Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 20/06/2020 17:36 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.


वाचने 90075
प्रतिक्रिया 190

प्रतिक्रिया

कायप्पावरचं एका तज्ञांच म्हणणं. ताबारेषेच्या दोन्ही बाजूला नो मॅन्स लँड असते. चिनच्या बाजूच्या नो मॅन्स लँडमधे चीनचे सैनिक आले होते. म्हणून आपणही आपल्या बाजूच्या नो मॅन्स लँड मधे आलो होतो.  चिन्यांचे म्हणणे होते की, आमच्या बाजूची नो मॅन्स लँड आम्ही आत्ता जिथे आहोत त्याच्यापुढे आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे तुम्हीच घुसखोरी केली आहे.  भारत म्हणतोय नाही. आम्ही घुसखोरी केलेली नाहीये. तुम्ही तुमच्या हद्दीत सिमारेषेवर आलात म्हणून आम्हीपण आमच्या हद्दीत सिमारेषेपर्यंत आलेलो आहोत. अमेरिकन वार्तांकनानुसार, ६ जूनला बैठक झाली. दोघांनी सैन्य मागे घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे चिनी सैन्य मागे गेले का हे पाहायला भारतीय सैन्याची तुकडी गेली. तिथे चिनी सैनिक नव्हते पण त्यांचा रिकामा तंबू होता. भारतीय तुकडीने तो तंबू पाडून टाकला. त्याचा राग चिनी सैन्याला आला व त्यांनी त्या तुकडीवर काठ्या खिळ्यांनी हल्ला चढवला. भारतीय सैन्याची तुकडी छोटी असल्याने ती तुकडी गारद झाली. पण हे कळताच आपले सैनीक तेथे धावत गेले व त्यांनी हल्ला चढवला. तो जोरदार हल्ला चिन्यांना झेपला नाही. त्यांचीही हानी झाली.  एवढ्या तंबूच्या क्षुल्लक कारणावरून ही मारामारी व्हायला नको होती. असंही पुढे त्या वार्तांकनांत म्हटले आहे. परंतू भारताचे म्हणणे आहे की, रिकामे तंबू ठोकायचे व कालांतराने तेच तंबू पुरावा म्हणून पुढे करून सिमारेषा पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा ही चीनची आवडती पध्दत आहे. याच पद्धतीने २०१३ साली माघार घेत असल्याचे दाखवून, २४ चौ. किमी ठापलेलेही आहेत. पण आत्ताचे सरकार सिमेवरील सैन्याला डावपेचांमध्ये जास्त महत्व देते. त्यांना थोडे अधिकारही दिले जाताहेत. कशामुळे ते नक्की सांगता येत नाही, पण एवढे मात्र नक्की की, नो मॅन्स लँड मधे रिकामे तंबूसुध्दा ठेऊ द्यायचे नाहीत ही सैन्याची सूचना मान्य करण्यात आली व सैन्याने त्याप्रमाणे कारवाई केली. १९६२ पासून आत्तापर्यंत यशस्वी होत आलेली ही तंबू पघ्दत कायमची मोडीत निघतेय म्हटल्यावर, चिन्यांचा रागाने तिळपापड झाला असल्यास नवल नाही. रिकाम्या तंबूची ही पध्दत वरून किती निरूपद्रवी वाटते पण ती किती उपयुक्त आहे हे ज्याला माहीत नाही तो भारताला बोल लावणारच. वर ठळक केलेले अमेरिकन वार्ताहराची कॉमेंट त्याचीच तर साक्ष आहे. मुख्य म्हणजे भारतातले बहुसंख्य विरोधक हे देशप्रेमी असूनही, त्यांना अर्धवट माहिती देऊन वापरले जातंय याचे वाईट वाटते. त्यामुळे एका अमेरिकन वार्ताहराची दिशाभूल झालेली असल्यास, त्यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही. आणखी एक कायप्पा संदेशानुसार, कॉंग्रेस पार्टी व चीनची कम्युनीस्ट पार्टी यांच्यात नेहमीच माहितीची देवाण घेवाण चालत असते. दोन्ही सरकारांचा त्यात संबंध नसतो. तसा त्यांच्यात करारच आहे म्हणे. वरील माहीती मला नविन आहे. त्याबाबत इथल्या तज्ञांच्या मत प्रदर्शनाची वाट बघतोय. मी अजून कोणतेच मत बनवलेले नाही. चिनी लोक डॅंबीस आहेत हे मात्र मी मानतो.

In reply to by शाम भागवत

प्रतिसाद माहितीपूर्ण आवडला. (शेवटच्या चार-पाच ओळींंबद्ल माहिती नाही) भारतीय कम्युनिष्ट पार्टी कोणत्या तरी गटाने ६२ च्या युद्धात चीनचे समर्थन करीत होते की असे काही तरी माहिती वाचावी लागेल. (चुभूदेघे) ते अवांतर वाढत जाईल. आज आणखी एक बातमी दिसते की गलवान नदीवरील पुल ज्याचं काम चिन्यांनी थांबवलं होतं म्हणे ते पूर्ण झालं. (बातमी) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिन्यांचं हेच म्हणणं होत की, तो पूल नो मॅन्स लँडमधे येतो. म्हणून भारत तिथे पूल बांधू शकत नाही. त्यासाठीच खेळलेली खेळी होती ती. जर जमून गेली तर फायदा होऊन जातो. पण नाही जमलं तर माघार घ्यायची. त्यात नुकसान नसतंच. फक्त चाचपणी होते. कुस्तीतल्या सुरवातीच्या खडाखडीसारखी.

In reply to by शाम भागवत

आंजावर जुजबी शोध घेतला असता ही घटना "नो मॅन्स लॅण्ड" मध्ये घडली असा उल्लेख बातम्यांमध्ये आढळला नाही ! सगळीकडे एलएसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) चा उल्लेख आढळला. ___________________________________________________________________________________ भारत-चीन एलएसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) भारत आणि चीनमध्ये 4,48888 कि.मी. सीमा आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातून जाते. हे पश्चिम क्षेत्र म्हणजेच जम्मू-काश्मीर, मध्यम क्षेत्र म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व क्षेत्र म्हणजेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे. तथापि, अद्याप दोन्ही देशांचे पूर्णपणे सीमांकन झाले नाही. कारण बर्‍याच भागात अनेकांमध्ये सीमा विवाद आहे. पश्चिमेकडील क्षेत्रात अक्साई चीनचा दावा सध्या चीनच्या अखत्यारीत आहे. १९६२ च्या भारताशी युद्धाच्या वेळी चीनने हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. त्याचवेळी चीन पूर्व क्षेत्रात अरुणाचल प्रदेशवर दावा केला. हा दक्षिण तिबेटचा एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅकमोहन लाइनही चीन स्वीकारत नाही, अक्साई चीन भारताचा हक्क नाकारतो. या वादामुळे दोन्ही देशांमध्ये कधीच सीमेबाबत एकमत होऊ शकले नाही. तथापि, यथास्थिती राखण्यासाठी अ‍ॅच्युरियल कंट्रोलची ओळ म्हणजे एलएसी टर्म वापरली गेली. तथापि, अद्याप हे स्पष्ट झाले नाही. दोन्ही देश त्यांच्या नियंत्रणाच्या वेगवेगळ्या सीमारेषा सांगून दावा करतात. अनेक हिमनद्या, बर्फाचे वाळवंट, पर्वत आणि नद्या या वास्तविक सीमारेषेवर (एलएसी) आहेत. एलएसीसह असे बरेच भाग आहेत जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकदा तणाव असतो. त्यामुळेच बर्‍याच वेळा चकमकी होतात आणि आपल्या पर्यंत बातम्या येत राहतात. (संदर्भः https :// www. bbc. com/hindi/india-53096593)

In reply to by चौथा कोनाडा

नो मॅन्स लँड फक्त आंतरराष्ट्रीय सीमेबाबातच असते. त्यामुळे वाद असलेल्या सीमेबाबतच्या वार्तांकनात हे शब्द कधीच वापरले जाणार नाहीत. सीमेवरची परिस्थिती नीट डोळ्यासमोर यावी यासाठी ते शब्द मी वापरले आहेत. त्रासाबद्दल क्षमस्व. प्रत्यक्ष ताबारेषेवर दोन्ही देशांचे सैनीक कधीच उभे नसतात. त्या रेषेपासून थोडेसे आत सोयीच्या जागी पोस्ट उभारलेल्या असतात. त्यामुळे एक अघोषीत अशी मोकळी जागा दोन्ही सैन्यामधे असते. रोज रोज भांडणे न होण्याच्या दृष्टीनेही ते चांगलेच असते. त्यातूनच एक नो मॅन्स लँड परिस्थिती जिला दोन्ही बाजू महत्व देत आहेत असा पायंडा पडत असतो. हाच पायंडा कोणितरी मोडतो व मग कुरबूरी सुरू होतात. कारगीलमध्ये हाच प्रकार झाला होता. “अनेक वर्षे बिनतक्रार पाळल्या गेलेल्या कोणत्यातरी पायंड्याचे उल्लंघन” हेच कारण असते कुरबुरी सुरू होण्याचे. कारगील सारखा प्रकार सियाचीनमधे होऊ नये म्हणून आपण आता तिथे ३६५ दिवस सैन्य पहारा ठेवत असतो. असो.

In reply to by शाम भागवत

..... त्यातूनच एक नो मॅन्स लँड परिस्थिती जिला दोन्ही बाजू महत्व देत आहेत असा पायंडा पडत असतो ...
अगदीच उद्बोधक ! नो मॅन्स लॅण्ड बद्दलची कल्पना आणखी स्पष्ट झाली !

