Skip to main content

कास पठार आणि महाबळेश्वर

लेखक शामसुन्दर यांनी शनिवार, 03/10/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
कास पठार आणि महाबळेश्वर चालू झाले आहे का ?कोणी माहिती देऊ शकेल का?

वाचने 7252
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कसे जाणार? सार्वजनिक जागा / बागा अधिकृतपणे बंद आहेत.

In reply to by सतिश गावडे

तीन दिवसांपूर्वी ओळखीच्यातील तीन जण गेले होते कारने. एकाचे कंपनीचे काम होते आणि कंपनीने रूम बुक करून दिली होती.

कास पुष्प पठार बंद आहे. लांबून बघता येते. त्याच्या पुढे १ कि मी अंतरावर कास तलाव आहे. अतिशय उत्तम ठिकाण आहे. इथे जाऊ शकता.

In reply to by बोलघेवडा

रीसोर्ट चालु आहेत का सर? स्वत:च्या गाडीने जाणार आहे चालु आसेल तर थिक नाहितर निघलो पुधे तपोळा जाव म्हण्तोय

आम्ही जाऊन आलोय कालच . बऱ्यापैकी पर्यटक ही होते. पठार फुलायला सुरवात झालीय. धुकं , ढगांची दुलई आणि ऊन नसल्याने छान हिरवेगार वातावरण होते काल. पुढे कास तलाव बघून पुढे 10 किमीवर शिवसागर जलाशय आहे. बोटिंग 7 महिने बंद होतं. काल आमच्यसमोरच बोटी उघडल्या मग पुढे संगम आणि जुनी बामणोली इथे बोटीने गेलो अर्धा तास लागला, पाण्यातून 12 किमी होते. तिथे भुयारात महादेवाचं मंदिर होतं. गार, शांत, प्रसन्न . कोयना , कांदाटी, सोळशी नद्यांचा संगम .