अशुद्ध

"आपल्याला कामावरून काढणार आहेत उद्या"
"हो..आता आपल्याकडून काम होत नाहीये ना"
"म्हणून, काढून टाकायचं? वा रे वा"
"मग दुसरं काय करणार"
"इतकी वर्षे सेवा केली आपण"
"त्याचा आता काय उपयोग"
"नेमकं कुठं चुकलं आपलं?"
"मला नाही वाटत आपलं काही चुकलंय"
"हो ना..ज्यांच्यामुळे आपण निकामी झालो त्या वरच्यांना कोणी काढत नाही"
"बघ ना..तसंच असतं ते..गरज सरो वैद्य मरो"
"आपल्या जागी कोण येणार?"
"नविन कोणीतरी आहे! साहेबांच्या नात्यातलं"
"विश्वासू आहे का पण?"
"रक्ताच्या नात्यातला आहे. म्हणजे असणारच"
"रक्त!! त्याचा काय भरवसा?"
"म्हणजे?"
"जिथं आतलंच अशुद्ध झालंय, तिथं बाहेरच्याची काय कथा?"
ट्रान्सप्लांटच्या आदल्या रात्री एक किडनी दुसरीशी बोलत होती!

वाचने
9948
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
Hmmm
+१ लंबर एक!!
:-) +१
अधिकेक !
+१
चान्गली आहे +१
+१
वा !
1
+१
+1 परफेक्ट जमलीय.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
1
+१
+१ खूप मस्त....