सुंदर लेख. अगदी जुन्या काळात घेऊन जाणारा आणि डोळ्यापुढे चित्र उभे करणारा.
पोयनाड आणि पेझारी हे दोन गावे शेजारी शेजारी. पेझारकर नावाची एक ज्यू व्यक्ती माझ्या ओळखीची होती.
हल्ली अलिबाग भागात जाणे झाले की, पोयनाडच्या "ब्रेकफास्ट" हॉटेलात विरामासाठी थांबलो नाही, असे सहसा होतच नाही. त्या हॉटेलात कधी कधी जिताडा नावाचा मासा मिळतो. निव्वळ अप्रतिम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पोयनाडला माझे ३-४ मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात तलाव खोदून मत्स्यव्यवसाय सुरु केलाय,
त्यामुळे तिथे जिताडा नेहमीच मिळतो.
आपला ( जिताडाप्रेमी ) नरेश ;)
(तात्यांकडून साभार)
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
वा सुंदर लेख.
अलिबागला काही वेळा जाणे झाले पण पोयनाड मात्र कधीच बघितले नाही.हा लेख वाचून जमेल तेव्हा तिकडे जावेसे वाटू लागले आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
सुंदर लेख, आमचा पण सातार्याला मोठा वाडा होता...माझ्या पणजोबांनी १९०२ साली विकत घेतला, २००२ साली विकला आम्ही. या वाड्यातल्या काही गोश्टींची यादी आणि त्या<चे अर्थ देतोयः
तुळई: आजच्या घरांमधला कॉलम पण लाकडी
अंबारः धान्य साठवायच कोठार...याला खाली एक खिडकी अस्ते. त्यातुन धान्य काढुन घेता येतं
मंडपी: देव्हार्याच्यावर टांगायची एक चौकोनी फ्रेम. यावर सगळ्या सोवळ्या वस्तु ठेवलेल्या असायच्या.
खणः हे एक माप असतं. पण घराची लांबी रुंदी मोजायला..म्हणजे ४ खणी सोपा, किंवा ८ खणी माडी असं.
घंगाळः पातेल्या सारखं एक पाण्याचं भांड. साधारण पणे आंघोळीसाठी वापरतात.
अडसरः दार लवल्यावर अडसर ओढायचा. म्हणजे दार उघडत नाही. उघडताना तो परत भिंतीत सरकतो.
बंबः हा बर्याच जणाना माहीती असेल. तांब्या किंवा पितळ्याचा पाणी तापवायला वापर्तात.
जयबाला परुळेकरांच्या लेखा मुळे जुन्या आठवणी निघाल्या. धन्यवाद
तुळई/तुळवंट = बीम (कॉलम नव्हे) ही छतात आडवी असते. भक्कम सागवानाचे तुळवंट म्हणजे छताचा मुख्य आधार असत.
तुळईला आधाराला खाली उभे असतात ते खांब (कॉलम).
दोन तुळयांच्या मधे टाकलेले लाकडी दांडू म्हणजे वासे. ('खाल्ल्या घरचे वासे मोजणे' ह्या म्हणीतले ;) )
अशा दोन तुळयांच्या मधल्या मापाला खण म्हणतात.
घंगाळ - हे साधारणपणे तांबं ह्या धातूचं असतं, पसरट तोंडाचं आणी बाजूला कड्या असतात धरायला.
चतुरंग
होतों तेव्हां तिथें पेझारकर नांवाचे विक्रीकर निरीक्षक - इन्स्पेक्टर होते. त्यांची माझी मस्त मैत्री होती. तेहि ज्यू . खेळाबद्दलचें प्रेम हा आमचा दुवा. हॉकी आणि फुटबॉलच्या फील्ड प्लेसिंगमधला, आक्रमणातला फरक, वगैरे मस्त समजावून द्यायचे. तेव्हां ७५ सालीं आपली हॉकी नुकतीच सुवर्णकाळातून उतरणीला लागली होती. पेझारी गावांत तेव्हां ज्यू बहुसंख्य होते आणि सुखवस्तु, प्रतिष्ठितहि होते. मध्यंतरी वर्तमानपत्रांत ज्यूंविषयींच्या एका लेखांत वाचलें कीं तिथले बहुतेक ज्यू इथलें समृद्ध सुखवस्तु सोडून इझरायलला गेले. तेव्हां यांना तीनशें वर्षें इथें राहूनहि इथल्या मातीवर प्रेम करतां आलें नाहीं याबद्दल मला चीड आली. निळू दामलेंना इझरायलमध्यें कांहीं मराठी भाषिक ज्यू भेटले होते. असो. विषयांतर झालें. क्षमस्व.
असो. मस्त लेख.
सुधीर कांदळकर.
तुमचा हा लेख आणि पहिला भागही आजच वाचला. दोन्ही लेखांमधली आठवणींची साठवण आवडली.
कॄपया मागच्या भागाचा दुवा दिलात तर सोईचे होईल. पुढचा भाग लवकर येऊ दे.
स्वाती
असं एखादं घर प्रत्यक्ष पहायला खूप आवडलं असतं.
ओपेन टेरेसची साधी पण मस्त कल्पना खूप आवडली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
घराचं वर्णन खूपच आवडलं. अगदी जुन्या काळात नेणारं. इतके बारकावे आणि इतकी छान लेखनशैली आहे की लेख वाचून मलाही माझ्या आजोळचं करकंबचं {पंढरपूर तालुक्यातलं} घर आठवलं. [पण मी इतकं छान लिहू नाही शकणार!]
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
प्रतिक्रिया
पोयनाड
पोयनाडला
सुंदर लेख
मस्त आठवणी...
छान
वाह
अभिषेक, थोडी दुरुस्ती/माहिती
लेख आवडला.
मी विक्रीकर खात्यांत ....
वा.. छानच!
सुरेख आठवणी
सुरेख लेखन..
वा. सुंदर
सुरेख आठवणी!
छान