Skip to main content

सरांचे आठवावे लेख । सरांचा आठवावा वाद । सरांचा आठवावा प्रताप । मिपामंडळी ।।१।।

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 29/08/2020 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
सरांचे आठवावे लेख । सरांचा आठवावा वाद । सरांचा आठवावा प्रताप । मिपामंडळी ।।१।। सरांचे कैसें लिहिणे । सरांचे कैसें पिंकणे । सरांचे वाद घालणे । कैसें असे ।।२।। सर्वज्ञानी मूर्तिमंत । "काल" साक्षेपाचा योग । "प्यु रिंग" जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।। रतिक्रीडेचे लेख आठवावें । लॉर्ड ऑफ द रिंग मिरवावे । मिपालोकी आंजालोकीं उरावे । "रिंग"रूपें ।।४।। सकलांशी वाद घालावे । उद्धारार्थ बोधामृत पाजावे । "मी-माझे" अध्यात्म वापरावे । पाडण्या जिल्बी ।।५।। सर्व ज्ञानाचा महामेरू । सकल वादाचार्यांस आधारू । अखंड उपदेशाचा निर्धारु । श्रीमंत संक्षेपी ।।६।।

वाचने 7898
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

कवी म्हणून "चामुंडराय" यांच्या प्रतिभेचे कौतूक वाटले. रचना देखील आवडली पण सरांचे विचार आपल्याला पटत नाही म्हणून त्यांना खास "लक्ष्य" करावे हे काही पटले नाही बुवा ! असो.

In reply to by धर्मराजमुटके

खरे तर बोलणार नव्हतो, पण. मुद्दा विचार पटत नाहीत हे नाहीच आहे. मांडणी पटत नाही. आक्रस्ताळेपणा पटत नाही. माझा पंथ सोडल्यास इतर सगळे पंथ मूर्ख आहेत ही भूमिका पटत नाही. त्यामुळे विरोध होतो. मांडणी पटत नाही म्हणून अर्णव ला पण लोक लक्ष करतातच की.. मग इथे तर खूपच प्रेमाने सगळे समजावून दिले आहे. यात खटकण्यासारखे काय आहे?

In reply to by धर्मराजमुटके

तेच म्हणणार होतो. जर तुम्हाला नसेल पटत तर नका त्यांचा धाग्यावर जावुन प्रतिसाद देवु किंवा प्रति-प्रतिसाद देवु नका . आपल्या घरची ८०-९० ची मंडाळी कशी हट्टीपणा करतात म्हणुन त्यांचा पदोपदी काय तुम्ही अपमान करता काय? या कानाने ऐका आणि त्या कानाने सोडुन द्या सगळं. राग लोभ कुठे कोण वरती घेवुन जाणार आहे काय?

In reply to by प्रमोद देर्देकर

संक्षींचे वय ८०-९० च्या दरम्यान आहे!! बापरे. हे मला माहित नव्हते. _/\_

एका कुणीतरी एका कुणाच्या स्वभाव विशेषावर सूचक कविता केली आहे. त्यावर अगदी तिरकस प्रतिक्रिया देखील काही संहिता पाळून दिली जावी. इथे एका विशिष्टच व्यक्तीचा उल्लेख कशासाठी? आपण शहाणे आहोत व सर्व नास्तिक हे गाढव आहेत अशी दुराग्रही भूमिका घेणारी " एक " मिपाप्रिय" आय्डी ही इथे आहे.सध्या बरेच दिवसात ते इथे आलेले नाही. त्या ही आयडी ला वरील कविता लागू पडते. मीच शहाणा सर्वज्ञ असे समजणारे अनेक जण इथे आहेत. तेंव्हा कुणाला टोमणे मारायचा आनन्द घ्यायचा असेल तर त्यातही एक निखळ पणा हवा !

उत्तम रचना...जमलंय एकदम. काही जणांना कायम अटेन्शन हवे असते. हल्ली निगेटिव्ह पब्लिसिटी चा जमाना आहेच ज्याचा वापर करून अटेन्शन सीकर संक्षी प्रकाशझोतात राहायचा प्रयत्न करत असावेत.

काही म्हणा. सरजींमुळे मिपावर येण्यात एक आकर्षण असायचे. आता काय नवीन बुवा? अशी उत्सुकता वाटायची.

In reply to by चित्रगुप्त

लै मिस करतो. माणुस हटके होता. -दिलीप बिरुटे (सरांचा फॅन)

प्रथमदर्शनी वाटले की कुणी राजकारणी व्यक्ती आसावी. पुढे प्रतिसाद वाचल्यावर कळले की परीवारतलेच कुणीतरी दिसते. नवीन आसल्याने कोण ते कळाले नाही. आसो . पण रचना मात्र भारी आवडली.