✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

प — प्राची अश्विनी, Mon, 08/10/2020 - 08:48
पान खाता खाता आठवतं काहीबाही.. हिरव्या कंच पानाचा देठ नखंलताना आज्जी म्हणायची, "स्वस्ताई होती तेव्हा... दोन रुपयांना हेss पोतंभर तांदूळ. ओंजळीनं घ्यायचो तपेल्यात... वाटी वगैरे नाही आत्तासारखं.." पान मांडीवर पसरायची, सुरकतलेल्या हातात अडकित्ता घ्यायची, "चोर पकडले जायचे, शिक्षा व्हायच्या... आत्तासारखं नाही." चंचीतली सुपारी आडकित्त्यावर अलवार कातरायची ती.. पानावर चुन्याचं अल्लद बोट लागायचं, त्यावर कात सुपारी मांडत म्हणायची, "इंग्रज गेले आणि सगळी शिस्त गेली. शिस्त गेली तशी स्वस्ताई गेली." पानाची घडी करून ती तोंडांत सारून ती पुढे सांगायची, "पूर्वी पानात केशर घालायचे मी. तुझे आजोबा मुंबई वरून केशराची अख्खी पेटी आणायचे माझ्यासाठी." आज्जीचे डोळे धुरकट व्हायचे.. आत आईच्या हातून पडलेल्या तांब्याचा ठणठणाणठण आवाज यायचा. आज्जी माझ्याकडे बघून हळूच डोळे मिचकवायची. "आताही सगळं सुखंच म्हणा. पण अंथरुणावर पाठ टेकल्या टेकल्या डोळे मिटले तर ते खरं सुख" मी हात पुढे करायचे. लुसलुशीत पोपटी पान माझ्या हातावर ठेवत ती म्हणायची, "अन् पानात मांडलेलं चाटून पुसून खाल्लं तरच ती खरी भूक " पान तोंडांत कोंबत मी हळूहळू काढता पाय घ्यायचे. आज्जीची बडबड तरीही चालूच असायची...... पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही.. विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही..

प्रतिक्रिया द्या
9450 वाचन

💬 प्रतिसाद (14)

छान!

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/10/2020 - 13:26 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

क्या बात!!

Bhakti
Mon, 08/10/2020 - 15:21 नवीन
क्या बात!! पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही.. विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही.. भारीच !!
  • Log in or register to post comments

सुरेख व्यक्ती-क्षण चित्रण !

माहितगार
Mon, 08/10/2020 - 15:32 नवीन
सुरेख व्यक्ती-क्षण चित्रण !
  • Log in or register to post comments

आजी अगदी डोळ्यांसमोर उभी

रातराणी
Mon, 08/10/2020 - 21:38 नवीन
आजी अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली..
  • Log in or register to post comments

कमाल आहे

सत्यजित...
Mon, 08/10/2020 - 22:27 नवीन
एवढं सहज सोप्पं लिहिणं! माझी आज्जीही पान खात असे.तिच्यासोबत घालवलेलं माझं बालपण भर्रकन डोळ्यासमोर येवून तरळत राहिलं.
  • Log in or register to post comments

मस्तच !!!

वीणा३
Tue, 08/11/2020 - 01:16 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments

लिहिलंय छान

चांदणे संदीप
Tue, 08/11/2020 - 10:22 नवीन
ह्याला ललित म्हणणं जास्त योग्य राहिल. सं - दी - प
  • Log in or register to post comments

सुंदर!

एस
Tue, 08/11/2020 - 16:05 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

सही...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/11/2020 - 16:20 नवीन
लै भारी लिहिता. आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काल तब्बल ४ महिन्यांनी आमचा

महासंग्राम
गुरुवार, 08/13/2020 - 09:35 नवीन
काल तब्बल ४ महिन्यांनी आमचा नेहमीचा पानवाला उघडला होता त्याच्याकडे पान खातांना हेच आठवलं नेमकं
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
गुरुवार, 08/13/2020 - 10:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

सर्वांना प्रतिसादाबद्दल

प्राची अश्विनी
गुरुवार, 08/13/2020 - 10:33 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अती उत्तम.

Jayant Naik
गुरुवार, 08/13/2020 - 11:26 नवीन
प्रसंग आणि व्यक्ती समोर उभे करायची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मस्त .
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शिंदेकिरण
गुरुवार, 08/20/2020 - 11:11 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा