जीवन के सफर मे

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
28 Oct 2020 - 12:02 pm

जीवन के सफर मे राही

जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी
ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो ।

बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड
मधील मसुरीच्या  रस्त्यावर दोनच मिनिटे
भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही।
पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट।

हिमालयाच्या कुशीतील सगळी ठिकाणं
काय किंवा निसर्गाने निर्माण केलेली कुठलीही ठिकाणे  नुसती पाहाण्या पेक्षा, निवांतपणे
अनुभवायची आहेत,हे अनुभवांती पटलंय।
दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यातअतिशय आल्हाददायक निवांत वातावरणात, रमणीय स्थळांमधे उत्तराखंडात । पण गावे निवांत नव्हती।
कारण, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या
(नगरपालिका )निवडणूकांची गडबड ह्रषीकेश ,डेहराडून ,मसुरी ,जिथे गेलो तिथे।

मतदानाचा प्रचंड उत्साह।राष्ट्रीय,प्रादेशिक पक्षाचे
तसेच ,स्वतंत्र उमेदवार हिरिरीने ,मैदानात ।
पुढील पाच वर्षे "जनसेवाहेतू"।

निवडणुका पार पडल्या ।पेपरात दुसरे दिवशी फोटो बातम्या होत्या ।मतदारांचाउत्साह।
वृध्द ,अपंग ,पहिल्यांदाच मतदान करणारे।
दोन गटामधील बाचाबाची।तणाव।पोलीसांचा हस्तक्षेप वगैरे।
एकंदरीत मतदान शांततेत।

मी एकोणीस नोव्हेंबर ला मसुरीला ।भर दुपारी  अतिशय  आल्हाददायक ,थंड वातावरणात ,स्वेटर ,कोट, कानटोपी
परिधान करून,एका व्ह्यू्पॉईंटजवळ उन खात निवांत ।तेथील प्रसिद्ध  अशा माल रोडवर ।
नेहमी गजबजलेल्या या मालरोड ची गंमतच आहे।
दोन मैल लांबी आणि जेमतेम पंधरावीस फुट रुंदी।
एका बाजूला खोल दरी।रस्ता मोठमोठे चढ उतारांचा ।
वळणावळणाचा।दोन्ही कवेत हॉटेल्स  मोठी दुकाने
टपरीवजा छोटी दुकाने,ऑफिसेस,ब्यांकाआणि
काय काय घेउन।
अधुनमधून उपरस्ते मिळतात किंवा फुटतात।
उतारांकडे किंवा चढाकडे,जाणारे ,येणारे।
सगळीकडे गर्दी आणि गर्दी।माणसांची।वाहानांची ।
दुचाकी, तीनचाकी।चारचाकी,खासगी ,भाडोत्री,सरकारी।
कुठेकुठे रस्ते जाम।

मसुरी प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने
अनेक प्रकारचे असंख्य पर्यटक।देशी,विदेशी।
दुकानात ,हॉटेलमध्ये,प्रेक्षणीय स्थळां मधे ,स्थळांजवळ जिकडेतिकडे।कुतुहलयुक्त नजरांनी,स्थळे पाहात ।
काही जण  कुणी मागे लागल्या सारखे घाईघाईने ,तर कुणी एखादेकाम उरकून टाकल्यागत हा स्पॉट ते
तो स्पॉट करत।काही उगीच  निरुद्देश  हिंडणारे।

खरेदी, घासाघीस ,खाणे ,पिणे , कंटाळणे ,वैतागणे।
मुलांचे रडणे ,हट्ट।हट्ट स्त्रियांचेही।खरेदी साठी

तरुण तरुणींचेे बिलगुन चालणे।एकमेकांच्याकानात बोलणे । सल्लज कुजबूज।बहुधा नवविवाहित।
काही हुषार पुरुष आपापल्या बायकांना,खरेदीसाठी मोकळे सोडून ,चालतीबोलती प्रेक्षणिय स्थळे न्याहाळत।
काही ,कुटुंब वत्सल ।चिल्यापिल्यांना साभाळत।
खरेदीचा वैताग चेहऱ्यावर न दिसूदेता, अर्धांगाचे खरेदीस  पूर्ण पाठिंबा देत, खिसे रिकामे करत।

बहुतेक पर्यटकांसाठी  पर्यटन हा घाईघाईने
उरकण्याचाच कार्यक्रम।पाहाण्या, अनुभवण्यापेक्षा ,
खरेदी व खरेदी।आपल्या गावातही त्याचकिंवा
कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू पर्यटन स्थळी
घासाघीस करून घेण्यात काही वेगळीच मजा।

स्वतःचे व बरोबरच्यांचे फोटो आणि सेल्फी सेल्फी, सेल्फी आणि सेल्फी,हेचमुख्य आकर्षण।
गावी परतल्यावर जाउन आलो  हे जाहीर
करण्यासाठी।

