कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज
कोविड१९ हा समाजात उद्भवलेला पूर्ण नवीन आजार आहे. संबंधित रुग्णांचा जागतिक पातळीवर सतत अभ्यास चालू आहे. त्यातून त्याचे स्वरूप हळूहळू उलगडत आहे. त्यानुसार तज्ञांची मते तयार होत आहेत. बऱ्याचदा त्यात एकवाक्यता दिसत नाही. आजाराचे स्वरूप देखील विविधांगी आहे. या धाग्यात केलेले लेखन हे लिहितेवेळीच्या अधिकृत वैद्यकीय माहितीनुसार केलेले आहे. त्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी. असे काही महत्त्वाचे बदल झाल्यास त्याची दखल नव्या प्रतिसादातून घेईन.
प्रश्न : …………………………………………….. १. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का? ‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल: १. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.) २. विषाणूविरोधी औषधे ३. अॅन्टिबॉडीज ४. मूळ पेशींचे उपचार. या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात. पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही. ………………………………………………………………………………………………………….. २. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ? बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील. यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती: १. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे. २. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. ३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे. ४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही …………………………………………………………………………………………………………………………………………. ३. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ? यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत: १. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते. २. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते. ३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात. ४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते. ५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते. ६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे. ..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल. ……………………………………………………………………………………………………………………….. ४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ? या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो. “ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते. तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही. कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे १. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत. २. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………. ५. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार : गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती : १. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ? खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो: *वय १८ ते ५५ दरम्यान. *१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे. *असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते. *पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते. २. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ? वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. ………………………………………………………………………………………………………………………………………………… ६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ? या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो. या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे. याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत : १. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो. २. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो. ३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात. ……………………………………………………………………………………………………………………………………….. ७. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का? होय, असे काही अभ्यास चालू आहेत. १. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे. २. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत. ३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते. ४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे. ५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल. ……………………………………………………………………………………………………………………………………………………………. ८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का? प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात. १. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार . ३. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात. ४.अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही. ५. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते. हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………………… ९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ? कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत: १. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश २. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या ३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश. ....................................................................... १०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे? लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो. कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू. ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात. हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते. ................................................................................................................................................. ११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का? ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे. ................................................................................................... १२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का? याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात : 1. मारक (Neutralizing) 2. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. ........................................................................................................................ १३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ? या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला. या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही. १३ ब. ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ? २००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. ........................................................................................................................................................ १४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ? होय त्यात काही तथ्य आहे. या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो. रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते. सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे. दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात विशिष्ट प्रथिनांचे ( ACE२) प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो. ................................................................................................................................................................................. १५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ? मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते. ............................................................................................................. १६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता. आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर: १. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत. २. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत. ३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल. ................................................................................................................................... १७. कोविडविरोधी लसीचा संरक्षक कालावधी कमी असणार आहे का ? लस तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार तिचा संरक्षक कालावधी (सं का) ठरतो. १. काही लसी ( देवी, पिवळा ताप) या सौम्य केलेल्या जिवंत जंतूंपासून बनविल्या होत्या. देवीलसीचा ‘सं का’ पन्नास वर्षांहून अधिक काळ होता. २. करोना २ च्या बाबतीत त्या विषाणूच्या एका प्रथिनाचा वापर लस तयार करण्यासाठी होतो. ते प्रथिन पूर्णपणे की अंशतः वापरायचे यावर मतभेद आहेत. त्यानुसार संबंधित लसीच्या संकात फरक पडेल. ३. वरील प्रकार २ च्या लसींचा सं का १ पेक्षा खूप कमी असतो. म्हणून त्यांना बूस्टर द्यावे लागतात. ४. सारांश : लस तयार करताना संशोधकांना तराजूच्या एका पारड्यात प्रभावीपणा तर दुसऱ्यात सुरक्षितता ठेवावी लागते. तो समतोल साधणे जिकिरीचे असते. ........................................................................................................................................................... १८. “करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?” या संदर्भात काही मूलभूत माहिती: विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये: १. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो. २. त्यामुळे त्यांचे जनक जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात. ३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते. ४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा पाठलाग करणे तुलनेने अवघड जाते. ५. म्हणून त्यांच्याविरोधी नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात. ( याउलट वैशिष्ट्ये DNA गटातील विषाणूंची असतात). ........................................................................................................................ १९. वाफ घेणे व रोगप्रतिबंध वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती: कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे. तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही. त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे. ......................................................................................................... २०. रेमडेसीविर आणि इटोलीझुमॅब यात काय फरक असतो ? १. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी) २. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू. हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते. ........................................................................ २१. कोविड आणि हृदयाचा त्रास यासंबंधी दोन प्रकारची निरीक्षणे आहेत: १. जे रुग्ण या आजारातून बरे झाले त्यांना पुढे काही दिवसांनी हृदयस्नायू कमकुवत होण्याचा त्रास दिसून आला. यांच्यातील काहींना पूर्वी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तर काहींना नव्हता. २. काही मृतांच्या शवविच्छेदनात या विषाणूने हृदयस्नायूला इजा केल्याचे आढळून आले आहे. ............................................................... २२. इंटरफेरोन्सचे उपचार : इंटर्फेरोन्स (IF) ही सजीवांच्या पेशींनी विषाणू विरोधात तयार केलेली प्रथिने असतात. ती औषधरूपात प्रयोगशाळेत देखील तयार केली जातात. मुळात ती विषाणूंची वाढ रोखतात (interfere with). कोविड संदर्भात त्यांचे विविध रुग्णप्रयोग अजून चालू आहेत. एका अभ्यासात हा मध्यम आजार झालेल्या रुग्णांना IF अधिक अन्य दोन विषाणू विरोधी औषधे एकत्र दिली गेली. तिथे परिणाम चांगले दिसले आहेत. अर्थात यावर अजून पुरेशी तज्ञ चिकित्सा व्हावयाची आहे. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. .......................................................................... २३. किरणोत्सर्गाचे उपचार : न्यूमोनियातील दाह कमी करण्यासाठी किरणोत्सर्गाचे उपचार शंभर वर्षांपूर्वीही दिले जात. आता हा उपचार पुन्हा चर्चेत आला आहे. यामध्ये किरणोत्सर्गाचा सौम्य डोस शरीरावर दिला जातो. हा १ डोस साधारण सिटीस्कॅनच्या डोसपेक्षा थोडा अधिक असतो. तो थेट विषाणू विरोधक म्हणून काम करत नाही, पण फुफ्फुसातील दाहप्रक्रिया कमी करतो. सध्या भारतासह सहा देशात त्याचे प्रयोग चालू आहेत. हा उपचार गंभीर आजार असलेल्या आणि ऑक्सिजन द्याव्या लागणाऱ्या रूग्णांसाठी केला जात आहे. काही निष्कर्ष चांगले आहेत मात्र किरणोत्सर्गाचे संभाव्य दीर्घकालीन दुष्परिणाम ध्यानात घ्यावे लागतील. त्यामुळे हा उपचार मर्यादित रुग्णांपुरताच विचाराधीन आहे. ..................................................................................... २४. मृतदेहाद्वारा या रोगाचा प्रसार होतो का ? या विषयावर बरेच संदर्भ पाहिल्यावर एक स्पष्ट होते. ते म्हणजे याबाबत समाधानकारक शास्त्रीय पुरावा किंवा विदा उपलब्ध नाही. काही उल्लेखनीय मुद्दे : १. इतिहासात अन्य महासाथींच्या दरम्यान मृतदेह हाताळण्याची काही ठाम तत्त्वे पाळली गेली आहेत. त्याला अनुसरून सध्याही तशात अंतरिम सूचना जाहीर झाल्या. २. व्यक्ती मृत्यू झाल्यावर शरीरात कुजण्याची प्रक्रिया सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. एकदा ती सुरू झाली, की शरीरातील विषाणू वगैरे सर्व नष्ट होतात. ३. त्या ‘मधल्या’ वेळात विषाणू बाहेर पोहोचू शकतील असे गृहीतक मांडले गेले. प्रत्यक्ष सार्स-२ बाबत तसा काही ठोस अभ्यास झालेला नाही. ४. रेडक्रॉसच्या अंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक समितीचे प्रमुख डॉ. Oran Finegan आहेत. त्यांचे उद्गार असे आहेत, “रोगप्रसाराचा सर्वात मोठा धोका जिवंत बाधिताकडून आहे, मृताकडून नाही”. ५. व्यक्तिगत पातळीवर मृतदेह काळजीपूर्वक हाताळले जाणार नाहीत, या गृहितकामुळे ते ताब्यात न देण्याचा शासकीय निर्णय झालेला दिसतो. एक संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7290165/ ........................................................... २५. कोविड आणि अस्पिरीनचा उपयोग अस्पिरीनला दाहप्रतिबंधक आणि रक्तगुठळीप्रतिबंधक असे दोन्ही गुणधर्म आहेत. सध्याच्या आजारात अनेक लोकांमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रिया बऱ्यापैकी झालेल्या दिसून आल्या आहेत. रुग्णाचे एकंदरीत रिपोर्ट पाहून संबंधित डॉक्टर अस्पिरीनचा निर्णय घेतात. बऱ्याच प्रयोगांमध्ये असे दिसले आहे, की ज्या रुग्णांना ऍस्पिरिन चालू होती त्यांचा हा आजार नियंत्रणात राहिला व गंभीर झाला नाही. तसेच अशा एकूण रुग्णांचा मृत्यूदरही कमी राहिलेला आहे. यावर अधिक संशोधन अभ्यास चालू आहेत. .......................................... २६. भविष्यात कोविडचा समूळ नाश होइल का ? मानवी संसर्गजन्य आजारांच्या इतिहासात समूळ नाश झालेला एकमेव आजार म्हणजे देवी. तो नष्ट होण्यामागे दोन कारणे होती: १. माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा साठा (reservoir) नसणे. २. प्रभावी लसीकरण कोविडच्या बाबतीत वटवाघळात साठा असणे ही कटकटीची बाब आहे. लसीकरण सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे. म्हणून…. समूळ नाश होणे कठीणच. आजार सौम्य करणे व साथ नियंत्रणात आणणे हे ध्येय. ..................................In reply to नविन प्रश्नोत्तरे धाग्यातच by शाम भागवत
In reply to लेखाचं किंवा प्रतिसादांचं संपादन by संजय क्षीरसागर
In reply to नविन प्रश्नोत्तरे धाग्यातच by शाम भागवत
In reply to धागा वाचत आहेच, उपयुक्त by प्रचेतस
लेखकाला या लेखाचे संपादन करण्याची सुविधा प्रशासनाने प्रदान केली पाहिजे.>>> +१११११. हीच संपादकांना विनंती.
प्रतिकारशक्ति वाढावी म्हणून फळ आहार किंवा काही मॉडर्न औषधी डोस घ्यावीत न घ्यावीत त्याबद्दलही माहिती दिली तर>>>>> सामान्य नागरिकांनी रोगप्रतिबंधक म्हणून कुठलेही “औषध” घेण्याची गरज नाही. खालील गोष्टी करता येतील : १. समतोल व चौरस आहार : यात प्रथिने आणि जीवनसत्वांकडे विशेष लक्ष द्यावे. २. नियमित व्यायाम ३. मनातील भीती काढून टाकून मोकळेपणाने जगायला लागणे. नवीन वाचकांसाठी माझ्या जीवनसत्वे आणि खनिजे या लेखमालांचे अनुक्रमे दुवे : अ. ब.
In reply to सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! by हेमंतकुमार
३. मनातील भीती काढून टाकून मोकळेपणाने जगायला लागणे.म्हणजे प्रतिकारशक्तीचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे हे बरोबर आहे का?
In reply to ३. मनातील भीती काढून टाकून by प्रकाश घाटपांडे
म्हणजे प्रतिकारशक्तीचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे हे बरोबर आहे का?प्रकाश, होय. मानवी भावना (affect) आणि प्र-शक्ती यांचा संबंध आहे. या अभ्यासासाठी ‘भावनिक प्रतिकारविज्ञान’ (affective immunology) अशी एक विशेष विज्ञानशाखा उदयास आलेली आहे. त्यातले संशोधन अजून अपुरे आहे. पण २ निरीक्षणे वैद्यकात नोंदवली आहेत: १. प्र-शक्ती बिघडलेल्या काही रुग्णांत भावनिक विकार अधिक दिसतात २. काही मनोविकारांत प्र-शक्तीशी संबंधित बिघाड बऱ्यापैकी दिसतात्त. (इच्छुकांसाठी संस्थळ : www.affectiveimmunology.com)
इलेक्ट्रॉनिक उपकरणे -मोबाइल,बॅटरी ,रिमोट कीबोर्ड ह्यांचे डिसइन्फेकशनएकंदरीत निर्जीव वस्तू हाताळण्यात बाबत माझे मत सांगतो. कुठल्याही दुकानदाराने त्या देताना हातात स्वच्छ आणि रोज बदलण्याजोगे मोजे घालावेत. आपण घरी अशा वस्तू हाताळल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. हाताला वारंवार अल्कोहोल युक्तद्रव लावल्याने त्वचेच्या काही समस्या काही लोकांत उद्भवल्या आहेत. ............. **
ह्या लिंक मध्ये संधिवातावरील औषध प्रभावी ठरत असल्याचे म्हटले आहेहे औषध म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अँटीबॉडी असते. त्याचे पुरेसे रुग्णप्रयोग झाल्यानंतरच योग्य ते निष्कर्ष बाहेर येतील.
In reply to हॅण्ड ग्लोव्ज बद्दल? by मधुका
In reply to नोटा ,पावत्या,वर्तमानपत्रे निर्जंतुक कसे करावे.... by सतीशम२७
In reply to सध्या कोरोना असल्याने by बाप्पू
In reply to नेहेमीसारखाच माहितीपूर्ण आणि by शेखरमोघे
मग असे करणार्या व्यक्तींनी हातमोजे वापरणे कितपत योग्य आहे? त्या पेक्षा त्यांनी हातमोजे न घालता वारंवार हात सॅनीटाईज करणे योग्य आहे ना?मंडळी, हा लाखमोलाचा आणि काथ्याकूटाचा विषय आहे. यात दोन्ही बाजूंनी बोलणारे समसमान तज्ञ सापडतील. म्हणूनच एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी. स्वच्छ धुतलेले काय किंवा कुठलेही मोजे घातलेले हात काय, ते अगदी थोड्या वेळातच जंतूयुक्त होतात. त्यामुळे याचा बाऊ न करता आपल्या प्रतिकारशक्तीवर भिस्त ठेवावी, असे मला वाटते. सूक्ष्मजीवांचा ‘ यत्र तत्र सर्वत्र’ असा संचार बघता या विषयावर पूर्ण समाधानकारक उत्तर मिळणार नाही.
In reply to काथ्याकूटाचा विषय by हेमंतकुमार
In reply to @ कुमार१ : आपल्या प्रतिकारशक्तीवर भिस्त ठेवावी, by संजय क्षीरसागर
In reply to ??? by गवि
In reply to काथ्याकूटाचा विषय by हेमंतकुमार
In reply to काथ्याकूटाचा विषय by हेमंतकुमार
In reply to नाही तसे नाही. by पाषाणभेद
सौ टके की बात !>>>> मनातील भीती काढून टाकण्याने (कुठल्याही संकटाला) प्रतिकार क्षमतेला चांगली मदत होते. ............
मरणाचे प्रमाण गरीबात कमी आहे. बळी मध्यम वर्गीयच जास्त करून व ते सुद्धा मधुमेहवाले आहेत>>> नाही हो ! देशोदेशींचा विदा येगयेगळा आहे .
In reply to .... by हेमंतकुमार
In reply to आणि... by हेमंतकुमार
In reply to "Choose your parents wisely"...... by Nitin Palkar
In reply to त्याचा अर्थ... by हेमंतकुमार
In reply to आपल्या जन्माची वेळ आणि स्थळ हे पण सूज्ञपणाने निवडा. by चित्रगुप्त
या दोन्ही गोष्टीवरूनच जन्मकुंडली मांडली जाते, आणि निष्णात ज्योतिषी त्यावरून जीवनातील सर्व घटना आणि मृत्यूची वेळही जाणून घेऊ शकतात, हा स्वानुभव आहे. मृत्यूची वेळ, कारण, जागा हे सर्व निश्चितच आहे,चित्रगुप्त साहेब एकदा यावर स्वतंत्र धाग्यात सविस्तर लिहाच. स्वानुभव असल्याने कदाचित अधिक चिकित्सा होणार नाही.
In reply to "Choose your parents wisely"...... by Nitin Palkar
In reply to यातून एकमात्र होईल ... by चौकटराजा
त्या पेक्षा पण भयंकर विषाणू ,जिवाणू पृथ्वी वर अस्तित्वात असतील आणि ते कधी ही मानवत संक्रमित होतील>>>>> होय, हे शक्य आहे. २.
लक्षणे अजिबात नसलेल्या लोकांच्या Random tests मधे त्यांच्यात करोनाच्या anti bodies सापडल्या म्हणे !होय, बरोबर. असे होऊ शकते. याला अजून एक बाजू आहे. ‘करोना’ हे विषाणूंचे एक कुटुंब आहे. त्यातील (करोना-२ सोडून) अन्य एखाद्याचा संसर्ग झाला असेल तरीही या antibodies सापडू शकतात. म्हणूनच त्या मोजणे ही ‘रोगनिदान’ चाचणी नसते.
In reply to +१ by हेमंतकुमार
करोना’ हे विषाणूंचे एक कुटुंब आहे. त्यातील (करोना-२ सोडून) अन्य एखाद्याचा संसर्ग झाला असेल तरीही या antibodies सापडू शकतात.मला वाटतं ही टेस्ट चालू रोगनिदानासाठी आहे असं कुठे म्हटलं नसावं. ती होऊन गेलेल्या आजाराबद्दल आहे असंच सर्वत्र लिहून आलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं कोणत्याही जुन्या कोरोनाव्हायरस गटातल्या अन्य विषाणूनेही नोव्हेल कोरोनाव्हायरससारख्याच अँटिबॉडीज तयार होत असतील आणि नोव्हेल कोरोनाव्हायरस होऊन गेला की अन्य कोरोना फॅमिली व्हायरस होऊन गेला याची काही विशिष्टताच त्यात नसेल (जे तुमच्या प्रतिसादात ध्वनित होतंय, चुभुद्याघ्या) तर मग या टेस्टचा शून्यच उपयोग म्हणावा लागेल.
In reply to करोना’ हे विषाणूंचे एक कुटुंब by गवि
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.हाही निष्कर्ष पुरेसा महत्वाचा नाही वाटत का?
हाही निष्कर्ष पुरेसा महत्वाचा नाही वाटत का?त्याला उपचारांच्या दृष्टीने महत्व नसते. मुळात संबंधित अभ्यास फक्त इटली व स्पेन मधल्या काही मोजक्या रुग्णांवर झालेला आहे. जगभरात अनेक वंशांची माणसे आहेत. अशा असंख्य लोकांवर जेव्हा पुरेसे प्रयोग होतील तेव्हाच भविष्यात त्यावर अधिक बोलता येईल. विविध रक्तगट आणि काही आजार होण्याचे प्रमाण यावर गेल्या ५० वर्षांत बरेच संशोधन झाले आहे. मात्र त्यातील बरीच गृहीतके पुरेश्या पुराव्याअभावी सिद्ध झाली नाहीत. अशा बऱ्याचशा अभ्यासांचा, रोगनिदान आणि उपचार या दृष्टीने उपयोग नसतो. वैद्यकातील पूरक अभ्यास इतकेच त्यांचे महत्त्व असते. ‘रक्तगट व आजार’ असे अनेक अभ्यास आतापर्यंत गृहितके याच पातळीवर राहिलेले आहेत.
बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत" हा एक स्वतन्त्र लेखनविषय होऊ शकेल.बरोबर. येत्या काही वर्षांत या आजारावर बरेच काही लिहीले जाईल.

तर आपल्या मास्क घालून बाहेर पडण्याला काहीच अर्थ नाही का? >>>> १.सर्व प्रकारचे रोगजंतू हे अतिसूक्ष्म असल्याने काही प्रमाणात का होईना आपल्या शरीरात जाणारच. आपण अवरोध साधने वापरून त्यांचे प्रमाण कमी करू शकतो. २. आता डॉक्टर आणि सामान्य नागरिकांची तुलना करू. डॉक्टर ज्या रुग्णालयात रोग्यांच्या समवेत काम करतात, तिथल्या वातावरणात जंतूंची घनता कित्येक पट जास्त (उदाहरणार्थ काही कोटीत) असते. त्यामुळे दीर्घकाळ त्याच वातावरणात काम केल्यावर त्यांच्या शरीरात जाणाऱ्या जंतूंची घनताही बऱ्यापैकी राहते. ३. आता सामान्य मुखपट्टीचा मुद्दा. यावर तज्ञांत बरेच मतभेद आहेत. आपण जेव्हा ती घालून वावरतो, तेव्हा आपले बोलणे, शिंकणे आणि खोकणे यातून बाहेर पडणाऱ्या जंतूकणांची संख्या कितपत कमी होते यावर उलट-सुलट निष्कर्ष निघालेले आहेत. त्यामुळे या पट्टीपेक्षाही शारीरिक अंतर राखणे अधिक महत्त्वाचे आहे. पट्टी आणि अंतर या दोघांचा मिळून परिणाम फायदेशीर होतो.
In reply to सृजा, by हेमंतकुमार
प्राणी आणि कोविडचांगला प्रश्न. बहुधा हा आजार प्राण्यांमधून माणसात आलाय. तो प्राण्यांनाही होऊ शकतो (likely) असे वैद्यकीय संदर्भ सांगतो. वृत्तपत्रीय संदर्भानुसार काही प्राण्यांना तो झालाय. (https://news.cgtn.com/news/2020-05-15/How-is-COVID-19-affecting-animals-around-the-world--QvreEAyXN6/index.html) खात्रीशीर माहितीसाठी प्राणीशास्त्रज्ञ व्यक्तीचे मत लागेल.
In reply to गोंधळी, by हेमंतकुमार
३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.ब्रिटीश एक्सपर्ट प्रा. वेंडी बार्कलेंच्या म्हणण्यानुसार वीषाणू तासाभरापेक्षा अधिककाळ हवेत राहू शकतो. संदर्भ १ , २ (युट्यूब बीबीसी मला पडणारे दोन प्रश्न असे की वादळात मोठ मोठ्या वस्तु उडून जाऊ शकतात, काही मायक्रॉनचा साईज असलेल्या वीषाणूंना साठी हवेचे सामान्य चलनवलन एखाद्या वादळासारखे नसेल का ? दुसरा प्रश्न जर पंधरा मिनीटात सुक्ष्मकण जमिनीवर बसत असतील तर सामान्यपणे बंद घरातील सर्व धूळ दिवसाभरात तरी खाली बसावयास हवी ती दिवसेंदीवस वाढत जाते म्हणजे हवेतून खाली बसण्यास वेळ घेते. अर्थात हे वीषाणू बाकी मोठ्या द्रव्य तुषारांसोबत आहेत असे गृहीत धरतो म्हणून जरासे लौकर बसण्याची शक्यता गृहीत धरली जाते पण छोट्या तुषारांसोबतच्या वीषाणूंचे काय होत असावे. असिम्प्टॉमॅटीक लोकांचे प्रमाण अधिक असणे लक्षणे लपवणे आणि कमी टेस्टींगमुळे वीषाणू समाजात अधिक असूनही मान्य केले जात नसण्याची शक्यता बाकी रहात नाही ना अशी साशंकता वाटते.
In reply to वाफ घेणे by कपिलमुनी
In reply to कपड्यातून पसरतो का ? by Prajakta२१
In reply to प्राजक्ता, by हेमंतकुमार
In reply to प्राजक्ता, by हेमंतकुमार
In reply to हे पुरेसे क्लिअर वाटत नाही by माहितगार
जर सर्वसाधारण कापड वीषाणूंशी यशस्वी संघर्ष करत असेलकापड संघर्ष नाही करत ! सामान्य माणसाच्या कपड्यावर बाजारहाट करताना जे काही विषाणू उडले असतील, त्यांची संसर्गक्षमता क्षीण असते. मुळात ते कपड्यावर चिकटणे वगैरे आपल्यला वाटते तितके होत नाही. आपल्या चालण्याच्या हालचालीबरोबर बरेच असे कण वातावरणांतच विखुरले जातात.
In reply to माहितगार, नीट लक्षात घ्या. by हेमंतकुमार
...आपल्या चालण्याच्या हालचालीबरोबर बरेच असे कण वातावरणांतच विखुरले जातात...म्हणजे आपण आपल्या कपड्यावरून उडालेल्या वीषाणूंनी तेवढे प्रभावित होणार नाही इथ पर्यंत लक्षात घेतले तरी इतरांच्या कपड्यांवरून उडालेल्या वीषाणूंचे काय ? हा प्रश्न छिद्रन्वेषीपणा वाटले पण भारतातील गर्दीची ठिकाणे आणि कपड्यांच्या दुकानात कपडे वापरून पहाणे प्रकार आहे किंवा कपडे ऑनलाईन मागवलेले कुणि वापरून पाहिलेले असू शकतात कारण ते सहज बदलून मिळतात. या बाबींची जोखीम कितपत असू शकेल.
