Skip to main content

सनातन भारतांतील लैगिंकता आणि लिंगभेद - डॉक्टर भरत गुप्त ह्यांच्याशी संवाद

लेखक साहना यांनी शनिवार, 12/09/2020 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
भरत गुप्त हे संस्कृत आणि ग्रीक भाषेचे विद्वान असून दिल्ली विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. कामसूत्र ह्या पुस्तकावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ह्या ऑनलाईन भेटींत आपण त्यांच्याकडून कामसूत्र ह्या विषयावरील अधिक माहिती जाणून घेऊ शकू तसेच प्रश्न सुद्धा विचारू शकू. सप्टेंबर १२ २०२० वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे शनिवार सकाळी १० कॅलिफोर्निया वेळे प्रमाणे लिंक : https://www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179 कार्यक्रम आणि वक्ते इंग्रजी भाषेंतून बोलणार आहेत पण आपण मराठीतून प्रश्न विचारू शकता आणि आम्ही भाषांतर करू.

वाचने 7783
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे
असं लिहिलंय ना !

In reply to by आनन्दा

इथे संपूर्ण रिकॉर्डिंग उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=Iy67Fhk49N0

सनातन भारतातील हाच एक विषय चर्चेला घ्यावा असे वाटले ...कौतुकास्पद ! बाकीचे विषय संपले. हाच एक विषय जगाला भेडसावत आहे ... चालू द्या !

In reply to by विटेकर

तुम्हाला कौतुक वाटते हे ऐकून खरोखरच आनंद झाला. ह्यालाच तर मनमोकळे असणे म्हणतात ;p

In reply to by विटेकर

डॉक्टर भरत गुप्त यांनी बरेच विषय हाताळलेले आहेतः उदा. कश्मीरी युवा मुसलमान और राष्ट्रवंदना समान नागरिक संहिता अंतरजातीय विवाह विकास:आर्थिक एवं सांस्कृतिक आणि सनातन भारतांतील असे विषय घ्यायला आणि हाच विषय घेतला याचा आक्षेप का ?

In reply to by विटेकर

आपले कौतुक आयोजकांकडे पोचवले आहे ! पाठिंब्यासाठी धन्यवाद .

In reply to by विटेकर

जगाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल इतरांनी काही तरी केले पाहिजे ही तुमची कळकळीची भावना पाहून भरून आले. तुमच्याकडे मात्र मिसळपाववर शेरेबाजी करण्याइतका वेळ आहे ही आनंदाची गोष्ट! :-)

In reply to by चलत मुसाफिर

खरेतर नस्तो वेळ माझ्याकडे ,पण तुम्ही इतक्या उत्साहाने करताय म्हंटल्यावर कौतुक करायला वेळ काढावाच लागला. त्याचा तुम्हाला आनंद वाटला याचा मलाही आनंद वाटला .. आनंदी आनंद गडे ! बाकी जगाला भेडसावणार्‍या इतर गंभीर समस्यावर इतरांनी काहीतरी केले पाहिजे .. हे तुमचे -आमचे मत बराब्बर जमते !