गाभा:
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
16 Aug 2020 - 12:26 am | प्रलयनाथ गेंडास...
(३० वर्षे वाट पाहून ) राम मंदिर झालंय,
म्हणजे प्रभु रामाला सुद्धा एव्हडी वाट पाहावी लागली...
सर्व सामान्यांनी त्या प्रपोर्शननुसार मनाची तयारी करावी...
वाट बघा..
16 Aug 2020 - 7:16 am | Gk
तुमच्याकडे अजून मोदी पंतप्रधान झाले नाहीत ?
16 Aug 2020 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी होता....=))
आता आमच्याकडे कोणतेही प्रश्न उरलेले नाहीत.
आमच्या मेंदूचं आता काहीही काम उरलेलं नाही, म्हणजे आता कोणतेही प्रश्न उरलेले नाही सर्व अलबेल आहे.
That's All.
-दिलीप बिरुटे
(दिवा-बत्तीत खुश असलेला आत्मनिर्भर)
16 Aug 2020 - 10:32 am | संजय क्षीरसागर
लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते आणि जनतेच्या जीवनाचं भवितव्य मग त्या नेतृत्वाच्या हाती जातं. थोडक्यात, आपल्या आयुष्याचं काय करायचं हा निर्णय सामन्य माणूसच घेतो. त्यामुळे सामान्य मानसाच्या जीवनात तुम्ही नमूद केलेली सर्व सुखं येण्यासाठी दोनच मार्ग आहेत : १. समाज प्रबुद्ध होणं किंवा २. ज्याला हे बदल घडावेसे वाटतायंत त्यानं राजकारणात सक्रीय सहभागी होणं. पहिला मार्ग वेळ काढू असला तरी हमखास आहे आणि दुसरा मार्ग डायरेक्ट दिसला तरी अवघड आहे; शिवाय तो पुन्हा लोकांनी तुमच्याकडे नेतृत्व सोपवण्यावर म्हणजे त्यांच्या प्रबुद्धतेवरच अवलंबून आहे. तस्मात, वेल इन्फॉर्म्ड डेमॉक्रसी हा एकमेव उपाय सामान्यांचं जीवन सुखकारक करतो.
भारताचं दुर्दैव असं की आतापर्यंत अशिक्षित आणि गोरगरीबांना फसवून लोक सत्ता काबीज करत होते आणि सुशिक्षितांनी कितीही आपटली तरी फरक पडत नव्हता कारण शेवटी बहुमताचा प्रश्ण ! आताच्या सरकारनं सुशिक्षितांना उल्लू बनवून सत्ता काबीज केली आहे त्यामुळे आता देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय !
सुशिक्षितांची पोटं भरलीयेत, त्यांना गरीबी फक्त ऐकून माहिती आहे. त्यांना नोटबंदीत किती मेले, बुलेट ट्रेनचा देशाला काय उपयोग आहे, पटेलांच्या पुतळ्यानं देशाचं काय भलं झालं, सर्जिकल स्ट्राईकसारख्या निर्बुद्ध लॉकडाऊनमुळे करोडो लोकांचे किती अतोनात हाल झाले, जिएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट लागलीये, रिजर्व बँकेच्या पावणे दोन लाख कोटींच्या गंगाजळीवर सरकारनं कसा हातोहात डल्ला मारला आहे. सत्तेतले भ्रष्ट आणि गुन्हेगार नेते हद्दपार झाले का त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती ओढवली आहे ? न खाऊंगा, न खाने दूंगा वाला स्वतःच ऐतखाऊपणा करुन सगळा पब्लिक सेक्टर स्वतःची इस्टेट असल्यासारखा वापरतोयं का ? पेट्रोल, डिजेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती वर गेल्यात ?.... याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यांना राममंदीराचा खुळखुळा मिळाला की खुष, ज्याला साधं समोर लिहिलेलं वाचता येत नाही त्याच्या योजनांना किती हवा देतोयं याची कल्पनाच नाही.
आता काही अपूर्व चमत्कार घडला तरच देशातल्या सामान्यांचं आयुष्य सुखकर होईल.
17 Aug 2020 - 5:13 pm | चौकस२१२
आताच्या सरकारनं सुशिक्षितांना उल्लू बनवून सत्ता काबीज केली आहे त्यामुळे आता देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय !
हे जर खरे असेल तर
दोन, तीन गोष्टी सिद्ध होतात
१) दोन्ही सुशिक्षित आणि अशिक्षित यानं उल्लू बनवले असणार ... त्याशिवाय ३०० चा आकडा कसा गाठता आला ?
२) वरील दोन्ही प्रकारचे लोक त्याच लायकीचे असले पाहिजेत नाही का? त्याशिवाय उल्लू कसे बनले आणि त्या मुले आता तक्रारीला जागा नाही ,, बसा बोंबलत
आणि जाता जाता .. गेली ६० वर्षे जनता उल्लू नवहती वाटत..खूप डोकं लढवून त्यांनी एकाच कुटुंबाला भरघोस ( ४००+ राजीव गांधी आठवा) मते दिली नाही का ! आणि आपले कल्याण करून घेतले .
20 Aug 2020 - 3:15 pm | उपयोजक
खूप डोकं लढवून एकाच कुटूंबाला भरघोस मते!
:)) :))) ;)
16 Aug 2020 - 11:07 am | प्रलयनाथ गेंडास...
१०० टक्के सहमत.
आताच्या घडीला, कोरोना सुद्धा, इष्टापत्ती वाटून घेण्याचा ऍटीट्युड, शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारीत केला जातोय.
उदा.
(मत देण्याचे) कर्मण्ये वाधिकारस्ते,
(सर्व सामान्यांनी) मा फलेषु कदाचन.
16 Aug 2020 - 9:30 pm | Rajesh188
देशात अन्न धान्य च पुरवठा मुबलक होत आहे
देशात रेल्वे सेवा व्यवस्थित चालू आहे
देशात शिक्षण सर्वांना मिळत आहे
देशात रोजगार उपलब्ध आहे.
देशात रोज दंगे होत नाहीत.
देशात तुमच्या घरात घुसून तुम्हाला कोणी बाहेर काढत नाही.
देशात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.
देशात सर्रास तुमची संपत्ती लुटली जात नाही.
कष्ट करण्याची तयारी असेल तर देशात कोणीच उपाशी नाही.
सरकार निवडणे जनतेच्या हातात आहे चांगले लोक निवडा सरकार चांगले मिळेल.
16 Aug 2020 - 10:37 pm | आर्यन मिसळपाववाला
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे धन्यवाद.
लोकशाही स्वतःच्या लायकीचं नेतृत्व निवडते
१००% सहमत.
याचा अर्थ लोकाना पन हेच पाहिजे आहे अस काधु शकतो का ??
16 Aug 2020 - 11:25 pm | संजय क्षीरसागर
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की :
१. भ्रष्टाचार संपेल
२. किंमती कमी होतील
३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील
४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील
अश्वासनं देणार्यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा यथासांग अभ्यास करुन मी इथे २०१४ सालीच सांगण्याचा प्रयत्न केला की हा फ्रॉड आहे. पण प्रचाराचा धुराळा इतका बेमालूम उडवला गेला की विरोधात बोलणारा देशद्रोही, त्याला पाठवा वन-वे तिकीट देऊन सिरियाला ! आणि शेवटी बहुमताच्या जोरापुढे काय पाड लागणार ?
जबरस्त बहुमत मिळाल्यावर वाट्टेल ते केलं आणि त्याचे काहीही परिणाम झाले तरी सगळं भारी चाललंय असा इतका भयानक प्रचार केला गेला की देशातले सगळे आवाज दाबले गेले. २०१९ ला पाच वर्षात `सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही' हा मुद्दाच निकालत निघाला ! जे काही झालंय (वरचा प्रतिसाद बघा) तेच भव्य दिव्य आहे आणि आता हा अश्वमेधाचा वळू कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती झाली.
आता लोकांना सामान्य माणसाचं आयुष्य सुखकारक झालं की नाही यात काहीही इंटरेस्ट राहिला नाही. सर्वेसर्वा त्यांचासाठी युगपुरुष झालेत. ते म्हणतील ते देशाचं हित आणि त्यांच्याविरुद्ध बोललात की तुमचं काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायला हवं असं काही नाही. कोणताही पब्लिक फोरम, तुमचं घर, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक कुठेही तुमची परिस्थिती दयनीय होऊ शकते.
16 Aug 2020 - 11:55 pm | संजय क्षीरसागर
यथासांग अभ्यास करुन मी इथे २०१४ सालीच सांगण्याचा प्रयत्न केला की हा फ्रॉड आहे > वाचा :
अरविंदबरोबर दीड तास
17 Aug 2020 - 9:57 am | सुबोध खरे
अरेरे
आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये का?
तेसुद्धा २०१४ पासून ?
मग आता २०२४ला पण हेच सरकार येणार आहे तुम्ही काय करणार?
17 Aug 2020 - 12:53 pm | जिन्क्स
प्रत्येक धाग्यावर असं वैयक्तिक होणं टाळता येईल का? आशा कुसपटीतुन सुरू झालेला वाद पुढे बऱ्याच वैयक्तिक अपशब्दांपर्यंत जातो. आशचर्य याचं वाटत की तुमच्या अपशब्दांकडे संयोजक मंडळ सपशेल दुर्लक्ष करते.
शेवटी All are equal. But some are more equal than others हेच खरं
17 Aug 2020 - 1:43 pm | प्रमोद देर्देकर
संक्षी साहेब ते सगळं जावु द्या.
आम्हाला एकदाच सांगा सर्व बाजुंनी परिपक्व, तुमच्या सगळ्या मते मांडलेल्या बाजुंनी चालणारे असे
कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय?
हे एकदा कळलं तर आम्ही उपकृत होवु.
17 Aug 2020 - 2:04 pm | संजय क्षीरसागर
सध्या अमक्यालाच (डायरेक्ट) पंतप्रधान करायचं हे ठरवून संपूर्ण देश मतदान करतो ही फंडामेंटल चूक सर्वांनी मनातून हद्दपार केली पाहिजे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची कोणतीही पारख न करता सरसकट पक्षाला मतदान केलं जातं. उमेदवार नालायक असेल तर तुमच्या मतदारसंघात काय प्रो-पब्लिक पॉलिटिक्स होणार ? तो उमेदवार केवळ शीर्षस्थ नेत्याची आरती ओवाळण्यात धन्यता मानणार, त्याला मतदारांचा विचार करण्याची गरजच वाटणार नाही.
तस्मात, प्रत्येक नागरिकानं आपाल्या मतदारसंघातल्या उमेदवाराला मत देतांना या गोष्टी बघायला हव्यात :
१. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी > कामीत कमी गुन्हेगारी खटले असलेला उमेदवार हवा.
२. त्याची शैक्षणिक आहर्ता
३. त्यानी आतापर्यंत तुमच्या मतदारसंघासाठी केलेलं काम
४. त्याच्याशी जनसंपर्क करण्याची सुलभता
मग भले तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो. एक माणूस म्हणून तो जवाबदार, सुशिक्षित आणि कमीतकमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हवा. इतकं साधं धोरण सर्वांनी अवलंबलं तर राजकीय परिस्थिती एकाच निवडणूकीत बदलेल.
अर्थात, याव्यतिरिक्त सत्ताबदलाचा कोणताही मार्ग नाही.
17 Aug 2020 - 3:09 pm | प्रमोद देर्देकर
उमेदवार केवळ शीर्षस्थ नेत्याची आरती ओवाळण्यात धन्यता >>> असे उमेदवार काँन्ग्रेस मध्ये किती होते याची यादी बनवा. आणि भाजप मध्ये कीती होते याची पण बनवा.
गेला बाजार तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे कोणत्याही वार्डात असा उमेदवार सापडणं कठिण आहे. आणि जरी सापडला तरी त्याला बाकीचे निवडुन आलेले उमेदवार साथ देणार नाहीत. कारण लोकांनाही असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो.
आणि असा पक्ष सुध्दा निवडुन आला तरी मतैक्यासाठी त्रिशंकु स्थिती निर्माण होते हे तर तुम्ही जाणताच.
17 Aug 2020 - 4:11 pm | आंद्रे वडापाव
आता प्रमोद साहेब तुम्हीही सांगा पाहू ...
कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला सत्तेत यायला हवंय?
की ज्यामुळे ,
लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ... आणि सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होईल
तुम्ही ही आढेवेढे न घेता उत्तर द्या पाहू ...
तुमची याबतीतील मत एकदा कळलं तर आम्हीही उपकृत होवु.
17 Aug 2020 - 4:27 pm | प्रमोद देर्देकर
अरे आंद्रे एव्हढं काय मनाला लावुन घेतोस शोन्या!
माझा कधी प्रतिसाद पाहिलास का कि ज्यात मी प्रतिस्पर्धी म्हणुन सारखं हे सरकार किंवा ते सरकार पाहिजे असं पिंका टाकत असतो नाही ना.
मी संक्षींना त्यांना कोणते सरकार हवं आहे जे आजच्या घडीला अति निस्पृह आहे असं वाटतंय म्हणुन त्यांचे मत पहात होतो.
पण तु आलास चालत्या गाडीत चढायाला. मि. कुल गाय नाईस (थंड डोक्याच्या माणासा)
मला कोणतही सरकार चालेल जे हा १५० कोटी लोकांचा गाडा पुढे घेवुन जाईल…
साला ब्रम्हदेवाचा बाप जरी आला तरी काहीच होणार नाही कारण एकच लोकसंख्येचा भस्मासुर…
सालं आकाश फाटलं तर ठिगळं तरी कुठे कुठे लावत बसणार…..
म्हणुन ते नियंत्रण कराणारे कोणतेही सरकार मग साम्राज्य शाही, हुकुमशाही अथवा राजेशाही काही हे आणा.
कॉंग्रेस असो , भाजपा असो वा जनता दल कोणतही चालेल.
17 Aug 2020 - 4:35 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही आपापसात बखेडा करण्यापेक्षा माझा मुद्दा बघा, एकदम नामी आहे.
हे पक्षीय राजकारणच भारताच्या लोकशाहीला मिळालेला शाप आहे.
17 Aug 2020 - 4:25 pm | संजय क्षीरसागर
१.
काय मिळणार अशी यादी मिळवून ? तुम्ही माझा प्रतिसाद वाचा : नागरिकांनी (पक्षाकडे न पाहता) केवळ उमेदवाराची लायकी पहायला हवी.
२.
आमच्या मतदार संघात २०१९ ला, मुकुंद किर्दत नांवाचा एम. टेक., अत्यंत लोकाभिमुख आणि शून्य गुन्हेगारी बॅकग्राउंडचा उमेदवार `आप'नी दिला होता. माझं धरुन त्याला ७९० मतं पडली ! आणि हाइट म्हणजे आमचा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित आणि प्रबुद्ध समजला जातो ! जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारलं तर त्यांना हा उमेदवारच माहिती नव्हता. मला म्हणाले तू आधी का नाही सांगितलंस ! हीच का आपली जाण ?
३.
एकदा सर्वांनी चांगला उमेदवारच निवडायचा म्हटल्यावर बाकीचे कोण येणारेत ? आणि लोकांना असा प्राणामिक शिकलेला उमेदवार नको असतो ? हे लोक कोण ? अहो, आपणच तर मतदार आहोत !
४.
तीच तर लोकशाहीची मेख आहे : तुम्ही चांगला उमेदवार निवडा (पक्ष बघू नका) > एकदा चांगले लोक एकत्र आले की तुम्हाला चांगलं सरकार मिळेल.
आणि लोकशाहीत सामान्य माणसाचं जीवन सुखकारक व्हायला सुशिक्षितांनी राजकारणाभिमुख होणं गरजेचं आहे. माझ्यावर इथे किती हल्ले झाले ते बघा. परिणामांची तमा न बाळगता इथे जिएसटीचा मी एकहाती विरोध केला, आता सध्याच्या वाढलेल्या किंमती पाहा.
शेवटी एकमेव मार्ग हाच आहे > पक्ष बघू नका चांगला उमेदवार निवडा, तुम्हाला चांगलं सरकार मिळेल.
18 Aug 2020 - 7:48 pm | सुबोध खरे
आमच्या मतदार संघात २०१९ ला, मुकुंद किर्दत नांवाचा एम. टेक., अत्यंत लोकाभिमुख आणि शून्य गुन्हेगारी बॅकग्राउंडचा उमेदवार `आप'नी दिला होता. माझं धरुन त्याला ७९० मतं पडली ! आणि हाइट म्हणजे आमचा मतदारसंघ अत्यंत सुशिक्षित आणि प्रबुद्ध समजला जातो ! जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना विचारलं तर त्यांना हा उमेदवारच माहिती नव्हता. मला म्हणाले तू आधी का नाही सांगितलंस ! हीच का आपली जाण ?
हायला
जो माणूस १० लाखाच्या मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर केवळ ७९० इतक्याच माणसांना ओळखतो,
तो निवडून आल्यावर बाकी नऊ लाख९९ हजार माणसांना भेटणार केंव्हा आणि त्यांची कामे केंव्हा करणार?
ज्या माणसाला राजकारणात काम करायचं आहे त्याचा जनसंपर्क जबरदस्त असायला पाहिजॆ.
आपल्या वातानुकूलित केबिन मध्ये बसून जनतेची कामे होत नाही. फार तर असा माणूस प्रशासनिक सेवेत यशस्वी होऊ शकेल.
बाकी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षातील सर्व लोकांना उल्लू बनवून आपला स्वार्थ साधला आणि अण्णा हजारे सारख्या माणसांचाहि विश्वासघात केला त्याचे राज्य आपल्याला यायला हवंय?
पांडुरंग हरी.
.
18 Aug 2020 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
का २०१४ नंतर खास लावून घेतली ? त्यांना समोर धरलेलं वाचता येत नाही, तुम्हाला वाचता येतं पण मुद्दा समजत नाही.
१.
तुमचा खासदार तुम्हाला ओळखतो का ? तुमच्या मतदारसंघातल्या अडचणींसाठी किती वेळा तुम्ही त्याला फोन केला आहे ?
२.
निवडणूका झाल्यापासून तुमचा खासदार किती वेळा मतदार संघात आला ? तुम्हाला भेटला का ? तुमच्या मतदारसंघातल्या किती प्रष्णांचा पाठपुरावा तुम्ही किमान फोन करुन तरी केला आहे ?
३.
तुमचा खासदार कुठे बसतो हे तुम्हाला माहिती आहे का ? निवडणूकांनंतर बघितला तरी का कुठे ? मुकुंद किर्दतला मी व्यक्तिशः ओळखतो. तो तुमच्या खासदारासारखा जनतेच्या पैशावर ऐतखाऊपणा कदापि करणार नाही.
४.
पक्षीय राजकारण आणि फालतू मुद्दे काढून विषय भरकटवणं एवढाच काय तो तुमचा वकूब !
अहो, मुद्दा लक्षात घ्या मुकुंद किर्दत अपक्ष असता तरी मतदारसंघात तोच एकमेव लायक उमेदवार होता. आणि तेच मी सांगतोयं उमेदवार बघा, पक्ष नाही.
आता प्रामाणिकपणे सांगा तुमच्या खासदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे ? त्याची शैक्षणिक आहर्ता काय ? तुमच्या मतदारसंघातले नेमके कोणते प्रष्ण त्यानी सोडवल्यामुळे तुम्ही त्याला मत दिलंत ?
आणि उत्तर देता येत नसेल तर अडाण्यासारखे कमळासमोरचं बटन दाबणारे आणि तुम्ही यात काहीएक फरक नाही.
19 Aug 2020 - 10:23 am | सुबोध खरे
आपलंच खरं हे आयुष्यभर रेटत राहिलात तरी तसं होत नाही.
आमचा पूर्वीचा खासदार श्री किरीट सोमय्या यांचा ऑफिस मुलुंडला नीलम नगर मध्ये आहे तेथे कोणीही आपली तक्रार घेऊन जाऊ शकत असे. त्यांची पत्नी श्रीमती मेधा सोमय्या आणि मुलगा श्री नील सोमय्या ( हा आपल्या वरून मोहितेंचा चांगला मित्र होता) हे आपल्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी नेहमी उपलब्ध असत.
आताच खासदार श्री मनोज कोटक यांनी एक प्रणाली करून ठेवली आहे. आपला प्रश्न सुरुवातीला आपल्या नागरसेवकाकडे त्यांनतर आमदाराकडे वर्ग करा. कारण हे लोक आपल्या जवळ राहतात.
आमच्या सोसायटीतील दीड शहाण्या पदाधिकाऱ्यांनी घरगुती कर्मचाऱ्यांना येण्यास बंदी केली होती. त्याविरुद्ध मी एक लेखी अर्ज दिला होता कि मी आणि माझी पत्नी दोघे डॉक्टर असून आम्ही अत्यावश्यक सेवेत मोडतो तर आमच्या घरी घरगुती कर्मचाऱ्यांना परवानगी द्यावी कारण तसा सरकारचा नियम आहे.
असे असूनही त्या दीड शहाण्या लोकानी आमच्या सेविकेस येण्यास मनाई केली तेंव्हा श्री मिहीर कोटेचा या आमच्या आमदाराला फोन केला त्यांनी सोसायटीच्या सचिवाला फोन करून सज्जड दम भरला कि सरकारी नियमाप्रमाणे आपण घरगुती कर्मचाऱ्यांना मनाई करू शकत नाही तसे केल्यास आपल्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही केली जाईल. यामुळे १ ऑगस्ट पासून आमच्या घरात घरगुती सेविका येणे सुरु झाले आहे.
आमचा अगोदरचा आमदार श्री तारा सिंह हे काम कसे करतात हे मी प्रत्यक्ष पहिले आहे. एकदा काही कामासाठी रेशन कार्यालयात गेलो असताना श्री तारा सिंह तेथे बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे काय प्रश्न आहेत तें विचारत असत आणि त्याचे उत्तर ताबडतोब देत असत. श्री तारा सिंह तेथे दर मंगळवारी २ ते ४ बसत असत
आमदार समोर बसला असल्याने रेशन सरकारी कर्मचारी नम्र पणे वागत होते. उद्या या परवा या असली अरेरावी त्यांना करता येत नसे. . त्यामुळे प्रश्न लगेच सुटला नाही तर पुढच्या वेळेस ते बसलेले असताना परत तोच प्रश्न घेतला जाऊन सोडवला जात असे.
या अगोदरचे आमचे अनेक खासदार खरोखरच चांगलं काम करणारे होते. ज्यात माझ्या आठवणीतील लोक म्हणजे डॉ सुब्रमण्यम स्वामी, श्री गुरुदास कामत, श्री प्र्मोद महाजन, श्रीमती जयवंतीबेन महेता, आणि श्री संजय दीना पाटील हे आहेत.
उगाच कुणालाही माहिती नसलेला माणूस खासदार म्हणून उभा राहतो आणि अर्थात त्याची अनामत रक्कमही जप्त होते म्हणून तुम्ही जनतेच्या अकलेबद्दल बेफाट विधाने करताय? अडाण्यासारखे कमळासमोरचं बटन दाबणारे आणि तुम्ही यात काहीएक फरक नाही.
आपले मत १ लाख मतांच्या इतके अमूल्य आहे असला अहंगंड बाजूला ठेवा.
दुसर्याबद्दल माहिती नसताना @ सुबोध खरे : मुद्दा न समजण्याची सवय बालपणापासून आहे असली बेजबाबदार विधाने करणे आता तरी सोडून द्या
19 Aug 2020 - 2:09 pm | संजय क्षीरसागर
हेच तर मी सांगतोयं की गुन्हेगारी बॅकग्राउंड नसलेला, सुशिक्षित, तुमच्या मतदारसंघात काम केलेला आणि तुम्ही संपर्क करु शकाल असा उमेदवार निवडा.
मनोज कोटकची शैक्षणिक आहर्ता काय आणि त्याच्यावर दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत का ? हे मतदानापूर्वी तुम्ही बघितलं का ?
23 Aug 2020 - 2:09 am | वगिश
माझ्या मुलाला भटके कुत्रे चावले, सोसायटी WhatsApp समूहात कुत्रे हाकलून लावा अशी तक्रार केली असता त्या मेसेज चि प्रत पोलिस स्थानकात जमा करून एका कुत्रे प्रेमी ताई न गुन्हा दाखल केला, त्या वकिल आहेत त्यामुळे हर ते कायदे शोधून गुन्हा दाखल केला आहे.
भटकी कुत्री ही माझी मुले आहेत अस त्यांच म्हणण आहे, पण त्या मुलांची अन्य जबाबदारी त्या ताई घेत नाही असो मुद्दा असा की गुन्हा दाखल कुणावरही होऊ शकतो, तो सिद्ध झालाय का?
तुमचा मित्र पडला म्हणून एवढे चिडून जाऊ नका.
23 Aug 2020 - 5:45 pm | संजय क्षीरसागर
माझ्या ओळखीचा उमेदवार निवडून आला नाही हा मुद्दा नाही.
उमेदवाराची शैक्षणिक आहर्ता, त्याच्यावर दाखल असलेले फौजदारी गुन्हे, त्यानी मतदारसंधात केलेलं काम, त्याची संपत्ती याची माहिती मतदार घेत नाहीत. केवळ अमक्याला पंतप्रधान करायचं या निर्बुद्ध विचारानी, उमेदवार न बघता, पक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबतात हा मुद्दा आहे.
गुन्हा सिद्ध झाल्यावर निवडणूक लढवता येत नाही (जर दोन वर्ष तुरुंगवासाची सजा झाली असेल तर), याची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही.
24 Aug 2020 - 2:56 am | कोहंसोहं१०
"उमेदवाराची शैक्षणिक आहर्ता, त्याच्यावर दाखल असलेले फौजदारी गुन्हे, त्यानी मतदारसंधात केलेलं काम, त्याची संपत्ती याची माहिती मतदार घेत नाहीत. केवळ अमक्याला पंतप्रधान करायचं या निर्बुद्ध विचारानी, उमेदवार न बघता, पक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबतात हा मुद्दा आहे" >>>>>>>
लोक माहिती घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप करत बसण्यापेक्षा स्वच्छ प्रतिमेच्या आणि खरेच काम केलेल्या उमेदवाराने किंवा ज्यांचा त्या उमेदवारावर खरोखरच विश्वास होता त्यांनी तो उमेदवार निवडून यावा यासाठी स्वतःच्या उमेदवाराचे काम आणि बाकी उमेदवारांच्या गुन्ह्याचे, शैक्षणिक अर्हतेचे पितळ जनतेसमोर उघड पाडण्यासाठी किती प्रयत्न केले हे बघणे जास्त सयुक्तिक नाही का?
लोकशाही राजकारणात जनतेला दोष देणे हा सर्वात मोठा निर्बुद्धपणा आहे.
17 Aug 2020 - 5:05 pm | चौकस२१२
'त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची कोणतीही पारख न करता सरसकट पक्षाला मतदान केलं जातं.
भारतापुरता म्हणत असाल तर एकवेळ खरे असले पण भारतासारख्याच असलेल्या संसदीय लोकशाहीत ( अमेरिका नाही तर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इत्यादी) इतर देशात साधारण पणे "पक्षाची धोरणे" हा महत्वाचाच मुद्दा असतो आणि त्या नुसार पारंपरिक पद्धतीने बरेचदा लोक मतदान करतात.. तिथे सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार आधी ठरलेलं असतो तरी पण
याचे कारण बहुतेकदा असे असेल कि
- दावे उजवे आणि आजकाल पर्यावरणवादी अश्या साधारण तीन विचारसरणी खूप काळ रुजलेल्या आहेत त्यांच्या मुख कलमांमध्ये फार मोठा बदल होत नाही
- वयक्तिक / घराणे यावर बेतलेला पक्ष ( जिथे आमचे साहेब तिथे आम्ही ) असे फारसे नसते
स्थिर आणि परिपक्व लोकशाही साठी पक्षानुसार राजकारण ( यात पक्षाने आपली धोरणनशी वर्षानुवर्षे प्रामाणिक राहणे हे गृहीत आहे म्हणा ) हेच जास्त योग्य वाटते..
स्थानिक मुद्दे आणि उमेदवार हे कोण आहेत काय हे जरी महत्वाचे असले तरी लांब पल्य्या साठी "पक्षानुसार " हेच जास्त निरोगी, असा साधारण येथील अनुभव दशकानुदशके सांगतो .. भारतात "व्यक्ती तितके पक्ष" हे जाऊन २-३ सुधृद पक्ष उभे राहतील तर बरे असे वाटते ..
17 Aug 2020 - 5:27 pm | चौकस२१२
" देशातले सगळे आवाज दाबले गेले.."
आपण ७५ सालचे बोलताय कि सध्याचा कर्दनकाळ नमो यांचं बद्दल?
बरोबर आहे बहुतेक आपण णमोकाळाबद्दल बोलत असणार
हि नवीनच माहिती! गेला बाजार खालील लोकांची दुकाने चालू आहेत , आवाज ऐकू येतात तरी आपण असा दावा करता ? आश्यर्य आहे!
- शेखर गुप्ता, रवीशकुमार, निखिल वागळे, द प्रिंट , द quint , राजदीप सरदेसाई, बरखा दत्त म्याडम , गिरीश कुबेर , प्रयाग राज , कमला हसन , भट साहेब , अरुंधती रॉय, तमाम भाई लोक, नासिर , जावेद, "असहिष्णुता" अश्या अवघड शब्दांचा उच्चार न करता येणार बडा भाई , "असुरक्षित वाटायला लागले" आता पाणी वाला भाई आणि त्यांची मिसेस .. इत्यादी
आत्तापर्यंत हे सगळे ७५ सारखे कोठडीत गेले पाहिजे होते नाही का? किंवा सायबेरिया किंवा " री येडुकाशन " साठी चीन मध्ये ?
नमोजी अहो ऐकताय न... वरील सगळ्या लोकांना लगेच घ्या ई हो ताब्यात .. म्हणजे वरील दिवटी विधान खरे असे तरी म्हणता येईल ! लवकर
17 Aug 2020 - 5:30 pm | Gk
धोनीने प्रचार करायला नकार दिला म्हणून घालवला म्हणे
कायतरी लोया आहे , असे लोक कुजबुजत आहेत
21 Aug 2020 - 2:24 pm | प्रसाद_१९८२
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की :
१. भ्रष्टाचार संपेल
२. किंमती कमी होतील
३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील
४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील
---
२०१४ आधी देशात वरिल समस्या होत्या, हे तुम्ही मान्य करताय. याचा अर्थ, कॉंग्रेसने वस्तुंच्या भरमसाठ किमती वाढवून, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन सर्वसामन्य भारतीय जनतेला लुटले हे देखील तुम्हाला मान्य आहे तर. मग देशातील जनतेने वर्तमान सरकारच्या (दिखाव्याला?) पाठींबा दिला तर त्यात चूक काय ? देशातील जनतेने कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सरकारला पुन्हा निवडून द्यायला हवे होते की काय ?
---
गेल्या सहा वर्षात देशात झालेल्या एका तरी घोटाळ्याचे अथवा भ्रष्टाचाराचे नाव सांगा ?
21 Aug 2020 - 8:37 pm | संजय क्षीरसागर
१. नोटाबंदी हा मोदींचा सर्वस्वी एकट्यानं घेतलेला सर्वात चुकीचा निर्णय. ४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती > १०० % पैसे परत आले. नोटाछपाईचा खर्च सुद्धा लोकांनी भरलेल्या टॅक्समधून वसूल झाला नाही. जनतेचा नाहक अतोनात छळ झाला, बँकीग व्यवस्थेवर कमालीचा ताण आला, अर्थव्यवस्थेची वाट लागली. मोदींना ना खेद ना खंत; आता तो विषयच काढत नाहीत.
२. बुलेट ट्रेन हा केवळ मोदींची हौस म्हणून १.१० हजार लाख कोटींचा प्रकल्प > देशाला शून्य उपयोग > सध्या तो गुंडाळला गेला आहे. त्या कर्जाची परतफेड कशी होणार याचा काही ठावठिकाणा नाही.
३. जिएसटी ही मोदींची महत्वाकांक्षी योजना > अर्थव्यवस्थेचा बोजवार उडाला आहे. कायदा येऊन सव्वा तीन वर्ष झाली अजून घोळ संपत नाहीत. मोदी त्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत.
४. काय वाट्टेल ते करुन प्रत्येक राज्यात आपलीच सत्ता हवी या हव्यासापोटी लोकांनी नाकारलेले काँग्रेस नेते घेऊन सत्ता काबीज करणे.
५. महाराष्ट्रात निर्लज्जपणे एका रात्रीत, भ्रष्ट नेत्याशी हातमिळवणी करुन सत्तास्थापनेचा प्रयत्न. त्यासाठी रातोरात राष्ट्रपती आणि राज्यपालांची संमंती मिळवून देशाच्या नितीमत्तेला राजकारणाची निम्नतम पातळी दाखवून दिली. फडणवीस या घटनेत मोदी आणि शहा यांची संमती मान्य करतात पण त्याला गनिमी कावा असं निर्लज्ज नांव देऊन पुन्हा झालं ते योग्यच होतं असा दिखावा करतात.
६. जिएसटीमुळे अपेक्षित रेवेन्यू जनरेट होत नाही असं दिसल्यावर, रिजर्व बँकांचे गवरनर्स बदलून १.७५ लाख कोटींच्या गंगाजळीवर हात मारला.
७. पब्लिक सेक्टर कंपन्यात संबीत पात्रासारखे डिरेक्टर्स नेमून, पक्षाचा भसाडा लाऊड स्पिकर म्हणून त्याला तिथून पेमेंट ! पब्लिक सेक्टर कंपन्यांची इफिशियंसी वाढवायची सोडून त्या स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारख्या विकायला काढल्या.
८. गंगा शुद्धिकरणाचा इतका बेंडबाजा वाजवला, शून्य प्रगती. उज्वला गॅस योजनेसारखी निर्बुद्ध योजना, हजारो कोटी रुपये खर्च केले. गरिबांकडे दुसरा रिफिल घ्यायला पैसे नाहीत. सगळी योजना पाण्यात गेली. संबीत पात्रा ज्या घरात जेवायला बसला आहे तिथे सिलेंडर फळीवर आहे आणि स्वयंपाक चुलीवर चालू आहे असा फोटो वायरल झाला.
९. सरकारी खर्चानी वारेमाप परदेश दौरे, परदेशी गुंतवणूकीत कोणताही लक्षणीय फरक नाही. स्वतः परराष्ट्र मंत्री असल्यासारख्या गळाभेटी पण पण परराष्ट्रसंबंधाचा बोजवारा. देशाच्या परराष्ट्रनितीच्या प्रोटोकॉलला हरताळ फासून अमेरिकेत ट्रंपच्याबरोबर हातमिळवून अबकी बार ट्रंप सरकार अशी अत्यंत बाववळट घोषणा.
१०. देशाच्या पैश्यानी वाट्टेल ती शो बाजी, उदा. लाखो रुपये खर्चून गुहेत बसून ध्यान आणि त्याचे फोटो वायरल होतील अशी सोय करणे. निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यावर स्वतःच्या संसदीय भाषणातून बिनधास्तपणे प्रचार करणे.
११. सर्जिकल स्ट्राईकसारखा, कोणतीही पूर्वसूचना न देता देशव्यापी लॉकडाऊन, फाळणीनंतर स्वतंत्र भारतात नागरिकांचे मरणप्राय हाल. अर्थव्यवस्थेची संपूर्ण वाट लावली. एकूण परिणाम शून्य. मोदी गायब.
21 Aug 2020 - 9:52 pm | बाप्पू
सगळया नाही.. पण बर्याचश्या मुद्यांशी सहमत..
21 Aug 2020 - 10:03 pm | ऋतुराज चित्रे
संक्षी अगदी योग्य मुद्दे मांडलेत. ह्यावर कोणीच सरकारचा बचाव करायला पुढे येणार नाहीत.फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारतील ,तुम्ही ह्या गोष्टी कशा हाताळल्या असत्या?
कुठल्या घोटाळ्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खिशाला चाट पडत होती? परंतू नोटबंदी ,जी एस टी मुळे सामान्यातल्या सामान्य माणसाला आर्थिक भुर्दंड पडत आहे.
21 Aug 2020 - 11:41 pm | कोहंसोहं१०
प्रश्न चांगला आहे ऋतुराज परंतु यावर सामान्य माणसाने उत्तर देणे म्हणजे बॅटही पकडता न येणाऱ्या व्यक्तीने टीव्ही समोर बसून सचिन तेंडुलकरने हा बॉल अश्या पद्धतीने फटकारला पाहिजे होता म्हणजे आऊट होण्याऐवजी सिक्स गेला असता हे सांगण्यासारखे आहे.
या निमित्ताने पुलंच्या मुंबईकर पुणेकर की नागपूरकर मधील महापालिकेच्या उंदीर मारणाऱ्या विभागातील अधिकाऱ्याचे अमेरिकेच्या आर्थिक घडीवरचे विवेचन हा जोक आठवला.
खरा प्रश्न हा आहे की सध्याचे देशासमोरचे बरेचसे प्रश्न निर्बुद्ध राहुलने कसे हाताळले असते? १५-२० वर्षांपासून साधं स्वतःच्या constituency चा विकास करता आला नाही त्या जोकरला...शेवटी तिथूनही पराभूत होऊन पळावे लागले. तो पंतप्रधान झाला असता तर देशाचे काय झाले असते यावर न बोललेलंच बरं. सत्तेत आलो तर गरिबांना दर वर्षी ७२ हजार देउ हे आमिष साधी सीट सुद्धा वाचवू शकली नाही त्याची. आणि त्याचे कारण हे गरिबातल्या गरीब आणि अडाण्यातल्या अडाण्याला सुद्धा ठाऊक आहे. पुढचे लाम्बच.
पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने.
असो. जनता आता हुशार होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाला मतदान करत आहेत. ६० वर्षात काँग्रेसचे तथाकथित धुरंदर नेते फार काही करू शकले नाहीत तर पुढे हा जोकर काय करणार हे जनतेला कळून चुकले आहे. याउलट मॅनिफेस्टो मधील एकेक वचने सध्याचे सरकार पूर्ण करत चालली आहे त्यामुळे पुढच्या १५-२० वर्षात हे सरकार नक्कीच चांगले करून दाखवू शकेल जर सत्तेत राहिले तर. त्यानंतर मात्र ७० वर्षाच्या तरुण राहुल गांधीला थोडा वाव असू शकतो जर तोपर्यंत थोडीफार अक्कल आली असेल तर.
तोपर्यंत मोदी/भाजपद्वेषी यांचा ओरडा चालूच राहील.
22 Aug 2020 - 2:53 pm | ऋतुराज चित्रे
पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना
तुम्ही तरी काय वेगळं करत आहात? पंतप्रधानांचे नोटाबंदी आणि जीएसटी चे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत आहात. खरंतर राहुल गांधींचा ना मी उल्लेख केला ना त्यांच्या क्षमतेची पंतप्रधानांबरोबर तुलना केली. विषय भरकटवणे हाच एकमेव उद्देश असेल तर चालू द्या!
24 Aug 2020 - 2:10 am | कोहंसोहं१०
पंतप्रधानांचे नोटाबंदी आणि जीएसटी चे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत आहात>>>>>>>
ऋतुराज, इथे नोटाबंदी आणि जीएसटी हा विषयच नाही मुळात. जेंव्हा प्रतिसादाला प्रतिसाद दिला जातो तेंव्हा माफक अपेक्षा हि असते की विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत किंवा निदान मुद्द्याला धरून लिहावे. वर एका आयडी ने २०१४ पूर्वीच्या समस्या, आधीच्या सरकारचे भ्रष्टाचार घोटाळे याविषयी काही प्रश्न विचारले आणि एका महाशयांनी त्याला प्रतिसाद म्हणून नेहमीच्या सवयीला धरून मोदी बॅशिंग सुरु केले ज्यात नोटाबंदी आणि जीएसटी आणले ज्याचा प्रतिसादाशी काहीच संबंध नाही. तुम्ही हे वाचले नसेल वर तर पुन्हा देतो "....नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने"
21 Aug 2020 - 11:48 pm | संजय क्षीरसागर
या मागची सायकॉलॉजी फार गहन आहे.
स्वतःला आगापिछा काही नाही, म्हणजे हे फकीर अशी भव्य प्रतिमा पहेले छूटच निर्माण केली. थोडक्यात, स्वतःच्या बाबतीत भ्रष्टाचाराची शक्यताच नाहिशी करुन टाकली आणि देशातल्या खुळ्या जनतेनं ते सर्वस्वी मान्य केलं. पण आतला डाव फार भारी आहे. मोदींना ऐय्याषीचा भयंकर शौक आहे.
मग करायचं काय की हस्तेपरहस्ते ललित मोदी, मेहूल चोकसी किंवा तत्सम व्यक्तीला सांगायचं की बराक ओबामांसमोर मोदी उठून दिसतील असा सूट त्यांना हवा. त्या व्यक्तींना अशा काही सवलती मिळालेल्या असतात की ते मोदींचं संपूर्ण नांव चांदीच्या धाग्यांनी लिहिलेला, दहा लाखांचा सूट ह्यांना भेट म्हणून पाठवणार (म्हणजे मोदींच्या खात्यात एक पैशाची उलाढाल नाही पण रुबाब बघा). बराक ओबामा जगाच्या सर्वात बलाढ्य राष्ट्राचा प्रेसिडेंट, त्याला काय घंटा फरक पडणार ? खुद्द ओबामा स्वतःची छत्री धरुन उभे आणि मोदी खुळ्यासारखे त्याच्या शेजारी दहा लाखांचा सूट घालून मिरवतायंत ! पुन्हा मेडीयात बोंबाबोंब झाल्यावर सूट लिलावाला तयार ! आता काय काम आहे सूटचं, आपली हौस झाली काम संपलं ! आहे की नाही भारी आयडीया ?
अरुण शौरींचे परराष्ट्र मंत्रालयात दोस्त आहेत. मोदींचे इतके अफाट दौरे बघून त्यांनी चवकशी केली की या दौर्यांचं फलित काय ? कारण परदेश दौर्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्या दौर्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मेडीयाला सांगायचा प्रघात आहे. एकतर देशाचा पैसा त्या दौर्यात लागलेला असतो आणि दुसरं म्हणजे जे करार झाले त्याचा देशाच्या भवितव्याशी संबंध आहे. काय सांगावं शौरींना परराष्ट्र मंत्रालयातल्या वरिष्ठांनी ? कसलं फलित, अहो ते फक्त `सेल्फि दौरे' आहेत ! आहे की नाही भन्नाट आयडीया ? परराष्ट्र मंत्री कोण, प्रोटोकॉल काय, सगळं काशीला पाठवून, देशाच्या पैशावर परदेशात भटकण्याची हौस पुरवून घ्यायची ! आणि स्वतःच्या खात्यात उलाढाल शून्य !
अल्बर्ट हॉल मधला इंटरव्यू तर हाईट होता ! संपूर्ण स्क्रिप्टेड प्रकार, त्यात प्रसून जोशीसारखा दरबारी भाट प्रश्ण विचारतोयं. काय त्या प्रश्णांची लायकी आणि काय ती उत्तरं ! निव्वळ प्रतिमा उच्चीकरणाशिवाय काहीही साधण्याचा उद्देश नाही पण टायटल काय भारी `भारतकी बात, सबके साथ !' ज्या माणसाला समोर लिहिलेलं धड वाचता येत नाही. जो स्ट्रेंग्थचं स्पेलींग STREANH करतो आणि ते सुद्धा चायनीज डेलीगेशन समोर ! त्याला उभ्या आयुष्यात अल्बर्ट हॉलमधे विंगेत उभं रहायची तरी संधी मिळाली असती का ?
थोडक्यात फंडा काय, मनसोक्त वापरा आणि भोगा, फुल ऐय्याशी करा, मालकी दुय्यम आहे. आपल्याला कुणीही विचारणारं नाही. फक्त खात्यात उलाढाल होऊ देऊ नका ! कारण एकतर त्यानं बालंट येण्याची शक्यता हमखास आणि दुसरं म्हणजे आपल्यामागे आहे कोण ?
सर्वांनी एकच शहाणपणा शिकायचा, भोग महत्त्वाचा, मालकीचा आग्रह हा मूर्खांचा हव्यास आहे. काय बिशादे भ्रष्टाचार शाबीत होण्याची ? तस्मात, मनसोक्त भोगत, हे फकीर आता तहहयात पंतप्रधान राहणार!
22 Aug 2020 - 1:05 am | संजय क्षीरसागर
फक्त सायकॉलॉजी हा एक सीए म्हणून माझा भ्रष्टाचाराचा अभ्यास आहे आणि तो विधानांनी शाबित होतो.
१. मोदींचा १० लाखांचा सूट (नेटवर उपलब्ध)
२. अरुण शौरींचा इंटरव्यू ज्यात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात केलेल्या विचारणेचा उल्लेख आणि मिळालेलं उत्तर आहे (माझ्याकडे आहे)
३. अल्बर्ट हॉल इंटरव्यू नेटवर उपलब्ध आहे.
४. मोदींना समोर लिहिलेलं वाचता येत नाही (एमए डिग्री असून सुद्धा, (म्हणजे डिग्रीच्या खरेपणाबद्दल सुद्धा संदेह ! ) > लिंक प्रतिसादात दिली आहे.
22 Aug 2020 - 2:12 am | कोहंसोहं१०
सव्वाशे कोटी लोकसंख्या आणि सव्वाशे लाख कोटीपेक्षा जास्त जीडीपी असलेल्या देशाच्या पंतप्रधानाने जगातल्या सर्वात बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीसोबत मीटिंग साठी घातलेला १० लाखाचा सूट हा भ्रष्टाचार? हाहाहा. अगदी हा भ्रष्टाचार जरी मानला तरी ह्यापेक्षा भ्रष्टाचाराचे चांगले उदाहरण देऊ शकला नाहीत हेच मोदींचे यश.
बाकी १० लाखाचा सूट भ्रष्टाचार तर १० वर्षाच्या राज्यात काँग्रेसने केलेला हजारो कोटींच्या घोटाळ्याला काय म्हणाल? एखादा चांगला शब्द सापडल्यास नक्की सुचवा.
"मोदींना ऐय्याषीचा भयंकर शौक आहे" >>>> छान विनोद. पण मग उठसूट काहीही काम न करता सुट्टीसाठी थायलंडला पळणाऱ्या युवराजच्या सवयीला काय म्हणाल? समाजसेवा?
किंवा इटलीच्या बार डान्सर ला एका प्रतिष्ठित (?) घराण्याची सून म्हणून आणणाऱ्या माजी पंतप्रधानांच्या कृत्याला काय म्हणाल? आंधळे प्रेम की धर्मनिरपेक्षता?
थोडा विचार करून बघा ऐय्याषी शब्द इथे जास्त चांगला सूट होतो का?
"परदेश दौर्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्या दौर्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मेडीयाला सांगायचा प्रघात आहे" >>> हो का? मग चायना बरोबर सत्तेत असताना आणि नसताना घेतलेली गुप्त भेट आणि गुपचूप केलेला करार पत्रकार परिषद घेऊन मीडीयाला किंवा देशाला सांगायचा प्रघात नाही वाटत?
"थोडक्यात फंडा काय, मनसोक्त वापरा आणि भोगा, फुल ऐय्याशी करा, मालकी दुय्यम आहे. आपल्याला कुणीही विचारणारं नाही. फक्त खात्यात उलाढाल होऊ देऊ नका" ---> हे मात्र काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराला चपखल बसते. तरी बिचारे खूप काळजी घेऊनही नॅशनल हेराल्ड मध्ये अडकत चालले आहेत.
बाकी परराष्ट्र दौऱ्याचे यश काय लिहीत बसणार. जगातल्या महत्वाच्या देशांव्यतिरिक्त १५७ मुस्लिम देश आणि त्यातील काही प्रमुख देश जे पाकिस्तानसारख्या मुस्लिम देशाच्या विनंती किंवा धमक्यांना भीक न घालता मोदींचे गुणगान गातात यातच सर्वकाही आले. बाकी ३७० कलम आणि शत्रुदेश वगळता जगात कोणीही न केलेला विरोध, विनंतीवरून वेळेवर राफेल मिळणे, भारताला UN security counsil आणि स्थायी सदस्यत्वासाठी लाभलेला बहुसंख्य देशांचा पाठिंबा (तसेही तुम्हाला सांगून काही उपयोग नाही माहित आहे त्यामुळे सध्या एवढेच पुरे)
बाकी ह्याही प्रतिसादात मोदी बॅशिंग करून (बरेचसे मुद्दे मात्र खरेच हास्यास्पद आहेत...पुढच्या वेळी थोडा अभ्यास करून चांगले आणा) माझ्या वरच्या प्रतिसादातले हे वाक्य "पण जोकर गांधीचे अकर्तृत्व लपवण्यासाठी मोदीद्वेषाचे पांघरुण घेणे आवश्यक ठरते काँग्रेस समर्थकांना नाहीतर प्रसाद_१९८२ यांनी विचारलेल्या सरळसोप्या प्रश्नांना हो किंवा नाही असा प्रतिसाद देण्याऐवजी मोदीविरोधी घंटा वाजवली नसती प्रतिसाद्कर्त्याने" पुन्हा खरे ठरवल्याबद्दल धन्यवाद.
22 Aug 2020 - 11:33 pm | संजय क्षीरसागर
काँग्रेस भ्रष्ट होती म्हणून यांना सत्तेत आणले. हे भ्रष्टाचाराचं समूळ निर्मूलन करणार होते. आता यांच्या भ्रष्टाचाराची तुलना काँग्रेसशी करुन यांना जस्टीफाय करण्याइतका निर्लज्जपणा दुसरा नाही !
एकूण परदेश दौर्यांचं फलित शून्य आहे. सर्व सभोवतालच्या देशांशी संबंधांची वाट लागली आहे. ट्रंपबरोबर हात उंचावून केलेली `अबकी बार ट्रंप सरकार' अशी घोषणा हा अत्यंत निर्बुद्ध प्रकार होता, जो देशाच्या प्रोटोकॉलमधे बसत नाही. इतके परदेश दौरे करुन आणि कोट्यावधी रुपये उडवून, इतर देशांशी झालेले व्यापारी करार आणि देशात झालेली परदेशी गुंतवणूक यात अजिबात वाढ नाही. त्यामुळे देशाच्या रोजगार निर्मितीत काहीही फरक पडलेला नाही.
22 Aug 2020 - 11:56 pm | अर्धवटराव
बरोबर आहे.
काश्मीरमधे ३७० हटवल्यावर संपूर्ण जगाने भारताला वाळत टाकले. ओआयसी तर भारतावर आक्रमण करायला निघाली आहे. `अबकी बार ट्रंप सरकार' अशी घोषणा ट्रंपच्या २०२०२ निवडणुकीला उद्देशुन केली असल्यामुळे भारताला खजील व्हावं लागलं आहे. चीनसारखा प्राणप्रीय पारंपारीक मित्र आज आपला कट्टर वैरी झाला आहे.
मोदी तसा कर्मदरिद्री माणुस. पंतप्रधानपद भेटल्यावर तर चेकाळलाच. फुकटात विदेशी दौरे करायला मिळताहेत म्हटल्यावर कशाला संधी सोडणार तो. बसला जगभर फेर्या मारत. जनतेच्या पैशाचा चुराडा नुसता.
२०१४ पुर्वी भारताची प्रतिमा एक सहनशील, जबाबदार देश अशी होती. काहि भरकटलेले लोकं यायचे. थोडे फार बाँबस्फोट करायचे, काहि लोकांना त्रास व्हायचा, थोडीफार जीवीतहानि व्हायची. पण भारताने कधि संयम सोडला नाहि. नेमस्तपणे आपली बाजु मांडत राहिला. मोदी इतका आतातायी आणि युद्धखोर... उगाच सैन्याला बंदुका उडवायला लावल्या. भारताची प्रतिमा खराब केली.
भारतीय जनता देखील किती नालायक. केजरीवालांसारख्या उमद्या माणसाला नाकरुन या मोदिच्या मागे लागली. केजरीवाल स्वच्छ माणुस. अगदी मैफील रंगवणारा. सर्वप्रथम त्याने आपल्या पक्षातच साफसफाई केली.. कुमार विश्वास वगैरे अनावष्यक लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला. देश पातळीवर लोकांना एकत्र करुन, आपल्यापेक्षा लायक माणुस भेटला तर त्याचा सन्मान करुन, जनसेवेचं व्रत साधणारे सगळे गुणत्याच्या अंगी असुनही जनतेने मोदिला निवडुन दिलं. भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळं आता.
24 Aug 2020 - 2:30 am | कोहंसोहं१०
इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त भक्तच करु शकतात ! --------> हजारो करोड च्या घोटाळ्याकडे मुद्दाम कानाडोळा करून १० लाख रुपयाच्या सूट ला भ्रष्टाचार म्हणण्याचा निर्बुद्ध युक्तिवाद काँग्रेसचे चमचेच करू शकतात.
बाकी "(मिपावर) आयडी ब्लॉक झाला नसता तर २०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता होती" ह्या तुमच्या अजून एका निर्बुद्ध युक्तिवादाला एखादा छानसा अलंकारिक शब्द सापडला तर जरूर कळवा.
बाकी अलंकारिक मराठीत मोदीविरोध ग्लोरिफाय करण्याच्या नादात तुम्ही हे विसरून गेलात की तुम्ही लिहिलेले बरेच मुद्दे काँग्रेसला जास्त लागू होतात. ते दाखवण्याची मला संधी दिली याबद्दल मात्र धन्यवाद :)
तिथे गेली अनेक दशके साडीला इस्त्री करण्यात धन्यता मानणाऱ्या काँग्रेसच्या २३ महाभागांनी राजकारणातील त्यांचे पुढील भवितव्य ओळखून अध्यक्ष बदलण्यासाठी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. इथे तुमचा मोदीविरोधी अजेंडा पुढे चालवण्यापेक्षा तिकडे पक्ष पडझड वाचवण्यासाठी काही उपाय सापडले (निर्बुद्ध असले तरी चालतील) तर श्रेष्ठींना जरूर कळवा.
बाकी मोदींच्या बाबतीत हाथी चले बाजार.....ही म्हण मात्र चपखल बसते.
24 Aug 2020 - 7:00 pm | संजय क्षीरसागर
१.
मोदींनी भ्रष्टाचार केला हे मान्य करुनही तुम्ही त्यावर पांघरुण घालता हे लज्जास्पद आहे. आणि याचा अर्थ तुमचं कायद्याचं ज्ञानही शून्य आहे. कायद्यान्वये भ्रष्टाचारात प्रतवारी नाही.
२.
यावर आतापर्यंत अनेक वेळा उत्तर देऊनही तुम्हाला प्रकाश पडत नाही म्हणजे कमाल आहे. जिएसटीचं काय ज्ञान आहे तुम्हाला ? जिएसटीमुळे अर्थव्यवस्थेची काय वाट लागली आहे याचं सुतराम आकलन नसतांना पुन्हापुन्हा तोच निर्बुद्धपणा करु नका. आता नीट वाचा : जुलै २०१७ ते एप्रिल २०१९ हा कालावधी मोदीसरकारनी केलेल्या या तद्दन मूर्खपणाबद्दल देशात जनजागृती करायला पुरेसा होता. मोदीभक्त इतके बावळट आहेत की त्यांना व्यावसायिकांनी पूर्वीच्या बेस किंमतीवर जिएसटी लावला आहे इतकी उघड गोष्ट लक्षात आली नाही. शिवाय हे भक्त इतके मूर्ख आहेत की अजूनही त्यांना जिएसटी फेल गेला हे लक्षात येत नाही. वेळच्यावेळी या गोष्टी लक्षात आल्या असत्या तर खुळ्यासारखे अच्छे दिनची वाट बघणारे जागे होऊ शकले असते.
आता तुम्हाला जिएसटीबद्दल काय माहिती आहे ते लिहा आणि काही येत नसेल तर असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका.
24 Aug 2020 - 9:10 pm | कोहंसोहं१०
"मोदींनी भ्रष्टाचार केला हे मान्य करुनही तुम्ही त्यावर पांघरुण घालता हे लज्जास्पद आहे" >>>>>>> काँग्रेस ने हजारो कोटींचा भ्रष्टचार करून त्यावर काहीच न बोलता दहा लाखाच्या सूट ला (काय करणार ६ वर्षात अजून काही चांगले मिळालेच नाही तुम्हाला) भ्रष्टाचार म्हणून प्रसिद्धी देण्याचा जो निरर्थक प्रयत्न तुम्ही चालवला आहे तो सर्वाधिक लज्जास्पद आहे.
यावर आतापर्यंत अनेक वेळा उत्तर देऊनही तुम्हाला प्रकाश पडत नाही म्हणजे कमाल आहे. >>>>> प्रश्न जीएसटी चूक कि बरोबर हा नसून तुमच्या लिखाणामुळे देशात होऊ शकत असलेले पण आयडी मिपावर बॅन असल्याने न झालेले सत्तांतर या तुमच्या दाव्यातली जी अतार्किकता आहे ती किती अवास्तविक आणि निर्बुद्ध आहे हेही स्पष्टीकरण तुम्हाला वारंवार देऊनही तुम्ही पुन्हा तुमच्या दाव्याची पाठराखण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करता ही खरी कमाल आहे.
"आता तुम्हाला जिएसटीबद्दल काय माहिती आहे ते लिहा आणि काही येत नसेल तर असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका" ---> प्रतिसादाला प्रतिसाद देत राहायचे, विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन विषयाची गाडी भरकटवुन हळूच जीएसटी आणि नोटबंदी वर वळवायची आणि प्रत्येक प्रतिसादातून मोदीविरोधी अजेन्डा पुढे हाकायचा हेच तुम्ही करत आलात. यापुढे असले निरर्थक प्रतिसाद देऊ नका.
24 Aug 2020 - 9:27 pm | संजय क्षीरसागर
१. मोदींनी भ्रष्टाचार केला हे तुम्हाला कबूल आहे त्यामुळे पुढच्या चर्हाटाचा काही उपयोग नाही.
२. जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे लक्षात येत नसेल तर लेखन आणि स्मृती यांचा संबंध संपला आहे असा अर्थ होतो.
24 Aug 2020 - 10:05 pm | कोहंसोहं१०
मोदींनी भ्रष्टाचार केला हे तुम्हाला कबूल आहे त्यामुळे पुढच्या चर्हाटाचा काही उपयोग नाही. >>>>>> अरेरे! अजून एक केविलवाणा प्रयत्न. कदाचित तुम्हाला मराठी नीटसे कळत नसावे. माझ्या प्रतिसादात मोदींनी भ्रष्टाचार केला हे कबूल केले नसून उलट तुम्ही १० लाखाचा घातलेला सूट हा भ्रष्टाचार म्हणून ग्लोरिफाय करण्याचा आणी गळी उतरवण्याचा जो प्रयत्न करताय अन त्याचबरोबर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल मात्र अवाक्षरही न बोलता सोयीस्कररीत्या त्याकडे कसे दुर्लक्ष करताय हे मी दाखवून देत आहे.
जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे लक्षात येत नसेल तर लेखन आणि स्मृती यांचा संबंध संपला आहे असा अर्थ होतो >>>>>>
हाहाहा. चोराच्या उलट्या बोंबा. जिएसटीचा विषय तुम्हीच पुन्हापुन्हा काढतायं हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असूनही अशी विधाने करून तुम्ही स्वतःचीच शोभा करताय. हरकत नाही...सुरु ठेवा. त्यानिमित्ताने तुमचा खोटारडेपणा वाचकांच्या समोर येईल.
24 Aug 2020 - 9:38 pm | डॅनी ओशन
भ्रष्टाचार शब्दाचा फार मुक्तहस्ते वापर चाललाय असे नाही वाटत. 10 लाखाचा सूट फकीर माणूस कसा घालतो वैगेरे ऐकायला मस्त आहे, टाळ्या पण पडतील. कायद्याच्या कोणत्या संज्ञेमध्ये हा भ्रष्टाचार आहे हे सांगावे अशी विनंती. फॉरेन डेलिगेशनने भेटी स्विकारण्याबद्दल परराष्ट्र खात्याची परवानगी लागते असे वाचलेले. असा नियम पंतप्रधान पदाबद्दल काही आहे काय ? त्यानंतर त्याचा लिलाव करून रक्कम सरकारदरबारी जमा झाली या बाबीचा काही फरक पडतो काय, कायदेशीरदृष्ट्या ?
आणि सरतशेवटी, मोदींनी डॅमेज कंट्रोल म्हणून जरी लिलाव केला असला तरी त्यात वावगे काय ? डॅमेज कंट्रोल झालंच नव्ह ?
(जर असा कायदा असेल, तर ओशो सारखे गुरु रोल्स रॉईस घेऊ शकतात, पण वर्ल्ड लिडर्सना भेटण्यासाठी मोदी सूट घेऊ शकत नाहीत असे म्हणावे का ?)
21 Aug 2020 - 10:54 pm | Rajesh188
भारताच्या स्वतंत्र काळापासून सर्व सरकार जबाबदार आहेत.
सरकारी योजना 100 रुपयाची असेल तर जनतेच्या हातात 5 ते 10 रुपयेच पडतात बाकी सर्व नेते,अधिकारी,बाकी दलाल गायब करतात.
हे खूप वर्षा पासून चालू आहे आणि आज पण तीच स्थिती आहे.
सरकारी कामात प्रचंड पैसे मधल्या मध्ये हडप केला जातो त्या मुळे ती काम निकृष्ट दर्जाची होतात.
रस्ते निर्मित साठी करोडो रुपये मंजूर केले जातात आणि रस्ता तयारच होत नाही.
सरकार आली आणि गेली काही ही फरक पडला नाही.
बाकी gst, नोट बंदी ह्या मुळे जे नुकसान झाले आहे ते वरील सर्व प्रकार समोर अत्यंत किरकोळ आहे.
आज पण सरकारी ऑफिस मध्ये पैसे दिल्या शिवाय काम होत नाही.
भ्रष्ट चार पहिला पण खुलेआम चालला होता आणि आज पण खुले आम् चालू आहे.
फक्त लोक बदलतात पण यंत्रणा तशीच कुचकामी राहते त्या मध्ये काहीच फरक पडत नाही.
सरकार बदल झाला आहे ह्याचे दृश्य परिणाम 0 असतात.
त्या मुळे लोक neutral झाली आहेत निवडणुकी विषयी.
फक्त T N शेशन hya महान व्यक्ती नी निवडणुकीत चालणारा भ्रष्ट कारभार खूप मोठ्या प्रमाणात नष्ट केला.
असे दहा वीस अधिकारी जरी असतील तरी खूप मोठ्या प्रमाणात देश सुधारेल.
22 Aug 2020 - 1:13 am | संजय क्षीरसागर
या दोन निर्णयांमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ज्याप्रकारे गाळात गेलीये तशी अवस्था स्वातंत्रोत्तर काळात एकदाही आली नव्ह्ती. आणि आता ती लवकर सुधारण्याची शक्यताही नाही. कितपत अभ्यास आहे तुमचा अर्थशास्त्राचा आणि कशाच्या जोरावर तुम्ही हे विधान केलंय ?
22 Aug 2020 - 11:15 am | Rajesh188
अर्थशास्त्र तसा गहन विषय आहे त्या मध्ये माझा बिलकुल अभ्यास नाही हे मान्य करून हे
तुम्हीच हे सांगा नोट बंदी मुळे
सामान्य लोकांचे काय नुकसान झाले.
1) ज्या नोटा बंद झाल्या त्या बँकेत जमा करायचे स्वतंत्र जनतेला दिले होते.
आणि पुरेसा वेळ सुद्धा दिला होता .
माझ्या मते नुकसान कोणाचे झाले.
जो पैसा हिशोबत नव्हता पण बाजारात फिरत होता तो थांबला आणि त्या पैशा वर अवलंबून जे उद्योग होते ते बुडाले.
हा एकमेव नोट बंदी चा तोटा मला दिसत आहे.
अजुन काय काय नुकसान झाले हे तुम्हीच सांगू शकाल तुम्ही अर्थशास्त्र मधले जाणकार आहात असा तुमचा दावा आहे.
श्रीमंत सरकार आणि श्रीमंत जनता ह्या मध्ये फरक आहे.
एका प्रकारात फक्त फक्त सरकार श्रीमंत असते पण जनतेला त्याचा काही ही फायदा होत नाही.
सर्व योजना बनावट.
सरकारी खर्च योजनेवर 100 रुपये जनतेच्या वाट्याला फक्त 5 रुपये हा प्रकार.
Gst मुळे सरकार गरीब झाले पण गळती थांबली असेल तर तो फायदा च आहे असे माज मत आहे.
तुम्ही अर्थ शास्त्र जाणकार आहात.
ह्या वर अजुन प्रकाश टाका.
22 Aug 2020 - 11:28 am | संजय क्षीरसागर
तुम्ही बिनधास्त ठोकाठोकी करता, ते थांबवा.
नोटाबंदी आणि जिएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं किती आणि काय नुकसान झालंय हे माझ्या वरच्या आणि जिएसटीच्या पोस्टवरच्या प्रतिसादात सविस्तर लिहिलं आहे.
माझे नुसते प्रतिसाद वाचले तरी तुम्हाला भरपूर प्रकाश पडेल. इथून पुढे माझे प्रतिसाद न वाचता बिनधास्त ठोकाठोकी करू नका.
22 Aug 2020 - 11:54 am | Rajesh188
तुमच्या दोन्ही पोस्ट मी अत्यंत ध्यान देवून वाचल्या आहेत.
तुमच्या पोस्ट मध्ये gst मुळे होणारे नुकसान
म्हणून
सर्व पैसा परत आला आणि फुकट छपाईचा खर्च वाढला आणि लोकांना त्रास झाला असे लिहल आहे.
पण त्या पुढचे तुम्ही लिहायचे विसरला की फायद्या चे नाही म्हणून लीहल नाही?
जो पैसा सरकार च्या नजरेत नव्हता तो
सरकार च्या नजरेत आला.
टॅक्स चोरी होत होती त्याला आळा बसला.
अर्थ शास्त्र मध्ये जर तुम्ही जाणकार आहात तर उथळ पोस्ट करू नका
सविस्तर चारी बाजू चा विचार करून लिहा.
मला त्या मधले काही जास्त खोलवर समजत नाही.
आम्ही उथळ पोस्ट करू शकतो.
22 Aug 2020 - 11:55 am | Rajesh188
चुकून gst लिहल गेले
22 Aug 2020 - 2:00 pm | संजय क्षीरसागर
१. नोटाबंदी हा मोदींचा सर्वस्वी एकट्यानं घेतलेला सर्वात चुकीचा निर्णय. ४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती > १०० % पैसे परत आले. नोटाछपाईचा खर्च सुद्धा लोकांनी भरलेल्या टॅक्समधून वसूल झाला नाही. जनतेचा नाहक अतोनात छळ झाला, बँकीग व्यवस्थेवर कमालीचा ताण आला, अर्थव्यवस्थेची वाट लागली. मोदींना ना खेद ना खंत; आता तो विषयच काढत नाहीत.
वरती सगळे मुद्दे अंडरलाईन केलेत. पुन्हा वाचा.
आणखी काय घंटा सविस्तर लिहिणार ? नोटाबंदी फेल गेली हे तुमच्या लक्षात येत नाही का ? कुठे रहाता तुम्ही ? तुम्हाला रांगेत उभं रहावं लागलं का ? एका गोष्टीची धड कल्पना नाही का कसला अनुभव नाही; कशाला उगीच टाइमपास करता ?
22 Aug 2020 - 2:48 pm | Rajesh188
तुम्हाला विषयाचा काडी चा अभ्यास नाही .
ह्याच विषयात नाही तर इथे तूम्ही ज्या काही पोस्ट केले आहे त्या विषयात पण तुमचा सखोल अभ्यास नाही.
मला च जास्त कळत हा सर्वात मोठा भ्रम तुमचा झाला आहे.
मलाच नाही तर येथील असंख्य सभासद ना तुम्ही मूर्ख ठरवायचं प्रयत्न केला आहे.
नोट बंदी मुळे टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढली.
कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स मध्ये 13 ते 14 percent वाढ झाली.
इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले.
जे पाहिले इन्कम टॅक्स चुकवत होते ते पण tax भरू लागले.
डिजिटल payment चे प्रमाण वाढले.
सर्व पैसा बँकेत आल्या मुळे पुढच्या वाटचाली योग्य मार्ग निर्माण झाला.
ह्याची पण माहिती करून घ्या आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सारखे वागू नका.
23 Aug 2020 - 1:10 am | संजय क्षीरसागर
१.
तुम्हाला कुणी सांगितलं की हा नोटाबंदीचा उद्देश होता ? नोटाबंदीचा उद्देश काळा पैसा चलनातून नष्ट करणं हा होता. एकदा पैसे बँकेत भरायची मुदत संपल्यावर रिटर्न भरुन तो बापाजन्मात व्हाइट होत नाही. काहीही आकडेवारी फेकतायं ज्याचा नोटाबंदीशी सुतराम संबंध नाही.
२.
नोटांचे रंग बदलून काय घंटा फरक पडतो पुढच्या वाटचालीत ? बँकेतले पैसे काढून लोकांनी पुन्हा नव्या चलनात भ्रष्टाचार सुरु केला. आज भ्रष्टाचाराची परिस्थिती जैसे थे आहे. कुठे राहता तुम्ही आणि काय अनुभव आहे तुमचा सरकारी खात्यातल्या कामांचा ?
३.
तुम्ही असले प्रतिसाद पुन्हा देऊ नका.
23 Aug 2020 - 1:24 am | Rajesh188
काळा पैसा म्हणजे काय ह्याची व्याख्या सांगाल तर मी पुढे काही लिहीन.
22 Aug 2020 - 10:48 pm | आनन्दा
४.५० लाख कोटींचं चलन सर्क्युलेशनमधून बाद होईल अशी हमी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती
याची youtube क्लिप असेल तर देता का?
22 Aug 2020 - 11:52 pm | संजय क्षीरसागर
त्यात ते `गंगामे बहा देंगे' म्हणाले आहेत. मोदींची भुक्कड आणि बोगस भाषणं पुन्हा ऐकणं हा एक मोठा छळ आहे. सुरुवातीला हा आकडा एकूण चलनाच्या (१५ लाख कोटी) ३०% होता (४.५० लाख कोटी रुपये) मग जसे जसे करोडो रुपये बँकेत जमा व्यायला लागले तसा हा आकडा बदलत गेला आणि २०% वर आणला गेला.
The government estimated that ₹3 lakh crore, or approximately 20%, of the demonetised ban knotes would be permanently removed from circulation.[58] However, according to a 2018 report from the RBI, approximately 99.3% of the demonetised banknotes, or ₹15.30 lakh crore of the ₹15.41 lakh crore that had been demonetised, were deposited with the banking system. The banknotes that were not deposited were worth ₹10,720 crore.[12] Commentators concluded that the government failed in its aim of purging black money from the economy.[13]
ही घ्या लिंक
23 Aug 2020 - 12:08 am | अथांग आकाश
@ आनंदा : बनावट नोटांच्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या चलनाकडे प्रतिसादकर्ते सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत हे लक्षात घ्या!
नोटबंदी वरून अजुनही गळा काढणार्या लोकांबद्दल माझी समजुत अशी आहे की : एकतर ही मंडळी अशा कॅटेगरीतली असावीत की ज्यांना बेहिशोबी कींवा बनावट नोटांच्या स्वरूपातील बराच पैसा गमवावा लागला असावा कींवा अशा स्वरूपातील पैसा बाळगणार्या लोकांच्या जीवावर त्यांची एैयाषी-उदरनिर्वाह चालत असावा!
कींवा ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते पण नखशीखांत कर्जात बुडालेले असुनही श्रीमंतीचा खोटा देखावा करत राहीलेले लोक ज्यांना स्वत:ची (नसलेली) अब्रु राखण्यासाठी व आपण कर्जबुडवे नसून आपल्याला नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने ते फेडतां येत नसल्याच्या कांगावा केलेले-करणारे लोक!
राजकारणी, विरोधासाठी विरोध करणारे, नमोरूग्ण, राहुल-सोनीया-मौनमोहन प्रेमी आणी भाजप-संघ विरोधक यांचाही त्यांत समावेश आहेच.
दॅट्स ॲाल!
23 Aug 2020 - 12:40 am | Gk
2014 मध्ये भाजपाने नोटबंदीला विरोध केला होता
https://timesofindia.indiatimes.com/blogs/sanjeev-singh-blog/how-bjp-had...
गरिबांना त्रास होईल म्हणे
23 Aug 2020 - 12:41 am | संजय क्षीरसागर
१.
१०० % चलन परत बँकेत जमा झालं याचा अर्थ सर्व बेहिशेबी पैसा फक्त जुन्या नोटातून नव्या नोटात रुपांतरित झाला. कुणालाही बेहिशेबी पैसा गमवावा लागला नाही.
२.
विनोदी आहात काय ? नोटाबंदी आणि कर्जबुडवेगिरीचा सुतराम संबंध नाही. ती बेहिशेबी पैसा चलनातून नष्ट करण्याची योजना होती.
३.
काहीही फेकाफेकी लावलीये ! नोटाबंदी हा मोदींचा एकाहाती घेतलेला सर्वात निर्बुद्ध निर्णय होता अशा आर्थिक विषयावर चर्चा आहे. त्यात राजकारण कुठून काढतायं ?
23 Aug 2020 - 1:42 am | अथांग आकाश
अभ्यास गेला चुलीत! नोटबंदी हा अभ्यासाचा विषय नसुन अनुभवायचा विषय होता सर्वसामान्यांसाठी. हो तेच सर्वसामान्य ज्यांच्या झालेल्या सोकाॅल्ड हालांचे अतीरंजीत वर्णन वाचुन-ऐकुन आता कंटाळा आलाय.
Are you sure? Are you confident? Lock kiya jaaye?
हो तर विनोदी आहेच मी! म्हणून तर इतके दिवस तुमच्या फेकाफेकीयुक्त चर्चा-प्रतिसादांना विनोदी लेखन समजुनच तर वाचत होतो. पण आता त्यातल्या विनोदाची पातळी घसरत चालल्याने हा लेखन प्रपंच!
तुम्ही प्रतिसाद नीट वाचतां का हो?
हे माझ्या प्रतिसादातले वाक्य वाचले नाहीत की त्याचा अर्थ समजला नाही तुम्हाला.
23 Aug 2020 - 1:48 am | संजय क्षीरसागर
इथे अर्थशास्त्रीय चालू आहे. तुमच्यासाठी तो अभ्यासाचा विषय नसेल तर कशाला प्रतिसाद देता ?
आणि तो सर्वसामान्यांसाठी अनुभवायचा विषय होता इतकं बाष्कळ विधान खुद्द मोदीसुद्धा करणार नाहीत.
23 Aug 2020 - 2:21 am | वगिश
अरे जरा संदर्भ देऊन आरोप करा बर, काय तेच नोट बंदी आणि gst च तुणतुणं. म्हणे अर्थव्यवस्था गाळात गेली.
23 Aug 2020 - 5:51 pm | संजय क्षीरसागर
मग सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय उर्जित अवस्था आहे का ? प्रतिसाद देण्यापूर्वी किमान रोजचा पेपर तरी वाचत जा.
16 Aug 2020 - 11:19 pm | Rajesh188
लोकांना सरकार म्हणजे काय,सरकार च्या निर्णयाचे आपल्या जीवनावर परिणाम होतो.
जलद आणि कार्य तत्पर प्रशासन हवं असेल तर सत्ताधारी लोक उत्तम दर्जाची असावी लागतात ह्याची जाणीव च नाही..
आम्ही स्वतः च्या मेहनतीवर जगतो आम्हाला सरकार ची गरज काय ..
असे सर्व गैरसमज लोकांचे आहेत त्या मुळे कोणी ही निवडून येवू ध्या आम्हाला काय त्याचे असा विचार करतात.
सरकारी निर्णय वर प्रतेक व्यक्ती चे भविष्य कसे असेल हे अवलंबून आहे हे सत्य त्यांना कोणी सांगतच नाही.
आणि दुसरे आपली लोक भावनिक आहेत त्यांना जाती वरून, धर्मा वरून,प्रंतावरून, लिंगा वरून कधी ही,कोणी ही नेता मूर्ख बनवू शकतो.
17 Aug 2020 - 4:52 pm | चौकस२१२
"...परदेशी स्थायिक नागरिक?"
हे कुठं आणलेत या यादीत?
पूर्णतः नाही कळला संधर्भ !
भारतात भरपुर शहाणी सुरती माणसे आहेत, त्यातील ४ गेली बाहेर तर भारताचे काय फार मोठ्ठे नुकसान झाले असे वाटत नाही.. हा त्यांच्या बाहेरील आयुष्यात त्यांनी भारताने त्यांच्या साठी केलेल्या शिक्षण खर्च एवढे तरी धन भारतात आणावे / पाठवावे असे वाटते
माझ्य सारख्या सर्वसामान्य माणसाचे विचाराल तर भारतात राहून जितका हात भार भारतीय अर्थव्यस्थेला लावू शकलो असतो तितका किंवा थोडासा अधिक मी भारताबाहेर राहून भारतासाठी केला आहे यात समाधान आहे ...
17 Aug 2020 - 7:23 pm | Gk
डॉकटर व कम्पाउंडर मधला फरक तसाही जनतेला समजत नाहीच.
नैतर 2014 ला डॉकटर मनमोहन ला घालवून आणलेला कंपौंडर परत 2019 ला आणला नसता
17 Aug 2020 - 7:47 pm | आर्यन मिसळपाववाला
राजकारनी - कोनि बनवले त्याना, का आनि कसे मुर्ख बनवत आहे ते सामान्य मानसाला.
"...परदेशी स्थायिक नागरिक?"
विनति आहे थोदा गहन विचार करावा. इथे राहुन काय करता येवु शकले असते.
18 Aug 2020 - 4:37 am | चौकस२१२
आर्यन मिसळपाववाला ...गहन विचार करूनच लिहिलंय .. मला कल्पना आह कि आपण काय म्हणताय ते,. कि माणूस फक्त पैशाने नाही तर इतर गोष्टीतून देशाची सेवा करतो अप्रत्यक्ष रित्या.. वैगरे आणि त्याची किंमत/ त्याचा देशाला होणार फायदा असा पैशात मोजता येत नाही...,मान्य
माझ्य बाबतीत तरी मी भारतातात राहून देशाला काय फार मोठे योगदान दिले असते असे नाही
मी काही आय आय टी किंवा आई आई एम चा पदवीधर नाही कि इसरो चा नाही ..किंवा समाजाची खूप चाड असलेले समाजसेवक वृत्तीचा नाही किंवा सेनादलाच्या जाऊ शकणार नाही ..
बाकी खूप हुशार लोक जी सोडून गेली त्यातील अगदी थोड्या लोकंनाबद्दल हवे तर असे म्हणता येईल कि ते भारतात राहिले असते तर त्यांचे योगदान जास्त असते .. मान्य
\पण सर्वसामान्य भायेर कायमचे स्थलांतरित झालेल्यांमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले नसावे.... कारण लोकसंख्या एवढी आहे कि पुरेसे हुशार लोक भारतात आहेत
17 Aug 2020 - 10:35 pm | Rajesh188
पक्ष गांधीवादी अहिंसेवर विश्वास ठेवणारा आहे त्यांचे उमेदवार गुंड आहेत ,हिंसा वादी आहेत तर पक्ष चे गांधी वादी धोरण बघून त्या गुंडांना निवडून द्यायचे का?
पक्षाची धोरण गरिबी हटाव ची आहेत आणि त्यांचे उमेदवार उद्योग पती,गरिबांचे शोषण करणारे आहेत तर पक्षाचे गरिबी हटाव चे धोरण ला पाठिंबा म्हणून हे श्रीमंत शोषण करते निवडून द्यायचे का?.
चांगले उत्तम राजकीय वातावरण आणि सरकार हवे असेल तर पक्ष ला बिलकुल किंमत
देण्याची गरज नाही फक्त चांगली लोक निवडा .
जे खरोखर समाजाचे ,देश ह्यांच्या हिताचा च विचार करतात.
18 Aug 2020 - 4:50 am | चौकस२१२
राजेश आपला विचार मान्य आहे .. पक्ष आपल्या धोरणांपासून दूर भटकायला लागला कि असे वाटणारच आणि ते भारत पुरते कदाचित जास्त प्रखरतेने जाणवत असेल... ( म्हणजे पक्ष आवडतो पण उमेदवार भिकार)
पण हे जगात इतर लोकशाहीत कमी प्रखर आहे एवढेच मी दाखवू इच्छित होतो कारण येथे "पक्ष धोरणे" रातोरात बदलत नाहीत , आणि दल बदल फारसे होत नाहीत
राणे, कोल्हे आणि अजित पवार यांनी जे तिथे केले ( आज इथे तर उद्या तिथे) ते इथे केले असते तर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्ठात आली असती...
"तिकीट दिले नाही म्हणून तिकडे जातो" किंवा "माझा पक्ष काढतो" हे जोपर्यंत चालू आहे आणि जनता खपवून आहे अश्या समाजात पक्ष या कल्पने वर विश्वास ठेवणे कठीण .. असो बघू पुढे काय होते ते ..
उदाहरण म्हणून
१) आप चा प्रयोग स्थानिक पातळीवर यशस्वी झाला...केजरीवाल निवृत्त झाल्यावर तो पक्ष कसा राहील वगैरे काळ दाखवेल
किंवा
२)भाजपात आयाराम गयाराम मोठ्या संख्येने घेतल्याने "तत्वावर चालणार पक्ष" हे किती टिकेल हे पण दिसेल हळू हळू !
22 Aug 2020 - 9:44 am | शा वि कु
पुरेपूर सहमत. सर्वच पक्षांमध्ये सर्वप्रकारचे नग असतात. तेव्हा नग पाहूनच निर्णय, ब्रँड बघून नाही.
17 Aug 2020 - 11:26 pm | नेत्रेश
परदेशी स्थायिक नागरिक - यांचा काय संबंध? जरा सविस्तर समजाउन सांगाल का?
आणी परदेशी स्थायिक नागरिक भारताच्या एकुण लोकसंख्येच्या २% तरी आहेत का?
17 Aug 2020 - 11:33 pm | Rajesh188
मनमोहन सिंग हे हुशार आहेत त्या बाबत वाद नाही पण ते चांगले पंत प्रधान होते ह्याची फक्त दहा उदाहरणे ध्या.
नरेंद्र मोदी पेक्षा मनमोहन हे चांगले होते.
है कशा वरून ठरवले.
17 Aug 2020 - 11:44 pm | ऋतुराज चित्रे
कडबोळे सरकार असतानाही देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित सांभाळली होती डॉ. मनमोहन सिंगांनी. बहुमत असूनही मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला.
17 Aug 2020 - 11:47 pm | Rajesh188
सरकारी कंपन्या विकून आणि बाहेरच्या देशातील कंपन्यांना मोकळे रान देवून तात्पुरती अर्थ व्यवस्था सुधारली पण देशाचे नुकसान पण झाले.
मनमोहन ह्यांच्या काळात.
18 Aug 2020 - 9:49 am | आर्यन मिसळपाववाला
खालिल लिन्क चेक करा.
https://en.wikipedia.org/wiki/Non-resident_Indian_and_person_of_Indian_o....
भारत लोकसन्ख्या - 1,352,642,280
Non-resident Indian and person of Indian origin - 32,100,340
एकुन % - २.३७ +- ०.५ %
18 Aug 2020 - 10:09 am | नेत्रेश
person of Indian origin हे दुसर्या देशात १ कींवा दोन्ही भारतीय पालकांच्या पोटी जन्माला आलेले, कींवा भारतीय नागरीकत्वाचा परदेशी नागरीक त्याग केलेले असतात. त्यांना भारतीय नागरीक म्हणुन गणता येणार नाही.
18 Aug 2020 - 11:13 am | Gk
त्याना चालते, त्यांच्या मते
अक्षयकुमार देशी असतो
आणि सोनिया , राहुल विदेशी
18 Aug 2020 - 11:30 am | नेत्रेश
अक्षयकुमार आता देशी झाला आहे असे ऐकुन आहे.
खरे खोटे नक्की माहीत नाही.
18 Aug 2020 - 12:05 pm | आर्यन मिसळपाववाला
बाकि मुद्द्यावर पन होवु दे चर्चा
1. प्रशासकिय व्यवस्था - कधि विचरले आहेत प्रश्न सचिव / आयूक्त / ग्रामसेवक याना कोनि
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार - NA- खुप झलि चर्चा
3. बेफिकीर सामान्य माणूस - बेफिकीर पना मुले च होतेय कि काय सगले
4. प्रचंड लोकसंख्या - ह्या वर तर काहिच कोनि बोलताना दिसत नहिये
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात) - बोला ह्या वर पन
6. अडाणी आणि अशिक्षित लोक - बोला ह्या वर पन
7. परदेशी स्थायिक नागरिक - अजुन मुद्दे अपेक्शित आहेत.
8. सो कॉल्ड सुशिक्षित लोक - कूलाबा किवा कसबा पेत् किवा नागपुर शहर मधिल मत् दान टक्केवरि पहा
9. भांडवलदार आणि सरकारी अधिकारी - तेलान्गन च्य तह्सिल्दर सपदले १ कोट चि लाच घेताना (सचिव / आयूक्त ह्या हीशोबाने १०० / २०० कोट घेत असले पहिजेत)
18 Aug 2020 - 7:56 pm | सुबोध खरे
ह्या वर तर काहिच कोनि बोलताना दिसत नहिये
Narendra Modi puts population back on government agenda
https://www.thehindu.com/news/national/narendra-modi-puts-population-bac...
AUGUST 16, 2019
Centre gets moving on population control law
https://www.sundayguardianlive.com/news/centre-gets-moving-population-co...
January 25, 2020
https://edtimes.in/10-points-you-need-to-know-about-the-proposed-populat...
August 10, 2020
आता यावर परत शाहीन बाग बसणार काय?
धार्मिक आणि आचार स्वातंत्र्यावर घाला
18 Aug 2020 - 8:21 pm | Gk
कायदा करून मग 130 कोटी लोक 2020 साली सुधारणार.
आमचा नेहरू लई भारी.
2 पेक्षा जास्त अपत्ये असतील तर इलेक्शन लढता येत नाही , हा कायदा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे ना ?
18 Aug 2020 - 8:27 pm | Gk
महापौर हारुण शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपविल्याचा आरोप आसिफ बावा यांनी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. यासंदर्भातील तक्रार त्यांनी आज दाखल केली. शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपवून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
शासकीय निर्णयानुसार तीन अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र असतानाही त्यांनी अपत्याबद्दल माहिती लपवून अर्ज दाखल केला आहे. तो रद्दबातल ठरवावा, अशी मागणी आसिफ बावा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
https://m.lokmat.com/sangli/sangli-municipal-election-mayor-shilkhedars-...
18 Aug 2020 - 8:48 pm | Rajesh188
नेहरू म्हणजे देश नाही.
लोकसंख्या वाढ ही गंभीर समस्या आहे हे मान्य आहे पण त्याची कारणे काय आहेत ह्याचा पण विचार करा.
पाहिले लोकसंख्या हा प्रश्नच नव्हता जेव्हा नेहरू होते देशाची लोकसंख्या30 ते पस्तीस करोड असेल.
मेडिकल सायन्स मध्ये झालेली सुधारणा मुळे लोकांची आयुष्य वाढलं.
पाहिले 10 मुल सरासरी एका स्त्री ल असायची पण ते सर्व जगत नसतं त्या मधील 3 ते 4 च जगायची .
मेडिकल मध्ये नवीन शोध लागल्या मुळे बाल मृत्यू चे प्रमाण घटले .आणि म्हाताऱ्या लोकांचे प्रमाण वाढले.
अजुन सुद्धा लोकसंख्या वाढ हा देशाचा प्रश्न नाही .
भ्रष्टाचार, हाच देश समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो नष्ट झाला तर देश ह्या लोकसंख्या सहित उत्तुंग भरारी मारेल.
18 Aug 2020 - 9:21 pm | शाम भागवत
राजेशभौ, नेहरूंची पत्नि ३७ व्या वर्षीच गेली. त्या अगोदरही त्या आजारीच होत्या. इंदिरा गांधींना दोन मुल झाल्यावर त्यांनी नवऱ्यापासून विभक्त रहायला सुरवात केली. हे सगळं लक्षात घेऊन उत्तरे द्या!
जीके उर्फ कूलगाय वगैरेंना चर्चा करायला, वाद घालायला आवडते. त्यामुळे ते एखादा स्फोटक विषय गळाला आमिष लावल्यासारखे लावतात व नंतर मासा गळाला लागायची वाट बघत बसतात. हा पेशन्सचा खेळ आहे. त्यांच्याकडे खूप पेशन्स आहे. जर मासा गळाला नाही लागला तर शांतपणे दुसरे आमिष गळाला लावतात.
तुमच्याकडे खूप पेशन्स असेल आणि त्यांनी काहीही लिहिलं तरी तुम्हाला राग न येता तुम्ही प्रतिवाद करू शकत असाल तसेच तरच भाग घ्या.
;)
हा विषय खूप भरकटू शकतो व भाषापण खूप खालावली जाण्याची शक्यता आहे. खूप उदाहरणे दोन्ही बाजूंनी देता येतील, हे लक्षात घेऊन प्रशासकांना विनंती केली होती. पण असो.
18 Aug 2020 - 10:29 pm | शा वि कु
भारी लिहिलंय
20 Aug 2020 - 8:57 pm | शाम भागवत
अहो, जीके उर्फ कूलगाय यांचा व्यासंग खूप मोठा आहे. त्यांना खूप माहिती आहे व ती त्यांना वेळेवर आठवते सुध्दा! ते काय असे तसेच नाहीत. शिवाय त्यांची भाषा खूपच लवचीक आहे.
म्हणून जरा राजेशभाऊंना सावध केले.
:)
20 Aug 2020 - 9:52 pm | Gk
मी कुलगाय नाही
तो मी नव्हेच
20 Aug 2020 - 9:58 pm | शाम भागवत
ओके.
जीके आणि कुलगाय
:)
18 Aug 2020 - 11:08 pm | Gk
पोरे मरत होती म्हणून 7 काढत होते,
छान लॉजिक आहे,
मग बायका मरत होत्या म्हणून 4 लग्ने करत होते म्हणून लॉजिक दिले तर ?
18 Aug 2020 - 11:16 pm | Rajesh188
अनेक बायका करण्याची पद्धत पहिली सर्व धर्मात होती.
काळा नुसार बदल होत गेला .
18 Aug 2020 - 6:14 pm | धर्मराजमुटके
या प्रश्नाची चार उत्तरे आहेत.
१. काही लोक हिंदुत्त्ववादी सरकार असल्यावर सुखी असतात.
२. काही लोक काँग्रेसचे राज्य आले की सुखी होतील.
३. काही लोक कोणाचेही राज्य असले तरी सुखी असतात.
४. काही लोक कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी कधीच सुखी नसतात.
आपण कोणत्या पर्यायात बसतो त्याप्रमाणे सुखी व्हावे. सर्वकाळ सगळे सुखी राहू शकत नाहीत. रामदास स्वामींचा " जगी सर्व सुखी असा कोण आहे ? विचारी मना तुच शोधूनी पाहे" हा श्लोक कधी कानावरुन गेला आहे काय ? किंवा गेला बाजार सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट ऐकण्यात आली आहे काय ?
18 Aug 2020 - 8:36 pm | Rajesh188
इथे नेहरू,मोदी चा विषय चालला नाही .
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे.
पाहिले सामान्य लोक किंवा पूर्ण जनता सुखी होण्यासाठी काय आवश्यक आहे ह्या वर विचार करायला हवा.
1) न्याय व्यवस्था अतिशय कठोर,जलद,आणि न्याय निष्ठुर असावी .
तिथे कोणताच भेदभाव केला जाणार नाही.
2) प्रशासन कार्य तत्पर,भ्रष्टाचार मुक्त आणि कायद्याला आणि जनतेला बांधील हवं.
कायद्या शी विपरीत काम करणाऱ्या व्यक्ती ला फाशी सारखी शिक्षा असावी आणि लगेच.
आर्थिक गैर व्यवहार आणि खून हे गुन्हे एकाच दर्जाचे समजले जावेत.
3) पायाभूत सुविधा पूर्ण देशात निर्माण असाव्यात.
4) वीज,पाणी,रस्ता ह्या प्राथमिक गरजा भागवल्या जाव्यात
5) कोणत्याच व्यक्तीचे कोणत्या ही प्रकारचे शोषण होवू नये.
18 Aug 2020 - 9:03 pm | आर्यन मिसळपाववाला
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे. - एक्दम बरोबर आशय बोलला आपन..
सर्वकाळ सगळे सुखी राहू शकत नाही - अश्या भ्रामक कल्पना मधे नको रहायला.
१. न्याय व्यवस्था अतिशय कठोर,जलद - अगदि खरे
२. पायाभूत सुविधा - सहमत
३. वीज,पाणी,रस्ता ह्या प्राथमिक गरजा - सहमत
४. शोषण होवू नये - सहमत
५. प्रशासन कार्य तत्पर,भ्रष्टाचार मुक्त आणि कायद्याला आणि जनतेला बांधील हवं - सहमत
वरिल यदि मधे भर द्वयावि.
18 Aug 2020 - 10:21 pm | शा वि कु
६) त्यात स्विमिंग पूल आणखी गोल्फ कोर्ट दोन्ही असावं.
आपली छोटीशी भर :-)) (ह.घ्या प्लिज्ज)
18 Aug 2020 - 10:37 pm | Rajesh188
पक्षीय वेठबिगारी जी रक्तात आहे जी नष्ट होईल तो सुदिन.
नाही तर आशिया खंडातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती ला मिळणारे सुख मिळण्याची अपेक्षा samanta लोकांना आहे .
असा विचार पक्षीय अफु सेवन केल्या शिवाय मेंदूत निर्माण होणार नाही
18 Aug 2020 - 11:19 pm | Gk
काँग्रेस अमुक धर्माला साथ देते , मत ब्यांकेसाठी लोकसंख्या नियंत्रण ठेवत नाही,
अशी जहाल भाषा व मते असलेले लोक आता , बिचारे लोक , 10 मधली 4 च जगत होते हो , म्हातारे जास्त जगताहेत , रोगराई हटली , ही कारणे देताहेत , हे अगदी मनोरंजक आहे
आणि बाळ मृत्यू कमी झाले , माणसे जगू लागली , रोग कमी झाले , सोयी वाढल्या, हे आता 2014 नंतर लिहून लोकसंख्येचे जस्टीफिकेशन देताहेत
आणि परत काँग्रेसने 60 वर्षात काय केले , हेही विचारत असतात,
-------
अमित शहा एम्स मध्ये एडमित झाले म्हणे , फुकट एक सामान्य माणसाची सीट अडवली, आमचे काँग्रेसवाले हुशार , म्हणूनच फॉरिणात उपचार घ्यायला जातात
18 Aug 2020 - 11:34 pm | Rajesh188
पक्षीय राजकारण शी संबंधित हा विषय जोडला तसे भारताची सर्वात मोठी हानी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केली आहे .
Bjp aani उजव्या पक्ष नसते तर हा देश नष्ट झाला असता.
19 Aug 2020 - 6:40 am | अर्धवटराव
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
--> प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडणे म्हणजे काय असते याची कल्पना आहे का तुम्हाला ?
--> पराकोटीच्या छिन्नविछीन्न राज्यव्यवस्थेतुनआणि परकीय गुलामगिरीच्या जोखडातुन मोकळी झालेली जनता आज लोकशाही व्यवस्थेची ७ दशकं प्रॅक्टीस करते आहे.
3. बेफिकीर सामान्य माणूस
--> त्यात नवल काय आहे? आणि कोणि सांगितलं सामान्य माणसाला बेफीकीर राहायला ?
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
--> हे आपलं सामाजीक सत्य आहे
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
--> त्यात काय प्रॉब्लेम आहे?
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
--> हे आवडतं ना आपल्याला ?
7. परदेशी स्थायिक नागरिक
--> त्यात काय प्रॉब्लेम आहे?
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
--> चालायचच
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
--> हा फॅक्ट जगाच्या इतीहास, वर्तमान, आणि भविष्यात नेहेमीच राहणार आहे.
ज्या परिस्थीतीत शिवरायांनी स्वराज्य स्थापलं, टिळकांनी पुनःश्च हरि ओम म्हटलं, गांधींनी छातीवर गोळ्या झेलल्या, नरसींहरावांनी अर्थव्यवस्था मोकळी केली, वाजपेयींनी कारगील युद्ध जिंकलं, मोदिंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंच करायला कंबर कसली... त्यापेक्षा परिस्तीती नक्कीच चांगली आहे ना ? मग रडायचं कशाला?
24 Aug 2020 - 5:15 pm | राजाभाउ
उत्तम प्रतिसाद.
एका वाक्यात तुम्ही यतार्थ वर्णन केले आहे. आतशी सुरुवात आहे हो, लोकशाही आपल्यात रुजणार, प्रगल्भ होणार मग परिपक्वते कडे जाणार. आपल्या पेक्षा शे दोनशे वर्षे आधी लोकशाही किंवा तत्सम व्यवस्था असणार्या देशां शी तुलना करण्यात काय अर्थ ?
येव्हडी प्रचंड लोकसंख्या, विवीधता असून पण आपण अजुन एकसंध देश म्हणुन टिकुन आहोत, हिच मोठी कामगिरी म्हणली पाहिजे. या सगळ्या परीस्थीत आपण हळुहळुच पुढ सरकणार, खेचाखेची चालूच रहणार. त्यामूळ आपण ७० वर्षात काय साध्य केलं ते पाहील पाहीजे.
काय चुकतय, काय सुधारल पाहीजे , हे जरूर पाहील पाहीजे, आणि कुठल्या पक्षाच काय चुकल किंवा बरोबर हे बघायला काही हरकत नाही पण हे लक्षात ठेवल पाहीजे कि सगळ्या पक्षात इथलीच गुणदोषउक्त माणस असणार, काही उत्तुंग तर काही खुजी. आपल्याला शक्य आहे ते जरूर करावे पण रात्रित काहीतरी अमुलाग्र बदल होइल असा भाबडे पणा बाळगण्यात काहीच अर्थ नाही
19 Aug 2020 - 1:59 pm | मराठी_माणूस
एक माफक अपेक्षा : कोणत पक्ष अवाजवी टोल बंद करु शकतो
19 Aug 2020 - 2:01 pm | मराठी_माणूस
एक माफक अपेक्षा : अवाजवी टोल बंद करणे , खड्डे मुक्त रस्ते. हे अजुन पर्यंत झाले नाही. सरकार बदलले तरीही.
19 Aug 2020 - 3:46 pm | चौकटराजा
खरे तर मोदी हा विषय या चर्चेत आणल्याबद्द्ल मी प्रथम माफी मागतो. मोदी यानीच असा एक देखावा उत्पन्न केला होता की देशाला आमूलग्र बदलायची ताकद पी एम या पदात आहे व ती वापरण्याची पूर्ण आकांक्षा त्यान्च्यात आहे. सहा वर्षात ते नुसते बसून आहेत असे नव्हे पण भारतीय माणसात आमूलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात मात्र ते दिसत नाहीत. एक उदाहरण देतो. हेल्मेटची सक्ती फक्त वेगवान रस्त्यावर करा व देशातील स्पीड ब्रेकर या साठी एक ठोस अशी नीती तयार करा हे दोन विषय किती साधे आहेत यावर त्यानी कधी काही केले आहे का...? मन्दिर ,३७०, तीन तलाक हे विषय सामान्य माणसाला अधिक जवळचे की कसे याचे भान दुर्दैवाने आजही दिसत नाही !
19 Aug 2020 - 4:04 pm | मराठी_माणूस
अगदी बरोबर.
19 Aug 2020 - 4:22 pm | Gk
रस्ते खड्डे वाहतूक हे राज्याचे विषय आहे
20 Aug 2020 - 1:23 pm | बाप्पू
रस्त्यांच्या बाबतीत सहमत.
किती सरकारे आली आणि गेली. पण रस्ते आणि त्यांची quality कधीच सुधारली नाही.
सर्व रस्ते थोड्याश्या पावसाने वाहून जातात. टोल चा झोल तर संपतच नाही... याबाबत ज्या ज्या लोकांनी आवाज उठवले ( माहिती अधिकार कायद्या च्या मदतीने ) त्यापैकी बऱ्याच लोकांचे संशयास्पद मृत्यू झालेत.
20 Aug 2020 - 6:42 pm | Rajesh188
एक रस्त्यांची काम कशा पद्धतीने दिली जातात हे जगजाहीर आहे.
इथे कॉन्ट्रॅक्टर चा दोष नाही प्रत्येकाला कमिशन द्यावे लागते.
परत payment मिळण्यासाठी पण पैसे द्यावे लागतात.
पण ह्या सर्वामधून राहिलेल्या पैश्यात अजुन नफा मिळवण्यासाठी सामान निकृष्ट दर्जाचे वापरले जाते.
कसे रस्ते टिकणार.
पंचायती पासून राज्य सरकार पर्यंत एकच पद्धत आहे.
पण कुंपण च शेत खायला लागल्यावर काय करणार.
आर्थिक गुन्हा हा गंभीर शिक्षेस पात्र खरे तर असायला हवा.
खून आणि आर्थिक गैरव्यवहार हे दोन्ही गुन्हे सामान पातळीवर गंभीर आहेत.
22 Aug 2020 - 9:27 pm | कानडाऊ योगेशु
स्वच्छ भारत अभियानाने होत असलेला बदल दिसतोय.
रोज सकाळी कचर्याची गाडी फिरते आणि घराघरातुन कचरा गोळा केला जातोय.
ह्या अभियानात त्रुटी असतील व अन्य काही समस्याही असतील पण आज एक जनजागृती झाली आहे हे निश्चित. मोदी सरकारने स्वच्छतेला निश्चितच अग्रभागी (फोरफ्रन्ट) आणले आहे.
23 Aug 2020 - 12:14 am | संजय क्षीरसागर
सर्व देशाकडून स्वच्छता अभियान सेस वसूल केला गेला त्यातून खेडेगावात टॉयलेटस बांधल्या आणि गावं स्वछ झाली, स्त्रीयांची सोय झाली असली फेकूगिरी मोदींनी नेहेमी प्रमाणे केली. कोट्यावधी रुपये स्वतःचा फोटो असलेले बॅनर्स लावून आणि सेलिब्रिटी अँकर्सला देऊन उधळले. पण मूर्खपणाची हद्द अशी की खेडेगावातल्या टॉयलेट्सना पाण्याची सोयच केली नाही. परिणामी त्या टॉयलेट्स पूर्णपणे निकामी झाल्या आहेत आणि गावात परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे.
एकदा स्वच्छता अभियान सेस वसूल केल्यावर शहरातल्या सार्वजनिक टॉयलेटस स्वच्छ होणं आणि स्त्रीयांची सोय होणं हे सरकारचं काम होतं. तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या स्त्रीया अशा सार्वजनिक स्वच्छता गृहात कधी गेलात का याचं उत्तर इथे सांगा ? काहीएक फरक नाही, सगळी जैसे थे परिस्थिती आहे.
थोडक्यात, स्वच्छता अभियान सेस अजूनही आपण भरतो, पुन्हा वर प्रत्येकी महिना ७५ रुपये देऊन कचरावाले हायर करावे लागतायंत. वास्तविकात ही जवाबदारी कॉर्पोरेशनची आहे.
23 Aug 2020 - 12:19 am | कानडाऊ योगेशु
अंमलबजावणी करणे हे व्यवस्थेचे काम आहे आणि मी लिहिल्याप्रमाणे ह्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. पण कचरा व्यवस्थनाबाबतीत लोकांच्या मानसिकतेत बदल घडला आहे. आजकाल सर्रास रस्त्यावर कोणीही कचरा टाकणे तितकेसे दिसत नाही. बाकी चालु द्या.
23 Aug 2020 - 12:30 am | संजय क्षीरसागर
करोडो रुपये वसूल करुन तुम्ही जर सार्वजनिक टॉयलेटमधे जाऊ शकत नसाल आणि स्त्रीयांची गैरसोय कायम असेल तर काय घंटा फरक पडला देशाच्या हायजिन स्टँडर्डसमधे ? आणि खेडेगावातल्या सर्व टॉयलेटस निकामी झाल्यात तर तो पैसा पाण्यात गेला नाही का ?
लोकांची मानसिकता केवळ भाषणबाजीनं बदलत नाही त्यासाठी तशा सोयी उपलब्ध असाव्या लागतात इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का ?
23 Aug 2020 - 12:50 am | अथांग आकाश
या विधानाच्या पुष्टीसाठी काही पुरावा? माफ करा काही दस्तऐवज पुरवाल का महोदय?
स्वगत: लोकांना नीट वाचायला - लिहायला शीका - अभ्यास करा असे सल्ले देणार्याने निराधार- भंपक विधाने करण्यापुर्वी थोडा विचार करायला नको का?
23 Aug 2020 - 1:30 am | संजय क्षीरसागर
3 Crore Toilets But Not Enough Water.
शिवाय एनडिटीवीनी या सर्व प्रकल्पाचा गावोगावी जाऊन पोस्ट इंप्लिमेंटेशन मागोवा घेतला आहे. रविश कुमारची ही संपूर्ण स्टोरी तुम्ही एनडिटीवीवर बघू शकता.
हे पण वाचा : Open defecation continues हा २७ नोव्हेंबर २०१९ चा बिबिसी रिपोर्ट आहे.
२.
काहीही अभ्यास नसतांना परत अशी विधानं करायचं धाडस करु नका.
23 Aug 2020 - 1:02 am | Rajesh188
माझे घर गावात सुद्धा आहे आणि प्रतेक महिन्याला मी 2 ते3 दिवस तरी गावी असतो.
गवि घरा घरात संडास ची योजना होती आणि त्या साठी सरकारी अनुदान दिले जायचे.
गवि प्रत्येकाच्या घरात संडास आहे .
खेडेगावातील संडास निकामी झालेत हे तुम्ही कोणत्या आधारावर बोलत आहात.
सार्वजनिक संडास हा प्रकार गाव खेड्यात नाही.
एक तर तुम्हाला काहीच माहिती नसते किंवा सर्वांना पेक्षा जास्त माहीत असते.
मुंबई सारख्या शहरात जी सार्वजनिक संडास आहेत त्याची साफ सफाई ची जबाबदारी bmc ni खूप वर्षा पासून घेतली आहे.
संडास ची संख्या आणि ते संडास वापरणाऱ्या लोकांची संख्या ह्या मध्ये असलेल्या व्यस्त प्रमाण मुळे ती स्वच्छ ठेवणे अशक्य आहे
23 Aug 2020 - 1:32 am | संजय क्षीरसागर
.
23 Aug 2020 - 12:31 am | कानडाऊ योगेशु
>>तुमच्या घरातल्या स्त्रीया अशा सार्वजनिक स्वच्छता गृहात कधी गेलात का याचं उत्तर इथे सांगा ?
होय.माझ्या घरातल्या एका स्त्रीने ह्या शौचालय बांधणीच्या कामात अधिकारी म्हणुन काम केले आहे आणि त्यामुळे ह्यातील समस्या मी पुरेपुर जाणुन आहे.
23 Aug 2020 - 12:47 am | संजय क्षीरसागर
पण विषय बांधकामाचा नाही.
तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया सध्या सार्वजनिक टॉयलेटस वापरता का ? इतके करोडो रुपये वसूल करुन तिथे उत्कृष्ठ हायजेनिक स्टँडर्डस ठेवणं ही जवाबदारी सरकारनं घेतलीये का ? थोडक्यात, परिस्थिती जैसे थे आहे का बदलली ?
25 Aug 2020 - 4:47 pm | स्वलेकर
तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया सध्या सार्वजनिक टॉयलेटस वापरता का ? - हो. आमच्या गावात सगळ्यांच्या घरात टॉयलेटस सरकारी याजनेतून बांधले गेले आहेत.
इतके करोडो रुपये वसूल करुन तिथे उत्कृष्ठ हायजेनिक स्टँडर्डस ठेवणं ही जवाबदारी सरकारनं घेतलीये का ? - हे मला माहित नाहि. पण टॉयलेटस स्वच्छ ठेवणे हि मा़झि जबाबदारि.
थोडक्यात, परिस्थिती जैसे थे आहे का बदलली ? - माझ्या मता प्रमाणे खुप बदललि आहे.
25 Aug 2020 - 6:06 pm | शाम भागवत
शेखर गुप्ता यांनी २०१९ च्या निवडणुकींनंतर एक मुलाखत दिली होती. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की मोदी विरोधकांना मोदींनी केलेले काम, दिसत असूनही पहावयाचेच नव्हते!!!<\a>
ही मुलाखत सकाळने पण मराठीत अनुवाद करून छापली होती.
त्यामुळे होतंय काय की, मिडियामधे मोदी अप्रिय आणि लोकांत प्रिय!!! पण त्यातून कोणि शिकत नसेल तर त्यामुळे त्यात मोदींचे नुकसान नसून फायदाच होतो.
:)))))
25 Aug 2020 - 6:31 pm | शाम भागवत
काॅंग्रेसने ज्या कल्याणकारी योजना आत्तापर्यंत आणल्या होत्या त्यावर लोकांचा विश्वास नव्हता.
याउलट मोदींनी आणलेल्या योजना यशस्वी होत असूनही, त्या कशा अयशस्वी होत आहेत याचे पुरावे शोधण्यात आम्ही व्यस्त होतो. पण आम्हाला पुरावे मिळत नव्हते.
घरात गेल्यावर आम्हाला नव्याने मिळालेले गॅस सिलेंडर दिसत होते. पण आम्हाला ते पहावयाचे नव्हते.
मुद्रा लोन हा मोठा घोटाळा असणार, हे वाटप फक्त कागदावरच झालेले असणार, असेच आम्ही समजत होतो. पण आजमगढ पासून ५० किमीवरच्या गावातल्या दलिताने “मला ₹५०००० मिळाले व त्यातून मी दुकान थाटले. मी ₹१३०० चा हप्ता भरतो. हप्ता चुकला तर बॅंकेचा मॅनेजर कोणाला तरी काय झालंय हे पाहायला पाठवतो.” असं सांगितल्यावर मी चक्रावलो. परत आल्यावर मी मग तो मोठा डाटाच तपासायला घेतला.४.८१ कोटी लोकांना २.१ लाख करोड दिले गेले होते.
हे सर्व पैसे प्रत्येकाच्या खात्यात जमा झालेले होते. खरोखरचे वाटप झालेले होते. पण आम्हाला ते पहावयाचेच नव्हते!
लोकांना काॅंग्रेसच्या काळातील लोककल्याणाच्या योजना व त्याची अंमलबजावणी माहीत होती.
त्यांनी मोदींच्या योजना व त्या योजनांची अंमलबजावणी अनुभवली.
दोन्हीतला फरक त्यांना जाणवला.
त्याचे प्रतिबिंब २०१९ च्या लोकसभा मतदानात पडले.
25 Aug 2020 - 6:57 pm | शाम भागवत
अवांतर:
अगदी असंच केजरीवाल याच्या बाबतीत झालेले असणे शक्य आहे.
केजरीवाल याच्या विरोधकांना त्यांनी केलेली कामे पहावयाची नसावीत.
अर्थात हे माझे तर्कावर आधारित विधान आहे. खखोदेजा.
25 Aug 2020 - 7:15 pm | Rajesh188
दिल्ली मध्ये असंख्य समस्या आहेत आणि केजरीवाल ते सोडवू शकले नाहीत.
राष्ट्रीय राजधानी असल्या मुळे मीडिया जास्त इज्जत काढत नाही.
सर्व दिल्लीत नळाद्वारे पाणी पुरवठा नाही,
कायदा आणि सू व्यवस्था चे नेहमी बारा वाजलेले असतात.
गलिच्छ वस्त्या खूप आहेत.
मीडिया सांगते केजरीवाल नी चांगले काम केले हे काही खरं नाही
25 Aug 2020 - 9:39 pm | शाम भागवत
अर्र...
माझं केजरीवालांबद्दलचे ते वाक्य गणेशा साठी होते.
19 Aug 2020 - 9:35 pm | Rajesh188
गल्ली पातळीवर,गाव पातळीवर,जिल्हा पातळीवर,राज्य पातळीवर लोकांची संघटना हवी .
आणि ह्या संघटना कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंधित नकोत.
लोकशाही देशात अशा संघटना असल्याचं पाहिजेत तरच राज्य करते,प्रशासन ह्या वर दबाव निर्माण करता येईल आणि लोकहिताचे निर्णय घेणे ही त्यांची majburi होईल.
आपल्या राज्य विषयी बोलायचे झाले तर लोकांची संघटना म्हणून अत्यंत आक्रमक अशी शिवसेना ही योग्य संघटना होती पण ते राजकारणात गेले
अण्णा हजारे ह्यांनी चांगली लोक जागृती केली होती पण त्या स्थिती चा फायदा घेवून केजरीवाल राजकारणात गेले मुख्यमंत्री झाले राजकारणी झाले.
एक राज्यपाल झाली.
सक्रिय लोकांची बिगर राजकीय संघटना खूप महत्त्वाची आहे.
19 Aug 2020 - 10:39 pm | आर्यन मिसळपाववाला
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे.
@ Rajesh188 - आपले सगले मुद्दे चान्गले आहेत, सविस्तर सान्गा.
19 Aug 2020 - 10:49 pm | Rajesh188
एक बिल्डिंग म्हणून सर्व रहिवासी एकत्र आले,
एक गाव म्हणून सर्व गावकरी एक झाले .
तर कोणतेच प्रशासकीय अधिकारी तुमचे शोषण करणार नाहीत.
असे च देशभर घडले तर काय हिम्मत आहे कोणाची अन्याय करण्याची.
पण राजकीय मत बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
कोणताच राजकीय पक्ष तुमचा नाही तुम्ही एकजूट होवून त्यांना मजबूर करणे गरजेचे आहे.
19 Aug 2020 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
आता सांगा ज्या राममंदीराचा तुम्ही इथे (देवाचं नांव कुणी ठेवलं ?) इतका जोरदार डंका पिटला त्यानं `सामान्य माणसाचं आयुष्य ' नक्की कसं सुखकर होणार आहे ?
20 Aug 2020 - 5:49 pm | वामन देशमुख
मिसळपाव मालकास नम्र विनंती,
राष्ट्रीय श्रद्धेला ठेच पोहोचवू पाहणा-या संजय क्षीरसागर या आयडीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
20 Aug 2020 - 6:47 pm | Gk
एकमेकांच्या धर्मस्थळांचा सन्मान राखावा.
गेले वर्षभर चीन मध्ये मशिदी पाड , कुराणवर बंदी घाल , असले अचाट प्रकार सुरू होते
अन जणू काय पापाची सजा मिळावी तसा करोना आला
20 Aug 2020 - 8:21 pm | संजय क्षीरसागर
With the Forty-second Amendment of the Constitution of India enacted in 1976, the Preamble to the Constitution asserted that India is a secular nation.
A secular state is an idea pertaining to secularity, whereby a state is or purports to be officially neutral in matters of religion, supporting neither religion nor irreligion
20 Aug 2020 - 8:34 pm | शाम भागवत
आणिबाणिच्या काळातील घटना दुरूस्ती आहे होय. मग बरोबर आहे. कोणाची काय बिशाद होती वेगळं मत मांडायची.
पण ते असो.
ही दुरूस्ती काढून टाकण्यासाठी परत आणिबाणी आणायला लागेल का?
20 Aug 2020 - 8:41 pm | संजय क्षीरसागर
धर्माच्या नांवाखाली विभाजन कशापायी ? धर्म ही व्यक्तिगत आणि घरगुती बाब असायला हवी.
20 Aug 2020 - 8:48 pm | शाम भागवत
सर्व धर्म सारखे अजिबात नाहीत.
सर्व माणसे सारखी आहेत म्हणून सर्वांना समान कायदा असावा.
धर्माच्या आधारावर वेगवेगळे कायदे करून त्या आधारे विभाजन करू नये.
वेगळेपण जे काय जपायचे असेल ते घरात जपावे.
21 Aug 2020 - 4:52 am | चौकस२१२
SURE AND THE DEFINITION OF SECULARISM?
ONE COMMON civil LAW FOR ALL
not
Law based on each religion!
You forget to mention this major diff the way secularism is interpreted in Bharat
20 Aug 2020 - 8:54 pm | Rajesh188
भारत हा देश धर्म निरपेक्ष आहे मग धार्मिक अल्पसंख्याक म्हणून वेगळे कायदे का आहेत.
शिक्षण संस्था धार्मिक अल्पसंख्याक म्हणून वेगळे नियम,का?
धार्मिक यात्रे साठी अनुदान का?
हज यात्रा,अंबरनाथ यात्रा.
इथे धार्मिक अल्प सांख्याक आहेत,
जाती जाती साठी वेगळे कायदे आहेत.
समाजात सर्वात जास्त. भेदभाव काँग्रेस नी जोपासला हे सत्य च आहे.
मुस्लिम रस्त्यावर नमाज पडू शकतात पण हिंदू च वर्षातून एकदा येणाऱ्या सणाला आक्षेप घेतला जातो
नमाज,आणि pray च्या वेळेस त्यांचे धर्म गुरु धार्मिक भावना चेतवतात त्याला कोणाचा विरोध नाही पण एकदा indolikar समाज प्रबोधन करत असेल कोणताच धार्मिक द्वेष पसरवत नसेल तो व्यक्ती इथे गुन्हेगार ठरवला जातो
कुठे आहे धर्मनिरपेक्ष पना.
20 Aug 2020 - 9:46 pm | Gk
सरकार हजला अनुदान देते , ते बंद झाले ना ?
हिंदू यात्रानाही मदत करते , जास्त गाड्या सोडते , रस्ते करून देते , आरोग्य केंद्र , पोलीस , स्वयंसेवक , भक्त निवास वगैरे व्यवस्था करते , रेडिओ , टीव्ही वर रामायण लावते , रोज सकाळी भूपाळी लागते , स्थानिक प्रशासन नैवेद्य , प्रसाद वगैरे देते, कॅलेंडरात लाल सुट्ट्या देते, शनिवारच्या सुट्टीच्या शुभेच्छा , मोदक खा घरी
का उगाच काँग्रेस काँग्रेस करताय ?
20 Aug 2020 - 9:49 pm | Gk
शाळेत संस्कृत विषय शिकवतात
20 Aug 2020 - 9:55 pm | Rajesh188
संस्कृत प्राचीन भाषा आहेच आहेच आणि सर्वात प्राचीन भाषा पण आहे.
ती नाही शिकवणार तर कोणती भाषा शिकवणार ?
20 Aug 2020 - 11:11 pm | Gk
मीही तेच म्हणतोय
संस्कृत शिकायची अन शिकवायची सोय काँग्रेसने केली होती , मग इतके सगळे करून काँग्रेस हिंदू विरोधी कशी ?
20 Aug 2020 - 9:58 pm | Rajesh188
रामायण,महाभारत,ही ह्या देशाची प्राचीन संस्कृती आहे..
गौतम बुद्ध हे सुद्धा भारताचे वैभव आहे त्यांचं सुद्धा भारतीय ना गर्व आहे.
पण जे नुकतेच तिकडे गेले आहेत आणि त्यांना गौतम बुद्ध समजले नाहीत ते थोडे भरकटले आहेत..
20 Aug 2020 - 10:20 pm | बाप्पू
ज्यांना आपले पूर्वज कोण हे समजले नाही त्यांना संस्कृत आणि संस्कृती काय समजणार..
21 Aug 2020 - 6:10 am | Gk
तुम्हाला तरी तुमचे पूर्वज कुठे माहीत आहेत ?
शुद्धोधन राजा आणि गौतम बुद्ध हेही रघुवंशातच जन्मले
मग तुम्ही अयोध्येत बुद्ध विहारही बांधायला हवा
21 Aug 2020 - 6:39 am | बाप्पू
ती 5 एकर दिलीये ना तिकडे काय बांधायचं ते बांधा..
अयोध्येत काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ.. त्याचे सल्ले तुम्ही देण्याची तुमची कुवत नाही.
21 Aug 2020 - 11:08 am | Gk
तुमची कुवत आहे तेच तुम्ही 10 हजार वर्षे बांधत आला आहात , पुढेही बांधा
20 Aug 2020 - 10:44 pm | Rajesh188
ह्या लोकांना ना देशाचा गर्व (कसा ही असला तरी माझा देश आहे)
ना संस्कृती चा गर्व.
ना रिती rivaj विषयी ज्ञान.
ह्यांना परकीय आक्र मक प्रिय
काय समजावणार ह्या लोकांना
20 Aug 2020 - 11:09 pm | Gk
देशाचा गर्व नाही हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवले ? तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? कुठे मिळते ते ?