फाटका ट्रेक ढाकचा...! भाग २... समाप्त

विखि's picture
विखि in जनातलं, मनातलं
14 Jul 2020 - 11:55 pm

मागच्या भागा पासुन पुढं...
गुहेत आल्याव फुल्ल एन्जॉय सुरु झाला.....
थोडा वेळ गेल्यावर सगळे गुहेत सेट झालो ज्यानी-त्यानी आपली आपली कामं करायला घेतली. आज खास गावठी चिकनचा बेत होता. बारीक-पुंडल्यानी चूल लावायला घेतली, चावरे,कनकधर-मास्तर, सुम्या चिराचीरी करत बसली, इशा-अम्या गुहेची साफसफाई बघत होते. अ‍ॅजे मेन आचारी म्हणून चिकनला हळद मीठ चोळून मी गुहेच्या तोंडापाशी पाय पसरून बसलो. मस्त गार वाटत होतं. गुहेचा माहोल कायच्या-काय भारी होता. खाली खोल दरी,बाजूला वर ढगात घुसलेला कळकराय सुळका, तोंडाव येणारं गार वारं. लई लांबवर राजमाची जवळ एखादी लाईट दिसत होती. बाहेर अजिबात कसला आवाज नाय का काय नाय. मागं पोरांचा कालवापण कमी झालेला. ती तरी उडून-उडून किती उडणार कुनाव. सगळी गपगार होती. उलट माहोलला सूट असं गाणं सुरु होतं. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुये में उडाता चला गया’ किशोरभौनी त्यात अजूनच चेरी ऑन द टॉप का कायतरी केलं. आयुष्यात एकदम दोन मिनिटात ठेहराव आल्यागत झालं. एकदम सुकून-ऐ-जिंदगी. लय दिवसांनी एवढं चील वाटत होतं. माझं लक्ष बाजूला असलेल्या ढाकोबाच्या शेंदूर फासलेला दगडावर गेलं. इथल्या आदिवासी लोकांनी त्याला डोळे वगैरे लावले होते. त्याच्याच पुढ्यात बरीच त्रिशूळ लिंबासकट खवली होती. पोरांनी मगाशीच हातपाय धून तिथं दिवा लावला होता. त्यामुळं गाभारा चांगलाच उजळला. ढाकोबा म्हणजे लय कडक काम.एकदम जागृत देव. बाईमानसाचा वारा पन नाय चालत. इथं येऊन त्याच्या दारात कुणी काय येडं-वाकडं किंवा चुकीचं वागलं तर ते खालच्या दरीत पडतंय अशी आख्यायिका लय फेमसे इकडं. मगाशी गावातलं म्हातारं हेच कायतरी सांगायला बघत होतं. मागच्या वेळेस मी इथं आलो तेव्हा याच ठिकाणी ढाकोबाच्या पुढ्यात घापकनी एकाच्या अंगात आलं. त्याच्या बरोबर आलेली लोकं मंग त्याच्या पाया पडून त्याला काय-काय प्रश्न विचरत बसली. ते अंगात आलेलं मानुस आणि माझ्यात एक दोन वेळा बघाबघी पण झाली, मला वाटलं धरतंय आता ह्ये मला. पण तसं काय झालं नाय उलट "पाव्हनं जेवायला बसा आता, बकरं मारलंय" म्हणून त्याच्या माणसांनी आम्हाला जेवायला बसवलं. आम्हीपण येताना आणलेली आमची पन्नासची सुक्की भेळ बाजूला सारून मस्त मटण हानलं. ह्ये अंगात येणं-बिनं जाऊ दे, पण का काय माहीत हितं आल्यावर नेहमीच कायतरी गूढ-गंभीर टाईप वाटायचं. काय नसून पण कायतरी असल्यागत वाटायचं.
"अय विक्या ते चिकन कर की आता, समाधी घेतली काय तिथंच, कधीचं बसलंय तिथं, आता काय बाबा होतो का" पुंडल्या मागून वरडलं, तसा मी भानावर आलो.
दिवसभर म्हणावं तसं नीट खाल्लं न्हवतं त्यात एवढं जंगल तुडवून आल्यामुळं लय भुका लागल्या होत्या. पोरांनी सगळी तयारी करून ठेवलेली फक्त चुलीव चिकन चढवायचं होतं ते चढवून सगळे चुलीच्या बाजूलाच बसून हात-पाय शेकत गप्पा मारत बसली. जसं चिकन शिजायला लागलं तसं गुहेभर त्याचा वास पसरला. लैच भारी वास सुटला. एवढा की आजूबाजूच्या जंगलातलं एखादं जनावरपन हातात भगुलं घ्यून “थोडं चिकन द्या की राव” म्हणत गुहेत यायला बसलं होतं. चिकनचं पातीलं खाली घेतल्या घेतल्या पोरं हावऱ्यागत गोल करून बसली. नेहमीप्रमाणे एका ताटात दोनजन अशी. कनकधर मास्तर पातील्यात नाक घालून मोठा श्वास घेत “एक नंबर वासे राव” करत होतं. बारीक काय बाण घ्यून तयारच होतं “मास्तर पडसाल पातील्यात, या मागं” म्हणून लगी उडलं.
“हा मंग, विक्याच्या हातचं चिकने ते, मेलेलं मानुसपण उठून पंगतीला बसतंय” पुंडल्या मला साबण लावत होतं “हा असूदे, तुला लेग पीस पायजे ना तुला, देतो” म्हणून मी मानाचा लेग पीस त्याच्या ताटात टाकला. तसा त्यानी तो लेग पीस तोडला. “लिंबू आणलंय ना रे” चावरे विचरत होता. “राहिलं बहुतेक” म्हणून मी आणि बारीक एका ताटात बसलो. लिंबू नाय म्हंटल्यावर चावरे जरा नाराज झालं
“ते काढ की बाजूचं, त्या त्रिशूळला खवलेलं, ढाकोबाचा प्रसाद म्हणून घ्या” बारीक नाय ती आयडिया सांगत होतं
“कशाव पडलाय रे तू नक्की, तसाच त्रिशूळ घुसल ना तुझ्या हेच्यात मग कळल तुला, जेव गप” पुंडल्या एकदम फोर्म मधी आलं
हावऱ्यागत चिकन खाल्लं त्यादिवशी. हाताची चव वगेरे ठीके पण आशा माहोलमधी तिथली माती खाल्ली तरी ती भारी वाटल. म्हणून काय लगी माती नाय खायची हे आपलं उपमा टाईप कायतरी.
जेवण झाल्यावर लय वेळ गुहेच्या कड्यावर पाय खाली सोडून गप्पा हाणल्या. आधी-मधी दुसऱ्या तोंडाला असलेल्या कडक ढाकोबाच्या वाटारलेल्या डोळ्याशी बघाबघ चालू होती. लय वेळानी डोळ्यावर भेंडीची तार आल्यागत झालं. "झोपा राव आता, लय झोप आलीत, खाली पडल नायतर गुंगीत" म्हणून मी उठलो. "हा मंग विक्याचा आत्मा हितं भटकत बसल, ढाकोबा नंतर विकोबा पण फेमस व्हील" बारीक दात काढत बसल. "घाण तोंडाच्या गप की" म्हणत बारीकला धक्का देऊन परत मागं वढला "पडल ना ऐ गांडो" घाबरलं बारीक, तो सोडून सगळी हसायला लागली.
"झोपा आता" मी झोपायला चादर टाकली. जेवताना सारखंच हितंपण दोनजन एका चादरीत असं करून झोपली. मी आणि बारीक एका चादरीत होतो. कड्यापासून 10-12 फुटावर आम्ही झोपलो होतो. त्यानंतर पुंडल्या, चावरे बाकी पोरं लायनीत झोपली. पाठ टेकल्यावर लय भारी टाईप कायतरी वाटलं. "सकाळचा गजर लाव रे बारीक, सहाचा लाव, कड्याव बसून मस्त चहा मारू" म्हणसतोवर बारीक घोराय लागलं होतं.बारीक त्या कुशीव मी ह्या कुशीव, गुहेच्या तोंडाकडं तोंड करून. गार लागत होतं मंग तोंडावर घेतलं.
मस्त चिल वाटत होतं. बाहेर मधून-मधून वाऱ्याचा आवाज येत राहिला. घेतलेला श्वास जाणवत होता. कधी झोप लागली कळलंच नाय.
किती वेळ झोपलो माहीत नाय, पण कायतरी स्वप्नं पडल्यागत झालं. कुठंतरी उघड्याव झोपलोय, कुणीतरी बळंबळं चादर तोंडावर दाबून ठेवलीत. कोणतरी आजूबाजूला घुमतंय. तशे भासकंनी डोळे उघडले. झोप एकदम मोडल्यागत झालं. ते कधी कधी होतं ना एखादं स्वप्न पडून गेलं तरी त्या स्वप्नात असल्यागत वाटतं, तसं कायतरी झालं. हार्टबीट वाढल्यागत वाटत होतं. म्हणलं ‘आयला ह्ये काय इन्सेपशने’ त्या लिओनार्डो कापरे सारखं.
तेवढ्यात त्या स्वप्नात जसं कोणतरी आजूबाजूला घुमतंय असं वाटत होतं ते खरंच जाणवायला लागलं. दोन मिनिटं मी कुठंय काय चाललंय काहीच सुधरना. आपण ढाकच्या गुहेत झोपलोय, कड्याच्या बाजूला, समोर ढाकोबाचं छोटं देउळे, तिथं डोळे वाटारलेली मूर्तीऐ, शेजारी पलीकडं कूस करून बारीक झोपलंय एवढं पक्कं सुधारलं. आपल्या भोवती कोणतरी चालतंय,फिरतंय हे पण पक्कं व्हायला लागलं. तो आवाज मधीच कमी जास्त व्हायचा, कधी डोक्याच्या मागं कधी खाली पायाजवळ, कधी कानाजवळ. थोडं फाटल्यागत झालं. असं वाटलं बारीकला हलवाव, पण म्हणलं नको उगं ते पण घाबरल. मी एकटाच फाटलोय तेवढं ठिके. डोक्यात कायपण यायला लागलं, आपण गुहेत काय माती तर नाय खाल्ली ना. वशाट केलं त्यामुळं तर नाय काय झालं, पण इकडं तर वशाट प्रसाद म्हणून दाखवतात, तेवढ्यात आठवलं मगाशी आम्ही बाजूच्या गुहेत मुतायला गेलो होतो, तिथं एक बकरं मारलं होतं, त्याची कातडी-बितडी तिथंच पडली होती त्यावरच आम्ही टाईमपास म्हणून धार धरली होती, पोरं तर त्यावर पार ए-बी-सी-डी काढत होती. त्यामुळं तर नाय ना काय झालं, ते काय साधं बकरं न्हवतं शेवटी ते बकरं ढाकोबाला बळी दिलेलं होतं, ढाकोबाचा प्रसाद होता तो. ढाकोबा म्हणलं असल "विक्या भाड्या माझ्या बकऱ्याव मूतला? संपला तू आता" डोक्यात कायबी यायला लागलं. गावातलं बाबा आठवलं "त्यो, काय येडा नाय, बघतोय त्यो" काय येडयागत वागलं तर ढाकोबा खाली दरीत ढकलतंय, सगळं आठवायला लागलं. आत्ता पुर्रा घाम फुटला होता. खरंच असं वाटलं उठून ढाकोबाच्या पाया पडाव. पण म्हणलं नको, आई घालूदे. चादरी बाहेर यायलाच नको. मी हाताच्या मुठीनी चादर अजून जाम धरली. आजूबाजूला फिरल्याचा आवाज काय कमी होत न्हवता. एकदम असं वाटलं हा भास तर नसल. हा तसंच असल. नायतर माझ्या एकट्याला कशाला त्रास दिल ढाकोबा. सगळी तिथं मुतलीत, सगळयांनी वशाट