In reply to by चौथा कोनाडा

galwan point

आपल्यासारखाच जरा युट्यूबवर शोधाशोधा केल्यावर लक्षात येते की आपला सीमेचा प्रदेश अरुणाचल प्रदेशापासून ते दौलत बेग ओल्डी जो विमानतळाचा बेस आहे, पुढे अक्साईन चीनचा प्रदेश सुरु होतो त्यावरही आपण हक्क सांगतो पण आता तो मिळविणे म्हणजे युद्धच करावे लागेल असे दिसते. सर्व वादग्रस्तच राहीलेले आहे. पहिल्या छायाचित्रात 'पॅगॉग त्सोवर' आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगतो. पण चिन्यांनी आपल्या पाच पर्यंत घुसखोरी केली आहे आणि तिथेच सध्या वाद सुरु आहे. कोणी कितीही नाही म्हटलं तरी चिन्यांची घुसखोरी केलीच आहे. आपल्याला आपण पॉइंटपर्यंत आपला हक्क सांगितलाच पाहिजे आणि चिन्यांना मागे रेटलेच पाहिजे. चिन्यांचे तंबू म्हणा पेट्रोलिंग म्हणा सध्या ते आपल्या हद्दीत येऊन केली आहे. आणि आपल्याला मागे जावे लागते किंवा दुर्लक्ष होते. चिन्यांच इतिहास असाच आहे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या भूभागावर दुर्लक्ष केले तिथे तिथे त्यांनी तो भाग आपला म्हणून घ्यायला सुरुवात केलेली दिसते.

o

सिमारेषा निश्चित नसल्यामुळे दौलतबेग ओल्डी जे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत ठिकाण आहे, तिथून पाकड्यांवर आणि चिन्यांवर लक्ष ठेवता येते. म्हणून सध्या ओल्डीबेग पासून ते दरबगपर्यंत भारताने रस्त्याचे काम सुरु केले त्यात चिन्यांनी खोडा घालायचे काम केलेले दिसते कारण आपल्या जसजशा सीमा मजबूत होत तसतसे सीमारेषा स्पष्ट होत जातील. माहिती नाही केव्हा होईल ते पण अक्साई चीनवर आपलं नियंत्रण यावे असे मनापासून वाटते. आपण म्हणता तसे सीमेवर सतत अशीच वादग्रस्त ठिकाणे असल्यामुळे नेहमी वाद होतांना दिसतात. एकमेकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्हीही देश आपला सीमा प्रदेश मजबूत करतांना दिसत आहेत. आपला इतिहास सर्व असा मोकळाढोकळा असल्यामुळे नव्या काळात आता अधिक मजबुत व्हावेच लागणार आहे.

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

> पहिल्या छायाचित्रात गलवान खो-यात आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगतो. सर, एक दुरुस्ती करायला हवी. हा नकाशा पॅगॉग त्सो इथला आहे. जिथे ही चकमक झाली त्या गलवान नदी खोऱ्याचा नव्हे.

In reply to by मनो

दुरुस्ती केली. लिहितांनाची चूक लक्षात आणून दिल्याबद्ल धन्स. सध्या विरोधी पक्षाकडून सरकारवर जी टीका केली जात आहे ती याच पॉइंटवरची आहे. सरकार म्हणते की घुसखोरी झालीच नाही. आज दोन व्हीडीयो पाहिले त्यात आपले सैनिक बोटीमार्गे फिंगर पॉइंट ८ पर्यन्त पेट्रोलिंग करत असतात आणि जमीनीवर चालत जाऊन पॉइंट ८ वर जातात पण पॉइंट पाचपासून ते ८ पर्यन्त चिन्यांनी तंबू टाकले आहेत वा त्यांचे सैन्य तिथे आहे. सैन्यस्तरावरुनचर्चेत चिन्यांनी परत जावे म्हणून चर्चा होणार आहेत असे बातम्यांवरुन दिसते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद, डॉ. साहेब ! तुम्ही जोडलेल्या आकृत्यांनी सीमेबाबत चित्र अधिक स्पष्ट झाले !

In reply to by शाम भागवत

वर ठळक केलेले अमेरिकन वार्ताहराची कॉमेंट त्याचीच तर साक्ष आहे.
अमेरिका आणि चीन ह्यांचे पण सध्या फारसे सख्य नसताना , तो अमेरिकन पत्रकार चीनला का झुकते माप देत असावा ? हा प्रश्न तुम्हाला नसुन , फक्त मनात आला तो व्यक्त केला आहे.

In reply to by मराठी_माणूस

रिकाम्या तंबूला काय एवढं महत्व द्यायचं? हा अगदी सहज मनात येणारा विचार असावा असं वाटतं. कोणाची बाजू वगैरे घ्यायचा त्याचा विचार असावा असे काही वाटत नाही. शेवटी हाही माझा तर्कच आहे म्हणा. :) खरे काय ते अजून २-३ वर्षांनी कळेल. :) पण तोपर्यंत तरी रस्ता पूर्ण होऊ दे, एवढीच इच्छा आहे. _/\_

चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे यांच्याशी सहमत पण मुख्य म्हणजे भारतात ज्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये चिनी गुंतवणूक आहे त्यावर काय तोडगा काढणार? उदाहरणार्थ : पेटीएम, बिग बास्केट, फिल्पकार्ट (आणि अजून कितीतरी) यातून चायनीज कंपन्यांना भरमसाठ नफा होतो मात्र या कंपन्यांमूळे हजारो भारतीय लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. आता तीन चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात चीनची 'ग्रेट वॉल मोटर्स' कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे अशी बातमी होती. यातून तीन हजार प्रत्यक्ष रोजगार अपेक्षित आहेत. याचे काय करायचे? हा विषय अवघड आहे पण कुठूनतरी सुरुवात झालीच पाहिजे. यावर अधिक प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

भारतात चिन्यांची गुंतवणूक अनेक क्षेत्रात मोठी आहे. धाग्यातल्या लिंकमधे उल्लेख आहे तसा ”2019 च्या अखेरीस अंदाजे 1,000 चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे किंवा देशात विविध कंपन्यांशी जुगाड जमवून ते सहभागी आहेत, जवळ जवळ 8 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक आणि स्थानिक बाजारात 200,000 रोजगार निर्मितीचा समावेश आहे. आणि चिनी कंपन्यांची भारतात गुंतवणूक आतापर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या जवळ जवळ गेली आहे. हे सर्व भारतातून खरडून काढायचं म्हणजे महा कठीण काम आहे. मिपावरच कोणी तरी प्रतिसादात म्हटलं होतं की चीन्यांच्या उत्पादन हे अतिशय कमी भावात मागणे आणि न घेणे त्याचबरोबर भारतीय उत्पादने तितकीच स्वस्त करणे आणि त्याला उत्तम पर्याय देणे आता अशा गोष्टीमुळे किती फ़रक पडेल ते माहिती नाही. बांधकाम, तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल्स, आणि इतर अनेक गोष्टीत चिन्यांनी इतके खोल पाय रुतले आहेत की ते उपसून काढणे महाकठीण काम वाटतं. पण अशक्यही काहीच नसते. एक साधं उदाहरण बघा काही दिवसापूर्वी प्लेष्टोअरवर आपल्या मोबाईलमधे चिन्यांचे कोणते अ‍ॅप्लीकेशन आहे हे ओळखण्याचे अ‍ॅप होते त्यातून ते अ‍ॅप्लीकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमधे कोणते चीनी अ‍ॅप्लीकेशन आहे हे ओळखून ते रिमोव्ह करायचा पर्याय होता पण चिन्यांच्या तक्रारीनंतर ते अ‍ॅपच प्लेष्टोअरवरुन हटविण्यात आले. चीनी म्हणतात आम्च्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनलेला आहे. ''लॉकडाऊनमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. त्यात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून मध्यमवर्गीयांवर अधिक आर्थिक बोजा पडणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारतीयांकडील अधिक स्वस्त सामान हे चीनकडून येते. त्यामुळे बहिष्कार करण भारताला शक्य नसल्याचे चीनचं म्हणनं आहे. चीनी ज्या अर्थी सध्या आपल्या उत्पादनासंदर्भात इतका हवालदील झाल्याचे एक कारण कोरोनाही आहे. आपण भारतीयांनी रिस्क नको म्हणून चीनी वस्तू खरेदी करणे कमी केल्याचे दिसते, आणि त्याचा परिणाम चीन्यांच्या उत्पादनावर नक्की होणार आहे. बघा आपल्या सर्वांना किती जमते ते...! 'कौन कहता है कि आकाश में सुराख नहीं हो सकता। एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो! -दिलीप बिरुटे

मिसळपाववर अजूनही ही चर्चा का सुरू झाली नाही याचं आश्चर्य वाटलं. असो. १५ जूनला नेमकं काय घडलं याची थोडक्यात पण तार्किक दृष्ट्या सुसंगत माहिती इथे वाचनात आली: https://threadreaderapp.com/thread/1273826233881554944.html चीन्यांनी चर्चेसाठी आलेल्या आपल्या (भारताच्या) छोट्या तुकडीला फसवून ठार केलं त्यात तुकडी प्रमुख (कमांडिंग ऑफिसर) चा समावेश होता. चिडलेल्या ५० ते ६० सैनिकांनी, जे पोस्ट वर वाट पाहत होते, प्रतिहल्ला चढवून कित्येक चीन्यांना कापून काढले. मागून चिन्यांना कुमक मिळाली अन आपले २० सैनिक धारातीर्थी पडले. १० पकडले गेले. आपल्या तुकडीच्या प्रमुखाला नाहक फसवून ठार केल्याचा बदला आपल्या सैनिकांनी शत्रूचे ४० ते ५० सैनिक मारून घेतला. चीन्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी आपल्या (भारतीय) सैनिकांच्या बेशिस्तीवर (त्यांच्या दृष्टीने बेशिस्त) बोट ठेवले: https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/first-hi… पण स्वतः च्या (चीनच्या) सैन्याची आगळीक (चर्चेसाठी आलेल्या भारतीय तुकडीला फसवून ठार केलं गेलं) मात्र त्यांनी सोयीस्करपणे नजरेआड केली. याही मागे गेलं तर चीनला खरी भीती आहे ती गलवान खोऱ्यात दळणवळणाच्या सुविधा तयार करून, भारत भविष्यात सैनिकी कारवाई करून अगदी सहजपणे अक्साई चीन भूभाग कधीही ताब्यात घेवू शकतो. कारण भारताने (सरकार कोणाचेही असो) नेहमीच आपली भूमिका कणखरपणे मांडली आहे -- पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि एक ना एक दिवस आपण तो मिळवणारच. कोरोनामुळे जगभर डागाळलेली प्रतिमा आणि त्यामुळे होणारा आर्थिक परिणाम यातून जगाचं आणि महत्वाचं म्हणजे चिनी जनतेचं लक्ष इतरत्र वळवून आपली खुर्ची शाबूत आणि मजबूत ठेवण्यासाठी झी जिनपिंग नी आता युद्धाची तयारी सुरू केली आहे. सर्व जग कोरोनाशी आणि आर्थिक संकटाशी दोन हात करण्यात गुंतलेलं असताना हीच ती वेळ दुसऱ्याची जमीन गिळंकृत करून दक्षिण आशियात भारतावर मानसिक वर्चस्व निर्माण करण्याची, असे मनसुबे आखले जात आहेत. भारताला चीनची दादागिरी कसेही करून झुगारून देण्याशिवाय आता पर्याय नाही. सीमेवर युद्ध कदाचित होणार नाही पण भारत चीन शीत युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांनी सर्वपक्षीय सभेतल्या भाषणात "ऐतिहासिक क्षण" हा उल्लेख करून आजवरची मुत्सद्देगिरीची दिशा पूर्ण बदलण्याचे संकेत दिले आहेत.

In reply to by श्रीगणेशा

पहिल्या लिंक बद्दल धन्यवाद. चीनच्या कुरापती भारताला नवीन नाहीत. आपल्याला केवळ ६२ चे युद्ध माहिती असते. त्यानंतरचे चीनचे २ युद्ध प्रयत्न हाणून पाडत भारताने मिळवलेले विजय आपल्या लक्षात राहत नाहीत. किती मोठ्या प्रमाणात कोणती कारवाई होईल त्याचा अंदाज येणं कठीण आहे. पण जर चीननं युद्ध केलं तर ते आपणच जिंकू हे मात्र निर्विवाद.

भारत-चीन युद्ध सुरू झाले तर रशिया तटस्थ असेल की भारताबरोबर? Quora varil comment लहानशी लुटुपुटुची मारामारी असेल तोवर कुणीच मध्ये पडणार नाही. थोडेसेही मोठे हल्ले झाले तर ३रे महायुद्ध होईल आणि आजवर महायुद्धात मूळ हल्लेखोर देश नुकसानीत गेले, तबाह झाले. चीनला तशी संपण्याची इच्छा नसावी. आजही जपान सार्वभौम देश नाही. जर्मनी एकाच जातीपंथातला (युरोपियन), काहीसे रक्तगुण समान असलेला देश असल्याने पुन्हा मिसळून गेला. पण चीन तसा नाही. तिसऱ्या महायुद्धात चीनला संपल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांना ठाऊक आहे. चीनने थोडाही भारतावर मोठा हल्ला केला तर सर्वप्रथम भारताने तिबेट ताब्यात घेऊन स्वतंत्र करणे जास्त शहाणपणाचे व उपयोगी ठरेल. तो भाग चीनने जबरीने काबीज केलेला असल्याने आणि चीनच्या प्रस्तावित OBOR आपोआप अडथळा निर्माण होईल आणि म्हणून भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव कमी राहील. आणि चीनने जास्तच युद्ध वाढवले तर चीनची पूर्ण पूर्व किनारपट्टी फक्त जी औद्योगिक दृष्टीने पुढारलेली आहे, ती संपविण्यात येईल ज्यात जपान, तैवान, इंडोनेशिया, मंगोलिया, विएतनाम, भारत, दक्षिण कोरिया, हे मुख्य साऊथ चीन समुद्र भागातील देश युद्धात चीनविरुद्ध भाग घेतील आणि कोरोनाबाधित इटली, जर्मनी, फ्रांस, इंग्लंड आणि रशिया व अमेरिका चीनला घेरून तयार राहतील जेणेकरून युद्ध आण्विक बाजूला कळणार नाही. चीन अजूनही वैद्यकीय खास करून औषधी क्षेत्रात मागेच आहे जरी त्यांनी विषाणू Virus संबंधी प्रयोग केले ज्यात चीनसुद्धा हरला आणि त्यांचे अनेक लोक मारले गेले जे त्यांनी जरी जगापासून लपविले तरीही जगाला माहीत आहे. आणि निव्वळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, UNच्या इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर तसेच डॉलर ऐवजी चिनी युऑन Yuon चा कब्जा करण्यासाठी चीन ३रे महायुद्ध करणार नाही इतकेच नाही तर चीन स्वत:हुन ते टाळेल कारण त्याची खूप मोठी शिक्षा चीनलाच भोगावी लागेल. आज अमेरिका चीनच्या सर्वात जास्त कर्जाखाली असला तरीही. (अमेरिकेचे एकूण कर्जापैकी साधारण १७% कर्ज चीनकडून घेतलेले आहे आणि त्याच्या खालोखाल साधारण १५.५% जपानकडून). जपानचे सैन्य अमेरिकेच्या आधिपत्याखाली असल्याने जपान आणि चीन एकत्र होऊ शकणार नाही जरी ते एकवर्णीय (Race) आहेत (तरी ते शेकडो वर्षांपासून एकमेकांचे शत्रूच आहेत) आणि चीन दुसऱ्या महायुद्धात जपानने केलेली वाईट हालत विसरूच शकणार नाही. आणि म्हणूनच ३रे महायुद्ध खरं तर होणार नाही. मोठ्यात मोठे म्हणजे दक्षिण चीन देशांपर्यंत ते सीमित राहील. इतके मात्र नक्की कि चीनने मोठी लढाई लढण्याची तयारी म्हणून युद्ध झाल्यास जरुरी इतका मोठ्ठा तेल Oil साठा अगोदरच करून ठेवला आहे. आणि चीनने युद्धात तेलमार्गावर असलेले त्यांचे तळ वापरण्याचा प्रयत्न जरी केला तर मध्यपूर्वेतील देश आणि भारत-रशिया-अमेरिकेचे तळ त्यांना नाकाम करू शकतील. तशी युद्धाची परिस्थिती चीन येऊच देणार नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीनला युद्धाचा सराव मुळीच नाही. चीनच्या सैनिकांपेक्षा पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया सारख्या लहान देशांनाही लढाईचा जास्त सराव आहे. पाकिस्तानची भारतावर ही कृपाच आहे की तो भारतीय सैन्याला कायम तयारीत राहणे भाग पाडतो आणि भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय सैन्यात भाग घेत असते (त्यात पाकिस्तानही मागे नाही). फक्त पाकिस्तानला युद्ध करणे परवडणारे नाही. चीन त्यांना युद्धात खेचू शकणार नाही कारण तसे झाले तर सर्वप्रथम CPEC चे सर्वात जास्त नुकसान होईल. जरी CPEC रस्त्याची कामे बॉम्ब मिसाईल हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी योजलेली Design केलेली आहेत. एकदा का भारताने POK, आणि पाकने चीनला दिलेला POKचा भाग कापला, जे शक्य आहे कारण मुख्य चीन आणि POK यात तिबेट हा राहण्यास तसेच खडे सैन्य ठेवण्यास खूप कठीण असलेला भाग आहे ज्यामुळे तेथील वातावरणात चिनी भूदल सैन्य टिकणार नाही. पूर्ण जगात त्या कठीण प्रदेशात युद्ध करू शकणाऱ्या सैन्याच्या ३-३।। पलटणी फक्त भारताकडे आहेत, त्या म्हणजे डोग्रा आणि गोरखा पलटणी. आणि यासाठीच चीन नेपाळला फूस लावत असतो की चीनविरुद्ध भारत गोरखा सैन्य वापरू शकणार नाही. आणि म्हणूनच चीनशी युद्ध वाढते दिसताच भारताने ताबडतोब नेपाळचा बंदोबस्त करणे जरुरी आहे. आणि यासाठीच भारत कधीही नेपाळला मदत बंद करीत नाही. सद्य नेपाळ सरकार पाडणे भारताला काहीच कठीण नाही (जशी राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, झारखंड सरकार निव्वळ भाजपप्रणित केंद्रीय NDA सरकारच्या मुद्दाम केलेल्या दुर्लक्षामुळे टिकून आहेत). एकूण परिस्थिती पूर्ण असीमित युद्धाची नसून सीमित युद्धाचीच दिसते आहे आणि तिथपर्यंतच चीन मजल मारू शकेल अन्यथा चीनचे खूप नुकसान होईल हे चीनला कळून चुकलेले आहे. आणि यासाठीच चीन पाकिस्तान-भारत युद्ध पेटवू पाहाय आहे, ज्यापासून पाकिस्तान दूर पळते आहे (जरी पाकिस्तानने मिलिटरी खर्चासाठी या वर्षी बजेटमध्ये जास्त तरतूद केल्याचे समजते). कारण चीनला भारताकडून फटका म्हणजे पाकिस्तानचा सुंठीवाचून खोकला जाणे आहे. CPEC जितका लांबेल तितकेच दिवस पाकिस्तान सार्वभौम (स्वतंत्र) आहे हे पाकिस्तानला कळून चुकले आहे. आणि त्यामुळेच पाकिस्तानकडून आतंकवादी कुरबुरी सध्या कमी आहेत. भारताने POK, गिलगिट-बाल्टिस्तान ताब्यात घ्यावा हीच पाकिस्तानची मनोमनी ईच्छा असणार आणि आहे हे दिसून येत आहे. POK, गिलगिट-बाल्टिस्तान भारताने ताब्यात घेतला की CPEC हवेत विरेल. तसे कबायली टोळीवाल्यांमुळे POK हा भाग कुणाच्याही ताब्यात राहू शकत नाही, जसे अफगाणिस्तानमधून अगोदर रशियाने पाय काढून घेतला आणि आता अमेरिकाही तिथून पळ काढू इच्छित आहे. POK भागात अनेक अफगाणी टोळीवाले अमेरिकेच्या गुपचूप पाकिस्तानने फुलविले, फळविले आणि इतके वर्ष अफगाणिस्तानमधील टोळीयुद्धात मदत करून खूप वर्षे अमेरिकेकडून पैसा लाटला. या भागात प्रथम रशिया हरला, नंतर अमेरिका पळ काढण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून अमेरिका पाकिस्तानला अधूनमधून मदत करीत राहते जोपर्यंत अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानमधून सुखरूप निघत नाहीत. आणि आता चीन CPECद्वारे त्यात फसतोय. भारतालाही POK मध्ये स्वारस्य असण्याचे कारण नाही. ज्या लोकांच्या जगण्याशिवाय इतर जरुरीच्या काहीच इच्छाच नाहीत, त्यांच्यावर कधीच राज्य करता येत नसते. ते फक्त एकमेकांच्या टोळ्यांवर हल्ले करीत राहणार, एकमेकांची बायकामुली पळवित राहणार. धान्य इत्यादी न पिकविता फक्त लुटालूट करून अन्न मिळविणाऱ्याना बंदुकी आणि दारुगोळा सोडून इतर कशाचीही अद्ययावत गोष्टींची इच्छा नसते आणि म्हणून जरुरीच नसते. कां नाही? गेल्या २००० वर्षांचा इतिहास बघा अगदी चंगेजखान, उझबेक, मुघल, शक, हुण इत्यादी कुणीही असो, येथील लोक फक्त लुटले जात राहिले आणि लुटत राहिले, पैसे कमविण्यासाठी हिंदुस्थानातील आक्रमणात अल्पकाळ सैन्यात भरती होत राहिले, एकदुसऱ्यांना मारून व मरुन जगत राहिले. हा भाग फक्त काश्मीरच्या शीख राज्याखालीच काहीसा शांत होता. हा भाग कधी माणसाळणार नाही, तेथे चीननेही CPEC प्रोजेक्ट बांधून मूर्खपणाच केलाय. त्या रस्त्यावर येणारे ट्रक इत्यादी कायम लुटले जाणार, जाळले जाणार. इतिहास साक्षी आहे मुस्लिम कबायली टोळीवाले असोत वा राजे त्यांचा प्रतिकार फक्त हिंदुस्थानीच करू शकले आणि म्हणूनच आज भारतात ८२% हिंदू टिकून आहेत. तिबेट स्वतंत्र करून दलाई लामाला तेथे प्रस्थापित करणे भारताला अशक्य नव्हते, फक्त त्यावेळी असलेल्या नाकर्त्या आणि फक्त चीनला पोकळ धमक्या देणाऱ्या पंतप्रधानामुळे ते झाले नाही (दोन वेळा लिखित धमक्या दिल्या आणो तिसरीअगोदर चीननेच हल्ला केला). १९६२ मध्ये चीनला ठोकणे मुळीच अशक्य नव्हते, चीनची जिंकण्याची स्थिती नव्हतीच. पण भारतीय सैन्याला अखेरपर्यंत हल्ल्याच्याच काय प्रतिकार करण्याच्यासुद्धा आज्ञाच मिळाल्या नाहीत, कारण आपला संरक्षणमंत्री नेहरूंचा मित्र पक्के कम्युनिस्ट होते (ज्याला नंतर काढले गेले). दोघांनी मिळून भारताला आता शास्त्रांची काय जरुरी आहे आणि भारतातील १५ पैकी १२ Ordinance फॅक्टरी बंद केल्या. अन्यथा तेथून ब्रिटिश सरकार पूर्ण जगाला रायफली आणि गोळ्या पुरवीत इतकी त्यांची क्षमता होती. आज त्याच साध्या रायफली आणि गोळ्या आपल्याला सध्या हत्यारबंद पोलिसांसाठी आयात कराव्या लागत आहेत. नेहरू आणि त्यानंतरचे नेहरू/गांधी घराणेही नेहमीच वामपंथी धोरणाचेच होते आणि अजूनही आहेत, फक्त ते निव्वळ सत्तेत राहिल्यामुळे त्यांचे वामपंथी गुण फ्रीजमध्ये बांधून ठेवले गेले, कारण सत्ता काबीज करण्याची जरुरीचं पडली नाही. ती आपोआप मोहनदास गांधींनी स्वत: त्यांच्या ताटात वाढली. जेव्हा स्वातंत्र्यानंतर २-३ महिन्यातच १९४७ सालीच मोहनदास गांधींना चूक जाणवली, तेव्हा नेहरूंना पंतप्रधानपद सोडा सांगितले पण नेहरूंनी सत्तालालसेने मुद्दाम ते कानाआड केले गेले. तसेच १९४८ सालीच आता काँग्रेस निर्मितीचे कार्य संपले म्हणून आता काँग्रेस विलीन Dissolve करा असे सांगितले पण ते बोलूनही उपयोग झाला नाही, कारण त्यानंतर काही ४-५ दिवसातच मोहनदास गांधीजींचा खून झाला. नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई पटेलांसारखे कुणी असते तर त्यांच्याकडून चीनला तेव्हा १९६२ सालीच धडा शिकवला गेला असता. आजही चीन भारताचे वा भारत चीनचे फारसे नुकसान करू शकत नाही कारण भारत-चीन सीमेवर चीन असो वा भारत दोघांची लोकसंख्या फारच कमी आहे आणि तेथेही कठीण हिमालय उभा आहे. लडाखला लागून असलेला भाग लडाखचाच चीनने काबीज केलेला Aksai Chin आणि त्यास लागून मूळ तिबेटचा भाग आहे जेथे युद्धात चिनी (मूळ लडाखी-तिबेटी) सैन्य मारले गेले तरी चीनला त्यात स्वारस्य नाही पण भारतीय लडाखी, Aksai Chin सुद्धा मूळ भारतीय त्यामुळे तेथे फक्त ढकला-ढकली होते. आता कधी गोळ्या चालविल्या जातच नाहीत, हीच परिस्थिती सिक्कीमजवळ. तेथे चिनी अधिकारीसह उरलेले मूळ तिबेटी समोर उभे केले जातात, ज्यांच्या जिवाची चीनला किंमत नाही तशी चीनी सरकारला त्यांची चिनी माणसे मारली गेल्याबद्दलही काही दु:ख वाटत नाही, हे वूहान विषाणू प्रकरणावरून दिसून आले ज्यात वूहानच्या करोना विषाणूने लाख तरी चिनी मेले ज्याचे पण आकडे जगापासून वाचण्यासाठी लपविले गेले. चीन ३रे महायुद्ध करणे शक्य नाही. जास्तीत जास्त South Chin Sea इथपर्यंतच लढाई वाढू शकते ज्यास मिनी महायुद्ध म्हणता येईल. आणि चीनची तितकीसुद्धा हिम्मत होणार नाही. झाल्यास सर्वात मोठे नुकसान चीनचेच असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनची पत कोसळेल. चीनमधील उद्योग बाहेर जात आहेतच, पण चिनी मालाला खरेदी करणारे भारतीय गद्दारांशिवाय कुणी नसेल. चीनचा GDP कोसळेल. शक्यता आहे Security Council मधील सदस्यत्व चीन हिरावून घ्यायला सोपे कारण मिळेल, चीनचे UNOचे सदस्यत्व जरी गेले नाही तरीही UNO च्या सदस्यांची संख्या वाढविली जाईल आणि त्यात भारत, तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान इत्यादीची वर्णी लागेल. कुणास ठाऊक भारतीय २० सैनिक मारले गेल्याबद्दल हे काय झालं, ऐसा तो मैने नही कहा था म्हणत चिनी क्सि जिनपिंग रडत असेल, चीनचेही ५९ मेलेत, पण त्याची चिंता अर्थात क्सि जिनपिंगला नसणार. पण भारताचे मेले तर युद्ध जवळ येते, जे करण्याची त्याची इच्छा आहे कि नाही कुणास ठाऊक. की फक्त हूल द्यायला गेले आणि २० भारतीय मारून बसले. समजेलच लवकर. पण भारत-चीन युद्ध होण्यात अमेरिका आणि युरोपियन यांचा फायदाच आहे, शस्त्र त्यांचीच विकली जाणार आहेत. आणि यावेळी युद्ध त्यांच्या घरादारांत नाही, दूरच्या दुसऱ्यांच्या घरात आहे. त्यांना फक्त बसल्या जागी टाळ्या वाजवायच्या आहेत. मॉडीजी टुम लडो, हॅम टुम्हारे पीचे हाय

In reply to by अर्जुन

मिमांसा करण्याचा स्तुत्य प्रयत्न. बर्‍याच बाबींना छेडलंय. :-) - अगोदरच्या महायुद्धांची कारणे बघीतली तर बुभुक्षीत महत्वाकांक्षा हे एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. तसंच आर्थिक अराजक माजलं आणि ते फार लांबलं, तर त्याची परिणती युद्धात होऊ शकते. सद्य जागतिक परिस्थितीत या दोन्ही गोष्टी दिसून येतात. - जर चीनकडून युद्ध झालं तर पाकिस्तानला त्यात उडी घेण्यास ते भाग पाडू शकतात. सध्याच्या परिस्थितीत पाक अर्थव्यवस्था जवळपास संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. केवळ चीननं दिलेलं कर्ज माफ जरी केलं तरी पाकची परिस्थिती बर्‍यापैकी सुधारेल. युद्धपरिस्थितीत चीन तसं करू शकतो. अफगाण युद्धाच्या वेळेस अमेरिकेने अनेक देशांची कर्जे केवळ पाठिंब्यासाठी माफ केली होती. इथे तर प्रत्यक्ष सहभाग घ्यायला लावण्यासाठी चीन एवढे तर नक्कीच करू शकतो. - चीनला सध्या मित्र असलेले दिसत नाहीत असं म्हणणं योग्य ठरेल. पाकिस्तान आणि उ. कोरीया एवढेच देश सध्या चीनसोबत असल्याचे चित्र दिसते. बाकीच्या अनेक लहान देशांना चीननं आर्थिकदृष्ट्या अंकित करून जरी घेतले तरी ते प्रत्यक्ष युद्धात किती मदत करतात ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. - सीमित युद्ध करणे चीनला अजिबातच परवडणारे नाही. कारणे दोन - १. सध्या चीनच्या विरोधात असलेलं जगातील बहुतांश जनमत. ऑफिशियल स्टँण्ड घेण्यासाठी बहुतांश देशांना ते कोलीत मिळेल. २. सीमित युद्धातून मिळणारा नगण्य फायदा. उलट सीमित युद्ध भारताच्या पथ्यावर पडणारं असेल. युद्ध अटळ आहे असं चित्र सध्यातरी दिसत नाही. ते होऊ नये हेच सर्वात चांगलं. पण झालंच तर आहे त्या परिस्थितीत भारत त्यासाठी तयार असेल, असा एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे.

गावात एक म्हण आहे, वेळेला शेजारीच उपयोगाला पडतो, पण आमचे शेजारी एकास एक नग आहेत एक दहशतवादी पाठवतो, एक घुसखोरी करतो. नेपाळी सुद्धा आजकाल चीन च्या बुडाला चिकटलेले आहेत. बुंगलादेश वाले चितगाव देतायत, श्रीलंका हंबंनटोटा देऊन फसली आहे. पाकिस्तान न गुआदार उघडले आहे चीन साठी. असले शेजारी असण्यापेक्षा आम्ही एक बेट असतो तर बरं झालं असतं आष्ट्रोल्यासारखं. आणि चायनीज सामान नाही वापरलं तर मरणार नाही कोणी. दहा वर्षापूर्वी कुठे होते स्मार्टफोन? कोण वापरत होता चिरकुट इलेक्ट्रॉनिक? कुणाकडे होते दहा जाकेट, पाच बुट, दहा गॉगल? मरत होती का लोकं? टिक टॉक नव्हतं म्हणून काय बिघडलं होतं आपलं? आपण जर हायफाय चोजं कमी केली आणि गरज आहे तेवढं च खरेदी केलं ना तर कशाला लागतं चायनीज? भारतीय वस्तू म्हणजे दणकट, वापरायला सुटसुटीत आणि तुलनेने स्वस्त परंतु टिकाऊ असतात. त्यांचा पर्यावरणाला फायदा नाही का? वापरा आणि फेका च उदात्तीकरण थांबलं तरच उपयोग आहे बघा.

मी काय म्हणतो.... नाही म्हटलं.... ते बाल्कनीत येऊन , टाळी, थाळी बडवून, दिवे लावण्याचे, व त्यातून निर्माण होणाऱ्या, पवित्र ध्वनी प्रकाश लहरींनी, चिन्यांना आपल्या भूमीवरून हुसकावून लावण्याच्या, जगतगुरुने सांगितलेल्या रामबाण इलाजाची, कायप्पा ढकलपत्रे, भक्त संप्रदायाकडून आली कशी नाहीत अजून....

In reply to by mrcoolguynice

ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा काही लोकांना राजकारण कसे दिसते हे समजत नाही, हिथे थाळी वाजवून डॉक्टर्स विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुद्दा आणायची काय गरज होती? ज्या लोकांना bjp आवडत नाही त्यांनी नक्कीच बजप चा विरोध करावा पण हिथे bjp विरुद्ध चीन नसून भारत विरुध्द चीन आहे हे लक्षात ठेवावे. उद्या समजा दुर्दैवाने चिनी सैनिक तुमच्या शहरात घुसले (अस होणार नाही) तर तुम्ही मानणार आहे का चिनी सैन्याला की मी bjp चा supporter नाही मला मारू नका, आणि ते ऐकणार आहे का तुमचं. एका शाहिद झालेल्या जवानांच्या वडिलांनी सुद्धा राजकारण करू नका म्हणून सल्ला दिलाय, त्यामुळे त्यांचा तरी मान ठेवा. सरकार म्हणून bjp च काय चुकलं असेल तर चर्चा करण्यात काहीही हरकत नाही पण ओढुन ताणून कुठेही bjp ला आणण्यात काहीही गरज नाही.

@ अर्जुन सुंदर विश्लेषण ! चीन मधील वाढती बेरोजगारी, वुहान मधील कोरोनाच्या प्रादुर्भावाने लाखो चीन नागरिक मेले आणि मरत आहेत त्यांचा सरकार विरोधात उफाळुन येणारा रोष, तसेच हाँगकाँग मधील आंदोलन यांच्यामुळे चायनीज वन पार्टी सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे, हा धोका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनतेचे लक्ष दुसर्‍या विषयात गुंतवणे आणि त्यासाठी शत्रु निर्माण करुन कृत्रिम राष्ट्रवादाची निर्मीती करुन जनतेला तो विषय देणे ज्यामुळे सत्तेवर येणारे गंडांतर टाळता येते. यामुळे चीन आपल्याशी मध्यम युद्ध करण्याची मानसिकता तयार करुन आणि त्याप्रमाणेच नियोजन करुन सीमेवर आला आहे असे सध्या तरी चित्र दिसत आहे. हिंदुस्थानशी पंगा घेणे परवडणारे नाही, हे चीनचे थोबाड एकादा व्यवस्थित सुजवले की त्यांच्या कायम स्मरणात राहिल याची खबरदारी आपण घेतली पाहिजी आणि जागतिक पातळीवर चीनला जितके उघडे पाडता येइल आणि त्यांच्या विरोधात जितकी वातावरण निर्मीती करता येइल ती केली पाहिजे, अशी संधी आपल्याला देखील परत मिळणार नाही. आपले २० जवान वीरगतीस प्राप्त जरी झाले असले, तरी त्यांनी त्या स्थितीत केलेला करुन दाखवलेला पराक्रम हा अतुलनिय आहे :- P1 संदर्भ :- reddit जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

In reply to by मदनबाण

मालक ते व्हीडियोच्या लिंका द्या. नाय तर पुन्हा धागा जड होऊन जाईल. :) -दिलीप बिरुटे

मदनबाण जी, आपल्या प्रतिसादातील खालील ओळी, खुपच अर्थपूर्ण आहे, आणि त्या अर्थाचा आपण सर्वच भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करून, आपण आपली भारतीय लोकशाही विचारबैठक कशी मजबूत करता/ठेवता येईल, याचासुद्धा प्राधान्यक्रमात समावेश करावा अशी आशा...
सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे, हा धोका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनतेचे लक्ष दुसर्‍या विषयात गुंतवणे आणि त्यासाठी शत्रु निर्माण करुन कृत्रिम राष्ट्रवादाची निर्मीती करुन जनतेला तो विषय देणे ज्यामुळे सत्तेवर येणारे गंडांतर टाळता येते.

In reply to by mrcoolguynice

आपल्या प्रतिसादातील खालील ओळी, खुपच अर्थपूर्ण आहे, आणि त्या अर्थाचा आपण सर्वच भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करून, आपण आपली भारतीय लोकशाही विचारबैठक कशी मजबूत करता/ठेवता येईल, याचासुद्धा प्राधान्यक्रमात समावेश करावा अशी आशा... हे मी चीनसाठी म्हंटले आहे, तिथे एकच पार्टी म्हणजे सीसीपी आहे, आपल्या इथे लोकशाही असुन राजकारणी पर्ट्यांची काहीच कमतरता नसुन जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही असल्यानेच मी मोंदींचा निषेध नोंदवु शकतो आणि मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य आपल्या मिळाले आहे आणि आहे. हेच चीन असता तर तिथे विरोध करणारा सरळ गायब होतो आणि इंटनेटवर देखील कोणतेच स्वात्यंत्र्य नाही. बाकी भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करायचे झाले तर... त्यांच्या मनात नसलेल्या राष्ट्रवादाची करावयास हवे, जे आपल्या सैनिकांचे रक्त चीन सांडत आहे हे पाहत असुन देखील देखील आधाश्या सारखे चीनी मोबाइल विकत घेण्याच्या स्पर्धेत धावण्यात धन्यता मानतात ! संदर्भ :- OnePlus 8 Pro sold out within minutes of going on sale even as calls for boycotting Chinese items

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

In reply to by मदनबाण

आपल्या इथे लोकशाही असुन राजकारणी पर्ट्यांची काहीच कमतरता नसुन जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही असल्यानेच मी मोंदींचा निषेध नोंदवु शकतो आणि मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य आपल्या मिळाले आहे आणि आहे. हेच चीन असता तर तिथे विरोध करणारा सरळ गायब होतो आणि इंटनेटवर देखील कोणतेच स्वात्यंत्र्य नाही. बाकी भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करायचे झाले तर... त्यांच्या मनात नसलेल्या राष्ट्रवादाची करावयास हवे, जे आपल्या सैनिकांचे रक्त चीन सांडत आहे हे पाहत असुन देखील देखील आधाश्या सारखे चीनी मोबाइल विकत घेण्याच्या स्पर्धेत धावण्यात धन्यता मानतात !
आपल्या इथे १९४७ पासूनच अखंडित लोकशाही आहे, व मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य १९४७ अबाधित आहे (काही दृश्य व अदृश्य आणीबाणी कालावधी सोडून). आपल्या स्वतंत्र सैनिकांनी , ते पुढे राज्यकर्ते झाल्यावर देखील, दुसऱ्या मतांचा आदर करण्याची थोर परंपरा घालून दिली होती खरी. केवळ हयात पंतप्रधान मोदीजी यांच्या हयातीतच झालेली टीका असो, किंवा स्वर्गीय पंतप्रधान नेहरू यांच्यावर मरोणोत्तर अनेक दशके चाललेली खालच्या दर्जाची टीका असो, किंवा नंतरच्या पंप्रधानवरील मतप्रदर्शन असो, मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य भारताच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला मिळाले आहे , त्याचा यथेच्छ उपयोग काही भारतीय पिढ्यानपिढ्या करतही आहेत, व मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य, नोटबंदी सारखी गेल्या काही कालावधीतील नवलाई नाही, याची जाण, सुजाण नागरिकांना असेलच, असा माझा आशावाद आहे. केवळ फोन खरेदीवरून , कोणत्याही भारतीयाच्या, मनात असलेला/ नसलेल्या राष्ट्रवादाविषयी अनुमान बांधणे हे वैचारिक संयमाचे शीघ्रपतन होईल. मोदीजी स्वतः चिनी मालकी असलेल्या पे टी एम चा पुरस्कार करतात, म्हणून त्याचा राष्ट्रनिष्ठेविषयी आपण शंका घेऊ शकत नाही. फोन बरोबरच इतर असंख्य पैलू ध्यानात घेऊनच अनुमान बांधणे इष्ट होईल. असो, केवळ एक पक्षीय चीनमधील राजकीय यंत्रणा, व एक सुप्रीम लीडर च्या कुठल्याही निर्णयाचे अंध समर्थन करणारे मंत्री/सचिव/भक्त, याविषयी आपले निरीक्षण व अदृश्य तिटकारा प्रतिक्रियेतून जाणवल्याने, मला आशा आहे की असे सुप्रीम-लीडर संस्कृती विषयी, माझ्यासारख्या भारतीयांसारखी विचार बैठक, आपली असावी, असा कयास बांधायला वाव आहे.

In reply to by mrcoolguynice

केवळ हयात पंतप्रधान मोदीजी यांच्या हयातीतच झालेली टीका असो, किंवा स्वर्गीय पंतप्रधान नेहरू यांच्यावर मरोणोत्तर अनेक दशके चाललेली खालच्या दर्जाची टीका असो, किंवा नंतरच्या पंप्रधानवरील मतप्रदर्शन असो, मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य भारताच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला मिळाले आहे , त्याचा यथेच्छ उपयोग काही भारतीय पिढ्यानपिढ्या करतही आहेत, व मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य, नोटबंदी सारखी गेल्या काही कालावधीतील नवलाई नाही, याची जाण, सुजाण नागरिकांना असेलच, असा माझा आशावाद आहे. वरील २ नावात तुम्ही अजुन २ नावे घेतली नाहीत, ती म्हणजे तथाकथित देश की बहु उर्फ राजमाता आणि त्यांचे चिरंजीव बिनडोक गांधी ! या माता पुत्रांचे कारनामे आपणास ठावूक नाही की ठावुक असुन त्यावर आपणास सोयिस्कर मौन पाळायचे आहे ? चीनच्या सत्तेशी कॉग्रेस पक्षाचा MoU [ memorandum of understanding ] कसा असु शकतो ? त्यावर आपले मत काय ? संदर्भ :- Rahul Gandhi make the Congress-China MoU public There is a secret shady pact between CCP and Congress party that makes India’s position very weak केवळ फोन खरेदीवरून , कोणत्याही भारतीयाच्या, मनात असलेला/ नसलेल्या राष्ट्रवादाविषयी अनुमान बांधणे हे वैचारिक संयमाचे शीघ्रपतन होईल. मोदीजी स्वतः चिनी मालकी असलेल्या पे टी एम चा पुरस्कार करतात, म्हणून त्याचा राष्ट्रनिष्ठेविषयी आपण शंका घेऊ शकत नाही. फोन बरोबरच इतर असंख्य पैलू ध्यानात घेऊनच अनुमान बांधणे इष्ट होईल. मी राष्ट्रनिष्ठा नाही तर राष्ट्रभावने बद्धल बोललो आहे याची नोंद घ्यावी. जिथे नागरिक चीनी वस्तुंचा बहिष्कार करतात तिथेच काही त्या जवळ देखील करतात, तेव्हा जे त्या जवळ करतात त्याच नागरिकां बद्धल माझे वक्तव्य आहे. मोदी सरकारने अनेक चीनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करत आहेत हे पेटीएमचे उदा. देताना विसरलात की विचारांचे शिघ्रपतन रोखता आले नाही ? मला आशा आहे की असे सुप्रीम-लीडर संस्कृती विषयी, माझ्यासारख्या भारतीयांसारखी विचार बैठक, आपली असावी, असा कयास बांधायला वाव आहे. मनमोहन असो वा मोदी, योग्य कृती बद्धल कौतुक आणि अयोग्य गोष्टींबदल निषेध नोंदवायला मी दुजाभाव करत नाही. आपले कॉग्रेस पक्षाने साइन केलेल्या MoU बद्धल काय मत आहे ते इथेच कळल्यास आपल्या विचारांच्या बैठकी बद्धल मलाही अंदाज येइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

In reply to by मदनबाण

वरील २ नावात तुम्ही अजुन २ नावे घेतली नाहीत,
कारण विषय भारतीय पंतप्रधान यांच्यावरील टीकेचा होता.
MoU बद्धल काय मत आहे
आपण दिलेला दुवा, व त्याचे लेखक, त्यातला मजकुराची सतत्या याबद्दलची विश्वासार्हता निदर्शक कोणतीही माहिती, दुर्दैवाने माझ्याकडे नसल्याने माझा पास.
मोदी सरकारने अनेक चीनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करत आहेत हे पेटीएमचे उदा. देताना विसरलात की विचारांचे शिघ्रपतन रोखता आले नाही ?
माझा प्रतिसाद एखाद्याने खुल्या मनाने वाचता, पेटीएमचे उदा. असूनही माझी मोदींच्या राष्ट्रभवानेविषयी शंका नाही, असेच प्रतीत होईल, अशी माझी आशा होती.
जिथे नागरिक चीनी वस्तुंचा बहिष्कार करतात तिथेच काही त्या जवळ देखील करतात, तेव्हा जे त्या जवळ करतात त्याच नागरिकां बद्धल माझे वक्तव्य आहे.
त्याला विरोध न करता, उलट मी हे निदर्शनाला आणू उत्सुक होतो, की केवळ फक्त फोन पुरते मर्यादित दृष्टिकोन न ठेवता, अधिक व्यापक दृष्टिक्षेप आपण टाकला पाहिजे आहे. नाहीतर काये की एखादा उत्साही राष्ट्रप्रेमी, आपला जुना चायनीज फोन, ओळखीत कोणाला वापरायला देऊन, सो कॉल्ड नॉन चायनीज फोन घेऊन, राष्ट्रप्रेमाच्या दिवा स्वप्नात रंगून जाण्याचा धोका संभवतो. विचारांच्या याच प्रकारच्या शीघ्रपतना विषयी इशारा देण्याचा माझा हेतू स्पष्ट होतो. सध्याच्या चायनीज कंपनीच्या रद्द केलेल्या निविदा, जर केवळ वरकरणी मेड इन इंडिया लेबल लावलेल्या, परंतु चिनी भागभांडवलावर उभ्या राहिलेल्या कंपन्यांच्या वाट्याला न गेल्या, तरच रद्द करण्याची कृती पूर्णार्थ प्राप्त करेल.

In reply to by mrcoolguynice

आपण दिलेला दुवा, व त्याचे लेखक, त्यातला मजकुराची सतत्या याबद्दलची विश्वासार्हता निदर्शक कोणतीही माहिती, दुर्दैवाने माझ्याकडे नसल्याने माझा पास. २००८ मधली बातमी :- Congress, Chinese Communist Party sign MoU टिवटिव दुवा :- https://twitter.com/JethmalaniM/status/1274682842404929538 अवांतर :- चायनीज अँबेसीच्या पोर्टलवर २० एप्रिल २०१७ साली चायनीज फुड फेस्टिवल [ Chinese Diaoyutai Food Festival ] चे फोटो माझ्या पाहण्यात आले आहेत त्याचा दुवा वाचकांसाठी खाली देउन ठेवतो. http://in.china-embassy.org/chn/sgxw/t1455276.htm

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- En Jodi Manja Kuruvi | Vikram | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

In reply to by मदनबाण

आपण दिलेल्या नवीन दुव्याबद्दल धन्यवाद ! परंतु दुव्यातील B & D ( आणि ) छापाच्या या तथाकथित पत्रकारीते विषयी, भाष्य करायला माझा नकार नोंदवतो.

In reply to by mrcoolguynice

परंतु दुव्यातील B & D ( भ आणि द ) छापाच्या या तथाकथित पत्रकारीते विषयी, भाष्य करायला माझा नकार नोंदवतो. या विषयावर अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र यांनी आपल्या सारखेच भाष्य करायचे टाळले असुन राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी सरकारवर सातत्याने टिका करतानच्या बातम्या मात्र पहिल्या पानावर देत आहेत. महाराष्ट्रातील [ पुरोगामी ? ] एकाही वर्तमानपत्रात [ तैमूर ने शी केली तरी त्याची मनोरंजनात्मक बातमी छापणारे ] या बद्धल वाच्यता केलेली निदान अजुन तरी माझ्या पाहण्यात नाही ! वरती मी म्हंटल आहे :- ती म्हणजे तथाकथित देश की बहु उर्फ राजमाता आणि त्यांचे चिरंजीव बिनडोक गांधी ! या माता पुत्रांचे कारनामे आपणास ठावूक नाही की ठावुक असुन त्यावर आपणास सोयिस्कर मौन पाळायचे आहे ? यावर अधिक खाली :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior

In reply to by mrcoolguynice

इलेक्टोरल बॉन्ड ने काळा पैसा कसा नश्ट होणार आहे ते या दुव्यात योग्यरीत्या सांगीतले आहे. गोदी मिडियात या बद्द्ल अवाक्षर नाही. https://www.youtube.com/watch?v=m5s2GP9i1Bo

In reply to by गोंधळी

ओक्के, लिंक बद्धल धन्यवाद. B & D किंवा गोदी मिडिया काही नाही दाखवले जात ते वरच्या दुव्यातुन समजले, तसेच जर गांधी परिवारा विषयी B & D / गोदी मिडियात दाखवले जात असेल तर ते असत्य असते का ? त्या बद्धल देखील वाच्च्यता व्हायलाच हवी, नाही का ? दोष देउन सत्य नजरे आड करणे हे दोन्ही बाबतीत चूक ठरते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

Prime Minister Narendra Modi’s remarks Friday that neither has anyone intruded into Indian territory nor has anyone captured any military post एथेच हा विषय संपला. https://www.youtube.com/watch?v=rLRTz4hSDU4 बाकी त्या जवानांना श्रध्दांजली.

भारताने काय काय केले पाहिजे? १. तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणे व तेथे आपला राजदूत ठेवणे. २. तिबेटच्या परागंदा सरकारला (Government in Exile) ला मान्यता देणे. ३. दक्षिण चिनी समुद्राला पूर्व समुद्र (East Sea) म्हणायला सुरुवात करणे. त्यातून व्हिएतनामच्या दाव्याला पुष्टी देणे. ४. मलाक्काच्या सामुद्रधुनीतील भारतीय नौदलाची गस्त वाढवणे. ५. चीनच्या सीमा भारताशी ऐतिहासिकदृष्ट्या कधीही जुळलेल्या नव्हत्या असे ठासून सांगत तिबेट, सिकियांग, आंतर मंगोलिया, हाँगकाँग इत्यादी प्रदेशांना स्वतंत्र दाखवत चीनचा नवा नकाशा प्रसिद्ध करणे. ६. गंगटोक ते ल्हासा, लेह ते यारकंद मार्गे काराकोरम खिंड अशा रस्त्यांची घोषणा करणे व मुद्दा क्र. ५ नुसार या रस्त्यांचे करार त्या-त्या स्वतंत्र सरकारशी करण्याचे घोषित करणे. ७. तैवानशी नौदलाचा संयुक्त सराव आयोजित करणे. ८. हाँगकाँगच्या लोकशाहीवादी आंदोलनाला उघड पाठींबा देणे. ९. तियानमेन चौकातल्या दडपलेल्या आंदोलनाला उजाळा देत राहणे. चीनमधील मानवाधिकार व लोकशाहीवादी कार्यकर्त्यांचा जाहीर गौरव करणे. ही केवळ सैन्यसामर्थ्याची खडाखडी नसून अनेक पातळ्यांवर अनेक वर्षे खेळावे लागेल असे हे छुपे युद्ध आहे हे ध्यानात ठेवावे. गलवान खोऱ्यातील आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला कडक सलाम!

In reply to by एस

मला वाटते हे सर्व करावे, पण ते २०२२ नंतर. रस्ते पूर्ण झाल्यावर आपला दबाब चीन व पाकिस्तानवर खऱ्या अर्थाने पडायला सुरवात होईल. तोपर्यंत तरी सरकारी पातळीवर खडाखडीचे प्रकारात सैन्याला मोकळीक देणे व चिन्यांना कुरघोडी करू न देणे, रस्त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडणे हेच उपाय अवलंबावेत. तसेच या सगळ्याचे रूपांतर युध्दात होणार नाही यासाठी राजकीय खेळ्या करत राहणेच योग्य होईल. २०२२ नंतर मात्र युध्द झाले तरी हरकत नाही, इतक्या थराला जाऊन, आक्रमकता दाखवायला हरकत नाही. मात्र तोपर्यंत, आम्ही चिन्यांना घाबरत नाही हा संदेश कणखरपणे सर्व जगांत पोहोचायला हवा. ऐनवेळी भारताने कच खाल्ली तर काय करायचे? अशी पुसटशी सुध्दा शंका, भारतीय मित्रांच्या मनात येता कामा नये.

In reply to by शाम भागवत

अहो, मी वेगळे काहीही सुचवत नाहीये. जनरल थोरातांनी मांडलेली व राबवलेली व्यूहरचनेच्या आधारे सगळं बोलतोय. पण आपण ती व्यूहरचना मोडली व १९६२ साली हरलो. आता परत तीच चूक का करायची? चिनने मात्र रसद पुरवढ्यावर ताण येणार नाही याची काळजी घेत (म्हणजे रस्ते बांधत) नेहमी हालचाली केल्या आहेत. थोरातांचे बोलणे चीननेच जास्त मनावर घेतलेले दिसून येते. आवश्यक तेवढा भूभाग ताब्यात आल्यावर त्यांनी आसामात उतरलेले सैन्यही ताबडतोब माघारी घेतले व एकतर्फी युध्दबंदी जाहीर केली. अन्यथा रसदीवर ताण येणार हे त्यांना माहीत होते. तसेच त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या प्रदेशात लागलीच रस्ते बांधले. रसदीवर येणाऱ्या ताणामुळे आसामात घुसखोरी चीन करूच शकणार नाही. जर केली तर, भारताच्या या सापळ्याच चीन अडकेल व त्याचे कंबरडे मोडता येईल हेच तर थोरात सांगत होते. चिनच्या आसाममधील वेगवान माघारीमुळे थोरातजी बरोबरच बोलत होते हेही सिध्द झालंय. जाऊ दे. जे झाले ते झाले. पण चीनशी लढताना ती चूक पुन्हा करायची नाही ही खूणगाठ बांधली तरी पुरेसे आहे. जर युध्द झाले तर त्याचा फायदा आपल्याला उठवता यायला पाहिजे. त्यासाठी पाकने चिनला दिलेला काश्मीरचा भाग व त्यालगतचा अक्साई चीनचा काही भाग येथे वेगाने सैन्य पोहोचवता येईल, यास्थितीत पोहोचेपर्यंत, युध्दाचा आपल्याला काय उपयोग आहे?

In reply to by एस

प्रतिसाद आवडला. आता पुढे काय केले पाहिजे, आता भारताची काय भूमिका राहिली पाहिजे, हे सुचवणारा प्रतिसाद आवडला. भारत आता यापुढे काय पावले उचलेल ते पाहणे रोचक ठरेल. आपले प्रतिसाद नेहमीच नवे, वेगळे आणि माहितीपूर्ण असतात. लिहिते राहा सेठ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, मी वेगळे काहीही सुचवत नाहीये. जनरल थोरातांनी मांडलेली व राबवलेली व्यूहरचनेच्या आधारे सगळं बोलतोय. पण आपण ती व्यूहरचना मोडली व १९६२ साली हरलो. आता परत तीच चूक का करायची? चिनने मात्र रसद पुरवढ्यावर ताण येणार नाही याची काळजी घेत (म्हणजे रस्ते बांधत) नेहमी हालचाली केल्या आहेत. थोरातांचे बोलणे चीननेच जास्त मनावर घेतलेले दिसून येते. आवश्यक तेवढा भूभाग ताब्यात आल्यावर त्यांनी आसामात उतरलेले सैन्यही ताबडतोब माघारी घेतले व एकतर्फी युध्दबंदी जाहीर केली. अन्यथा रसदीवर ताण येणार हे त्यांना माहीत होते. तसेच त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या प्रदेशात लागलीच रस्ते बांधले. रसदीवर येणाऱ्या ताणामुळे आसामात घुसखोरी चीन करूच शकणार नाही. जर केली तर, भारताच्या या सापळ्याच चीन अडकेल व त्याचे कंबरडे मोडता येईल हेच तर थोरात सांगत होते. चिनच्या आसाममधील वेगवान माघारीमुळे थोरातजी बरोबरच बोलत होते हेही सिध्द झालंय. जाऊ दे. जे झाले ते झाले. पण चीनशी लढताना ती चूक पुन्हा करायची नाही ही खूणगाठ बांधली तरी पुरेसे आहे. जर युध्द झाले तर त्याचा फायदा आपल्याला उठवता यायला पाहिजे. त्यासाठी पाकने चिनला दिलेला काश्मीरचा भाग व त्यालगतचा अक्साई चीनचा काही भाग येथे वेगाने सैन्य पोहोचवता येईल, यास्थितीत पोहोचेपर्यंत, युध्दाचा आपल्याला काय उपयोग आहे?

In reply to by शाम भागवत

खरंय. प्रतिसाद पटला. चीनने त्याच्या ताब्यातल्या भूभागावर रस्ते लगेच बांधून घेतलेत. काही तर actual line of control च्या इतक्या जवळ आहेत की त्यातून पुढे भारताला चांगलाच धोका निर्माण होऊ शकतो. भारतानं मात्र जरा काही बांधकाम हाती घेतलं की चीन बोंब उठवतो, दबावतंत्र खेळतो. नेहमीचे फेसऑफ्स त्याच दबावतंत्राचा भाग आहेत. त्यामुळेच एवढी वर्षं तिथं फार बांधकाम झालेलं नव्हतं. आत्ता आत्ता भारतमाला प्रकल्पांतर्गत सीमेलगत बरीचशी कामं झालीयेत/चालू आहेत. पण बांधकामाचंही जाऊ देत.. मंत्रीमंडळातील नेते, लष्करी अधिकारी यांनी अरुणाचल प्रदेश/लद्दाख मधे साधी भेट जरी दिली तरी चीन समज देण्याची वगैरे भाषा बोलतो. चीननं स्वतःचा खूप बागुलबुवा करून ठेवलाय. युद्धतंत्राचा तो प्रभावी भाग आहे. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण केलं की अर्धी लढाई जिंकलेली असते. पण भारतीय लष्कराच्या ६२च्या युद्धातल्या पराजयातील पराक्रमाचीही त्यांना तितकीच जाणीव आहे. ते शौर्य वादातीत आहे. आजपर्यंतच्या युद्धखोरीच्या प्रकारात आणि फेसऑफ्स मधे त्याचं प्रतिबिंब उमटतं. आपणच जर घरबसल्या इतके संतापतो, तर आपलं सैन्य किती भडकलेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. चीन सैन्याचं मनोबल आत्ता कसं असेल हे जाणणं औत्सुक्याचं ठरेल! आता तर Rules of Engagement [ROE] मधे सुद्धा बदल केल्याची बातमी आहे. ज्यांना जो संदेश हवा तो उघड आणि स्पष्ट आहे.

In reply to by एस

एस, प्रतिसाद एक नंबर. चीन उघडपणे पाकड्याना पाठींबा देतो, आपला झेंडा मुद्दाम उलटा लावतो. याच भाषेत यांना उत्तर दिलं पाहिजे.

चीन लडाखमध्ये भारतीय सैनिकांचे हत्याकांड करत असताना... परिस्थिती वर भाष्य करून , भारतीय जनतेला खरी माहिती देणे तर सोडाच, पण भिन्न मतप्रवाहतील घटकांवर, "या परिस्थितीत राजकारण आणू नका" म्हणून भक्तवृंदा कडून एकप्रकारे सात्विक संताप व त्राग्याचे प्रदर्शन करणार्यांनी, डोळ्यावर ओढलेले कातडे बाजूला सारावी... चिनी घुसखोरी इतकाच महत्वाचा, नव्हे त्याच्या कैकपटीने अधिक भरतीयांच्याशी संबंधित कोरोना महासाथी दरम्यान , चाललेले राजकारण पाहावे... जस की दुसऱ्या पक्षांची राज्यसरकारे अनैतिक मार्गाने पडण्याचे प्रयत्न करणे, तेथील रेल्वे सारख्या केंद्रीय साधनांचा वापर करून ठराविक राज्यातील श्रमिक वाहतुकीची वाट लावून त्याचे खापर तेथील राज्यांवर टाकणे, तिथल्या आपल्या पक्षातील पण विरोधी बाकांवर बसलेल्या चमचा पित्त्यांच्या मदतीने, धादांत सणसणीखेज आरोपाचा धुरळा लावणे, अफवेतून मॉब लिंच झालेल्या धार्मिक व्यक्तीच्या, विरुद्ध धर्मियांना टार्गेट करण्याचा दृष्टिकोनातून उन्मादी भडकावू अफवा पसरवून , आधीच अतिश्रमात असलेल्या पोलीस यंत्रणेवर जास्तीचा ताणाचा बोजा टाकणे... हे असे धंदे आधी बंद करण्याचा आग्रह भक्तांनी आपल्या मानस पित्या कडे धरावा.

In reply to by विनोद१८

चीन लडाखमध्ये भारतीय सैनिकांचे हत्याकांड करत असताना... परिस्थिती वर भाष्य करून , भारतीय जनतेला खरी माहिती देणे तर सोडाच, पण भिन्न मतप्रवाहतील घटकांवर, "या परिस्थितीत राजकारण आणू नका" म्हणून भक्तवृंदा कडून एकप्रकारे सात्विक संताप व त्राग्याचे प्रदर्शन
या धाग्यावर, काही जणांकडून हे चालू आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. “अशा प्रकारची वक्तव्यं करुन लोकांच्या भावनांशी खेळलं जात आहे. माझी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना असं करणं बंद करा अशी विनंती करायची आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करताना नियंत्रण रेषेवर नेमकं काय झालं याबद्दल योग्य माहिती दिली नसल्याची टीका केली होती. “संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण विरोधकांना आणि देशवासियांना अशा संवेदनशील घटनांची योग्य माहिती दिली पाहिजे,” असं मत कमल हासन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ता ऑनलाइन | June 21, 2020 06:06 pm

हा आदरणीय पंतप्रधान यांचा दावा आणि वाचाळ माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्याकडून झालेला खुलासा माझ्यासाठी असा आहे: एकूण चिनी सैन्याची मुसंडी २६ चौरस किमी इतकी. नंतर २.५ किमी माघार. उरलेल्या प्रदेशाचे आक्रमित क्षेत्र चीनने आतापर्यंत बळकावलेल्या तुलनेत नगण्य. म्हणून चीनने भारतीय भूमीवर आक्रमण केले नाही. जाता जाता: तेव्हडं चीनने काँग्रेसच्या चीन धार्जिणी कारकिर्दीत लाटलेल्या प्रदेशाचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा कमी राहील एव्हडं बघा.

भारत आणि चीन दरम्यान पारंपरिक युद्धाची शक्यता सध्या तरी नाही. पण गलवान व्हॅली सारख्या छोट्या चकमकी सुरू राहतील, ज्यात बंदुकीची गोळी किंवा तोफेचा गोळा पण न सुटता दोन्ही बाजूने सैन्याचे बळी जातील. पण सध्या तरी भारत आणि चीन गोळी चालवून युद्धाला सुरवात करणार नाही. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, एकदा गोळी चालवून युद्धाचा भडका उडाला तर या युद्धाला लवकरच जागतिक स्वरूप प्राप्त होईल आणि ते भयानक असेल. जगातील कोणत्याही मोठ्या देशाला आपल्यामुळे युद्ध सुरू झाल्याचा ठपका आपल्यावर येऊ द्यायचा नाही. या परिस्थितीत अजून एक होऊ शकते की चीन स्वतः काही न करता सध्या आपल्या कडेवर घेतलेल्या नेपाळ कडून भारताची आगळीक काढू शकतो, किंवा चीन मागे आहे या भरवशावर नेपाळ पण काही वेडेपणा करू शकतो. याची छोटी झलक नेपाळने बिहारला लागून असलेल्या सीमेवर सितामढी येथे दाखवली होती. मात्र नेपाळने आपल्या सुरक्षा जवानांवर हल्ला केला किंवा चिथावणी दिली तर भारत सरकार समोर गंभीर संकट तयार होईल. लक्षात घ्या भारताने या वर कारवाई करायची नाही असे ठरवले तर विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पण सरकारला सुखाने बसू देणार नाही आणि केली तर चीन या संघर्षात नेपाळची बाजू उचलण्याच्या बहाण्याने उडी मारेल आणि त्याला व्यापक युद्धाचे स्वरूप देईल. पुन्हा युद्धखोर म्हणून भारताचे नाव समोर करेल, या बाबतीत आपल्याच देशातील डावे पत्रकार पण चिनचीच भाषा बोलतील. तसेच हीमालयातील लढाईसाठी भारताला गूरखा रेजिंमेन्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण त्या वातावरणात ते सहज व दीर्घकाळ टिकाव धरु शकतात. त्यामूळे भारताला संयम बाळगणे व नेपाळशी संबंध सूधारणे किंवा टिकवणे आवश्यक आहे. जरी चूकीचे वाटत असले तरी नेपाळला सध्या व्यापारात काही सवलती, आर्थिक मदत देऊन तो कूरापती काढणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तसेही ओली जास्त दिवस सत्तेत राहतील असे वाटत नाही. त्यांचा आरोग्याचा आधीच तक्रारी आहेत. देशात विरोध वाढत चालला आहे. आपण निदान नेपाळचे लोकमत भारताच्या बाजूने राहील याकडे लक्ष द्यावे. त्या प्र माणे अ मे रिका, सौदी अरेबियाशी अ स लेले आप ले चां ग ले संबंध वाप रुन पा कि स्तान व र द बाव आ णावा, जो प र्यत आप ले र स्ते सी मा भागात बां धून त या र होत ना ही तो प र्य त यू द्ध टा ळावेच लागेल. हिवाळात चीनही यूध्दास तयार होणार नाही. त्यामूळे सध्या आपल्या संयमाची परीक्षा आहे.

