शब्द
*शब्द*
शब्द देतात आनंद
दुःखही देतात शब्दच,
शब्दानेच मिळते वेदना
त्यावर मलम होती शब्दच !!
शब्दातून मिळते प्रेम
माया हि होतात शब्दच,
शब्दच नात्यांतला दुरावा,
नवी नाती जुळवतो शब्दच !!
ह्रदयातून यावा शब्द,
साखरमाखला गोड गोड,
भावनेने ओथंबलेला ,
काही नको त्यात तडजोड !!
कधी मुके होतात शब्द,
अन् बोलू लागतात डोळे,
भाव मनीचे याचे त्याला,
जातात समजून सगळे !!
झाडं वेली, डोंगर दरी
पक्षी बोलतात मधुर शब्द
मोहवणारं निसर्गाचं हरेक रूप.
तेथे मात्र सारंच निःशब्द !!
होई सारंच निःशब्द !!!
-©सौ वृंदा मोघे
15/1/2020
छान कविता
शब्दा वाचून, कळले सारे....
चांगली आहे कविता
धन्यवाद