प्रेमाचा कोव्हीड!!
(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!)
--------
आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.
वॉचमनने दारात तुझं टेंप्रेचर मोजलं नव्हतं, पण मी हातात हात घेतल्यावर ते लगेच वाढत चाललेलं मला कळत होतं
तुझे थरथरते, अधीर ओठ घामट मास्कच्या मागे लपलेले नव्हते.
पण हपिसात उपस्थिती 100% असल्यामुळे एकांत मात्र नव्हता नावापुरताही.
तू आणि मी मग बाहेर पडलो, बॉसने जरा रागानेच हाफडे दिल्यावर
भटक भटक भटकलो तुझ्या बाईकवर भन्नाट
हो, लॉकडाऊन नव्हता ना,
पोलीस हाणहाणून सुजवतील अशी भीती नव्हती.
फारतर सिग्नल तोडल्याचे शंभर घेतले असते!
संध्याकाळी पोचलो पिक्चर पहायला, कुठला कुणास ठाऊक
नाहीतर काय, थेटरात एकदाचा अंधार होण्याशी मतलब
मास्क ओढल्यासारखंच की ते
कोण कुठं ओळखू येतंय मग?
अंधार झाला, पडदा उजळला
अन् प्रेमाच्या व्हायरसचा संसर्ग
ताबडतोब झाला दोघांनाही
पसरला तो श्वासातून, स्पर्शातून, अवघ्या अंगांगात
क्षणात निकामी झाली दोन हृदये
आणि धापा टाकू लागलो दोघेही
आॕक्सिजनयुक्त सळसळत्या रक्ताची निर्माण झाली टंचाई अख्ख्या शरीरात (फक्त एक भाग सोडून)
पण इथेच तर खरी मजाय!
रामबाण लसही तयारच होती दोघांपाशी
एकमेकाला टोचायची कशी भर थेटरात हाच फक्त प्रश्न
व्हायरसनेच केलता सवाल, व्हायरसनेच दिले उत्तर
पिक्चर टाकून अर्ध्यात
बाहेर पडलो दोघेही
थेट पोचलो तुझ्या फ्लॕटवर
सोसायटीवाल्यांच्या नजरा चुकवून
या व्हायरसलाही जाम भिऊन असत ते, नाही?
कुलूप काढून आत शिरताच सुरू केली आपण ट्रिटमेंट
घेतलं (!) एकमेकाला आप्रेशनटेबलवर
आणि दिला जालीम लशीचा डोस
पुनःपुन्हा
थोड्याच वेळात निगेटीव्ह होऊन कोसळलो
आणि मग
झालो एकमेकांपासून
कोरंटाईन
सात दिवस की चौदा, की अजून जास्त
ते मात्र हातात नव्हतं दोघांच्याही
पण एकूण काय, कोरंटाईन जितकं कमी तितकं चांगलं
हो ना?
हिहीही
त्रिवार धन्यवाद!!! :-)
ख्या ख्या ख्या
:-)
:p
:-)
मस्त...
अर्थातच!
माऊली,
रास्त शंका...
कै च्या कै
वाचवा!
सर्वांना धन्यवाद
(आधुनिक ) शृंगार-रस
हा हा हा!