फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट.....
सगळे रंग..कॅनव्हासवर
सुखाने रहात होते..
हिरवा,निळा,भगवा वगैरे..!
आपापल्या जागी सुखी होते...
कॅनव्हास पण समाधानी....
पांढरी रंगाई पण सुखाने नांदत होती...
हिरवा हळूहळू पसरत होता...उगीचच
निळा.. तसा नविन.. हसत होता...
भगवा..एकटाच! तळपत होता..
सगळे आपापल्या जागी ...मजेत
पण....कली आला..!
गर्जला...
"सगळे सुखी? चांगले..? पांढरा पण..?
दाखवलेच पाहिजे..कॅनव्हासला!"
हळूच म्हणाला रंगांना,"हिरवे मियाँ; पसरा खूप अजून,
देतील नाहीतर हाकलून..!"
"अहो निळेबाबा, तुम्ही नविन ना?
घ्या ना जागा हक्काची! राखीव.!.मागेच रहाल"
"काय भगवे राजे? कसले हो?
मोठे व्हा! तो बघा हिरवा..वाढतोय!"
झाले.......रंग नासले..
सगळे असुरक्षित..आक्रमक झाले
वेगाने कॅनव्हासवर पुढे सरकू लागले.....!
कोणीच माघार घेईना
आणि...भिडले एकमेकांना...तुंबळ!
"मारो काटो...." हिरवा..
"हरहर.." भगवा..
"संघर्ष करा..विजय असो.." निळा..
"नका रे बाळांनो;मी नष्ट होईल..!" पांढरा..
कॅनव्हास थरारून गेला.....
पांढरा तर काळाठिक्कर पडला!
कली हसतोय्.."माझे काम झाले..मूर्ख!"
आणि...रंगांच्या या भांडणातून...
भयानक्..हिडीस! जीवघेणा.....
नविन रंग...
लाल.......
जन्माला आला....!!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1831
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाय क्लास
हेच म्हणते
In reply to हाय क्लास by मीनल
रूपक
सहमत आहे
In reply to रूपक by धनंजय
छान मांडणी
उत्तम