आणखी एक कला
***
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
इतक्या वस्तू बनल्या आहेत घेऊनच आस
हरवायची - ती आपत्ती नको वाटायला.
*
रोज काही हरवू द्या - होऊ दे गडबड शोधायला -
हरवा छल्ला चावीचा, जाऊदे वाया एक तास.
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
*
सरावाने भराभरा, भारंभार लागा हरवायला
नावांस, ठिकाणांस, सफर करायच्या त्या स्वप्नांस
हरवू देत. ती आपत्ती नको वाटायला.
*
हरवले आईचे घड्याळ, लागता हा हा म्हणायला
गेले जुने घर, अन् त्यापूर्वीचे, जिव्हाळ्याचे खास...
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
*
दोन शहरे सांडली माझी, माझा लागला जायला
देश, कित्येक नद्या, भूखंड, अर्धा पृथ्वीचा व्यास
चुकचुकते आहे - पण आपत्ती नको वाटायला.
*
हरवला आहेस तूही (बोलायला गमत्या, वागायला
प्रेमळ) - खोटे नाही सांगत - स्पष्टच सांगावयास -
हरवायची कला नाहीच कठिण शिकायला.
वाटेल आपत्ती. (ठेव लिहून -) पण नको वाटायला.
***
- (मूळ इंग्रजी कविता) एलिझाबेथ बिशप -
(माझ्या एका मित्राचे खूप काही हरवले आहे, ही कविता वाचताना मला त्याची खूप आठवण आली. या कवितेचे भाषांतर करताना त्याच्या दु:खाची किंचित का होईना, सह-अनुभूती मला होत आहे.)Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4033
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
सरस
कवितेचा
हो!
In reply to कवितेचा by भडकमकर मास्तर
हेच म्हणते
In reply to कवितेचा by भडकमकर मास्तर
आवडले.
सुंदर!
कविता आणि
सुंदर !
सुरेख अनुवाद
सर्वांना धन्यवाद
सुरेख..! आपल
थोड्या उशिराच
छान - स्फूर्ती
In reply to थोड्या उशिराच by विसुनाना
भाषांतर..
सहमत आहे
In reply to भाषांतर.. by स्वाती दिनेश