✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भूमिपुत्र ...बळीराजा

V — Vivekraje, Wed, 10/28/2020 - 10:08
धरतीच्या लेकराला कसं आभाळ नडलं.. होतं सपान येगळ सारं इपरित घडलं.. होती कष्टाची पावती , सारी उभी शेतामधी.. आलं आभाळाच्या मनी, उभं पाणी डोळ्यामधी.. शेत पाण्यात भिजलं , मन जागीच थिजलं.. रान सपनाच उभं, एका क्षणात विझलं.. कधी बाजारात धाक , काय मिळेल हो दाम.. पेरी मोत्याचं बियाणं, वाही अनमोल घाम.. कर्ज व्याजनं ते काढी , रानी हिरवळ शृंगारी.. व्याज फेडी दर साली, तरी फिटेना उधारी.. दरसाली पेरतो , नव्या सपनाच बियाणं.. तरी भरेना घरात, कधी खरं सोनं नाणं.. दिस सणाचे हे आले, देवा आता उंबऱ्यावर.. करी उपकार थोडे ,जगाच्या पोशिंद्यावर.. थोडी उसंत जगण्याची,त्याच्या नशिबी मिळू दे.. सपनं छोटी छोटी त्याची, थोडी झळाळी मिळू दे.. सण दिवाळीचे दीप, त्याच्या घरिबी उजळू दे.. पीक जोमात येऊ दे , भाव सोन्याचा मिळू दे.. नावं आहे बळीराजा, मान राजाचा मिळू दे.. दरबारी जनावरं पीक,आभाळी भिडू दे..

प्रतिक्रिया द्या
2047 वाचन

💬 प्रतिसाद (3)

छान आशादायक काव्य!

पाषाणभेद
गुरुवार, 10/29/2020 - 10:01 नवीन
छान आशादायक काव्य!
  • Log in or register to post comments

चान चान

सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2020 - 10:13 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

छान

गोंधळी
गुरुवार, 10/29/2020 - 14:34 नवीन
वास्तविक.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा