हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?
मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.
तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ? नाही कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते.
आणि एक मोठी वीज कंपनी यांच्या बंधू चीच होती तिला हे देतात ,आता तुमच्याच भागातले त्यांचे मित्र चालवतात - ते एकच आहेत हे सर्वांना माहीत आहे..
म्हणजे तुम्ही अधिक डेटा वापरा याना तुमचीच वीज मिळेल आणि ते तुम्हालाच ती विकत देतील!
हे विलक्षण धक्कादायक आहे .
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न कायम आहे.
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?
विस्ताराने लिहा ना.
कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते.
एवढं फिजिक्स आलंय की विक्रम - वेताळच सांगेल.
अशा भंपक गोष्टींवर तुम्ही
अशा भंपक गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता हेच
हे विलक्षण धक्कादायक आहे
ऊडवा हा धागा !
In reply to अशा भंपक गोष्टींवर तुम्ही by सुबोध खरे
हे तर अंधश्रद्धेच्याही पलीकडचे आहे.
संपादक मंडळीने हा धागा उडवावा. मिसळ्पाव च्या कीर्तीला मोठा धक्का लागेल जर असे धागे ठेवले तर. लोक मिपाकरांना विचीत्र नांवे ठेवतील .
अंधश्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्यांचे काय झाले माहीत असूनही मी हे मत मांडत आहे. कदाचित अशी मंडळी काहीतरी अघोरी उपाय करुन विरोधांत बोलणाऱ्याला अपाय करतील.
बाप्रे....
रिलायन्स अगदीच फ्रॉड करतीये म्हणा की. परत मिळालेली वीज, बंधूंना विकलेली वीज याचं कुठंच अकौंटिंग होत नाही म्हणजे कमाले !
आणि तुम्हाला हे नै का कळालं ताप्रे भौ ?
कोरोना पण काय व्हायरसजन्य आजार नैये. तो ५जी नेटवर्कच्या रेडिएशन मुळे होणारा आजार आहे. हे सुद्धा काल युनिव्हर्सिटीत शिकवलेले. तेही या अनुषंगाने मांडावे म्हणले.
कुठल्यातरी तद्दन साईटवरचं
कुठल्यातरी तद्दन साईटवरचं नक्कल+चिटकव केलंय असं वाटतंय !
नक्की काय
म्हणजे थोडक्यात ह्यांना असे सांगायचे आहे मोबाईल नेटवर्क आणि वीज नेटवर्क हे एकाच मालकाचे आहे.
मोबाईल सिग्नल नी होणाऱ्या उर्जेचेच रूपांतर परत विजे मध्ये करून तीच वीज परत तुम्हाला विकली जाते.
म्हणजे एकच माल double विकला जातो आणि लोकांची फसवणूक होते.
आणि ह्या फसवणुकीचा कंपनी ला डबल फायदा होवून ती स्पर्धेत आघाडीवर आहे.
जास्त खोलात न जाता फक्त व्यवहारी शंका.
1) एका घरात त्याच कंपन्यांचे 4 मोबाईल असले तरी 1 युनिट पण वीज चार्जिंग साठी वापरली जाणार त्या 1 युनिट विजेचे रूपांतर करण्यासाठी जो खर्च येईल तो जास्त असेल.
2) रिलायन्स फक्त वीज वितरण क्षेत्रात आहे वीज निर्मिती ते करत नाहीत.
विजेचा वापर आणि विजेची मागणी ह्याचा हिशोब वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या नक्कीच तपासून बघत असणार.
3) विजेची वितरण व्यवस्था ही राष्ट्रीय ग्रिड नी जोडलेली आहे थोडी पण extra वीज ग्रीड मध्ये आली तर त्याचा परिणाम ग्रीड वर होवून ग्रीड फैल होईल.आणि हे लपून राहणार नाही.
आइन्स्टाईनला नोबेल ई = एम सी२
आइन्स्टाईनला नोबेल ई = एम सी२ या इकेव्शसाठी नाही मिळालेले.(फोटोइलेक्ट्रिक इफेक्टसाठी मिळाले.) बाकी चालू द्या.
वरिल
बातमी इथे 'ताज्या प्रेता'नी दिली असल्याने, या बातमीचा जिवंत माणसांबरोबर कोणताही संबध नसावा.
रेडीओ वेव्ह्ज चे रुपांतर
रेडीओ वेव्ह्ज चे रुपांतर पुन्हा इलेक्ट्रीकल एनर्जी मधे करून ती वीज म्हणून वापरणे या शोधाबद्दल तुम्हाला एक सुपर नोबेल देवू करावे या साठी संजय राउतांकडे प्रस्ताव पाठवतो. नक्की मिळेल. ( नोबेल कमिटी म्हणजे तरी काय इकडून तिकडून गोळा करून आणलेली माणसेच असतात ना?)
मुकेश भाई ना पण एक प्रत पाठवतो. धंद्याचे नवे सिक्रेट समजेल त्यांना.
बाय द वे. या रुपांतरीत विजेची फ्रिक्वेन्सी काय असते हो? आणि ती नॅशनल ग्रीड ला कशी जोडतात?
मुकेश भाई ना पण एक प्रत
In reply to रेडीओ वेव्ह्ज चे रुपांतर by विजुभाऊ
विजुभाऊ, प्रेत चं spelling चुकलं हो, बरं जाऊ द्या. पाठवा एक ताजे प्रेत मुकेश भाईंना.
प्रत म्हणजे कॉपी असा अर्थ अपेक्षित आहे
In reply to मुकेश भाई ना पण एक प्रत by वामन देशमुख
मराठी साठी इंग्लिश शब्दाचा आधार घेतला.
Happy birthday!
In reply to प्रत म्हणजे कॉपी असा अर्थ अपेक्षित आहे by Rajesh188
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आकाशात वीज चमकली तरी radio waves तयार होतात
आकाशात विजा चमकतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात radio waves निर्माण होतात त्याचे रूपांतर विजेत केले आणि ती वीज साठवून ठेवली तर वर्ष भर वीज विकत घ्यायला लागणार नाही मुकेश जी ना.
परत तारे,ग्रह, galaxy, cluster radio लहरी निर्माण करत च असतात.
वर्ष भर विजेचा पुरवठा .
फक्त radio लहरी चे विद्युत लहरित रूपांतर केले की झाले
सर्व फुकट
फुकट वीज मिळवण्याचे सिक्रेट
घरातील ओव्हन मायक्रोवेव्ह मोड मध्ये ठेवावा, त्यात मोबाइल ऑन करुन ठेवा , आणि दोन वायर काढून मीटरच्या फ्यूज मध्ये खुपसा ,
ओव्हन चालू केल्याने त्यातील वेव्ह मुळे वीज निर्मिति होउन पुनहा मीटर मध्ये जाते व फुकट वीज मिळते
ज्या विषयातले आपल्याला अजिबात ज्ञान नाही त्या वर कशाला लिहायचे?
विषेशः शास्त्र आणी तंत्रज्ञान विषयातील अज्ञान सहज उघडे पडते. अशाने स्वतःची विश्वासार्हता गमाउन बसाल.
लेखातली थीयरी संपुर्ण चुकीची आहे हे वेगळे सांगायला नकोच.
हा विनोदी लेख आहे हे लिहीत जा
हा विनोदी लेख आहे हे लिहीत जा हो लेखकमहाशय.
एक माजी सरकारी अधिकारी आहेत त्यांची आठवण झाली
एक माजी सरकारी अधिकारी आहेत त्यांची आठवण झाली.
ते नाही का ढगात (cloud) डाटा साठवतात म्हणायचे.
किंवा पेंट्यागॉनचे अधिकारी सिम कार्ड काढून मीटिंगला बसतात वगैरे ? यु ट्यूब वर पहाता येतील त्यांची मुक्ताफळं.
https://youtu.be/AnxrJiS5uKU
https://youtu.be/AnxrJiS5uKU
विश्व बंधू गुप्ता
हो, हेच ते !
In reply to https://youtu.be/AnxrJiS5uKU by ऋतुराज चित्रे
हेच ते क्लाउड सिडिंग वाले.
उच्च कोटीचे असत्य लिहिले आहे
उच्च कोटीचे असत्य लिहिले आहे
संजय राउतांकडे शिकवणी लावलेली
संजय राउतांकडे शिकवणी लावलेली दिसतेय
२ मिन मिसळपाव वाचतो आहे का
२ मिन मिसळपाव वाचतो आहे का संध्यानंद हेच कळेनासं झाल...
बर झालं ताप्रे भाउ... चांगली अद्दल घडु दे मुकेश भाईला... आता २०० बिलियन डॉलर्सची मार्केट कॅप १ -२ मिलियन वर आल्यावर कळेल त्याला....
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?
ओह. मला वाटले की पैसे फक्त रिजर्व बँकेच्या टाकसाळीतच बनवितात. असो. खुपच माहितीपुर्ण लेख. अजून असे माहितीपुर्ण लेख येउद्यात.
व्हाटस्अप विद्द्यापीठातील
व्हाटस्अप विद्द्यापीठातील संशोधन वाटतेय.
मूकवाणी
मुकेशने नवीन ओएस काढल्यास त्याचे नाव काय असेल?
मूकवाणी -प्रथम
उलल्लू, अच्चा असं झालं तर
उलल्लू, अच्चा असं झालं तर
जालंदर जलालबादी आहेत ते.
जालंदर जलालबादी आहेत ते.
आइन्स्टाईन आणि हाय्जेनबर्ग चे अनसर्टनिटी प्रिन्सिपल
विद्वानविनोदी लेखक म्हणतायेत कि uncertainty principle + Einsteins Nobel winning equation चा वापर करून विज तयार होतेय...योगायोग असा की आइन्स्टाईन ने अनसर्टनिटी प्रिन्सिपलला आवाहन / काटशह देण्यासाठी बराच वेळ खर्ची घातला होता.
काही प्रश्न
वरील लेखन वाचुन काही प्रामाणिक प्रश्न पडले आहेत.
खरच नाल्यातील गॅस वापरुन चहा करता येतो का???
कॅमेराचा शोध नक्की किती साली लागला???
भारतात इंटरनेट मेल पाठवण्याची सुरुवात कधी पासुन चालु झाली???
किमंकोत्पादनम् ?
बाकी सगळं जाउद्या. फक्त हा ३१.७५९५ % आकडा कुठनं काढला त्याची उत्सुकता आहे.
-गा.पै.
हे त्यांच्या कवटीच्या वजनाचे
In reply to किमंकोत्पादनम् ? by गामा पैलवान
हे त्यांच्या कवटीच्या वजनाचे प्रमाण असावे..
एव्हढा उच्चकोटीचा विनोद करायचा म्हणजे मेंदूचं वजन जास्त असलंच पाहिजे.
निकोला टेस्लाच्या, संकल्पित
निकोला टेस्लाच्या, संकल्पित टेस्ला टॉवरचं पेज विकिपीडियावर वाचून त्यात टेस्लाज लॉस्ट फाईल्स टाकून बनवलेला मसाला दिसतोय
ताजे ....... शिळे
ताजे प्रेत परत नाही दिसले. शिळे झालेय वाटतं !
😉
हाच लेख ऐसी अक्षरे वर टाकला होता.
तेथे किती प्रतिसाद आलेत ? फ़क्त तीन. नंतर लोकांनी संपुर्णपणे दुर्लक्ष केले.
मिसळ पाव वरील लोकांना बराच वेळ आहे असे दिसते.