मी एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतो, आणि थोडक्यात सांगायचे तर सध्या माझे कामाचे स्वरूप नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्याकरता त्यांचे एस्टीमेट आणि प्रपोजल तयार करणे असे आहे. तर, असाच एक संभाव्य प्रोजेक्ट म्हणजे ऍटलांटा एरियात होणाऱ्या एका प्राथमिक शाळेचे रिनोवेशन. इमारतीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी या शाळेत गेलो होतो. शाळेभोवती चक्कर मारत असताना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणारा, आणि बाहेरच्या दिशेने उघडणारा, एक दरवाजा दिसला (खालचा फोटो बघा) आणि हसतच सुटलो .... फोटो बघा तुम्हीसुद्धा हसत सुटाल... दरवाज्या बाहेर खाली उतरण्यासाठी ना जीना ना अजून काही व्यवस्था... म्हणजे आतून दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकले की थेट पहिल्या मजल्यावर... आहे की नाही गंमत? हा अनोखा दरवाजा तुमच्या बरोबर शेअर करावा वाटला म्हणून इथे देत आहे... बघा आणि घ्या हसून..!!!
ह्म्म्म्म, आणि आता हसून झाले असेल तर वस्तुस्थिती सांगतो... हा दरवाजा शाळेच्या मेकॅनिकल रूमचा म्हणजे जिथे बॉयलर किंवा इतर एच. वि. ए. सी इक्विपमेंट्स इंस्टॉल केलेत त्या रूमचा आहे. अर्थात या रुमला आतूनही प्रवेश आहे, पण जर का या इक्विपमेंट्स मध्ये काही बिघाड झाला आणि बदलायची वेळ आली तर नवे इक्विपमेंट या खोलीत सहज, म्हणजे जास्त कष्ट न घेता, हालवता आले पाहिजे म्हणून ही व्यवस्था. असे असले तरी प्रथम दर्शनी हा दरवाज्याने पाहणार्याला अचंबित न केले तर नवल!
-अनामिक

वाचने
1522
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहावं ते नवलंच..
धन्यु! बदल
In reply to पहावं ते नवलंच.. by प्राजु
मस्त
अवजड यंत्रसामुग्री