Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 20/06/2020 17:36 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.


वाचने 90075
प्रतिक्रिया 190

प्रतिक्रिया

१६ जून २०२० पासून चीनवर एक मोठीच आफत ओढवलेली आहे. २०१६ साली युरोपिय संघाने चीनविरूध्द दावा दाखल केला होता. संघाचे असे म्हणणे होते की, चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते. खरेतर हे आरोप चीनवर गेली दोन दशके होत आहेत. पण योग्य व अधिकृत उपाय सापडत नव्हता. अमेरिकापण याच मुद्यावर भर देत होती. पण ट्रंप यांनी हाच मुद्दा यावेळेस जास्त लावून धरला. पण अमेरिकेची गोष्टच वेगळी आहे. ती जागतिक व्यापार संघटनेकडे दावे लावणे वगैरे करत बसली नाही. तिने थेट आयात कर लावायला सुरवात केली व जागतिक व्यापार संघटनेला दम भरला की, संघटनेने चीनवर योग्य कारवाई केली नाही तर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडेल!!! अर्थात ट्रंपला आकस्त्राळे, स्वार्थी वगैरे विशेषणे देऊन चीन मात्र सर्व नैतीक बाबींचे पालन करणारा असं रंगवायला काहींनी कमी केले नाही. लोकांनाही त्यात चुकीचे वाटले नाही, की शंका आली नाही, कारण अमेरिकेचा इतिहास सगळ्यांनाच माहित्येय. आता चीन सरकार अनुदान देते हे सिध्द करता येत नाही हाच खरा प्राॅब्लेम आहे. कारण चीनमध्ये जाऊन आपण माहिती गोळा करू शकत नाही. उलट चीनी लोक इतर देशात मुक्तपणे फिरून पुरावे गोळा करू शकतात. यावर उपाय म्हणून एक नवीनच शक्कल लढवली गेली. जो देश मुक्त व्यापाराचे नियम पाळतो, अशा कोणत्यातरी तिसऱ्याच देशातील उत्पादन खर्चाशी चिनच्या उत्पादन खर्चाची तुलना करायची व त्यानुसार चीन सरकार अनुदान देते आहे हे सिध्द करणे. चीन युरोपिअन युनियनमधे अल्युमिनीयम व पोलाद इतक्या स्वस्तात विकत होते, की तिथले कारखाने बंद पडले. टाटांचा मोठा गाजावाजा झालेला, युरोपातील स्टील उद्योग विकत घेण्याचा प्रयत्नपण यामुळेच तोट्यात गेला होता. भारताचीही हीच अडचण आहे. भारत आपल्या उत्पादकांना मदत देऊ शकत नाही. मदत दिली तर चीन ती आरामात सिध्द करू शकतो. पण हेच चिनने केले तर मात्र आपण ते सिध्द करूच शकत नाही. त्यांच्या देशात जाऊन आपण माहिती मिळवणे सोडाच, आपण कुठे जायचे, रहावयाचे, कोणाला भेटायचे हे सगळे चीनचे सरकारच जणू काही ठरवते. आपल्या मनानुसार कुठेही जाऊन कोणालाही भेटता येत नाही. खरे तर अशा प्रकारच्या परिस्थितीत चीनला समान पातळीवर व्यवहार करणारा देश अशी मान्यता देणे हीच मोठी घोडचूक होती. पण चीनने आपली माणसे आंतराराष्ट्रीय संघटनांमधे पेरून ठेवली होती. त्यामुळे दाद मागणेही अवघड होऊन बसले होते. TheBL ने तर जाहीर करून टाकले आहे की, “अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सीसीपीने यूएन आणि जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतर-अमेरिकन विकास बँक यासारख्या जगातील प्रमुख वित्तीय संस्थांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये घुसखोरी केली आहे.” तर सांगायचा मुद्दा असा की, चीन त्याच्या अनैतीक खेळींमुळे यशस्वी होत होता. चीनचे कौतूक भारतातलेपण करायला लागले होते. पण अनैतीक पध्दतीने चीन भारतीय बाजार ताब्यात घेत आहे, त्यामुळे भारतातील रोजंदारीवर परिणाम होत आहे वगैरेकडे कोणी भारतीय गांभिर्याने पहात नव्हता की बोलत नव्हता. कोणि बोलला तर त्याची टिंगल टवाळी होणार हे जणू काही ठरूनच गेले होते. भारत चीनला तोंड देऊच शकत नाही हा सिध्दांत पक्का करण्याचीच स्पर्धा चाललेली होती. याबाबतीत आपले समर्थक भारतात तयार करणे, ह्या चिनच्या कार्याला दाद द्यायला हवी. अर्थात आंतरराष्ट्रीय समुदायात चीन घुसखोरी करत असेल तर भारतात आपले हस्तक तयार करणे चीनला खूपच सोपे गेले असेल. भारतात असे कितीतरी लोक आहेत की, जे देशभक्त असून, निव्वळ हस्तकांच्या अपप्रचाराला बळी पडून चीनची बाजू घेत असतात. प्रत्यक्षात जर चीनला व्यापारात अनैतिक मार्ग अनुसरायला बंदी केली तर भारत चीनला आरामात टक्कर देऊ शकतो, ही वस्तूस्थिती आहे. ही भारताची क्षमता इतर देशही मान्य करताहेत. विश्वास टाकायला तयार होताहेत. भांडवल गुंतवायला तयार होताहेत. तंत्रज्ञान द्यायलाही तयार व्हायला लागलेत. चीनला भारत पर्याय होऊ शकतो हे मान्य केल्याचीच खरेतर ही लक्षणे आहेत. पण स्वत: भारतीयच भारताची खरी किंमत जोखू शकत नसतील तर काय उपयोग? तर सांगायचा मुद्दा असा की, हे सगळे १६ जून २०२० ला संपलेले आहे. २०१९ मधे जागतीक व्यापार संघटनेने अनुचीत प्रथांबद्दल चीनला जबाबदार धरलेले आहे. फक्त तो निर्णय अंतीम नव्हता तर अंतरिम होता. १५ जून २०२० पर्यंत त्यावर आपली बाजू मांडायची चीनला संधी होती. पण चीनने ती संधी घेतली नाही. त्यामुळे चीन सरकार उत्पादकांना अनुदान देते हा अंतरिम निर्णय आपोआप अंतीम झालेला आहे. चीनची फार मोठी कोंडी झालेली आहे. चीनच्या मालावर अँन्टी डंपिंग ड्युटी लावायला आता जगभर सुरवात होऊ शकते. चीनच्या वस्तुंचा उत्पादन खर्च काढायची नवीन पध्दत मंजूर झाली आहे. भारतही आता हे शस्त्र वापरू शकतो. म्हणजे भारत वापरत होताच. पण आता त्यात जोर येऊ शकेल. चीनचा कांगाव्याकडे गांभिर्याने अथवा पक्षपाती पध्दतीने लक्ष देणे आता सोपे जाणार नाही. भारतीय उत्पादकांच्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या किमतीत, चीन भारतात तयार वस्तू कशा विकू शकतो याचे फारसे आश्चर्य भारतीयांना आता वाटणार नाही. त्यासाठी चीन म्हणजे कोणीतरी फारच भारी प्रकार आहे, किंवा त्यांचे बिझीनेस माॅडेल अफलातून आहे अशा प्रकारचे ढगात मारलेले बाण परिणामकारक होणार नाहीत. भारतीयांची अशी समजूत करून देण्यात आलीय की, कोरोना प्रकरणामुळे चीनने जगाचा विश्वास गमावला. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी आहे. चीनवरचा अविश्वास गेले दोन दशके वाढतच आहे. २०१६ पासून तर तो खूपच वेगाने वाढलाय. “कोरोना” ही उंटाच्या पाठीवर लादलेल्या सामानावरची शेवटची काडी आहे.

In reply to by शाम भागवत

....चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते....
मी हे परदेशात असताना चिनी लोकांना मार्केट सर्वे करताना जवळून बघीतले. बाजारातील प्रत्येक उपलब्ध वस्तू, बाजारातील वस्तुंचे किरकोळ व्यापारी मुल्य ते व्यापार्‍यांना अपेक्षीत कमिशनचे दर यांचा अत्यंत पद्धतशीर अभ्यास करून त्यापेक्षा आकर्षक किमतीत चीन उत्पादन उपलब्ध करते. आपण म्हणता तसे स्थानिक उत्पादन बंद पडले की किमती वाढवणे शक्य होत असावे. पर्यावरण व कामगार कायदे विषयक अटी कमी ठेवल्यामुळे युरोमेरीकन गुंतवणूकदार कंपन्या खुश होत्या त्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तेरीभी चुप मेरी भी चुप चालू असावे. व्याजाचे दर कमी ठेवणे हे बँक सरकारी असेल तर अश्यक्य नसते. युरोमेरीकन पैसावापरून त्यांनाच कर्जात टाकण्यात चीनला बर्‍यापैकी यश आले.

The Great Game in the Buddhist Himalayas: India and China’s Quest for ... By Phunchok Stobdan तिबेटन आणि चिनी राजकारणावरच्या इतिहासाची एक बाजू दर्शवू इच्छित हे एक रोचक पुस्तक वाचनात आले, -अर्थात भारतीय अधिकृत भूमिका यातील सर्वच बाजूंचे समर्थन करेल असे नक्की सांगता येणार नाही पण जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.

In reply to by माहितगार

गूगल बुक्सवर पूर्ण पुस्तक वाचता येईलच असे नाही, या वृत्तांकनात आढावा आला आहे. पुस्तक जरा चिनी अध्यक्षाची बाजूस मदत करणारे ठरु शकते हे, त्यामुळे सर्व मुद्यांशि सहमत होणे कठीण असावे, लक्षात घेऊनच वाचले पाहीजे.

चर्चा छान चाललीये. शेखर गुप्ता (यूट्यूब चॅनेल "The Print ") हे दररोज एक "cut the clutter " नावाचे एपिसोड करतात. ते राजकारण, करोना, अमेरिका, चीन बरोबर चाललेला वाद या सगळ्या बद्दल चांगली माहिती देतात, त्यांच्या कडचे रिपोर्टर्स सुद्धा वेग वेगळ्या विषयांवर अभ्यास करून माहिती देतात (असं वाटतं तरी).

महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांनी तळेगाव पुने जवळ ग्रेट वॉल मार्ट या चिनी कंपनीला १५००० कोटी रुपयांची गुंतवणूक परवानगी दिली आहे कारण एकच असावे आपला चीन भाऊ चांगला होवो व भारतात येवो हि कालची बातमी

In reply to by शकु गोवेकर

गलवान खोऱ्यातील चकमकी नंतर चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आणि इतर दोन कंपन्यांच्या गुंतवणुकीवर स्थागिती देण्यात आलेली आहे. - उद्योगमंत्री सुभाष देसाई https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maha-freezes-3-chinese-…

‘चीनच्या तुष्टीकरणाचे भारताचे धोरण विस्कळीत’ अशा शीर्षकाचा लेख ‘जपान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च’मधील प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी, गलवानमधील चीनचे कथित ‘अनपेक्षित’ डावपेच हे अनपेक्षित नसावेत, असे निरीक्षण नोंदवले आहे. मोदींना चीनच्या आकस्मिक हल्ल्यांचा अनुभव नाही. चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची भाबडी समजूत असावी. परंतु सद्य:परिस्थितीबाबत त्यांनी स्वत:लाच दोष दिला पाहिजे. धोरणांचे अतिवैयक्तिकरण आणि रणनीतीतील हटवादी भाबडेपणा यामुळे राजनैतिकदृष्टय़ा कुशल-कणखर नेता म्हणून नव्हे, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा ‘भारतीय अवतार’ म्हणून मोदींनी स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्या चुकांमधून शिकत नाहीत आणि चीनबाबतचे धोरण बदलत नाहीत तोपर्यंत भारतीय नागरिक आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही प्रा. चेलानी यांनी दिला आहे.

In reply to by आनन्दा

बरोबरे .. आता खरं ५६ इंच छातीच्या निधडेपणाची गरज आहे. दरम्यान ... पाकिस्तानी वृत्तपत्रे काय चुना लावतायेत पहा ...
पाकिस्तानातील ‘डॉन’ने भारत-चीन तणावाबद्दलच्या अग्रलेखातही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेजाऱ्यांशी दादागिरी करून आपण या प्रदेशात सर्वश्रेष्ठ आहोत, असे दर्शवण्याचा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पाकिस्तान सात दशकांपासून भारताची चिथावणी सहन करीत आहे. पाकिस्तानशी वैमनस्य वाढवून अन्य छोटय़ा देशांना दबावाखाली आणण्याचा भारताचा कदाचित प्रयत्न असेल. परंतु भारत-चीनमध्ये आर्थिक आणि लष्करीबाबतीत फारशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून भारताने या आघाडीवर अतिसावधगिरीने पावले टाकावीत, असा अनाहूत सल्ला ‘डॉन’ने दिला आहे.

चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची (मोदींची) भाबडी समजूत असावी
. देव करो, आणि २०२२ ला रस्ते पूर्ण होईपर्यंत, प्रा. ब्रह्मा चेलानी व चीन ह्याच गोड गैरसमजात राहो हीच इच्छा. मी फक्त सरकारच्या सीमेलगत रस्ते बांधणी शिथील होत नाहीये ना? इकडेत लक्ष पुरवणार. :)

आज दैनिकं वाचून काढल्यावर निदर्शनास आले की, चीन सीमेवर तणाव असून भारताने लडाख पासून सीमेवर सैन्य तैनाती आणि लष्करी हालचाली वाढविल्या आहेत, चीननेही सीमेवर तसेच केले आहे. एकीकडे सीमेवर तणावर तर दुसरीकडे चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. आणि ''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे. अशावेळी पंतप्रधान चीनने घुसखोरी केली नाही असे का म्हणत आहेत माहिती नाही. असो. तो धाग्याचा विषय नाही. रशियाच्या मध्यस्थीतीमुळे व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे, अशाही बातम्या आहेत. दुसरी बातमी अशी की चीनने त्यांच्या एका कमांडरसह सोळा चीनी सैन्य मेले असल्याची कबूली दिली आहे. आपल्याकडे भारतात आपण जीतके चीनबद्दल सीमावादावर चर्चा करतो किंवा जितके पेटून उठतो तितकी चर्चा चीनमधे जाणीवपूर्वक केली जात नाही असे दिसते. राज्यकर्त्ये त्यांचं काम करतील नागरिकांनी त्यांचं काम करीत राहावे असे किंवा जाणीवपूर्वक चीन तेथील जनतेला अशा घडामोडींपासून दूर ठेवते. माध्यमांवरही बंदी आणून ते विषय दूर ठेवते. आपली प्रसारमाध्यमे म्हणत आहेत की चीनला बाजारपेठेची भिती वाटत असल्यामुळे तो नमला आहे, यात मला काही तथ्य वाटत नाही. चीनची भारतात गुंतवणूक असली तरी जगभर चीन्यांच्या गुंतवणूकीचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे तो नमला असे काही वाटत नाही. दुसरं असं की चीन सीमेवर जी काही शस्त्रसंबंदीचा करार होता त्यात आता सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्यामुळे दुसर्‍या बाजूने चीनही आता गोळीबाराला प्रत्युत्तरास तयार आहे असे म्हटले आहे. इतक्या दिवस पाकड्यांच्या बाजूने सतत विनाकारण गोळीबार चालू असतो तसे आता चीन्यांच्या बाजूनेही सुरु राहील असे वाटते. काहीही घडामोडी होवोत, चिन्यांनी घुसखोरी केली असेल तर त्यांना परत फिरायला मजबूर केलं पाहिजे आणि आपण आपल्या भाग मिळविला पाहिजे तरच आपण आपला दबदबा निर्माण करु. नाही तर,अक्साइ चीनच्या वेळी तेव्हाच्या पंतप्रधानांनी काढलेल्या ” एक घास का तिनकाही नही उगता” अशा बेफ़िकीरीच्या या उद्गारावर मंत्रीमंडळातील महावीर त्यागी यांनी ”पंडित जी, आपके सिर पर भी बाल नहीं उगते, वह भी बंजर ही है, तो क्या उसे भी चीन को भेंट कर देंगे? काढलेले उद्गार सर्वांना माहिती आहे. इतिहासातल्या काही मोठ्या चुका आहेतच, पण आता वर्तमानात पुढे जाऊ. बाकी, आता तशी परिस्थिती नाही. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही. नाही नाही, असे काही होणार नाही. आपल्यातलेच काहीजण डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत आहेत. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे. शेखर गुप्तांच्या cut the cutter बघून मला मिळालेली माहिती अशी कि १) फिंगर ४ च्या आपल्या कडील बाजू पर्यंत आपला ताबा आहे तर फिंगर ४ च्या चीन कडील बाजूला चीन चा ताबा आहे २) आपला दावा आसा आहे कि फिंगर ८ पर्यंत चा प्रदेश हा भारतीय आहे तर चीन चा दावा फिंगर २पर्यंत आहे. ३) पण फिंगर ३ जवळ आपला एक लहानसा सैनिकी base आहे तर फिंगर ४ जवळ एक आणखीन एक निरीक्षण चौकी आहे . मग आत्ता भारत आणि चीन मध्येवाद ह्या प्रदेशात का चालू झाला? ४) तर चीन ने फिंगर ४ कडील त्यांच्या कडील त्यांच्या बाजुला म्हणजेच P -१४ पॉईंट जवळ १-५ मे दरम्यान एक सैनिकी चौकी उभारली आहे , भारताची भूमिका अशी आहे कि चीन ने status quo बदलला आहे आणि त्यालाच भारताचा विरोध आहे, आणि ह्या चौकी जवळच १६ तारखेची चकमक झालेली आहे ५) म्हणजे आपला दावा जरी फिंगर ८ पर्यंत असला तरी आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तरी पण चीनने फिंगर ४जवळ चौकी उभारून जैसे थे स्थिती मध्ये बदल केला आहे ६) आणखीन महत्वाची बाब म्हणजे चीनने उभारलेली चौकी हि आपल्या फिंगर ३ आणि ४च्या चौक्या पेक्षा उंचावर आहे म्हणजेच उद्या समजा चकमक झालीच तर चीन ला उंचीचा थोडा फायदाच होणार आहे त्यामुळेच भारताची मागणी अशी आहे कि एप्रिल मध्ये जशी परिस्तिथी आहे तशीच ठेवा म्हणजेच फिंगर ४ च्या चीन च्या बाजू कडील सैनिकी चौकी ला आपला विरोध आहे पण जस वरती लिहिल्या प्रमाणे आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तर चीन चा ताबा हि फिंगर ४पर्यंतच आहे म्हणूनच भारताची मागणी हि जैसे थे परिस्तिथी ठेवा अशी आहे आणि पंतप्रधानांनी भारताच्या भूमीवर आक्रमण झाले नाही आहे म्हटले असावे कारण ज्या भूमी वर प्रत्यक्ष ताबाच नाही तर घुसकोरी झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

“वर्षांनुवर्षानुसार पडलेले पायंडे आणि त्याची कोणीतरी केलेले उल्लंघन” यापलिकडे काहीही नाही. पण चीनला ती नवीन चौकी फायद्याची वाटत असणार. ती टिकवायची असेल, तर प्रथम अव्वाच्या सव्वा दावे करायचे. मग ते सोडून द्यायचे बतावणी करायची. मग त्याबदल्यात चौकी राहू दे म्हणायचे. “बळी तो काळ पिळी” यापध्दतीने हे सगळे चाललंय. मला तर शेतावरचे बांध हळूच पुढे ठकलायची पध्दतच आठवतीय. :)

In reply to by रात्रीचे चांदणे

चीनची घुसखोरी कुठे कुठे ? चीनने जवळ जवळ पाच ठिकाणी अशी एलएसीवर अशी घुसखोरी केली आहे, करत असतो. सध्या ज्यात प्रामुख्याने चर्चा आहे गलवान खोरे, पॅगॉग त्सोवर, वर एक प्रतिसादात उल्लेख केला आहे त्यात पॅगॉग त्सोवरनदीच्या काठावर आपला बेस कँप हा फिंगर चारवर आहे आणि चीनचा बेस कँप हा फिंगर आठच्या नंतर किंवा खाली आहे. आपण बोटीने फिंगर आठपर्यंत पेट्रोलिंग करतो तर चीन जमीनीमार्गे पाचच्या पुढे येऊन ठेपला आहे आणि इथेच वाद आहे. आपण म्हणता तसे ते आपल्या फिंगर पाच पर्यंत एलएसी मानत असतील तर ते आपल्या हद्दीत आलेच नाही, आणि त्यांची हद्द ही फिंगर पाचपर्यंत आहे असे म्हणायचे असेल तर मग मुद्देच संपले. (चित्र पाहा) फिंगर क्षेत्रातल्या पॉइंटवरच एकमत होत नसल्यामुळे अजूनही सहमती झाली नाही, केवळ माहितीस्तव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या मांडणीत प्रत्येक शब्द जपून वापरावा लागतो, (ट्रंप प्रमाणे महासत्तेचे सत्ताधिश असाल तर जरासा वेळपाहुन कानाडोळा करणे छोट्या सत्तांना भाग पडते) भाजपाई (तसे एकुणच भारतीय) आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या नेमक्या शब्द योजनात क्च्चे पडतात ह्या बद्दल मी एक मिपा लेखही लिहिला. शत्रुपक्ष आपल्या सिमेत आलाच कसा मग तुम्ही कडक प्रत्त्युत्तर का नाही दिले यावरुन विरोधीपक्ष कोंडीत पकडतील त्या कोंडीतून सुटण्यासाठी मोदी बहुधा बोलून मोकळे झाले. एकदा राजा बोलला की मंत्रीगणाला सांभाळून घेण्या शिवाय भाग नसतो अशी भाजपाची गत झाली हे खरे आहे. इतर देशियांशी कळणार असेल असे बोलणार असाल तर एस. जयशंकर यांच्या मुलाखती ऐकुन त्यांच्या वाक्य रचनांचा वापर करत बोलावे किंवा प्रराष्ट्र सचिवांना आधी बोलू द्यावे मग आपण बोलावे हे श्रेयस्कर असावे. खरे म्हणजे हे केवळ नेत्यांनीच नाही सर्वसामान्यांनीही केले पाहीजे समाज माध्यमांच्या काळात प्रत्येक व्यक्ती प्रचारतंत्राचा भाग आहे किंवा टार्गेट तरी आहे, दुसर्‍या देशातील व्यक्तींना प्रत्युत्तरे नेमकी काय द्यायची हे (स्थानिक पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन) माहित हवे कारण उद्याचे नेते आपल्यातूनच पुढे जाणार असतात.

शेतावरचे बांध संधीसाधूपणे पुढे ढकलणे + बळी तो कानपिळी + दुसर्‍याला त्रास देऊन स्वतःच आरडाओरडा करणे प्रसंगी दम भरणे अगदी, चीनची निती अशीच आहे.

एक बातमी ...
गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर एबीपी-सी व्होटरनं एक सर्व्हे केला. ज्यात चीन सीमा व मोदी सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं का या प्रश्नावर ६० टक्के लोकांनी नकार दर्शवला आहे.
. त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".

In reply to by mrcoolguynice

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधे ७०% अधिक नागरिकांनी देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. “आयएएनएस” व “सी-व्होटर“ याच्याकडून हे सर्वेक्षण करण्यात आले. “पंतप्रधान मोदी चीनसोबतची तणावाची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत“ असे मत नागरिकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र टाईम्स २४ जून २०२० :) पेपरातल्या बातमी देत चर्चा करायचा मला खूप कंटाळा आहे. कारण त्यामधे मिडियावाले लोकांना खूप वापरून घेतात. काही अभ्यास करून मते मांडण्यांऐवजी आयते तयार मटेरिअलवर अवलंबून राहून चर्चा व्हायला लागते व तीच सवय लागते. त्यामुळेच इथेच थांबणार आहे. पण बातमीतला सोयीस्कर भाग तेवढा देऊन मेसेज टाकायला मात्र मी तुम्हाला प्रोत्साहनच देईन. :)

In reply to by mrcoolguynice

...देताना तुम्हाला खुप काही आनंद झाला काय, प्रतिक्रिया आणि त्याखालची ओळ वाचुन तसेच वाटले. मुळात विचारलेला प्रश्न चुकीचाच आहे 'मोदी सरकारने चीनला चोख उत्तर दिले का' असा बुद्धीभ्रम निर्माण करणारा न प्रश्न विचारता 'भारतीय सैन्याने चीनी सैन्याला चोख उत्तर दिले का' असा हवा होता ?? असा चुकिचा प्रश्न विचारुन त्याचे उत्तर प्रसिद्ध करुन भारतीय जनमानसाचे व भारतीय सैन्याचे मनोधैय प्रचंड उंचावले काय ? ह्या बातमीत म्हटल्याप्रमाणे हा सर्व्हे कधी कुठे झाला, त्याचा Sample Size किती ? हा सर्व्हे घेणार्‍या "एबीपी-सी व्होटर"ची विश्वासार्हता काय ?? त्यानी ज्या ज्या लोकाना याबद्दल प्रश्न विचारले त्या त्या लोकाना तिकडची Ground Reality / खरी वस्तुस्थिती कितपत् माहित होती, ते ६० टक्के लोक नक्की कोण होते ?? 'मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं नाही' या त्यान्च्या आणि तुमच्या समजाला वस्तुनिस्ठ आधार काय ?? याचा अर्थ असा ध्वनित होतो की भारतिय सैन्य फक्त आणि फक्त मार खाऊन आणि २० जणांचे बलिदान देऊन परत आले. त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल". असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.

In reply to by विनोद१८

त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला , "चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".
असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.
ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा. एक म्हण : "वड्याचे तेल वांग्यावर काढणे"

In reply to by mrcoolguynice

वांगे सडके असेल तर वड्याचे तेल नक्कीच पडेल यात शंका नाहीच, मी विचारलेल्या प्रश्नांवर बोला. तुमचा अजेन्डा पुढे रेटु नका, हे मिसळपाव आहे मोदीविरोधकांचे व्यासपीठ किंवा चेपु नाही याचे भान असावे. 'भारतिय सैन्याने जवळ जवळ ३५ ते ४० चीनी लाल माकडे मारली ( याचेसुद्धा काहीना अतीव दुखः झाले असे एकुन दिसते ) हे सोयिस्करपणे विसरुन भारतीय सैन्य मार खाउन हात बांधुन परत माघारी आले' असा त्या सर्व्हेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा रोख आहे हे तर सरळ सरळ दिसते आहे. इतका अपमान अणि अविश्वास आपल्याच सैन्यावर अप्रत्यक्षपणे दाखविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होईल असा प्रयत्न करणे याला काय म्हणायचे ?? हे कधीच सहन केले जाणार नाही. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लिहा अवांतर नको. ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा. हे कोण सुरेंदर मोदी ?? सरळ सरळ नाव घ्यायला कशाला घाबरता, आपल्या घटनेने तसा अधिकारच दिला आहे ना तेव्हा बिन्धास्तपणे त्यांचे नाव घ्या. मला वैयक्तिक त्यांना काही विचारायचे नाही, मला तशी गरज नाही.

चीन नरमला, तणाव निवळला अशा बातम्यात तथ्य नाही. सरकार अगा जे घडलेच नाही म्हणते. असे असले तरी घुसलेले चीनी सैन्य या क्षणापर्यन्त परत फिरलेले नाही. एएलसीवर पलिकडून काही पॉइंटवर दोनहजार सैन्य येऊन आहे. गलवानखो-यातील पेट्रोलिंग पॉइंट १४,१५, गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट १७ ए, हॉटस्र्पिंग फिंगर चार, पॅनगॉंग त्सो सरोवर वरील फिंगर ५ ते ८ या सर्व पॉइंटवरच्या घुसखोरी (संदर्भ-बातम्या) माघारी यावर अजुनही एकमत झालेलं नाही. गलवान खो-यातून जो रस्ता पुढे ओल्डीतळावर जातो, त्या रस्त्याच्या उंच शिखरावर चीन्यांनी पेट्रोलिंग पॉइंट केला आहे, वरच्या बाजूने भारतीय हालचालींवर चिन्यांना मारा करायला अथवा लक्ष ठेवायला सोपे आहे म्हणून तेथून चिन्यांनी मागे सरकावे ही आपली मागणी आहे. अधिक गोष्टी समजून घेण्यासाठी हा यूट्यूबवरचा व्हीडीयो बघावा. -दिलीप बिरुटे

पंतप्रधान म्हणतात घुसखोरीच झाली नाही. तर मग चकमक का व कशी झाली ? संरक्षण खात्याकडून काय अधिकृत माहिती दिली गेली आहे कुणी लिंक देवू शकेल का ?

जिथे चकमक झाली तिथे चीन ने रात्रीतून कॅम्पस उभे केलेत. बंकर्ससारखे पर्मनंट स्ट्रक्चर उभे केलेत. गलवान नदीचा प्रवाहच बदलला! रिंईफोर्स बरच झालंय. भारतीय रणगाडे तिकडे लडाखमध्ये पोचलेत. डीओबी, देसपांग आदी ठिकाणी सैन्याची जमवाजमव चीन करत आहे. सोक्षमोक्ष लावावा लागणार अस वाटायला लागलाय. चर्चा व्यर्थ होत आहेत!!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

चीनने चर्चेच्या नावाखाली ''गलवान खोरे'' आमचेच असून आमच्याच भूभागात भारतीय सैन्याने प्रवेश केल्याच्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान म्हणाले होते की विद्यमान पंतप्रधानांनी जवाबदारीने बोलायला हवे होते. ”आमच्याकडे घुसखोरी झालीच नाही” हाच आधार चीनने पकडला आहे. कोण बरोबर कोण चूक पुन्हा राजकीय आखाडा सुरु होईल तुर्तास तोही मुद्दा बाजूला ठेवू. वादग्रस्त स्थानावरुन दोन्ही सैनिकांनी माघार घ्यावी यावर सहमती झाली असे दाखवूनही चीन्यांनी पक्कं बांधकाम गलवान खो-यात सुरु केल्याचे दिसते. भारताकडे युद्धनिती आणि संबंधित प्रश्न कसा हाताळावा याची ठरविणारी फौज असेलही पण आता चीन्यांना आक्रमक पद्धतीने बॅकफूटवर जावं लागेल अशी कृती सरकारकडून भारतीयांना अपेक्षित आहे. एकीकडे गलवान खो-यावर चर्चा करायची, आणि तिथे पक्के बांधकाम करायचे त्याचवेळी ओल्डीबग हे एअरबेस आहे त्या अक्साइनचीन सीमेवर चीन्यांनी आपलं सैन्य संख्या वाढवली आहे. भारताच्या परराष्ट्रखात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीन्यांचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्याबरोबरच्या चर्चेत तरी चीन्यांनी गलवान आमचंच आहे असे म्हटले आहे. एकून परिस्थिती पाहता एवढ्यात परिस्थिती निवळणार नाही असे दिसते. चिन्यांना योग्य धडा देण्याची यापेक्षा दुसरी कोणती उत्तम वेळ असू शकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत रणांगणावर जिंकतो आणि टेबलावरची चर्चेत हरतो असे ऐकलेले ते खरे की काय असे वाटू लागले.

NEW DELHI: As various government departments are preparing measures to reduce dependence on Chinese imports, eyes are now on the home ministry that is set to procure close to 50,000 bulletproof jackets — including some for the Indo Tibetan Border Force (ITBP) that is posted on the Line of Actual Control (LAC) and has been involved in a tussle that took place at Pangong Tso lake. The defence ministry’s insistence on continuing with an order for 180,000 bulletproof jackets, even after it came to light that the vendor had switched the critical raw material supplier from western sources to Chinese companies last year, has led to a situation where other forces too could get similar products. Read more at: {{{https://economictimes.indiatimes.com/news/defence/will-bulletproof-jack…}}}

https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-politicians-dont-even-… वरील बातमीत एका तज्ञांचे चीन संबंधातील मत मांडलेले आहे. त्यात एका ठीकाणे असे म्हट्ले आहे कि कारगील, पठाणकोट,मुंबई हल्ला या संबधी आधी माहीती मिळाली होती , तरीपण हे हल्ले झाले. योगायोगाने एक पत्रही "इतिहासाची गरज नेमकी कशासाठी?" ह्या शिर्षकाखाली प्रसिध्द झाले आहे. त्यात नरहर कुरुंदकरांच्या एका लेखाचा संदर्भ आहे. ज्यात असे म्हटले आहे की, महंमद गझनी सोमनाथ फोडण्यासाठी ३०० मैल हिंदू राजवटीतून चालत आला तरीही प्रतिकार झाला नाही. https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-email-… सतर्कता कमी पडतेय का ?

भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढत आहे. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं म्हटलं आहे.

In reply to by शा वि कु

दुवा गंडला असल्यामुळे काहीच दिसत नाही. नव्याने लिंक द्याल का प्लीज. -दिलीप बिरुटे

In reply to by शा वि कु

सरकारने देशविदेशात जाऊन आंतराराष्ट्रीय राजकारणात आपल्या बाजूने इतर देश राहावेत आदानप्रदान होत राहावेत यात आपला मुत्सद्दीपणाचा अभाव आहे असे म्हणायला वाव आहे. श्रीलंका,बांग्लादेश, नेपाळ हे लहान देश चिन्यांच्या बाजुने झालेत. चिन्यांनीही आता बाजार म्हणून या देशांकडे बघायला सुरुवात केलीच आहे. पाकडे त्यांच्या बाजूने आहेतच. आपण ट्रम्प तात्याच्या भरवशावर आहोत त्यांचा किती फायदा झाला ते भारतीय सरकारलाच माहिती. उत्तम मतं, दुव्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

clipboard39_202006446538

काल आणि आज सर्वच माध्यमांनी चिन्यांच्या घुसखोरीबद्दल बातमी दिली आहे. चिन्यांनी तंबू टाकून तळ ठोकला आहे. पूर्व लडाखसीमेवरील गलवान खोरे, हॉट्स्प्रींग, पेनगाँग त्सो सरोवरच्या तनावाबद्दल चर्चा सुरुच असतांना चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठाराव घुसखोरी केली आहे आहे, ज्या गलवान खोर्‍यात आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले तिथेच चिन्यांनी पक्के बांधकाम सुरु केले आहे असे म्हटले आहे. चित्र गलवान खोर्‍यातील असून नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध करुन दिले आहे, त्याचा अर्थ नवी दोन बांधकामे चीनने केली असल्याचे म्हटले आहे. आता जे काय असेल ते असेल त्याबाबत आपल्याकडून तरी त्याबाबात फारसे बोलले गेलेले नाही. मला वाटतं आपलं धोरण सध्या शांततेचे असावे आणि संधी मिळाली की त्यांना हुसकावून लावणयात येईल असे वाटते. भारतीय लष्कराकडून याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देखना है आगे आगे क्या होता है... !

संदर्भासाठी बातम्या लिंका : दै. सकाळ, economictimes -दिलीप बिरुटे

चीनच्या बाजुने सात्यत्याने लष्करी सिद्धता वाढवली जात आहे, अश्या बातम्या आणि व्हिडियो काही काळा पासुन सतत समोर येत आहे. चीनच्या बाजुने :- आपल्या बाजुने :- आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे. टी-९० भीष्म टँक बद्धल माहितीपट

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior

In reply to by मदनबाण

चिन्यांनी आपल्याला धडकी भरावी म्हणून युद्धाभ्यास केला असावा अशा बातम्या येत आहेत. चीनी सर्वपरीने नाटक करीत आहेत आणि त्याचवेळी इंच इंच नव्हे, तर मिटर मिटर, किलोमिटर आत सीमेत घुसत आहेत. एका नकाशावर आखलेली रेष प्रत्यक्षात जवळ जवळ चार किलोमिटरची सीमा बनली आणि आपल्या बाजूचं टोक तीथपर्यंत आपली ते सीमा समजतात. आणि असा हा मामला वर्षानुवर्ष धुसमसत राहणार असे वाटते. -दिलीप बिरुटे

या प्रतिसादाचा काही भाग धाग्याशी संबंधित नाही असे वाटण्याची शक्यता आहे.... अवांतर करण्याचा उद्देश नाही! ही चर्चा वाचतेय आणि वाचत राहीन. चांगली चर्चा सुरु केल्याबद्दल बिरूटेसरांचे आभार! चर्चा वाचत असताना आणि ९ जूनच्या " फाईट चायना विथ वॉलेट" धाग्यानंतर, मी काय करू शकेन याचा विचार केला आणि कमित कमी चिनी वस्तू वापरायचा निर्णय घेतला ( माझ्यापुरताच). आत्ता वापरत असलेल्या वस्तू वापरून संपवेन आणि नविन वस्तू घेताना चिनी घेणार नाही. हे मी पाकिस्तान बद्दल आधीच केले आहे. (मी तेथे उत्पादन झालेल्या वस्तू वापरत नाही, त्यांचे संगित/ सिरियल / सिनेमे बघत नाही). ते खूपच सोपे होते. चिनी मार्केट 'ऑल पर्व्हेझिव' असल्यामुळे कदाचित थोडे कठीण जाईलही, त्याची आता मानसिक तयारी आहे. ह्या बाबतीत त्यांचे एन्क्रोचमेन्ट मला मान्य नाही ( जसे भूभागावर नाही तसेच अर्थकारणावरही नाही, म्हणूनच या धाग्यावर हा प्रतिसाद). एक सामान्य नागरिक म्हणून हे मी निश्चित करू शकते. पण या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी यायचे एक आणखी कारण आहे. गेल्या आठवड्यात एक इन्फ्लेटेबल ग्लोबल अ‍ॅटलास घरी आणला. तो फुगवल्यावर मी जो भारताचा नकाशा बघितला तो नुसताच आश्चर्य चकीत करणारा नव्हता, त्याने मी हादरलेच!! भारताची मानच कापून टाकलेली दर्शवली होती त्यात... संपूर्ण जम्मू काश्मिर हा "डिस्प्युटेड टेरिटरी" म्हणून दाखवला होता. भारतापेक्षा पूर्ण वेगळ्या रंगात. हा अ‍ॅटलास व्हिएट्नाम मधून आला होता. बराच विचार केला मी यावर.... नेहमीचा सोडून देणे हा पर्याय मंजूर नाही... मी काही केले किंवा केले नाही तरी फारसा फरक पडेल असे नाही याची पूर्ण जाणीव आहेच. तरीही, जो भाग आक्षेपार्ह दाखवला होता तो, आणि उत्पादक माहिती भोवती नोंद करून , तो अ‍ॅट्लास आणि एक पत्रं मी येथील भारतीय कॉन्सुलेटला पाठवले व त्या पत्राची एक प्रत पंतप्रधानांना पाठवली. बिरुटेसरांनी नेपाळ बद्दल वर लिहिलेच आहे.... आता हे व्हिएट्नाम सारखे लहान देश देखिल ह्या भूभागावरील आपले sarvabhoumatva ( हे मराठीत काही केल्या लिहीता आले नाही) मान्य करत नाहीत किंवा त्याबद्दल संशयास्पद मिस् रेप्रेझेन्टेशन करतात हे मनाला फार त्रासदायक आहे....... आपण नागरिक दक्ष राहिलो नाही तर इतरांना भारत भूमी गिळंक्रुत ( हे व्यवस्थित लिहिता येत नाही हा क्रोमचा प्रॉब्लेम आहे का?) करायला वेळ लागणार नाही हे परत एकदा जाणवून गेले. मग आपल्याला (पाकिस्तान आणि चीन सोडून) इतर देशांचे उपद्व्याप, असे धागे काधावे लागतील अशी काळजीही वाटून गेली. केवळ म्हणूनच हा प्रतिसाद! आता या समस्येवर कायम स्वरूपी इलाज शोधणे तातडीचे झाले आहे. आपण ते करू शकू हा विश्वास आहे, तरीही आपल्या देशाची घरभेद्यांची महान परंपरा द्रुष्टिआड करून चालणार नाही. येत्या काळात सक्षम आणि सतर्क राहण्याची आणि शत्रुला नामोहरम करण्याची भारतीय नागरिकांची सामुदायिक ईच्छा आणि उद्देश असावा असे वाटते.

इशान्य लडाखमधे आपण क्षेपणास्त्रे सीमेवर ठेवली असून चिन्यांचे संभाव्य हल्ले परतवण्यासाठी आपण तयारी केल्याचे बोलले जात आहे, असे असले तरी आपल्या ज्या काही मुद्यांचा प्रश्न आहे, ते मात्र सुटलेले नाही. सहा जूनच्या वेळेसची 'जैसे थे' परिस्थिती ठेवायला चीन तयार नाही. पेनगाँग सरोवरच्या फिंगर चारपर्यंत चीनने घुसखोरी करुन तिथे हेलीपॅडही उभारल्याच्या बातम्यांमधून दिसत आहे. दक्षीणबाजूला चिन्यांच्या हालचाली वाढल्या असून आपण पूर्वीपासून तिथे आहोत असे दाखवायला त्यांची नाटके सुरु आहेत. फींगर चारवर पाचशे मिटर अंतरावर भारत चीन सैन्य आमने-सामने आहेत. भडका इथेच उडण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने ज्या प्रश्नांसाठी हे सर्व सुरु झालं होतं तिथे त्या त्या स्थळांवर आपण तूर्तास बॅकफूटवर आहोत. आज गृहमंत्रीही योग्य वेळी चीन्यांना धडा शिकवू असे म्हणत आहेत. सध्या तरी आपल्याकडे सकारात्मक असे काही नाही. -दिलीप बिरुटे

Since Modi's June 19 infamous speech, PLA has encroached on two key Indian border areas: 1. The Depsang "bottleneck" (Y-junction), deep inside India and scene of a 3-week ingress in 2013. 2. The “triangle” near Galwan Valley's Patrol Point 14, scene of the June 15 fatal clashes. टिवटिव दुवा :- Brahma Chellaney Modi vowed the soldiers' deaths "will not be in vain." But today, the "triangle"—including the clashes' site—has come under PLA's control. Rather than giving the promised "free hand," India has asked its Army "not to escalate," thus allowing PLA to keep escalating its intrusions. टिवटिव दुवा :- Brahma Chellaney

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे. Amidst tensions with China, how C-17s are lifting the 46 tonne T-90 tanks आपल्या आणि जपानच्या युद्ध नौकांचा एकत्रित युद्ध अभ्यास :- LAC stand-off: India, Japan conduct naval exercise amid China row

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

In reply to by शाम भागवत

कौतुक वाटते ह्या न्युज चॅनेलांचे, त्यातल्या त्यात त्या न्युज नेशन आणि टीव्ही नाईन चे. गेला महिनाभर किंबहुना जास्तच काळ चीन भारत युध्द चालूच आहे अशी चर्चा असते. काय एकेक रिपोर्ट काय एकेक भाष्ये अन खरोखर पोलीस टाईम्स च्या तोंडात मारतील अशा यमकी हेडलाईन्स. " ट्रम्प ने खाई है कसम, चीन होगा अब भस्म" अरे काय? त्यात रक्षामंत्री रशियाला जाऊन डिमांड करायच्या आत रशिया आपल्याला एस ४०० अ‍ॅअर डिफेन्स प्रणाली देणार ह्याची चर्चा चालू. इतकेच नाहीतर ही प्रणाली सीमेवर तैनात झाल्यावर चीन कसा पाय लावून पळणार ह्याचे वर्णन. लगेच ही प्रणाली मंत्रीम्महोदय सोबत येताना विमानात घेऊन येणार असा आविर्भाव. त्या प्र्णालीचे गुणगान दोन दिवस गाऊन झाल्यावर ह्या वर्षात त्या मिलतील असे मंत्री आश्वासन घेऊन परतले आणि तीच एस ४०० सिस्टीम चीन ने सीमेवर उभी केली. लगेच चॅनेलांनी इस्रेली बराकचे गुणगान सुरु केले. एकेक स्पेशल रिपोर्ट्स आणि ब्रेकिंग न्युज पाहता ह्या चॅनेलांना काय हवेय ते अद्याप कळले नाही.

In reply to by शाम भागवत

सकाळ २८ ॲाक्टोबर २०२० भारताची क्षेपणास्त्र मारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त बेका ( बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट ) करारावर शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील. 👆 हवाई प्रभूत्व मिळवण्यासाठी हे फार महत्वाचे वाटतंय.

मन कि बात मध्ये चायना चे नाव सुद्धा घेतले नाही. सीमा पार से ? येड्याचा बाजार आहे नुसता.

In reply to by कपिलमुनी

बोलले पण थेट नै. जसे, की ''वाकड्या नजरेने भारतीय भूमीकडे पाहणार्‍यांना कणखरपणे उत्तर दिले जाईल. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृढनिश्चयाने जवानांनी जे बलिदान तोच संकल्प भारतीयांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय बनविले पाहिजे, हीच खरी जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल'' मान्य. आता पुढील पाऊल ? लडाखमधे चिन्यांनी भारतीय सैन्याबरोबर यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मार्शल आर्टमधे पारंगत असलेल्या जवानांची भरती करुन ती बटालियन लडाख आणि सीमाप्रदेशावर चिन्यांची असणार आहे, ही त्यांची तयारी आहे प्रत्यक्ष सीमेवर. आपण रशीयाकडून क्षेपणास्त्र विरोधी रडार घेतले. अमेरिकेकडून अमूक घेतले. जपानकडून अमुक-धमूक युद्ध सराव केला. हे सर्व अभिमान वाटावे असेच आहे, असे असले तरी आपलं मुळ जे दुखणं आहे त्यावर कार्यवाही अपेक्षित आहे, चिन्यांचे सैन्य लडाख आणि सीमेवर जे आत घुसले आहे, ते परत फिरले पाहिजेत, तरच या प्रकरणात भारतीय शिरजोर ठरले आणि आपण आपली भूमी परत मिळवली असे म्हणावे लागेल. -दिलीप बिरुटे

हे काय नळावर च भांडण आहे का की माझं नाव का घेतलं आणि नाही घेतलं म्हणायला

प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने वाचावे असे दोन लेख :- ‘Post Galwan battle, Chinese soldiers were in a state of panic’ PLA troops are an anxious group, recall Indian officers बादवे जरासे अवांतर :- वरील एका प्रतिसादात आपण जपान बरोबर नौदलाचा एकत्रित युद्ध अभ्यास केला आहे त्याची बातमी आहे, जपान बरोबर आपले एक वेगळेच नातं देखील आहे जे टोकियो ट्रायल्स या नावाने प्रसिद्ध असुन देखील त्या बद्धल हिंदुस्थानी नागरिकांना तितकीशी माहिती नाही. या संपूर्ण घटनेवर वेब सिरिजी देखील असुन माझा अत्यंत प्रिय अभिनेता इरफान याने त्यात प्रमुख भुमिका केलेली आहे. जालावर असलेली माहिती खाली डकवत असुन त्यात माझी कोणतीही भर नाही... Remembered in Japan, forgotten in India…….. The day was 12 November, 1948. Tokyo Trials are going on in a huge garden house on the outskirts of Tokyo, the trial of fifty-five Japanese war criminals including Japan’s then Prime Minister Tojo, after losing WWII. Of these, twenty-eight people have been identified as Class-A (crimes against peace) war criminals. If proved, the only punishment is the “death penalty”. Eleven international judges from all over the world are announcing……”Guilty”…. “Guilty”…… “Guilty”……… Suddenly one thundered, “Not Guilty!” A silence came down in the hallway. Who was this lone dissenter? His name was Radha Binod Pal a Judge from India. Born in 1886 in the Kumbh of East Bengal, his mother made a living by taking care of a household and their cow. For feeding the cow, Radha used to take the cow to the land near a local primary school. When the teacher taught in school, Radha used to listen from outside. One day the school inspector came to visit the school from the city. He asked some questions of the students after entering the class. Everyone was silent. Radha said from outside the classroom window…. “I know the answer to all your questions.” And he answered all the questions one by one. Inspector said… “Wonderful!.. Which class do you read?” The answer came, “… I do not read…I graze a cow.” Everyone was shocked to hear that. Calling the head teacher, the school inspector instructed the boy to take admission in school as well as provide some stipend. This is how education of Radha Binod Pal started. Then after passing the school final with the highest number in the district, he was admitted to Presidency College. After taking M Sc. from the University of Calcutta, he studied law again and got the Doctorate title. In the context of choosing the opposite of two things he once said, “law and mathematics are not so different after all.” Coming back again to the International Court of Tokyo. In his convincing argument to the rest of the jurists he signified that the Allies, (winners of WWII), also violated the principles of restraint and neutrality of international law. In addition to ignoring Japan’s surrender hints, they killed two hundred thousand innocent people using nuclear bombardment. The judges were forced to drop many of the accused from Class-A to B, after seeing the logic written on twelve hundred thirty-two pages by Radha Binod Pal. These Class-B war criminals were saved by him from a sure death penalty. His verdict in the international court gave him and India a world-famous reputation. Japan respects this great man. In 1966 Emperor Hirohito awarded him the highest civilian honor of the country, ‘Kokko Kunsao’. Two busy roads in Tokyo and Kyotto have been named after him. The law has been included in the syllabus of his sentence. In front of the Supreme Court of Tokyo, his statue has been placed. In 2007, Prime Minister Shinzo Abe expressed his desire to meet his family members in Delhi and met his son. Dr. Radha Binod Pal (27 January 1886 – 10 January 1967) name is remembered in the history of Japan. In Tokyo, Japan, he has a museum and a statue in Yasukuni shrine. Japan University has a research center in his name. Because of his judgment on Japanese war criminals, Chinese people hate him. He is the author of many books related to law. In India, almost nobody knows him and perhaps not even his neighbors know him! A hindi movie was made on him, Tokyo Trials, starring Irfan Khan but that movie never made headlines. …..one of the many underrated & unknown Indians. We have been cheated by hiding the greatness of all our great nation and people as they were interested only in self and own Glory, संदर्भ :- Tokyo Trials – Radha Binod Pal a Judge

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

In reply to by मदनबाण

खूप लक्ष देऊन यातील न्यायाधीश पाल आणि स्वीडन चा न्यायाधीश यांचे म्हणणे ऐकावे लागते.. हा चित्रपट म्हणजे 'एक रुका हुवा फैसला ' चा जणू एका फार वरचं पातळीवरचे रूपांतर ( तसे एक रुका हुवा हा सुधाच १२ अँग्री मेन याचे रूपांतर होते म्हणा) फक्त १२ सर्वसामान्य नागरिकांनऐवजी ७/८ न्यायाधीश ते सुद्धा प्रत्यक्ष देशाने खास निवडून पाठवलेले म्हणजे यातील वाद प्रतिवाद किती क्लिष्ट असतील याची कल्पना करा मजा आली बघताना .. डोकं दुखलं पण मजा आली

१. पाकव्याप्त काश्मिरमधील हाॅस्पिटलातील निम्म्या खाटा लष्करासाठी मोकळ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं म्हटलं जातंय. २. रशियातील विमानतळ भारतीय विमानांना केव्हाही वापरता येतील. त्यासाठी पूर्वपरवांगीची गरज नाही असं कळतंय.

सरकारने मोबाईलमधील ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली यामुळे काय होणार हे मला तरी माहिती नाही. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध नसतील परंतू प्ले स्टोअर टाईप विविध स्टोअरवर हे अ‍ॅप्लीकेशन मिळत असतातच. तिथे आणि तशा अनेक स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप मिळत असतात, जाणकारांना माहिती आहेच. व्हीपीएन द्वारे असे अनेक अ‍ॅप वापरले जातात. असो, सरकारने काहीतरी पाऊल उचललं सरकारचं अभिनंदन. सरकारने हळुहळु अब्जावधी डॉलर्सची जी चीनी गुंतवणूक आहे तिला समूळ नष्ट करुन टाकावे, जे होईल ते होईल. बाकी आज चार वाजता पंतप्रधान आपल्या भेटीला येत आहेत तेव्हा चीन संबंधात काही नवे असले तर धाग्यात येईनच आज चार बजे देखना न भूले.. मेरे प्यारे भाईयो और बहनो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे चिनी अ‍ॅप्स बंद करण्याची तांत्रिक प्रक्रिया काय असेल हे जाणण्यास उत्सुक. जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ? बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ? शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ? सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ?

In reply to by चौथा कोनाडा

जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ? नाही बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ? नाही शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ? नाही सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ? नाही फक्त प्ले स्टोअर मधून काढलंय. कदाचित पुढे ISP आधीच install असलेल्या अॅप साठी इंटरनेट ब्लॉक करतील. ताजा कलम : टिक टॉक प्ले स्टोरवर सर्च केलं तर दिसत नाही. गुगल वर सर्च करुन प्ले स्टोअर च्या लिंक वर क्लिक केलं तर प्ले स्टोअर मध्ये tiktok वर जातो आणि इंस्टॉल करता येतं.

In reply to by तुषार काळभोर

+१ शेअरइट अ‍ॅपवर बंदी घातल्या नंतर दुसर्‍या दिवशी वापरण्यासाठी उघडलं तर भारत शासनाची सुचना आली ही "शेअरइट हे चिनी अ‍ॅप असल्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे, कृपया वापरू नका, लवकरच आम्ही या संबंधी योग्य त्या प्रक्रिया आणि कार्यवाही करत आहोत" ही अ‍ॅपबंदी साठी टप्याटप्याने तांत्रिक कार्यवाही करण्याची सुरुवात केलीय असे बातम्यांमध्ये दाखवले जात आहे !

With Chinese troops on Indian territory in 7 places in Ladakh, the PLA is now stepping up activity on the Arunachal Pradesh border. China has activated the Tawang, Walong and Asaphila borders -- which bore the brunt of Chinese attacks in 1962. टिवटिव दुवा :- Ajai Shukla आपल्या बाजुने एअर डिफेन्स सिटिम्स तैनात करण्यात आल्या असुन जमिनीवर M777 howitzers देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत. १] आकाश :- सरफेस टु एअर मिसाइल्स [ रेंज - ३० किमी ] २] Israeli SpyDer ३] Pechora ४] OSA-AK यातील काहींचे माहितीपर व्हिडियो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chinese troops now stepping up activity near Arunachal Pradesh

भौइयो और बहनो... त्यांनी आमचे २० जवान शहीद केलें... बदल्यात आम्ही त्यांचे ५० अप्लिकेशन्स प्ले स्टोर वरून बॅन केले, जे पंडित नेहरूंना जमलं नाही..

चीन ने पाकिस्तानवर जवळपास संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! आता चीनच्या इशार्‍यावर पाकड्यांनी २० हजार सैनिकांना गिलगिट बाल्टिस्तान मध्ये हलवले आहे. . .. ... बादवे...लाखो हिंदूंच्या कत्तली घडवुन आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करुन इस्लामी राष्ट्राची हिंदुस्थान विरोधात निर्मीती झाली त्याच पाकिस्तानात आज साधा नमाज पढण्याचे वांदे झाले असुन यांचे चीनी आका यांची मुक्तपणे ठासत असुन यांच्या बायकांना देखील चीन मध्ये उचलुन नेत आहेत. [ हिंदूंनी चीनी लोकां कडुन काही तरी शिकावे का ? की इथे राहुन तिथे आत्मियता बाळगणार्‍यांनी बोध घ्यावा ? ] टिवटिव दुवा १ :- Yes this is true... टिवटिव दुवा २ :- Aukaat of Porkistanis after Chinese invaded Porkistan टिवटिव दुवा ३ :- MASTER-SLAVE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pakistan Army Veteran calls Kashmiris Traitors for giving Terrorist locations to Indian Army

.....पिवळे चिनी साहित्य मनसोक्त वाचुन देशाचा, देशाच्या पन्तप्रधानाचा व देशाच्या सैनिकान्चा मानभंग, तेजोभंग करणारी व पराकोटीचा द्वेश करणारी व सोयिस्कररित्या खरी माहिती दडवुन खोटी माहिती देणार्‍या व अर्बन नक्षल्यांसारखे आपला अजेन्डा पुढे रेटणार्‍या प्रतिक्रिया देणारी 'पिवळी पिशाच्चे' द्रुगोच्चर होऊ लागली आहेत असे दिसते. आमच्या सैनिकांनी चीनचे ३५ ते ५० सैनिक मारले म्हणुन कदाचित 'दुख्खी आणि वैफल्यग्रस्त' होउन ती 'पिवळी पिशाच्चे' पिसाळली असतील का ?? वरच्या काही प्रतिक्रिया वाचुन तसे वाटले म्हणुन लिहिले.

लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डीव्हिजन तैनात करण्यात आल्या आहेत. रणगाड़े क्षेपणास्त्रे याच्या पूर्ण सज्जतेसह भारताच्या सैन्यदलात मोठ्या हालचाली दिसत आहेत, तिकडे चीननेही एकीकड़े चर्चा करीत असल्याचे दाखवून सीमेवर सैन्य उभे केले आहे. भारत-चीन या दोन्ही देशांच्या कमांडरस्तरावरील चर्चेत भारताने शोक, दौलतबेग, ओल्डीरोड इथे गस्त घालू नये, ही चीनची मागणी भारताने धूड़कावून लावली आहे. चीनच्या दुस-याच्या हद्दीत घुसन्याचा मूर्खपणा वाढत आहे, तो भाग आमचाच आहे ही मुजोरी कमी झालेली नाही. काल पंतप्रधान यांचं राष्ट्राला उद्देशून भाषणात चीनबद्दल एकही शब्द नव्हता, बोलायचं होतं चीनवर पण बोलले चन्यावर ही टीका होत असली तरी काही गोष्टी आणि सर्वच गोष्टी जाहीर सांगायच्या नसतात. मॅपची लढाई आहे, App ची नाही असे असले तरी चीन विरुद्ध आता सरकारने कंबर कसली आहे, एक भारतीय म्हणून चीनची खोड मोडली पाहिजे असे फार वाटत आहे. -दिलीप बिरुटे