Skip to main content

[शशक' २०२०] - अशुद्ध

लेखक चिनार यांनी रविवार, 26/04/2020 16:04 या दिवशी प्रकाशित केले.

अशुद्ध




"आपल्याला कामावरून काढणार आहेत उद्या" "हो..आता आपल्याकडून काम होत नाहीये ना" "म्हणून, काढून टाकायचं? वा रे वा" "मग दुसरं काय करणार" "इतकी वर्षे सेवा केली आपण" "त्याचा आता काय उपयोग" "नेमकं कुठं चुकलं आपलं?" "मला नाही वाटत आपलं काही चुकलंय" "हो ना..ज्यांच्यामुळे आपण निकामी झालो त्या वरच्यांना कोणी काढत नाही" "बघ ना..तसंच असतं ते..गरज सरो वैद्य मरो" "आपल्या जागी कोण येणार?" "नविन कोणीतरी आहे! साहेबांच्या नात्यातलं" "विश्वासू आहे का पण?" "रक्ताच्या नात्यातला आहे. म्हणजे असणारच" "रक्त!! त्याचा काय भरवसा?" "म्हणजे?" "जिथं आतलंच अशुद्ध झालंय, तिथं बाहेरच्याची काय कथा?" ट्रान्सप्लांटच्या आदल्या रात्री एक किडनी दुसरीशी बोलत होती!


वाचने 9948
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

+1

:-) +१

+१

+१

+१

1

+१

चांगली कल्पना

खुप आअडली कथा. शशक म्हणुन तर छान आहेच, रूपक म्हणुन बघतो म्हटलं तर अजुनच अफाट होते कथा. विजेत्या कथांच्या रांगेत असायला हवी हि शशक.

सुरेख -दिलीप बिरुटे

+१

+१

+१ आवडली..

+१

+१ आवडली!

सुन्दर !!

.

+१

+1

+१

+१

जमलीय

आवडली.

1

+१