Skip to main content

आजकाल

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 29/08/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोलाहलात गर्दीच्या एकांत मी कवळतो अंधारून येता मीच अंतर्बाह्य झळाळतो रिक्ततेच्या डोहामध्ये सदा सचैल डुंबतो शून्य असूनही थेट अनंताशी झोंबी घेतो आठवता आठवता पुन्हा त्याला विसरतो दशदिशा कोंदून जो दहा अंगुळे उरतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3520
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला। स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला - (मोरोपंत) पैजारबुवा,