प्रेम दिसावे
तुझ्यासाठीच क्षण प्रत्येक जगावा
माझ्या आधी 'तू ' होण्यात जगावा
अस कस भरलं खूळ ,कोड पडावे
सोडवण्याआधी मी आणखी गुंतावे
साऱ्या दूनियेने कोठेही धावावे
तुझ्या पावलांभोवती जग शोधावे
खुडतांना दुःख होते फुलांनीही सांगावे
नको त्यागाची 'वाहवाही' फक्त प्रेम दिसावे
-भक्ती
(२०१६)
क्लास.
हो .. शेवट मलापण भावला..
खुडतांना दुःख होते फुलांनीही
धन्यवाद गणेशा!
'कोड' पडावे ??? म्हणजे काय ?
पुढच्या ओळी अशा आहेत
खुप खुप धन्यवाद!