खाल्लंय, सगळ्यांनी दात काढलेत. सगळी त्या बाबाव हासलीत, मंग आवाज पण सगळ्यांना ईल ना. म्हणून मी माझी समजूत घातल्यागत केलं. पण चादर सोडत न्हवतो, उगं कोणतरी भास्कन तोंडावरून चादर काढून म्हणल "विक्या मेला तू आता" नकोच ना ते. घुमल्याचा आवाज येतच होता. पण पुढं काय होत पण न्हवतं, जसा टाईम सरकत होता तसं ग्रेस पॉईंट भेटल्यागत वाटत होतं. बहुतेक भासच दिसतोय, मी माझी समजूत घालायला सुरुवात केली... तेवढ्यात बारीक कानापशी आलं "विक्या तुला आवाज येतोय का रे कसला".... संपलं सगळं संपलं आता. म्हणजे हा भास नाईये. आईच्या गावात.....! कपाळात आता...
"तुलापण येतोय आवाज?" बारीकला दबक्या आवाजात विचारलं. "हा रे,लय वेळ झाला,कोणतरी आजूबाजूला फिरतंय असं वाटतंय" त्ये बी घाबरलं होतं. काय कराव कळत न्हावतं. आंग सगळीकडून गरम झालं. "पोरांना उठवायचं का?" बारीक बोलला "नको, सगळीच घाबरतील नायतर" म्हणून मी त्याला गप केलं. खरं तर मला चादर बाजूलाच सारायची न्हवती, डेरिंग व्हीना काय बघायची.
"तुला काय वाटतं, काय असल" बारीक विचरत होतं
"काय माहीत, पण जे काये ते काय करत नाहीये,नुसतं फिरतंय बाजूला" मी जरा सावरायला बघत होतो.
"बहुतेक कुणाला मारायचं ते चेक करत असल" बारीक हागऱ्यागत बोलत होतं.
"गप की गांडो,तुलाच पैला घ्यायला पायजे मंग,त्या घळी पासून बोंबलत येतंय, त्यो काय येडा नाय वगेरे, गरज काये बोंबलायची भाड्या"उचकलो मी
"आरे तसं काय नाय, तसं असतं तर दोरी वरून चढतानाच ढकलला असता मला दरीत" बारीक पार कोडगं झालतं.
चादरीत आमची खुसुरपुसुर चालूच होती. लय वेळ झाला होता असं वाटलं. आजूबाजूचा घुमन्याचा आवाज कमी झालता पण वाऱ्याचा आवाज तेवढा चालूच होता. "बारीक, आवाज कमी झाला ना"
"हा, वाटतंय तसं"
"कधी, उजाडतंय असं झालंय"
"तीन-चार तरी वाजले असतील"
"हा" म्हणत जरा रिलॅक्स झालो आणि मगाच पासून मुठीत पकडलेली चादर जरा लूज सोडली पण तोंडावरची काय नाय काढली. मागं कॉलेजला असताना आम्ही पोरं-पोरं बसलो असतांना नुकतंच मिसरूड फुटलेल्या एका ज्योत्षी टाईप पोरानी सांगितलं होतं “जेव्हा कधी अस्वस्थ वाटेल, धडधड वाढेल तेव्हा फक्त श्वास मोजत राहा.........हरी ओम” किती भक्तीभावानी सांगत होतं ते
आनी आम्ही “आम्हाला नाय ओ कधी असलं होत,हितं पैशे मोजायच्या वयात कुठं श्वास-बीस मोजायला सांगता राव, जावा तुम्ही” म्हणून आम्ही त्याच्यावर पण दात काढले होते. कर्मदरिद्रीपणाची लक्षणं कुटून कुटून भरली होती आमच्यात.
ते आठवून अधाशा सारखे श्वास पण मोजून झाले. एक....दोन..तीन...पाच..पन्नास..पाचशे...हजार..... नंतर बारीक पण झोपलं बहुतेक, कितीतरी वेळानी मलापण झोप लागली. कधी कळलंच नाय.

