मंदीने अमेरिकेचा गळा काय आवळला, अमेरिका एकदम जमीनीवर आली, आपल्या पैशाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ओबामा ने अनेक पाऊले उचलायला सुरवात केली व त्याच बरोबर भारतात सार्वजनिक निवडणूकीचे वारे वाहू लागले होते, व ओबामाला एक महत्वाचा मुद्दा कळाला जो मुद्दा भारतात राजीव गांधीच्या बोफोर्स लफड्यापासून शेबंड्या पो-याला ही माहीत आहे तो म्हणजे स्वीस बॅंकेतील काळा पैसा !
मंदीवरील एक उपाय म्हणून ओबामाने स्विस बैंकेमध्ये असलेल्या अमेरिकन खात्यांची माहीती मागवण्याची चाल खेळली, थोडासा दबाव टाकून स्विजरलैंड ला मजबूर केले की लिस्ट जाहीर करण्यासाठी. खरं तर गेली चारशे वर्षापासून स्विजरलैंड मध्ये गुप्त बैंक खात्यांची सुविधा आहे जी त्याकाळातील माफिया व गुन्हेगारांचा पैसा जमा करण्याची एकमेव म सुरक्षित जागा होती व बैंकेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या खात्याची माहीती कुणाला ही मिळत नसे. पण मंदीमुळे व अमेरीकेच्या व तसेच बाकीच्या देशांच्या दबावापुढे बळी पडून स्विजरलैंड ने स्विस बैंकेतील खात्यांची माहीती जगासमोर उघडी केली.
त्या माहीतीमुळे अमेरीकेत भुकंप झाला की माहीत नाही पण भारतात मात्र सर्व सामान्यांचे डोळे फिरावेत व श्वास थांबावा असा हाल झाला, जगामध्ये सर्वात जास्त काळा पैसा स्विस बैंकेत कुठल्या देशाचा असावा तर तो देश आहे भारत, हो आपलाच महान भारत ! जेथे सचोटीने, सत्यांने, देशप्रेमाने भारावलेले काही वेडे देशाच्या आझादीसाठी अगदी मागे नाही साठ एक वर्षापुर्वी आपले जिवन त्यागले.. त्यांचा आत्मा क्लेषाने रडत असेल की काय करण्यासाठी आम्ही स्वातत्रं लढा दिला व काय झाले !
१५०० अब्ज डॉलर !
एवढा पैसे ! थांबा जरा हे वाचून कळणार नाही हा आकडा काय आहे, भारतावर जागतीक बँकेचे फक्त १५५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे, हे कर्ज मुक्त होण्यासाठी १५ वर्षाचा कालावधी लागेल सध्याच्या प्रगती नूसार ! समजले किती पैसा आहे जो धुळ खात पडला आहे. जर हा सर्व पैसा भारतात आणला तर भारतावर कुणाचे ही कर्ज राहणार नाही उलट तो पैसा जर भारतात वापरला गेला तर त्या पैसातून भेटणा-या फक्त व्याजानेच दर वर्षी २५-३० जिल्हे पुर्ण विकसीत करता येतील ! देशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल काही वर्षामध्ये एवढा आफाट पैसा आहे हा !
पण कुठला ही राजकिय पक्ष ह्या विषयी ब्र सुध्दा काढत नाही आहे ? ह्याचे काय कारण असावे ? साधे सोपे कारण सर्वांचाच पैसा आहे ह्यामध्ये, नेता, अभिनेता, व्यवसायीक सर्व जणांचा हा काळा पैसा, सामान्य जनता आपल्या रक्ताने देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काबाडकष्ट करते व जे हारामखोर हाच देशाचा पैसा त्या स्विस बँकेत जमा करतात व देशाचे वाटोळे करतात, जर हाच पैसा भारतात राहिला असतात तर सध्या आपण विकसित देश असलो असतो ना की अविकसित तिसरी दुनिया !
तुम्ही विचार कराल त्या काय एवढे बाकी देशाचा पैसा पण तेथे असेलच ना !
जरा पहिल्या पाच ची लिस्ट बघा मी काय म्हणतो आहे ते कळेल.
१. भारत - १५०० अब्ज डॉलर.
२. रशिया - ४७० अब्ज डॉलर.
३. ब्रिटन - ३९० अब्ज डॉलर.
४. युक्रेन - १०० अब्ज डॉलर.
५. चीन - ९६ अब्ज डॉलर.
आपल्या खालच्या सर्वांची रक्कम आपल्या काळ्या पैसाच्या अर्धीपण नाही आहे =)) काय विनोद आहे नाही ! हसावे का रडावे हेच कळत नाही आहे.
अमेरिकेने दबाव टाकून हा आकडा बाहेर काढला व आता त्यांनी दुसरा दबाव टाकून त्यांच्या देशातील खात्यांची पुर्ण माहीती व मालकांची माहीती मागवली आहे व त्यांना ती मिळाली सुध्दा असावी आता पर्यंत. जर भारतात खरोखर असा एक ही पक्ष आहे जो म्हणतो की आम्ही योग्य तो दबाव टाकून तो सर्व काळा पैसा भारतात परत आणू त्यांनाच माझे मत, त्या शिवाय मी मतदान करणारच नाही उलट जे करत आहेत त्यांना पण माझे हेच सांगणे की बाबा रे ह्यांचा वर दबाव टाकण्याची आपल्या कडे पाच वर्षातून एकदाच संधी येते, त्यांनंतर आपण त्यांचे बिगारी मजदुर आहोत, ह्यांचे नाक दाबा, मतदान करु नका, काय होईल ? देशाचे अजून ४०-५० अब्ज डॉलर ह्या नाटका पायी खर्च होतील होई देत पण ह्यांना जनतेची ताकत तरी कळेल. जनतेनेच जर ह्यांना नाकारले तर ह्यांना जन्मभराची अक्कल मिळेल की काही कर पण देशाचे वाईट चिंतले की जनता फाट्यावर मारेल !
जय हिंद !
वाचने
13873
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्य वचन....
>>>कदाचित
In reply to सत्य वचन.... by सागर
असहमत राजे...
In reply to >>>कदाचित by दशानन
>>तुमच्यासा
In reply to असहमत राजे... by सागर
घोषणापत्र वाचत नाही....
In reply to >>तुमच्यासा by दशानन
एक नजर
In reply to घोषणापत्र वाचत नाही.... by सागर
आपल्या खिशाला कात्री
In reply to एक नजर by दशानन
२-३
In reply to आपल्या खिशाला कात्री by सागर
१०० टक्के सहमत
In reply to २-३ by गुळांबा
भ्रष्ट नेत्यांवरच्या केसेस
In reply to >>तुमच्यासा by दशानन
राजे मला
In reply to सत्य वचन.... by सागर
राजे, चांगली माहिती
अवांतर :
In reply to राजे, चांगली माहिती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्कीच
In reply to अवांतर : by सागर
सर, बेकारी
In reply to राजे, चांगली माहिती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म :(
In reply to सर, बेकारी by दशानन
जय हो...
सगळे आतून एक!
सर्वपक्ष समभाव
वा ! छान !!
राजे
हे सगळे
भाजपा
मतदानात
असतो... पण कोणी तो पर्याय वापरायचे कष्ट घेत नाहीत
In reply to मतदानात by चित्रादेव
नसतो.
In reply to असतो... पण कोणी तो पर्याय वापरायचे कष्ट घेत नाहीत by सागर
हा पर्याय वापरायचा कसा हे माहित नाही..
In reply to नसतो. by आळश्यांचा राजा
सागरराव
In reply to हा पर्याय वापरायचा कसा हे माहित नाही.. by सागर
अस्तित्वात नाही
In reply to हा पर्याय वापरायचा कसा हे माहित नाही.. by सागर
इतका पैसा
हे सगळे
अवलियाला विचार
In reply to हे सगळे by सँडी
इथे सगळे
In reply to अवलियाला विचार by मिसळभोक्ता
अतिशय
नाही
बोफोर्स चा
ते
In reply to बोफोर्स चा by अविनाशकुलकर्णी
अरब म्हणजे किती ?
होय अरब म्हणजे अब्जच
In reply to अरब म्हणजे किती ? by अभिरत भिरभि-या
तरीच
गरीब जनता
हे २००९ मध्ये लिहले होते!
हे खरं आहे का ?
याला म्हणतात अस्सल पाठिंबा
In reply to हे खरं आहे का ? by अर्धवटराव
कशाला ?
In reply to याला म्हणतात अस्सल पाठिंबा by टवाळ कार्टा
चुकीच्या गणिताला
In reply to कशाला ? by अर्धवटराव
मग ठिक आहे
In reply to चुकीच्या गणिताला by टवाळ कार्टा
थोडे गणित करूया
ब्यांकांमध्ये "ठेवले" याचा
In reply to थोडे गणित करूया by क्लिंटन
आय एन एस मंगल कलश.
In reply to ब्यांकांमध्ये "ठेवले" याचा by आदूबाळ
आय एन एस रामदेव
In reply to आय एन एस मंगल कलश. by सतिश गावडे
राज , बर झालं !
१५०० अब्ज डॉलर
कर्ज
In reply to १५०० अब्ज डॉलर by श्रीरंग_जोशी
हे प्रकरण एक हाईप ...
ह्या विषयावर कालच्या
हा खूप जुना लेख आहे, वर
माध्यमांमधून सांगितल्या
हा हा हा
In reply to माध्यमांमधून सांगितल्या by पिंपातला उंदीर
तुमच्याकडे आकडे आहे ?