चीन हा साम्राज्यवादी देश आहे.त्याचा इतिहास च तसा आहे. मला वाटतं तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण झाला असता तर चीन ची सीमा भारताला मिळालीच नसती. चीन ला शह द्यायचा असेल तर तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी जोरदार मोहीम भारताने आखावी. त्या साठी शस्त्र,प्रशिक्षण देण्याची तयारी पण ठेवावी. तिबेटी तरुणांना पैसे, शस्त्र पुरुवून अतिर्की कारवाया करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चीन भारताशी युद्ध करणार नाही कारण चीन ची गुर्मी उतरवण्याची जगातील खूप राष्ट्र ची इच्छा आहे . युद्ध झाले तर अनेक देश भारताच्या बाजू नी उभे राहतील . भारताच्या अरुणाचल वर त्याचा डोळा आहे.

१९६२ नंतर चे सर्वात कमि % डिफेन्स बजेट असतना आपले सैन्य कसे लढणार ? ते अत्यंत शूर वीर आहेत पण त्यांना पुरेसे बजेट द्यायला हवे , युद्ध सुरु झल्यावर ५०० कोटि जाहीर केले आहेत , हे आग लागल्यावर विहिर खणण्यासारखे आहे

भारतचा स्वातंत्र्यानंतरचा तिबेट सहीत नकाशा कोणा़कडे उपलब्ध आहे का ? जालीय दुवा असेल तर इथे डकवावा

शेजारी शेजारी जमीन असेल तर काही नालायक शेजारी आपल्या शेत जमिनीत आक्रमण करतात .त्यांना प्रेमाने समजावून काही फरक पडत नाही तुम्ही संयम ठेवला तर ते अजुन तुम्हाला त्रास देतात अडवणूक करतात ह्याचा अनुभव नेहमी आपल्याला येतो. जेव्हा भर चोकात त्याला फोडून काढत नाही तो पर्यंत तो त्रास देतच राहतो. तसेच देशांचे आहे जो पर्यंत तुम्ही आक्रमक भूमिका घेत नाही तो पर्यंत बाजूचा देश त्रास देतच राहणार. नेपाल सारख्या किरकोळ देश पण आपल्या विरोधी जातो ह्या आपले शांती प्रिय धोरण कारणीभूत आहे.

चीनच्या बाॅर्डरवरील रस्त्यांबद्दल उल्लेख आलेला आहे म्हणून बाॅर्डर रोड सारखेच बाॅर्डर रेल्वे बद्दलही इथेच लिहीतो. यांत जम्मु व काश्मीर,लडाख,पंजाब,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, अरूणाचल व आसामचा समावेश १. श्रीनगर - कारगील - लेह ४३० किमी, २०२६ ला पूर्ण करणार. २. जम्मू - पूँच्छ २३४ किमी. २०२५ ला पूर्ण करणार. ३. पठाणकोट - लेह ७२८ किमी २०२३ ला पूर्ण करणार. ४.पट्टी - फिरोजपूर २५ किमी २०२२ ला पूर्ण करणार. डबललाईन (पाकिस्तानी बाॅर्डरला खेटून) मुंबई -जम्मू अंतर २६७ किमीने व मुंबई - अमृतसर अंतर २४० किमीने कमी होणार. फिरोजपुर - अमृतसर अंतर ३२ किमी कमी होणार. भारत पाकिस्तान युध्दातली ही सगळी नेहमीची युध्दभूमी आहे. ५. डेहराडून - उत्तरकाशी ९० किमी २०२६ ला पूर्ण करणार ६. उत्तरकाशी - यमुनोत्री ७. उत्तरकाशी - गंगोत्री ८. ऋषीकेश चामोली १६० किमी २०२६ ला पूर्ण करणार ९. जोशीमठ, बद्रीनाथ १०. सोनप्रयाग - केदारनाथ ११. तनकपूर - बागेश्वर १५५ किमी. २०२६ ला पूर्ण करणार ( नेपाळ व चीन सरहद्द) १२. तनकपूर - जौलिजबी १०७ किमी २०२७ ला पूर्ण करणार (नेपाळ व चीन सरहद्द) १३. जोधपूर - जैसलमेर २९२ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द) १४. जोधपूर फलसुद ११६ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द) १५. अनुपगढ - बिकानेर १५५ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकिस्तान सीमा) १६. मिसामरी - तवांग ३७८ किमी २०२६ ला पूर्ण करणार १७. मुरकोगसेलाक - रूपाई २५६ किमी २०२६ ला पूर्ण करणार १८. उत्तर लखीमपूर - सिलापथर २४७ किमी २०२६ ला पूर्ण करणार

In reply to by फुकनी

आता हा प्रतिसाद नक्की कोणत्या माहितीबद्दल आहे ते कळेना. त्या माहितीच्या खालीच प्रतिसाद चिकटवला असता तर बरे झाले असते. पण हा प्रतिसाद जर बाॅर्डर रेल्वे बद्दल असेल, तर त्यात गोपनीय काहीही नाही.

नेपाळी पण सध्या लैच ट्याव ट्याव करू लागलय. चीन-नेपाळ संबंध पाहताआणि सध्या नेपाळ सरकारचं चीन प्रेम, त्यांचा नवा नकाशा हे सर्व पाहता यांनाही खुमखुमी येतेय. च्यायला, रात्री गल्लीत ड्यूटीला येणारे गुरखे, कपड़े विकायला येणारे नेपाळी यांना आवरावे लागते. आम्हाला उगा तान देऊ नका. आमचं डोकं सध्या खराब आहे. शिस्तीत राहा म्हणा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते आपले बंधू आहेत. राज्यकर्ते आणी नागरीक , आपण गफलत करता कामा नये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कि विचारायच, की बाबारे, चीन नं तर तुमचेही ४ ५ गावं घशात घातले, म्हाइताय का ;)

तैवानच्या हद्दीत विमाने घुसवून: "...Normalized sorties will let the Taiwan secessionists understand the power gap between the Chinese mainland and the island, as they will find themselves struggling to deal with frequent PLA operations, and the US cannot come to their rescue, the expert said....." ग्लोबल टाईम्स * ...Normalized sorties... * ...they will find themselves struggling to deal with frequent PLA operations * and the US cannot come to their rescue, भारतीय हद्दीत पुढे सरकण्याचे प्रयत्न करुन * '...India knows ‘it can’t have a war with China’..' *'"It is normal to see heated nationalism in India, but we don't need to worry whether nationalism will hijack the policymaking of India to further provoke China. When India is in conflict with Pakistan or other neighbors, nationalism might drive New Delhi to take actual operations, but when it comes to China, it is a different story,"...So they might say some harsh words, but they dare not take the first shot against us." - ग्लोबल टाईम्स आता चिनी भाषेतला फरक बघा According to the report, the US has 375,000 enlisted members of its Indo-Pacific Command, including 60 percent of its Navy ships, 55 percent of its Army and two-thirds of its Marine Corps. In addition, with 85,000 forward-deployed soldiers and a large amount of high-tech and new weaponry, the US military has maintained its absolute supremacy in the Asia-Pacific over the years, while also keeping to seek new deployments, budgets and resources using China's and Russia's military development as excuses. In 2020, the US took a series of measures to contain China, on topics including COVID-19, Hong Kong, Taiwan, high-tech and the military. Recently, US warships have repeatedly trespassed into Chinese territorial waters around the Xisha and Nansha islands, conducted operations in the South China Sea and crossed the Taiwan Straits. In a rare move, it has deployed three aircraft carriers to the region. Chinese military experts told the Global Times that China has expelled the trespassing US warships and conducted exercises to boost its combat capability, showing its will and capability to safeguard its sovereignty and territorial integrity. "...Both countries (चीन व युएसए) should keep communication channels open, implement the military confidence building and crisis prevention agreements and create conditions for communication and dialogues on nuclear security, cyberspace, outer space and artificial intelligence to manage their differences and prevent conflicts, the report suggests...." ग्लोबल टाईम्स तेच भारताबाबतचा बढाईखोरपणा "....Indian forces use weapons bought from different countries which many not coordinate with each other well, not to mention their undisciplined troops who can blow up their own submarine in a dockyard and shoot down a friendly helicopter, observers noted...." "...Indian economist Swaminathan Aiyar said in a Saturday report by Indian media outlet the Economic Times that the gap between China and India militarily and economically is five times bigger than it was in 1962. Attempting military adventures in that area is asking to be thrashed again and humiliated on a scale five times bigger than in 1962. In a potential self-defense counterattack, China will secure its own territory and not likely claim Indian territory after emerging victorious, but the battle will deeply hurt India so much that global position and economy would go backwards to decades ago, Chinese analysts said...." -ग्लोबल टाईम्स बेसिकली आमेरीका इंडोपॅसिफीक मध्ये दबाव कायम ठेवेल पण आमेरीकन जनमत कोणतेही युद्ध अंगावर घेण्याच्या मनस्थितीत नाही याची कल्पना, स्वतःची सुधारलेली आर्थीक व सामरीक स्थिती त्याच वेळी भारतासहीत इतरदेशांच्या अर्थव्यवस्था करोनाने हवालदिल झालेल्या असताना पुर्ण युद्ध अंगावर घ्यायचे नाही पण युद्ध न करता पुशकरुन जेवढे पदरात पाडून घेता येईल तेवढे पदरात पाडून घेणे असा सर्वसाधारण पवित्रा असावा. अर्थात चिनला भाषा कोणती समजते ती आमेरीकेसारख्या बलाढ्य देशाच्या बलाढ्य आरमाराची