"विक्या उठ ना ऐ, चहा ठेव ना, उठ ना ऐ" कोणतरी लय लांबून हाका मारल्यागत वाटत होतं. च्यायला स्वप्नात पण कोणतरी स्वयपकाचच काम सांगत होतं.
भास्कनी तोंडावरची चादर वढली. "लय तोंड वर करून बोलत होता, पहाटं उठून, कड्यावर चहा प्यायला बसू, पहाट-बिहाट मरू दे, आठ वाजता तरी उठ,आणि चहा ठेव पैला" पुंडल्या लय वेळ लय बोलत होता असं वाटलं.
"डुकरांनो चहा तरी ठेवा की तुम्ही” झोपेचं वाटूळं केल्यामुळं पुंडल्यावर उचकलो मी.
"डुक्कर कधी चहा पीतं का रे आणि असं कसं, तू आचारी ऐ" म्हणत पुंडल्यानी बारीकच्या पण तोंडावरची चादर वढली "उठे भुताडकी"
"घन्टा आचारी" वैतागुन मी उठलो.
कुंडातल्या पाण्यानी हात पाय धून गुळणा केला. डोक्यातून रात्रीची गोष्ट जात न्हवती. असं वाटलं च्यायला, नक्की हे सगळं घडलं होतं का सगळं स्वप्नं होतं. बाकी पोरं मस्त गुहेच्या तोंडावर उतानी- पालथी बिलथी लोळत पडली होती. ही सगळी एवढी निवांते म्हणल्याव नक्की काल रात्री काय झालतं का नाय. बारीकपण उठल्या पासून गप होतं. इरवी ह्याची जीभ लय चरचर चालती पण मगाच पासून गप पडलं होतं कोपऱ्यात. म्हणजे नक्की काय झालं असल. तसं बारीक आणि माझी नजरानजर झाली पण ते बी काय बोलंना आणि मी पण. पोरांनी चूल पेटवून ठेवली होती आणि त्यावरच हात-पाय शेकत बसली. वातावरण तसं शांतच होतं. ढाकोबाच्या मूर्तीकडं दोन-तीन वेळा बघून झालं.
"चहाचे कप काढ रे" म्हणून चुलीवरून चहा खाली घेतला मी. पुंडल्यानी चहाचे कप खाली लायनीत ठेवले. बारीकनी त्यावर गाळणी धरली. दोन कपात चहा वतुन झाला तेवढ्यात कायतरी आवाज आला. वळखीतलाच वाटला तो. हाईट म्हणजे तो कनटीन्यू येत राहिला. गुहेत शांती असल्यामुळं आवाज परफेक्ट ऐकू येत होता. अरे हा तर तोच आवाजे. रात्री येत होता तसा. बारीकला पण ते जाणवलं बहुतेक, कारण आमचं दोघांचं पण लक्ष तिकडं गेलं. तोच आवाज. कोणतरी घुमल्यागत. आरे पण आत्ता, दिवसा? त्या नादात आम्ही कपात चहा वतायचा तर खाली वतला. "अय येड्यांनो नीट चहा वता की" पुंडल्या बोंबललं.
तोच आवाज ते पण आमच्या समोरच? बारीक-मी एका टायमालाच गर्रकनी मागं वळून बघितलं. आणि समोर बघितलं ते बघून डोकं भंजाळलंच एकदम. काल ज्या आवाजानी काळीज तोंडातून बाहेर पडायचंच फक्त बाकी होतं. नाय नाय तिथून घाम फुटला. मेंटल झाल्यागत झालतं. ती आमच्या समोर एकदम निवांत हिकडून-तिकडं फिरत होती. पांढऱ्या रंगाची.... फाटलेली.... एक प्लास्टिकची पिशवी.......!
काय.....एक फाटलेली प्लास्टिकची पांढरी पिशवी....!
वाऱ्यामुळं सर्र-सर्र करत तेवढ्या तेवढ्यात जमिनीला घासत हिकडं तिकडं फिरत होती. बारीक माझ्याकडं बघतोय मी बारीककडं. ह्याचा आवाज होता रात्री??? ही फाटलेली पिशवी??? आम्हाला फक्त अटॅक यायचा राहिला होता. हिला असं सोडून चालणार न्हवतं. इवढीश्या फाटलेल्या पिशवीने आमची फाडून ठेवली.