मी मात्र,एकटाचअसल्याने खरेदी वगैरे
भानगडी नव्हत्या।पण कितीही निवांत राहायचे
ठरवले तरी,अशा वातावरणात आजुबाजुला
जे घडतय त्यापासून पूर्णअलिप्त  राहणे एखाद्या
योग्यालाच शक्य।
आपण त्यातले नसल्याने फुकटची गंमत
पाहाण्यात,न्याहाळण्यात ,वेळ मजेत जात होता।
व्ह्यू्पॉईंटच तो । निसर्गा सोबत हे ही।
जवळच असलेल्या सायकल रीक्षा स्टेंडवर अनेक
रीक्षा चालक ग्राहकांच्या प्रतीक्षेत।
दुकान दार ,ठेलेवाले आपापल्या धंद्यात मग्न।
तेवढ्यात एकजुनी खटारा मारुती ८०० ,गाडी
रस्त्यात थांबली।त्यातून अंदाजे पन्नास वर्षीय व्यक्ती उतरली।
पांढरा नेहरू शर्ट ,पायजमा ,खादीचे नीळे जाकिट असा वेष।
दुकान दार, ठेलेवाले ,रिक्षावाले,रस्त्याच्या कडेला असलेले, सर्वांना ,हास्यवदने भेटत ,हात जोडून  नमस्कार ,हस्तांदोलन हे उपचार सुरू।ते राजकीय नेते असणार हे कळणे अवघड
नव्हते।
मतदान तर अगोदरच होउन गेलेले ।
त्यामुळे मतदानासाठी जोगवा निश्चित नव्हता।
मतदानानंतर ,मतदारांना भेटण्यासाठी येणारी ,
कोण ही अलौकिक विभुती असा विचार डोकावला।

गाडीच्या मागील काचेवर, चिकटवलेल्या स्टिकर वर मजकूर होता,'नगरपालिका अध्यक्ष पद हेतू उमेदवार
बिल्लू बाल्मिकी ।निशानी 'बंगला,' पे मुहर लगाईये'।

त्यातून उलगडा की,नगर पालिकेच्या अध्यक्ष 'पदहेतू'निवडणूकीचे हे उमेदवार।
मतदानानंतर ,आपल्यालापाठिंबा दिल्याबद्दल ,मतदान केल्या बद्दल,हे सद्ग्रहस्थ मतदारांचेआभार
मानत फिरत होते।
मला स्थानिक समजून माझ्याशीही हस्तांदोलन केले ।
मी उपचार म्हणून त्यांना 'इन एडवांस बधाई'पण दिली।
  "पिछले पार्षदोंने गांव की हालत बिगाड दी ,अब आप के आनेसे हालात बेहतर होंगे" कुणीतरी या भावी लोकसेवकाची चाप्लुसी करणे हेतू बोलले।

"मै चुनाव जितनेवाला नही, ये तय है।'
त्यांचा भ्रमनिरास करत उमेदवार ठामपणे बोलले।
आपल्या पराभवाबद्दल  केवढा विश्वास! निवडून येणार नाही माहिती होते तर लढवली कशाला निवडणूक
अन पैसे का खर्च केले ? माझ्या मनात प्रश्न।

कदाचित तो ओळखून ,त्यांनीचजमलेल्या लोकांपुढे
खुलासा केला।
"चुनाव तो आपके लिये लडा।
खुद तो एक लाख भी नही लगाया। 
लेकीन सामनेवालोंके पसीने छुडवाए।
एक एक करोड खर्च किये उन्होने।चलो आपका कुछ फायदा तो हुआ ना? ''हसत,डोळे मिचकावत
जमलेल्या जनतकडेे कटाक्ष टाकून ते  बोलले।

अशी भानगड होती तर !
जनहीतार्थ 'इधर का माल ऊधर 'करण्याची ही कल्पना
भन्नाटच !

आजूबाजूची जनता त्यांच्या बोलण्यातील मतितार्थ ध्यानी येउन , हेतू समजून त्यांच्या भाग्यदात्या कडे
कृतज्ञतेने पाहात होती।
सामनेवाल्या उमेदवारांच्या करोड ,करोड ,पैकी
आपापल्या पदरी किती पडले ,ह्याचे हिशेब
त्यांचे त्यांना च ठाऊक होते।ते त्यांच्या चेहर्यावर दिसत होते ।
तोवर नेता स्टाईल ने सर्वाकडे सुहास्य वदने ,कटाक्ष टाकत हात हलवत ,बिल्लू जी गाडीत बसून निघून गेले ।
'अर्थव्यवस्था मजबूत राहाण्यासाठी पैसा साचून न राहाता खेळता राहिला पाहिजे,' या कुठे तरी वाचलेले विधानाचा धडा मला देउन !
                 नीलकंठ देशमुख
     ८७९३८३८०८० nilkanthvd1@gmail.com

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

28 Oct 2020 - 2:03 pm | आनन्दा

मस्त आहे.
तेव्हढं ते formatting चं मनावर घेता आलं तर बघा ना.
रसभंग होतो

आनन्दा's picture

28 Oct 2020 - 2:03 pm | आनन्दा

आणि अकारणच एका स्वर्गीय मिपाकर माणसाची आठवण पण येते..

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:49 pm | नीलकंठ देशमुख

हे समजले नाही

जाऊ द्या, ते सध्या स्वर्गवासी असल्यामुळे त्याबद्दल बोलणे अप्रस्तुत आणि विषयांतर देखील ठरेल.. (कारण ते मिपाकरांचे बरेच लाडके होते)

ते हयात असते तर सरळ नाव घेऊन बोललो असतो. तुम्हीच शोधून पहा मिळाले तर..

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:50 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:50 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:50 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:50 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:51 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 3:51 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
प्रयत्न करतो.फॉरमॅटींगचा

नीलकंठ देशमुख's picture

28 Oct 2020 - 4:59 pm | नीलकंठ देशमुख

चूकीने एकच प्रतिसाद जास्त वेळ प्रकाशित झाला

सिरुसेरि's picture

28 Oct 2020 - 9:05 pm | सिरुसेरि

छान लेख . पुलेशु .

नीलकंठ देशमुख's picture

29 Oct 2020 - 2:27 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद