Skip to main content

ग्रंथ परिचय

भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय. - ४. तळघरातील बंद खोल्या ५. बा(पा)दशाह नाम्यातील ४०२ -४०३ पानांचा संदर्भ

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 20/06/2020 02:09 या दिवशी प्रकाशित केले.

भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.

४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे. ५. बादशाहनामामधील ४०२-४०३ पानावरील भाषांतरातून निर्माण होणारे निष्कर्ष.

४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या तळघरात काही असे अवशेष दडवले असावेत कि ते इतरत्र कुठेही ठेवले तर गवगवा होऊन त्यातून त्या काळातील जनतेत असंतोष पसरेल. त्यापेक्षा तिथल्या तिथेच ते खोलीत बंद करून टाकले तर सोईचे होईल.