"ह्ये पकड रे" म्हणत बारीकनी चहाची गाळणी पुंडल्याकडं दिली आणि पिशवीवर तुटून पडला पण वाऱ्यामुळं ती बारीकच्या हातातून एक दोनदा निसटली. फायनली तिची मुंडी पकडत "हिच्या तर आता आईला...."म्हणत दातओठ खाऊन तिचा बोळा करून पूर्ण ताकतीनी गुहेबाहेर फेकली. तशी ती पिशवी वाऱ्याबरबर उडत गेली. तिच्या पुढच्या धामाला,जिच्यामुळं असं वाटलं आता आम्हाला हा धाम सोडाय लागतोय. गेली उडून एकदाची..... तसं मी आणि बारीक एकमेकाला टाळ्या देत लय मोठ्यानी दात काढायला लागलो. "काय झालं रे ह्यांना" चावरे आणि बाकी पोरं पण येड्यागत आमच्याकडं बघायला लागली. "त्यो काय येडा नाय" आम्ही दोघं पण जोरात बोंबललो. "येडी झाली का रे ही" म्हणून पोरांनी आपले आपले चहाचे कप उचलले. आम्हीपण आमचे कप घेऊन चिअर्स-बिअर्स करून सेलिब्रेशन करत,फुर्रर्रर्र करून नरड्याखाली चहा ढकलला.
दुपारचं जेवण उरकून सगळं आवरायला घेतलं. भांडी -कुंडी धून कुंडात आहे तशी ठेवली. गुहा झाडून घेतली. निघताना ढाकोबाला बघत इमानदारीत पाया पडलो. एकएक करत खाली उतरायला घेतलं. गुहेचा नजारा डोळ्यात साठवल्यागत केलं आणि वटारलेल्या डोळ्याच्या ढाकोबाला मनातल्यामनात "येऊ का? येतो परत" म्हणत पाठमोरा होत सगळ्यात शेवटी मी खाली उतरलो.
चारेक वाजले, गावात आलो. एखादी सायकल पूर्ण झाल्यागत वाटलं. शाळेच्या अलीकडं त्या म्हाताऱ्या बाबाचं घर लागलं. बाबा घराबाहेरच एका दगडावर बिडी फुकत बसलं होतं. आम्हाला बघताच बिडी बाजूला टाकत ते बाहेर आलं. "आलं व्हय तूम्ही" आमच्या पुढ्यात उभं राहिलं.
"आले म्हणजे? बाबाला काय डाउट होता का, आपल्या येण्यावर?" बारीक कडमडलं.
"गप ना, ती पिशवी दे बाबाला" मी बोललो. नेहमीप्रमानं शिल्लक राहिलेलं तांदूळ-तेल-मसाले वगेरे सामान एका पिशवीत बाजूला काढून ती एखाद्या गाववाल्याला देतो. या टायमाला ”बाबा हे घ्या” म्हणत त्याच्या हातात दिली. गाड्यांना स्टारटर मारला. ”पोरांनो या परत” म्हणत मागं आलेल्या बाबानीपण त्याचे आधीच आत गेलेले गालफाड खुलावले.
पुढं देहूरोड बायपासला आम्ही चहाला थांबलो. पोरांची एकमेकावर उडाउड चालूच होती. मी कुठंतरी शून्यात गेलो. काल रात्रीची फाटलेली फक्त माझ्या आणि बारीक मध्येच राहिली. अ‍ॅजे झाकली मुठ सव्वा लाख म्हणून. पण राहून राहून एक वाटत राहिलं. रात्री थोडावेळ-एखाद सेकंद जरी काल तोंडावरून चादर काढली असती तर एवढी फजिती नसती झाली. या सगळ्यातून एक धडा घेतला तो एकदम फिट्टच. कसंय ना प्रॉब्लेम-बिब्लेम तर येतच राहतात. त्यामुळं उगं त्याला घाबरून-भिऊन तोंडावर चादर घेण्यात काय अर्थ नाय. ती चादर बाजूला सारून जे आहे ते फेस करणं जास्त महत्वाचंय त्याशिवाय वस्तुस्थिती नाय कळायची. नायतर आयुष्यात आपली अशीच फजिती आणि फाटत राहणार, बीनकामाची, उगाचच. आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा आपण सगळेच कुठली ना कुठली चादर तोंडावर घेऊन प्रॉब्लेम टाळायचं बघतो. बऱ्याच वेळा भित्यापाठी ब्रह्मः राक्षस सारखी गत होते. सगळी आपल्या मनाची भीती,मनाचे खेळ. प्रत्यक्षात काय नसतं पण. एक लय भारी फॉर्म्युला त्या रात्री ढाकच्या गुहेत सापडला.
"भें......डी" बारीकनी माझं बोट गरम चहाच्या कपात बुडवलं तसा मी बोम्बललो, पोरं हसायला लागली.
“मानसात ये जरा, कुठं गेलता रे” बारीक दात काढत बोललं
"तिकडंच.... गुहेत" भाजलेलं बोट बारीकच्या शर्टला पुसत मी बोललो
“गुहेत परत? "
“हा, ढाकोबा पावला म्हणायचा, चल काढ गाडी” म्हणत मी बारीकच्या मागं बसलो. तिकडं सूर्यपण डुबला.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

फोटो टाकयचा ट्राय केला पण, होत नाहीये बहुतेक

कपिलमुनी's picture

15 Jul 2020 - 12:00 am | कपिलमुनी

लेख आवडला,
असेच लिहीत राहा

विखि's picture

15 Jul 2020 - 11:07 am | विखि

हौसला अफजाई बद्दल आभार _/\_

अर्धवटराव's picture

15 Jul 2020 - 12:52 am | अर्धवटराव

जे आहे ते फेस करणं जास्त महत्वाचंय...

खरच पावला ढाकोबा :)

विखि's picture

15 Jul 2020 - 11:12 am | विखि

हा ना, बेक्कार पावला :)

शा वि कु's picture

15 Jul 2020 - 8:18 am | शा वि कु

जाम हसलो राव. एकदम भारी लिहिलेत.

विखि's picture

15 Jul 2020 - 11:14 am | विखि

ह्ये सगळं आठवून आम्ही तर अजून हसतो :)

सुखी's picture

15 Jul 2020 - 8:25 am | सुखी

मस्त अनुभव :D

फोटो टाकायचा प्रयत्न परत करा... फोटो शिवाय मजा नाय राव

विखि's picture

15 Jul 2020 - 11:17 am | विखि

खरंय फोटो पायजेच, पण व्हीना ना ते :) ट्राय चालुये

विखि's picture

15 Jul 2020 - 11:40 am | विखि

.

सोत्रि's picture

15 Jul 2020 - 11:54 am | सोत्रि

जबरदस्त!

कसंय ना प्रॉब्लेम-बिब्लेम तर येतच राहतात. त्यामुळं उगं त्याला घाबरून-भिऊन तोंडावर चादर घेण्यात काय अर्थ नाय. ती चादर बाजूला सारून जे आहे ते फेस करणं जास्त महत्वाचंय त्याशिवाय वस्तुस्थिती नाय कळायची. नायतर आयुष्यात आपली अशीच फजिती आणि फाटत राहणार, बीनकामाची, उगाचच.

हे खरं चेरी ऑन द टॉप आहे!

- (चादर बाजूला सारून बघण्याचा सराव करणारा) सोकाजी

येक नंबर, सुरेख लिहिलं आहे.

> खाली खोल दरी,बाजूला वर ढगात घुसलेला कळकराय सुळका, तोंडाव येणारं गार वारं. ....
> जेवण झाल्यावर लय वेळ गुहेच्या कड्यावर पाय खाली सोडून गप्पा हाणल्या.

ह्ये वाचून ढाक बहीरीचा हा फोटू अठीवला. मागल्या धुक्यातला हाय तोच कळकराय सुळका.

फोटो

विखि's picture

15 Jul 2020 - 12:30 pm | विखि

तेवढा फोटो कसा टा़कला सान्गा की राव :)

king_of_net's picture

15 Jul 2020 - 12:44 pm | king_of_net

फोटो अपलोड
12 Oct 2019 - 5:24 pm | सुमो
पोस्ट इमेज आणि Imgbb हे पर्याय आहेत.

तसंच एम्बेड फोटोज इथं तुमच्या फ्लिकर फोटोची लिंक दिल्यास त्या फोटोची एम्बेड लिंक आणि फोटोचा डायरेक्ट url मिळतो .

हे ट्राय करुन बघा....

king_of_net's picture

15 Jul 2020 - 12:36 pm | king_of_net

एक नंबर!!!

अर्धवटराव's picture

15 Jul 2020 - 9:24 pm | अर्धवटराव

हे साहेब कसले निवांत बसलेत _/\_

तुषार काळभोर's picture

15 Jul 2020 - 9:48 pm | तुषार काळभोर

सार्थक झालं असेल ट्रेक केल्याचं !!

