डॉक्टर की कंपाउंडर
काल एका मुलाखतीत शिवसेनेचे सर्वात महत्वाचे तोंड ( म्हणजे प्रवक्ते) हे नक्की काय बोलतात हेच समजत नाहीत.
ते बोलल्यामुळे शिवसेनेचे सरकार आले हे नक्की. त्यावेळेस संजय राऊत इतके बोलले की त्यामुळे शिवसेना फुटतेय की काय इतकी शंका आली होती
पण त्यांनी आपला मुद्दा मागे घेतला नाही. आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले . हा खरे तर चमत्कारच होता.
पण संजय राउतंनी त्या नंतर करोना आणि सुशांत सिंग या बाबतीत अनेक उलटसुलट उड्या मारल्या.
त्यांच्या बोलण्यात कसलीही संगती नसते. पण सनसनाटी असते. राज्यसभेचे सदस्य असलेले संजय राउत त्यांचा शहाण्पणा विसरलेत की तो त्यांना अगोदरपासूनच नव्हता अशी शंका येतेय. या असल्या माणसाला आपण जनतेचा प्रतिनीधी आहोत हे तरी समजते का? आणि आपले नेते हे असे आहेत याची लाज वाटायला लागते.
बरे ते इतकी पोरकट भाषा वापरतात याची त्यांना कधीच लाज वाटणे सोडा पण कधी खेदही वाटत नाही.
दोन वर्षांपूर्वी सामना च्या एका अग्रलेखात अजित दादा पवारांना " मुतर्या तोंडाचे अजित दादा" असे म्हणाले होते ही भाषा अर्थातच अश्लाघ्य आहे.
याच अग्रलेखात त्यांनी अजित पवारांना " गटारी किडा' रिकामी खोपडी असेही म्हंटले आहे.
https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shivsena-president-uddhav-thackeray-ayodya-tour/
https://youtu.be/qbO9SkWHLfQ?t=18
अर्थात बाळासहेब ठाकर्यांकडून " स्वतःची मैद्याचे पोते आणि बारामतीचा म्हमद्या " अशी अवहेलना आनंदाने सहन करणार्या शरद पवारांना त्यात काहीच वाटले नव्ह्ते हे पुढे दिसून आलेच.
अत्यंत हिडीस भाषा हे संजय राउतांचे वैशिष्ट्य आहे. त्याची त्यांना अर्थातच काहीही लाज नाहिय्ये.
राजकारण सोडून ते कोणत्या प्रांतात शिरतील हेही सांगता येत नाही.
म्हणातात की डॉक्टर पेक्षा कम्पाउम्डरला जास्त कळते. डब्ल्यू एच ओ या जागतीक संस्थेवरही त्यांनी अशीच मूर्खपणाची कॉमेंट केली आहे.
याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सर्वत्र पसरतोय.
या अशा मूर्ख माणसाला मराठी जनता का सहन करतेय तेच कळत नाहिय्ये.
अशा मूर्ख आणि तोंडाळ लोकांचे काय करायचे जनतेला ठरवायचे स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळेल तोच खरा स्वातंत्र्यदिन असेल.
वर्गीकरण
वाचने
6610
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
राउत हे राज्यसभेचे सदस्य आहेत
पर्याय काय?
हा तर जनतेवर बलात्कार
.
भारतात जी राजकीय सस्कृति आहे
--
अहो कुठे लक्ष देताय?
उधोजी ठाकरे= डॉक्टर
छान
In reply to छान by Gk
हवापुवा :) :)
In reply to छान by Gk
:))