध्ये आपला राजदूतच तर बोलवणार कोणाला नाही असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितल्यावर ते गप्प बसले. अवांतर : आता पाकिस्तान फ्रेंच फ्राईज वर पण बंदी घालणार आहे म्हणे.

दुसरा कोणीतरी धागा काढेल म्हणून?

In reply to by तुषार काळभोर

निसटत्या बाजूंवर त्यांचं बरोबर लक्ष असतं. म्हणून नोव्हेंंबर उजाडायच्या आधीच नोव्हेंबरच्या घडामोडींचा धागा काढला त्यांनी. :)

https://www.loksatta.com/manoranjan-news/ramayan-star-dipika-chikhlia-p… रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या आगामी ‘गालिब’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. या चित्रपटात त्या २००१ मध्ये भारतीय संसदेवर करण्यात आलेल्या दहशवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. अफजल गुरुचा मुलगा गालिबच्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. https://www.loksatta.com/manoranjan-news/ramayan-star-dipika-chikhlia-p…

आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. हंटर बिदेन यांचा लॅपटॉप रिपेअरसाठी दिला गेला होता, तो ट्रम्प तात्यांच्या माणसांनी गुपचुप उचलुन त्याच्या हार्डडिस्क मधली माहिती मिळवली आणि उघड केली. ही माहिती अर्थातच चीन आणि बिदेन यांच्या आर्थिक व्यवहारांची होती. ट्विटरवर ही माहिती शेअर करणार्‍यांची अकांउट्स ट्विटर लॉक करत होता आणि ते ठराविक ट्विट डिलीट केल्यावरच युजर अकांउट परत सक्रिय होत होते. का कोणास ठावूक सिलिकॉन व्हॅली ट्रम्प तात्यांच्या विरोधात आणि प्रो चायना स्टँड घेउन आहे असे वाटते. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे ह्म्म... जगाने हिंदूंच्या जेनोसाइडचा अभ्यास केला पाहिजे जे अजुनही चालू आहे ! संपूर्ण जगाच्या इतिहास सगळ्यात मोठे जेनोसाइड हे हिंदुंचेच आहे हे मी मानतो. हिंदूच्या मोठ्या कत्तली करण्यात आल्या, त्यांची मुंडकी तोडुन भाल्यांवर नाचवण्यात आली, हिंदुंच्या स्त्रियांना फाकवुन काढण्यात आलं [ आजही तेच होत आहे ]आणि विकण्यात देखील आलं आणि तरी देखील हा समुदाय या भुतलावर अजुनही त्यांची संस्कृती टिकवुन आहे हे मोठे नवलच आहे. आता शांतता प्रिय धर्मियांची संख्या २५% आसपास आहे तेव्हा हिंदूच्या मुलींना भर रस्त्यात ठार करण्यात प्रकार घडत आहेत, काही वर्षांनी जेव्हा ते ५०% पोहचतील तेव्हा ? असो... फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. फ्रान्स / युरोप आणि हिंदूस्थान यांना एकाच समस्येचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा स्वत:ची ओळख, स्त्रिया आणि संपती वाचवण्यासाठी यांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh

In reply to by मदनबाण

ही माहिती अर्थातच चीन आणि बिदेन यांच्या आर्थिक व्यवहारांची होती.
हि माहिती युक्रेन मधल्या कंपनीबद्दल बद्दल होती असे वाचले होते, जिथे जोपुत्राला काम मिळाले होते.दुवा.

In reply to by मदनबाण

========================================================================================================== जो बिदेन यांचे चीन शी असणारे संबध पाहता, ट्रम्प तात्या परत येणार असे दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh

असा धाग्यांचा विषय आहे. इथे एवढ्या समस्या आहेत त्या मधून मार्ग निघणे अवघड होत चाललं आहे. आणि धागा कर्त्याला जगाची काळजी पडली आहे

In reply to by Rajesh188

जगाच्या समस्या कधी तुमच्या दारात येतील सांगता येत नाही राजेश भाऊ.. उघडा डोळे बघा नीट.. नाहीतर काही वर्षयांनी आफ्रिकेत कुठेतरी कोणीतरी कोणाला कानाखाली मारली त्याचा बदला म्हणून इथे इथलाच कोणीतरी तुमचा गळा कापेल तेव्हा तुम्हाला समस्येची गांभीर्यता समजेल..

बचत खातेदारांना देखील या शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. बचत खात्यातून पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी शुल्क वसूल केले जाणार आहे. एका महिन्यात तीन बँक व्यवहार निशुल्क असतील. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी एका वेळी ४० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर पैसे काढण्यासाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत. maharashtra times: नोव्हेंबरपासून खिसा खाली होणार; बँकेत पैसे जमा करणे आणि काढणे महागात पडणार जनधनवाल्यानाही चार्जेस लागू होणार https://maharashtratimes.com/business/business-news/bank-of-baroda-set-…

In reply to by Gk

व्वा, आनंदाची बात मी ! या मुळे उद्योगपती, भांडवलदार यांच्या कर्ज थकबाकींमुळे झालेले नुकसान भरून येण्यास मदत होईल व परिणामी सर्वसामान्य नागरिक आत्मनिर्भर होईल !

In reply to by चौथा कोनाडा

सर्वसामान्य नागरिक नव्हे.. बँक्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत.. जेणेकरून पुन्हा कोणीतरी मल्ल्या किंवा निरव मोदी कर्ज मागायला आल्यावर पैसा कमी पडू नये.

In reply to by बाप्पू

अहो, मल्ल्या किंवा निरव मोदी हे सर्व (राजकारणी/संबंधित यांनी पुरस्कृत केलेले ) सामान्य नागरिकच आहेत की ! ते आत्मनिर्भर झाले की बास ना ! Olectra1234

In reply to by चौथा कोनाडा

एखादा प्रकल्प NPA का होतो याचा विचार न करता केवळ आपण फक्त उद्योगपतींना दोष देतो. याचे मूळ इतक्या वर्षाच्या समाजमनाच्या समाजवादी जडणघडणीत आहे त्यात श्रीमंतांबद्दल असलेल्या असूयेचाही भाग आहे. केवळ वस्तुस्थिती नजरेस आणून द्यावे यासाठी हे लिहीत आहे. कोणत्याही उद्योगपतींची बाजू घेणे म्हणून नाही. झारखंड मध्ये तिलैया किंवा उत्तर प्रदेशातील दादरी हे अति प्रचंड ऊर्जा प्रकल्प (UMPP) मार्गी का लागले नाही? कंत्राट दिल्यावर सहा वर्षे झाली तरी त्यांना जमीन दिली गेली नाही. यासाठी घेतलेल्या भांडवलाचे व्याज कोण भरणार? जमीन त्यांना देणे हे राज्य सरकारचे काम असते. दंडेली करून जमीन घेतली तर ते न्यायालयात टिकत नाही. आणि त्याचा फटका उद्योगपती च्या गळ्यात येतो. मग ते पण आपले कर्ज न भरता उद्योग आजारी म्हणून मोकळे होतात. https://www.deccanchronicle.com/150429/business-latest/article/reliance… https://indianexpress.com/article/business/companies/supreme-court-allo… https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/reliance-pow… माझ्याकडे रिलायन्स पेट्रोलियमचे समभाग होते ती कम्पनी रिलायन्स ऊर्जा कंपनीत विलीन केल्याने रिलायन्स ऊर्जा या बुडत्या कंपनीचे समभाग माझ्या गळ्यात आले आणि माझे बरेच पैसे बुडाले. यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी काही अभ्यास केला तेंव्हा नजरेस आलेली वस्तुस्थिती मंडळी आहे. अर्थात श्री अनिल अंबानी हे धुतल्या तांदळासारखे आहेत असे माझे म्हणणे मुळीच नाही. परंतु प्रत्येक उद्योगपती हा चोरच असतो आणि प्रत्येक श्रीमंत माणसाची संपत्ती हि गैरमार्गानेच मिळवलेली असते या दळभद्री मनस्थितीतून आपण बाहेर येणे आवश्यक आहे यासाठी हा प्रपंच.

फ्रान्स मधल्या घटनेचा निषेध भारतात सुद्धा.. तो देखील हिंसक पद्धतीने.. मागे एका धाग्यावर म्हणल्याप्रमाणे काही जमाती माय पेक्षा शेजारीणीची काळजी खूप करतात. DNA मध्येच फॉल्ट असावा.. जेव्हा त्या शिक्षकाला आणि संपादकाला निर्दयीपणे मारले गेले तेव्हा निषेधाचा एखादा मोर्चा काढला नाही यांनी.. किंवा झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून दोषींना सख्त शिक्षा दया असे म्हणून ही जमात कधी पुढे आली नाही.. तेव्हा मूगगिळून गप्प बसले आणि आता जग पेटवतायत.. बहिष्कार घालतायेत. फ्रांस ने चौका चौकात ते पोस्टर छापावे आणि असल्या बर्बर जमाती लोकांना पुन्हा आश्रय देऊ नये. अजूनही तेथील दहशतवाद्यांचा टक्का (%) कंट्रोल मध्ये आहे भारताइतपत वाढल्यास रोजरोस असे प्रकार बघायला मिळतील हे वेगळे सांगणे न लागे.. जास्त सहानुभूती दाखवून आश्रय दिला ( ते ही अश्या वेळी जेव्हा 57 देशांपैकी कोणी यांना विचारत नव्हते.. त्यावेळी त्यांचा उमाः कुठे गेला होता काय माहिती.. ) त्याचे पांग हे असे फेडतायेत. आणि इथे भारतात.. - बेगाने शादी मे "अब्दुल्ला" दिवाना.

In reply to by Gk

आलात?? तरी म्हणलं तुम्ही अजुन मागे कसे. अजुन कसे वकीलपत्र घेतले नाही दहशतवाद्यांचे.. !! आल्या आल्या निदान त्या शिक्षकाला माणुसकीच्या नात्याने श्रद्धांजली वाहिली असती तर ते जास्त योग्य वाटले असते.. असो तसेही "माणुसकी " नावाची गोष्ट तुमच्यासारख्यांना काय माहिती. हे घ्या.. https://youtu.be/gj_-KQNfiYw आणि हे ही बघा.. माय मारो आणि शेजारीण जगो.. !! https://youtu.be/iJaZS_aNAX8

In reply to by बाप्पू

याव्यतिरिक्त माझ्याकडे व्हाट्सअँप वर काही व्हिडीओ आहेत जिथे काही तरुण फ्रांस च्या नावाने गळा काढून गाडयांची तोडफोड करत आहेत. ते इथे देणे योग्य होणार नाहीत. कोरोना काळात हजारो लोकं जमवून रस्त्यावर जाळपोळ करणे आणि ते ही कुणासाठी?? कुठल्या प्रश्नासाठी??? आणि अश्या लोकांचा निषेध करण्याऐवजी तुम्ही साळसूदपणाचा आव आणून इथे आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडणार.. !!

In reply to by बाप्पू

तुम्ही 2 व्हिडीओ दिलेत त्यातला 1 ओपन होत नाही दुसरा भोपाळ मधला आहे , तिथे मा साध्वीजी आहेत , त्या दंगलखोरांना पकडतील किमान शाप तरी देतील

In reply to by बाप्पू

मिसळपावावर 2 - 4 हजार आयडी असतील. कोणत्या प्रकरणात कुणी श्रद्धांजली वाहिली अन कुणी नाही , हे तुम्ही इथे बसून कसे ठरवणार ?

२१व्या शतकात धर्माधारीत संघर्ष लयाला जाऊन मनुष्यप्राणी जगण्या-मरण्याच्या इतर समस्यांना हात घालेल असं भाकीत ७०-८० च्या दशकात केलं जायचं.. ते चक्रं उलटच फिरायला लागलय कि काय :(

In reply to by अर्धवटराव

ॲा! धर्माधारीत संघर्ष लयाला जायला आतातर कुठे सुरवात होतीय. ;)

In reply to by शाम भागवत

धर्म आधारित संघर्ष पेटता रहवा म्हणून इंथन टाकणाऱ्या अनेक यंत्रणा ,संस्था कार्यरत असतात. अगदी देशांची सरकार सुद्धा त्या मध्ये सामील असतात. आपल्याला फक्त आग पेटलेली दिसते पण काडी लावणारे आणि वर पेट्रोल टाकणारे व्हाइट कॉलर गुन्हेगार कधीच दिसत नाहीत.

In reply to by Rajesh188

तुमचं म्हणजे कस आहे ना राजेशभाऊ.. सगळं काय वाईट ते राजकारणी किंवा समाजविघातक लोकच करतात.. तेच सगळा संघर्ष पेटवतात.. सामान्य लोकं म्हणजे कित्ती कित्ती भोळीभाबडी..!!! He राजकारणी असतात जे भोळ्या भाबड्या, दीनदुबळ्या लोकांची माथी भरकटवतात.. सगळ्या पापाची बिले त्यांच्या आणि सरकारच्या नावावर फाडून तुम्ही सेक्युलॅरिज्म ची चादर ओढून निवांत झोपी जाता..! कधीतरी समस्या आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा..!! वैश्विक नाही पण आपल्या गल्ली बोळातील लोकांशी चर्चा करा. त्यांची खाजगी मते जाणून घ्यायचा प्रयत्न करा..

प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी दुसरं तर अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन ने तिसरं लग्न केलं

In reply to by Rajesh188

साळवेंचा विवाह असावा स्कार्लेटची बिझनेस डील. कारण साळवेंचा पहिला घटस्फोट खूप आधी झालाय. अर्थात हे दोन्ही विवाह वेगवेगळ्या व्यक्तींसोबत झालेत साळवे आणि स्कार्लेटचा एकमेकांशी संबंध नाही.

फ्रान्स मधील मंत्र्याचे वक्तव्य :- We Are At War” – French Official Warns Country Must Brace For More Islamist Terror Attacks २०१५ मध्ये युरोपियन संसदेत या विषया खाली ३ प्रश्न विचारले गेले होते :- Wave of Muslim rape cases across Europe काही काळात युकेचा देखील बाजा वाजणार आहे, दोन वर्षा पुर्वीची तिथली स्थिती :- युकेत शिख समुदायाच्या महिलांवर अनेक वर्ष अत्याच्यार झाले आणि साधरण २०१७ /२०१८ च्या सुमारास ही गोष्ट उघडकीस आली. Sexual exploitation of British Sikh girls by grooming gangs has been 'recklessly ignored' by police due to 'political correctness', claims report Sikh girls 'abused by grooming gangs for decades' says shock new report Pakistani Grooming Gangs Have Been Targeting Sikh Girls In UK For Over 50 Years, Says Report एक छोटे का होइना पण चांगले पाउल :- UP CM Yogi Adityanath Vows To Bring Law Against 'Love-Jihad'; Touts 'Mission Shakti' जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #JusticeForSadhviPragya :- SIGN THE PETITION

भारतिय अर्थव्यवस्था, त्यावर भाष्य करणारे अर्थतज्ञ, अग्रेलेखातून सरकारला 'ईशारे' देणारे संपादक , जी डी पी वगैरे कितीही वाचन केले तरी 'अर्थ' कसा लावायचा हे कळत नाही. आता करोनामुळे भारतिय अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार नव्हे वाजलेच, असे आपण वाचत होतो, मिडियातून बघत होतो. जी डी पी कसा खाली घसरला वगैरे. मग नवरात्री,दसर्या निमित्ताने मर्सेडिझ बेंझ कंपनीने तब्बल ५५० गाड्या विकल्या ह्याचा अर्थ कसा काढायचा? एका गाडीची किंमत किमान ४० लाखापर्यंत असते मग असे कोण हे व्यावसायिक आहेत जे अशा माहागड्या गाड्या घेउ शकतात? कारण पुढची १/२ वर्षे काही खरे नाही,बाजराला उठाव नाही असे सगळेच म्हणत आहेत.. https://auto.hindustantimes.com/auto/news/mercedes-benz-india-delivers-… महागाईने मध्यम वर्गाचे कंबरडे मोडले आहे असे म्हणावे तर मारूती सुझुकीने ऑक्टोबर मध्ये तब्बल ९५,००० गाड्या विकल्या! ह्याचा अर्थ कसा काढायचा? https://www.rushlane.com/navratri-car-sales-2020-12380963.html किया, टाटा,ह्युन्डाई ह्यांचाही खप वाढला. सरकारला नेहमी ईशारे देणारे अर्थतज्ञ, गिरीश कुबेरांसारखे सम्पादक ह्यावर काही बोलत का नाहीत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हेच कनसिडर केले तर भारतात 1947 पासून कार विक्री होतेच आहे की म्हणजे भारतात गरिबी आहे , हा भाजपयांनी पसरवलेला भ्रम आहे की काय, तुमचे 'हे' कधी गाडी घेणारेत ?

In reply to by Gk

नेहमी व्यक्तिगत पातळीवर घसरतोस जिक्या तू. तुला मुद्द्दा समजला का ? ह्यात भाजपा/राजकारण कुठे आले? जी डी पी घसरत आहे, सगळे व्यवसाय मंदीत आहेत हे आपण सारखे वाचत होतो. अगदी अच्युत गोडबोले/गिरीश कुबेर ह्यांच्यासरखे तज्ञही हेच सांगत होते. मग असे असतना गाड्यांचा विक्रमी ख्प कसा? गाड्यांचा/बाईकच्या खपाचा अर्थ्व्यवस्थेशी थेट संबंध असतो असे अर्थतज्ञच सांगतात ना ? मग आता ह्याचा अर्थ कसा लावायचा? धंदे तोट्यात आहेत असे सगळेच जण म्हणत होते मग ४०/५० लाखाच्या गाड्या घेणारे लोक कोणता धंदा करतात? बिल्डर? पण बंधकाम व्यवसाय तेजीत नाही असे हेच अर्थतज्ञ म्हण्त होते.

दहशतवाद हा देशासमोरील महत्वाचा प्रश्न नाही . जी काही दहशतवादी कृत देशात झाली आहेत ती एकतर पाकिस्तान नी घडवून आणली आहेत किंवा येथील राजकीय कुरघोडी चा परिणाम आहे मुस्लिम हे हिंदू चे शत्रू आहेत हिंदू ना मारून टाकतील,हे सर्व राजकीय विधान आहेत. आणि मुस्लिम ना पासून हिंदू चे रक्षण भारतीय जनता पार्टी करेल हे सर्व बकवास आहे. 20 कोटी मुस्लिम देशात राहतात ते येथील नागरिक आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी देशा बाहेर काढू शकत नाही त्यांना राज्य घटनेने दिलेले अधिकार नाकारू शकत नाही. मग भारतीय जनता पार्टी मुस्लिम चे काय करणार. देशातील सर्वात महत्वाचे प्रश्न हे बेरोजगारी,गरिबी,भ्रष्टाचार,अकार्यक्षम प्रशासन. न्याय मिळण्यास होणारा उशीर. प्रशासन गुंड ह्यांची मैत्री. राजकीय पक्षांना असणारी गुंड लोकांची साथ. हे प्रश्न सर्वात मोठे आहेत हे सर्व प्रश्न सुटले तर एक पण दहशतवादी हल्ला भारतात होवू शकत नाही. कोणाला तू देशप्रेमी आहेस का असे विचारताच येणार नाही उगाचच धार्मिक संघर्ष निर्माण करणाऱ्या लोकांपासून भारतीय जनतेनी सावध राहण्याची गरज आहे

In reply to by Rajesh188

@ राजेश इयत्ता 5 वी मराठी मेडीयम. निबंध स्पर्धा - विषय - दशतवाद त्या लायकीचा प्रतिसाद.. _^_ आता डोकंच 5 वीच्या पोराइतपत आहे म्हणल्यावर आम्ही बिचारे काय काथ्याकूट करणार.. रामराम.. !!!

In reply to by बाप्पू

Bjp ही तारणहार आहे. किती ही लोक बेरोजगार झाली,बँका उद्योगपती नी बुडवल्या,काही मोजकेच उद्योगपती प्रगती करत गेले,रेल्वे पासून बँका पर्यंत सर्व क्षेत्र लाडक्या उद्योगपती ना अंदन दिली तरी ,प्रशासकीय व्यवस्थेत काडीचा बदल करू शकले नाहीत तरी,सामान्य लोकांचे जीवन अजुन खडतर झाले तरी. Bjp सरकार चे गुणगान गायले की उत्तम दर्जा चा प्रतिसाद. आणि bjp चा एकमेव कार्यक्रम हिंदू मुस्लिम, मुस्लिम आणि हिंदू ना बरोबर घेवून जाण्यात त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही . हिंदू मुस्लिम हे एक मेकाचे कसे कट्टर दुश्मन होतील. आणि त्या मधून घडणाऱ्या दंगलीत सामान्य लोकांचे कसे बळी जातील अशी ह्यांची ध्येय धोरण ...आणि ह्या द्वेषाच्या राजकारणात स्वतःची पोळी भाजून घेणे हाच ह्यांचा हेतू. मुस्लिम सोडा हिंदू चे तरी आर्थिक बाबतीत मजबुती करणं bjp ni केले आहे का

In reply to by Rajesh188

अहो राजेश.. तुम्ही माझे प्रतिसाद वाचा.. BJP च्या प्रत्येक चुकीच्या धोरणावर मी टीका केली आहे. मग ते नोटबंदी असो किंवा अर्थव्यवस्था.. पण माझ्या बहुतांश प्रतिसादाच्या उत्तरात तुम्ही BJP ला का धारेवर धरातायेत ते समजेना.
आजकाल खरं बोलले.. आणि स्पेशली हिंदुत्वाबद्दल किंवा भारताच्या मूळ संस्कृती बद्दल काही बचावात्मक बोलले कि लोकं मला भाजपेयी का समजतात.. देव जाणे. कदाचीत हेच भाजपा वल्यांचे यश आहे का.??

In reply to by Rajesh188

देशातील सर्वात महत्वाचे प्रश्न हे बेरोजगारी,गरिबी,भ्रष्टाचार,अकार्यक्षम प्रशासन. न्याय मिळण्यास होणारा उशीर. प्रशासन गुंड ह्यांची मैत्री. राजकीय पक्षांना असणारी गुंड लोकांची साथ. हे प्रश्न सर्वात मोठे आहेत
हे अगदी खरे आहे. पण सामान्य माणूस सुध्दा आपले भले कशात आहे ते न समजुन घेता नाही नाही त्या गोष्टीत रस घेतो.

---सरकारला नेहमी ईशारे देणारे अर्थतज्ञ, गिरीश कुबेरांसारखे सम्पादक ह्यावर काही बोलत का नाहीत?>> यांच्या सारखे जे कोणी जर्नालिस्ट आहेत त्यांना फक्त भाजपा सरकारवर टीका करणे एव्हढेच माहीत आहे. देश सामान्य माणसे मुसलमानांनी केलेले बलात्कार वगैरे विषयी यांना काही देणे घेणे नाही.

In reply to by दिगोचि

अखलाक बद्दल रकाने च्या रकाने आणि headlines टाकणारे निकिता तोमर बद्दल मूग गिळून गप्प बसतात. माझा प्रॉब्लेम अश्या हिपोक्रेटीक लोकांबद्दल आहे. असेच चालू राहिले तर एक दिवस हे नॉटी ( याचा अर्थ संजय राऊत जी यांना विचारा ) लोकं भारतात मूळ 10, 000 वर्ष्याहूनही जुन्या सांस्कृतिचा बट्ट्याबोळ वाजवून लोकांना रानटी आणि वाळवंटी संस्कृती स्वीकारायला लावणार. किंबहुना तशी परिस्थिती आणणार कि लोकांपुढे पर्यायच राहणार नाही.

In reply to by बाप्पू

निकिता तोमरच्या नातेवाईकनि सरकारी तपासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे Nikita Tomar murder case: Both accused sent to 14-day judicial custody Both the men accused in the Nikita Tomar murder case have been sent to judicial custody after they were produced in court on Thursday. https://www.indiatoday.in/india/story/nikita-tomar-murder-case-both-acc… योगीजींच्या हाथरस केस मध्ये ही तत्परता नव्हती म्हणून आमचे बंटी बबली नाचून आले, मग कुंभकर्ण जागा झाला, योगीजी आता लव्ह जिहादवर मोठा कायदा करणारेत , त्यांचे व तुमचे अभिनंदन

In reply to by Gk

तपास होत आहे.. ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी सरकार चे आभार. पण एक अखलाख मेला तर जणू भारतात मुस्लिमांचे जगणे च मान्य नाही असा डोलारा उभा केला होता बुद्धिजीवीयांनी.. पार UNA मध्ये निघाले होते काही महाभाग.. टीव्ही वर चर्चा आणि महाचर्चा चे फड रंगले होते.. ज्यांना कोण विचारत नव्हते तेसुद्धा आपले आपले अवॉर्ड अडगळीतून शोधून परत करत होते.. असा काही गोंधळ निकिता तोमर च्या बाबतीत झाला नाही.. अश्यावेळी ही जमात खोल खड्डा खणून आतमध्ये लपून बसते.. आणि त्या बाजूला जरा काही झाले तरी छाती पिटत वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्या तसे येतात. माझा आक्षेप या हिप्पोक्रसी ला आणि त्यांच्या प्रोपेगेंडा ला आहे. तुमचे बंटी आणि बबली सुद्धा आता रस्त्यावर उतरले नाहीत कदाचीत जात यावेळी हवी ती नव्हती.. आणि आरोपी त्यांच्याच "कम्युनिटी" मधला होता. जाता जाता... मनुष्याच्या जीवाची किंमत होऊ शकत नाही. मारणारा कोणीही असो, कोणत्याही जाती.धर्माचा असो.. त्याला न्याय मिळालाच पाहिजे.