विखि's picture

15 Jul 2020 - 1:16 pm | विखि

.

king_of_net's picture

15 Jul 2020 - 1:30 pm | king_of_net

आला की...
येउद्यात बाकिचे सारे फुटु...

king_of_net's picture

15 Jul 2020 - 1:34 pm | king_of_net

अजुन एक मदतीचा हात..

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

विखि's picture

15 Jul 2020 - 2:47 pm | विखि

आभार किंगराव _/\_ जमलं एकदाचं :)

विखि's picture

15 Jul 2020 - 2:13 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:19 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:20 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:21 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:34 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:34 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:35 pm | विखि

.

तुषार काळभोर's picture

15 Jul 2020 - 9:46 pm | तुषार काळभोर

हा असला प्रकार तुम्ही रात्रीचा केलात? फाटली कशी नाही, म्हणतो मी !!

विखि's picture

16 Jul 2020 - 8:45 pm | विखि

खरंय ते , पण वाट नेहमीची होती त्यामुळं जास्त नाय फाटली, नंतर फाटली पण त्या पिशवीमुळं :)

विखि's picture

15 Jul 2020 - 2:36 pm | विखि

.

अर्धवटराव's picture

15 Jul 2020 - 9:44 pm | अर्धवटराव

दोर आणि लाकडी शिडी पक्की आहे कि नाहि हे चेक करायला काहिच मार्ग नाहि :(
डेंजर आहे राव.

विखि's picture

16 Jul 2020 - 8:42 pm | विखि

खरंय, तेवढं शिडी-दोरचं रामभरोसे आहे, पण इतक्या वर्षात तिथं काही अपघात घडल्याचं ऐकीवात नाही, बर्‍यापैकी मजबुत आहे, हा जरा डुगडुग करती पन :)

विखि's picture

15 Jul 2020 - 2:36 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:36 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:37 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:38 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:39 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:39 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:39 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:40 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:40 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:42 pm | विखि

.

विखि's picture

15 Jul 2020 - 2:43 pm | विखि

.

भारी लेख आणि फोटो. इनो घेणार होतो पण इनो कुठेच मिळत नाहीये सध्या.

विखि's picture

16 Jul 2020 - 8:38 pm | विखि

हे हे हे हे, आभार

जब्बरदस्त !!! पिशवीचा फोटो घेतला कि नाही :P :D

विखि's picture

16 Jul 2020 - 8:36 pm | विखि

हा हा हा, नाय ना, आओ त्या पिशवीचा एवढा राग आलताना, पाहिल्याच घावात तिचा चेन्दामेन्दा करुन गुहेबाहेर फेकली तिला :)

विंजिनेर's picture

16 Jul 2020 - 4:56 am | विंजिनेर

झकास लिहलंय राव. ढाकचा बहिरी आहेच तसा भारी. बाहेर सायंकाळून येताना गुहेतून बघत बसावं निवांत - जबरी अनुभव असतो तो.
बाकी, खाली उतरताना वानरं नव्हती वाटतं आजूबाजूला आणि सुई आणि डोंगरामधून येतानाचा घसार्‍याचा फटू नाहिये वाटतं?

विखि's picture

16 Jul 2020 - 8:34 pm | विखि

खरंय, ढाकचा नाद नाय, जुना ट्रेक आहे हा आमचा, तेव्हा स्मार्ट फोन वगेरे प्रकार न्हवता लय, त्यामुळ् लिमीटेड फोटो आहेत

टवाळ कार्टा's picture

16 Jul 2020 - 5:50 am | टवाळ कार्टा

भारी

विजुभाऊ's picture

16 Jul 2020 - 6:54 am | विजुभाऊ

अह्हाहा. काय मस्त लिहलय राव. एमदम थेट तिथेच जाऊन आल्यासारखे वाटले.
भेटा एकदा एक प्यार्टी लागू तुम्हाला. फर्मास.

विखि's picture

16 Jul 2020 - 8:28 pm | विखि

हा हा हा, चालतयं की :) आभार

च्या मारी.... डेंजर काम आहे हि गुहा....
आणि रात्री तर एकदम बोगदा...

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2020 - 1:20 pm | चौथा कोनाडा

एक नंबर लिहलंय, फोटो बी आर्रररर भारी ! मज्जा आली वाचताना !

विखि's picture

16 Jul 2020 - 8:36 pm | विखि

आभार _/\_