✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ यांनी
Wed, 09/09/2020 - 13:12  ·  लेख
लेख
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
108954 वाचन

💬 प्रतिसाद (293)

प्रतिक्रिया

.

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 12:43 नवीन
उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे नेहरू झाले आहेत दिल्लीवाल्या भाजपयाना काही विचारले की नेहरूंकडे बोट दाखवतात महाराष्ट्र भाजपे ठाकरेंकडे बोट दाखवतात
  • Log in or register to post comments

राहता राहिला शिवसेना - कंगना

गणेशा
गुरुवार, 09/10/2020 - 12:47 नवीन
राहता राहिला शिवसेना - कंगना आणि सुशांत चा विषय.. कंगना एक स्त्री असून तिला हरामखोर म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा राग आला पाहिजे आणि कंगना ने मुंबई म्हणजे pok ची तुलना केल्याचा हि राग आलाच पाहिजे अर्णब ज्या पद्धतीने बातम्या देतोय, जसे बडबड करतोय त्याचा हि राग आला पाहिजेच.. ज्या पद्धतीने दूरदर्शन ऐवजी बातम्यांचे क्रूरदर्शन चालू आहे ते हि नक्कीच आवडले नाही पाहिजे.. ड्रग पुरवणाऱ्या ला शिक्षा व्हावीच पण ड्रग घेणाऱ्या सुशांत ला पण त्या अनुशंघाने ड्रग घेणारा म्हणुन बघितलंच पाहिजे.. भले तो प्रतिभा संपन्न अभिनेता होता. आवडायचा.. पण तरीही.. कंगना एक स्त्री म्हणुन तिच्या विषयी आदराने बोललेच पाहिजे हे मला वाटते, तसेच दोषी सिद्ध न होता हि रियाची जी अवस्था पत्रकार, सोशल पोस्टकर्ते आणि इतर ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल पण वाईट वाटलेच पाहिजे ड्रग समूळ नष्ट झाले पाहिजेत, त्या ऐवजी त्या मागून चालणारे राजकारण पण संपले पाहिजे असे हि वाटलेच पाहिजे. नाहीतर, कुठल्याही पद्धतीने आपल्या आवडत्या नेत्याचे, पक्षाचे समर्थन करताना, आणि विरुद्ध पक्षाला, नेत्यांना बोल लगवताना आपण नक्की सगळीकडे सारखी भूमिका घेतोय हे आपल्याला तरी पटलेच पाहिजे..
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम प्रतिसाद

चांदणे संदीप
गुरुवार, 09/10/2020 - 17:05 नवीन
प्रतिसाद प्रचंड आवडलाय. जास्त लिहित नाही. भेटल्यावर बोलूच. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

.

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 14:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

काय फरक पडला?

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 15:26 नवीन
प्रधानसेवक झालेच ना ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

ह्यालाच बुम rang . म्हणतात

Rajesh188
गुरुवार, 09/10/2020 - 15:37 नवीन
खूप मोठ्या प्रमाणावर आणि चुकीच्या पद्धती नी राजकीय पक्ष नेत्या वर सर्व माध्यमातून टीका झाली की लोकांची सहणभुती त्या नेत्याला पक्षाला मिळते. गुजरात दंगली मध्ये माध्यमांनी मोदी ना टार्गेट केले होते त्याचा उलट परिणाम झाला आणि ते निवडणुका जिंकत च गेले. कंगना ,आणि मीडिया च्या आडून जेवढे आरोप bjp आघाडी सरकार करेल त्याचा परिणाम म्हणून पुढच्या निवडणुकी नंतर सुद्धा आघडी सरकार च राज्यात सत्तेवर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

आघाडी (की बिघाडी)

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 15:46 नवीन
आघाडी सरकार मुळात सत्तेतच धोकेबाजी करुन आलेले सरकार आहे. मते युतीच्या नावाने मागायची आणि नंतर इतरांशी चुंबाचुंबी (हा शिवसेनेचाच शब्द) करुन सत्तेत बसायचे असा प्रकार आहे तो. जनतेने हे ही पाहीले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

छान

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 16:19 नवीन
ऑप्रेषण लोचटचे महाराष्ट्रात मढे उठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

छान

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 16:49 नवीन
कधी झाले म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

ऑप्रेषण

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 16:54 नवीन
त्याच "ऑप्रेषण" ने मध्य प्रदेशात कोणाचे मढे उठवले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

अजून उठले नाही

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 16:57 नवीन
बाय इलेक्शन बाकी आहेत, ते झाल्याशिवाय तुमचा तात्या विंचू उठणार नाही माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर ऑपरेशन लोचटचा आद्य पितामह तात्या विंचू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हं

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 17:22 नवीन
म्हणजे अंतिम संस्कार बाकी आहेत अजुन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

मग तुमच्या मते अजित पवार plus

गणेशा
गुरुवार, 09/10/2020 - 16:39 नवीन
मग तुमच्या मते अजित पवार plus भाजपा यांनी जो शपथ विधी केला त्याला काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मुर्खपणा

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 16:50 नवीन
तो ही मुर्खपणाच होता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हे कधी?

आनन्दा
गुरुवार, 09/10/2020 - 17:58 नवीन
हे कधी? जर सेना शांत राहून सहानुभूती encash केली तर.. हे म्हणजे समोरच्यालाच सहानुभूती मिळावी असे वागतात. कसं होणार अश्याने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

केंद्रीय सत्ता चा दबाव झुगारून लावणारा

Rajesh188
गुरुवार, 09/10/2020 - 15:20 नवीन
नेताच कोणत्या ही राज्यातील जनतेला आवडतो. पण जेव्हा काँग्रेस ची सत्ता महाराष्ट्रात होती तेव्हा सुद्धा तेव्हाचे मुख्यमंत्री केंद्रीय सत्ता आणि नेते ह्यांच्या दबाव खाली च काम करायचे. . ह्याचे कारण फक्त मानसिक दुर्बलता हे नसून आपले अती देशप्रेम ( हा गुण की अवगुण मराठी लोकात आहे). त्या मुळे केंद्र सरकार म्हणजे भारताचे सरकार त्यांचे ऐकावेच लागेल देश पहिला नंतर राज्य अशी विचारसरणी. पण बंगाल पासून दक्षिण मधील अनेक राज्य राज्य फर्स्ट नंतर देश असाच विचार करतात त्या मुळे ह्या राज्यातील नेते,सरकार कधीच केंद्राच्या दबावात येत नाहीत सरळ विरोध करतात. ही आपली वृत्ती वर विचार करण्याची वेळ आली आहे म्हणजे बंड करायचे नाही पण राज्य हिता च्या आड देश हित येवू धायचे नाही . पोकळी निर्माण झाली की ती नक्की भरून निघेल शरद पवार नंतर त्यांची जागा नक्कीच भरून निघेल. बाळासाहेब गेले म्हणून सेना संपली नाही. दिघे गेले म्हणून ठाण्यात सेना संपली नाही. इंदिरा जी गेल्या म्हणून काँग्रेस संपणार नाही एक दिवस नक्कीच राहुल गांधी भक्कम नेतृत्व देतील.
  • Log in or register to post comments

lol त्या दिवसाची अधिरतेने वाट बघतोय

अथांग आकाश
गुरुवार, 09/10/2020 - 15:30 नवीन
इंदिरा जी गेल्या म्हणून काँग्रेस संपणार नाही एक दिवस नक्कीच राहुल गांधी भक्कम नेतृत्व देतील.
lol त्या दिवसाची अधिरतेने वाट बघतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

नक्कीच

सॅगी
गुरुवार, 09/10/2020 - 23:21 नवीन
भारत तर फार छोटा आहे हो, रा गा तर अमेरिकेसह चीनचेही नेतृत्व करतील हा विश्वास आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भारत तर फार छोटा आहे हो, रा

सुबोध खरे
Fri, 09/11/2020 - 10:07 नवीन
भारत तर फार छोटा आहे हो, रा गा तर अमेरिकेसह चीनचेही नेतृत्व करतील हा विश्वास आहे... हो ना डॉकलाम प्रकरणाचे वेळेस त्यांनी चिनी राजदूताशी गुप्त खलबते हि केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

दम दिला असेल

सॅगी
Fri, 09/11/2020 - 23:07 नवीन
दम दिला असेल बहुदा.....दाऊदला जसा मुखपत्राच्या कम्पाउंडरनी...आपलं ते....संपादकांनी दिला होता तसा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गणेशा

शा वि कु
गुरुवार, 09/10/2020 - 15:56 नवीन
दोन्ही धाग्यावरील प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. राजकीय मते मांडणे

गणेशा
गुरुवार, 09/10/2020 - 16:41 नवीन
धन्यवाद.. राजकीय मते मांडणे बंद केली होती, पण एक प्रतिसाद दिला की मग लिहिले 2-3 :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

हाहा

शा वि कु
गुरुवार, 09/10/2020 - 17:27 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक मात्र होण्याची शक्यता आहे

Rajesh188
गुरुवार, 09/10/2020 - 17:09 नवीन
BJP सेना युती मुळे मराठी मत शिवसेना मुळे. मारवाडी आणि गुजराती लोकांची मत bjp मुळे युती ला हक्कानी मिळत होती. Bhaiye ,बिहारी लोकांची गरजच लागत नव्हती सत्ता मिळवण्यासाठी. पण bjp बरोबर नसेल तर मुस्लिम ,मराठी आणि मिळाली तर बाकीचे थोडेफार ह्याच मता वर अवलंबून राहवे लागेल . मुंबई मध्ये सत्ता मिळणे आघाडी ला अवघड जाईल पण बाकी भागात राष्ट्रवादी मजबुत आहे
  • Log in or register to post comments

मुद्दा काय?

रविकिरण फडके
गुरुवार, 09/10/2020 - 17:31 नवीन
आजचा प्रश्न: विजुभाऊंचा मुद्दा काय आहे ते लक्षात न घेता आणि तेव्हढ्याचपुरते आपले प्रतिसाद मर्यादित न ठेवता लोक भरकटतात का? असो.
  • Log in or register to post comments

नाही नाही नही....................

गोंधळी
गुरुवार, 09/10/2020 - 21:41 नवीन
मस्त आहे. https://www.youtube.com/watch?v=kXo5XQSYQNA
  • Log in or register to post comments

छान

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 21:45 नवीन
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लगीन करणार नाही , असेही ते तरुणपणी म्हणत होते म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

बाबा लगीन

Gk
गुरुवार, 09/10/2020 - 21:48 नवीन
https://khaasre.com/devendra-fadanvis-marriage-story/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

कंगना प्रकरण महागात पडणार हे नक्की

Rajesh188
गुरुवार, 09/10/2020 - 23:33 नवीन
Bjp la Kangna प्रकरण महागात पडणार हे नक्की. आघाडी सरकार च हवं इथे असे लोकांना वाटत आहे. Bjp fakt भावनिक प्रश्नात च लोकांना गुंतवून ठेवत आहे ह्याची जाणीव हळू हळू होत आहे.
  • Log in or register to post comments

स्पेलिंग चुकीचे

सॅगी
Fri, 09/11/2020 - 09:27 नवीन
Shivsena चे स्पेलिंग चुकीचे लिहीले आहे राजेश दादा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मलाही खटकलं

गामा पैलवान
Fri, 09/11/2020 - 01:44 नवीन
विजुभाऊ, कट्टर शिवसैनिक असूनही कंगणाच्या घराची तोडफोड मला खटकली. ती जर मुंबईस पाकव्याप्त काश्मीर म्हणंत असेल तर तिला प्रत्युत्तर द्यायचे इतर अनेक मार्ग होते. कोणते ते मला माहित नाही, पण उठांना माहित असणार. असो. या निमित्ताने कंगणास एक फुकट सल्ला देतो. तिला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीरासारखी वाटंत असेल तर तिने लवकरात लवकर सोडलेली बरी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

पूर्ण

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 09/11/2020 - 08:27 नवीन
तिचे पूर्ण ट्विट काय आहे, ते पाहू ते रे पैलवाना Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://www.opindia.com/2020/09/tylerstreetart-instagram-mumbai-deface-public-property-viral/ म्हणून तिने पी ओ के म्हंटले आहे. "असुरक्षित वाटत असेल तर ह्या देशात राहू नका" असे सल्ले भाजपावाल्यांकडुनही दिले गेले आहेत. तसे बोलणही चुकीचेच होते. असो. मुत्सद्देगिरीचा अभाव सेना नेत्रुत्वाकडे दिसतो. घडली घटना की दे प्रतिक्रिया. उद्धव संयमी व विचार करणारे म्हणून ओळखले जातात. मात्र आजुबाजुचा त्यांचा गोतावळा कसा आहे माहित नाही. त्यात काँग्रसची अवस्था 'सहन होत नाही व सांगताही येत नाही " अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ते नुसतंच काश्मीर हवं ना?

गामा पैलवान
Sat, 09/12/2020 - 13:22 नवीन
माईसाहेब, गोष्ट उलगडून सांगितल्याबद्दल आभार! पण मग पाकव्याप्त काश्मीरपेक्षा जम्मू-काश्मीर ही उपमा चपखल ठरली असती (वैम). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

.

Gk
Fri, 09/11/2020 - 07:16 नवीन
कंगणाने कवारणताईन व्हायलाही नकार दिला, हिच्यासाठी हा नियम का लागू नाही ?
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या

सुबोध खरे
Fri, 09/11/2020 - 10:06 नवीन
महाराष्ट्रात तुम्ही बाहेरच्या राज्यातून आलात आणि ७ दिवसाच्या आत परत जाणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात क्वारंटाईन होण्याची गरज नाही असा नियम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

Kangana Ranaut tests Covid-19

मदनबाण
Fri, 09/11/2020 - 18:32 नवीन
Kangana Ranaut tests Covid-19 negative, leaves Himachal home for Mumbai कोव्हिड टेस्ट देखील करुन मुंबईत शिरल्या होत्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rafale induction stern signal to adversaries, says Rajnath
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महाराष्ट्रातच एका

मराठी_माणूस
Fri, 09/11/2020 - 19:38 नवीन
महाराष्ट्रातच एका जिल्ह्यातुन दुसार्‍या जिल्ह्यात गेल्यास काय नियम आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राऊत वाचळ पणाला शौर्य

विजुभाऊ
Fri, 09/11/2020 - 09:45 नवीन
राऊत वाचळ पणाला शौर्य समजतात. इतरांच्या सौजन्याला त्यांचा कमकुवतपणा समजतात. २७ ऑक्टोबर २०१८ साली राउतांनी अजित दादंवर एक अग्रलेख लिहीला होता त्यात अजित दादांचा उल्लेक इतक्या खालच्या पातळीवर केला होता की बोलवतही नाही. https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shivsena-president-uddhav-thackeray-ayodya-tour/ या अग्रलेखातली हिणकस भाषा राऊत वापरतात. कंगनाने तर एकही अपशब्द वापरलेला नाहिय्ये. राउत कोणाच्या संरक्षणार्थ हे बोलत आहेत हे लपून राहीलेले नाहिय्ये. पण राउतांना स्वतःला एक न्याय लावतात आणि इतरांना दुसरा न्याय . ते जे बोलतात ते बिंधास्त असते आणि बाकीचे बोलले की मराठी माणसाची अस्मिता दुखावते. खरे तर कंगना जे काही बोलली ते मुंबईत येवू नये म्हणून शिवसेना धमक्या देत असेल तर हे पी ओ के मधील अतिरेक्यांसारखेच आहे. ती बोलली यात काही गैर आहे असे वाटत नाही. राउतांनी मी तीला लहान मुलाचे कौतूक करताना आपण कधीतरी त्याला ' हरामखोर" असा शब्द वापरतो त्या अर्थाने हरामखोर म्हणालो. अर्थात अजित दादांना गटारातला कीडा , मुतर्‍या तोम्डाचे असे म्हणणार्‍या राउत बहुतेक घरातही मुलाबाळांशी असेच बोलत असतील. पण शिवसेना , संजय राउतांच्य तोंडाळपणामुळे स्वतःचीच नाचक्की करुन घेतेय हे नक्के. शिवसेनेचे हे प्रकरण त्यांच्या सहकारी पक्षांना हे भोवणार आहे
  • Log in or register to post comments

आत्ताच आर टीव्ही वर पाहिले.

विजुभाऊ
Fri, 09/11/2020 - 10:09 नवीन
आत्ताच आर टीव्ही वर पाहिले. राउतांच्या भावाने केबल ऑपरेटर्स ना रीपब्लीक चॅनेल दाख्वू नका म्हणून सांगितलय. ही गळचेपीच आहे की. अगदी पी ओ के सारखी
  • Log in or register to post comments

मला एक कळत नाही.

सुबोध खरे
Fri, 09/11/2020 - 10:23 नवीन
मला एक कळत नाही. कंगना राणाउत काय बोलायचं ते बोलू द्या कि. तिच्या प्रत्येक वक्तव्याला बेफाट प्रत्युत्तर देण्याची शिवसेनेच्या प्रवक्त्याने काय गरज आहे / होती. श्री राऊत यांनी तिला हरामखोर म्हणणे हे अत्यंत अशोभनीय आहे. तर कंगणा राणाउत यानि श्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे हेही चूक आहे. पण एका बॉलिवूड च्या नटीच्या तोंडाला लागू नये एवढे तारतम्य शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये नाही? आणि त्यानंतर मुंबईत ६० हजारच्या आसपास बेकायदा बांधकामे असताना, कंगणा उपस्थित नसताना, उच्च न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असताना, एवढी घाई करून सुडाने तिच्या कार्यालयाचा बेकायदेशीर भाग घाईघाईने पाडून स्वतःची प्रतिमा मलीन मात्र करून घेतली.
  • Log in or register to post comments

खरंय.

शा वि कु
Fri, 09/11/2020 - 10:44 नवीन
एका बेताल मुंगीला चिरडण्यासाठी (तितक्याच बेताल) हत्तीने सगळे बळ वापरले आहे. आणि मुंगीला काही झालं नाहीच. तिला उलट आणखी बळकटी आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मुंगी ही उपमा आवडली

Rajesh188
Fri, 09/11/2020 - 10:49 नवीन
मुंगी कडे दुर्लक्ष च केले असते तर पुढचे महाभारत घडले नसते. ती पण बोलून बोलून थकली असती आणि आपल्या बोलण्याचा सरकार वर काहीच परिणाम होत नाही हे बघून वारुळात गेली असती. ज्या 7 आयपीएस ऑफिसर नी मीडिया बद्द्ल कोर्टात केस टाकली आहे त्या वर न्याय मुर्तीनी मीडिया कंट्रोल करण्यासाठी काही प्रमाणात राज्य सरकार ला अधिकार देणे गरजेचे आहे अशी टिप्पणी केली आहे आणि ती योग्य च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

मुंबई

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 09/11/2020 - 11:01 नवीन
"मुंबईवर पहिला आणी शेवटचा हक्क फक्त आणि फक्त आमचाच" ही शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे. वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करणे असो(मणीरत्नम-बॉम्बे) वा मोठाअवजड उद्योग/कारखाना असो किंवा टाडा लागलेल्या अभिनेत्याला सोड्वणे असो, 'मातोश्री'वर जाउन 'आशीर्वाद' घेतल्याशिवाय ह्या गोष्टीची पूर्तता होत नसे. बाळासाहेब असेपर्यंत हे लोकानी खपवुन घेतले. कारण नरसिंह राव्/वाजपेयी/अडवाणी, आधीच्या पिढीतील नेत्रुत्वाने दुर्लक्ष केले कारण तेव्हा शिवसेनेला जनाधार होता. आधिच्या पिढीतील अभिनेते- देवानंद वगैरे , व अमिताभ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी मातोश्रीवर जाउन 'सदिच्छा' भेट घेत. आता काळ बदलला आहे. 'अरे ला कारे' करणारी ही पिढी आहे.. सर्वच क्षेत्रांमध्ये हा बदल झाला आहे. तेव्हा कंगना माफी मागेल व शिवबंधनाचा धागा बांधून घेइल ह्या भ्रमात असण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

त्या साठी मुंबई ही मुंबई च राहिली पाहिजे

Rajesh188
Fri, 09/11/2020 - 11:35 नवीन
जुन्या चित्रपटात दिसणारी सुंदर मुंबई ,सुंदर समुद्र किनारे आणि आत्ताची मुंबई . गर्दी नी ओसंडून वाहणारी,चौपाटी म्हणजे कचरा पेटी,मोकळी जागा , बगीच्छे ह्यांचा दुष्काळ असणारी गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली. मुंबई गुदमरत आहे तिचा जीव कधी जाईल सांगता येणार नाही. तरी मुंबई ची धर्मशाळा झाली पाहिजे सर्वांना भंडारा मिळतो असे विचारधारा असलेली देशातील मंडळी. मुंबई म्हणजे नावडती प्रेयसी झाली आहे रात्री झोपायला जवळ पाहिजे पण तिची कोणतीच जबाबदारी नको जबाबदारी मात्र तिच्या कायदेशीर नवऱ्यानी ची घेतली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ही

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 09/11/2020 - 12:44 नवीन
"गटारे,रस्ते ,रेल्वे पटरी ह्या वर सुद्धा अनधिकृत बांधकाम असलेली" ही अवस्था कोणी होउ दिली? राज्याचे राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठीच होते ना? निवडुन आलेलेच होते ना? महापालिकांमध्ये काम करणारे बहुतांशी अभियंते मराठीच ना?मुंबई सोडा, पुणे,नागपूर्,नाशिक्,अनेक जिल्ह्यांची ठिकाणे ही बकाल का दिसतात? आपल्या एस.टी.बसेस ईतर राज्यांच्या तुलनेत मळलेल्या व जुनाट का? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कर्नाटक महाराष्ट्र चा जुळा भाऊ आहे

Rajesh188
Fri, 09/11/2020 - 15:07 नवीन
कर्नाटक शी तुलना नको ते राज्य महारष्ट्र सारखेच प्रगत आहे. मुंबई ,पुणे,नाशिक ची ही अवस्था उत्तर दिशेनी असलेल्या बेशिस्त londhya मुळे झाली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र मधील कोणती ही शहर उत्तरे च्या कोणत्या ही शहरं ना पेक्षा हजार पट सुंदर आणि स्वच्छ आहेत. कर्नाटक चे फोटो देवू नका ते प्रगत राज्य आहे. बंगलोर,मंगलोर सारखी अती उत्तम शहर त्यांच्या कडे आहेत आणि कर्नाटक सुद्धा महाराष्ट्र सारखे उत्तरेच्या londhya मुळे त्रस्त आहे . तिथे सुद्धा विरोधी आवाज उठात आहे. राज्यांतर्गत migration वर नियंत्रण ठेवले तरच देशातील सर्व शहर वाचतील . नाही तर भयंकर लोकसंख्या असलेला उत्तर भारतीय लोक देशातील सर्वच शहरांची कचरा कुंडी करून टाकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तुलना का नको?

सॅगी
Sat, 09/12/2020 - 23:09 नवीन
इतरांकडुन चांगले ते घेतलेच पाहिजे. केएसआरसीटीच्या ऐरावत/अंबारी वोल्वो सेवेला उत्तर देणारी सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा कोणती आहे? शिवशाही (टाटा/अशोक लेलँड)? शिवशाहीची सेवा किती बेभरवशाची आहे हे सांगायला नको..ब्रेक फेल, इंधन गळती, चढणावर एसी बंद..... शिवनेरी/अश्वमेध सेवा मुंबई-पुणे मार्गाव्यतिरिक्त बाकी मार्गांवर का विस्तारत नाहीत? आहे काही उत्तर? चांगल्या गोष्टींचे पंख महाराष्ट्रात लगेच कापले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हेच तर म्हणणं आहे

Rajesh188
Sat, 09/12/2020 - 23:39 नवीन
महाराष्ट्र मधील st सेवा ठरवून खिळखिळी केली गेली काही वर्ष पूर्वी उत्तम स्थितीत असलेलं महामंडळ बिकट अवस्थेत गेले . मुंबई मधील बेस्ट बस सेवा देशा समोर एक उत्तम उदाहरण होते त्या बस सेवेची पण ठरवून वाट लावली. महाराष्ट्र मधील अनेक संस्था मोडकळीस आणल्या गेल्या. पण महाराष्ट्र मधील त्या त्या वेळच्या विरोधी पक्षांनी कधीच सरकार ल ह्या विषयावर धारेवर धरले नाही. सभागृह अशा विषयासाठी कधीच बंद पाडले गेले नाही . जसे विरोधी आणि सत्ता धारी मध्ये एकमत झाले आहे. ह्या अशा विषयात विरोधी पक्षांनी रान उठवयचे सोडून एक साध्या केस साठी आणि एका अभिनेत्री साठी महाराष्ट्र हिताची आपल्याला सुद्धा कदर नाही हेच दाखवून दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मुंबई किती बेकायदा बांधकाम आहेत

Rajesh188
Fri, 09/11/2020 - 10:43 नवीन
मुंबई महानगर परिसरात की बेकायदा बांधकाम आहेत हे सर्वांना माहीत आहे. अगदी काटेकोर परीक्षण केले तर पूर्ण मुंबई महानगर परिसर बेकायदा आहे. कोणत्या न्या कोणत्या स्वरूपात प्रतेक बिल्डिंग मध्ये अनधिकृत बांधकाम आहे,फूट पथ वर अनधिकृत अतिक्रमण आहे. सरकार ची हजारो एकर जमीन वर अनधिकृत बांधकाम आहेत. अधिकृत भिंग घेवून शोधावे लागतील. पण बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर मध्ये बदल करणे धोकादायक आहे ते बिल्डिंग कोसळू शकते. ते मोठे गंभीर आहे. त्या साठी क्रिमिनल कोड च वापर करून जेल ची हवा मिळायला हवी.
  • Log in or register to post comments

बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर

सुबोध खरे
Fri, 09/11/2020 - 11:53 नवीन
बिल्डिंग च्या मुळ स्ट्रक्चर मध्ये बदल करणे हे कुणी केलंय ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा