Skip to main content

असा भास होतो

लेखक मनोज यांनी शनिवार, 20/06/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो असे कुणी का इतके आवडावे जो जीवनाचा खरा ध्यास होतो
लेखनविषय:

वाचने 2630
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो इथे जरा बदल केला तर मीटर मध्ये फरक नाही पणा ऐकायला बरं वाटतं बघा स्मरतो गजरा केसात माळलेला मोगरा कसा माझा श्वास होतो आणि ही ओळ मस्ता आहे. कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो

उत्तम प्रयत्न! लिहीत रहा,लेखनात सफाई येत राहील. >>>डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो>>>हा छान झाला आहे.