In reply to by बाप्पू

तिकडे गोव्यात भाजपाचे मंत्री बोलले , पोटभर गोमांस खा त्यांचा कुणी निषेध केला नाही की त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही.

@माई भारतिय अर्थव्यवस्था, त्यावर भाष्य करणारे अर्थतज्ञ, अग्रेलेखातून सरकारला 'ईशारे' देणारे संपादक , जी डी पी वगैरे कितीही वाचन केले तरी 'अर्थ' कसा लावायचा हे कळत नाही. हे मला देखील कळंत नाही ! मार्केट कोसळण्याच्या आधी त्यात अनेक नविन खेळाडु देखील मोठ्या संख्येने भाग घेतात असे का ? याचा देखील 'अर्थ' कसा लावायचा हे मला अजुनही समजलेले नाही. असो... तुमच्या ह्यांच ग्रह तार्‍यां विषयी काय मत आहे ? ते कळंव हो ! महाराष्ट्रात अनेकांचे ग्रह फिरणार आहेत असं दिसतयं... ग्रह तारे यांच्या विषयी काही काळा पासुन मला विशेष रुची निर्माण झाली असुन त्यातलं मला काहीही कळंत नसले तरी जाणुन घेण्याची प्रबळ इच्छा होत आहे. माझ्या वाचण्यात आलेली माहिती :- विश्व आर्थिक मंदी- 2020 5 नवम्बर 2019 से लेकर 24 जनवरी 2020 तक, जब तक शनि और गुरु फिर एक बार धनु राशि में रहेंगे, तब तक की समयावधि प्राकृतिक विनाश की बड़ी वजह बन सकती है. इसके अतिरिक्त मार्च 30, 2020 से लेकर 29 जून 2020 और 19 नवम्बर 2020 से लेकर 05 अप्रैल 2021 तक के मध्य गुरु-शनि की युति मकर राशि में रहेंगी, गुरु क्योंकि धन, आर्थिक स्थिति के कारक ग्रह है और शनि कष्ट, आपदाओं और काल के कारक ग्रह है, इस स्थिति में मकर राशि में दोनों का एक साथ होना प्राकृतिक आपदाओं के अतिरिक्त आर्थिक बाजार में रिकार्ड गिरावट का कारण बनेगा, यह स्थिति विश्व आर्थिक मंदी की वजह बन सकती है. इस ग्रह युति की अवधि में इस प्रकार की आर्थिक आपदायें भयंकर रुप में आने के संकेत मिल रहे है. इस समय में विश्व भर में बड़े पैमाने पर वित्तीय संकट, आर्थिक गिरावट और सेंसेक्स के रिकार्ड स्तर से गिरने के प्रबल योग बना रहा है. ऐसे में धन निवेश से बचना लाभकारी रहेगा. इससे पूर्व भी जब गुरु-शनि मकर राशि में 1842, 1901, 1961 में एक साथ आए थे तो कुछ इसी तरह की स्थिति देखने में आई थी. ========================================================================================== युद्ध के बादल यहां ध्यान देने योग्य बात यह है कि 1961-1962 में जब गुरु-शनि एक साथ मकर राशि में एक साथ थे, तो पडौसी देश चीन से युद्ध हुआ था. मकर राशि भारत देश की कुंडली में नवम भाव की राशि है, और नवम भाव से गुरु-शनि तीसरे भाव को पीडित कर युद्ध की स्थिति एक बार फिर से बना सकते है. 2020 से 2022 के मध्य एक बार फिर से चीन और पाकिस्तान से सावधान रहना होगा. अन्यथा युद्ध के बादल सिर पर एक बार फिर मंडरा सकते हैं... 59 साल बाद मकर राशि में फिर जुटेंगे 6 ग्रह, देश दुनिया में होंगे बड़े बदलाव

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracy

In reply to by Gk

अश्या गद्दार व्यक्तीला फासावर लटकावले पाहिजे. तो नावावरून हिंदू वाटतोय म्हणून त्याला सपोर्ट करायला किंवा आंतरजालावर त्याला (उमाः प्रमाणे ) सपोर्ट करणारा समाज नाही आमचा. तुमच्यासारखं नाव बघून वकीलपत्र घेत नाही आम्ही.. . आम्ही माय ला मानतो.. शेजारणीला नाही.. बाकी ही घटना इथे " नावासकट " हायलाईट करण्याचा तुमचा उद्देश समजला.. अश्या संधी फार कमी मिळत असतील नाही?? .. त्याचा बेनिफिट घ्या. बाकी अश्या गोष्टी इतरधर्मीयांनी तुमच्या बिरदारीबाबत सुरु केल्या तर आंतरजाल ठप्प होईल एका दिवसात..

In reply to by बाप्पू

@ बाप्पू कडव्या राष्ट्रनिष्ठा पुरेश्या प्रमाणात निर्माण करण्यात गेली १४०० वर्षे आपण भारतीय नेमके का कमी पडत आलो आहोत हे समजणे कठीण जाते. भारतीय अजिबात राष्ट्रनिष्ठा दाखवत नाहीत असे नाही पण तुटून पडणार्‍यांची पुरेशी संख्या निर्माण करण्यात भारतीय तवज्ञान कुठे कच्चे पडते हे भारतीय तत्वज्ञानातील अधिकतम सकारात्मकता कायम ठेवत पुन्हा तपासण्याची गरज असावी. गेली काही शतके ज्या राष्ट्रनिष्ठेचा परिचय पश्तुन अफगाणांनी अफगाणीस्तानच्या बाबतीत दिला तशा निष्ठा ईतिहास कालीन भारतीयांनी दाखवल्या असत्या तर परकीय आक्रमणे झाली तरी टिकाव धरण्याचा कालावधी कमी राहून पाकीस्तान बांग्लादेश तयार होण्याची, आणि सकारात्मकतेला अधिक मर्यादा घालणार्‍या परकीय संस्कृतींच्या वैचारीक गुलामीची वेळ आली नसती.

In reply to by माहितगार

फ्रान्स मधली त्या घटनेची एक बाजू दिलासादायक आहे शिक्षकाचा खून करणार्याला पोलिसांनी पाठलाग करून ताबडतोब ठार केले. चार्वाक , तुकाराम , गांधी , दाभोलकर , लनकेश .... इथे अनेकांचे धर्मान्ध खुनी मोकाट फिरतात ह्यांच्या खुन्यानाही मोदी सरकारने ठो ठो गोळी हाणावी

In reply to by Gk

ते जावु दे जि. क्या. मला सांग इतक्या मशिदी असताना मथुरेत श्री कृष्ण मंदिरात नमाज पढायला ४ मुस्लिम लोक गेले त्या विषयी तुमचे काय मत आहे? असे जर आम्ही मशिदीत जावुन आरती केली तर चालेल काय? असे झाले तर मग मिसळपाव कशाला अख्खा भारत बंद होईल नाही?

In reply to by माहितगार

आपण भारतीय नेमके का कमी पडत आलो आहोत हे समजणे कठीण जाते.
बरोबर. ज्या गोर्‍यांनी आपला देश लुटुन फस्त केला त्यांच्याच देशात शिक्षण घेणार्‍यांना, नोकरी करणार्‍यांना स्वर्ग २ बोटे उरला आहे असे का वाटते ?

भारतिय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे अर्थतज्ञ म्हणत होते. ह्या सगळ्याचे कारण करोना आहेच पण मूळ कारण नोव्हेंबर २०१६ मधिल नोटाबंदी आहे असेही अनेक पत्रकार सारखे म्हणत होते. ट्रॅक्टर व बाईक्सच्या विक्रीचा अर्थ्व्यवस्थेशी थेट संबंध असतो असे हे तज्ञ नेहमी सांगत असतात. मग आता हिरो कंपनीने एका महिन्यात आठ लाख बाईक्स विकल्या ह्याचा अर्थ काय ? ह्युन्डाई कंपनीने तर तब्बल ५६००० गाड्या विकल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मोठा रेकॉर्ड आहे. मर्सेडिझने नवरात्रि/दसर्याच्या काळात ५५० गाड्या विकल्या. एका गाडीची किंमत ३५ ते ४० लाख तरी असावी. ४० लाखाची गाडी घेणारे मोठे व्यावसायिक असतात मग ह्याचा अर्थ "भारतिय अर्थ्व्यवस्थेचे बारा वाजले आहेत.. निर्मला सीतारामन ह्याना काहीच कळत नाही" वगैरे जो प्रचार चालु होता ती सगळी अजेंडा पत्रकारीता म्हणायची. आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही पण निदान अर्थव्यवस्था व तिच्यावर भाष्य करताना पत्रकारानी आपला राजकीय अजेंडा बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ऑक्टोबर चे GST कलेक्शन 1लाख कोटी झाले असे म्हणतात.. अवांतर - तुमची प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले.. माई तुमच्या ह्या नी पक्ष बदलला की तुम्ही काडीमोड घेतलात? ह घ्या

In reply to by आनन्दा

हा हा हा. आर्थिक समस्यांचा उहापोह राजकीय विचार बाजूला ठेवुन करावा असे आमचे मत.अनेक अर्थतज्ञ तसे करताना दिसत नाहीत."अर्थ्व्यवस्थेने मान टाकलेली/केंद्राच्या तिजोरीत खडखडाट.." अशी वाक्ये लोक्सत्तेच्च्या अग्रलेखात गेल्या आठवड्यापर्यंत येत होती. हे अंशुमान तिवारी(https://en.wikipedia.org/wiki/Anshuman_Tiwari) , अतिशय उत्तम उहापोह करतात, आकडेवारी सांगून. देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते. मग हे असे अचानक काय झाले? यु पी आय मधुन व्यवहार वाढले हे समजू शकतो पण हिरो कंपनीच्या बाईक्सची ८ लाख विक्रमी विक्री झाली.. जर अर्थव्यवस्थेने मान टाकलेली होती, लोकांच्या खिशात पैसा नव्हता तर मग ह्युण्डाई/मारूतीच्या गाड्या एवढ्या जोरात कशा खपत आहेत? https://auto.hindustantimes.com/auto/two-wheelers/hero-motocorp-shatter… ह्याचे उत्तर मिळेल का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दुचाकी चार चाकी चा खाप वाढण्याचे दुसरे एक पण महत्वाचे कारण करोना आणि सोशल डिस्टन्सिंग हे असू शकते. बस ट्रेन ने प्रवास करायला लागू नये म्हणून लोक गाड्या किंवा दुचाकी घेत असावेत. हे देखील एक शक्यता आहे

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

देशाची अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली आहे हे ते सांगत होते. "आता पुढची २/३ वर्षे काही खरे नाही" असेही म्हणत होते. माई हे असत्य नाही. करोनाने त्यात अधिकची भर घातली आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम दिसायला पुढचे वर्ष उजाडावे लागणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या भितीने ज्यांना कामासाठी इतर वाहनांचा वापर टाळावा वाटला असावा आणि ज्यांची आर्थिक स्थिती योग्य असावी यांनी मध्यम छोट्या श्रेणीतील कार आणि दुचाकींना पसंती दिली असण्याची शक्यता अधिक वाटते. काही चिंतादायक बातम्या :- Data | An estimated 12.2 crore Indians lost their jobs during the coronavirus lockdown in April: CMIE Lockdown 2.0: Unemployment rate hits 26% in India, 14 crore lose jobs, says CMIE 1.89 crore salaried Indians lost jobs since April, around 50 lakh only in July, says CMIE 1.89 crore salaried jobs lost in 3 months Every third professional has lost his job since corona Coronavirus: India will take 'years' to recover from unemployment crisis Five million salaried people lost jobs in July; their ballooning numbers a source of worry: CMIE India's fragile formal sector: 18.9 million white collar job loss 'difficult' to retrieve Loss is not only of jobs but also of incomes माझ्या ओळखीतल्या अनेक जणांचे वांदे लागले आहेत, कोणाचा बिझनेस आहे,कोण हॉटेल लाईन मध्ये आहे तर कोणी नोकरदार. जितक मला ठावूक आहे आणि समजलं आहे त्यानुसार डिप्रेशन अटळ आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With China

In reply to by मदनबाण

काही कळत नाही रे मदनबाणा . लोकांकडे पैसा नाही म्हणावे तर यात्रा डोट कॉमवर ४०% अधिक बुकिंग झाली. ती कशी? https://www.livemint.com/news/india/travel-firms-witness-spike-in-booki… हे सहलीला जाणारे कुणी धनाढ्य नाहीत. मध्यम-उच्च मध्यमवर्गीय आहेत. एका वर्गाकडे ४०/५० लाखाच्या गाड्या घेण्यासाठी पैसा आहे. उच्च-मध्यम्/नवश्रिमंतांकडे मारूती एर्टिगा, किया, हेक्टर, आय-२० गाड्या घेण्यासाठी पैसा आहे. गुजरात्मध्ये समुद्र-विमानाने पटेलांचा पुतळा पाहण्यासाठि पहिल्याच दिवशी ३००० बुकिंग्स झाली. https://indianexpress.com/article/business/aviation/spicejet-gets-3000-… वरील बातम्यांची व 'ढासळणार्या' अर्थ्व्यवस्थेची सांगड कशी घालायची ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहलीला जाणे, ७/८ लाखाच्या गाड्या घेणे,४०/५० लाखाच्या गाड्या घेणारे आर्थिक नियोजन करत असतीलच ना? भविष्याचा विचार करत असतीलच ना? हे कोण व्यावसायिक आहेत , ज्यांचे एकदम मस्त चालले आहे?

तर bjp विरूद्ध मत व्यक्त करणाऱ्या लोकांना पण भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. भारतीय संस्कृती टिकून राहावी म्हणून सर्व काही रिती रीवज ते अतिशय भक्ती भावाने निभावत असतात. धर्माचा,जातीचा वापर जेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो तेव्हा मतभेद होतात. राजकारणात धर्म आला की राजकीय पक्ष धर्म जाती वाटून घेतात त्या संबंधित पक्षाच्या सरकारला ला विरोध केला की त्या धर्माला विरोध करतोय असा सोयीचा अर्थ काढला जातो. मुळात धर्माला राजकारणात प्रवेश निषिद्ध च असला पाहिजे. बाहुधर्मिय ,अनेक जातीत विभागलेला भारतीय समजा साठी ते धोकादायक आहे. टीव्ही वर सरळ धार्मिक चर्चा आयोजित करून ,न्यूज वर धर्म आधारित बातम्या चा रतीब लावून आपण देशप्रेम दाखवत आहोत की देशद्रोही काम करत आहोत ह्या विषयी विचार करण्याची गरज आहे. ह्या बाबत gulf मधील देशांचे उदाहरण घेण्याची गरज आहे. बहुसंख्य मुस्लिम असलेल्या ह्या देशात बिगर मुस्लिम लोकांना काहीच त्रास नाही. इथल्या सारखे तिथे मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करत नाहीत. कोणत्या देशात मुस्लिम वर अन्याय झाला म्हणून तिथे लोक रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांनी धर्माला धर्माच्या ठिकाणी च ठेवलं आहे.

In reply to by Rajesh188

एक प्रश्न मनात आला. गल्फ मध्ये ईशनिंदा कायदा आहे की नाहीये हे जरा सांगाल का मला शोधून? धर्म आणि राजकारण एकत्र अनु नये म्हणताय म्हणून विचारतोय आपला. अवांतर - तुम्ही म्हणताय ते कितीही खरे असले तरी अनादी काळापासून धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच चालत आलेले आहेत, त्यामुळे त्यात बदल होणे मला तरी इतक्यात अपेक्षित नाही. You have to live with it.