चुका
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो.
सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती भावना आता हळूहळू बदलत होती.वाढलेली सामाजिक बंधनं आणि बदललेली मानसिकता यात मी हरवलो होतो.
खर सांगायच तर मी प्रेम आणि आकर्षण या वादात अडकलो होतो.काल ज्या मुलीसोबत मी सहज खेळायचो,बोलायचो आज तस काहीच नव्हत.त्यात चित्रपटांमधील प्रेमप्रसंग बघून तर मन अगदीच पेटून उठे.मी माझ्याच मनात प्रेमाच्या कित्येक व्याख्या निर्माण केल्या होत्या.पण प्रत्येक वेळी त्या व्याख्या बदलत होत्या.याचा परिणाम मी नैराश्यात गेलो,मी कोणाशीच बोलत नव्हतो.
याचा परिणाम व्हायचा तो झालाच,नववीच्या प्रथम सत्र परिक्षेचा निकाल लागला,वर्गात मागून दुसर्या बेंचवर बसलो होतो,सगळ्यात आधी तर इंग्रजीचा पेपर हाती आला,मला ८० पैकी केवळ २१ गुण होते.तो पेपर हाती अन भरथंडीत घामाच्या धारांनी मी न्हाऊन गेलो,दुसरा पेपर आला तो मराठीचा,वाटल यात तरी जास्त असतील पण बघितल तर फक्त ३३.आता मात्र ह्रदयाचे ठोके दुप्पटगतीने पडू लागले,मी घाबरलो,तोच भूमितीचा पेपर हाती आणि आता डोळे पाणावले होते,कारण ४० पैकी फक्त ४ गुण,काय करावे काहीच सुधरत नव्हते.माझा आवडता विषय इतिहास.आठवीपर्यंत इतिहासाचा प्रश्न येताच माझं उत्तर तयार असायच,पण नववीत मला त्याच इतिहासातील धड्यांची नावं पण आठवत नव्हती,यातही मी काठावरच पास होतो.
आता गुणपत्रकावर पालकांची स्वाक्षरी आणायची होती,पण हे गुणपत्रक घरी दाखवायची हिम्मत माझ्यात नव्हती,अन म्हणून मी स्वत:च त्यावर सही केली.पण शेवटी दादाला ते कळालाच,बरच समजून सांगितल त्याने मला.त्याचवेळी शाळेत एक वक्तृत्वस्पर्धा होती,त्यातला एक विषय होता,किशोरावस्था.अन त्यात माझा दुसरा क्रमांक आला होता,पण त्या भाषणाचा माझ्यावर परिणाम होणार एवढ्यात द्वितीय सत्राच्या परिक्षा तोंडावर आल्या,सगळ्यांनी गृहपाठाच्या वह्या गोळा करायला सांगितल्या पण माझी हिंदीची वही अपूर्णच होती.इतक्या लवकर ती पूर्ण होणार पण नव्हती,अन म्हणून मी त्यात थोडफार लिहून मी स्वत:च त्यावर सह्या केल्या.
१० वीच्या वर्गात प्रवेश केला,मनस्थिती सुधारत होती,अन त्याचवेळी माझ नववीतील प्रकरण उघडकीस आलं.पुन्हा तेच नैराश्य,तोच एकटेपणा.आजवर चाललाय.सुधारण्याचा प्रयत्न सुरु असताना पुन्हा भुतकाळातल्या चुका तोंड वर काढतात.अन पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न.तेच नैराश्य.तोच एकटेपणा.
प्रतिक्रिया
@ rushikapse165 :
आत्ता पदवीच्या शेवटच्या
@ rushikapse165 : अजून बराच पल्ला गाठायचायं !
होय नक्की.
"ती तुझ्याकडे बघत होती रे"
पण या एका वाक्याने आनंद मिळतो
पदवीच्या शेवटच्या वर्षाला
हो,मला अगदी तसे मोजकेच मित्र
एन एल पी चा उपयोग करुन एखादा
होय नक्कीच.
प्रॉब्लेम काय आहे ?
मी त्यातून सावरलोय.पण आता मी
सध्यातरी पदवी नंतर काय
होय,ध्येय आहे.आणि त्याकडे
मला मिपावरच्या एका
त्रासदायक आठवण म्हणून शिल्लक
होय,नक्कीच.