...आरोग्यसेवकांनी सर्वोत्कृष्ट दर्जाची अवरोध साधने वापरायची आहेतच. प्रश्न आहे तो सामान्यांनी सामान्य प्रकारच्या मुख्यपट्ट्या किती काळ वापरत राहायच्या, हा.....एक डॉक्टर जसा स्वतःला बाधा होऊ नये म्हणून मुखपट्टी बांधतो तेव्हा तो दुसर्यालाही आपल्या वीषाणूंची बाधा होऊ नये म्हनून बांधतोच ना ? डॉक्टर म्हणतात का आम्ही किती काळ मुखपट्टी वापरणार किती वेळा हात धुणार ? एखाद्या ड्रायव्हरने किती काळ 'न पिता' गाडी चालवणार म्हटले तर चालेल का ? आपल्यातील वीषाणूंनी इतरांना अपघात होऊ नये असे वाटत असेल तर मुखपट्टी वापरावी किंवा संपूर्ण विलगीकरण करावे अथवा अधिकतम शारीरीक अंतर राखावे हे सयुक्तिक असणार नाही का? रुग्ण आणि डॉक्टरांना उत्तम दर्जाच्या मुकपट्ट्या कमी पडू नयेत म्हणून प्राधान्य देणे समजण्यासारखे आहे पण खरे म्हणजे जर वीषाणू संसर्ग साथ वास्तव असेल तर शक्य तेवढ्या लोकांना म्हणजे सामान्यांनाही उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या उपलब्ध व्हावयास नको का ? -उत्पादन आणि वितरणात बॉटलनेक असतील तर त्या निस्तरावयास हव्यात- किमानपक्षी दिवसातून दहा वीस लोकांशी संवाद साधावा लागणार्यां (व्यावसायिक इत्यादीं)ना उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या नको का? या बद्दल कुणिच का काही बोलत नाही. *** बाकी मी मुद्यांचे समर्थन करताना आणि साशंकता व्यक्त करताना आपल्या लेखनाची दखल घेतलेलीच असते. कुठे रहात असल्यास पुन्हा तपासून बघेन, अनेक आभार.
In reply to ...आपल्या चालण्याच्या by माहितगार
शक्य तेवढ्या लोकांना म्हणजे सामान्यांनाही उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या उपलब्ध व्हावयास नको का ?जरुर व्हाव्यात , अनुमोदन !
In reply to माहितगार, नीट लक्षात घ्या. by हेमंतकुमार
In reply to कापड संघर्षाचा माझा व्यक्तिगत अनुभव by माहितगार
हा विषाणू खरेच मानवनिर्मित असु शकेल काहा प्रश्न रोचक आहे पण तो जीवशास्त्रज्ञाच्या अखत्यारित येतो. थोडेफार गुगल केल्यावर मला समजले ते असे: प्रयोगशाळेमध्ये एखाद्या जिवाणूचा डीएनए कृत्रिम पद्धतीने तयार करतात. मग तो एखाद्या जिवाणू मध्ये घालतात. थोडक्यात अंशतः कृत्रिम जिवाणू प्रयोगशाळेत तयार केलेले आहेत असे दिसते. इथे काही माहिती आहे: https://www.reuters.com/article/us-science-synthetic-life/u-s-scientists-take-step-toward-creating-artificial-life-idUSKBN1DT2ZB https://www.sciencedaily.com/releases/2008/01/080124175924.htm मात्र सध्याच्या विषाणूबाबत अधिकृत माहिती संबंधित जीवशास्त्रज्ञाने सांगावी हे बरे.
In reply to म मा , by हेमंतकुमार
In reply to म मा, by हेमंतकुमार
In reply to धन्यवाद. पण अशा पट्ट्या by मराठी_माणूस
In reply to होय, by हेमंतकुमार
In reply to निरीक्षण ... by हेमंतकुमार
आता सहा मजले चढले तरी व्यवस्थित असते >>> छान प्रगती, शुभेच्छा !

In reply to चांगली बातमी : करोनावर लस by Prajakta२१
बारकावे महत्वाचे असतात,+११
In reply to दुसरी बाजू ! by हेमंतकुमार
In reply to मागा , by हेमंतकुमार
In reply to डॉ. कुमारजी, by माहितगार
In reply to आणखी एक प्रश्न by माहितगार
नव्या जन्मणार्या बाळांवर काही परिणाम संभाव्य असू शकतात का ?चांगला प्रश्न. काही अहवाल : १.. काही कोविड- मातांच्या बाळांना जन्मल्यावर श्वसन अवरोध झाला आणि त्यांच्या यकृताचे कामात बिघाड होता २. काही बाळांना न्यूमोनिया झाला पण तो बराही झाला. ३. तर काही माता मुदतपूर्व प्रसूत झाल्या
निष्काळजीपणा बघता लस ऊपलब्ध होई पर्यंत फॅमिली प्लानिंगची अॅडव्हायजरी जास्त सयुक्तीक>>> अगदी बरोबर. *
जगातल्या इतर डॉक्टर व संशोधकांचे गेली सहा महिने दुर्लक्ष झाले
बघूया, जगातील काही संदर्भ मिळाले तर सांगतो.
निष्काळजीपणा बघता लस ऊपलब्ध होई पर्यंत फॅमिली प्लानिंगची अॅडव्हायजरी जास्त सयुक्तीक>>> अगदी बरोबर. *
जगातल्या इतर डॉक्टर व संशोधकांचे गेली सहा महिने दुर्लक्ष झाले
बघूया, जगातील काही संदर्भ मिळाले तर सांगतो.
In reply to मा गा by हेमंतकुमार
In reply to मा गा by हेमंतकुमार
हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे हे कसे ठरवितात?हा विषय सामाजिक वैद्यकातला असून त्याच्याशी क्लिष्ट संख्याशास्त्रीय संकल्पना निगडित आहेत. मी त्यातला तज्ञ नसल्याने एका मर्यादेत उत्तर देतो. समूह प्रतिकारशक्ती मोजण्याच्या दोन पद्धती असतात : १. अप्रत्यक्ष : यात त्या आजाराच्या नव्याने निर्माण होणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करतात. परंतु यात लक्षणविरहित लोकांची मोजदाद होत नाही. ही याची महत्त्वाची मर्यादा आहे. २. प्रत्यक्ष: यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजातील लोकांच्या रक्तातील संबंधित अँटीबॉडीज चे प्रमाण मोजावे लागते. ( काही आजारांत अन्य चाचण्या देखील).
२. प्रत्यक्ष: यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजातील लोकांच्या रक्तातील संबंधित अँटीबॉडीज चे प्रमाण मोजावे लागते. ( काही आजारांत अन्य चाचण्या देखील).दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई, चे सेरॉलॉजीकल सर्वेंचे रिझल्ट मागच्या आठवड्याभरात आले त्या बद्दलचा वृत्तपत्रीय माहिती आधारीत धागा मी काढला आहे. हर्ड इम्युनिटी संदर्भाने केलेल्या वाचनातून मला ज्या गोष्टींचे आकलन झाले त्यात पहिले हर्ड इम्युनिटीसाठी टक्केवारी वीषाणूच्या संसर्ग फैलाव क्षमते नुसार आणि लोक व्यवहार पद्धतीनुसार बदलती असते. दुसरे नव्या वीषाणूची साथ चालू असताना या स्पेक्युलेशनचा उपयोग नसतो कारण किती लोकांपर्यंत पोहोचल्या नंतर साथीला उतार पडेल ते साथ संपल्या नंतरच कळते. तिसरे त्या पेक्षाही महत्वाचे लस उपलब्ध नसलेल्या वीषाणूची साथ हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी जाणीवपुर्वक पसरवण्याचा विचार आणि प्रयत्न -कुणालाही प्रत्यक्ष आजाराने ग्रस्त करुन प्रयोग करणे अनैतिक असल्यामुळे- अनैतिक ठरतात.
दुसरे नव्या वीषाणूची साथ चालू असताना या स्पेक्युलेशनचा उपयोग नसतो>>> +११ या मागे Seroepidemiology विज्ञान असते. यामध्ये हे साथ वगैरे नसताना निरोगी माणसांच्या मूलभूत तपासण्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतात. त्यातून त्या भौगोलिक प्रदेशातील काही आजारासंबंधीची प्रतिकार शक्ती लोकांत कितपत अस्तित्वात आहे याचा प्राथमिक अंदाज येतो.
(सौजन्य : npr ).
In reply to विज्ञान गोंधळ लेले आहे by Rajesh188
In reply to विज्ञान गोंधळ लेले नसते by माहितगार
विज्ञान गोंधळ लेले नसते.तर विज्ञान म्हणजे नेमकं काय? आणि ते गोंधळलेलं नसतं म्हणजे काय? आ.न., -गा.पै.
In reply to हर्ड इम्युनिटी हे आजारापासून by Gk
नविन प्रश्नोत्तरे धाग्यातच