Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 03/07/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या क्षणभंगुर कवितेवर प्रतिसाद देणार्‍या क्षमाशील वाचकांनो, या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन. धन्यवादाचा. अन् मग विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर ह्या कवितेचं काळंशार मायाळू खत होवो. अन् मग उपेक्षेच्या झळा सोसून, दुर्बोधतेचे आरोप झेलून, कोमेजलेली कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता त्या खतावर पुन्हा जीव धरून तरारो. अन् मग विचक्षण वाचकांनो, त्या बावनकशी कवितेचं असणं, गारूड टाकणं, अस्वस्थ करणारे प्रश्न पाडणं, सारं सारं तुमच्यात अनिर्बंध साथीसारखं पसरत जावो.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3800
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आज खूप दिवसानंतर एकाहून एक सरस लेखन वाचायला मिळाले, त्यातले हे अव्वल रत्न. अनंत यात्री, जियो! सं - दी - प