न्यूज १८ च्या संकेतस्थळावर Lt Gen Hooda यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा, एक नेमका आणि प्रत्येकालाच नेमक्या जबाबदारीचे नेमके भान देणारा लेख आला आहे.
कॉपीराईटमुळे संपूर्ण लेख देऊ शकत नाही तो न्यूज १८ च्या संस्थळावर जाऊन वाचणे अधिक उत्तम त्यांच्या मुख्य मुद्यांचा खाली गोषवारा.
१) Lt Gen Hooda (निवृत्त असावेत) म्हणतात की सार्वजनिक माहिती पेक्षा अधिकची माहिती त्यांच्याकडे नाही पण लदाख परिसर व Line of Actual Control (LAC) चे भारतीय लष्कराकडून होणारे व्यवस्थापन पद्धतीची त्यांना व्यवस्थीत कल्पना आहे.
२) ज्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चिनचे आपापले म्हणणे आहे त्यात Pangong Tso and Depsang या दोन जागांचा समावेश होतो . आत्ता पर्यंतची स्थिती आपापल्या म्हणण्यानुसार असलेल्या नियंत्रण रेषे पर्यंत दोन्हीही फौजांनी आपापली गस्त चालू ठेवावी पण कायमस्वरूपी प्रेझेन्स ठेवू नये. म्हणजे दोन्ही बाजूंचा क्लेम चालू राही.
३) Pangong Tso आणि Depsang, मध्ये जिथे गस्त करण्यासाठी चिनी आणि भारतीय सैन्य दोन्हींनाही परवानगी होती तिथे चिनने स्वतःच्या सैन्यतळाचा जम बसवून भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखून ठेवले आहे. -म्हणजे चिनचे सैन्य गस्त घालून गेले असते आणि भारतीय सैन्यालाही त्यांची गस्त घालता आली असती तर समस्या नव्हती.
४) कायमस्वरूपी तळ दोन्ही सेनांनी करू नयेत असा ताळमेळ असताना तो चिनी सैन्याने मोडू नये अशी अपेक्षा आहे एखाद्या बाजूने मोडला तर चर्चेच्या नेमक्या पायर्या करारात आहेत आणि त्या पायर्यांमध्ये भारतीय सैन्याने सांगितल्या प्रमाणे त्यांची गस्त संपवून चिनी सैन्य मागे फिरलेले नाही उलट पक्षी सैन्य तळ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे चर्चेद्वारे चिनी सैन्याने मागे फिरावे म्हणून भारतीय बाजूकडून सांगून पाहिले जात आहे.
५) हुडांच्या म्हणण्यानुसार युद्धाची भूमिका घेण्यापुर्वी चर्चेच्या संधी वापरून घेणे अधिक उचित पण आपल्या बाजूने होणारी चर्चा अधिक नि:संदिग्ध अशा स्वरूपाची असावयास हवी.
६) 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' आणि 'विवाद्य सीमा क्षेत्र' या दोन वाक्य प्रयोगात अल्पसा पण महत्वाचा फरक आहे. 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' ला 'विवाद्य सीमा क्षेत्र' म्हटले की मानसिक दृष्ट्या दुसर्याची बाजू तुम्ही आधीच स्विकारून दुसर्या बाजूस अधिकची संधी देता तर हुडांच्या म्हणण्यानुसार भारतीय सीमेच्या बाबत भारतीय सैन्याच्या अधिकार विषयक तडजोड करण्याचे भारतीयांना कसलेही कारण नाही. ज्या भूभागावर भारत अधिकार सांगतो त्यास 'विवाद्य सीमा क्षेत्र' ‘disputed area’ and ‘grey zone’ हे शब्द प्रयोग भारतीयांनी टाळले पाहीजे.
७) सध्या 'विवाद चालू असलेल्या सीमा क्षेत्रात' समस्या असली तरीही भारतीय सैन्य संपूर्ण नियंत्रणातील भूमीवरील कब्जा गामावत चालले आहे अशी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल बरोबर नाही, सरकारे कोणतीही असोत डोळ्यात तेल घालून संपूर्ण नियंत्रणातील कोणताही भूभाग भारतीय सुरक्षा दलांनी अद्याप गमावलेला नाही. तसा अभास निर्माण करणे भारतीय सुरक्षा दलांच्या आता पर्यंतच्या योगदानास कमी लेखणारे ठरते. त्यामुळे भारतीयांचे मनोबल खच्ची करण्याची शत्रुस हकनाक संधी मिळते अशी संधी देणे सर्वांनीच टाळले पाहिजे.
८) आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षमता व इच्छाशक्ती आणि त्या तुम्ही नि:सदिंग्धपणे कसा जाणवून देता हे महत्वाचे असते.
In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी. १०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो. ११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी. १२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे. * हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
वाचने
48161
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
नियंत्रण रेषेच्या बाबत
जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक
“ There will be no withdrawal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Parisमाझा मॅनेजर ऑस्ट्रेलियात
निसटत्या बाजू सावरा
किती ते चिडवायचं? :)))
In reply to निसटत्या बाजू सावरा by अभ्या..
निसटत्या बाजू आणि उत्तरदायित्वास नकार !
In reply to निसटत्या बाजू सावरा by अभ्या..
बर्नॉल...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Parisआता हे काय नविनच!
आता भूतानची पाळी !
In reply to आता हे काय नविनच! by वामन देशमुख
मला एक शंका वारंवार येतीय.
In reply to आता भूतानची पाळी ! by वामन देशमुख
जिनपिंगच्या काळात काही मिलियन
In reply to मला एक शंका वारंवार येतीय. by शाम भागवत
मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो
In reply to आता भूतानची पाळी ! by वामन देशमुख
आणखीन एक
In reply to मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो by राघव
अहो, घटना घडतच असतात. आपण
In reply to आणखीन एक by राघव
चीन आणि त्याची हालचाल...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiनक्कीच...
In reply to चीन आणि त्याची हालचाल... by मदनबाण
दीपक व्होरांचा एक विडिओ आहे,
@ राघव, दिलेला व्हिडियो
In reply to दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, by राघव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiधन्यवाद बाणा. होय हा विडीओ
In reply to @ राघव, दिलेला व्हिडियो by मदनबाण
व्हिडिओ आवडला, बरीचशी मतं
In reply to दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, by राघव
काही महत्वाच्या बातम्या :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalWhy China’s New Claim to
In reply to काही महत्वाच्या बातम्या :- by मदनबाण
१९६२ च्या युद्धात भारतीय
In reply to Why China’s New Claim to by वामन देशमुख
स्ट्रॅटेजिक अॅडव्हांटेज -
@ राघव आजच पूर्व एयर चीफ
In reply to स्ट्रॅटेजिक अॅडव्हांटेज - by राघव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalIndia-China Standoff: 144
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthistवुहान परत एकदा गाजायला लागेल
किंग्ज गोल्ड ज्युवेलरी
In reply to वुहान परत एकदा गाजायला लागेल by शाम भागवत
:)
In reply to किंग्ज गोल्ड ज्युवेलरी by सतिश गावडे
चीनच्या एकूण सोन्याच्या
In reply to :) by शाम भागवत
जालावर रडार आणि अँटी रडार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Meinमाझ्या माहिती नुसार चीन ने ही
In reply to जालावर रडार आणि अँटी रडार by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Meinइस्लामी राष्ट्र म्हणुन ज्याची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodhचीनी उपद्व्याप...China
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumatiआपल्या इस्रोचा स्पाय सॅटेलाइट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- Kedarnath'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ?
In reply to आपल्या इस्रोचा स्पाय सॅटेलाइट by मदनबाण
'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे
In reply to 'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? by माहितगार
काही दिवसापासून मराठी
नेमक्या कोण कोणती वृत्तपत्रात
In reply to काही दिवसापासून मराठी by धनावडे
लोकसत्ता आणि पुढारी
In reply to नेमक्या कोण कोणती वृत्तपत्रात by माहितगार
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China backमदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China backआत्ताच माझ्या वाचनात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian vs Chinese Air Force: Is the Indian Air Force superior to the Chinese PLAF?https://www.aajtak.in
चीन.बरोबर जे मतभेद आहेत
बरोबर.. परिस्थिती हाताबाहेर
In reply to चीन.बरोबर जे मतभेद आहेत by Rajesh188
चीन समोर भारतीय सेना टिकाव
In reply to चीन.बरोबर जे मतभेद आहेत by Rajesh188
चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल.-- या विधानाला काही आधार की असाच हवेत गोळीबार ? मुळात चीनी सैन्याला युद्धाचा अनुभव शून्य आहे या उलट पाकिस्तानच्या कृपेने भारतीय जवान सतत एक्टिव असतात. या शिवाय सियाचीन सारख्या अतिऊंच भागांचा भारतीय सैन्याला सराव आहे याच्या उलट चीनी सैन्य समुद्र सपाटिच्या भागातून हिमालयात येते. हिमालयातील लडाक भागात जर युद्ध पेटले तर भारतीय सैन्य चीन्यांना वरचढ ठरेल यात शंका नाही. याची छोटिसी झलक भारतीय सैन्याने, १९६२च्या युद्धात गमावलेले अनेक पॉईंट परत घेऊन दाखवून दिली आहे.राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे.
In reply to चीन समोर भारतीय सेना टिकाव by प्रसाद_१९८२
सहमत आहे
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
हे मुद्दे वाचून चांगल वाटलं.
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
मुद्दा क्रमांक ७ व ८ ला पूरक माहिती
In reply to राजेशभौ, २०२० ची परिस्थिती वेगळी आहे. by शाम भागवत
अगदी सद्दाम हुसेन प्रमाणे
In reply to चीन समोर भारतीय सेना टिकाव by प्रसाद_१९८२
भारतातील 10 हजार लोकांवर चीन
इंडियन आर्मी केहेते हैं हमे !
सैनिकांची हालचाल पण भारतीय अती हुशार मीडिया नी प्रसिद्ध केली
सहमत आहे, तसे
In reply to सैनिकांची हालचाल पण भारतीय अती हुशार मीडिया नी प्रसिद्ध केली by Rajesh188
भारतीय माध्यमात जे काही येतंय
In reply to सहमत आहे, तसे by माहितगार
त्या साठी गुप्त माहीत उघड
In reply to सैनिकांची हालचाल पण भारतीय अती हुशार मीडिया नी प्रसिद्ध केली by Rajesh188
shocking...........
कोणी दिला पाहिजे राजींनामा?
In reply to shocking........... by गोंधळी
मग आता..
In reply to कोणी दिला पाहिजे राजींनामा? by रात्रीचे चांदणे
@ गोंधळी
In reply to shocking........... by गोंधळी
थोडा थोडा करून
तैवान चा भाग? ??
तवांग लिहायचे होते
In reply to तैवान चा भाग? ?? by सुबोध खरे
भारताचा हा भूभाग चीनने
राजनाथसिंहांना आज ती माहीती संसदेत का द्यावीशी वाटली ?
In reply to भारताचा हा भूभाग चीनने by ऋतुराज चित्रे
तोच 38000 ची गोळी देवून जनतेला परत नशेत ठेवले जाईल
In reply to राजनाथसिंहांना आज ती माहीती संसदेत का द्यावीशी वाटली ? by Rajesh188
कारण तेथे चीनने अधिक भूमीवर
In reply to भारताचा हा भूभाग चीनने by ऋतुराज चित्रे