✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

र — रातराणी, Wed, 06/24/2020 - 13:03
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला. झाकण काढेन, अशी अख्खी झुकून मी कुकरची वाफ घ्यायला बघेन. तेवढंच स्टीम क्लिनिंग.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. पाणी टाकायला विसरल्याने झालेला बटाट्याचा कोळसा, आता कसे वडे करू? तू आता कुकर कसा घासायचा या चिंतेत असशील मी हसून पुन्हा मोबाईलमध्ये नवी रेसिपी बघायला सुरू करेन,आत्मविश्वासाने इझी, बिगीनर असे किवर्ड टाकेन बघेन सोपं काही सापडतंय का आणि मग... ..... पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, तेव्हा तुला अरबट चरबट खावंसं वाटेल ना, सिंकमधली भांडी आठवून तुझी भूक मरेल ना?????

प्रतिक्रिया द्या
14395 वाचन

💬 प्रतिसाद (17)

आरारारारारा... चांगलंच तळलं

प्राची अश्विनी
Wed, 06/24/2020 - 13:49 नवीन
आरारारारारा... चांगलंच तळलं की.;)
  • Log in or register to post comments

अरारारारारारारारारारारारा....

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 06/24/2020 - 14:29 नवीन
काही खर नाही बाबा.. त्या युट्युब रेसिप्यांनी तर जाम वैताग आणला आहे या लॉकडाउनच्या काळात. उध्दवा लवकर हाटेलं सुरु कर रे बाबा, लै लोकांचे दुवे मिळतील तुला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 06/24/2020 - 15:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जबरा!

चांदणे संदीप
Wed, 06/24/2020 - 15:47 नवीन
सिंकमधली भांडी आठवून माझीच भूक मेली. ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments

हेहेहेहे मस्त जमलाय... किती

वीणा३
Wed, 06/24/2020 - 21:07 नवीन
हेहेहेहे मस्त जमलाय... किती वेळा अगदी अगदी झालंय काय सांगू :D
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

रातराणी
Wed, 06/24/2020 - 21:38 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

लैच भारी =))

प्रचेतस
गुरुवार, 06/25/2020 - 06:18 नवीन
लैच भारी =))
  • Log in or register to post comments

हे कांड करुन झालंय माझ!

मन्या ऽ
गुरुवार, 06/25/2020 - 11:43 नवीन
हे कांड करुन झालंय माझ! (नको त्या आठवणी!)
  • Log in or register to post comments

हा हा हा.. छान आहे..

गणेशा
गुरुवार, 06/25/2020 - 13:14 नवीन
हा हा हा.. छान आहे..
  • Log in or register to post comments

_/\_

एस
गुरुवार, 06/25/2020 - 14:11 नवीन
दंडवत स्वीकारा! (रच्याकने, पाणी न घालता कुकरला शिट्ट्या कशा होतील? आजकालच्या कुकरांचे काही सांगता येत नाही ब्वॉ!) ;-)
  • Log in or register to post comments

सिटी मार सिटी मार सिटी मार

अभ्या..
गुरुवार, 06/25/2020 - 14:17 नवीन
रात राजाने मारल्या असतील शिट्ट्या. ;) . आजकालच्या नवर्यांचे काही सांगता येत नाही बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

दुत्त्त दुत्त्त अभ्या..

रातराणी
Fri, 06/26/2020 - 18:43 नवीन
दुत्त्त दुत्त्त अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अचूक निरीक्षण

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/25/2020 - 14:25 नवीन
या लॉकडाउन मुळे स्वयंपाकातले बारकावे सगळ्यांना माहित झाले आहेत, युट्युब सुगरणींनो लिहितांना काळजी घ्या... घरी वाट्टेल ते मुकाट खात असलो तरी...इथे वाट्टेल ते लिहिलेले खपवून घेतले जाणार नाही.. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हां बास! हे असं ठणकावून

एस
गुरुवार, 06/25/2020 - 14:29 नवीन
हां बास! हे असं ठणकावून सांगण्याची हिंमत फक्त इथेच करू शकतो! नाही तर काय बिशाद आहे?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पाणी घातलेल हो.. पण पाणी कमी

मन्या ऽ
गुरुवार, 06/25/2020 - 17:57 नवीन
पाणी घातलेल हो.. पण पाणी कमी आणि गॅसची आच मोठी ठेवलेली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

:-) :-)

रातराणी
Fri, 06/26/2020 - 18:41 नवीन
:-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

धन्यवाद :)

रातराणी
Fri, 06/26/2020 - 18:44 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा